९/११ कारस्थान - काहि शोध
💬 प्रतिसाद
(95)
व
वडिल
Wed, 12/22/2010 - 17:18
नवीन
राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे.
बघु कधी वेळ मिळतो ते.
- Log in or register to post comments
य
योगी९००
Wed, 12/22/2010 - 17:35
नवीन
राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे.
वा..!! लवकर लिहा ..वडिल जी तुम्ही एकदम कारस्थानी दिसता..
- Log in or register to post comments
व
वडिल
Wed, 12/22/2010 - 17:57
नवीन
खादाड माउ जी,
प्रत्येक शोधकर्त्या ने किंवा वार्ताहाराने ( जरनालिस्ट) सजग राहुन प्रत्येक माहिती ला त्रयस्त पणे पहाणे जरुरीचे असते. तसेच मी करतो. कुठल्याहि गोष्टि वर १००% विश्वास ठेवणे चुकिचे असते.
म्हणुन कुठल्याहि राजकारणी किंवा धार्मिक नेत्या वर कधिहि विश्वास ठेवु नका ! भले लोक तुम्हाला कारस्थानी म्हणो किंवा अजुन काहि !!!
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 12/23/2010 - 13:18
नवीन
राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे
लिहा लिहा.
एका दिवंगत पंतप्रधानांची हत्या झालीच नाही. म्हणे. अतेरेक्यानी त्यांच्या डमीलाच ठार केले. त्या डमीचा देहसुद्धा मिळाला नाही. मात्र अतीरेक्याचा देह छिन्न्विछीन्न अवस्थेत काहोइना मिळाला.
अतीरेक्याचा कॅमेरा सुद्धा एकदम सुस्थितीत मिळाला
अर्थात ठार करणारे सुद्धा अतीरेकी नव्हतेच म्हणे.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
गुरुवार, 12/23/2010 - 18:03
नवीन
तुम्ही एकदम सी आय ए व के जी बी ची कटकारस्थाने अशी जगासमोर आणली तर
मिपा वरील असांज अशी पदवी नक्कीच मिळेल .
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Wed, 12/22/2010 - 17:36
नवीन
वाट पाहतोय.
- Log in or register to post comments
र
रणजित चितळे
गुरुवार, 12/23/2010 - 06:32
नवीन
भोपाळची वायु गळती अमेरीकेच्या रासायनिक युद्धाच्या तंत्राचा विकास करण्याच्या दृष्टीकोनातून केलेला प्रयोग होता.
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
गुरुवार, 12/23/2010 - 07:39
नवीन
मी तर बरेच वेळा असेही ऐकले आहे कि 'मनमोहनसिंग नामक कोणी एक गृहस्थ ह्या देशाचे पंतप्रधान आहेत' म्हणे. लोक काय काहीही बोलतात.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 12/23/2010 - 06:55
नवीन
मी असं ऐकलं आहे की हे तिघंही खरं तर जिवंत आहेत. त्यांचे तथाकथित मृत्यू ही कॉंग्रेसने सरकारी यंत्रणा वापरून निर्माण केलेली नाटकं होती.
तसंच महात्मा गांधींची हत्या हेदेखील एक नाटकच होतं, असंही ऐकलं आहे. टिळकांच्या अस्तानंतर लयाला जाणारी मराठी ब्राह्मणांची अस्मिता कायमची खच्ची करण्यासाठी रचलेलं.
कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं.
नक्की कशावर विश्वास ठेवावा कळत नाही.
- Log in or register to post comments
र
रणजित चितळे
गुरुवार, 12/23/2010 - 07:18
नवीन
कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं.
सर माफ करा मला पण हे खरे नाही.
मी त्यावेळेला ऑपरेशन विजय मध्ये होतो.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 12/23/2010 - 07:55
नवीन
तुम्ही देखील मला माफ करा, कारण माझा युद्ध घडल्यावर अविश्वास दाखवण्याचा हेतू नव्हता. कॉन्स्पिरसी थियरी मांडणारे उघड सत्य घटनांवर कशा सहजपणे शंका घेतात हे दाखवण्यासाठी काहीतरी टोकाची उदाहरणं घेऊन (तिरकसपणे) मुद्दा मांडत होतो.
कॉन्स्पिरसी थियरी मानणाऱ्यांना कुणाचीच उत्तरं पटत नाहीत. कोणावरच विश्वास बसत नाही. कारण प्रत्येक उत्तरात ते खुसपट काढू शकतात. म्हणून ते बहुतेक वेळी हास्यास्पद असतात.
- Log in or register to post comments
र
रणजित चितळे
गुरुवार, 12/23/2010 - 08:03
नवीन
सहमत व विचार पटले
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 12/23/2010 - 07:29
नवीन
>>कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं. >>
का? तुम्ही योजना तयार केली होती का काय? बोलण्यात काहीतरी तारतम्य बाळगा. कारगील युद्धात तुमच्या घरातलं कोणी शहीद झालं आहे का? असतं तर तुम्ही असा उचलली बोटं आणि लावली कीबोर्डाला, असा प्रकार केला असतात का?
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 12/23/2010 - 07:59
नवीन
आधीची उदाहरणं नीट वाचली असतीत तर हे तिरकसपणे लिहिलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असतं. कोणीतरी केलेलं भंपक विधान मी ऐकलं, असं मी म्हटलं. याचा अर्थ मी त्यावर ठामपणे विश्वास ठेवतो असं मानून एकदम चिडू नका.
वदंतांचं वर्णन म्हणजे सत्यावर विश्वास असा निष्कर्ष काही तोडफोड करणाऱ्या फलटणीच काढतात असं वाटत होतं.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 12/23/2010 - 08:03
नवीन
तिरकस लिहिलंत हे लक्षात आलंच होतं. तरीही काही बाबतीत लेखणी चालवता येते म्हणूनच केवळ, आणि तिरकस बोलता येतेच केवळ, म्हणून तसे करायलाच पाहिजे असे नाही. कारगिल कदाचित काही जणांसाठी केवळ अनेक युद्धांपैकी एक युद्ध असू शकेल, पण काहीजणांसाठी तसे नसण्याचीही शक्यता आहेच.
असो. चिडले नव्हते. इतके बेजबाब्दार विधान पाहून खेद झाला, पण चालूदेत.
- Log in or register to post comments
र
रणजित चितळे
गुरुवार, 12/23/2010 - 07:16
नवीन
कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं.
सर माफ करा मला पण हे खरे नाही.
मी त्यावेळेला ऑपरेशन विजय मध्ये होतो.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 12/23/2010 - 07:19
नवीन
धार्मिक धाग्यांवरून लोकांचं लक्ष उडवण्यासाठी स.मं. ने एक आयडी तयार करून असे धागे टाकण्याचं कारस्थान केलेलं आहे आणि याचे पुरावे आहेत.
-आजोबा.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 12/23/2010 - 07:27
नवीन
आणि मस्तमस्त शोध लावले आहेत!!
-पणजोबा
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
गुरुवार, 12/23/2010 - 07:35
नवीन
पुरावे सादर करा
खापरपणजोबा.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 12/23/2010 - 07:48
नवीन
असं काय करताय तीर्थरूप?
अमेरिकेला, शुद्धलेखनाला, आणि तार्किकतेला शिव्या घालायला मिपावर पुरावा लागत नसतो!!!
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/23/2010 - 07:49
नवीन
शक्यता नाकारता येत नाही.
- रगडा पँटिस
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
गुरुवार, 12/23/2010 - 08:34
नवीन
तुमची शक्यता नाकारली जाण्याची आता शक्यता वाटते आहे.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/23/2010 - 08:36
नवीन
शक्यता नाकारता येत नाही
-- हटवादी
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
गुरुवार, 12/23/2010 - 08:37
नवीन
नाही, हि नाकारता येते, तसे पुरावे आहेत.
नातू.
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/23/2010 - 09:06
नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
- मादीवादी
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
गुरुवार, 12/23/2010 - 11:31
नवीन
?
- Log in or register to post comments
स
सुहास..
गुरुवार, 12/23/2010 - 11:32
नवीन
आपले डोके फीरले आहे काय >>
तशी शक्यता नाकारता येत नाहि.
डफली
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/23/2010 - 07:48
नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
- साडु
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
गुरुवार, 12/23/2010 - 08:36
नवीन
शक्यता नाकारता येत नाहि. मग काय करता येते ?
जावई
- Log in or register to post comments
र
रमताराम
गुरुवार, 12/23/2010 - 08:18
नवीन
वडील! (हे सामान्यनाम नाही विशेषण म्हणून वापरतो आम्ही)
आणखी एक अमेरिकेचे षड्यंत्र ऐकले होते आम्ही. आपला तो रामसेतू फोडायचा प्लान होता त्यांचा. खरे म्हणजे तिथे थोरियमचे साठे आहेत ते त्यांना चोरायचे होते, बरे झाले ना तो प्रयत्न हाणून पाडला ते.
सहज मनात आले की कसे चोरतील ते थोरियम? एक प्रसंग डोळ्यासमोर आला.
अमावास्येची रात्र... समुद्रात अमेरिकेच्या एखादी युद्धनौका, चारपाच दुय्यम नौका नि चाळीस पन्नास पडाव. पडाव हळूच भारतीय हद्दीत शिरतात, आपले कोस्ट गार्ड नि नेव्हीचे लोक गाढ झोपलेले... एक दोघे वरिष्ठ - चुकून वडिल लिहिले होते आधी पण गोंधळ नको म्हणून खोडले - अधिकारी त्यांच्या खास बोटीत गुपचूप बसलेले.... तिकडून पडावातून तीन वेळा बॅटरीची उघडझाप होते.... इकडून प्रतिसाद मिळतो... एक पडाव पुढे येतो... त्यातून गोरा अमेरिकन एक डॉलरची अर्धी नोट पुढे करतो.... आपले वरिष्ठ खिशातून दुसरा अर्धा भाग काढून जोडून पाहतात नि अंगठा वर करून सिग्नल देतात... आता उरलेले पडाव पटापट पुढे येतात.. सगळे वीर पटापट समुद्रात उड्या मारतात नि तळाशी जाऊन दणादण खोदकाम सुरू करतात... पडावात भरून थोरियम दुय्यम नौकांमध्ये पोचवले जाते... पहाट होईतो सार्या नौका, रामसेतू नि थोरियम सगळेच गायब झालेले असते. अर्थात जाताना त्यांनी सोन्याची बिस्कीटे भरलेली ब्याग वरिष्ठांच्या हवाली केलेली असते. वरिष्ठ खूष... अमेरिका खूष... पाणबुडे खूष... सेतू वहीं बनायेंगे चा नारा देता येईल म्हणून इतरही खूष... एकुण सांगता चांगली होते.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 12/23/2010 - 08:20
नवीन
वा!
तुमच्या कथेवर पिच्चर काढायचाय!
रजनीकांतला घेऊन!! विथ अ आयटम साँग फिचरिंग मलाईका अरोरा!!
रॉयल्टी काय घेणार, बोला!!!
:)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 12/23/2010 - 08:23
नवीन
काका, किती पुस्तकां वाचल्यात हो, हयसून नेलेली?
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 12/23/2010 - 08:38
नवीन
अवांतर पश्न, प्रतिसाद प्रतिबंधित!!!
:)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 12/23/2010 - 08:41
नवीन
एकपण नाय मां? समाजलाच माका. :)
- Log in or register to post comments
र
रमताराम
गुरुवार, 12/23/2010 - 08:33
नवीन
द्या नाममात्र काहीतरी. अहो पण रजनीकांतला आणि मलाईकाला साईन केल्यावर आमची रॉयल्टी द्यायला पैसे उरतील ना तुमच्याकडे. आणि हो मलाईका त्या फ्रिगेटवर ओबामाबरोबर आयटेम साँग पेश करते आहे असे दाखवा, एकदम नॉवल आयडिया बगा. गाणं कोण लिहून देणार आहे का ते विचारा इथे.
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 12/23/2010 - 09:01
नवीन
रामभाऊ, काय हे? पिडांकाका पिच्चर काढणारेत. त्यांच्याकडं मागून मागून नाममात्र काय मागताय? छ्या... आणि वर त्यांनाच विचारताय की, रजनीकांतला आणि मलाईकाला साईन केल्यावर आमची रॉयल्टी द्यायला पैसे उरतील ना तुमच्याकडे, असं? तुम्ही समजता काय पिडांकाकांना? ते अशा पाच-पन्नास रजनीकांतना, मलाईकाला खेळवतात. मला वाटलं होतं पिडांकाकांचा पिच्चर म्हटल्यावर तुम्ही चांगल्या सोन्याच्या विटा वगैरे मागाल. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मागा सोन्याच्या पाच-दहा विटा. एक माझ्यासाठी ठेवा या सल्ल्याची फी म्हणून.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 12/23/2010 - 09:07
नवीन
तुम्ही काय लंकेत बदली होऊन गेलांत काय हो हल्ली?
नाय, सोन्याच्या विटा वगैरे बोलतांय म्हणऊन विचारतो!!!!:)
नाय म्हणजे,
श्रावण मोडक (सध्या मुक्काम कोलंबो) असं!!!
:)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 12/23/2010 - 09:08
नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 12/23/2010 - 18:10
नवीन
वाटलं की नाही तुम्हाला मी लंकेत गेलो असं! ;)
पण ते "सध्या मुक्काम" वगैरे बेक्कार बसला राव. इतकंही हाणू नका ना... :)
बाकी, पुण्यातच आहे. त्यामुळं ही अशी सोन्याची विटा वगैरे भाषा.
- Log in or register to post comments
र
रमताराम
गुरुवार, 12/23/2010 - 09:07
नवीन
काय हे श्रामो. चारचौघात असे म्हणायचेच असते. आता सांगूनच टाकतो. एक थोरियमची वीट देणारे आहेत ते, व्यक्तिगत निरोप धाडला होता त्यांनी. (म्हणजे काय त्या थोरियम मधे त्यांचाही 'कट' असेलच की)
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 12/23/2010 - 09:11
नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
- तमिल
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 12/23/2010 - 18:19
नवीन
थोरांचे देणे ते. थोरियमचीच विट मिळणार तुम्हाला. आणि हे आधीच ठरलंय तुमचं असं दिसतंय. म्हणजे आम्ही सान ते सानच राहणार! :(
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 13:56
नवीन
दन्गा घालुन घालुन सगळे दमुन घरि गेलेले दिसतायेत.
याचि, शक्यता आहे हे मला माहित आहे.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
गुरुवार, 12/23/2010 - 21:05
नवीन
पाकिस्तान मध्ये व अरब जगतात ९ /११ चा हल्ला ज्यू लोकांनी घडवला आहे .अशी समजूत तेथील कट्टर पंथीयांनी केली आहे .त्याच धर्तीवर मुंबई हल्ला हे हिंदू व ज्यू लोकांचे कारस्थान आहे असा विखारी प्रचार पाकिस्तानी प्रसार माध्येमे करत आहेत. हेच अरबांच्या गळी उतरू पाहत आहेत .(भारताची आखतात कंपन्या विकत घेण्याची मोहीम पाक्यांच्या जीवावर आली आहे .)
तुम्ही अश्या लेखातून त्यांना मदत करत आहात .आज हिरव्या दहश्त्वादाविरूढ जगभरात जनमत बनत आहे ,त्याला आपण हातभार लावायचा कि त्याचा प्रचार करावा ह्याचा विचार वडिलकीच्या नात्याने तुम्ही करावा
मिपा वर प्रसिध्द होण्याचे अनेक फंडे येथील दर्दी व जुनी जाणती मंडळी आपणास करतील .तेव्हा आवारा
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Fri, 12/24/2010 - 05:10
नवीन
+१. निनादशी १०० टक्के सहमत! राज्यकर्ते, त्यांचे चमचे (दिग्गी) आणि 'प्रथमपुत्र' (First son-राहुल) हानी करताहेत तेवढे पुरे कीं! आपण कशाला भर घालायची?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2