Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंदमानमधुन सावरकरांचे नाव काढले...

अ
अवलिया
Sun, 11/28/2010 - 07:40
🗣 84 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14141 वाचन

💬 प्रतिसाद (84)
त
तिमा Sun, 11/28/2010 - 08:07 नवीन
आमचा होरा/अंदाज तुम्हाला या पानाशी पोहचण्याची मुभा नाही.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sun, 11/28/2010 - 08:40 नवीन
<१) याच धर्तीवर अंदमानातील जिथे जिथे सावरकर वगैरे नाव असेल ते काढुन टाकावे? >ते काम मणिशंकर अय्यर यांनी पूर्वीच केले आहे <२) काही बिनडोक लोक अंदमानला जावुन सावरकर होते त्या खोलीत जावुन उगाच डोळ्यात पाणी वगैरे आणुन देशप्रेमाच्या गुळण्या टाकतात. त्यावर त्वरीत बंदी आणावी> त्यापेक्षा त्यावर जिझिया कर लावण्याची मागणी करा. जाणारे ही खुष घेणारेही खुष <३)तिथला तो तथाकथित तुरुंग जमीनदोस्त करुन तिथे शेळीपालन केंद्र व बोकड पैदास केंद्र चालु करावे> या मागणीमुळे आपण मांसाहारा चे व पर्यायाने हिंसेचे पुरस्कर्ते आहात असा भास होतो! <<४) भारतातील इतिहासाच्या पुस्तकातुन सावरकर तसेच इतर सर्व क्रांतीकारक ( खरे तर हे स्वतःच्याच फायद्यासाठी लढले, पण आव मात्र देशप्रेमाचा !) यांची नावे काढुन टाकावीत. थोडक्यात इतिहासाचे पुनर्लेखन करावे>> जागे व्हा मालक, मुळात १०० पानी इतिहासात २ पाने या सर्वांना मिळतात. तिही हटतील, मागणी नाही केलीत तरी. अस काय करता, अहो २-३ वर्षांपूर्वी एन सी आर टी अभ्यासक्रमांच्या पुस्तकात क्रांतिकारकांचा उल्लेख दहशतवादी असा केला होता. माहित नाही का? <<५) भारताचा इतिहास हा इसवी सन १९२० पासुनच पुढे चालु ठेवावा. मागच्या सर्व खुणा पुसुन टाकाव्या. त्यासाठी रायगड, राजगड, सिंहगड इत्यादी सर्व डोंगर सपाट करावे>> विनंती अ) <भारताचा इतिहास हा इसवी सन १९२० पासुनच पुढे चालु ठेवाव> यात उल्लेखापेक्षा गाळण्याची यादी जास्त असेल तेव्हा एव्हढा त्रास घेण्यापेक्षा ठराविक एक दोन नावांव्यक्तिरीक्त अन्य कुणाचाही उल्लेख स्वातंत्र्य संग्रामात, चुकलो स्वातंत्र्य प्राप्तिमध्ये असू नये अशी मागणी करा. ब)<रायगड, राजगड, सिंहगड इत्यादी सर्व डोंगर सपाट करावे> असे विध्वंसक विचार मनात आणू नका. त्यापेक्षा या ठिकाणी पर्यटन मंडळाला खाजगी विकासकांच्या मदतीने पर्यटनस्थळे उभारायला सांगा म्हणजे रम, रमा आणि रमी यात रमलेले पर्यटक या वास्तू कुणी बांधल्या असले फलतू प्रश्न विचारणार नाही. <६) शनीवार वाडा जमीनदोस्त करावा > आत उरलाय काय त्याच्या पाडायला? फार तर नाव बदलाची मागणी करा
  • Log in or register to post comments
ज
जोशी 'ले' Sun, 11/28/2010 - 08:45 नवीन
सरकार चे डोके ठिकाणावर आहे का ? आयला......त्या वायझेड कांग्रेस वाल्यांना आजन्म कोलू फिरवायची शिक्षा दिली पाहिजे
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Mon, 11/29/2010 - 06:26 नवीन
सरकार चे डोके ठिकाणावर आहे का ? त्यासाठी डोके असायला लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'
य
यकु Sun, 11/28/2010 - 09:13 नवीन
सावरकर डॉट ऑर्ग वर उपलब्ध असलेले खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मृत्यूंजय दिनानिमित्त त्यांनी केलेले एक भाषण ऐकले. सावरकरांना त्यांची जहागिर परत मिळावी आणि त्यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी काही लोकांनी भारत सरकारकडे केली होती. याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात - "आता मला या उपाधीचं काय हो चीज? काय अर्थ आहे हे भारतरत्न... हे शब्द माझ्या छातीवर बसवून? "...हे फक्त आता समाधानासाठी...मला कुणी विचारलं तर मी सांगतो.. अहो, एवढा तीन चतुर्थांश हिंदुस्थान मला परत मिळाला - त्यात माझी जहागिर परत मिळाली नाही?... सावरकरांना त्यांच्या हयातीतच आपल्याच "भारत सरकार" कडून जो खुन्नसभरा त्रास भोगावा लागला त्यासमोर हे नाव काढून टाकणे वगैरे प्रकार तसे क्षुल्लकच. सावरकरांनी असल्या ** सरकारकडून कधीच काही अपेक्षा केली नव्हती. त्यामुळे अवलियांनी उपरोधानं केलेल्या मागण्या रास्त आहेत. :(
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sun, 11/28/2010 - 09:30 नवीन
हे खरंच दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातल्या आमदार-खासदारांना दिल्ली-दरबारात काय किंमत आहे हे पाहिलेच होते. हे त्याचेच एक ताजे उदाहरण! कीं या खासदारांनीच आपल्या सक्रीय सहभागाने हे घडवून आणले? श्री अवलियांनी यावर प्रकाश टाकावा! तसेच शक्य झाल्यास टाइम्स किंवा इतर आंग्ल वृत्तपत्रातील दुवा द्यावा. प्रतिभाताईंना (कदाचित्) अद्याप मराठी येत असेल पण 'पप्रं'ना कसे येईल? मग या सबबीचेच वेड ते पांघरतील!! 'सकाळ' पत्राच्या मालकीत भागीदार, सध्याचे कृषिमंत्री आणि बारामतीचे 'पोपु' दिल्लीत असताना असे कां व्हावे? पण भारतीयांची आजकालची एकंदर उदासीनत पहाता त्यात नवल वाटायला नको. गिलानी-अरुंधती यांच्या दिल्लीत केलेल्या देशविरोधी कारवायांसंबंधी FIR दर्ज "केलीच पाहिजे" असा 'बांबू' दिल्ली पोलिसांना ज्या देशात उच्च न्यायालयाला (हायकोर्टला) द्यावा लागतो त्या देशात देशभक्तीला कसली किंमत! लोकांच्या मनात या विषयावर जर तीव्र भावना असतील तर त्या "अनिष्ट बघणार नाहीं, अनिष्ट ऐकणार नाहीं, अनिष्ट बोलणार नाहीं" छाप मंत्र्यांना (माकडांना नव्हे) कळणार कशा? पंतप्रधानांना पत्रे लिहून! नाहीं लिहिली तर त्यांना कळणार कसे? पण जो सुचवतो त्याची अस्थानी व विनाकारण कुचेष्टाच केली जाते. असले अरण्यरुदन काय कामाचे? आपल्या लोकप्रतिनिधींना आपल्या-आपल्या मार्गाने खडबडून जाग आणा! ज्यांना हे वाचून असे कांहीं करावेसे वाटेल त्यांच्यासाठी तयार माहिती: पंतप्रधानः छोट्या मेल साठी (शब्दसंख्येवर ५०० कॅरॅक्टर्सची मर्यादा आहे): webpmo.nic@nic.in विस्तृत मेलसाठी (शब्दसंख्येवर मर्यादा नाहीं): pmosb@pmo.nic.in (हा पत्ता मला PMO क्डून्च आलेला आहे); राष्ट्रपती (शब्दसंख्येवर मर्यादा नाहीं): presidentofindia@rb.nic.in चालवा आपली बोटें कळफलकावर!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Sun, 11/28/2010 - 09:42 नवीन
आम्हाला वाटलं पोपु म्हणजे पाडगावकरांनी पोप ला नविन शब्द पाडलाय काय.. असो दुव्यांबद्दल धन्यवाद.. आजच माझ्या भयंकर विंग्रजीत मनमोहन सिंगांना घाम फोडतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
ग
गांधीवादी Mon, 11/29/2010 - 04:55 नवीन
Veer Savarkar’s photo and name removed from tourist guide in Andaman New Delhi: Tourist guide booklet published by the Government for attracting more tourists to Andaman and Nicobar has excluded the name of Swatantryaveer Savarkar although the place has become famous after Savarkar was kept in imprisonment here. His name has been excluded even from the pamphlet published on tourism. The above fact was accepted in writing by the Government in the Parliament. 'रिमोट कंट्रोल च्या खेळण्याला पत्र पाठवून काहीतरी बदल होईल आणि चक्क असा चमत्कार सुद्धा घडू शकतो' हि वेडी आशा ठेऊन मी देखील एक पत्र धाडतोय. बाकी सर्व मान्यवरांनी स्पष्ट केले आहेच. टीप : सदर चर्चचा दुवा मित्रांना पाठविलेला आहे, तसेच त्यांना देखील तसे पत्र पाठविण्याचे आवाहन केलेले आहे. शंभरच्या ऐवजी हजार पत्रे येऊन पडली तर माननीय पंतप्रधान आणि (अति)माननीय राष्ट्रपती निदान एक तरी पत्र वाचतील (हि सुद्धा एक वेडी आशा, बरंका)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
न
नगरीनिरंजन Sun, 11/28/2010 - 09:31 नवीन
हा देश आपला नाही राहिला गड्या.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Sun, 11/28/2010 - 09:37 नवीन
आंतरजालावरचे मला न आवडणारे पण लोकप्रिय शब्द वापरायची वेळ आणि तेवढा राग शक्यतो येत नाही.. पण.. ****** **** ** **** *** *** ***** असो.. तर नानाच्या सगळ्या मागण्यांना अनुमोदन.. आणखी एक मागणी.. आमच्या सर्वांच्या हृदयात तात्याराव आहेत ती हृदयंही काढुन घ्या म्हणावं.. नावनोंदणी कुठं करायचिये सांगा.. आमच्यासारख्या षंढांना काळीजं असायचा अधिकारच काय... आम्ही नुसतं म्हणायचं.... स्वातंत्र्य लक्ष्मी की जय.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Tue, 11/30/2010 - 04:40 नवीन
आमच्या सर्वांच्या हृदयात तात्याराव आहेत ती हृदयंही काढुन घ्या म्हणावं.. नावनोंदणी कुठं करायचिये सांगा.. आमच्यासारख्या षंढांना काळीजं असायचा अधिकारच काय... टाळीबाज ड्वायलाक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट
स
सुधीर काळे Sun, 11/28/2010 - 10:05 नवीन
http://timesofindia.indiatimes.com/india/Delhi-court-calls-for-FIR-against-Roy-Geelani/articleshow/7002100.cms वरील दुवा वाचा
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Sun, 11/28/2010 - 10:19 नवीन
@सुधीर काळे: आणि हे पत्र आहे १६ डिसेंबर २००८ चे! http://www.thejakartapost.com/n = 404 Page Not Found The page you requested was not found.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sun, 11/28/2010 - 11:01 नवीन
दोन दुवे दिले आहेत. एक २६/११/२०१०चे पत्र आणि दुसरे १६/१२/२००८चे. http://www.thejakartapost.com/news/2008/12/16/letter-indiapakistan-ties-after-mumbai-tragedy.html (किंवा http://tinyurl.com/2cqh4t9) दुसरा दुवा २०१०च्या पत्राच्या खालीही (वरून दुसरा) आहे मी हा http://tinyurl.com/2cqh4t9 दुवा माझ्या स्वाक्षरीत टाकत आहे. सांगितल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा
म
मदनबाण Sun, 11/28/2010 - 12:12 नवीन
आपल्या देशातील भिकार नेत्यांकडुन अजुन काय अपेक्षित असणार आहे ? भ्रष्टाचाराचा "आदर्श" समाजा समोर ठेवणारी ही मंडळी स्वतः देशद्रोही असुन, देशभक्तांच्या उरल्या सुरल्या खुणा सुद्धा नष्ट करण्याच्या मागावर आहेत हे या भिकार कॄतीतुन दिसुन आलेच आहे. अंदमानमधील पर्यटनविषयक प्रसिद्धिपत्रकांतून सावरकरांचे नाव गायब झाल्या बद्धल मी तीव्र निषेध नोंदवत आहे.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Sun, 11/28/2010 - 12:34 नवीन
काही विशिष्ट लोकांच्या प्रतिसादांची वाट पाहात आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 11/28/2010 - 12:58 नवीन
अतिशय अतिशय दुर्दैवी घटना.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 11/28/2010 - 15:16 नवीन
अतिशय अतिशय दुर्दैवी घटना. यशोसारखेच वाटते. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
इ
इंटरनेटस्नेही Sun, 11/28/2010 - 13:12 नवीन
.
  • Log in or register to post comments
अ
अमोल खरे Sun, 11/28/2010 - 14:14 नवीन
ते ब्राम्हण होते.........त्यामुळे जरी आता त्यांच्या विरोधात कोणी काहीही बरळले तरी मोर्चे निघणार नाहीत, तोडफोड होणार नाही, मुख्यमंत्री / पंतप्रधान लक्ष घालणार नाहीत. एका ब्राम्हण व्यक्तिला बदनाम करत आहेत म्हणाल्यावर बाकी मराठी लोक (काही अपवाद वगळता) शांतच बसणार हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही. सुभाषचंद्र बोसांबद्दल काही बोलले तर अख्खा बंगाल पेटेल.........इथे काहीही होणार नाही. अमराठी लोकांमध्ये सावरकरांबद्दल जास्त माहिती असेल असे वाटत नाही त्यामुळे त्याचा नॅशनल इश्यु वगैरे काही होणार नाही. हिंदुत्ववादाचा तथाकथित पुरस्कार करणारी भाजपा ह्याविषयी काही करेल असे वाटतच नाही. उरताउरली फक्त शिवसेना आणि मनसे. त्यांनी काही केले तर चांगले आहे....... नाही केले तरी आम्ही काय करु शकतो....... देशासाठी इतका मोठा त्याग करुन हेच मिळत असेल तर कशाला करायचा त्याग ? आहे कोणाकडे उत्तर ? सावरकरांच्या निधनानंतर त्यांना सरकारी इतमामात निरोप दिला गेला नाही. शेवटी आचार्य अत्र्यांनी धावपळ करुन लष्करी वाहनासारखी प्रतिकृति अ‍ॅरेंज केली असे ऐकिवात आहे. ज्या माणसाची ब्रिटिशांना इतकी दहशत होती, त्याची इतकी अवहेलना स्वतंत्र भारतातच होईल असे ब्रिटिशांनाही वाटले नसेल. "सावरकरांनी चालवलेल्या गप्पांच्या कार्यक्रमाला लहानपणी वेलणकर हे जायचे (भारताचे बहुदा पहिले पोस्टमास्टर जनरल....भारतातील पिन कोड चे जन्मदाते) म्हणुन त्यांना ब्रिटिश सरकारने आय सी एस केले नव्हते. (हे पुढे त्यांना एका ब्रिटिशानेच सांगितले). आणि आता सावरकरांवर ही वेळ येते.........आणि माझ्यासारखी लोक त्यावर प्रतिसाद देत बसतात.....काहीही उपयोग होणार नाही हे माहित असुन सुद्धा......... चांगलं आहे.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sun, 11/28/2010 - 15:23 नवीन
सावरकर हयात असतानाही त्यांची सरकारने अवहेलनाच केली होती.तीच परंपरा दुर्दैवाने आजही चालू आहे.
ते ब्राम्हण होते.........त्यामुळे जरी आता त्यांच्या विरोधात कोणी काहीही बरळले तरी मोर्चे निघणार नाहीत, तोडफोड होणार नाही, मुख्यमंत्री / पंतप्रधान लक्ष घालणार नाहीत.
सावरकर ब्राम्हण होते ही त्यांची मिस्टेक की काय मला कल्पना नाही.पण मला वाटते की आज त्यांच्या विरोधात कोणी काहीही बरळले तरी झाडाचे पानही हलणार नाही याचे कारण म्हणजे ते हिंदुत्ववादी आणि विज्ञाननिष्ठ दोन्हीही होते.ज्यांना त्यांचा हिंदुत्ववाद पटला त्यांना त्यांची विज्ञाननिष्ठा पटली नाही आणि ज्यांना त्यांची विज्ञाननिष्ठा पटली त्यांना त्यांचा हिंदुत्ववाद पटला नाही.आणि ज्यांना त्यांचे हिंदुत्व पटले त्यांना तरी सावरकरांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व (जातीभेदविरहित समाजरचना, कर्मकांडांना फाट्यावर मारणे वगैरे) पटले होते की केवळ ’हिंदुत्व’ हा सामायिक शब्द त्यात होता म्हणून ते त्यांना पटले हे सांगता येणे अवघड आहे.थोडक्यात काय की सावरकर हा फार फार मोठा माणूस होता.पाच आंधळे आणि हत्ती या गोष्टीप्रमाणे बहुतेकांना ते पूर्णपणे समजलेच नाहीत. तेव्हा मला वाटते की सावरकरांची ’मिस्टेक’ काही असेल तर ते इतर कोणाच्याही आवाक्याबाहेरचे असामान्य व्यक्तिमत्व होते.आणि त्या कारणाने सावरकरांचे वरवर समर्थन करणारे अनेक आढळले तरी त्यांचे कट्टर अनुयायी त्यामानाने थोडे आहेत. तात्याराव म्हणायचे की मी जे आज सांगतो ते लोकांना दहा वर्षांनी पटते आणि त्यासाठी दहा वर्षे थांबायची माझी तयारी आहे.दुर्दैवाने दहा वर्षांची शंभर वर्षे होत आहेत पण एक ना एक दिवस आपल्याच समाजाचे डोळे उघडतील आणि सावरकरांचे विचार पटतील. मग मणिशंकर अय्यरसारख्या झुरळांची पर्वा करायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे
य
यशोधरा Sun, 11/28/2010 - 16:15 नवीन
>>हिंदुत्ववादी आणि विज्ञाननिष्ठ दोन्हीही होते.ज्यांना त्यांचा हिंदुत्ववाद पटला त्यांना त्यांची विज्ञाननिष्ठा पटली नाही आणि ज्यांना त्यांची विज्ञाननिष्ठा पटली त्यांना त्यांचा हिंदुत्ववाद पटला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
म
मृत्युन्जय Sun, 11/28/2010 - 17:09 नवीन
मला ते आवडतात कारण ते प्रखर राष्ट्रप्रेमी होते. त्यांचे हिंदुत्ववादी, विज्ञाननिष्ठ किंवा ब्राह्मण असणे माझ्यासाठी दुय्यम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
न
नगरीनिरंजन Sun, 11/28/2010 - 16:07 नवीन
>>ते ब्राम्हण होते.. का तुम्ही त्यांच्या विचारांच्या चिंधड्या करताय आणखी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे
र
रन्गराव Sun, 11/28/2010 - 17:42 नवीन
>>एका ब्राम्हण व्यक्तिला बदनाम करत आहेत म्हणाल्यावर बाकी मराठी लोक (काही अपवाद वगळता) शांतच बसणार हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही. खरे साहेब हे वाक्य परत परत वाचा. ह्यात एक विसंगती आहे आणि एक शब्द जास्ती आहे. सावरकर "प्रखर हिंदूत्ववादी होते" हा प्रचार एक राजकीय चाल होती आणि तो कट होता त्यांच्या प्रखर देशभक्तीला धार्मिक रंग चढवून त्याच तेज कमी करण्याचा. आणि तुम्ही तर आता जात मध्ये आणून त्या सुर्याला ग्रहणच लावायला निघाला आहेत. तुम्ही केलेल्या अशा विधानांचा उपयोग सावरकरांच्या विरूद्धच केला जाईल. ते एक देशभक्त होते. त्यांना त्याचं इतिहासाच्या पुस्तकातल स्थान दुदैवान मिळाल नाही, आता जातीयवादामुऴं लोकांच्या मनातलं स्थान डळमळीत झाल नाही म्हणजे मिळवल. बाकी पवार साहेबांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे
स
सुधीर काळे Sun, 11/28/2010 - 15:09 नवीन
अमोल, लोकशाहीत संख्येला महत्व असते. माझी कितीही चेष्टा/कुचेष्टा झाली तरी मी मला चीड आणणार्‍या राजकीय/सामाजिक विषयांवर PM व Pres या दोघांना पत्रे लिहितोच. माझ्यासारख्या ५-१० पत्रांकडे कुणी ढुंकूनही पहाणार नाहीं हे माहीत असूनही. पण 'pmosb' या पत्त्यावर पाठविलेली पत्रे नक्की वाचली जातात कारण माझ्या काहीं माहितीवजा प्रश्नांना उत्तरेही आलेली आहेत. माझ्यासारख्या लोकांची संख्या वाढली पाहिजे म्हणून मी हे वारंवार लिहितो. कारण असे करण्यावर माझा विश्वास आहे! त्यावर कांहीं लोक कुत्सितपणे (थेट किंवा आडून-आडून) शेरेही मारतात. पण अशा शेर्‍यांकडे मी लक्ष देत नाहीं. कारण माझ्या मते लोकशाहीत वाईट गोष्टींबद्दल निषेध करून त्या मागे लोटण्याचा हा एकच योग्य मार्ग आहे. कारण दुसरा मार्ग आहे हिंसापूर्ण क्रांतीचा! कदाचित माओवादी हेच करत आहेत, त्यांच्या रास्त मागण्यांकडे लक्ष न दिल्यामुळे ते संघटित झाले आहेत असे 'मिपा'वरील कांहीं लेखांवरून वाटते!! निवडणुकांच्या आधी बरीच प्रलोभने दाखवून मतदारांचे लक्ष दुसरीकडे खेचले जाते व हे महत्वाचे मुद्दे तसेच उरतात. प्रगल्भ लोकशाही देशांमध्ये हे सर्रास केले जाते. आपली लोकशाही अद्याप तान्ही आहे. त्याला वळण आपणच लावायचे आहे. आता मी श्री अवलियांच्या इंग्लिश दुव्याची वाट पहात आहे. तो मिळाला कीं PM ना निषेध कळवेनच. प्रतिभाताईना तर लिहिलेसुद्धा! असो. आली जर तिरमिरी तर जरूर लिही! न लाजता लिही.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 11/28/2010 - 15:23 नवीन
अवलियांच्या मागण्यांशी सहमत. जसे तुरुंगात शेळीपालन व बोकडपैदासकेंद्र चालू व्हायला हवे तसे राजगड, रायगड, सिंहगड सपाट करून तिथे मंत्र्यांच्या बांधकाम कंपन्यांना वेगळाली शहरे वसवायची परवानगी बिनशर्त मिळाली पाहिजे. ब्राह्मणद्वेष्टे असल्याने असे करतात म्हणावे तर स्वजातियांनाही लुटल्याच्या कहाण्या दोनवर्षापूर्वी ऐकून आले होते. आपण पुढच्या आपल्याच पिढीचे किती नुकसान करून जात आहोत हे ध्यानात येत नसल्यासारखे वागतात. आधी वाटले फक्त पैसा हेच ध्येय असावे पण तोही पुरेसा मिळवून झाल्यावर नविन काय करायचे? शांत बसवत नाही. दोन वर्षांपूर्वी म्हणे शहराच्या आजूबाजूच्या छोट्या वाड्या वस्त्यांवरच्या शेतकर्‍यांच्या जमिनी जबरदस्तीने (बराच) पैसा देवून नवीन शहर वसवण्यासाठी घेतल्या आहेत. त्या शेतकर्‍यांची पुढची पिढी आता शहरात ड्रायव्हर, कुठे मजूर म्हणून काम करतात असे आमच्या गाडीचा ड्रायव्हर सांगत होता.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 11/28/2010 - 15:30 नवीन
खरतर मला सोनिया गांधी व राहुल गांधी ह्याच्या शिवाय कोणत्याच स्वातंत्र्यसैनिकाचे नाव ठावुक नाही.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 11/29/2010 - 12:53 नवीन
खी खी खी! धन्य आहात हो वेताळसाहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
म
मृत्युन्जय Mon, 11/29/2010 - 12:55 नवीन
राजीवजींचा विसर पडलेला दिसतोय तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
न
नितिन थत्ते Sun, 11/28/2010 - 16:00 नवीन
चुकीची गोष्ट घडली आहे याबाबत सहमत. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
प
प्रशु Sun, 11/28/2010 - 16:16 नवीन
तीव्र निषेध.. ह्या पेक्षा जास्त लिहिवत नाही........
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Sun, 11/28/2010 - 16:37 नवीन
"....एका ब्राम्हण व्यक्तिला बदनाम करत आहेत म्हणाल्यावर बाकी मराठी लोक (काही अपवाद वगळता) शांतच बसणार हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही...." ~ हे वाक्य जर तात्यांनी वाचले असते तर व्यक्तिशः त्यांना किती वेदना झाल्या असत्या हे सांगायला खरेतर कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. श्री.खरे यांच्या मतस्वातंत्र्याच्या हक्काला मी बाधा आणू शकत नाही, तरीही त्यानी 'सावरकर ब्राह्मण म्हणून मराठा शांत' ही सांगड का घातली हे अनाकलनीय आहे. असे म्हणायचे कारण खुद्द तात्यांनी असा भेदभाव बाळगण्याला कायम विरोध केला होता. सावरकरांनीच लिहिले आहे की, "आज आपल्या हिंदूत जो जन्मजात म्हणून म्हणविला जातो, तो जातिभेद निव्वळ पोथीजात आहे. पानपतचा सेनानी भाऊ ब्राह्मण, 'यातिशूद्र' वंशातील तुकाराम परमसंत ! आज ज्या जाती म्हणून मानल्या जातात, त्यात वर्ण वा गुण वा कर्म यांच्या कसोटीत संघश: असा कोणताही ठाम जन्मजात वेगळेपणा आढळत नाही. आजचा जातिभेद हा जन्मजात म्हणविला जात असला, तरी तो आहे निव्वळ पोथीजात...निव्वळ मानीव, खोटा !" असे रोखठोक मत असणार्‍या सावरकरांवरील प्रेम, आदर प्रदर्शित करीत असताना ते 'ब्राह्मण' होते म्हणून 'मराठा' विरोध करणार नाही हा समास कसा काय सुटला जातो, हे अनाकलनीय आहे. माझ्या माहितीचे कित्येक असे मराठे आहेत की एखाद्या ब्राह्मणाच्या घरात आढळणार नाही इतके सावरकर वाङ्मय त्यांच्या कपाटात आहे. शिवाजीनंतर दुसरा फोटो असेल त्या घरात तर तात्यांचा ! त्या मराठ्यांना आनंद झाला असेल केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री सुलतान अहमद यांनी दिलेल्या उत्तरामुळे? आज रविवार दि.२८ नोव्हेम्बर....तर सकाळची बातमी आली शुक्रवारी...जी वाचल्या क्षणीच आम्ही तीन (मराठा जातीच्या) मित्रांनी स्वतंत्रपणे ई-मेलद्वारे या घटनेचा निषेध केंद्राकडे नोंदविला आहे. अशा पत्रांची (श्री.सुधीर काळे म्हणतात त्याप्रमाणे....) कुठेना कुठे तरी नोंद होत असतेच...भले त्याची पोच येवो अथवा ना येवो. आम्ही लोकशाही तत्वे मानतो, त्यानुसार निषेधासाठी म.न.से. वा संभाजी ब्रिगेडचा रस्ता आम्हाला सातत्याने त्याज्य आहे...पण म्हणून आम्ही नेभळट ठरत नाही. टॅक्स्या फोडणे आणि ग्रंथालयातील दुर्मिळ पुस्तके जाळणे हे ज्याना पुरुषत्वाचे लक्षण वाटते ते त्या मार्गाने जातील, त्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. पण एखाद्या व्यक्तीचा अपमान तो अमुक जातीचा आहे म्हणून दुसर्‍या जातीच्या माणसाला संतोषाची घटना वाटत असेल असे मानणे ही घातक वंचना ठरेल, पण त्याहूनी ज्या व्यक्तीच्या आपलेपणाबद्दल श्री.खरे यानी तसे उदगार काढले आहेत त्या व्यक्तीच्या शिकवणीचाही तो अपमान असेल. धागाकर्त्यांनी औपराधिक भूमिकेतून 'सावरकरांच्या कोठडीत जावून काही लोक डोळ्यात पाणी वगैरे आणुन देशप्रेमाच्या गुळण्या टाकतात. त्यावर त्वरीत बंदी आणावी...' असे सुचविले आहे. अंदमानातील त्या कोठडीत असे डोळ्यात पाणी आलेल्यांपैकी मी एक क्षुद्र मराठा सावरकर भक्त होतो....आणि माझ्या आजुबाजूला तिथे जे लोक बसले होते, त्यांचीही स्थिती माझ्यापेक्षा काही वेगळी नव्हती.....! .... सुदैवाने कुणाच्याही डोळ्यातील अश्रूंना 'जात' नव्हती. इन्द्रा
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Sun, 11/28/2010 - 17:51 नवीन
.... सुदैवाने कुणाच्याही डोळ्यातील अश्रूंना 'जात' नव्हती. पवार साहेब, आपण जिंकला आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
श
शिल्पा ब Sun, 11/28/2010 - 20:42 नवीन
+१ बाकी कसला कोण तो मणिशंकर हरामखोर अय्यर अन काय त्याची लायकी? त्याच्या असल्या कर्तुत्वाने सावरकरप्रेमाला तडा जाणार नाही ... अन लिखित स्वरुपात निषेध नोंदवला कि त्याची नोंद होतेच त्यामुळे तो एक पर्याय वापरावा कारण अशे काँग्रेसी किडे चेचायला आपल्याकडे तेवढा पैसा नाही...ताकद नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
ज
जोशी 'ले' Mon, 11/29/2010 - 04:52 नवीन
त्या हरामखोर मनिशंकर चा इतिहास काय आहे ? हा पुर्वी कम्युनिस्ट होता आणि जेव्हा भारत - चीन युध्द्द चालु होते तेव्हा हा हरामखोर लंड्न ला शिकत होता व तेथे त्याने चीन साठी मदतनीधी गोळा करायची मोहिम उघड्ली होती, काय दुदैव आहे असा *****,####,@@@ हरामखोर अजुनहि जिवंत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
स
सुधीर काळे Mon, 11/29/2010 - 03:36 नवीन
"जय हो!" इंद्रा! सुरेख प्रतिसाद! खास करून ".... सुदैवाने कुणाच्याही डोळ्यातील अश्रूंना 'जात' नव्हती." हे वाक्य!! सावरकरांबद्दलची ही बातमी तू जर इंग्लिश वृत्तपत्रात वाचली असशील तर त्याचा दुवा पाठव. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
व
विकास Mon, 11/29/2010 - 04:45 नवीन
सुरेख प्रतिसाद! खास करून ".... सुदैवाने कुणाच्याही डोळ्यातील अश्रूंना 'जात' नव्हती." हे वाक्य!! १००००% सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
अ
अर्धवट Mon, 11/29/2010 - 05:06 नवीन
.... सुदैवाने कुणाच्याही डोळ्यातील अश्रूंना 'जात' नव्हती. देवाधिराज स्वर्गाधिपती इद्रदेवांचा विजय असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
ग
गणेशा Mon, 11/29/2010 - 13:18 नवीन
ग्रेट प्रतिसाद इंद्राजी सुदैवाने कुणाच्याही डोळ्यातील अश्रूंना 'जात' नव्हती हे पटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
अ
अप्पा जोगळेकर Tue, 11/30/2010 - 04:31 नवीन
अगदी समर्पक प्रतिसाद दिला आहे. दुर्दम्य पुस्तकातलं एक वाक्य आठवलं. जेंव्हा लोकमान्य टिळाक वारले तेंव्हा महात्मा गांधी खांदा देण्यासाठी पुढे झाले. तर एकजण म्हणाला की तुम्ही ब्राम्हण नसल्याने खांदा देउ नये. तेंव्हा गांधीजी म्हणाले होते , "लोकसेवकाला जात नसते." ~ हे वाक्य जर तात्यांनी वाचले असते तर व्यक्तिशः त्यांना किती वेदना झाल्या असत्या हे सांगायला खरेतर कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. ज्या माणसाने आयुष्यभर हारच खाल्ल्ली आणी दरखेपेला हरल्यानंतर ज्या माणसाचे तेज आणि शक्ती दसपटीने वाढत गेली त्या महामानवाच्या डोळ्यांमध्ये इतक्या क्षुद्र पातळीवरच्या कॉमेंटपायी अश्रू तरळले असते किंवा त्यांनी त्रास करुन घेतला असता असं अजिबात वाटत नाही. अहो, हीन भावनेचे सार्वजनिक विसर्जन करणारे लोक जागोजाग असतातच. त्यावेळेलाही तसे लोक असणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
स
सर्वसाक्षी Sun, 11/28/2010 - 18:08 नवीन
पवार साहेब स्वातंत्र्यवीर सावरकर काय अथवा छत्रपती शिवाजी महाराज काय, इतक्या महान व्यक्तिमत्त्वांना जात नसते हे खरे आहे. श्री. अमोल यांना असे म्हणायचे असावे की मराठा समाजातील थोर व्यक्तिविषयी काही अनुचित घडले असते तर ते करणार्‍याला इतके सोपे गेले नसते कारण आज महाराष्ट्र शासनात तसेच केंद्रातही काँग्रेसला घसरणीच्या दिवसात पश्चिम महाराष्ट्रातुन भरघोस मिळाली त्यामुळे त्या समाजाला दुखावताना सरकारला विचार करावा लागेल. शिवाय मागे जेम्स लेन प्रकरणात मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व सांगणार्‍यांनी रौद्र रूप धारण केले होते तेही ध्यानात असावे. दुसरीकडे मागासवर्गीय/ अनुसुचित जातीच्या व्यक्तिविषयी कुणी काही बोलल्यास कायद्याचा बडगा + बहुजनसमाजाचे आंदोलन यांना सामोरे जावे लागेल. ब्राह्मण समाज बरा. कुणीही या आणि झोडपा, यांना वाली नाही. त्यात पुन्हा स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकेकाळी काँग्रेस सरकारने ठरवु घातलेले भयंकर गुन्हेगार, पुरावा नसल्याने त्यांना नाईलाजाने सोडावे लागले. पण तेव्हा पासून त्यांचे चरित्र्यहनन करण्याचा वा त्यांना उपेक्षित ठरविण्याचा काँग्रेस सरकारचा डाव आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रस्तावित स्मारकासाठी फ्रान्स सरकारने जागा देण्याचे तयारी दर्शविली होती पण त्यांचे असे म्हणणे आहे की हिंदुस्थान सरकारने तशी कोणतीही मागणी / विनंती फ्रान्स सरकारकडे अधिकृतरित्या केलेली नाही असे ऐकुन आहे. अंदमानातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदगार मागे याच सरकारचे मंत्री असलेल्या मणीशंकर अय्यर यांनी उखडुन टाकले होते, त्यांचे काय कुणी वाकडे केले? स्वातंत्र्यवीर सावरकरच काय अन्य कुणाही देशभक्ताचा स्वातंत्र्यप्राप्ती हाच धर्म होता आणि देशभक्त हीच जात होती. हे सर्व महान क्रांतिकारक जात व धर्म यापलिकडचे होते. पण राज्यकर्ते तसे नाहीत. अजुनही राजकारणात जात या विषयाला अनन्यसाधारण महत्व आहे, प्रत्येक मतदार संघात उमेदवार उभा करताना त्या मतदार संघात कुठल्या जातीचे मतदार बहुसंख्येने आहेत याचाच विचार केला जातो.
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Sun, 11/28/2010 - 18:25 नवीन
>>ब्राह्मण समाज बरा. कुणीही या आणि झोडपा, यांना वाली नाही. वाली असा वरून पडत नसतो तो आपण बनवावा लागतो. त्यासाठी एखादा धर्मनिरपेक्ष ( धर्मनिरपेक्ष ह्याचा "minority appeasement" हा प्रचलित अर्थ लावू नये. ) उमेद्वार उभा करून त्याला निवडून दिलं पाहिजे. मराठी पाउल पडते पुढे ह्या गाण्यातला एक श्लोक आठवतो - "स्वै शस्त्र देशार्थे हाती धरावे, चितावे रिपूला रणि वा मरावे, तुझ्या रक्षणा तुच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावून येई" हा श्लोक रचणारेही ब्राह्मण होते आणि त्याच अनुकरण करनारेही काही ब्राम्हण होते उदा पहिले बाजीराव. ( खरं तर जातीन काही एक फरक पडत नाही पण जातही ग्प्प बसण्याची excuse असू शकत नाही) . हा श्लोअक आजही लागू आहे. फक्त तलवारी जावून लेखण्या आल्या आहेत आणि मेडिया रणांगण झालं आहे. त्यामुळे जात माग ठेवून आता लढायला हरकत नसावी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
अ
अर्धवटराव Sun, 11/28/2010 - 19:57 नवीन
बातमी वाचून आनंद झाला. (दु:खी) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Mon, 11/29/2010 - 06:20 नवीन
माझा काहीसा भावुक वाटणारा प्रतिसाद आवडल्याचे लिहिल्याबद्दल सर्व स्नेहीप्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. श्री.सर्वसाक्षी यानी अचूकपणे म्हटल्याप्रमाणे (स्वातंत्र्यवीर सावरकर काय अथवा छत्रपती शिवाजी महाराज काय, इतक्या महान व्यक्तिमत्त्वांना जात नसते हे खरे आहे. ) सर्वानीच 'महनीय' नावाबद्दल असा भाव मनी बाळगणे सद्यस्थितीत फार गरजेचे आहे. आदर भावनेची जी गोष्ट सावरकरांबाबत तीच गोष्ट गांधी-नेहरू यांच्याबद्दलही. भले या लोकांचे राजकारण आपल्याला पसंत असो वा नसो, पण म्हणून बोलताना/लिहिताना त्यांचे एकेरीत ('एमके, मोहन, जवाहर') उल्लेख करावेत असेही नसावे. शेवटी त्यांच्या कार्याचा देशपातळीवर जमाखर्च झालेला असतो आणि उरते ती त्यांची आठवण, ती काढत असताना निदान सौजन्य म्हणून तरी भाषेचा तोल जावू देऊ नये...इतकेच. श्री.सुधीर काळे यांनी शासकीय पातळीवर "पत्रे पाठवणे" किती गरजेचे आहे हे वारंवार विविध प्रतिसादातून स्पष्ट केले आहे व अगदी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या कार्यालयांची ई-मेल्सही दिली आहेत. मी (याच नव्हे...तर) विविध विषयावर पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवित असतो, ज्यावर काय कार्यवाही व्हायची ती होवो वा न होतो, पण पोच मात्र जरूर येते. डॉ.एपीजे कलाम हे पत्रव्यवहाराबाबत अतिशय दक्ष असत. (श्री.काळे यांच्यासाठी ~~ http://www.hindujagruti.org/news/10746.html इथेही "ते' वृत्त टिपणीसह आहे.) तरीही वरील 'सावरकर' प्रकरणात आम्ही मित्रांनी राष्ट्रपती/पंतप्रधान याना ई-मेल न करता 'जॉईन्ट सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ टूरिझम, भारत सरकार' याना पत्र पाठविले आहे. हे अशासाठी केले आहे की, टूरिझम डीपार्टमेन्ट वेळोवेळी ज्या पुस्तिका प्रकाशित करत असते, तीत अद्ययावत घडामोडींचा उल्लेख येण्यासाठी दक्ष असते. "अंदमान पुस्तिके"तून सावरकरांचे नाव वगळले म्हणून जर त्यांच्याकडे पत्रे आली तर त्याबद्दलची एक श्वेतपत्रिका सचिवपातळीवर तयार केली जाते व संबंधित मंत्रालयाकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी दिली जाते. त्यांचा ई-मेल आहे amitabhk@nic.in मला माहित आहे की सचिव पातळीवर [जिथे आय.ए.एस. दर्जाचे लोक असतात.... पत्रही दोन पॅरेग्राफपेक्षा जास्त होऊ देऊ नये....या लोकांना पत्रलेखकाला नेमके काय म्हणायचे आहे एवढेच अपेक्षित असते] अशा पत्राची गांभीर्याने दखल घेतली जातेच जाते. इन्द्रा
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Tue, 11/30/2010 - 04:39 नवीन
आदर भावनेची जी गोष्ट सावरकरांबाबत तीच गोष्ट गांधी-नेहरू यांच्याबद्दलही. भले या लोकांचे राजकारण आपल्याला पसंत असो वा नसो, पण म्हणून बोलताना/लिहिताना त्यांचे एकेरीत ('एमके, मोहन, जवाहर') उल्लेख करावेत असेही नसावे. कुठे येऊन सांगताय हे इंद्रराज साहेब. मागे एकदा खुद्द तात्यांनी महात्मा गांधींची टिंगल करण्यासाठी गांधीजींचा आणि दारुची बाटलीचा असे दोन फोटो बाजूबाजूला लावले होते. आणि त्याचा आनंद झालेले असंख्य लोक इथे आहेत. तुमच्या प्रतिसादाची जागा चुकली आहे. इथे महात्मा गांधींना कुणी वाली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
न
नितिन थत्ते Tue, 11/30/2010 - 05:21 नवीन
>>मागे एकदा खुद्द तात्यांनी महात्मा गांधींची टिंगल करण्यासाठी गांधीजींचा आणि दारुची बाटलीचा असे दोन फोटो बाजूबाजूला लावले होते. अहो चालतंय. असल्या गोष्टींनी (किंवा ती पहा ती पहा गांधीजींची ...... इत्यादि विडंबनांनी) गांधींची टिंगल वगैरे काही होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
व
विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 12/02/2010 - 09:29 नवीन
>>असल्या गोष्टींनी गांधींची टिंगल वगैरे काही होत नाही सहमत !!! आकाशावर थुंकल्याने आकाशाचा अपमान होत नाही, जो थुंकतो त्याच्याच तोंडावर ती थुंकी पडणार. गांधीजींची अशी टिंगल करण्याने गांधीजींचा जितका अपमान झाला त्यापेक्षा करणाऱ्याची बौद्धिक पातळी जगजाहीर झाली नाही का? >>त्याचा आनंद झालेले असंख्य लोक इथे आहेत काही जणांना जेनुईन आनंद झाला असेल तर ती त्यांची समज. काही लोकांनी लांगुलचालन केले असेल. असेही गांधीजी महान होते हे सिद्ध करायची गरज नाही. आणि तसे करायची गरज पडली तर मिपा हे त्यासाठी योग्य स्थळ नाही. >>तुमच्या प्रतिसादाची जागा चुकली आहे. इथे महात्मा गांधींना कुणी वाली नाही. असे गृहीत धरू नये. आणि तसे खरे असले आणि आपण अल्पमतात असलो तरीही मत मांडावेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 12/02/2010 - 15:42 नवीन
".....असे गृहीत धरू नये. आणि तसे खरे असले आणि आपण अल्पमतात असलो तरीही मत मांडावेच...." ~ या विचाराशी मी पूर्ण सहमत आहे. निकोप लोकशाहीच्या वाढीसाठी अशा मताची खूप आवश्यक असते. ८० च्या घरात येऊन पोहोचलेले कोल्हापूरचे कॉम्रेड गोविंद पानसरे हे मत सातत्याने आपल्या भाषणातून, लिखाणातून व्यक्त करीत असतात. "इथे कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराचा निवडणुकीत पराभव होणार हे नक्की माहित असतेच, पण जरी आमचा पक्ष अल्पमतात असला तरीही विजयी होऊ घातलेल्या कॉन्ग्रेसच्या उमेदवाराला व त्याच्या पक्षश्रेष्ठीना हे कळलेच पाहिजे की त्यांच्या धोरणाना इथे विरोध करणारेही, अल्पमतात असले तरी, आहेतच." हाच नियम आपल्याला ज्या व्यक्तिमत्वाविषयी आदर वाटतो, त्यांच्याबाबतीतही लागू होतोच होतो. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
च
चिंतामणी गुरुवार, 12/02/2010 - 10:59 नवीन
कुठे येऊन सांगताय हे इंद्रराज साहेब. मागे एकदा खुद्द तात्यांनी महात्मा गांधींची टिंगल करण्यासाठी गांधीजींचा आणि दारुची बाटलीचा असे दोन फोटो बाजूबाजूला लावले होते. आणि त्याचा आनंद झालेले असंख्य लोक इथे आहेत. अप्पा, संदर्भ देता का? स्वा.सावरकरानी हे कृत्य केंव्हा आणि कुठे केले. आमच्या ज्ञानात भर घाला ही मौलीक माहिती देउन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा