स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात? - एक नीरीक्षण
💬 प्रतिसाद
(125)
म
मितान
Mon, 11/01/2010 - 15:51
नवीन
+ १
अदिती आणि चित्राशी सहमत !
कोणताही पुरूष हा थेट त्याच्याशी कोणतंतरी नातं जोडता आलं किंवा शक्यता असली तरच आवडला पाहिजे का ? सहज जाता जाता निव्वळ 'दिसलेला' कोणी आवडू शकतो. चार तासांच्या प्रवासात सहप्रवासी असलेला आवडू शकतो किंवा नावडू शकतो. यात शुचीनी मांडलेले मुद्दे उदाहरण म्हणून घ्या. त्यात एका स्त्रीने हे लिहावं यात 'नवल' वाटण्यासारखे काय !!! असे नवल वाटणारे पुरूष मित्र हे ही काही नवल नाही ;)
- Log in or register to post comments
प
प्राजु
Mon, 11/01/2010 - 19:13
नवीन
हेच म्हणते. आदिती आणि चित्रा ताईशी पूर्णपणे सहमत आहे.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Mon, 11/01/2010 - 07:01
नवीन
एकुणच धागा आणि त्यावरच्या 'चर्चा' वाचुन चुकून 'हळदी कुंकवाच्या' कार्यक्रमाच्या हॉलमध्ये शिरल्यासारखे वाटले.
बाकी चालु द्या...
अवांतर :- मिपाला आता खरडफळ्याची खरच गरज उरली आहे का ? (हे स्वगत आहे. मिपा पदाधिकारी वर्गाला उद्देशुन हा प्रश्न नाही.)
- Log in or register to post comments
स
सुहास..
Mon, 11/01/2010 - 07:30
नवीन
शुचि लेख आवडला ,
प्रश्न हा पडला की 'त्या' पुरूषांना कसे पुरुष आवडत असतील. आणी 'त्या' स्त्रियांना कश्या प्रकारच्या स्त्रिया आवडत असतील ?
अवांतर : 'त्या' स्त्रियांच्या सत्यकथेवर आधारित http://en.wikipedia.org/wiki/Monster_(2003_film) (मॉनस्टर) नक्की पहावा.
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
Mon, 11/01/2010 - 09:02
नवीन
शुचि, एक धमाकेदार लेखमाला होऊनच जाउदे यावर :)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 11/01/2010 - 13:26
नवीन
शुची यांचे लेखन आणि त्यावर आलेले प्रतिसाद आवडले. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 11/01/2010 - 13:41
नवीन
निवांत : हापिसात जाणे, पगार घरी आणणे आणि निवांत जगणे. 'हेच का केलंस? तेच का नाही केलंस' वगैरे प्रश्नांच्या भानगडीत पडण्याचा कंटाळा असलेले पुरुष. बर्याचदा अशा पुरुषांना वाचनाचा किंवा टिव्ही/सिनेमे पाहण्याचा नाद असतो. त्यांना अगदी रोजचं वर्तमानपत्रदेखील पुरवुन पुरवुन, 'छोट्या जाहिराती'सकट वाचायची हौस असते. अशा प्रश्नांमध्ये डोकं घातल्यास वाचनाची समाधी भंग पावते, रसभंग होतो त्यामुळं 'हे पैसे! तुला मी कधी काही अडवलंय का तुला काय हव्वं ते कर ना प्रिये!' वगैरे गोग्गोड टाकून बर्याचशा झेंगटातून स्वतःला सोडवून घेत, सोफ्यावर लोळत टिव्ही किंवा पुस्तकं वगैरे वाचनाचा आनंद घेणारे पुरुष. अशा निवांत पुरुषांचा एक फायदा असतो, की त्यांचं डिट्टेलिंगकडं फारसं लक्षच नसतं. त्यामुळं वादाचे फार प्रसंग येत नाहीत. अर्थात काही स्त्रीया अशा पुरुषांना 'निर्लज्ज' वगैरे शेलकी विशेषणं लाऊन बदनाम करतात, पण त्याकडे लक्ष देण्यापेक्षा होणारा फायदा हा जास्त फायदेशीर असतो. ;)
(असं मला एकुण ८ स्त्रीयांनी पटवून दिलं होतं, त्यातल्या शेवटीच्या गळाला लागलोच. ;) =)) )
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 11/01/2010 - 13:46
नवीन
>>> असं मला एकुण ८ स्त्रीयांनी पटवून दिलं होतं,
पुरुषांना अशी वाढीव संख्या सांगण्यात मोठा रस असतो. ;)
[याला म्हणायचं पुरुषी अहंकार]
धमाल, पुरुषांना कशा प्रकारच्या स्त्रीया आवडतात यावर एक धागा काढा राव.
दिवाळीचा फराळ करता करता चर्चा करु, काय म्हणता ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 11/01/2010 - 13:52
नवीन
काय हे गुर्जी? वाढीव काय राव? स्वतःचा छळ कशाला कोण वाढवून सांगतो का? :(
>>[याला म्हणायचं पुरुषी अहंकार]
अत्यंत पाशवी प्रतिसादामुळे माझ्या कोमल मनास इंगळ्या डस्ल्या हे मी इथे खेदानं नमुद करु इच्छितो.
अहो, पुरुषांना अहंकार बाळगायला हल्ली परवानगी आहे का? ;)
(पळा आता...नायतर खातंय पाशवी मार )
>>धमाल, पुरुषांना कशा प्रकारच्या स्त्रीया आवडतात यावर एक धागा काढा राव.
हा हा हा...इकडं नको. तुम्ही एखादा दिवाळी अंक काढा,त्याला देतो लेख ;) (पर्या गप...मी मचाकला कथा देणार नैय्ये.)
>>दिवाळीचा फराळ करता करता चर्चा करु, काय म्हणता ?
जरुर जरुर...पण त्यापायात आपलं दिवाळं काढेल इथलं पब्लिक त्याचं काय? घाबरके रैना पडता है भिडू... :D
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Mon, 11/01/2010 - 13:58
नवीन
अहों धागा कशांला ?
अरे धम्या प्रा.डाँ. ना मचाकची लिंक दे. एक थिसेसच लिहुन होईल येवढी माहिती मिळेल त्यांना.
- Log in or register to post comments
क
कुंदन
Mon, 11/01/2010 - 14:03
नवीन
थिसेस नंतर मग काय , प्रा डॉ हे डब्बल डॉ होतील.....प्रा डॉ (डॉ)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 11/01/2010 - 14:18
नवीन
मस्त धागा ! :)
- Log in or register to post comments
य
योगप्रभू
Mon, 11/01/2010 - 14:46
नवीन
(प्रतिक्रिया केवळ विनोद निर्मितीसाठी. ह. घेणे)
शुची,
स्त्रियांना विशेषतः विवाहानंतर आवडणार्या पुरुषांच्या कॅटॅगरीत एक अॅड करावी म्हणतो. अनुभवाचे बोल.
नंदीबैल पुरुष : हे नेहमीच बायकांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या चेहर्याकडे बघून, अंदाज घेऊन देतात. स्वतःची फारशी अक्कल चालवत नाहीत. खरेदीच्या वेळी पिशव्या सांभाळायला, गाडी थांबल्यावर/ सिनेमाच्या मध्यंतरात वडापाव-कोल्ड्रिंक व पाणी आणायला, बाहेर गेल्यावर लहान मुलांच्या हमखास होणार्या 'शिशु'कार्यक्रमांवर निरीक्षक म्हणून अशा अनेक प्रसंगी हे पुरुष उपयुक्त ठरतात. यांचे पाकिट किंवा कार्ड बायकोच्या ताब्यात असते. यांचा वर्षातून एकच सण म्हणजे 'बैलपोळा'. तो दिवाळीच्या पाडव्याला असतो. त्या दिवशीच बायका उपचार म्हणून यांना अंघोळ घालतात व केवळ त्याच प्रसंगी दोन बोटे तेल चोपडतात. बैलाचे पोवळे खाजवल्यावर तो मान वर करत जातो तसे हे पुरुष अंगावर आणखी हात फिरेल या अपेक्षेने वर पाहतात. अशावेळी चतुर बायका गडबडीने बाहेर जाऊन औक्षणाचे तबक आणतात आणि काही सेकंदात ओवाळून पळ काढतात. पुन्हा 'बाबाच्या अंघोळीला फुलबाज्या लावा' असे सांगून मुलांना स्नानगृहाच्या दाराशी उभे करतात. या अल्पकालीन उपकाराचा मोठा मोबदला त्या पुरुषांकडून त्या दिवशी वसूल करतात.
हे पुरुष बैल असले तरी झापड लावलेला घोडा आणि ओझ्याचे गाढव अशा भूमिकाही उत्तम वठवतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या अंगावर वस्सकन ओरडल्यास ते भांडणात माघार घेतात आणि 'बरं बाई. तुझं खरं' असे म्हणतात. या पुरुषांना इमोशनल ब्लॅकमेल करणे सोपे असते. जादा घरकाम/जड वस्तूंची हलवाहलव करायची असेल त्यावेळी स्वयंपाकघरात भांडी वाजवत एकच वाक्य म्हणायचे ' त्या सुयोगचे वडील बघा. किती मदत करतात घरात. नाहीतर इकडे. आमचे नशीबच मेले खोटे' हे ऐकल्यावर बैलोबा निमूट उठून काम करतात. :)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 11/01/2010 - 15:07
नवीन
हिट्ट्ट आहे हा प्रतिसाद. :D
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 11/01/2010 - 15:15
नवीन
LOL! :d
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 11/01/2010 - 15:17
नवीन
हा हा हा
लै भारी !!
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Mon, 11/01/2010 - 15:26
नवीन
५००% सहमत!
मला स्वतः ला जरी आवडत नसले तरी बहुसंख्य एस्त्रीयांना ही क्याट्यागिरी आवडतेच आवडते.....! :)
- Log in or register to post comments
श
शुचि
Mon, 11/01/2010 - 15:40
नवीन
माझ्या साधारण (आधी सुमारच लिहीलं होतं) लेखाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा प्रतिसाद.
जिओ शब्दप्रभू!!
- Log in or register to post comments
म
मितान
Mon, 11/01/2010 - 15:54
नवीन
अग्गं माय !!! ( तोंडावर पदर ठेऊन दात न दाखवता हसणारी बाहुली ) =))
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Mon, 11/01/2010 - 16:57
नवीन
आत्ता कळलं, तुमचं नाव योगप्रभू का आहे ते! ;)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 11/01/2010 - 16:59
नवीन
_/\_
धन्य!
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Mon, 11/01/2010 - 18:02
नवीन
:D आणि इथे अजून एक लोळेरी स्मायली समजून घेणे...
लै भारी...
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Mon, 11/01/2010 - 18:22
नवीन
कडक प्रतिसाद. जवळजवळ सर्वच विवाहित पुरुषांना पटण्यासारखा!
(विवाहित)बेसनलाडू
यावरून आमच्या बैल या विडंबनाची आठवण झाल्याशिवाय राहवले नाही.
(स्मरणशील)बेसनलाडू
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
Tue, 11/02/2010 - 19:24
नवीन
साला, आमचे आत्मचरित्र लिहिण्याचे काम योगप्रभूंना औटसोर्स केले आहे.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 11/01/2010 - 18:48
नवीन
माझ्या एका मित्राला मैत्रिणींबरोबर गंमतीत आणि मैत्रीत फ्लर्टची फार सवय आहे; जेवढी मैत्री जास्त तेवढं याचं फ्लर्टींग जास्त! त्याच्या गर्लफ्रेंडलाही या सगळ्याची मजा वाटते आणि ती पण माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तो सगळ्यांचा खूप चांगला मित्र आहे याचा आनंद होतो आणि तिला हे असं इतर मैत्रीणींशी केलेलं मैत्रीखात्यातलं फ्लर्टींग आवडतंही. कधीमधी तीसुद्धा काड्या लावत बसते. आमच्या एकूणच मित्रमंडळात हा मित्र खूप लाडका आहे हे वेगळं सांगायची गरज नसावी.
सामान्यतः मुलींना मुलगी म्हणून न वागवणारे, एक माणूस म्हणून वागवणारे लोकं मला आवडतात, अशा लोकांशी माझी मैत्री चटकन होते.
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Mon, 11/01/2010 - 18:52
नवीन
सामान्यतः मुलींना मुलगी म्हणून न वागवणारे, एक माणूस म्हणून वागवणारे लोकं मला आवडतात, अशा लोकांशी माझी मैत्री चटकन होते.
प्रतिसादामधले हे वाक्य १०० टक्के पटले.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/02/2010 - 12:34
नवीन
+२ ... पटले.
(सामान्य मुलींना माणूस म्हणून वागवणारा) ;)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 11/02/2010 - 12:56
नवीन
सामान्य हा शब्द काळजाला भिडला, अंमळ हळवा झालो आणि डोळे पाणावले.
(नो थ्यांक्स बिरुटेसर, रुमाल आहे माझ्याकडं, तुम्ही पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा!)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/02/2010 - 12:57
नवीन
भेटा एकदा!*
*ही धमकीच आहे.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Mon, 11/01/2010 - 18:52
नवीन
इश्य!!
कसचं कसचं!!
;)
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Mon, 11/01/2010 - 19:05
नवीन
अय्या इतकं काय लाजायचं ते !! ;)
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Mon, 11/01/2010 - 19:09
नवीन
शी बै!
काहीच कळत नाही हिला!!
;)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 11/01/2010 - 19:08
नवीन
काका, माझा हा मित्र आता अमेरिकेत असला तरी मी त्याच्याबद्दल बोलते होते, तुमच्याबद्दल नाही! ;-)
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Mon, 11/01/2010 - 19:11
नवीन
रापचिक रापचिक, कूल कूल!!
:)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 11/01/2010 - 19:16
नवीन
भेटा तुम्ही एकदा!*
*ही धमकी नव्हे!! :-D
- Log in or register to post comments
श
शुचि
Mon, 11/01/2010 - 19:09
नवीन
>> मुलींना मुलगी म्हणून न वागवणारे, एक माणूस म्हणून वागवणारे लोकं मला आवडतात >>
वय वाढेल तसे असेच लोक जास्त भेटतात ग बाई. लहान आहेस तोवर मुलगी म्हणून वागावणं एन्जॉय करून घे. ;)
गम्मत करतेय :)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 11/01/2010 - 19:17
नवीन
हॅ हॅ हॅ ... वय वाढेल तेव्हा मुलगी म्हणून वागवणारे जास्त आवडतील! ;-) पुढचं पुढे ... आणि तेव्हा हे मित्रंही म्हतारे 'काका'च झाले असतील ना!!
एखाद्या मुलाशी चांगली दोस्ती झाली आहे हे समजण्याचे उपाय म्हणजे बर्याचदा 'ही काय मुलगी आहे का?' अशी वाक्य कानावर येतात. नाहीतर स्कूटर, बाईक सर्व्हीसिंगला टाकायची असताना मुलं लिफ्ट मागतात.
मी सध्या भलत्या काहीतरी विषयात नोकरी करत असल्यामुळे मुली ही अतिशय दुर्मिळ वस्तू आहे. त्यातही माझ्यासारख्या टवाळ पोरीच आजूबाजूला जास्त! त्यामुळे बर्याचदा अनिच्छेनेही मुलगी आहे यावरून "एन्जॉय" करून घेते.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Mon, 11/01/2010 - 19:28
नवीन
इतक्या महत्त्वाच्या विषयावरचा लेख अस्थायी किंवा अश्लील किंवा कोणी सुरू केली आहे व तिच्यात चित्रं आहेत की नाहीत अशी चर्चा का व्हावी ते कळलं नाही. मूळ लेखातल्या यादीत थोडी भर. यातल्या काही गोष्टी स्त्री व पुरुष दोहोंना लागू पडतात.
१. 'विनोदबुद्धी असलेले' - जग गमतीदार आहे असा दृष्टीकोन असणारे, आणि ती गंमत शेअर करण्यात उत्साह दाखवणारे कोणाला आवडणार नाहीत?
२. 'संगीताचं अंग असलेले' - ज्यांना एखादं वाद्य वाजवता येतं अशांना स्वरांच्या माध्यमातून मोहिनी टाकता येते. निदान रसिकपणे कानसेन असणंही महत्त्वाचं असतं.
३. 'खेळांमध्ये प्रवीण असलेले' - म्हणजे अर्थातच अगदी सचिन तेंडुलकर नाही, पण काहींना जात्याच खेळांमध्ये गती असते. हालचाली सौष्ठवपूर्ण असतात.
४. 'सकारात्मक भूमिका असलेले' - हातपाय गाळून बसणे, तक्रार करणे याऐवजी उत्साहाने सगळ्याला सामोरं जाणारे.
- Log in or register to post comments
N
Nile
Mon, 11/01/2010 - 19:33
नवीन
गुर्जी, तुमचे यशस्वी फार्म्युले काम नाही ना करुन राह्यले इथं!
-इनोद सकारात्माराम खेळकर.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/02/2010 - 05:28
नवीन
गुर्जींना अंमळ उशीर झाला ना ... असो!
- Log in or register to post comments
N
Nile
Tue, 11/02/2010 - 16:19
नवीन
नाही नाही, उशीरच असा काही झालेला नाही. फार्म्युले काम करत नाहीएत इतकंच सांगतोय आम्ही. आणि उशीराचा बाबतीत म्हणाल तर बेटर लेट.... यु नो!
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Mon, 11/01/2010 - 19:45
नवीन
आवरा राव आता. आत्ता या दोन छोट्या चकमकी वाचून फुटायची वेळ आली. ;)
- Log in or register to post comments
N
Nile
Mon, 11/01/2010 - 19:55
नवीन
विरोधाचा क्षीण प्रयत्न! ;-)
- Log in or register to post comments
स
सुहास..
Mon, 11/01/2010 - 21:01
नवीन
तरुणाईच्या जाहीरातबाजीचा क्षीण प्रयत्न !!
अवांतर : लगेच खरडी करु नयेत , सिनियर सिटीझन्सशी आम्ही भांडत नाही हे तरी कितिवेळा सांगायच !!
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Tue, 11/02/2010 - 05:26
नवीन
बरं ते सगळं राहू दे.... लग्न झालेल्या तुम्हा मुरांब्यांना विचारतो... लग्न करावं की नाही मग आम्ही?
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 11/02/2010 - 15:59
नवीन
जो खाए वो पछताए, न खाए वो भी पछताए! कळलं?
(आणि हा १०० वा प्रतिसाद)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 11/02/2010 - 16:25
नवीन
कसं आहे ना मित्रा,
वाघोबा म्हणलं तरी खातो, अन वाघ म्हणलं तरी खातो..मग जरा लढून, मजा करुन, सोबत थोडं जगुन पहावं असं माझं मत आहे. :)
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
Tue, 11/02/2010 - 11:31
नवीन
हम्म्म्म वाचतोय... :)
(सकारात्मक, मार्दवपुर्ण, आणि सिंगल) इंट्या.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/02/2010 - 12:09
नवीन
"मी सिंगल आहे", "मी लहान आहे", "माझं वय अमुकतमुक" असं बोंबलणारी बाळं बर्याचशा मुली-बायकांना आवडत नाहीत असं माझं आणखी एक निरीक्षण नमूद करते.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 11/02/2010 - 12:18
नवीन
अशा मुली-बायका चाईल्ड अॅब्युजला प्रोत्साहन देतात असं माझं आणखी एक निरीक्षण नमूद करतो.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »