Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्राचा विकास कष्टाळू बिहारी लोकांमुळेच : राजपुत्र राहुलजी

ह
हुप्प्या
गुरुवार, 10/21/2010 - 20:19
🗣 146 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
29125 वाचन

💬 प्रतिसाद (146)
म
मृत्युन्जय Fri, 10/22/2010 - 09:59 नवीन
असामान्य कर्तुत्व तुमच्या दृष्टीने बघायला गेले तर या मंडळींनी दाखविलेले नाही पण त्यांना परतपरत मते देणाऱ्यांच्या दृष्टीने ते नक्कीच आहे. एक मिनिट. कर्तुत्व बघुन या देशात कोण मत देतं? कित्येक दशके निवडणुका जिंकणार्या माननीय पप्पु कलानी यांनी नक्की कोणते कर्तुत्व दाखवले आहे? लालू म्हणतो की त्याने रेल्वेला न भूतो न भविष्यति फायदा कमावून दिला. ममतातै म्हणतात हे साफ खोटे आहे. रेल्वेची बॅलन्स शीट फुगवलेली आहे. आता मला सांगा एक कोणितरी खोटारडे आहे की नाही? कसले कर्तुत्व याच्यात मग? राहुल गांधींनी नक्की कुठले कर्तुत्व दाखवले आहे? नाही म्हणजे तुम्ही म्हणत आहात की त्यांना मत देणार्या लोकांना दिसले. नक्की काय दिसले ते कळेल का खरं? विनोद खन्ना, जयाप्रदा, दुसरी जया, सिद्धु यांनी नक्की काय कर्तुत्व दाखवले आहे शिंचे? अर्रे कर्तुत्ववान माणसाला मते मिळत असली असती तर भाटिया पुण्यातुन जिंकुन नसते का आले? त्यांना परतपरत लोकं मतं देत आहेत कारण त्यांच्या नावापुढे गांधी घराण्याची पदवी आहे. सोनिया गांधी सुद्धा काय त्याच्या कर्तुत्वामुळे काँग्रेस अध्यक्षा झाल्या का? राजीव गांधींची विधवा नसल्या असत्या तर काँग्रेसच्या चपराश्यानेसुद्धा भाव दिला नसता त्यांना. षंढ काँग्रेसींना बाइचा पदर धरुन चालायची सवय आहे बाकी काही नाही? नाही म्हणजे बाई जर इंदिरा गांधी असेल तर काहीच चुकीचे नाही त्यात. तिच्या काळात संपुर्ण मंत्रिमंडळात केवळ एकच पुरुष होता असे उगाच का म्हणतात? पण सोनिया गांधी? तिच्यापुढे पदर पसरावा असे का वाटले काँग्रेसींना? पक्षात तेव्हाही शरद पवार, माधवराव सिंधिया, राजेश पायलट, मनमोहन सिंग, प्रणव मुखेर्जी होते ना? मग हे सगळे असताना सोनिया गांधी कशाला हव्या होत्या? कारण या सगळ्यांची मोट बांधायला कोंग्रेसला नेहेमीच गांधी घराण्याचा टेकु लागतो. आणि कोंग्रेसला लागतो म्हणुन तो पुर्ण देशाच्या माथी मारला जातो. राहुल गांधी आज ना उद्या पंतप्रधान होतील. म्हातार्या जेटली, मोदी, अडवाणींना मत देण्यापेक्ष तरुण, देखणा, ऐटबाज (महत्वाचे म्हणजे गोरा आणि गांधी खानदानातला) राहुल गांधी बरा म्हणुन बरेच लोक त्यला मत देतील. पण हे त्याचे कर्तुत्व नाही. ही गांधी घराण्याची किमया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 10/22/2010 - 10:41 नवीन
इथे एक मुळातच गल्लत होत आहे आणि ती गल्लत तुम्ही-आम्ही सगळेच शिकले सवरलेले लोक करतो. आणि ती गल्लत म्हणजे "कर्तृत्व" या संकल्पनेची आपली व्याख्या आहे तीच सगळ्यांना थोड्याबहुत प्रमाणावर पाळावी असे आपल्याला वाटते. आपण शिकलेसवरलेले, बऱ्यापैकी नोकरी-व्यवसाय असलेले लोक आहोत.त्यामुळे आपल्याला infrastructure, वीज-पाणी पुरवठा, शिक्षण, माझ्याप्रमाणे अर्थशास्त्रात रस असलेल्यांना भारतीय अर्थव्यवस्था नीट सांभाळणे यासारखे मुद्दे ’कर्तृत्वाचा’ भाग वाटतात.पण हातावर पोट असलेल्यांना हे मुद्दे पूर्णपणे गैरलागू असतील.त्यांना ’अमुक एक नेता’ किंवा अमुक एक पक्ष आपल्याला दोन वेळच्या भाकरीची सोय करेल अशी (बऱ्याचदा खोटी) आशा वाटली तर ते त्या उमेदवाराला/पक्षाला मत देतात. अनेकदा मतदान हे पक्ष बघून होते, उमेदवार बघून नाही त्यामुळे दोन्हींचा उल्लेख इथे करत आहे. डेव्हिड धवन-गोविंदाचे चित्रपट का चालले?कारण अशा एखाद्या चित्रपटातील गोविंदाप्रमाणेच आपल्या प्रेमात एखादी करोडपतीची मुलगी पडेल, आपणही जगावर राज्य करू यासारखी स्वप्ने हे चित्रपट हातावर पोट असलेल्यांना विकतात. आणि त्या स्वप्नांच्या जोरावर असे लोक आपले जीवन सुसह्य बनवितात.आता अशा लोकांना ’एक डॉक्टर की मौत’ सारखे एका चांगल्या researcher ला आपल्या यंत्रणेने कसा त्रास दिला आणि त्याला आत्महत्या करायला कसे भाग पाडले हे दाखविणारे चित्रपट अजिबात भावणार नाहीत. त्याचप्रमाणे हातावर पोट असलेल्यांसाठी उमेदवार/पक्षाचे कर्तुत्व म्हणजे "त्यांचे जीवन सुसह्य बनवेल असे काहीतरी पक्ष/उमेदवार करेल ही आशा" अशी व्याख्या केली तर ती चुकीची ठरू नये. आजही हातावर पोट असलेल्या मतदारांची संख्याच कितीतरी जास्त आहे हे वेगळे सांगायला नकोच.आणि आपल्यासारखे शिकले सवरलेले लोक मतदानाच्या दिवशीची सुटी बघून खंडाळ्याला पळतात हे पण वेगळे सांगायला नको.तेव्हा निवडून येणारे आपल्या दृष्टीने कर्तृत्वहिन असतात पण त्यांना मते देणाऱ्यांच्या दृष्टीने नाही. यातूनच दुर्दैवाची गोष्ट अशी की असे राज्यकर्ते लोकांना नुसती खोटी आश्वासने देऊन भूलवतात आणि हातोहात फसवितात. पण तरीही विरोधी पक्ष जोपर्यंत ही फसवणूक effectively दाखवून देत नाही आणि आपणही तुमचे जीवन सुसह्य बनवू असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण करत नाहीत तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. पण असे करण्यापेक्षा आपल्या विरोधी पक्षाचा भर असतो घराणेशाहीवर आणि सोनियांच्या परदेशी मुळासारख्या प्रश्नांवर. आणि अशा प्रश्नांमध्ये सामान्य लोकांना खरोखरच इंटरेस्ट वाटावे असे काही आहे असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
समंजस Fri, 10/22/2010 - 11:49 नवीन
विवेचन छान आहे परंतू हे कागदावरच छान वाटतं :) कारण प्रत्यक्षात या पद्धतीने उमेदवार(बरेचसे) नाही निवडून येत. निवडणूका जिंकण्याचं समिकरण हे एवढं सरळ सोपं नाही :) आपण एकाद्या निवडणूकीत कोणा उमेदवाराकरीता प्रचार केला आहे का? मतदान होण्याच्या शेवटच्या २४-४८ तासात जे काही समिकरण राबवल्या जातं त्याचा अनुभव घेतला आहे का? नसल्यास घेउन बघा ;) [ अवांतरः अनुभवी ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 10/22/2010 - 14:22 नवीन
मतदान व्हायच्या २४-४८ तास आधी मोठ्या प्रमाणावर पैसे, दारू आणि इतर गोष्टी वाटून मते विकत घेतली जातात. आणि हा प्रकार सरळसरळ कायद्याचे उल्लंघन करणारा आणि अत्यंत अयोग्य आहे. असे घाणेरडे प्रकार आणि गुंडगिरी सज्जन माणसाला जमणार नाही म्हणून त्याच्यासाठी संसदेत पोहोचणे आणि म्हणूनच पंतप्रधान बनणे हे दुरापास्त आहे असे कोणी म्हणत असेल तर त्यात अमान्य करण्यासारखे काही आहे असे वाटत नाही.पण या चर्चाप्रस्तावात आणि इतर काही प्रतिसादांमध्ये गांधी घराण्यात जन्माला येणे हेच मोठे क्वालिफिकेशन आहे आणि ते पंतप्रधानपदासाठी गरजेचे आहे हा जो सूर आळवला जात आहे त्याला मात्र माझा विरोध आहे म्हणूनच या चर्चेत मी प्रतिसाद लिहिले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस
ग
गांधीवादी Sat, 10/23/2010 - 06:12 नवीन
>>मतदान व्हायच्या २४-४८ तास आधी मोठ्या प्रमाणावर पैसे, दारू आणि इतर गोष्टी वाटून मते विकत घेतली जातात. आणि हा प्रकार सरळसरळ कायद्याचे उल्लंघन करणारा आणि अत्यंत अयोग्य आहे. असे घाणेरडे प्रकार आणि गुंडगिरी सज्जन माणसाला जमणार नाही म्हणून त्याच्यासाठी संसदेत पोहोचणे आणि म्हणूनच पंतप्रधान बनणे हे दुरापास्त आहे असे कोणी म्हणत असेल तर त्यात अमान्य करण्यासारखे काही आहे असे वाटत नाही सहमत >> पण या चर्चाप्रस्तावात आणि इतर काही प्रतिसादांमध्ये गांधी घराण्यात जन्माला येणे हेच मोठे क्वालिफिकेशन आहे आणि ते पंतप्रधानपदासाठी गरजेचे आहे हा जो सूर आळवला जात आहे त्याला मात्र माझा विरोध आहे म्हणूनच या चर्चेत मी प्रतिसाद लिहिले आहेत. गांधी घराण्यात जन्म घेतल्यामुळे जी प्रतिष्ठा, सुरक्षा, आर्थिक पाठबळ, राजकीय प्रक्रियेची संपूर्ण माहिती घेण्याची जी सहजासहजी(इथे सहजासहजी हा शब्दच खूप महत्वाचा आहे) संधी मिळते, तिच्यामुळे त्यांना राजकीय व्युहात घुसणे सुककर असते. तसेच शेकडो वकील, वृत्तपत्रे, हाताशी ठेऊन कायदा कसा पाळायचा (कि न पाळून आपले इप्सित कसे सध्या करायचे) याचे सविस्तर शिक्षण यांना मिळते. त्यामुळे राजकीय पूर्वज क्वालिफिकेशन असेल तरच माणूस इथे टिकू शकतो. अन्यथा देश हितासाठी तो कुठे संपला तरी ती बातमी एका किरकोळ वृत्तपत्रात कोपर्यात सुद्धा येणार नाही. पण भक्कम राजकीय घराण्यातला एक माणूस गेला तरी त्याच्या नावाचे भांडवल करून पुढील शे दोनशे वर्षे तरी त्याच्या नावावर मते मागता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
व
विजुभाऊ Fri, 10/22/2010 - 09:38 नवीन
राहूल हे गांधी आहेत वरूण हे देखील गांधी आहे. कोणाचा वकूब किती आहे हे भारतीय जनता चांगलेच ओळखून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंख
ग
गांधीवादी Sat, 10/23/2010 - 06:16 नवीन
एकाच्या पित्याने हुशारीने मिळविले / टिकविले. दुसर्याचे पिता देश हितासाठी केवळ झिजले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
क
क्लिंटन Sat, 10/23/2010 - 07:35 नवीन
एकाच्या पित्याने हुशारीने मिळविले / टिकविले. दुसर्याचे पिता देश हितासाठी केवळ झिजले.
तुमच्या या चर्चेतील प्रतिसादावरून तरी तुम्ही राजीव गांधी देशहिताकरता झिजले असे म्हटणार नाहीत याविषयी शंका नाही. सध्याच्या राजकारणात देशहिताकरता वगैरे कोणी झिजत नसते.आता माफक अपेक्षा इतकीच की पैसे खायचे असतील तर जरूर खा पण लोकांसाठी काहीतरी काम तरी करा. राजीव गांधी देशहिताकरता झिजले वगैरे माझ्यासारखा वरकरणी* राजीव समर्थक वाटणाराही म्हटणार नाही. तेव्हा संजय गांधी देशहिताकरता केवळ झिजले असे जर म्हणत असाल तर मात्र बोलणेच खुंटले. *: वरकरणी राजीव समर्थक वाटणारा का? कारण माझा मुद्दा इतकाच की प्रत्येक राज्यकर्त्याच्या कामाचे त्याचे अडनाव/पक्ष/चेहरा या गोष्टी सोडून देऊन वस्तुनिष्ठ विश्लेषण करावे आणि त्याने काही चांगले केले असेल तर त्याचे श्रेय त्याला जरूर द्यावे. पण मिपावर राजीव गांधी हे नाव ऐकताच त्यांना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचेही श्रेय द्यायचे नाही असे वाटणारे सदस्य आहेतच. त्यांना मी कट्टर राजीव समर्थक वाटत असेलही. वस्तुस्थिती तशी नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ग
गांधीवादी Fri, 10/22/2010 - 04:40 नवीन
महाराष्ट्र राज्य एक प्रगत राज आहे हे हुप्य्या सारख्या माननीय सदस्यांना माहित नाही हे एक आश्चर्याच म्हणावे लागेल. शेकडो आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या चितेवर शेकून, लाखो उपाशी बालके टाहो फोडत आहेत, त्यांचा टाहोपेक्षा मोठी गर्जना CWG मध्ये करून, गरीबाच्या पोटाला दोन घास, राहायला दोन फुट जमीन कशी मिळेल, ह्यापेक्षा सडलेल्या भारतीय लोकशाहीचा उदोउदो करणाऱ्या, विचारवंताच्या जीवावर जी नेत्रदीपक प्रगती झाली आहे त्यामुळे कदाचित माननीय हुप्य्या यांचे डोळे दिपून गेले असतील. किती प्रगती झाली हे मोजण्यासाठी खेडेगावात, झोपडपट्टीत जाऊ नका हो. एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यावर जावा, पंचतारांकित हॉटेल मध्ये जावा, एखाद्या BMW / MERC मधून फिरा. भाकरी नाही तर रोज पिझ्झा खावा, गोल्फ क्लब मध्ये रोज चक्कर मारा, हिंजेवाडीतील एखाद्या उच्चभ्रू सोसायटी मध्ये ३/४ BHK घर घ्या. मगच तुम्हाला कळेल कित्ती कित्ती प्रगती झालेली आहे. आणि ह्या प्रगतीचे द्योतक म्हणजे लवकरच मुंबयीचे शांघाई , पुण्याचे मुनिक, बेंगलोरचे बीजिंग, कलकत्याचे कॅलीफोर्निया आणि दिल्लीचे हॉगकॉग होणार आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रिया देशपांडे Fri, 10/22/2010 - 04:46 नवीन
राहुल गांधीला तिकडे बरीच मते मिळवायची अहेत. निवडणूक आहे ना तिकडे?तो इकडे मुंबईत आला तरी असेच काहीसे मराठी माणसासाठी बोलेल.
  • Log in or register to post comments
स
स्वैर परी Fri, 10/22/2010 - 07:31 नवीन
+१!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिया देशपांडे
व
विश्वनाथ मेहेंदळे Fri, 10/22/2010 - 11:14 नवीन
चला हो, काहीही काय? मराठी मतांसाठी मराठी माणसाची स्तुती करण्याची राहुलला काहीही गरज पडली नाही. त्यांनी आपल्या **वर जोरकस लाथ मारली तरी आपण त्यांनाच निवडून देतो दर वेळी. उगाच स्तुती करण्याच्या भानगडीत का पडतील? बाकी मुंबईतल्या इतक्या मतदारसंघात भय्यांची मते निर्णायक आहेत की तो इथे येऊन पण त्यांचेच गुणगान गाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिया देशपांडे
ई
ईन्टरफेल Fri, 10/22/2010 - 04:50 नवीन
आमाला तर वाटते म्हाराश्ट्राची प्रगती झाली नाय........पन म्हाराश्ट्रातल्या ऊधोगपतींची प्रगती जरुर झाली!
  • Log in or register to post comments
प
प्रिया देशपांडे Fri, 10/22/2010 - 05:06 नवीन
तू आजच्या काळात कम्युनिस्टासारखा का बोलतोस? पश्चिम महाराष्ट्रातले अनेक शेतकरी सधन आहेत्.अनेकांकडे मर्सेडिस आहे त्याचे काय? शेतकर्‍यांना करमाफी असते त्याचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईन्टरफेल
न
नितिन थत्ते Fri, 10/22/2010 - 05:14 नवीन
हॅहॅहॅ त्या मर्सिडिझा त्यांना शेती करून मिळालेल्या नाहीत. :) बाकी मूळ धाग्याबाबत : हुप्प्या यांनी आपल्या चष्म्याचा "राहुल गांधी" हा फिल्टर काढून जगातल्या इतरही गोष्टींकडे बघावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिया देशपांडे
ग
गांधीवादी Fri, 10/22/2010 - 05:17 नवीन
आपल्याकडून अश्याच प्रतिसादाची अपेक्षा होती, ती पूर्ण झाली हे बघून आनंद झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ग
गांधीवादी Fri, 10/22/2010 - 05:15 नवीन
http://www.prahaar.in/columns/summary/30296.html शेतक-यांनी कर्जफेड केली नाही तर सहकारी संस्थांचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली. एरव्ही परस्परांची खुस्पटे काढणारे एका सुरात बोलताना पाहिल्यावर कुणाचाही असा समज होऊ शकतो की, शेतकरी कर्जबुडवा आहे. सरकार शेतक-यांवर कर्जमाफीची उधळण करीत आहे आणि त्याला कर्ज बुडवण्याची सवय लागली आहे. शेतक-यांचे तारणहार म्हणवून घेणारे नेतेच असे बोलताहेत म्हणजे पाणी डोक्यावरून चालले असावे. एवढा स्पष्टवक्तेपणा दाखवल्यामुळे हे नेते शहरी पांढरपेशांच्यादृष्टीने पुरोगामी ठरू शकतात. पण शेतक-यांना सल्ले देणा-यांनी शेतक-यांचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कोणती पावले उचलली याचे उत्तर त्यांच्याकडे आहे का ? शेतक-यांना भिकेला लावायला यांचीच धोरणे कारणीभूत नाहीत का ? यंदा विदर्भात अतिवृष्टीमुळे पिके हातची गेल्याच्या बातम्या येत आहेत, त्या त्यांच्या कानावर आल्या नाहीत का? त्यामुळे कर्जफेड दूर राहिली, शेतक-यांना यंदा किमान जगता येईल अशी स्थिती आहे का? मग कशाच्या बळावर शेतक-यांना कर्जफेडीचे सल्ले देत आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिया देशपांडे
ग
गांधीवादी Fri, 10/22/2010 - 05:20 नवीन
शेती आणि शेतकरी; कर्ज आणि कर्जमाफी
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Fri, 10/22/2010 - 06:15 नवीन
परमपूज्य राहुलजी हे निव्वळ आपल्या कर्तृत्वाने पुढे आले आहेत. अगदी सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे तळागाळातून आपली कारकीर्द सुरु करुन निव्वळ कर्तबगारीवर भावी पंतप्रधान या पदी पोचले आहेत असे मिसळपावच्या काही सदस्यांना वाटत असेल तर त्यांना माझा दंडवत आणि कोपरापासून नमस्कार. भारतात पुरेसे मूर्ख लोक आहेत आणि पुरेसे संधीसाधू, हलकट नेते आहेत जे कुठलीही लायकी नसलेल्या, निव्वळ अमक्या एका घराण्याचा कुलदीपक आहे म्हणून एखाद्याला डोक्यावर घेतील आणि त्याच्या हातात आपल्या देशाच्या नाड्या देतील. कागदोपत्रीच्या लायकीला काही अर्थ नाही. अमके वय, दिवाळखोर नाही असल्या पात्रतेवर कोट्यावधी लोक लायक ठरतील. परंतु राहुलजींचे गांधी आडनाव हेच एकमात्र क्वालिफिकेशन आहे. भारतात कागदोपत्री लोकशाही असली तर जनमानसात राजेशाहीच आहे. लोकांना अमक्या एका घराण्याच्या पिढ्यानपिढ्या निवडून द्यायलाच आवडतात ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या कसोटीवर राहुलजी राजपुत्र ह्या पदाला १००% लायक आहेत. हे महारथी उद्या पंतप्रधान होऊन देशाचा गाडा हाकू लागतील ह्याविषयी मलातरी शंका नाही. थत्ते काका, मी राहुलजींची दुर्बीण तेव्हाच काढीन जेव्हा राहुलजी असले तारे तोडणे बंद करतील. तुमची वट असली तर त्यांना निरोप पोचवा की असे भलतेसलते बोलू नका. माकडाच्या हाती आयतेच कोलित मिळते!
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 10/22/2010 - 06:29 नवीन
हुप्प्या यांच्याशी अंशतः सहमत आणि असहमत. असहमती यासाठी की घराणेशाही मधे मला तरी वैयक्तीक काहीही वाईट वाटत नाही. कोण म्हणतं घराणेशाही वाईट म्हणून? सातवहनांनी ४०० वर्षे राज्यं केलं. कुठे नुकसान झालं घराणेशाहीमुळे? भारतातच नव्हे तर जगात घराणे शाही मोठा प्रमाणात होती आहे. आणि त्यात तथ्यंही आहे. दत्तोवामन पोतदारांनी लग्नं न करता ब्रम्हचारी राहील्यामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले असे सावरकरांनी म्हटले होते. त्यांनी जर लग्न करून प्रजोत्पत्ती केली असती तर त्या हुषार संतानांची समाजाला गरज होती असे म्हटले होते. त्या न्यायाने चांगली घराणेशाही चालली असती एकवेळ. त्यामुळे गांधी-नेहरू (सॉरी नेहरूच म्हणायला पाहीजे. म. गांधीबाबांचा काही संबध नाही यात. हे सगळे नतद्र्ष्ट नेहरूंचेच प्रताप आहेत(आता नेहरूभक्त अन्य नेहरूभक्तांनी लिहीलेल्या नेहरुस्तुतीसुमनांचे ढिगाने पुरावे देतील. पण असो त्याने काहीच फरक पडत नाही))घराण्यापेक्षा एखादे एतद्देशीय घराणे चालले असते. बाकी प्रतिसादाशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ग
गांधीवादी Fri, 10/22/2010 - 06:45 नवीन
हुप्प्या यांच्याशी पूर्ण आणि पुपे यांच्याशी अंशतः सहमत. उपक्रमावरील thanthanpal तुम्हीच का अशी शंका येऊ लागली आहे. http://mr.upakram.org/node/2622 माननीय उपक्रम सदस्य thanthanpal यांचे लेखन : http://mr.upakram.org/tracker/2347
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
न
नितिन थत्ते Fri, 10/22/2010 - 06:55 नवीन
>>एखादे एतद्देशीय घराणे चालले असते काश्मीर हा परदेश आहे असे पुपे यांचे मत वाचून काळेकाकांना काय वाटेल हे आठवून डोळे पाणावले. :( @गांधीवादी - ठणठणपाळ हे हुप्प्या नसणार. भाषेची अशुद्धता नाही. ठणठणपाळ यांचे भारत वि इंडिया हे गाणे हुप्प्याजींच्या लेखनात कधी दिसले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ग
गांधीवादी Fri, 10/22/2010 - 07:01 नवीन
भाषेची अशुद्धता काय, मुद्द्मून सुधा तयार कर्ता येती. प्रत्येक प्लॅटफॉर्म वर वेगवेगळेच गाणे गावे लागते, तरच बिझनेस होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 10/22/2010 - 07:44 नवीन
काश्मीरच काय उप्र सुधा परदेशच आहे. आणि हो इटली सुधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ग
गांधीवादी Fri, 10/22/2010 - 07:47 नवीन
पुणे परदेशात येते का हो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 10/22/2010 - 07:49 नवीन
नाही मुंबई येते. पूर्वी येत नव्हती आता येते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ग
गांधीवादी Fri, 10/22/2010 - 07:52 नवीन
'आम्ही तीन चार वेळा परदेशी वारी केली' हे आज आम्ही ताठ मानेने सांगू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 10/22/2010 - 07:58 नवीन
आम्ही तसे सांगतोच. आणि अमेरीकेचा मार्ग परदेशातूनच जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
म
मालोजीराव Fri, 10/22/2010 - 17:10 नवीन
हे सगळे नतद्र्ष्ट नेहरूंचेच प्रताप आहेत
पु पे सर तुम्ही नेहरूंच्या एडविना प्रतापबाद्दल बोलताय का ? Image removed. नेहरूंनि शिवरायांबद्दल गरळ ओकल्यापासून मला तर त्यांचा किंचितही आदर वाटत नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
न
नितिन थत्ते Fri, 10/22/2010 - 06:48 नवीन
हुप्प्याजी तुम्ही इथे धाग्यांवर धागे काढून काही होणार आहे का? त्यापेक्षा दुर्लक्ष करावे. आता राजपुत्रांचे म्हणाल तर मातोश्रीवरचे युवराज सुद्धा असेच तारे तोडत असतात. त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो की नाही? पुढे नवे तलवारधारी राजपुत्र सुद्धा तारे तोडतील तेव्हापण आपण दुर्लक्ष करू. हो की नाही? "परमपूज्य राहुलजी हे निव्वळ आपल्या कर्तृत्वाने पुढे आले आहेत. अगदी सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे तळागाळातून आपली कारकीर्द सुरु करुन निव्वळ कर्तबगारीवर भावी पंतप्रधान या पदी पोचले आहेत" असे मिसळपाववर तरी कोणाच्या स्वप्नात आले असेल असे मला वाटत नाही. तसे मिपाकरांना वाटते अशी स्वतःचीच कल्पना करून घेऊन आपण त्रागा कशाला करून घेता ? भारतात सुद्धा ते कर्तृत्वाने पुढे आले आहेत असे कोणाला वाटत नसेल. आणीबाणीनंतरच्या जनता सरकारच्या काळात इंदिरा गांधीना नामोहरम करण्यासाठी चौकशी आयोग, खटले वगैरे चालू झाले. पण "त्यामुळे इंदिरा गांधींनाच प्रसिद्धी मिळाली" असे तेव्हाच्या वृत्तपत्रांचे म्हणणे होते. तसे काही तुमच्या सततच्या धाग्यांमुळे मिपावर राहुल गांधीबाबत व्हायला नको. ;) तुम्ही "परमपूज्य राहुलजी" हे उपरोधाने लिहिले आहे असे अज्ञ मिपाकरांना कदाचित कळणार नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Fri, 10/22/2010 - 16:54 नवीन
मातोश्रीवरचे थोरले आणि धाकले युवराज हेही भारतीय जनमानसातील राजेशाहीचेच प्रतीक आहे. पण हे संस्थान आता मोडकळीला आलेले आहे. थोरल्या राजांच्या माघारी ह्या संस्थानाची रया पार जाणार आहे हे सांगायला फार जाण असायची गरज नाही. त्यामुळे त्याविषयी राग असला तरी धोका कमी. ह्या घराण्याला सत्ता मिळायची शक्यता नगण्य. फारतर दोनचार शहरे, डझनभर गावे इतकेच. गांधी घराण्याचे तसे नाही. आजचे पंतप्रधानही जाहीरपणे म्हणतात की मी महाराणींचा आदेश असेपर्यंतच ह्या पदावर राहीन. हे काय स्वाभिमानाचे, लोकशाहीचे लक्षण आहे का? आपले हे पंतप्रधान म्हणे बुद्धीवादी, अफाट अभ्यास, अर्थशास्त्र तज्ञ आहेत. असे लोक जर इतके लीनदीन असतील तर सामान्यांची काय कथा? इथे जे राहुलजींचे भक्त आहेत त्यांचे जाऊ द्या. पण निदान कुंपणावरच्या काही लोकांना ते मत देतील तेव्हा राहुलजींचे गहन विचार माहित असावेत, आठवावेत अशी इच्छा आहे. माझ्या काथ्याकूटामुळे राहुलजींना मी जास्त प्रसिद्ध करेन असा म्या पामराचा समज नाही, माझी तितकी कुवतही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ग
गांधीवादी Sat, 10/23/2010 - 06:20 नवीन
पूर्वी राष्ट्रपती पद हे खेळणे म्हणून जाहीर झाले, आता पंतप्रधान. मग राजकारभार कोण चालविते , पक्षाध्यक्ष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
क
क्लिंटन Fri, 10/22/2010 - 07:55 नवीन
मी माझ्या ब्लॉगवर ’राजीव गांधींविषयी’ या चर्चेत एक मुद्दा मांडला आहे. तोच राहुल गांधींनाही लागू पडतो.तेव्हा तो मुद्दा इथे लिहित आहे. प्रत्येकाला अभिनेता आवडण्यामागे/नावडण्यामागे वेगवेगळी कारणे असतात. कोणाला अभिनेत्याच्या आवाजातील चढउतार आवडतात तर कोणाला देहबोली. कोणाला चेहऱ्यावरील हावभाव आवडतात तर कोणाला अजून काही.प्रत्येकाला अभिनेत्याची कोणती गोष्ट भावेल याचे काही गणिती सूत्र नक्कीच नाही.त्यामुळेच कोणाला तीन खानांमधला एक आवडतो तर कोणाला हृतिक. आता समजा एखाद्याला आमिर खान आवडत असेल त्याने शाहरूख समर्थकाला चुकीचे म्हटले तर तो त्याच्या बाजूने बरोबरच असतो. पण असे चुकीचे म्हणणे योग्य आहे का? कारण त्याच न्यायाने इतर अभिनेत्यांचे समर्थक आमिर समर्थकाला चुकीचे म्हणतील. तेव्हा चित्रपट क्षेत्रातल्या दोन दर्दी आणि माहिती असलेल्या व्यक्तींचे कोणता अभिनेता चांगला यावर एकमत होणे कठिण आहे. आता वळू या लोकशाहीकडे.आपण शिकले-सवरलेले, चांगल्यापैकी नोकरी/व्यवसाय असलेले आणि आज दोन वेळेला जेवायला मिळाले तरी उद्या मिळेल का असा प्रश्न न पडणारे लोक आहोत. आपल्या सारख्यांना कदाचित राष्ट्राचा अभिमान (म्हणून राम मंदिर, अणुचाचण्या, भारताच्या पंतप्रधानपदी परदेशात जन्मलेली व्यक्ती नको, स्वीस बॅंकेतून पैसे परत आणणे वगैरे) मुद्दे भावतील कारण आपण हातावर पोट असलेल्यांना हे मुद्दे भावतील का? काही काळ प्रचारतंत्र जोरात वापरून त्यांना या मुद्द्यांचे महत्व जरूर पटवून देता येईल पण ते फार काळ चालणार नाही. १९९० मध्ये लालूप्रसाद यादवांनी बिहारच्या मागासवर्गीय जनतेला सांगितले--’मै आपको स्वर्ग तो दे नही सकता लेकिन स्वर तो जरूर दुंगा’. पिढ्यानपिढ्या जातीव्यवस्थेच्या ओझ्याखाली दबलेल्या त्या मतदारांना या गोष्टीचे आकर्षण वाटले नसेल तर नवलच. तसेच ’कॉंग्रेस का हाथ आम आदमी के साथ’ ही कॉंग्रेस पक्षाची घोषणा अशा हातावर पोट असलेल्यांना आपल्यासाठी वाटली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. आता आपण आपल्या बाजूने विचार केला तर अशा लोकांचे मत जरूर चुकीचे वाटेल पण आपण स्वत: त्यांना आयुष्यात येत असलेल्या हालअपेष्टांना सामोरे गेलेलो नसल्यामुळे ते नक्की कसा विचार करतात आणि त्यांना काय भावते हे आपल्याला सांगता येणे कठिण आहे. यात अनेकदा होते असे की राजकारणी मंडळी भूलथापा देऊन या सामान्य जनतेला हातोहात फसवतात. असे म्हणतात की Public memory is short. त्यामुळे राजकारणी मंडळी आपला स्वार्थासाठी वापर करत आहेत हे त्यांना समजायला उशीर होतो. हे सर्व बाजूंसाठी तितकेच लागू होते. आपल्यासारखे लोक बिहारच्या जनतेने लालू यादवांना आणि राबडीदेवींना वर्षानुवर्षे निवडून कसे दिले, कॉंग्रेसने ’फारसे काही न करता’ त्यांचा पक्ष एकामागून एक निवडणुका कशा जिंकतो किंवा पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट वर्षानुवर्षे निवडून कसे येतात हा प्रश्न जरूर विचारू. पण त्याचवेळी कॉंग्रेस समर्थक मुंबई महापालिकेत काहीही न करता शिवसेना कशी निवडून येते किंवा गुजरात दंगलींमध्ये हात असूनही (खरा-खोटा भगवंतालाच माहित) नरेंद्र मोदी निवडून कसे येतात असे प्रश्न विचारतील. आता असा प्रश्न विचारणे म्हणजे एखाद्या आमीर खान समर्थकाने ’काय तो इतरांना सलमान खान आवडतो समजत नाही. आमचा आमीर किती चांगला अभिनय करतो’ असे म्हटल्यासारखे आहे. असा प्रश्न विचारून उपयोग नाही कारण दोन अभिनेत्यांचे समर्थक वेगळ्या मापदंडांवर दोन अभिनेत्यांना मोजतात. त्यामुळे निर्णयात थोडी तरी subjectivity येतेच. तेव्हा तुम्हाला राहुल गांधी पंतप्रधान म्हणून आवडणार नसतील तर कॉंग्रेसविरोधी मत द्यायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि तो तुम्ही वापरणार यात कोणतीही शंका नाही.पण लोकशाही ही आकड्यांचा खेळ असतो.जर लोकांनी राहुल गांधींनाच पंतप्रधान व्हायचा जनादेश दिला तर ते पंतप्रधान होतील आणि तसा जनादेश दिला नाही तर होणार नाहीत.
भारतात पुरेसे मूर्ख लोक आहेत आणि पुरेसे संधीसाधू, हलकट नेते आहेत जे कुठलीही लायकी नसलेल्या, निव्वळ अमक्या एका घराण्याचा कुलदीपक आहे म्हणून एखाद्याला डोक्यावर घेतील आणि त्याच्या हातात आपल्या देशाच्या नाड्या देतील
भारतात लोक मूर्ख आहेत असे तुम्हाला वाटते. पण त्याचबरोबर कॉंग्रेसविरोधी मत देणाऱ्यांना कॉंग्रेस समर्थकही मूर्खच म्हणतील हे पण ध्यानात घ्यायला हवे. आणि आपले लोक परत परत गांधी घराण्याला डोक्यावर का घेतात याचे कारण मी वर स्पष्ट केले आहेच.
कागदोपत्रीच्या लायकीला काही अर्थ नाही. अमके वय, दिवाळखोर नाही असल्या पात्रतेवर कोट्यावधी लोक लायक ठरतील.
अर्थ कसा नाही?तुम्ही या पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्हीही लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहायला पात्र आहात. निवडून आलात आणि लोकसभेत बहुमताचा पाठिंबा मिळवलात तर श्री. हुप्प्या हे भारताचे पुढील पंतप्रधान असतील. तसे झाले तर निवडून देणारी जनता चांगली आणि राहुल गांधींना निवडून दिले तर असे निवडून देणारी जनता मूर्ख या बोलण्याला काही अर्थ नाही.
भारतात कागदोपत्री लोकशाही असली तर जनमानसात राजेशाहीच आहे.
या बोलण्याला काय आधार आहे?मग शास्त्री, देसाई, चरण सिंह, वि.प्र.सिंह, चंद्रशेखर, नरसिंह राव, वाजपेयी, देवेगौडा, गुजराल, मनमोहन सिंह हे पंतप्रधान झालेच कसे? तुम्हाला निवडणुकीत लागणारा निकाल आवडत नसेल तर तसे वाटायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे पण आपल्याला न आवडणारा निकाल लागला म्हणून जनता मूर्ख आहे, जनमानसात राजेशाहीच आहे अशा विधानांना मात्र काहीच आधार नाही.
हे महारथी उद्या पंतप्रधान होऊन देशाचा गाडा हाकू लागतील ह्याविषयी मलातरी शंका नाही.
आणि जर लोकांनाही ते गाडा हाकण्यास योग्य नाहीत असे वाटले तर लोक त्यांना लोकसभेत बहुमत देणार नाहीत आणि त्या परिस्थितीत ते पंतप्रधान बनू शकणार नाहीत. बाकी चालू द्या. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ऋ
ऋषिकेश Fri, 10/22/2010 - 08:22 नवीन
वा! मस्त प्रतिसाद यानंतर काहि बोलणे.. कसली उत्तरे देणे शिल्लकच राहिलेले नाहि.. माझे टंकायचे कष्ट वाचवल्या बद्दल आभार आणि प्रतिक्रीयेला अर्थातच +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ग
गांधीवादी Fri, 10/22/2010 - 09:00 नवीन
>>तुम्ही या पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्हीही लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहायला पात्र आहात. निवडून आलात आणि लोकसभेत बहुमताचा पाठिंबा मिळवलात तर श्री. हुप्प्या हे भारताचे पुढील पंतप्रधान असतील. आपली अगोदरच्या खूप चर्चा वाचल्या आहेत, नक्कीच तुमचे विचार बर्यान्चदा पटतात. पण ह्यावेळेस असहमत आहे. आपण कोणत्या विश्वात राहता हे पहिले नमूद करणे. इथे नगर सेवकाला एखादे काही विचारायला जरी गेले तरी त्याच्या आजूबाजूची(गँग) मंडळी अंगावर धावायला येते (अनुभव घेऊन बघा). सध्या नगरसेवकाच्या निवडणुकीला देखील हाणामार्या / खुना-पाडी होते, तिथे श्री. हुप्प्या यांना लोकसभेत जाण्यासाठी कोणत्या थराला जावे लागेल हे देवालाच माहित. सध्या इथे नेत्यांचे कमी आणि गुंडांचे राज्य आहे. आम्ही ते अनुभवतो. (यांना घाबरून आहे, त्यामुळेच तर इथे बरेच जण खरे नाव घेऊन लिहित नाही) सगळा कारभार यांच्याच हातात आहे, गल्ली-बोळात वावरताना, राजकारण करताना नागरिकशास्त्राचे पुस्तक फेकून द्यावे लागते आणि एक नवीन पुस्तक विकत घ्यावे लागते, त्याची किंमत कित्येक हजारो करोड आणि हजारो निष्पाप लोकांचे प्राण देऊन चुकवावी लागते. श्री. हुप्प्या/कोणीही आजच्या घडीला ठरलेली हि किंमत देऊन त्या खुर्चीवर बसण्याचे धाडस करतील, असे वाटत नाही. (त्यापेक्षा शिका, थोडे पैसा गाठीला बांधा, संधी मिळाली कि फुर्रर्र व्हा. हा साधा सोपा मार्ग जनता स्वीकारू इच्छिते.) बर, एखाद्याने जीव धोक्यात घालून देखील ह्या गुंडांच्या (हो गुंडच, राजकारणी नव्हे) विरोधात कोणी उभा राहिला तर हे गुंड त्याचा जीवच घेणार नाही हे कशावरून. तुम्ही येणार का श्री. हुप्प्या यांना वाचवायला ? सतीश शेट्टी गेले, असे अजून जातील, किती जण जातात त्यांना वाचवायला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 10/22/2010 - 09:41 नवीन
तुमचा मुद्दा पूर्णपणे योग्य आहे पण तो या चर्चेशी संबंधित नाही.जर का चर्चेचा मुद्दा असता की कॉंग्रेसचे नेते गुंडगिरी करून, लोकांना धमकावून निवडून येतात तर त्या चर्चेत हा मुद्दा अगदी फिट होता.आणि मग तीच गोष्ट सगळ्या पक्षांबाबत थोड्याबहुत प्रमाणात लागू झाली असती. तेव्हा पंतप्रधान बनायला गुंडगिरी करता यायला हवी असा या चर्चेचा मुद्दाच नाही. तर या चर्चेच्या प्रस्तावातील एकूण रोखावरून असे भासवायचा प्रयत्न होत आहे की केवळ गांधी घराण्यात जन्माला आले म्हणून पंतप्रधानपद आपसूकपणे त्या व्यक्तीला मिळते! म्हणजे गांधी घराण्यातील जन्म हे पंतप्रधानपदाचे क्वालिफिकेशन आहे असे भासविण्याचा वारंवार प्रयत्न होतो. आणि ते तसे नाही हे उदाहरणांसह स्पष्ट केलेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ग
गांधीवादी Fri, 10/22/2010 - 09:52 नवीन
क्लिंटन साहेब, (कधीतरी) नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून बाहेर या. >>म्हणजे गांधी घराण्यातील जन्म हे पंतप्रधानपदाचे क्वालिफिकेशन आहे असे भासविण्याचा वारंवार प्रयत्न होतो. क्वालिफिकेशन नाही, गांधी घराण्यातील जन्म मस्ट आहे. मला तर माननीय युवराज राहुल बाबा यांच्यापेक्षा तुम्हीच जास्त क्वालिफाईड वाटता. पण काय देशाचे दुर्दैव बघाना, तुम्ही त्या घराण्यात जन्म घेतला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 10/22/2010 - 09:58 नवीन
क्लिंटन साहेब, (कधीतरी) नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून बाहेर या
सल्ल्याबद्दल धन्यवाद.
क्वालिफिकेशन नाही, गांधी घराण्यातील जन्म मस्ट आहे
अच्छा म्हणजे लालबहादूर गांधी,मोरारजी गांधी, चरण गांधी,विश्वनाथ प्रताप गांधी,चंद्रशेखर गांधी,पी.व्ही.नरसिंह गांधी,अटलबिहारी गांधी, एच.डी.गांधी, इंदरकुमार गांधी आणि मनमोहन गांधी ही आपल्या पंतप्रधानांची नावे आहेत हे मला माहितच नव्हते की. मला वाटत होते की त्यांची नावे लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई, चरण सिंह, विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, पी.व्ही.नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी, एच.डी.देवेगौडा, इंदरकुमार गुजराल आणि मनमोहन सिंह अशी आहेत अशा भ्रमात मी होतो. माझा भ्रम दूर केल्याबद्दल आपले आभार कोणत्या शब्दात मानू तेच कळत नाही.
मला तर माननीय युवराज राहुल बाबा यांच्यापेक्षा तुम्हीच जास्त क्वालिफाईड वाटता.
काय सांगता?याच प्रतिसादात तिसऱ्यांदा धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
म
मिसळभोक्ता Fri, 10/22/2010 - 18:54 नवीन
मला क्लिंटनसाहेबांचे प्रतिसाद खूप आवडतात. वरील प्रतिसादाची, त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीतला सर्वोच्च प्रतिसाद, अशी नोंद करण्यात यावी. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 10/22/2010 - 21:51 नवीन
धन्यवाद मिभो साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
प
पंख Sat, 10/23/2010 - 07:41 नवीन
तुझे आडनाव गांधी (तेच घराणे बर का ?) तर तू ईथे ईतके प्रतिसाद टंकत बसला असतास का ? ईथे मिपाकर युवराज "क्लींटन गांधी " या विषयावर एकमेकाना बडवत बसले असते ! बाळा पुस्तकातून बाहेर ये अन "गांधी " नाममहात्म्य मान्य कर ! काँग्रेसचे अस्तित्त्व केवळ "गांधी " या शब्दामुळेच आहे.. ज्या ज्या काळात काँग्रेसमधे गांधी नव्हते त्या काळात हा पक्ष रसातळाला होता.. (आता ईंदीराबाईच्या आणीबाणीचे ऊदा. देऊ नकोस, तो अपवाद होता ) "गांधी" या नावाची बाय डीफॉल्ट एक जादू आहे त्यामुळे कुणी शेंबडं पोरगही गांधी असल्यामुळे लोकमान्य होतं त्यात त्याचं कर्तुत्त्व काय असते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 10/23/2010 - 08:17 नवीन
बाळा पुस्तकातून बाहेर ये अन "गांधी " नाममहात्म्य मान्य कर
सुचनेबद्दल धन्यवाद.
ज्या ज्या काळात काँग्रेसमधे गांधी नव्हते त्या काळात हा पक्ष रसातळाला होता.. (आता ईंदीराबाईच्या आणीबाणीचे ऊदा. देऊ नकोस, तो अपवाद होता )
असे एकच उदाहरण सिलेक्टिव्हली वगळायचे कारण काय?आणि आणीबाणी इंदिरा गांधींनी का लादली? त्यात १९७२ च्या दुष्काळामुळे लोकांमध्ये वाढलेला असंतोष, १९७३ च्या आखाती युद्धामुळे तेल महागल्यामुळे भडकलेली महागाई, बिहारमधील नवनिर्माण आंदोलन आणि गुजरातमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन याचा काहीच वाटा नाही का?देशातील वातावरण १९७४ पर्यंत कॉंग्रेसविरोधी बनत होतेच आणि किंबहुना इंदिरा गांधींनी म्हणूनच आणीबाणी लादली असे म्हटले तरी चालेल. आणीबाणी आली नसती तरीही कॉंग्रेसचा पराभवच झाला असता असे मानायला नक्कीच जागा आहे. याचे कारण जून १९७५ मध्ये गुजरातमध्ये कॉंग्रेसचा प्रथमच झालेला पराभव, विविध पोटनिवडणुकांमध्ये हक्काच्या जागी कॉंग्रेसचे पराभव (उदा. शरद यादव जबलपूरमधून पोटनिवडणुक जिंकून लोकसभेवर जाणे) यासारख्या घटनांवरून म्हणायला नक्कीच जागा आहे.आणीबाणी आल्यामुळे उत्तर भारतात कॉंग्रेसचा धुव्वा उडाला तसा कदाचित उडाला नसता.पण पराभव झाला असता हे म्हणायला नक्कीच जागा आहे. काही मुद्दे १. नेहरूंच्या काळात कॉंग्रेसचा एक केरळ विधानसभा निवडणुक वगळली तर सर्वत्र विजयच झाला होता. पण २. इंदिरा गांधींच्या काळात १९६७ मध्ये कॉंग्रेसने प्रथमच लोकसभेतील २/३ बहुमत गमावले.बंगालपासून उत्तर प्रदेशापर्यंत सर्वत्र कॉंग्रेसविरोधी पक्षांची राज्य सरकारे आली. तेव्हा दिल्लीपासून कलकत्त्यापर्यंत जाताना एकही कॉंग्रेसशासीत राज्य दिसणार नाही असे म्हटले जायचे. तसेच १९६७ मध्ये कॉंग्रेस पक्षाचा तामिळनाडूत पराभव झाला आणि त्यानंतर आजपर्यंत राज्यात कॉंग्रेसचे सरकार येऊ शकलेले नाही. ३. १९७१ च्या लोकसभा आणि १९७२ च्या राज्य विधानसभा निवडणुकांमधील यशानंतर कॉंग्रेसची बाजू पडती होती याचा परामर्श वर केला आहेच. १९७७ च्या निवडणुकांविषयी वेगळे बोलायलाच नको. ४. १९८० मध्ये इंदिरा गांधींचे पुनरागमन झाल्यानंतर १९८३ मध्ये आंध्र प्रदेशात रामारावांनी तर कर्नाटकात हेगडेंनी कॉंग्रेसला चोप दिला. ही दोन राज्ये १९७७ साली सुध्दा कॉंग्रेसच्याच पाठिशी होती हे ध्यानात घ्यायला हवे. तसेच राजीव गांधींच्या कारकिर्दीत १९८४ च्या लोकसभा निवडणुकींमधील झंझावातानंतर मार्च १९८५ मध्ये कॉंग्रेस पक्ष उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान यासारख्या राज्यात जिंकला.पण प्रत्येक ठिकाणी त्या पक्षाचे बळ डिसेंबर १९८४ पेक्षा कमी झाले होते. उदाहरणार्थ डिसेंबर १९८४ मध्ये कॉंग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशात ८५ पैकी ८३ लोकसभेच्या जागा जिंकल्या.त्याच न्यायाने पक्षाने विधानसभेत विधानसभेत ४२५ पैकी किमान सव्वा तीनशे जागा जिंकायला हव्या होत्या. जिंकल्या किती? २६८! महाराष्ट्रात ४८ पैकी ४३ लोकसभा जागा जिंकणारा कॉंग्रेस पक्ष विधानसभेत मात्र २८८ पैकी १६७ जागाच जिंकू शकला. कर्नाटक आणि आंध्रमध्ये १९८५ मध्ये परत विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तर कॉंग्रेस पक्षाचा पराभवच झाला आणि रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री झाले.याच कर्नाटकात १९८४ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये कॉंग्रेसने मोठा विजय मिळवला होता. आंध्र प्रदेशात रामारावांनी परत एकदा कॉंग्रेस पक्षाला दणकून चोप आंध्र प्रदेशात दिला. पुढे कॉंग्रेस पक्षाचा सप्टेंबर १९८५ मध्ये पंजाबमध्ये तर नोव्हेंबर १९८५ मध्ये आसाममध्ये पराभव झाला.या राज्यांमधील पार्श्वभूमी वेगळी असल्यामुळे या राज्यांचा मुद्दा थोडा बाजूला ठेऊ या. पुढे मार्च १९८७ मध्ये केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांनी असाच जोरदार चोप कॉंग्रेसला दिला. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाने पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी २० जागा जिंकल्या होत्या. खुद्द सोमनाथ चॅटर्जींचा पराभव झाला.या पार्श्वभूमीवर कम्युनिस्टांनी विधानसभेच्या २९४ पैकी २५०+ जागा जिंकणे म्हणजे कॉंग्रेसने खाल्लेली मोठीच आपटी नाही का?त्यानंतर राजीव गांधींना खरा धक्का बसला जून १९८७ मध्ये हरियाणामध्ये.९० पैकी अवघ्या चार जागा कॉंग्रेस पक्षाने जिंकल्या. खुद्द मुख्यमंत्री बन्सीलाल यांचा पराभव झाला. पुढे जानेवारी १९८९ मध्ये तामिळनाडूतील विधानसभा निवडणुका राजीव गांधींनी प्रतिष्ठेच्या केल्या आणि अण्णा द्रमुकशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. निकाल काय लागला? २३४ पैकी २६ जागा कॉंग्रेस पक्षाने जिंकल्या! वि.प्र.सिंह राजीव गांधींच्या मंत्रीमंडळातून आणि कॉंग्रेस पक्षातूनही बाहेर पडले आणि त्यांनी लोकसभेची पोटनिवडणुक कॉंग्रेसविरूध्द अलाहाबादेतून लढवली.त्या पोटनिवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये परत कॉंग्रेसचा पराभव झाला. पुढे सोनिया कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर कॉंग्रेसने अनेक ठिकाणी विजय मिळवले पण १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी केली (११३ जागा). आजही कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्रात राष्ट्रवादीशिवाय सत्तेवर येऊ शकणार नाही.ओरिसामध्ये नवीन पटनाईकांनी कॉंग्रेसला असाच चोप वेळोवेळी दिला आहे.बंगालमध्ये कॉंग्रेसपेक्षा तृणमूल नक्कीच पुढे आहे. तेव्हा गांधींच्या नेतृत्वाखालीसुध्दा कॉंग्रेसचा आलेख उच्चीचा होता तसा निच्चीचाही होताच. तरीही कॉंग्रेसला केवळ मिळालेल्या विजयांचा परामर्श करायचा आणि गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या पराभवांकडे दुर्लक्ष करायचे आणि म्हणायचे "गांधी या नावात बाय डिफॉल्ट जादू आहे" याला काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंख
प
पंख Sat, 10/23/2010 - 08:41 नवीन
क्लींटनसाहेब माझा प्रतिसाद हलकेच घेउन त्याला ईतके विवेचनपूर्ण ऊत्तर दिल्याबद्दल धन्यवाद ! प्रतिसादांतून कळतेच आहे कि तुमचा याविषयीचा अभ्यास नक्किच अफाट आहे . पण मूळ प्रश्न वेगळाच असून तुम्ही त्यास जाणून बुजून बगल देत आहात कि काय अशी शंका येते... राहूल गांधीचे कर्तुत्त्व काय कि म्हणून तो भावी पंतप्रधान आहे ? ईतकाच हा प्रश्न आहे.. तसेच सोनिया बाईचे .. तिचे अथवा राहूलचे काय योगदान आहे देशासाठी ? सोनिया "गांधी" असल्यामुळेच व राहूल "गांधी" असल्यामुळेच मिरवून घेत आहेत हे तुम्हाला मान्य नाही का? राहुल पंतप्रधान होईलही कदचित, झालाच तर आक्षेपही नसणार आहे, पण त्याने पंतप्रधान होण्यासाठी केवळ पुस्तकातले निकष पुर्ण केलेले असतील काय ? तो "गांधी" नसता तर पंतप्रधान होऊ शकेल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 10/23/2010 - 09:16 नवीन
धन्यवाद पंख साहेब.
क्लींटनसाहेब माझा प्रतिसाद हलकेच घेउन त्याला ईतके विवेचनपूर्ण ऊत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
मी गेल्या ४ वर्षांपासून विविध मराठी संस्थळांवर वावरत आहे.या काळात मी कोणतीही चर्चा वैयक्तिक पातळीवर नेलेली नाही आणि यापुढेही नेणार नाही.
प्रतिसादांतून कळतेच आहे कि तुमचा याविषयीचा अभ्यास नक्किच अफाट आहे .
धन्यवाद.
राहूल गांधीचे कर्तुत्त्व काय कि म्हणून तो भावी पंतप्रधान आहे ?
मी या मुद्द्यांना पूर्वीच उत्तरे याच चर्चेत दिली आहेत. पण इतक्या प्रतिसादांच्या गर्दीत मी लिहिलेले काही प्रतिसाद हरवले जायची शक्यता आहे. तेव्हा मी लिहिलेले पुढील प्रतिसाद बघावेत ही विनंती (त्यात आपल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत) प्रतिसाद १ प्रतिसाद २ माझा मुद्दा हा की राहुल गांधींनी काहीही कर्तुत्व दाखवलेले नाही असे आपल्यासारख्या (मलाही) शिकलेल्यांना वाटते. पण हातावर पोट असलेले मतदार आपण ठेवतो त्या निकषांवर मतदान करत नाहीत.त्यामुळे राहुल गांधींनी कसलेच कर्तृत्व दाखवलेले नाही असे वैयक्तिक पातळीवर मला वाटत असले तरी सर्वसामान्य मतदारांना कदाचित तसे वाटत नसेल.बहुदा सर्वसामान्य मतदारांना राहुल गांधी आपल्या दोन वेळच्या भाकरीची सोय करतील हा विश्वास वाटत असेल कारण कॉंग्रेसचा प्रचार असतो ’कॉंग्रेसका हात आम आदमीके साथ’. याउलट भाजपचा प्रचार असतो राष्ट्रीय अभिमान,अणुचाचण्या, स्विस बॅंकेतून पैसे परत आणणे यासारख्या सामान्यांना अपील न करणाऱ्या गोष्टींवर. या सगळ्या गोष्टी भरल्या पोटी चर्चा करायच्या आहेत.रस्त्यावर झोपणाऱ्या मतदाराला सांगा की आम्ही स्विस बॅंकेतून काळा पैसा परत आणू म्हणून आम्हाला मत द्या. ते त्याला पटेल का? याउलट तो ’आम आदमी’ च्या बरोबर जायचा (बहुतांश वेळा खोटा) दावा करणाऱ्या कॉंग्रेसलाच मत देतो. दिर्घकालीन हिताचा विचार करता असे योग्य नाही हे मलाही पटते. पण केवळ मला राहुल गांधी आवडत नाहीत म्हणून ते सर्वसामान्य मतदारांनाही आवडू नयेत अशी अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे कारण माझे आणि हातावर पोट असलेल्यांचे मापदंड वेगळे आहेत.
तो "गांधी" नसता तर पंतप्रधान होऊ शकेल काय
आजही गांधी नसलेला कोणी नेता सामान्य मतदाराच्या मनात आपल्याविषयी विश्वास निर्माण करू शकेल तो नक्कीच पंतप्रधान होऊ शकेल. मात्र यासाठी अशा मतदाराला भावतील असे मुद्दे उभे केले पाहिजेत. राममंदिर,राष्ट्रीय सुरक्षा,स्विस बॅंकेतील काळा पैसा परत आणणे यासारख्या त्याच्याशी संबंध नसलेल्या गोष्टींचाच जप केला तर त्याचा उपयोग फार काळ होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंख
स
समंजस Fri, 10/22/2010 - 11:01 नवीन
<<< तेव्हा तुम्हाला राहुल गांधी पंतप्रधान म्हणून आवडणार नसतील तर कॉंग्रेसविरोधी मत द्यायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि तो तुम्ही वापरणार यात कोणतीही शंका नाही.पण लोकशाही ही आकड्यांचा खेळ असतो.जर लोकांनी राहुल गांधींनाच पंतप्रधान व्हायचा जनादेश दिला तर ते पंतप्रधान होतील आणि तसा जनादेश दिला नाही तर होणार नाहीत. ....लोकशाही हा आकडयांचा खेळ आहे. सहमत. .... जर लोकांनी राहुल गांधींनाच पंतप्रधान व्हायचा जनादेश दिला तर ते पंतप्रधान होतील आणि तसा जनादेश दिला नाही तर होणार नाहीत . .....असहमत. खरंच तुम्हाला वाटतं की पंतप्रधान होणे हे इतके स्पष्ट आणि सरळ आहे? जनाधारावर सरकार स्थापन करणे किंवा एका विशिष्ट व्यक्तीने पंतप्रधान होणे हे शक्य आहे जर एकाच पक्षाला स्पष्ट बहूमत मिळालं तरच अन्यथा हे अवलंबून आहे निकालानंतरच्या होणार्‍या राजकीय सौदेबाजी वर(युती/आघाडी/आतून समर्थन/बाहेरून समर्थन वै. वै.), जे होताना आपण बघितलं असेलच मागील काही वर्षात आणि तत्कालीन सरकार हे सुद्धा एक उदाहरण आहेच. <<< अर्थ कसा नाही?तुम्ही या पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्हीही लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहायला पात्र आहात. निवडून आलात आणि लोकसभेत बहुमताचा पाठिंबा मिळवलात तर श्री. हुप्प्या हे भारताचे पुढील पंतप्रधान असतील. तसे झाले तर निवडून देणारी जनता चांगली आणि राहुल गांधींना निवडून दिले तर असे निवडून देणारी जनता मूर्ख या बोलण्याला काही अर्थ नाही. ....असहमत. कारण वर दिलं आहेच. <<< या बोलण्याला काय आधार आहे?मग शास्त्री, देसाई, चरण सिंह, वि.प्र.सिंह, चंद्रशेखर, नरसिंह राव, वाजपेयी, देवेगौडा, गुजराल, मनमोहन सिंह हे पंतप्रधान झालेच कसे? तुम्हाला निवडणुकीत लागणारा निकाल आवडत नसेल तर तसे वाटायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे पण आपल्याला न आवडणारा निकाल लागला म्हणून जनता मूर्ख आहे, जनमानसात राजेशाहीच आहे अशा विधानांना मात्र काहीच आधार नाही. .... वर उल्लेखलेले व्यक्ती कसे पंतप्रधान झालेत हे तुम्हाला खरेच माहित करून घ्यायचे आहे का? ह्या सगळ्या व्यक्ती पंतप्रधान झाल्यात त्या जनतेनी त्यांनी पंतप्रधान व्हावे या उद्देशानी मतदान केल्या मुळेच झाल्यात असं तुम्हाला वाटतं का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ह
हुप्प्या Fri, 10/22/2010 - 17:12 नवीन
>> या बोलण्याला काय आधार आहे?मग शास्त्री, देसाई, चरण सिंह, वि.प्र.सिंह, चंद्रशेखर, नरसिंह राव, वाजपेयी, देवेगौडा, गुजराल, मनमोहन सिंह हे पंतप्रधान झालेच कसे? तुम्हाला निवडणुकीत लागणारा निकाल आवडत नसेल तर तसे वाटायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे पण आपल्याला न आवडणारा निकाल लागला म्हणून जनता मूर्ख आहे, जनमानसात राजेशाहीच आहे अशा विधानांना मात्र काहीच आधार नाही. << जनमानसात राजेशाही आहे ह्याला काय आधार? किती मोठी यादी देऊ? माझा नि:पक्षपातीपणा सिद्ध करायला भाजपापासून सुरवात करतो! मुंढे, महाजन, ठाकरे, पवार, भुजबळ, राणे, नाईक, शिंदे (सुशीलकुमार आणि माधवराव), अब्दुल्ला, लालू यादव, जयललिता, शेखावत (पाटील), दत्त, देवरा आणि अर्थातच गांधी. ही यादी आणखी वाढेल. घराणेशाह्यांची इतकी ढळढळीत उदाहरणे असताना त्याला अर्थ नाहि म्हणण्याला काही अर्थ नाही. मला आवडणारा निकाल मिळत नाही म्हणून जनता मूर्ख आहे असे आजिबात नाही. अडाणी, अशिक्षित, असंस्कृत, दरिद्री लोकांची इतकी प्रचंड संख्या ह्या देशात आहे की त्यात सुशिक्षितांची मते पार नगण्य वाटतील. असे लोक मत देताना नागरिकशास्त्र, कायदा, संविधान, भारताच्या गरज, उमेदवाराची पात्रता ह्या गोष्टींकडे बघणार नाहीत. ज्याच्या प्रलोभनाला, धमक्यांना ते बळी पडतील त्यांना ती मते मिळणार. ह्यांना मतदार म्हणून मूर्खच म्हटले पाहिजे. जर चुकून कधी एखादा मोरारजी, एखादा वाजपेयी निवडला जात असेल तर तोही ह्या मूर्ख मतदारांमुळेच. नालायक मतदारांचा भरणा असणारी लोकशाही ही लोकांनाच घातक आहे. पण हे अपवाद आहेत. आपण जी गैर गांधी घराण्यातील पंतप्रधानांची यादी दिलीत त्यांचा त्या पदावरील कालावधी सोयिस्कररित्या वगळलात. त्यातल्या देवीलाल, चंद्रशेखर, गुजराल ह्यांचे पंतप्रधानपद म्हणजे लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. तेव्हा कुणी किती काळ पंतप्रधानपदावर घालवला आहे तेही बघा जरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 10/22/2010 - 17:34 नवीन
मुंढे, महाजन, ठाकरे, पवार, भुजबळ, राणे, नाईक, शिंदे (सुशीलकुमार आणि माधवराव), अब्दुल्ला, लालू यादव, जयललिता, शेखावत (पाटील), दत्त, देवरा आणि अर्थातच गांधी. ही यादी आणखी वाढेल.
म्हणजे आपल्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की एकदा एखादा कोणी मंत्री/पंतप्रधान झाला तर त्याच्या नात्यातल्या कोणीही त्या पदावर बसता कामा नये?तुम्हाला तसे वाटत असले तर त्यात इतरांना काही हरकत घेण्यासारखे काहीच नाही.पण आपल्या राज्यघटनेला तसे वाटत नाही त्याचे काय?माधवरावांचा मुलगा म्हणून ज्योतिरादित्य आपोआप वारसाहक्काने गुण्याचा खासदार म्हणून नियुक्त झाला तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे.पण त्याला रितसर मार्गाने लोकांनी निवडून दिले तर त्यात आक्षेपार्ह काय?तेव्हा एखाद्या घराण्यात जन्माला येणे हे कोणत्याही पदासाठीचे qualification नाही त्याचप्रमाणे ते disqualification पण नाही.
नालायक मतदारांचा भरणा असणारी लोकशाही ही लोकांनाच घातक आहे.
अशाच ’नालायक’ मतदारांनी १९७७ साली इंदिरा गांधींना सत्तेवरून खाली खेचले होते.बांगलादेश युद्धानंतर इंदिराजींचा पराभव होईल असे कोणालाही स्वप्नातही वाटले नसेल पण ते प्रत्यक्षात आले.अशाच नालायक मतदारांनी १९९५ मध्ये शरद पवारांची उन्मत्त सत्ता उलथावली.१९८७ मध्ये देवीलाल यांनी कॉंग्रेसला हरियाणात जोरदार चोप दिला पण नंतरच्या काळात त्यांनी आणि त्यांच्या पुत्रांनी धुमाकूळ घातला त्याबद्दल त्याच देवीलालांना हरियाणातील अशाच नालायक मतदारांनी चांगलीच शिक्षा केली.देवीलाल १९८९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले ते शेवटचेच. त्यानंतर ते कुठलीच प्रत्यक्ष निवडणूक जिंकू शकले नाहीत.अशाच नालायक मतदारांनी बिहारमध्ये लालू-राबडीची सत्ता उलथवली. अशी अनेक उदाहरणे देता येतील. तेव्हा भारतीय मतदार तुम्ही जितके मूर्ख समजता तितके मूर्ख नक्कीच नाहीत. काही मतदार पैसे घेऊन विकले जात असतीलही पण काही त्याहूनही बिलंदर म्हणजे पैसे घेऊनही विकले जात नसतील असाच अर्थ या सगळ्या धक्कादायक निकालांमधून लागतो की नाही?
आपण जी गैर गांधी घराण्यातील पंतप्रधानांची यादी दिलीत त्यांचा त्या पदावरील कालावधी सोयिस्कररित्या वगळलात.
१९८९ सालापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या २१ वर्षात एकही गांधी पंतप्रधान झालेला नाही.त्यात नरसिंह रावांची पाच वर्षे आणि वाजपेयी-मनमोहन यांची प्रत्येकी ६ वर्षे हा कालावधी मोठा नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Fri, 10/22/2010 - 18:28 नवीन
आज खासदार, आमदार बनणे हे सामान्याच्या आवाक्याबाहेरचे आहे. तमाम मोठे पक्ष तिकिटे देताना काय पात्रता बघतात ते समजणे अवघड नाही. आणि मोठ्या पक्षाचे नाव नसेल तर निवडणूक लढवणे म्हणजे डिपॉझिट सरकारजमा करण्यापैकी आहे. तेव्हा लोकशाही मार्ग वगैरे भाबडेपणा सोडा. आज भुजबळांचा मुलगा वा राण्यांचा मुलगा वा महाजनांची मुलगी वा पवारांची मुलगी वा नाईकांचा मुलगा निवडणूकीला उभी राहू शकतो/ते हे काय लोकशाही मार्गाने होते काय? आजिबात नाही. उमेदवारी मिळवणे, प्रचारावर बेसुमार खर्च करणे हे सामान्याच्या आवाक्याबाहेरचे आहे. तिथे घराण्याचा भक्कम वारसा असल्याशिवाय वा जातीपातीची फिल्डिंग असल्याशिवाय होत नाही. उमेदवारीच मिळवणे सामान्यांना दुरापास्त आहे तिथे निवडून येण्याविषयी काय बोलावे? त्या फार नंतरच्या गोष्टी आहेत. आपला हा गोड गैरसमज आहे की केवळ योगायोगाने हे लोक त्या घराण्यात जन्माला आले आहेत. मुख्य कारण हे त्यांची कर्तबगारी हेच आहे आणि जनतेची पसंत हेही. १९७७ च्या घटना फार जुन्या आहेत. आजच्या काळात पैसाच निवडणूक जिंकून देतो. कितीतरी कमालीचे भ्रष्ट नेते केवळ पैशावर निवडून आलेले आहेत. निवडणूकीच्या प्रक्रियेत काही क्रांतिकारी बदल झाला तरच हे बदलेल पण ज्या खेळात आजचे नेते जिंकत आहेत त्या खेळाचे नियम आजचे नेते कसे बदलतील? १९८९ पासून कुणी गांधी पंतप्रधान नाही हे केवळ पुस्तकी, कोर्टात सिद्ध करण्यापुरते खरे. पण आज महाराणी सोनियाच ह्याच कर्त्या करवत्या आहेत. पंतप्रधानानी हे जाहीररित्या म्हटले आहे. तेव्हा संशयाला जागा नसावी. बाकी महाराणी राज्याचा लगाम उघडपणे हातात का घेत नाहीत हे एक गौडबंगाल आहे. ते कधी उघडकीस येईल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 10/22/2010 - 22:14 नवीन
हा प्रतिसाद हुप्प्या यांच्या प्रतिसादाला उत्तर म्हणून जरी असला तरी समंजस यांनी वर मांडलेले मुद्दे साधारण सारखेच असल्यामुळे हे उत्तर त्यांच्या प्रतिसादालाही मानावे ही विनंती.
आज खासदार, आमदार बनणे हे सामान्याच्या आवाक्याबाहेरचे आहे.
भरपूर पैसा खर्च करायला लागतो ही सत्य परिस्थितीच आहे.पण सध्याच्या जगात पैसे नसतील तर जवळपास सगळ्याच गोष्टी दुरापास्त आहेत त्यात ही आणखी एक. अर्थात हे निवडणुकीतील धनशक्तीचे समर्थन नाही पण जर सर्वत्र पैसाच बोलत असेल तर निवडणुका मात्र त्यापासून पूर्णपणे अलिप्त राहतील ही अपेक्षा आपल्याला करता येणार नाही.
तमाम मोठे पक्ष तिकिटे देताना काय पात्रता बघतात ते समजणे अवघड नाही.
तमाम मोठ्या पक्षांनी निवडणुकीत कोणाला तिकिट द्यावे हा त्यांचा प्रश्न झाला. जर निवडणुका जिंकायच्या असतील तर निवडून यायची क्षमता असलेल्या उमेदवारांना ते तिकिटे देतील.अन्यथा प्रमोद महाजनांच्या मुलीला तिकिट भाजपने दिले तसा प्रकार करून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतील.तो त्या पक्षाचा प्रश्न झाला. त्या पक्षांनी अमुक एका व्यक्तीलाच तिकिटे द्यायला हवीत अशी सक्ती इतरांना नक्कीच करता येणार नाही. कायद्याचा आणि निवडणुक आयोगाचा या बाबतीत इंटरेस्ट इतकाच की न्यायालयाने २+ वर्षाची शिक्षा ठोठावलेल्या व्यक्तीला उमेदवार बनता आले नाही पाहिजे आणि ज्या इतर अटी आहेत त्या पूर्ण केलेल्या असल्या पाहिजेत. बाकी आपल्याला पाहिजे ते करायला पक्ष मोकळे आहेत.त्यांनी जनतेला पटेल असे केले तर जनता त्यांना निवडून देईल नाहीतर त्यांचा उमेदवार पडेल. आता तुमचा मुद्दा झाला की पक्ष केवळ गुंडांना तिकिटे देतात आणि केवळ असेच उमेदवार निवडून येतात आणि त्यामुळे पूर्ण व्यवस्थेलाच किड लागली आहे तर तो मुद्दा पूर्णपणे मान्य. लोकसभेत अनेक बाहुबली निवडून जातात हे अयोग्य आहे यात शंकाच नाही. पण त्याचा या चर्चेचा एक मुद्दा-- घराणेशाहीशी काही संबंध नाही.
आज भुजबळांचा मुलगा वा राण्यांचा मुलगा वा महाजनांची मुलगी वा पवारांची मुलगी वा नाईकांचा मुलगा निवडणूकीला उभी राहू शकतो/ते हे काय लोकशाही मार्गाने होते काय?
वर म्हटले आहेच की कोणाला उमेदवारी द्यावी हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत मामला आहे.त्यावर इतरांनी बोलायची गरज नाही. जर तो उमेदवार पटला तर लोक निवडून देतील आणि अनेकदा उमेदवार पटला नाही तरी लोक पक्षाला म्हणून त्याच उमेदवाराला मते देतील. पण असे न पटणारे उमेदवार वारंवार एखाद्या पक्षाने दिले तर त्या पक्षाचे बळ फार काळ टिकणार नाही हे पण तितकेच खरे.
आपला हा गोड गैरसमज आहे की केवळ योगायोगाने हे लोक त्या घराण्यात जन्माला आले आहेत. मुख्य कारण हे त्यांची कर्तबगारी हेच आहे आणि जनतेची पसंत हेही.
हा गोड गैरसमज तुमच्यासारख्यांना वाटतोही. पण जर लोक (गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आणि मतदान करताना धमकावण्याचे प्रकार न करणाऱ्या) उमेदवाराला निवडून देत असतील मग तो भले कोणतेही अडनाव धारण करणारा असो तर त्यात तक्रार करण्यासारखे काही आहे असे वाटत नाही.
आजच्या काळात पैसाच निवडणूक जिंकून देतो.
निवडणुक आयोगाने किती पैसा खर्च करावा याचे दंडक घालून दिले आहेत त्याची पायमल्ली होते ही सत्य परिस्थिती आहेच. तसेच मतदारांना पैसे लाच म्हणून द्यायचाही प्रयत्न होतो ही पण सत्य परिस्थिती आहे.आणि अशा पैशाचा किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव निवडणुकांमध्ये झाला आहे असे आपले म्हणणे असेल तर तो मुद्दा पूर्णपणे मान्य. पण त्याचा घराणेशाहीशी संबंध काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ग
गांधीवादी Sat, 10/23/2010 - 08:19 नवीन
>>जर सर्वत्र पैसाच बोलत असेल तर निवडणुका मात्र त्यापासून पूर्णपणे अलिप्त राहतील ही अपेक्षा आपल्याला करता येणार नाही. नागरिकशास्त्राचे पुस्तक मात्र अजून अलिप्त आहे. त्या मध्ये सुद्धा 'पैशाची ताकत' हा मुद्दा जमा केला तरच बाकीच्या मुद्द्यांना 'अर्थ' राहील. >>घराणेशाहीशी काही संबंध नाही. असहमत. 'सुरुवातीला पंखांना जे बळ मिळते ते घराणेशाहीशी मुळेच मिळते' हे जर मान्य केले तर बाकी काही शिल्लक राहत नाही. नागरिकशास्त्राच्या पुस्तक प्रमाणे जरी घराणेशाही चालत नसली तरी राजकारणात (व्यवहारात) घराणेशाहीच चालते. त्यामुळे नागरिकशास्त्राचे पुस्तकची नवीन आवृत्ती निघायला हवी. >>त्या पक्षाचे बळ फार काळ टिकणार नाही हे पण तितकेच खरे फार म्हणजे किती ? किमान ५ वर्षे तरी टिकणारच ना? आणि त्या ५ वर्षात नवीन बळ मिळणार नाही हे कशावरून ? >>पैशाचा किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव निवडणुकांमध्ये झाला आहे असे आपले म्हणणे असेल तर तो मुद्दा पूर्णपणे मान्य. पण त्याचा घराणेशाहीशी संबंध काय? ह्यांचाशी कसे निपटायचे, कायदा कसा गुंडाळून खिशात घालायचा, ह्याचे शिक्षण कोणत्या शाळेत मिळते ? ते शिक्षण केवळ घरातच मिळू शकते. घराणेशाहीशी मुळेच मिळू शकते. अन्यथा एवढ्या लवकर राजकारणात प्रवेश कोणालाही अशक्य. घराणेशाहीशी आहे म्हणून मार्ग खुले आहेत. मागे बळ आहे. संधी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा