प्रगती!!! नक्की कशासाठी?
💬 प्रतिसाद
(72)
स
स्पा
गुरुवार, 10/14/2010 - 13:02
नवीन
हो मला आठवले.......
मी १० वर्षाचा होतो फक्त....... तेव्हा मी तुम्हच्या कडे बघून बाबांजवळ हट्ट धरला होता.....
मला याच आजोबांकडून वडापाव हवाय म्हणून...... ;)
- Log in or register to post comments
च
चिरोटा
गुरुवार, 10/14/2010 - 18:31
नवीन
अरे मी प्रगतीतून ९३ मध्येपण प्रवास केलाय. पण तिचाही वेग डेक्कन क्वीनएवढाच असल्याने फार काही प्रगती झाली आहे असे म्हणता येणार नाही.
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
गुरुवार, 10/14/2010 - 11:58
नवीन
मला वाटते कि प्रगती झालीस कि नाही हे ठरविण्यासाठी काही ठराविक विभाग करावेत. आणि प्रत्येक विभागाला एक जाहीर चर्चा करून गुणांकन द्यावे.
जसे : मोबायील.
आता मोबायील म्हणाले कि त्यात प्रगती आणि हानी दोन्ही आलेच.
एक वर्षाखेर त्या मोबायील ने किती मदत केली आणि त्यामुळे किती हानी झाली हि माहिती करून त्या विभागाला एक गुण देणे. दरवर्षी त्या गुण पडताळून बघणे आणि निश्चित करणे कि खरच ह्या विभागात प्रगती करत आहोत कि अधोगती.
अवांतर : हे सर्व करण्याची खूप इच्छा आहे पण कुठून सुरुवात होत नाहीये.
(my boss always says "just talk numbers")
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/14/2010 - 12:57
नवीन
मोबायील शब्द लै आवडला.
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 10/14/2010 - 11:59
नवीन
जाऊ द्या हो शेठ, कशाला उगाच त्रास करुन घेता ?
ह्या दुनयेत एकही गोष्ट चांगली नाही आणि वाईटही नाही, जे काही आहे ते आपल्या दृष्टीकोनावर आहे.
पटतेय तोवर रहायचे / पहायचे / ऐकायचे, जास्तच झाले तर आपला मार्ग मोकळा आहेच की.
शोलेचे ते जगप्रसिद्ध नाणे सोडुन प्रत्येक गोष्टीला २ बाजु आहेत, काय म्हणता ?
असा त्रागा ( बहुतेक जराशा हार्श पण चपखल शब्द ) करुन काही फायदा होत नाही.
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
गुरुवार, 10/14/2010 - 12:07
नवीन
>>जे काही आहे ते आपल्या दृष्टीकोनावर आहे.
पण डॉन भाऊ बर्यान्चदा आपल्याला दुसर्यांच्या दृष्टीकोनाचेच बळी पडतो.
>>पटतेय तोवर रहायचे / पहायचे / ऐकायचे, जास्तच झाले तर आपला मार्ग मोकळा आहेच की.
कोणता मार्ग आणि कुठे आहे ? मार्ग एकंच आहे, जनजागृती करणे. जनहितार्थ जे आहे तेच करावयास भाग पाडणे
>>असा त्रागा ( बहुतेक जराशा हार्श पण चपखल शब्द ) करुन काही फायदा होत नाही.
नाही डॉन भाऊ, प्रत्यके वेळेस असे होत नाही. कुठेतरी कधीतरी प्रत्येकजन विचार करत असतो. हि चर्चा शेकडो लोक वाचत असतात, पुढे हजारो वाचतील. कदाचित काहीतरी चांगले घडू शकेल.
- Log in or register to post comments
स
सुहास..
गुरुवार, 10/14/2010 - 12:27
नवीन
राक्या , तुला नेमक काय झालय ?
परत ब्रेक-अप झाला का 
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 10/14/2010 - 13:01
नवीन
मदर इंडीया काय म्हणते बघा!
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
गुरुवार, 10/14/2010 - 14:18
नवीन
श्री.ममो यांनी मूळ धाग्यात आणि नंतर काही प्रतिसाद वाचून झाल्यावर एक खुलासा म्हणून 'हे एका अज्ञाताने लिहिले आहे' अशी त्यांची चेतावणी वाचल्यानंतर एक बाब ते मान्य करतात की आपल्या देशाने प्रगती केली आहे, आणि करत आहे. हा Present Continuous Tense इथे महत्वाचा आहे, कारण जर अमेरिकेसारखा संपन्न देश प्रगतीची पाने उघडण्याचे थांबवत नाही, तर भारताने तरी 'आपली प्रगती झाली पुरेशी, आता थांबू या' असे म्हणण्यात हशील नाही.
प्रगतीची व्याख्या हा खरंतर एक मानसिक खेळ आहे आणि अगदी रामायण-महाभारतापासून चालत आलेली मानवाची 'सुखाची' ती एक कल्पना आहे. कृष्णेकाठी राहून मासेमारी करून, प्रसंगी कंदमुळे खाऊन जगणारा, आणि त्या वडाच्या तुटपुंज्या आवरणात राहूनही संसाराद्वारे प्रजा वाढविणारा आपला मूळपुरूष काय आणि शिक्षणामुळे आता देशाची सीमा ओलांडून थेम्स नदीच्या किनारी संडेला बोटिंग करीत एखाद्या एल्सीला घेऊन 'फिशिंग' करणारा एकनाथ काय, दोघांच्या 'जीन्स' मध्य मूलतः काहीच फरक नाही...फरक आहे तो प्रगतीच्या व्याख्येत. या एकनाथाचे पूर्वज उन्हाळ्यात उन्हामुळे मरत आणि जे जगत ते थंडीने काकडून मरत...जे चिवट असत तेच तगत, आणि प्रजा वाढविण्यासाठी सक्षम राहत. आता एकनाथाकडे सहा आकडी पासबुक असल्याने त्याला वाचविण्यासाठी उन्हाळ्यात लॉईडचा ए.सी. येतो तर थंडीसाठी इव्हान्सचा हीटर आहे. म्हणजेच एकनाथाच्या पिढीने त्या निसर्गाच्या रट्ट्यावर काही प्रमाणात का होईना मात केली आहे हे मान्य करावे लागेल आणि ही मिळकतच तो 'मानवाने विज्ञानाच्या आधारे केलेली प्रगती' मानतो.
सरासरी आयुष्यमान वाढले आहे हे कुणीही नाकबूल करणार नाही. बायपास नावाची कसली तरी शस्त्रक्रिया आहे हे ५० वर्षापूर्वी ऐकीवातदेखील नव्हते पण आज देशाच्या निमशहरी भागातील नाक्यानाक्यावर याचे स्पेशालिस्ट गेट उघडे ठेवून तुमचे आयुष्य वाढविण्याची हमी देत बसले आहेत. ही मानली तर प्रगतीच आहे आणि इथला कुणीही सदस्य वेळ आली तर 'बायपास' करून घेण्यासाठी पाठ फिरविणार नाही.....(देव करो तशी वेळ कुणावर येऊ नये....!!)... आता शरीर विज्ञानात ही जी क्रांती झाली आहे तिचे दुष्परिणाम शोधण्याचा प्रयत्न कुणी करू नये कारण त्यातून डोकेदुखीशिवाय काहीही निष्पन्न होत तर नाहीच, शिवाय मेडिसिन, इंजिनिअरिंगमधील नवनवीन होत असलेली प्रगती थांबतही नाही. 'थांबला तो संपला' हे विधानच मानवी प्रगतीला पोषक असे ठरले गेले आहे.
ही प्रगती माणसं बदलु शकली का? असा म.मो. यांनी प्रश्न विचारला आहे. काय नेमके तुम्हाला इथं अभिप्रेत आहे? सुख, समाधान शेवटी हे मानण्यावर आहे, हे तरी तुम्हाला अमान्य नसेल ना? १ लाख हजार कोटी रुपयांची माया जमविलेले मुकेश अंबानी काय आणि एस.टी.स्टँडवर हमाली करणारी व्यक्ती काय....दिवसातून दोनच वेळा जेवणार ना? "माझ्याकडे तुफान पैसा आहे म्हणून मी आजपासून चार वेळा ताजमध्ये जावून चापणार..." असे कुणीही म्हणत नाही. नीतासाठी मुकेशने आठ हजार कोटीचा राजेशाही बंगला बांधणार अशी घोषणा केली, म्हणजे नीता त्यात राहून डबल सुखी होणार असा बिलकुल अर्थ कुणी घेत नाही. ती ती व्याख्या त्या त्या व्यक्तीच्या मगदुराप्रमाणे ठरत असल्याने ती बदलणे स्वाभाविकच आहे. रिलायन्सचा नोकर सकाळी ८ वाजता उठतो तर रिलायन्सचा मालक पहाटे ५ वाजता उठून कामाला सुरुवात करतो. आता या दोन व्यक्तींच्या सुखाची आणि प्रगतीची व्याख्या कोणती असेल?
प्लॅस्टिक आणि इंटरनेट यांचे उदाहरण श्री.ममो यांनी दुष्परिणाम दर्शविणासाठी दिले आहे ते मला साफ अमान्य आहे. या दोन्ही घटकांना 'अतिरेक' नावाचा फ्लॅग लावला तरच त्याचे परिणाम 'दु' होतात अन्यथा प्लॅस्टिक सुरुवातीच्या काळात 'सु' म्हणूनच ओळखले जात होते आणि आजही ते पूर्णतः व्यवहारातून सरकारने घालविले आहे का? नाही, तर उलट ते ठेवण्यासाठी त्यात 'प्रगती' दायक सुधारणाच सुचविल्या आहेत. दुष्परिणामच बघायचा असेल तर आजकालची वर्तमानपत्रे पाहा, जी २०-३० पानांच्या अनावश्यक आवृत्त्या काढत असतात त्यामुळे पर्यावरणाची काय हालत होत आहे, त्यावर खरा तर तज्ज्ञांनी प्रकाश टाकणे गरजेचे बनले आहे. तीच गोष्ट 'इंटरनेट' ची. मला तर वाटते इंटरनेटच्या उपयुक्ततेविषयी लिखाई-पढाई होण्यापेक्षा ते किती हानीकारक आहे हे सांगण्याचाच ढोल जास्त पिटला जातो, पण असे असले तरी म्हणून इंटरनेट आपल्या आयुष्यातून निघून जाईल असे कुणीही मानू नये.
५० वर्षापूर्वी घरगुती 'गॅस' इथे आला त्यावेळीही 'हे म्हणजे, प्रगतीच्या नावे घर अपवित्र करण्याचाच सरकारचा डाव आहे, गॅसमुळे स्फोट होतात, भाकरीला वास येतो, भात कच्चा राहतो....मुलांना धोकादायक असतो' आदी वावड्या उडाल्या होत्या असे आपले वरिष्ठ सांगतात. आज काय स्थिती आहे? आहे एक तर गृहिणी या राज्यात जी गॅसवर स्वयंपाक नको म्हणेल? याचेही दुष्परिणाम असतीलच, पण म्हणून ही सुविधा कुणी काढून टाकून 'घरोघरी मातीच्या चुली' लावा असे म्हणणार नाही.
निसर्गाने वरदान दिले आहे असे तुम्ही म्हणता. कसले आहे हे वरदान? 'जगा आणि जगू द्या...' ही खरेतर निसर्गाची शिकवण आहे जी कुठल्याही चार भिंतीत असलेल्या शाळेत शिकविली जात नाही. चुका होत असतील निसर्गाचे संतुलन कायम ठेवण्यामध्ये, पण म्हणून त्या सुधारल्या जात नाहीत, किंवा जाणार नाही असे मानव कधीही म्हणणार नाही. हे एक चक्र आहे जे पृथ्वीच्या पहिल्या प्रकाशमय दिवसापासून अखंड चालत आले आहे, आणि ते चालते ठेवले आहे केवळ मानवानेच....पशूत आणि मानवात फरक आहे तो इथेच. ~ टेंड्न्सी टु सर्वाईव्ह.... डायनॉसॉर सदृश्य प्राण्यांनी ही टेन्डंसी ठेवली नाही आणि ते नष्ट झाले. मानवाने मेंदूच्या आधारावर ती टेंडंसी सातत्याने जागृत ठेवली आणि इतके उल्कापात झाले तरी तो 'प्रगती' नामक वाहनात बसून अखंड प्रवास करीत राहिला आहे, राहील.
मानवी प्रगतीवर बोलता बोलता म.मो. यांचा 'अज्ञात' एकदम लग्नाच्या मांडवात कुंडल्यांतील ग्रहांसमवेत उतरला आहे. मी तर म्हणेन हे सर्व सापेक्ष आहे. तुम्हाला असे म्हणायचे आहे का, लग्नातील हे बिनकामाचे आगावू राहुकेतू फक्त हिंदू अंगणातच बागडतात? कुठल्याही खंडात हे बंधू त्या त्या रुपात गोंधळ घालत असतीलच. त्याचा मानवी प्रगतीशी दूरान्वयेही संबंध नाही. लग्ने अडून राहतात, आणि होतही असतातच. ग्रहांचा हा खेळ आज २०१० साली आहे, म्हणजे तो १९१० वा १८१० साली किती असेल...? तितका तरी राहिलेला नाही ना? आणि जर तसा राहिला नसेल तर मग ते तुम्ही आम्ही घेत असलेल्या शिक्षणामुळेच आणि विचारात पडत गेलेल्या फरकामुळेच घडून आले आहे, असे म्हटले पाहिजे.
जेवणातील अन्नघटकांच्या प्रयोगाविषयी जी क्रिया जागतिक पातळीवर चालली आहे ते करणारी बुद्धी शेवटी मानवाचीच आहे ना? तिथे तर कुणी "मंगळ्या" आलेला नाही. विविधरितीने अनेकविध प्रयोग करत राहण्याची जिद्द मानवाने नेहमीच बाळगली आहे, मग अन्नधान्यावरील प्रयोग तरी का वेगळे मानावेत. शेवटी आजच्या बाळ्याने आपल्या आईला 'आई' म्हटले किंवा 'मम्मी' म्हटले, तिला त्याच्याविषवी वाटणारी ओढ तीळभरदेखील कमी होणार नाही.....बाळ्याच्या बाळासाहेब झाल्यावर त्याला आईची ओढ राहिली नाही तर तो परिस्थितीचा दोष असेल, प्रगतीचा नाही.
तुमच्या त्या "अज्ञाता" च्या शंका रास्त असतीलही पण दुर्दैवाने त्या 'निगेटीव्ह' विचारसरणीच्या वाटतात. त्यांना विरोध किंवा उपदेश करायचा म्हणून हे लिखाण नाही तर त्यांना समजून घेऊन ती विचारसरणी पॉझिटिव्ह कशी होईल हे पाहण्यासाठी आहे. आजच्या पिढीकडे प्रचंड प्रमाणावर उत्साह आला आहे, ती ऊर्जा, शक्ती वाया जाऊ नये असे वाटत असेल तर उगाच कुठल्यातरी भावनेच्या आहारी जाऊन प्रगतीची कवाडे बंद करण्याचा यत्न करू नये, इतकेच.
इन्द्रा
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
गुरुवार, 10/14/2010 - 14:44
नवीन
फिदा
(वाचून खोक्यात पहिले जे आले तेच लिहील.)
- Log in or register to post comments
र
रन्गराव
गुरुवार, 10/14/2010 - 15:14
नवीन
techno utopia ह्याच इतका लांबलचक भाषांतर असेल हे माहिती नव्हत ;)
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
गुरुवार, 10/14/2010 - 16:47
नवीन
१. श्री.गांधीवादी ~ 'फिदा' ही अदा कधीही खोक्यातून येत नाही, ती येते ती डोक्यातूनच कारण तिथे एक रज्जू असा असतो की, व्यक्ती पाहिली असो वा नसो, तिच्याकडून मेंदूने घेण्यासारखे काहीतरी स्वीकारले (मौखिक्/लिखित्त्/दृश्य स्वरूपात....इ.) तर त्याचे वहन तात्काळ त्या रज्जुकडे जाते आणि अगदी सहजगत्या त्या भावनेला आकार येतो 'व्वा..." ~ ही व्वा दादच फिदाचे प्राथमिक स्वरूप आहे.... म्हणून मी तुमची ही दाद खोक्यातून आलेली नाही असे ठामपणे म्हणू शकतो. एनी वे, थॅन्क्स !
२. श्री.रन्गराव ~ वेल, प्लॅटोचे रिपब्लिक आणि यूटोपियाचा उगम त्यामुळे मला माहित आहे, पण त्याने वा त्याच्या फॉलोअरने 'टेक्नो यूटोपिया' सादर केला असला तर त्यापासून मी अनभिज्ञ आहे. अर्थात तसे असेल तर मी जरून वाचेन.
(ते 'नाद खुळा' मात्र भावले....! थॅन्क्स !)
इन्द्रा
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 10/14/2010 - 19:24
नवीन
हल्ली मी दोन पवारांना जामच वचकून असतो - एक दिल्लीतले आणि दुसरे हे मिसळपाववरचे! :)
(घाबरट)बेसनलाडू
अर्थात इंद्रराजेंच्या अभ्यासपूर्ण आणि सविस्तर प्रतिसादांचे आपण पंखे आहोत, हेही कबूल करतोच.
(प्रामाणिक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
गुरुवार, 10/14/2010 - 20:32
नवीन
अहो बेला.....दिल्लीतल्या पवारांना त्यांचा एकुलता एक जावईदेखील वचकून राहत नाही, मग इतरांची बात सोडाच. तीच गोष्ट या मिपावरील पवाराची ! गल्लीतून मी मध्यरात्री ये-जा करीत असलो तरी तेथील कुत्रेही साधे गुरगुरून मला किंमत देत नाही....असला आमचा वचक ! तेव्हा फर्गेट धिस वचक बिझिनेस.
प्रतिसाद आवडल्याचा उल्लेख केला त्याबद्दल मन:पूर्वक आभार.
इन्द्रा
- Log in or register to post comments
श
शहराजाद
Fri, 10/15/2010 - 05:33
नवीन
उत्तम प्रतिसाद इन्द्रा, कीर्तीला 'साजेशी संथ पण दमदार सुरवात' आणि पुढे 'घणाघाती आणि शैलीदार फटकेबाजी' :)
आमचा प्रतिसाद आमच्या शक्तीप्रमाणे छोटासा- 'सहमत'.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 10/14/2010 - 19:32
नवीन
काय रे बाबा , का एवढा उदास ? डाक्तरकडं जाऊन ये ...
आणि इंद्रजीत पवारांचा प्रतिसाद आता संपेल मग संपेल करत वाचला तरी अर्धवटच वाचून झाला होता...मग तो नाद सोडला.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
गुरुवार, 10/14/2010 - 20:41
नवीन
".....मग तो नाद सोडला..."
~ अहो शिल्पाताई, असं करू नका. तिकडे त्या प्रियाली, पुष्करिणी आणि अदिती ओरडायला लागलेत की मी त्यांच्या धाग्यावर तीनच ओळीचा प्रतिसाद दिला यासाठी.....आणि इकडे तुम्ही तो मोठा झाला म्हणून अर्धवट वाचला...आणि नंतर तर नादच सोडला असे म्हणता.
मग मी नेमके काय करावे असे इथल्या भगिनीमंडळाचे म्हणणे आहे?
इन्द्रा
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 10/14/2010 - 21:42
नवीन
तुम्ही दुसऱ्या कोणाचं ऐकू नका...जे तुम्हाला पटेल तेच करा.
(पण माझंच जरा ऐका आणि हे ssssssss एवढे प्रतिसाद नकाच टंकू...एकदम शाळेतला धडा वाचल्यासारखे वाटते. हेच इतर मेगाबायटी प्रतिसाद टंकूंना पण सांगणे आहे.)
- Log in or register to post comments
P
Pain
Fri, 10/15/2010 - 05:45
नवीन
हाहाहा :D मस्त!
आणि ते इंद्रजीत नसून इन्द्र्राज/ इन्द्रराज आहे.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Fri, 10/15/2010 - 07:34
नवीन
वरील काही प्रतिसादात सर्वश्री निरंजन, गांधीवादी आणि Pain यांनी मांडलेलेच मुद्दे पुढे थोडे विस्ताराने घेतो.
अपघाती आणि मधुमेही मृत्युंची संख्या चिंतेत टाकणारी आहेच; पण जीवनमृत्युचा खेळ ही काय या विज्ञानयुगाची देणगी नसून पूर्वांपार चालत आलेली एक नैसर्गिक प्रक्रिया असे मानले तर या आकडेवारीची भीती काही प्रमाणात कमी होईल. अर्थात रस्त्यावरील अपघात ही 'निसर्गरावां'ची करणी नसून Man destroys Man या व्याख्येत येईल. पण पूर्वीही भूकंप, महापूर, दुष्काळ या आपत्तीत मरणार्यांची संख्या प्रचंड होतीच, तीच गोष्ट आजारपणाची. प्लेग, कॉलरा, कुपोषण या सारख्या महामारीत लाखाने जीव गमावल्याचा आपला इतिहास सांगतोच. परकीय आक्रमणाची तर गोष्ट हीच बाब अधोरेखीत करते की सैनिकांसमवेत नागरी कत्तलीही तीव्रतेने झाल्या होत्या.
श्री.निरंजन म्हणतात ".....ज्या दुष्काळात लोक मेले तोही मानवनिर्मितच होता." ठीक आहे. पण असे किती दुष्काळ या देशात पडले आणी त्यातील मानवनिर्मित किती? माझ्या माहितीप्रमाणे १९४३-४३ चा बंगालचा एकमेव (लक्षणीय) अपवाद वगळता अन्य दुष्काळ हे निसर्गाच्या कोपाचीच उदाहरणे आहेत. सरकार काही करत नाही असेही वारंवार म्हणू नये. त्यावेळीही चर्चिलने नसले तरी लॉर्ड वेव्हेलसारख्या हिंदुस्थानप्रेमी व्हाईसरॉयने शेवटी दुष्काळावर मात केलीच. तीच गोष्ट आजच्या सरकारचीही आहे. असेल प्रचंड प्रमाणावरील भ्रष्टाचार यंत्रणेत, पण म्हणून दुष्काळ, भूकंप, महापूर आदी विक्राळ भयप्रसंगी शासन यंत्रणा किती आणि कशी राबते हे मी स्वतः अनुभवलेय.
हां ~~ एक गोष्ट निर्विवादपणे मान्य करायला हरकत नाही की, नात्याच्या बंधनातील वीण हळुहळू सैलसर होत चालली आहे. वाढते घटस्फोट, एकत्र कुटुंब पद्धतीचा होत असलेला र्हास, वृध्दाश्रमांची भासणारी गरज आणि वाढती संख्या, नव्या नवरीला घरी केवळ नवराच असावा अशी वाटणारी आस (अपवाद आहेत...), पन्नास हजार पगार झाला तरी सहा आकडेवाल्याकडे असूयेने बघणारी नजर, सदैव शिडीच्या पायर्या चढण्याच्या नादात आयुष्याला दिलेले रखरखीचे रूप, घरी आलेली मित्र, नातेवाईक, शेजारी कधी एकदाचा आता उठेल (कारण 'अनुबंध...' चुकेल) आणि बाहेर पडेल याची वाट पाहणारे जोडपे.... ही मानसिकता बदलण्याचे कारणदेखील भौतिक प्रगतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. वरपांगी आम्ही सुखी आहोत, घर्/फ्लॅट्/बंगला/इंटेरिअर्/बॅन्क बॅलन्स/मुलांचे शिक्षण इ. सगळे आलबेल आहे. मूलभूत बदल झाला आहे तो जीवनविषयक दृष्टीकोन व सामाजिक व्यवहार या घटकात. "मी माझ्यापुरता.." ही या प्रगतीच्या युगाची देणगी आहे असे म्हणू या हवे तर.
असे असले तरी सर्वत्रच कृष्णमेघ दाटून आले आहेत अशी परिस्थिती बिलकुल नाही. 'इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम या नवी दिल्लीच्या संस्थेने करवून घेतलेल्या एका पाहणी असे आढळून आले की, पोस्ट-ग्रॅज्युएशनच्या विविध शाखांत घेणारे विद्यार्थी (मेल-फीमेल....जे साधारणतः Mature समजले जातात) आणि त्यांचे आई-वडील यांचा जीवनविषयक दृष्टीकोन आणि मूल्ये बव्हंशी एकसारखीच होती. याचात अर्थ असा की आजचा विद्यार्थी ज्यावेळी 'मागच्या' पिढीच्या वर्तनावर टीका करतो, त्याचवेळी त्याच्या लक्षात आणले जात होते की काही वर्षानी खुद्द त्याची गणनादेखील 'मागच्या पिढीतील माणूस' अशी होणार आहे; सबब हे एकमेकाच्या कॉलरी धरणे हे चक्र सदोदितच चालणारे आहे हे सिद्ध झाले.
मुलगा प्रस्थापितांविरूध्द, बापाविरूद्ध बंड करतो आहे असे म्हटले जाते; असेलही... मात्र हे बंड औरंगजेबाने शहाजहानविरूद्ध केलेल्या धाटणीचे असणार नाही हे नक्की, कारण जरी आपल्या आजच्या शिक्षणाने 'श्याम' आणि 'श्रावण' मोठ्या प्रमाणावर जन्माला येत नसले तरी चंगेझखान/नादीरशाह तर येत नाहीत, ही बाब सर्वमान्य व्हावी.
इन्द्रा
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Fri, 10/15/2010 - 08:38
नवीन
पवार साहेब,
शब्दा शब्दाशी सहमत आहे..
असो,
प्रगती झाली काय किंवा न झाली काय.. बेसिक्स जिथल्या तिथेच आहेत.. (वाटत नसले तरी) :)
थेअरी ऑफ रिलेटीविटीच म्हणा हवं तर. ;)
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 10/15/2010 - 09:33
नवीन
थोडक्यात आम्हि लवासा गाव वसवायचे नाहि असे म्हणा ना..कशाला उगेच आड वळणाने प्रगति वगैरे..
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2