Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ठार मेला. ग्रंथ आटोपला..आहे का अजून काही?

ग
गवि
Tue, 11/16/2010 - 06:41
🗣 75 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
23724 वाचन

💬 प्रतिसाद (75)
भ
भारी समर्थ Tue, 11/16/2010 - 07:03 नवीन
काय लांबड हाय राव.... हटके कंपायलेशन... महापरिनिर्वाण दिन की काय असतो. त्याचाही अर्थ हाच का? भारी समर्थ
  • Log in or register to post comments
भ
भारी समर्थ Tue, 11/16/2010 - 07:06 नवीन
कोणाला ठरवून मारला तर त्याचा 'काटा काढणे' होतो. भारी समर्थ
  • Log in or register to post comments
म
मधु बन Tue, 11/16/2010 - 07:16 नवीन
अनंतात विलिन होणे कार्यभाग आटपणे वैकुंठवासी
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Tue, 11/16/2010 - 07:24 नवीन
काही काही डबल झालेत... "कंदील लागणे" असा शब्द्प्रयोग मिपावर (आम्ही ) प्रचलीत (केला) आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 11/16/2010 - 07:29 नवीन
काही ठिकाणी झालेत खरे डबल. कंदिल लागणे.नव्या शब्दाबद्दल धन्स. पण त्यामागे काय आयडिया आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
ध
धमाल मुलगा Tue, 11/16/2010 - 11:39 नवीन
हे घ्या मुळ.. कंदील लागणे - १ कंदील लागणे - २ (आंबोळ्या, माझे रेफरलचे पैशे पाठवून दे रे paypal च्या खात्यावर. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
न
नगरीनिरंजन Tue, 11/16/2010 - 07:39 नवीन
यमसदनी जाणे/पाठवणे होत्याचे नव्हते होणे डोळे पांढरे करणे (बायकोचे) कपाळ पांढरे होणे बांगडी फुटणे (पाहा: पानिपताची बखर) खुर्दा होणे
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 11/16/2010 - 07:41 नवीन
इथेच डबल होणार बहुतेक शब्दसंख्या..
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 11/16/2010 - 07:43 नवीन
कंपुस सामोरे जाणे
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/16/2010 - 07:44 नवीन
तुमच्या लेखनाचा उत्साह आणि वेग बघुन खरच हेवा वाटतो.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 11/16/2010 - 07:45 नवीन
३१ मार्चच्या आत ३००+ टारगेट आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ग
गवि Tue, 11/16/2010 - 07:55 नवीन
:-) ३०० पोस्टे की ३०० शब्द? बरे.. समजले..खरंय.. फार होताहेत एका दिवशी पोस्टे.. सॉरी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Tue, 11/16/2010 - 07:56 नवीन
सोरी बिरि कशाला? चालु द्या तुमचे मस्त !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Tue, 11/16/2010 - 07:54 नवीन
"लेखनाचा उत्साह आणि वेग"" हे माझ्याविषयी नसावे.. पण असलेच तर.. सध्या नवीन लिहायला ब्याड पॅच आहे. कॉमेंटबद्दल धन्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
N
Nile Tue, 11/16/2010 - 07:58 नवीन
परा आणि नाना ह्या प्रस्थापितांचे असे प्रतिसाद पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली. (नवखा प्रस्थापित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अवलिया Tue, 11/16/2010 - 08:00 नवीन
बर मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/16/2010 - 08:20 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 11/16/2010 - 08:27 नवीन
तुमच्या कडुन अशाच प्रतिसादाची खात्री होती, ती पुर्ण झालेली पाहुन आनंद झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
क
कवितानागेश Tue, 11/16/2010 - 09:21 नवीन
गतप्राण झाला. देवाघरी गेला. 'तिकिट' काढले. हिन्दी (मला अजिबात न आवडणारा) भगवानको 'प्यारे' हुए! (...आम्ही काय आवडत नाही का देवाला?!) 'अमक्या'कडे गेला! ( रेफेरन्स टू: आधी गचकलेला 'अमका'!)
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Tue, 11/16/2010 - 09:27 नवीन
१) चपला भेटणे. पंख लाभणे.(मिपावरील सुप्रसिध्द !!) २) शेवटची वंदना घेणे. ३) (स्वर्गात) ठेका धरायला जाणे. ४) पुढच्या योनीत जाणे.(कॉलेजात लई फेमस होता. काय रे पुढच्या योनीत जायची लई घाई झाली का फेम !) वरिल यादीत " (वरच) तिकीट मिळणे " हा कॉमनली वापरला जाणारा शब्द कसा नाही ?
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 11/16/2010 - 09:29 नवीन
चपला भेटणे. पंख लाभणे.(मिपावरील सुप्रसिध्द !!) मि पा म्हणजे नवनव्या शब्दांची खाणच आहे की..
  • Log in or register to post comments
K
kamalakant samant Tue, 11/16/2010 - 11:25 नवीन
काही आठवलेले शब्द.कदाचित पुन्हा आलेले असतील तरी क्षमस्व. सौभाग्य गमाविणे,ग॑गा भागिरथी हणे,विधुर होणे,विधवा होणे,कुडी त्यागणे,आत्महत्या,शेवटचा श्वास घेणे, देहावसान्,काळ येणे,काळाने झडप घालणे,देवाला प्रिय होणे,देहा॑त,कायमचा आडवा करणे, छत्र हरपणे, ऐहिक कार्य स॑पविणे, मरण येणे, जड देहाचा त्याग करणे, देवज्ञा, शिरछेद, फाशी,कालवश्,दिव॑गत इत्यदि.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 11/16/2010 - 11:31 नवीन
अग्ग्ग्ग्ग्ग!!!! काय पण शब्दसंपदा!!!!! व्वा!!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 11/16/2010 - 11:43 नवीन
१.इथला व्हिसा संपणे. >>गोव-या स्मशानात जाणे (मला वाटते हा अजून जिवंत असलेल्या "वेटिंग लिस्ट" लोकांसाठी वापरतात..) २.ह्याचं दुसरं व्हर्जन : लाकडं पुढे जाणे. (वापरः एखादा गाडीवर जोरात गेला की, 'ह्याची लाकडं पुढं गेलेली दिसतायत.) शब्दसौजन्यः परीकथेतील राजकुमार. ३.खेळ खलास होणे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 11/16/2010 - 12:00 नवीन
धमु..आवडलं..झकास शब्द.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
च
चिगो Tue, 11/16/2010 - 12:18 नवीन
>>गोव-या स्मशानात जाणे (मला वाटते हा अजून जिवंत असलेल्या "वेटिंग लिस्ट" लोकांसाठी वापरतात..) << असाच "समाधीत पाय लटकणे" "व्हॅलिडीटी संपणे"
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 11/16/2010 - 12:21 नवीन
"व्हॅलिडीटी संपणे" :-)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 11/16/2010 - 13:20 नवीन
मजा आली वाचुन .. येव्हडे शब्द वापरात असतील असे वाटले ही नव्हते ..
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 11/16/2010 - 14:33 नवीन
वर लिहिलेले सर्व शब्द हे एकदाच मरण्याच्या क्रियेला आहेत. पण रोज मरणार्‍यांसाठी केवळ एकच शब्द आहे. 'मध्यमवर्ग' (आणि तो सुध्दा भारतातला)
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Tue, 11/16/2010 - 17:03 नवीन
आई शप्पथ... कहर आहे.. शाई संपणे, डाव बास, मसाला संपणे हे म्हणजे तर.. हैटच आहेत!
  • Log in or register to post comments
ज
जानम Tue, 11/16/2010 - 18:51 नवीन
शान्त झाले (पहिले खुप बन्ङ होते :०)
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 11/16/2010 - 19:24 नवीन
हिंदीमध्ये 'खटिया खडी होना' म्हणतात तसे काहीसे खाट उभी होणे वगैरे मराठीत म्हणतात काय हे माहित नाही. बाकी ही जी शब्दसंपदा आहे ती जिवंत माणसांनी वापरण्यासाठी!;) गेलेल्यांसाठी सगळे शब्द सारखेच!
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 11/17/2010 - 06:12 नवीन
गेलेल्यांसाठी सगळे शब्द सारखेच! वाक्य छान..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
अ
अविनाश कदम Tue, 11/16/2010 - 20:17 नवीन
वा ! किती समृद्ध मराठी भाषा. मरणे याला येवढे शब्द दुसर्‍्या कुठल्या भाषेत असतील काय याची शंका आहे. याचा अर्थ मराठी भाषा लवकर मरणार नाही. चांगलीच जिवंत राहील.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 11/17/2010 - 06:11 नवीन
याचा अर्थ मराठी भाषा लवकर मरणार नाही. चांगलीच जिवंत राहील. टिप्पणी आवडली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश कदम
म
मेघवेडा Tue, 11/16/2010 - 20:46 नवीन
जबरदस्त! __/\__
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 11/16/2010 - 21:53 नवीन
पैगंबरवासी ख्रिस्तवासी बुद्धवासी हे वरील शब्द हिंदूंमध्ये प्रचलीत असलेल्या कैलासवासी / वैकुंठवासी ह्या शब्दांना (अन्यधर्मियांसाठी) समानार्थी म्हणून घडवले गेले असले तरी, तसे निरर्थक वाटतात. कारण, कैलास वा वैकुंठ ही स्थानांची नावे असून, हिंदू व्यक्ती मृत्यूनंतर तिथे वास्तव्यास जाते, असे मानले जाते. परंतु, पैगंबर, ख्रिस्त वा बुद्ध ही व्यक्तींची नावे असल्यामुळे, सदर धर्मातील व्यक्ती मृत्यूनंतर "तिथे" जाते, म्हणजे नेमके कुठे जाते ते कळ्त नाही!! शिवाय ह्या धर्मात पुनर्जन्म मानत नाहीत, हे वेगळेच!! बाकी, ही सुचीची कल्पना छान!
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Wed, 11/17/2010 - 01:14 नवीन
चावी संपणे. (म्हणजे चावीची घड्याळे, खेळणी असतात ना, तसे)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 11/17/2010 - 05:54 नवीन
आणखी एक शब्द हल्लीच्या युगातला घ्या " त्याचा आयडी डिलीट झाला " समानार्थी शब्द " त्याचा आयडी उडाला " अवांतरः एखदयाचा गेम वाजला तर " आयडी उडवला " असे म्हणता येईल का ? ;)
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 11/17/2010 - 06:10 नवीन
आय डी डीलीट झाला.. वा. एकदम कंटेंपररी शब्द काढलात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 11/17/2010 - 11:08 नवीन
मी तर "ऑफ होणे" , "डिलीट होणे" असे वाक्प्रचारही ऐकले आहेत बोली भाषेत. राम बोलो होणे
  • Log in or register to post comments
प
पिंगू Wed, 11/17/2010 - 11:13 नवीन
बरेच शब्द झाले मरणासाठी.. आता कुणी जन्मासाठी तरी नविन शब्दांचा धागा काढा की... - पिंगू
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 11/17/2010 - 11:43 नवीन
आयडिया सर जी. म्हणजे ट्यांहां करणे. उद्भवणे अवतार घेणे संभव वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
ध
धमाल मुलगा Wed, 11/17/2010 - 12:00 नवीन
जन्माची चाहूल लागली असताना : जीवात जीव येणे. डबलसीट असणे (वाक्यात उपयोगः येडायस का? तुझी बायको सध्या डबलसीट आहे ना? ट्रेकला कशाला नेतोस तीला?) पुढचं व्हर्जन रिलीज होणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मराठे Wed, 11/17/2010 - 15:49 नवीन
प्रेम वाढीस लागणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
प्रभो Wed, 11/17/2010 - 15:54 नवीन
>>प्रेम वाढीस लागणे! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
ध
धमाल मुलगा Wed, 11/17/2010 - 16:37 नवीन
अग्गायायायायाया.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
न
नगरीनिरंजन गुरुवार, 11/18/2010 - 02:32 नवीन
>>प्रेम वाढीस लागणे :-) भारी. आमच्या नगरकडे गणपती बसणे असा ही वाक्प्रचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे
म
मेघवेडा Wed, 11/17/2010 - 15:40 नवीन
उत्तरपूजा झाली.. विसर्जन झालं. वड्यांचं पीठ मळायला घेतलं. (याचा कॉपीराईट आमच्या ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या वतीने मिपाकर श्री. प्रभो यांच्याकडे सुरक्षित आहे.) ;)
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 11/17/2010 - 16:03 नवीन
बल्ब फुटला / ट्युब विझली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा