Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

केस सरळ करावे की नाही?

र
रमणरमा
Wed, 11/24/2010 - 06:24
🗣 71 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
21543 वाचन

💬 प्रतिसाद (71)
न
नगरीनिरंजन Wed, 11/24/2010 - 07:40 नवीन
खाली आलेल्या सर्व प्रतिक्रिया वाचून तुम्ही एका गंभीर आणि वैश्विक समस्येला तोंड फोडले आहे याची जाणीव झाली. त्याबद्दल आपले अभिनंदन. शिवाय दर्जेदार व फुटकळ नसलेल्या धाग्यांअभावी मिपावर निर्माण झालेली पोकळी या धाग्याने भरून काढली या बद्दल आभार! कुठलेही केस सरळ वा कुरळे करून घेण्याचा वा देण्याचा वा झालेले पाहण्याचा अनुभव नसल्याने त्यावर मी काहीही मतप्रदर्शन करू शकत नाही याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 11/24/2010 - 06:27 नवीन
डोके पूर्ण भादरून घ्या.
  • Log in or register to post comments
र
रमणरमा Wed, 11/24/2010 - 06:35 नवीन
हो ना मी पण ऐकले आहे की डोके पूर्ण टक्कल केले की नवीन ग्रोथ चांगली येते. पण ट्राइ करायची भीती वाटते.. आलेच नाही परत केस तर काय घ्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
स्पा Wed, 11/24/2010 - 06:31 नवीन
कुरल्या केसांचा जाम वैताग आला आहे कुरल्या कि कुरळ्या ?
  • Log in or register to post comments
र
रमणरमा Wed, 11/24/2010 - 06:37 नवीन
तेच म्हणायचे आहे लिहिता नाही आले.. समजून घ्या ताई / दादा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
छ
छोटा डॉन Wed, 11/24/2010 - 06:33 नवीन
शक्यतो 'हेअर स्ट्रेटनिंग' ह्या भानगडीत पडु नका. एक तर ती प्रोसेस एकदाच करुन भागत नाही, दर महिन्याला केस वाढले की पुन्हा ते करावेच लागते, त्याचा दर वेळी ताप आहेच. शिवाय बर्‍याचदा ह्यामुळे केस गळतात. अजुन केसांच्या आरोग्याच्या दृष्तीने इतरही दुष्परिणाम आहेत. शक्यतो ह्या भानगडीत न पडलेले उत्तम :)
  • Log in or register to post comments
र
रमणरमा Wed, 11/24/2010 - 06:38 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/24/2010 - 06:39 नवीन
माझ्या इथल्याच एका मैत्रिणीने केस सरळ केले आहेत आणि (इ.स. २०१०च्या) ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून तिचे केस सरळच दिसत आहेत. तिच्या म्हणण्याप्रमाणे काही रसायन लावून केस सरळ केले आहेत त्यामुळे नीट काळजी घेऊन केस धुतले की केस सरळच रहातात आणि केस गळण्याचं प्रमाण वाढलेलं नाही. अर्थात केस वाढताना पूर्वी होते तसेच वाढणार आणि काही महिन्यांनी/वर्षांनी (केसांच्या लांबी आणि वाढीवर अवलंबून) केस पुन्हा कुरळे होतीलच. केसांचं गळणं प्रत्येकाच्या बाबतीत वेगळं असेल. तुम्हाला एवढाच कंटाळा आला असेल तर केस सरळ करून पहाच. पण त्याआधी सरळ केस कुरळे कसे करायचे आणि करावे का नाही याबाबत काही सल्ला मला द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
र
रमणरमा Wed, 11/24/2010 - 06:46 नवीन
मी तर म्हणेन की चांगले आहे केस नॅचुरली सरळ आहेत ते! कुरळे केस मेण्टेन करणे खूप अवघड असते आणि मेण्टेन नाही केले की बिलकुल चांगले दिसत नाही. पण ते सर्व करायची तयारी असेल तर प्रयत्न करण्यात काहीच हरकत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/24/2010 - 07:17 नवीन
केस मेण्टेन करण्यासाठी मला खास कष्ट करावे लागत नाहीत. आता केस गळण्याचं प्रमाण अंमळ जास्त आहे त्याचा दोष मी पुण्याच्या पाण्याला लावून मोकळी होते, त्यामुळे ती ही चिंता नाही. रमणरमाजी, पुण्याचा उल्लेख तुमच्या धाग्यात केला आहे, आता धागा हिट व्हायला पाहिजे. नाही झाला, तर पुण्याच्या पाण्यातच दोष आहे ही माझी थिअरी सिद्ध होईल. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमणरमा
N
Nile Wed, 11/24/2010 - 07:28 नवीन
हाफिसात कामं नसली की असे उद्योग करता क अहो तुम्ही? (१०% इकडे पाठवुन द्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
र
रमणरमा Wed, 11/24/2010 - 07:42 नवीन
अहो पुण्याचे पाणी ते.. इतक्या सहजासहजी त्याने आपला गुण सोडला तर काय बिशाद! चालायचेच.. काही दिवसाणी तुम्ही केस गळले तरी चालतील पण मला पुण्यातच राहायचे आहे असे म्हणाल :) ( ही लव्हज मी ही लव्हज मी नॉट च्या चालीवर धागा हिट होणार धागा हिट नाही होणार )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ट
टिउ गुरुवार, 11/25/2010 - 05:35 नवीन
धागा हिट होणार धागा हिट नाही होणार )
हे म्हणतांना डोक्यावरचा एक एक केस उपटा म्हणजे केस सरळ करावे की नाही हा प्रश्न पडणार नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमणरमा
व
विजुभाऊ Wed, 11/24/2010 - 06:54 नवीन
डानराव हे केसांच्या बाततीतले तज्ञ मानले जातात. माझी केस सध्या काहिशी गॉन केस आहे. पण माझ्या आणि डॉनरावांच्या बाबतीत दोन साम्य स्थळे आहेत. १) आम्ही दोघे ही सहा महिन्यातून एकदा न्हाव्या ला भेट देतो २) आमचे केस कापण हे प्रत्येक न्हाव्याला आव्हानात्मक वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
न
नितिन थत्ते Wed, 11/24/2010 - 06:34 नवीन
केसाविषयी सर्व शंका डॉनराव यांच्याकडे विचाराव्या.
  • Log in or register to post comments
N
Nile Wed, 11/24/2010 - 06:37 नवीन
डॉनरावांचे ऐकु नये, त्यांच्या केसांपेक्षा जावळीचे(पुर्वीचे) जंगल बरे अशी वदंता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
र
रमणरमा Wed, 11/24/2010 - 06:40 नवीन
लोल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 11/24/2010 - 06:43 नवीन
पुर्वि राजाराणी साबण मिळायचा
  • Log in or register to post comments
म
मधु बन Wed, 11/24/2010 - 07:28 नवीन
हेअर स्ट्रेटनिंग मधे २ प्रकार असतात परमनंट स्ट्रेटनिंग आणि आय्रनिंग परमनंट (?)स्ट्रेटनिंग जर योग्य काळजी घेतली तर जास्तित जास्त ४-५ महिने टिकत. आय्रनिंग मॅक्झिमम २-३ दिवस टिकत. पण दोन्हिमुळे केस खुप प्रमाणात गळतात.
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Wed, 11/24/2010 - 09:42 नवीन
आयर्निंग !!! म्हणजे इस्तरी करतात ??? गो बाबो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधु बन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/24/2010 - 09:51 नवीन
अरे बाळा, केसांची इस्तरी वेगळी असते. ही पहा: Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द
स
स्वानन्द Wed, 11/24/2010 - 09:57 नवीन
अशी असते होय. सोफिस्टिकेटेड दिसते की एकदम ! स्टेपलर ची मोठी बहीण वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मेघवेडा Wed, 11/24/2010 - 10:19 नवीन
हो, केस गळायला लागले की टकलाला ष्टेपल करून ठेवायचे!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/24/2010 - 10:35 नवीन
ए गपे, उगाच माझं गुपित का फोडतोस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
स
स्वानन्द Wed, 11/24/2010 - 11:06 नवीन
पॉईंट टू बी नोटेड रमा ताई... याचाच अर्थ, या महिला आपल्याला इतका वेळ चूकीचा सल्ला देऊन आपली दिशाभूल करत होत्या. वेळीच सावध व्हा आणि डॉन्रावांचे ऐका.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
र
रमणरमा Wed, 11/24/2010 - 18:57 नवीन
आता एक कौल टाकते ... १. डॉनरावांचा सल्ला ऐकावा २. महिला मंडळाचे ऐकावे ३. डॉनरावांचे ऐकल्यासारखे दाखवून महिला मंडळाने सांगितलेले करावे ४. महिला मंडळाचे ऐकल्यासारखे दाखवून डॉनरावांचा सल्ला वापरावा. अरे हाकानाका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/24/2010 - 19:06 नवीन
अरे ध्यानप्रेमी स्वानंद, माझे केस नैसर्गिकरित्या (नको तेवढे, माझ्यासारखेच) सरळ आहेत, माझे केस गळतात. माझ्या मैत्रिणीचे केस नैसर्गिकरित्या कुरळे आहेत, तिने ते सरळ करवून घेतले आहेत आणि तिचे केस गळणं एवढं होऊनही वाढलेलं नाही. रमणरमाजी, तुम्ही या पोरग्यांकडे लक्ष देऊ नका; 'पाशवी' शक्तींचा विजय असो, विजय असो, विजय असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमणरमा
श
शिल्पा ब Wed, 11/24/2010 - 19:14 नवीन
<<<माझे केस नैसर्गिकरित्या (नको तेवढे, माझ्यासारखेच) सरळ आहेत, स्वताची टिमकी वाजवलीच पाहिजे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
र
रेवती Wed, 11/24/2010 - 21:23 नवीन
आता पाशवी शक्ती म्हणजे जर बायका असल्या तर हा विजय मध्येच येण्याची हिंमत करतो तरी कशी? म्हणते मी!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 11/25/2010 - 06:29 नवीन
पाशवी रेवतीताईचा पाठींबा असल्यामुळे पळून गेला बहुतेक तो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मधु बन गुरुवार, 11/25/2010 - 06:22 नवीन
केस नुसते गळणारच नहित, जस्त वेळ ष्टेपल करायला जाल तर जळतील पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मस्त कलंदर Wed, 11/24/2010 - 07:33 नवीन
केसांची निगा कशी राखावी याबद्दल नंदनचे मत ऐकायला आवडेल. @ अदिती, पॅराशूट्चं कसलं तरी 'थेरपी' नावाचं चंदेरी रंगाच्या बाटलीतलं तेल वापरून पाहिलं. केस गळायचे पुष्कळच कमी आलेयत माझे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/24/2010 - 07:36 नवीन
नंदनचं मत ... नंदन फक्त लिंका देतो असं आमचं मत हो! ;-) मके, खुलाशाबद्दल धन्यवाद. ते ही वापरून पहाते, पण पुण्याच्या पाण्यावर कोणाचा इलाज चालणार ना! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
स
स्वानन्द Wed, 11/24/2010 - 09:46 नवीन
>>पण पुण्याच्या पाण्यावर कोणाचा इलाज चालणार ना! ते तर आहेच. भल्याभल्यांचे हातपाय गळतात. केस तर मामुली गोष्ट आहे. गळाले तर त्यात काय विशेष?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/24/2010 - 19:20 नवीन
केसांना मामुली म्हणतोस? अरे इथे एक आख्खा धागा निघालाय त्यावर आणि म्हणे मामूली! याला कोणीतरी पाशवी शक्तींचा हिसका दाखवलाच पाहिजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द
स
स्वानन्द गुरुवार, 11/25/2010 - 06:44 नवीन
हॅ... एकच धागा ना... पुण्याच्या पाण्यावर तर धागेच धागे निघतात... त्यापुढे हा असा एखादा केस... सॉरी धागा म्हणजे काहीच नाही. बाकी सत्त्व गुणांपुढे पाशवी शक्तींना नमते घ्यावेच लागेल. इतिहासच आहे तसा. :) ( उदाहरणादाखल : शक्तीमान विरुद्ध किल्विष ) हा हा हा.... सत्वगुणी ( स्वानन्द )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
N
Nile Wed, 11/24/2010 - 20:40 नवीन
नंदनला उगाच मध्ये आणु नका!! त्याची 'केस'च वेगळी आहे, त्याच्या डोस्क्याला आख्ख्या मराठी जालविश्वाचा ताप आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मस्त कलंदर गुरुवार, 11/25/2010 - 06:52 नवीन
धंदा कसा करावा यापेक्षा काय केल्याने तो बुडतो हे कळणं महत्वाचे. म्हणून नंदनची 'केस' रे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
अ
अश्विनीका Wed, 11/24/2010 - 07:46 नवीन
माझ्या एका मैत्रिणिने केस सरळ करून घेतले आहेत. तिचे जरा अतिच कुरळे केस होते. केसात कंगवा तरी जात असेल की नाही असे वाटण्याइतपत कुरळे. आता सरळ केल्यावर छान दिसतात तिचे केस. केस गळतात असे तिच्याकडून अजूनतरी ऐकले नाही. आणि एकदा केले की २-३ महिने ते छान रहातात. (नक्की किती महिने ते तिला विचारून सांगते). ही मैत्रीण यूसमधे रहाते. भारतात केस सरळ करण्यासाठी पार्लरमध्ये नक्की किती काळजी घेतात , काय काय वापरतात ते मला माहित नाही . तरीही आपण एकदा ट्राय करुन पहावे आणि चांगल्या पार्लरमधून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केस सरळ करून घ्यावेत .
  • Log in or register to post comments
र
रमणरमा Wed, 11/24/2010 - 07:56 नवीन
केस सरळ करून घेण्याबद्दल महिला मंडळाने दाखव्लेल्या उत्सहाबद्द्ल धन्यवाद! आता प्रोत्साहन मिळालेच आहे तर झटपट डिसीजन लॉक करून टाकते!! <मूजीक > न न ना ना नाना न न ना ना नाना < / मूजीक> माझे केस सरळ करणार :)
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Wed, 11/24/2010 - 08:12 नवीन
आता प्रोत्साहन मिळालेच आहे तर झटपट डिसीजन लॉक करून टाकते!! तसे असेल तर , केल्या नंतर "बिफोर" / "आफ्टर" छापाचे फोटु पण डकवा या धाग्यावर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमणरमा
व
विजुभाऊ Wed, 11/24/2010 - 10:41 नवीन
<मूजीक > न न ना ना नाना न न ना ना नाना < / मूजीक> माझे केस सरळ करणार नान्या आता हे पण सुरु केलेस का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमणरमा
र
रमणरमा Wed, 11/24/2010 - 19:01 नवीन
नानांचे केशकर्तनालय आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
इ
इंटरनेटस्नेही Wed, 11/24/2010 - 08:28 नवीन
या लेखातील केसांसंबंधी विचारलेला प्रश्न पाहुन आमच्या डोक्यात एक भयानक जोक आला आहे.. पण सध्या तो मोह आवरता घेतो. (इच्छुकांनी व्यनि करावा!)
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Wed, 11/24/2010 - 09:57 नवीन
काही सदस्यांनी मागणी नोंदवली देखील!...अन्य सदस्यांनी देखील व्यनि धाडावा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
र
रमणरमा Wed, 11/24/2010 - 19:02 नवीन
आमी नाय जा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
श
शिल्पा ब Wed, 11/24/2010 - 18:39 नवीन
अम्च्या सुद्धा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
इ
इंटरनेटस्नेही Wed, 11/24/2010 - 21:16 नवीन
शिल्पा आणि रमणमणा ताई... __/\__ तो ज्योक मी तुम्हाला सांगितला तर माझी इमेज डगाळाली जाऊन मला सदस्यत्त्वाचा राजीनामा द्यवा लागेल.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
म
मेघवेडा Wed, 11/24/2010 - 21:29 नवीन
रमणमणा =)) =)) इंट्या मेल्या, वर एका प्रतिसादात अदितीने ष्ट्यापलर सारख्या यंत्राचा एक फोटू टाकलाय बघ.. जीभ सरळ करून घे तुझी त्यात.. अशी सरकणार नाही परत! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
प
पैसा गुरुवार, 11/25/2010 - 17:34 नवीन
तुला मणामणाची रमणी असं म्हणायचं होतं का मेल्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा