+१
मी तर पॉपकॉर्नची फ्याक्टरी विकत घेतोय. झाडं शोधा रे!!!
बाय द वे, हर्षदराव, बाप्पाचा स्वेटर हा मिपावरील एक ऐतिहासिक धागा होता. थोडी शोधाशोध करा.... ऐतिहासिक म्हणजे अगदी ऐतिहासिकच.... वाचाच.
काय हरकत आहे?
सारसबागेच्या गणेशमंदिराचा एक स्वत:चा ट्रस्ट आहे. ते लोक गणपतीच्या मूर्तीवर कोणत्या प्रकारची वस्त्रे, दागिने असावेत याबद्दल ठरवतील की! यात चर्चा करण्यात काय हशील आहे?
आणि गणपतीला स्वेटर घातल्याने कोणत्या प्रकारची अंधश्रद्धा पसरते आहे हे समजले नाही! याबाबत थोडे विस्ताराने लिहीणे शक्य आहे का?
--असुर
सुध्या,
मिपावर सध्या जागतिक प्रश्नांवर किंवा त्रिलोकाला ग्रासून टाकणार्या विषयांवर चर्चा चालू असताना हे असले स्थानिक पातळीवरचे विषय आणून महत्वाच्या धाग्यांना बोर्डावरून हटवणे आहे का अशी एक शंका वाटून गेली =)) =))
(या शाश्वत प्रश्नावर नाना आणि टारझन यांचे मौलिक विचार जाणून घेण्यास उत्सुक)
बाकी मी एक अस्स्ल पुणेकर असल्याने जाज्वल्य अभिमान वगैरे बाय डिफॉल्ट आहेच! ;-)
--असुर
हर्षद भाऊ,
हिंदु धर्मात षोडोषोपचार पुजा म्हणुन एक प्रकार आहे. त्यात सोळा प्रकारचे संस्कार मुर्तीवर केले जाता, (मुर्तीत प्राण आणणे, वेगवेगळे अभिषेक, वस्त्रे ई.) हे सर्व उपचार मुळ त्या शक्तीला मानवी साच्यात बसवुनच केले जातात आणी खरं तर सगुण उपासना हि त्यासाठीच असते, उगाच त्या वरुन श्रदधा अंधश्रद्धे हा वाद काय कामाचा..
आमच्या विभागात पाळीव कुत्र्यांना सुदधा गरम कपडे घालतात. मुळात मुंबई सारख्या ठीकाणी असे करुन प्राण्यांपासुन त्यांची निसर्गनिर्मित प्रतिकार शक्ती कमी करण्याचा जो प्रघात पडतोय तो गणपतीला गरम कपडे घालण्यापेक्शा जास्त वाईट आहे.
कमी झाल्यास आजारी पडेल ना तो !
मग काय .. गणपतीचे डॉक्टर .. गणपतीची औषधे ..
वा वा ..
आमचे येथे गणपतीची शुद्ध प्रक्रियेने तयार केलेली औषधे मिळतील .. आमची इतरत्र कोठेही शाखा नाही ..
चालू द्या ..
मुर्ख लोक आहेत राव! अहो आमचा गण्या आला आहे उत्तर ध्रुवा वरुन (संदर्भः वेद, गणपती वगैरें मिपावरील समृद्ध लिखाण वाचावे) त्याला शिंची पुण्यातली थंडी वाजेल तरी कशी?
त्याला शिंची पुण्यातली थंडी वाजेल तरी कशी?
आणि समजा वाजली आणि त्यातून काही सर्दीपडसं झालं तर डॉक्टरची बिलं काय हा नायल्या भरणार आहे का?
ती विश्वस्तांनाच भरायचीयेत हो!!!
;)
मिपावर येउन गेला असा धागा....त्यावेळी वाद घालायची खुमखुमी होती ती आता वयोमानानं नाही राहिली.;)
एकच उत्सुकता लागून राहिलिये आणि ती म्हणजे यावर्षीच्या स्वेटरचा रंग आणि विणीचा टाका कोणता?
हे असे देवी देवतांच्या नावाने त्यांना स्वेटर चढविण्यापेक्षा रस्त्यावरील कुडकुडत बसलेल्या गरिबाला ते स्वेटर देऊन टाका.
मातीच्या गणपतीत जर खरोखरच देव असेल तर त्याला सुद्धा उबदार वाटेल.
शुद्ध मूर्खपणा. गणपतीच्या मूर्तीसमोर मोदक ठेवल्यावर ती मूर्ती एकही मोदक खात नाही याची काळजी का नाही करत मग? तेव्हा मात्र तत्परतेने ते ताट उचलून गायब केले जाते. न जेवल्यामुळेच थंडी वाजते त्याला :)
बरं स्वेटर मूर्तीला नसून गणेशाला घातलं म्हणावं तर गणांचा जो ईश आहे, चंद्राचा मुखभंग करणारा आहे, व्यासांकडून ऐकून महाभारत एकटाकी लिहीणारा आहे, रावणाला धडा शिकविणारा आहे, रिद्धी सिद्धींचा नायक आहे आणि सर्व संकटांचा हारक आहे त्याला तुम्ही स्वेटर-टोपडं घालणार?
नावांतरः किळस येते असले प्रकार पाहून.
=)) =)) =))
हा हा हा !!!
खास काही नाही, जरा 'जुने संदर्भ' आठवले ( अरे हो, आमचे आंद्याशेठ कुठे आहेत ? ). ;)
ह्यावर्षी जरा थंडी जास्तच असल्याने आम्हीच स्वेटर घालुन बसलो आहोत, त्यामुळे इतरांच्या स्वेटरवर टिप्पणी करणे आमच्या तत्वात बसत नाही ;)
- डॉन्या गणपती
स्वतःच्या खिशातुन पैसे गेल्यासारखे काही लोक गळे का काढत आहेत ?
जेवढ्या प्रेमाने / आदराने एखादा मुलगा थंडीची चाहूल लागल्याबरोबर आपल्या आई वडिलांसाठी स्वेटर, मफलर वगैरे आणतो त्याच भावनेने आणि श्रद्धेने कोणी गजनानालाच आई वडिलांसारखे श्रद्धास्थान देऊन स्वेटर घालत असेल तर इतरांच्या पोटात दुखायचे कारण काय ?
इथे गोरगरिबांच्या नावाने गळे काढणारे कधी स्वतःचे जुने पाने स्वेटर तरी दान करतात का ?
देवाला मिळणारे प्रेम सुद्धा काही लोकांना बघवत नाही. काय म्हणावे आता ह्याला ?
असो....
प्रतिक्रिया