Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सामाजीक सवयी

श
शैलेन्द्र
Sat, 12/11/2010 - 16:37
🗣 95 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
15176 वाचन

💬 प्रतिसाद (95)
व
विलासराव Sat, 12/11/2010 - 17:09 नवीन
>>नगर जिल्हातील अतिशय श्रीमंत व घरंदाज घरातील तो मुलगा अशी सवय का बाळगुन होता? तसा मला कमलेश आठवला, त्यापेक्षाही त्याची आजी... कमलेश शेखावतच्या घरी एकदा गेलो होतो, खानदानी राजपुत.. दणदणीत जेवण झाल्यावर त्याच्या आजीने सरळ ताटात हात धुतले, इतकेच नाही ते पाणी पीवुन टाकले. मीही नगरचाच. मी आजही घरी जेवण झाल्यावर सरळ ताटात हात धुतो. पण ते पानी वगैरे प्यायची काही भानगड नाही बुवा. मीच काय आमच्याकडे ही पध्द्तच आहे आजही. >>नगरच्या एके काळच्या दुष्काळी प्रदेशात राहणारे माझे नातेवाईक आजही ताटात हात धुतात, व घरच महीला मंडळ त्याच पाण्याने लगेच ताट वाटी धुवुन टाकते. नळाखाली ताट धुण्याची चैन करणे तिथे आजही गरजेचे वाटत नाही. हात ताटात धुतात ते मान्य. पण त्याच पाण्याने ताट वाटी धुतात हे मला नाही पटत. तस ते नाहीपण. अहो तेल़कट ताट असं एवढ्याशा पाण्यात धुवुन होईल का? याचा जरा प्रयत्न करुन पहा. ताटात हात धुण्याची पध्द्त कशी सुरु झाली हे मला नाही सांगता येणार. परंतु जेवायला बसण्याअगोदरही हात धुवायला भांडं दिलं जातं बर्याच ठिकाणी.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sat, 12/11/2010 - 17:23 नवीन
त्याच पाण्याने याचा अर्थ तेवढ्याच पाण्याने नाही, पण खरकटे ताट वाळले की जास्त पाणी लागते, ओले असेल तर पटकन स्वच्छ होते. , यस, हात धुवायला पाणी द्यायची पद्धत आजही आहे. आणी पानी प्यायचा प्रकार मारवाडात आहे, आपल्याकडे नाही, मी तसच लिहीलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
ट
टारझन Sun, 12/12/2010 - 09:09 नवीन
एक णाही अणेक उदाहरणे देता येतील :) माणसाणे जसजसा विकास केला तस तसे त्याच्या बुद्धीचे आणि सामाजिक भाणाचे तिनतेरा झालेत हे णक्की. पाठीमागुन कुटाळक्या करण्याच्या खुजलीप्रवृत्तीचे विषेश कौतुक वाटते ते ह्या साठीच . :) चला माझी शेळीचं दुध काढायची आणि जी-मेल लॉगिन करायची वेळ झाली . - (चेन)मेलेंद्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र Sun, 12/12/2010 - 09:33 नवीन
शेळी दुध देतीय, म्हणजे बकरु असलच कवळं, कधी येवु?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Sun, 12/12/2010 - 10:15 नवीन
अरे बापरे बकरीला करडु झालं पण ? अभ्यास कमी पडतोय माझा! पण तेच बरं आहे. अन्यथा आता ओकारीही येत नाही एवढं मन उडलंय. व्याआआआअक्क् - ( बकरीचा फक्त दुधदुभत्यासाठी उपयोग करणारा) मेंढपाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र Sun, 12/12/2010 - 11:19 नवीन
अरे राजा, दुभत्या जनावराला बारक पिल्लु असत रे बरेचदा, आता तुझी शेळी इतर काही प्रकाराने दुध देत असेल तर माहीत नाही. (बकरीचा व बकर्‍याचा फक्त कापुन खाण्यासाठी उपयोग करणारा) धनगर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Sun, 12/12/2010 - 13:44 नवीन
आता कसं सांगायचं ह्याला ? तुम्ही ट्रॅक क्लियर चुकलेले आहात एवढंच म्हणिन :) - क्रिप्टिक मास्तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र Mon, 12/13/2010 - 10:12 नवीन
जरा खरडी-व्यनीतुन ट्रॅकवर आन ना.. -क्रिप्टीक डिसास्टर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
र
राजेश घासकडवी Sun, 12/12/2010 - 00:27 नवीन
जेंव्हा आपण एखादा गुणविषेश एखाद्या समजाला/जातीला चिकटवतो तेंव्हा तो वांशिक नसुन परिस्थीतीजण्य आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे. हल्लि शहरातील बर्‍याचशा एकजीनशी वातावरणात वाढताना, आपले हे गुण विरघळत चाललेत, आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी व्यवसायसाठी योग्य गुण आपण आत्मसात करतोय.
१०० टक्के सहमत. दुर्दैवाने 'देअर, बट फॉर द ग्रेस ऑफ गॉड, गो आय' हे तत्व पुरेशा प्रमाणात वापरलं जात नाही. इतरांच्या चालीरीतींना आपण आपल्याच चष्म्यांतून बघतो.
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Sun, 12/12/2010 - 01:48 नवीन
ताटात हात धुणे ही सामाजिक सवय पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जन्माला आली असावी हे एकवेळ मान्य, पण रस्त्यावर पान-गुटखा-तंबाखू खाऊन थुंकणे, रस्त्याच्या कडेला प्रातर्विधी करणे, कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या कुठेही भिरकावणे, खाजगी मालमत्तेचा सार्वजनिक वापर करणे, कुणाच्याही बागेतली फुले, फळे बिनदिक्कतपणे तोडणे, ऐतिहासिक स्थळांवर आपली नावे कोरुन ती विद्रूप करणे, बाहतुकीचे नियम न पाळणे अशा सवयी कशातून जन्माला आल्या असाव्यात?
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sun, 12/12/2010 - 02:05 नवीन
........> अशा सवयी कशातून जन्माला आल्या असाव्यात? मला वाटते, टोकाच्या स्वार्थी आणि आत्मकेंद्री भुमिकेतून ह्या सगळ्या सवयी जन्माला आल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
ग
गांधीवादी Sun, 12/12/2010 - 04:21 नवीन
>>खाजगी मालमत्तेचा सार्वजनिक वापर करणे, नक्की काय म्हणायचे आहे, ते समजले नाही. कृपया स्पष्ट करून सांगाल काय ? बाकी सर्व सवयी ह्या 'बेशिस्तपणा' यातून जन्माला आलेल्या आहेते. यांना शिस्त कोण लावणार ? दुर्दैवाने शिस्त लावण्याची जबाबदारी असणारेच आज बेशिस्तीने वागतात. मग बेशिस्तपणा हा वरून खाली, कि खालून वर ह्या चर्चा झाडत राहतात. कारणे : पण रस्त्यावर पान-गुटखा-तंबाखू खाऊन थुंकणे, मानसिक रोग, गुंड प्रवृत्ती, थुंकण्यासाठी जागाच नसणे. रस्त्याच्या कडेला प्रातर्विधी करणे, प्रातविधी करण्याची पुरेशी सोय नसणे कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या कुठेही भिरकावणे, कचरापेटीची पुरेशी सोय नसणे. खाजगी मालमत्तेचा सार्वजनिक वापर करणे, समजले नाही. कुणाच्याही बागेतली फुले, फळे बिनदिक्कतपणे तोडणे, धर्मांधपणा, आणि मुलांना फळे तोडण्यासाठी शहरात फळझाडेच अस्तित्वात नसणे. ऐतिहासिक स्थळांवर आपली नावे कोरुन ती विद्रूप करणे, ऐतिहासिक संवर्धन खात्याची वरून वाहवत आलेली उदासीनता. बाहतुकीचे नियम न पाळणे. या बद्दल काय बोलणार ? नियम पाळणारे कुचेष्टेचा विषय ठरतात. वाहतूक व्यवस्थेच्या बोजावार्यानंतर याचे महत्वच उरले नाही. चुकून पकडले गेलोच तर काय ३०-५० रुपये देऊन सुटता येतेच कि, अशी मनोधारणा निर्माण होणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
च
चिंतामणी Sun, 12/12/2010 - 13:01 नवीन
बाकी सर्व सवयी ह्या 'बेशिस्तपणा' यातून जन्माला आलेल्या आहेते. यांना शिस्त कोण लावणार ? दुर्दैवाने शिस्त लावण्याची जबाबदारी असणारेच आज बेशिस्तीने वागतात. मग बेशिस्तपणा हा वरून खाली, कि खालून वर ह्या चर्चा झाडत राहतात. प्रत्येकाने स्वतःपासुन सुरवात करावी. आपण शिस्त पाळतो की नाही एव्ह्ढे प्रथम पहावे. कारणे : पण रस्त्यावर पान-गुटखा-तंबाखू खाऊन थुंकणे, मानसिक रोग, गुंड प्रवृत्ती, थुंकण्यासाठी जागाच नसणे. मानसिक रोग, गुंड प्रवृत्ती आणि कायद्याची भिती न वाट्णे हे महत्वाचे घटक आहेत. परदेशात गेल्यावर व्यवस्थीत वागतात. येथे परत आल्यावर का असे वागतात? कित्येकदा रस्त्यात बघतो की A/C कारमधुन जाणारे चालु गाडीचे दार उधडतात आणि पचकन थुंकुन दार बंद करतात. ह्याला काय म्हणायचे. रस्त्याच्या कडेला प्रातर्विधी करणे, प्रातविधी करण्याची पुरेशी सोय नसणे फक्त एव्हढेच कारण नाही. बेफीरीकी हेसुध्दा कारण आहे. पोरबाळे सार्वजनीक स्वच्छतालयात गेल्यास तेथे सफाई करायला लागेल म्हणून त्यांना रस्त्यावर बसवणारे कितीतरी महाभाग असतात. कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या कुठेही भिरकावणे, कचरापेटीची पुरेशी सोय नसणे. पुन्हा तेच. ९० %चे वर बेफीकीरी हे कारण आहे खाजगी मालमत्तेचा सार्वजनिक वापर करणे, समजले नाही. उदा. "वाहनतळाच्या जागेचा वापर व्यावसाईक कारणासाठी करणे" कुणाच्याही बागेतली फुले, फळे बिनदिक्कतपणे तोडणे, धर्मांधपणा, आणि मुलांना फळे तोडण्यासाठी शहरात फळझाडेच अस्तित्वात नसणे. हॅ हॅ हॅ. विनोदी आहात भौ तुम्ही.शहरात फळझाडेच अस्तित्वात नसतील पण मार्केटमधे मिळतात फुले आणि फळे. फुकटेगिरी हे कारण आहे. ऐतिहासिक स्थळांवर आपली नावे कोरुन ती विद्रूप करणे, ऐतिहासिक संवर्धन खात्याची वरून वाहवत आलेली उदासीनता. बाहतुकीचे नियम न पाळणे. या बद्दल काय बोलणार ? नियम पाळणारे कुचेष्टेचा विषय ठरतात. वाहतूक व्यवस्थेच्या बोजावार्यानंतर याचे महत्वच उरले नाही. चुकून पकडले गेलोच तर काय ३०-५० रुपये देऊन सुटता येतेच कि, अशी मनोधारणा निर्माण होणे. पहील्यांदा लिहीले आहे तेच पुन्हा लिहीतो. प्रत्येकाने स्वतःपासुन सुरवात करावी. आपण शिस्त पाळतो की नाही एव्ह्ढे प्रथम पहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
श
शुचि Sun, 12/12/2010 - 04:29 नवीन
डोक्यात तिडीक जाणारी, गलीच्छ सवय म्हणजे गर्दीत महीलांच्या अंगचटीस जाणे, गैरफायदा घेणे. याबद्दल ज्या भावना आणि जो राग आहे तो केवळ शब्दातीत आहे. मान्य ही विकृती , कर्करोगाप्रमाणे वाढलेल्या बेसुमार लोक्संख्येचे अपत्य आहे. पण न्यू यॉर्क मध्येदेखील अशीच गर्दी असूनही , अशी गलीच्छ सवय आढळली नाही. भारतातच का हा विद्रूपपणा आहे ते कळत नाही. आणि मग आपल्या संस्क्रुतीचे गोडवे गाण्यास वर आपण मोकळे.
  • Log in or register to post comments
ए
ए.चंद्रशेखर Sun, 12/12/2010 - 04:42 नवीन
शुचि ज्या विकृती बद्दल बोलत आहेत ती साधारण अशा समाजांच्यात जास्त प्रमाणात आढळून येते जेथे सार्वजनिक ठिकाणी स्त्री व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेल्या असतात. स्त्री व पुरुष यांचे जितके Segregation केले जाते त्या प्रमाणात या विकृती जास्त दिसतात. घरात बहिण भाऊ किंवा इतर नातेवाईक यांच्यातले स्त्री पुरुष कितीतरी मोकळेपणाने वावरत असतात. त्याच प्रकारचा मोकळेपणा जर स्त्री पुरुषांमधे सार्वजनिक ठिकाणी दिला गेला तर अशा विकृती कमी दिसतात. अर्थात काही मनोरुग्ण अशा विकृतीने पछाडलेले सगळीकडेच दिसतात. त्यांच्यावर उपचार किंवा कडक शासन हे होणेही आवश्यक असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
न
निनाद मुक्काम … Sun, 12/12/2010 - 11:05 नवीन
@मान्य ही विकृती , कर्करोगाप्रमाणे वाढलेल्या बेसुमार लोक्संख्येचे अपत्य आहे. अमान्य .तुमच्या पुढच्या वाक्यातून स्पष्ट झाले आहे कि परदेशात हे अनुभव येत नाहीत . हे खरे आहे .ह्याचे कारण भारतातील बहुसंख्य जनता हि आपल्या तारुण्यातून वार्धक्याचा प्रवासात आपल्या नैसर्गिक भावनांचे शमन कसे करावे मुळात ते करावे का ? ह्या संबंधी साशंक आसते .त्यातून हि विकृती जन्माला येते (येथे शतकांपासून चालत असलेली पुरुषप्रधान संस्कृती व महिलेस दुर्गा वगैरे लेखनात ठीक आहे ( पण प्रत्यक्ष जीवनात मादी ह्यापुढे सहसा कोणी पाहत नाही . ) रेल्वे किंवा बस मध्ये चिमटे काढणे वैगेरे प्रकार पण सरार्स होतात .तेव्हा योग्य त्या वयात योग्य त्या गोष्टींबद्दल मोकळी चर्चा हि समाजात घडली पाहिजे .नाही तर छोटा व मोठा पडदा माणसाची भूक चाळवून माणसातील श्वापद व वखवख नेमकीच जागृत राहील ह्याची कटाक्षाने दक्षता घेतो . (लंडनला आमचे एक कलीग (भारतीय ) चक्षु मोदन मध्ये तरबेज पण मेट्रोतून परत घरी येतांना एकदा भर गर्दीत (संध्याकाळी काही तास गाड्यांना तुडूंब गर्दी असते ) इधून धक्का व तिथून धक्का असे प्रकार करत असतात . एक कोपर्यात सावज टप्यात आले म्हणून दबा धरून बसला .शेवटी काही वेळा नंतर ती गौरागना त्याला म्हणाली झाले तुझे ? माझा स्टोप येतोय .मी उतरू का ? साहेब मग गोरे मोरे झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शैलेन्द्र Sun, 12/12/2010 - 11:14 नवीन
"डोक्यात तिडीक जाणारी, गलीच्छ सवय म्हणजे गर्दीत महीलांच्या अंगचटीस जाणे, गैरफायदा घेणे. याबद्दल ज्या भावना आणि जो राग आहे तो केवळ शब्दातीत आहे." अगदी मान्य.. पण यावर एकच उपाय आहे.. त्या महीलेने सरळ दणदणीत आवाजात त्या माणसाला शिव्या घालायच्या.. उरलेला काम गर्दी आपोआप करते. पण हल्लि दुसरा प्रकारही पाहिलाय, बर्‍याच महीला गर्दीत सरळ धक्काबुक्कि करत पुढे घुसतात, पुरुषांचा जो उद्देश असतो तोच त्यांचा असतो अस अजिबात नाही पण आपण धक्के मारले तरी समोरुन उत्तर येणार नाही याची खात्री असते आणी त्याचा गैरफायदा घेतला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
प
प्रसन्न केसकर Mon, 12/13/2010 - 14:14 नवीन
डोक्यात तिडीक जाणारी, गलीच्छ सवय म्हणजे गर्दीत महीलांच्या अंगचटीस जाणे, गैरफायदा घेणे. याबद्दल ज्या भावना आणि जो राग आहे तो केवळ शब्दातीत आहे. संपुर्ण सहमत! न्यू यॉर्क मध्येदेखील अशीच गर्दी असूनही , अशी गलीच्छ सवय आढळली नाही. हा! हा! हा! एन वाय पी डी चे (गेला बाजार कुठल्याही एल पी डी चे, एफ बी आय चे किंवा कौंटी पोलिसचे) क्राईम रजिस्ट्रेशन ‍रेकॉर्ड तपासा एकदा. हा किळसवाणा प्रकार जगभर सगळीकडेच चालतो. तुम्ही कुठल्या समाजघटकांमधे वावरता त्यावर प्रमाण अवलंबुन असते व हा वावर अनेकदा भौगोलिक परिस्थितीवर अवलंबुन असतो. अमेरिकेतला एकुणच क्राईम रेट, क्राईम डिस्पोजल रेशियो हा अमेरिकेत देखील चिंतेचा विषय आहे. तिथल्यापेक्षा इंग्लंडमधे पोलिस खाते अधिक सजग आहे असे समजले जाते. पण अमेरिकेत गेल्या १५-२० वर्षात स्कुल लेव्हलला याबाबत बरेच काम सुरु आहे असे तिथले स्थानिक लोक सांगतात. तिथे मुला-मुलींना गुड टच/ बॅड टच यातील फरक ओळखायला शिकविण्याचे आणि स्वसुरक्षिततेसाठी काय करता येईल याचे प्रशिक्षण देण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत ते कौतुकास्पद आहेत. तसे प्रयत्न इथेही व्हायला हवेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
न
नीलकांत Sun, 12/12/2010 - 06:49 नवीन
शैलेंद्र तुमचे निरिक्षण आवडले. नगर जिल्ह्याप्रमाणे विदर्भातसुध्दा ताटात हात धुण्याचा प्रकार आहे. लग्नाच्या पंगतीत किंवा भंडारा (म्हणजे एखाद्या प्रसंगी सर्वांनी एकत्र पंगतीत जेवणे) असल्यावर मात्र हात धूण्यासाठी वेगळी जागा असते तेथे जाऊन हात धुवायचे असतात. मानाच्या जेवणाततर खास भांड्यात हात धुण्याचा प्रकार होतो. मात्र विदर्भात तरी या प्रथेमागे पाण्याची उणीव असावी असे मला वाटत नाही. तुमच्या लेखाचा दूरसा भाग मला जास्त महत्वाचा वाटला. विशेषत: जेंव्हा आपण एखादा गुणविषेश एखाद्या समजाला/जातीला चिकटवतो तेंव्हा तो वांशिक नसुन परिस्थीतीजण्य आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे. हल्लि शहरातील बर्‍याचशा एकजीनशी वातावरणात वाढताना, आपले हे गुण विरघळत चाललेत, आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी व्यवसायसाठी योग्य गुण आपण आत्मसात करतोय. त्यामुळे हळुहळु पण निच्छितपणे ज्या गुणांचा आपल्याला अभिमान आहे वा इतरांच्या ज्या सवयींबद्दल आपण नाके मुरडतो, त्या नाहीशा होवुन एक नवा काहीसा एकजीनसी समाज उदयास येणार आहे हे नक्कि. हा भाग विशेष आवडला. - नीलकांत
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 12/12/2010 - 06:58 नवीन
ताटात हात धुणे ही परिस्थितीनुसार चालत आलेली संवय असली तरी परिस्थिती बदलल्यावरही त्यात बदल न करणे हे योग्य नाही. आजुबाजुच्या लोकांना घाण वाटू शकते याची तरी जाण ठेवावी. आजही मी ताटात हात धुतो असे म्हणणारे पंचतारांकित हॉटेलात जेवायला गेल्यावरेही तसेच करतात का ? की त्यावेळेपुरते आजुबाजुच्या परिस्थितीचे भान येते ?
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 12/12/2010 - 10:44 नवीन
परत आपण आपल्या चष्म्यातुन पाहतोय, असं वाटत. कुठे गेल्यावर शक्यतो यजमानांना वावगं वाटेल अस वागु नये हे मान्य, परंतु, बर्‍याचदा चुक आणी बरोबर काय हेच माहीत नसतं. एक गम्मत सांगतो.. काही महिण्यांपुर्वी चीनमधला पण आता अमेरीकेत असलेला एक शास्त्रज्ञ माझ्या कंपनीच्या वतीने आमच्या काही क्लायंट्ना भेटायला आला होता. त्याला घेवुन मी पुण्यातील एन आय व्ही या प्रसिध्द संस्थेत गेलो. तेथील संचालक व ईतर शास्त्रज्ञांशी आमची खुप छान चर्चा झाली. स्वाईन फ्लु बद्दल काय नाविन संशोधन जगभर होत आहे याबाबत फार छान देवान्घेवाण झाली. संचालकांच्या एका " थॉट प्रोव्हॉकिंग" प्रश्नावर विचार करताना, आमच्या हीरोने नाकात बोट घातले.. डोक्यातील विचारचक्राबरोबरच बोटही फीरु लागले. या मंथनातुन निघालेले अमृत बाहेर काढले गेले. आम्हांला मेल्याहुन मेल्यासारखे झाले, पण आपण काही वावगे करतोय हे त्याच्या गावीही नव्हते. त्याचे मंथन व शास्त्रीय चर्चा एकाच वेळी चालु होती. खरी गम्म्त पुढे झाली, चर्चा संपुन आम्ही जायला निघालो, शेक हॅन्डसाठी हात पुढे केले गेले. निम्मे शास्त्रज्ञ मागच्या मागे गायब झाले. संचालक बिच्चारे, त्याच्या हातात सापडले. शेक हॅन्ड झाल्यावर ते तातडीने बाथरुमकडे का पळाले ते त्याला बहुदा कळलच नसाव. अस्साच प्रकार मी बर्‍याच युरोपियन पाहुण्यांबद्द्ल पाहिलाय. बंद एसी गाडीत, काही गहन चर्चा चालु असताना ही मंडळी अधो-जठरवायुची सुरेल सुरावट छेडुन जातात. आपण कानकोंडले होवुन गप्प राहतो पण जर त्यांचा एखादा तिकडुन आलेला साथीदार असेल, तर तो सदर सुरावट कशी कणसुर होती व योग्य तान कशी असावी हे स्वता: दाखवतो. मोराल ऑफ स्टोरी, वेगवेगळ्या समाजात याबाबत वेगवेगळ्या समज-कल्पना आहेत, शक्यतो समोरील व्यक्तीच्या भावनांचा आदर करावा. पण एखादी व्यक्ती जर आपल्या कल्पनांच्या/समजाच्या पलीकडे वागत तर त्यावरुन त्या व्यक्तीबाबत वा संपुर्ण समाजाबाबत काही मत बनवणे चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
न
नितिन थत्ते Sun, 12/12/2010 - 17:18 नवीन
>>पंचतारांकित हॉटेलात जेवायला गेल्यावरेही तसेच करतात का ? आँ? पंचतारांकित हाटेलात तर आम्ही ताटातच (आपलं.... वाटीतच) हात धुतो.... लिंबू पिळून !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
व
विश्वनाथ मेहेंदळे Sun, 12/12/2010 - 19:16 नवीन
या प्रतिसादाला माझ्यातर्फे "प्रतिसाद ऑफ द मंथ" हे बक्षीस देण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
प
पंगा Sun, 12/12/2010 - 23:26 नवीन
पंचतारांकित हाटेलात तर आम्ही ताटातच (आपलं.... वाटीतच) हात धुतो.... लिंबू पिळून !!!!
ही वाटीत (फिंगरबोलात) लिंबू पिळून हात धुण्याची पद्धत बहुधा खास ब्रिटिश असावी (म्हणजे ब्रिटनबाहेर - युरोपातसुद्धा - फारशी माहीत किंवा प्रचलित नसावी), असे वाटते. (चूभूद्याघ्या.) यावरून एक जुनी ष्टोरी आठवली. ष्टोरी ऐकीव आहे, आणि (अशा आख्यायिकांच्या प्रथेस अनुसरून) तिच्या अनेक आवृत्त्या आहेत. मात्र आवृत्तीप्रमाणे / सांगणार्‍याप्रमाणे फक्त ब्रिटिश राणी आणि तिचे पाहुणे बदलतात (ही ष्टोरी कधी व्हिक्टोरियाच्या तर कधी दुसर्‍या एलिझाबेथच्या नावावर खपवली जाते, आणि तिचा पाहुणा हा कधी जर्मनीचा राजा, कधी इराणचा शहा तर कधी इतर कोणी - एखादा आशियाई नाहीतर आफ्रिकी राष्ट्रप्रमुख - असतो; नेमकी घटना कोणाच्या बाबतीत घडली याबद्दल खात्रीलायक माहिती मिळू शकली नाही.), पण ष्टोरीचा गाभा अबाधित राहतो, तेव्हा कोणाच्याही नावे गोड मानून घ्यावी, ही विनंती. (नेमके तपशील कोणी पुरवू शकल्यास ऋणी राहीन.) तर त्याचे असे झाले, की इंग्लंडला भेट देणार्‍या कोण्या परकीय राजप्रमुखांकरिता बकिंगहॅम पॅलेसमध्ये शाही खाना होता. खान्याशेवटी प्रथेनुसार फिंगरबोल आले. प्रमुख पाहुण्यांना हा काय प्रकार आहे याची (अर्थातच) कल्पना नव्हती. तरीसुद्धा बहुधा 'मुखशुद्धी अथवा पाचकासारखा काहीतरी प्रकार असावा' अशा समजुतीने प्रमुख पाहुणेमजकुरांनी ते लिंबू त्या गरम पाण्यात पिळले, आणि शांतपणे त्याचे घुटके घेऊ लागले. झाले. उपस्थित ब्रिटिश पाहुणेमंडळी / दरबारीजन वगैरे जे उपस्थित होते, ते झाला प्रकार पाहून हतबुद्ध! (म्हणजे, एकीकडे 'कसला येडा माणूस आहे हा!' हा अशा प्रसंगी इंग्रजसुलभ भाव, पण दुसरीकडे परकीय राजप्रमुख आहे, त्यात सरकारी पाहुणा आहे, त्यामुळे व्यक्तसुद्धा करता येत नाही!) पण राणीने प्रसंगावधान राखले, आणि स्वतःच्या फिंगरबोलात आपले लिंबू पिळून त्याचे शांतपणे प्राशन करू लागली. मग इतरेजनांनीही ते पाहून राणीचे अनुकरण केले, आणि प्रमुख पाहुणेमजकुरांस आपली चूक लक्षातही न येऊन त्यांची गोची (embarrassment) टळली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चिंतामणी Mon, 12/13/2010 - 05:41 नवीन
पंचतारांकित हाटेलात तर आम्ही ताटातच (आपलं.... वाटीतच) हात धुतो.... लिंबू पिळून !!!! ही वाटीत (फिंगरबोलात) लिंबू पिळून हात धुण्याची पद्धत बहुधा खास ब्रिटिश असावी (म्हणजे ब्रिटनबाहेर - युरोपातसुद्धा - फारशी माहीत किंवा प्रचलित नसावी), असे वाटते. (चूभूद्याघ्या.) निनाद यात तज्ञ आहे. त्याच्या उत्तराची अपेक्षा करतो.strong>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
न
निनाद मुक्काम … Mon, 12/13/2010 - 15:04 नवीन
अर्थात ह्या प्रथेचे प्रयोजन म्हणजे पूर्वी भयंकर थंडी असायची युरोपात व हिटर वैगैरे नसायचे त्यामुळे दिवाणखाना व शाय्यागृह येथे लाकडे कोपर्यातील चिमणीत पेटवून खोली उबदार करत. त्यामुळे जेवण झाल्यावर थंडीत बाहेर जाऊन हात धुण्यापेक्षा अमीर उमराव ह्यांनी हि शक्कल लढवली .बाकी दंतकथा माझ्या परिचयाची नाही .सध्यातरी युरोपात अमेरिकन प्री प्लेटेड सर्विस चा जमाना आहे त्यामुळे अश्या अनेक गोष्टीना फाटा दिला आहे .पण खूप ठिकाणी सुगंधित पाण्यात भिजलेला कापडाचा बोळा खुपदा दिला जातो . एखाद्या देशाची संस्कृती हि त्यांचे राहणीमान व खानपान व सार्वजनिक शिष्टाचार ह्यांनी ओळखली जाते . व अर्थात भाषा. पण हे सर्व घडण्यात कारणीभूत ठरते. ते तिथले हवामान ऋतू व त्याचा वर्षातील मुक्काम उदा भारतात ३ ऋतू तर युरोपात २ पाऊस १२ महिन्यात कधीही पडतो ( फ्रांक फुट मध्ये हिवाळ्याच्या आधी दिवसभर पडायचा . ह्यामुळेच सुती कपडे व उबदार कपडे असा फरक दिसून येतो .सुजलाम सुफलाम भारतात १२ महिने शाकाहार करायची चैन भारतीय करू शकतात युरोपात पूर्वी वर्षाचा फार मोठा काळ बर्फात असायचा .झाडे स्ट्रिप करायची आपली पाने .त्यामुळे अभक्ष भक्षण करण्याशिवाय पर्याय नाही. बर मसाले नसल्याने बेचव अन्न पोटात ढकलण्यासाठी वारुणी हवी .(थंड हवेत तर अत्यावश्यक म्हणजे हिमवर्षावात काही काळ फिरल्यावर आपली हाताची बोटे आपण हलवू शकत नाहीत इतक्या गोठणाऱ्या थंडीबद्दल बोलतोय ) थंडीत एकूणच शरीराची हालचाल कमी त्यामुळे ओठांची सुध्धा (म्हणजे बोली भाषा बोलताना शकयतो ओठ कमी हलवून तोंडातल्या तोंडता बोलायचे. .उगाच नाही भारतीय इंग्लिश उच्चार सर्वात स्पष्ट मानले जातात जगात ) त्यामुळे जागतीकारणात सर्व जग जवळ येत असल्याने ज्या देशाने प्रगती केली असे वेस्टन वल्ड आपल्यावर त्यांची संस्कृती जाणते अजाणते पणी लादणार. (लंडन ला बिर्याणी भारतीय उपहार गृहात खातांना काटे चमचे देतात .) तुम्ही हाताने खाता व धुता? असा कुत्सित प्रश्न विचारल्यावर जेव्हा कागद नव्हता तेव्हा तुम्ही कशाने खायचा व धुवायचा? असा मीच त्यांना प्रतिप्रश्न करतो.आम्ही उलट फालतू गोष्टींसाठी कागद वापरत नाहीत .उगाच नाही आमची संस्कृती इको फ्रेडली म्हणतात . .( बाकी जेव्हा कागद नसेल तेव्हा म्हणजे ट्रेकिंग किंवा आडरानात तेव्हा तुम्ही काय करतात .(एक साधा बाळबोध प्रश्न ) व उजव्या व डाव्या हाताचा उपयोग समजून सांगतो. भारतात उजव्या हाताने जेवतात हे त्यांना माहित नसते .अर्थात त्यांचे गैरसमज त्यांच्याशी संवाद साधल्या शिवाय दूर करता येणे शक्य नाही .(जपान आपल्याला पूर्वी वॉशिंग मशीन विकायचे तेव्हा त्यावर सूचना जपानी भाषेत असतात .कोकाकोला जेव्हा आखतात विकतात तेव्हा त्यावर अरबी भाषेत लिहिले असते .आपण हिंदीत लिहायचा आग्रह धरत नाही (मुळात हिंदीच का असा वाद नको म्हणून सर्वाना परकी अशी इंग्लिश भाषा आपण सोयीची मानतो .) मतितार्थ आपल्या येथे आपले रीतभात पाळावे त्याचा प्रचार करावा .पण जेव्हा आपण परक्या ठिकाणी जातो तेथे त्यांचे रीतीभात पाळले म्हणून काही धर्म बुडत नाही .थोडक्यात काय गंगा जाये तो गंगादास /जमुना गये तो जमुना दास .टोपीकर भारतात आले तेव्हा व्यापरी होते सैदैव मना झुकून व्यापरी सवलती मागत .(डोळ्यासमोर आणा शिवरायांच्या राज्याभिषेकाचे चित्र जे घरोघरी असते व मन झुकाव्लेला टोपीकर .मात्र ते राज्येकर्ते झाल्यावर राव बहाद्दूर व अश्या अनेक पद्वांसाठी त्यांचे उंबरठे झिजवणारे आपले देशी साहेब ) आजही मलबार हिल वाळकेश्वर येथील लोक अशुध्द फ्रेच भाषेचा वारेमाप उपयोग रोजो बोलीभाषेत करतात .गालाला गाल घासतात .पण जपानी आजही अभिनंदन करताना पुरपणे झुकतो (अर्थात पैसा फायनान्स करणे हे त्यांचे मुख्य काम असल्याने जग त्यांच्यापुढे झुकते )नाही म्हणायला हिरेव्यापारी मात्र जय श्री कृष्ण म्हणतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
च
चिंतामणी Tue, 12/14/2010 - 20:00 नवीन
सॉलीड सॉरी शॉल्लीड. तुम्ही हाताने खाता व धुता? असा कुत्सित प्रश्न विचारल्यावर जेव्हा कागद नव्हता तेव्हा तुम्ही कशाने खायचा व धुवायचा? असा मीच त्यांना प्रतिप्रश्न करतो.आम्ही उलट फालतू गोष्टींसाठी कागद वापरत नाहीत .उगाच नाही आमची संस्कृती इको फ्रेडली म्हणतात . . हे म्हणजे विजयी षटकार म्हण किंवा (तुझ्या भाषेत) "चेरी ऑन क्रीम" म्हण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/14/2010 - 20:58 नवीन
>> तुम्ही हाताने खाता व धुता? << मला वाटलं होतं की पाण्याने धुवायची पद्धत आहे. असो. चालायचंच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
न
निनाद मुक्काम … Tue, 12/14/2010 - 22:49 नवीन
हो पण हातचा त्वचेची अजिबात संपर्क होत नाही का ? पाण्यासाठी डावा हात वापरतो ना ? बाकी आपली कडे उजवा हात खाण्याचा व डावा धुण्याचा म्हणायची पद्धत आहे .गावात धुण्या अंगाला वळा असा विनोद बिचुकले गावचे रहिवाशी मकरंद अनासपुरे ह्यांनी केला नव्हता का ?(गावात तसे बोलायची पध्धत असते .आपल्या सारख्या शहरी भागातील लोक विनीद समजून हसतात .) बाकी त्या मधील सकाळ दुपार सकाळ दुपार हि त्यांची आरती मस्तच होती .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/14/2010 - 23:20 नवीन
>> पाण्यासाठी डावा हात वापरतो ना ? << कागदात आर्टीफिशियल इंटेलिजन्स अजूनतरी या लोकांनी भरलेला नाही, कागदसुद्धा हातातच घ्यावा लागतो. आणि अजूनतरी वॉलमार्ट, टेस्को, ऑल्डीमधे कागदांसाठीचा लांब दांड्याचा ब्रश पाहिलेला नाही. हातावर पाण्याचे रेणू असतात ... प्रत्यक्ष संपर्क होत नाही! :-) पाणी आणि कागद वापरणार्‍यांमधे "डावं-उजवं" करायचं आहे म्हणून असं नाही पण निनाद, तुम्ही दिलेल्या लॉजिकमधे चूक काढणं सहज शक्य आहे. कागदाआधी सगळेच पाणी वापरायचे, मग प्रगतीच्या एका टप्प्यावर कागद वापरायला सुरूवात झाली, अशा प्रकारचं आर्ग्युमेंट करणं अगदीच सोपं आहे. मुळात मला प्रश्न असा आहे की प्रातर्विधीनंतरची स्वच्छता कशी करतात यावरून माणसांमधला उच्च-नीचपणा ठरवणार्‍यांची बुद्धीची क्षमता किती? युरोपात राहून गोर्‍यांना टाळणं शक्य नाही आणि अशा प्रकारचे वादही होत रहाणार! "आमचीच संस्कृती श्रेष्ठ आणि गोरे सगळे असंस्कृत" म्हणणारे भारतीय आणि कागद-पाण्यावरून श्रेष्ठ-कनिष्ठता ठरवणारे, माझ्या लेखी एकाच पातळीवर आहेत. गमतीजमतीत यावरून मलाही बरंच पिडायचा प्रयत्न झाला आणि मी तो हसण्यावारी सोडूनही दिला. (मी ही काही कमी नाही, गोर्‍यांच्या पिण्यावरून, तीन बोटांनी पोळीचे तुकडे न करता येण्यावरून, बाटली, ग्लासातून पाणी 'वरून' पिता न येण्यावरून मी बरीच टिंगल करायचे.) उगाच कोणी पिडायला लागल्यावर सरळ बौद्धीक क्षमतेवरच टिप्पणी केली, त्यापुढे माझ्यावर अशा प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ परतपरत आली नाही. अवांतरः भारतीयांचे इंग्लिशचे उच्चार सर्वात स्पष्ट हे (भारतीय सोडून) कोण मानतं? अनेक तेलुगु लोकांशी बोलताना मला हे लोकं नक्की कोणती भाषा बोलताहेत हा प्रश्न पडतो. अनेक मराठी लोकांचं इंग्लिश ऐकून हाच प्रश्न पडतो, पण मराठीही येतं त्यामुळे बोलणं समजतं, तेलुगु, तमिळ भाषिक लोकांचं समजत नाही हाच काय तो फरक!* कितीतरी इंग्लिश मातृभाषा/पितृभाषा असणार्‍या लोकांना अनेक भारतीयांचे उच्चार समजत नाहीत. कॉल सेंटरमधे नोकरी करणार्‍यांना फक्त इंग्लिश भाषेतल्या औपचारिकतेचेच नाही तर उच्चारांचेही धडे गिरवावे लागतात. "स्पष्ट" बोलत असते तर हे धडे नक्कीच गिरवावे लागले नसते. *बंगाली लोकांच्या इंग्लिशवर आमच्या हापिसात भरपूर जोक्स होतात. आमच्याइथे एकदा SERC (उच्चारी: सर्क) स्कूल होतं. तर एक बंगाली माणूस दुसर्‍या बंगाल्याला सांगेल, "आमच्याकडे शार्क स्कूल आहे." आणि त्यावर सगळे बंगाली आपल्याला शार्क खायला मिळेल या आशेवर रहातील. अतिअवांतरः मी इंग्लंडात शिकते आहे (तेव्हा शिकत होते**) हे ऐकून एकदा एक आजोबांनी माझा फारच पिच्छा पुरवला होता; का, तर म्हणे, आख्ख्या 'हिंदुस्थानात' (म्हणजे नक्की काय कोण जाणे?) मराठी लोकांचंच इंग्लिशच सगळ्यात चांगलं असतं, हे माझ्या तोंडून वदवून घेण्यासाठी! अतिअतिअवांतरः ज्या भारतीय व्यक्तीचं इंग्लिश ऐकून तिची मातृभाषा कोणती हे पटकन कळत नाही त्यांचं इंग्लिश (व्याकरण आणि शब्दसंपदा) साधारणतः चांगलं असतं. **क्षीण प्रयत्न! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
प
प्रदीप Wed, 12/15/2010 - 04:48 नवीन
अगदी नेमके लिहीले आहेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शैलेन्द्र Wed, 12/15/2010 - 12:09 नवीन
मुळात जैवीक दृष्ट्या शरीरातील वरचे व खालचे द्वार यांच्या बॅक्टेरीअल व इतर काऊंटमधे फारसा फरक नसतो. आपली मानसीकता बाजुला ठेवली तर थुंकी ही शरीरातील इतर दोन स्त्रावांपेक्षा (मल व मुत्र) जास्त उपद्रवकारक आहे. आपल्या तोंडात जितके जिवाणु सापडतात तितके गुदद्वार व मुत्रद्वारात सापडत नाही. परंतु मल व मुत्र यांच्या उत्सर्जनाचे प्रमाण जास्त असल्याने, आधिक खबरदारी घ्यावी लागते. कोण कुठल्या हाताने धुतो/पुसतो व त्यासाठी काय वापरतो यावरुन संस्कृती ठरवायची झाल्यास मामला कठीण होइल. मोरारजींना कुठे बसवाल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शिल्पा ब Wed, 12/15/2010 - 21:57 नवीन
<<<मोरारजींना कुठे बसवाल? आमच्यापासुन बरंच लांब ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र गुरुवार, 12/16/2010 - 18:59 नवीन
अय्या, तुमच्याकडे फार्मविलेमधे ती पण सोय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब गुरुवार, 12/16/2010 - 19:08 नवीन
अर्थातच...ती काय पंगत ए का, सगळ्यांनी बाजूबाजूला बसून हसत खेळत एन्जोय करायची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र गुरुवार, 12/16/2010 - 19:16 नवीन
हॅ, अगदीच नवख्या आहात तुम्ही, यार आपणे इसका मजा शायद लियाही नही.. सर्वो सुपरच्या १ लिटरच्या डब्याने सांधलेले नाते फार गहीरे असतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
प
प्रदीप Wed, 12/15/2010 - 04:36 नवीन
प्रश्न होता फिंगरबाऊलची प्रथा इंग्लंडात(च) का आहे ?
सध्यातरी युरोपात अमेरिकन प्री प्लेटेड सर्विस चा जमाना आहे त्यामुळे अश्या अनेक गोष्टीना फाटा दिला आहे
हे थोडक्यात उत्तर आहे. आणी मी जे वर लिहीले आहे की मी कुठल्यही ब्रिट रेस्टॉरंटात असे काहीही पाहिलेले नाही, त्याच्याशी जुळते आहे. अशी प्रथा तिथे मुळात होती व ती तशी का होती ह्याविषयी तुम्ही जे लिहीले आहे ते नुसते तुमचे अंदाज की माहिती? असे विचारतोय ह्याला दोन कारणे आहेत-- (१) हे हिवाळ्ञात बाहेर जाणे कठीण वगैरे नुसते ब्रिटनपुरतेच मर्यादित नसावे, कारण तितकीच, किंबहुना त्याहीपेक्षा कडक थंडी युरोपात, कॅनडा वगैरे देशात पडत होती व आहे. (२) ब्रिटस हे अगदी काँजर्व्हेटिव्ह म्हणून सुप्रसिद्ध आहेत, आपल्या प्रथांची ते खूपच प्राणपणाने जपणूक करतात. त्याची अनेक उदाहरणे देता येतील. तर मग ही एकच प्रथा त्यांना का घालवावीशी वाटावी? तुम्ही सुगंधी पाण्यात भिजवलेल कापडाचा 'बोळा' दिला जातो (हल्ली!) असा उल्लेख केला आहे. तो खरे तर 'बोळा' नसून रोल असतो. आणि त्याचे प्रयोजन चेहरा पुसून फ्रेश व्हावे हा असतो, (खरकटे) हात पुसण्यासाठी नव्हे. इंग्लंडच्या राणीच्या दंतकथा मी वाचल्या आहेत, त्याअर्थी तिच्याकडील मेजवानीत हे करत असावेत. माझा अंदाज असा की वेस्टर्न स्टाईलने नीट खाता न येणारे अनेक देशोदेशींचे पाहुणे त्यांच्याकडे आल्यावर कधीकधी त्या पाहुण्यांची पंचाईत होत असावी, हात खरकटे होत असावेत व ते कुठेतरी (बहुधा टेबलक्लॉथलाच हळ्ळूच) पुसले जात असावेत. हे अनुभवल्यावर केव्हातरी राजवाड्याच्या मेजवानीसंबंधित कुणाच्यातरी डोक्यातून ही शक्कल निघाली असावी. बाकी तुमच्या वरील व इतरही अनेक प्रतिसादांतून तुम्ही ज्या लोकांत, देशांत रहात आहात त्यांच्या संस्कृतिवीषयी, तेथील चालीरितींविषयी जी काही टिप्पणी तुम्ही करीत आहात, त्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त करतो. स्तवःच्या चालीरितींवीषयी व संस्कृतीबद्दल रास्त अभिमान असावा, दुराभिमान नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
प
प्रदीप Mon, 12/13/2010 - 08:09 नवीन
ही स्टोरी मीही वाचली होती, त्यात सध्याची राणी व गडाफी अशी पात्रे होती. मी कुठल्याही ब्रिट रेस्टॉरंटमधे फिंगरबाउल दिलेले अनुभवले/पाहिलेले नाही. भारतीय रेस्टॉरंटात मात्र ही प्रथा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
च
चिगो Sun, 12/12/2010 - 07:45 नवीन
<em>जेंव्हा आपण एखादा गुणविषेश एखाद्या समजाला/जातीला चिकटवतो तेंव्हा तो वांशिक नसुन परिस्थीतीजण्य आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे. पटलं.. बाकी श्री. सन्जोप राव म्हणतात त्यातील... <em>पण रस्त्यावर पान-गुटखा-तंबाखू खाऊन थुंकणे> मलाही ह्याची प्रचंड चीड आहे मात्र ह्यातही परिस्थितीचा भाग आहे असं मला वाटतं. आपल्याकडे पान-सुपारी द्यायची पध्दत आहे. आसाममधे "तामुल भक्षण" हा समाज-संस्कृतीचा भागच आहे. मग खाऊन झाल्यावर थुंकणार कुठे? तर जिथे मिळेल तिथे.. सार्वजनिक स्वच्छतेबद्दलची उदासिनता हेही महत्त्वाचे कारण.. रस्त्याच्या कडेला प्रातर्विधी करणे सोय-सुविधांचा अभाव आणि सार्वजनिक स्वच्छतेबद्दलची उदासिनता <em>कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या कुठेही भिरकावणे वरील प्रमाणेच खाजगी मालमत्तेचा सार्वजनिक वापर करणे, कुणाच्याही बागेतली फुले, फळे बिनदिक्कतपणे तोडणे, आपलाच माल असल्याची उद्दाम, बेमुर्वत वृत्ती... कित्येकदा संबंधीत मालकाला बंध घालण्यात आलेलं अपयश ऐतिहासिक स्थळांवर आपली नावे कोरुन ती विद्रूप करणे संस्कृती आणि आपल्या इतिहासाबद्दल असलेली प्रचंड उदासिनता.. अत्यंत आत्मकेंद्री वृत्ती, आणि असे काही केल्यास आपल्याला कुणीही पकडणार नाही ह्याची असलेली खात्री.. (एकदा चारमिनारला भेट देऊन बघा) अवांतर : माझ्या मते ह्या वृत्तीचा प्रसार करण्याचे कार्य "एक दुजे के लिये" ह्या चित्रपटाने पण केलेय.. वाहतुकीचे नियम न पाळणे गांधीवादी म्हणतात तसेच..
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 12/12/2010 - 07:53 नवीन
आपल्याकडे घरात स्वच्छता अन बाहेर घाण असा प्रकार आहे अन त्याला फारसं कोणी आक्षेपही घेत नाही किंवा तसे होऊ नये म्हणून काळजीही घेत नाही....व्यक्ती असो वा शासन. बाकी शुचिच्या मुद्द्याशी सहमत. असे अतिशय घाणेरडे प्रकार लहान मुलींच्या बाबतीत तर होतातच....बघणारेही काही बोलत नाहीत अन करणारा करत सुटतो...
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 12/12/2010 - 08:06 नवीन
कृपया ह्याचे कारण काय कोणी सांगु शकेल काय?
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 12/12/2010 - 08:10 नवीन
वरचे प्रतिसाद वाचा की जरा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
वेताळ Sun, 12/12/2010 - 08:14 नवीन
स्पष्टीकरण दिलेले नाही. तरी देखिल त्या मागची कारणे जाणुन घेण्यास मी इच्छुक आहे.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 12/12/2010 - 08:44 नवीन
काहि लोकांना मोबाईल कसा वापरावा हे सुद्धा समजत नाहि.. एकदा डोक्तर च्या वेटिंग रुम मधे आम्ही बरेच पेशंट नंबरची वाट पहात बसलो होतो.. तेव्हढ्यात एकाचा मोबाईल वाजला..सामाजिक रित्भात म्हणून चट्कन उठुन बाहेर जावुन संभाषण करणे अपेक्षित होते..पण हे सद गृहस्थ स्वतःच्या घरी असल्या सारखे मोठ मोठ्याने मोबाईल वर गप्पा मारु लागले.....सांगितले तर राग आला...... सार्वजनिक ठिकाणी..शिंका आल्या तर तोंडावर रुमाल धरणे..जांभई आल्यास तोंडावर हाताचा पंजा धरणे..आळस आला तर.विचित्र पद्धतिने आळोखेपिळोखे न देणे..पाद आल्यास बाहेर जावुन त्याचा निचरा करणे..किंवा पाद येणार नाहि असा आहार घेणे..नाकात बोटे न घालणे..खानावळीत तोंड धुताना खाकरे न काढणे..एस टी वा बस मधे मोठ्यानी गप्पा मारत सह प्रवाश्यांच्या झोपेत व विचार शृंखलेत व्यत्यय न आणणे ..बागेत सिनेमा सारखे प्रेम प्रसंग न रंगवणे..ह्या साध्या गोष्टींचे पालन हि लोक करत नाहित व समोर व बाजुस बसलेल्या लोकांचे जिवन कष्ट प्रद करतात..
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sun, 12/12/2010 - 09:19 नवीन
ह्म्म =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
प
पर्नल नेने मराठे Sun, 12/12/2010 - 08:45 नवीन
माझ्या सवयींमुळे कोणाला त्रास होउ नये हा माझा कटाक्श असतो . होट्लमधे मी जेवायला गेले तरी टेबल आवरुन ठेवते, वापरलेले टिश्यु उडु नयेत म्हणुन एका ग्लासात भरुन ठेवते. लोकांकडे जेवायला गेले कि खाली काही सांडणार नाही हि काळजी घेते. ऑफिसच्या गाडीत / लोकल/ बसेस मध्येही ज्युसच्या बाटल्या, चॉकोलेट रॅपर्स वाटेल तसे टाकत नाही... खाली उतरले की वेस्टबिन मधेच टाकते.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 12/12/2010 - 08:50 नवीन
शहाणी माझी बाय गं ती!! (हा प्रतिसाद खडुस नाही..माझ्याकडुन तरी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
क
कुंदन Sun, 12/12/2010 - 09:14 नवीन
बरीच सुधारणा झालिये की. पुर्वी यासाठीच तुला कुठ्ठे म्हणुन न्यायची सोय नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे Sun, 12/12/2010 - 09:17 नवीन
अच्र्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
ग
गोगोल Sun, 12/12/2010 - 16:33 नवीन
खरच? आधी वाचता येईल असा लिहा. तुमच्या टाइपिंग ने डोळ्यांना फार म्हणजे फार त्रास होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा