Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोडे

श
शुचि
Tue, 12/28/2010 - 01:15
🗣 119 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
41501 वाचन

💬 प्रतिसाद (119)
N
Nile Tue, 12/28/2010 - 23:45 नवीन
माझा मुद्दा/आक्षेप मी नीटपणे इथे देउ शकलो नाही, तो मी खाली नविन प्रतिसादात दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
ध
धनंजय Wed, 12/29/2010 - 07:50 नवीन
अधिक विचाराअंती इन्डक्शन ठीक वाटले. गंमतच आहे. आधी मी चकलो! सेल्फ-रेफरन्समुळे (स्वसंदर्भ) अशाच अनपेक्षित गमतीजमती होतात. पिंग्यांच्या मते ९९ किंवा १०० पिंगे आहेत, तर काळ्यांच्या मते १०० किंवा १०१ पिंगे आहेत. शिवाय स्वसंदर्भाच्या गणितासाठी विवक्षित कालमर्यादा आहे - बरोबर १ दिवस. याच्यामुळे पिंग्यांची धावती बेरीज पुनर्नवीन होण्यास वाव मिळतो. (पिंग्यांचा रनिंग काऊंट अपडेट करायचे शेड्यूल आहे.) ("स्वतःच्या पिंगेपणाचे ज्ञान होतात तत्काळ मस्तकाची शंभर शकले होऊन पडतील" असा नियम असता, तर काहीच झाले नसते - बहुधा.) गडबड अशी होत होती की या काळ्यापिंग्यांचे कोडे सोडवायचा स्वसंदर्भक अल्गोरिदम मी अजून मनात लिहू शकलो नव्हतो. आता तो लिहिला आहे, आणि इन्डक्शन स्पष्ट झाले आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
य
योगी९०० Tue, 12/28/2010 - 13:01 नवीन
उत्तर : १०० व्या दिवशी सर्व पिंग्या डोळ्याच्या व्यक्तींना मृत्यूदंड होईल. (किंवा १०१ व्या दिवशी दुपारी म्हणा कारण वर असे सांगितले आहे की दुसरे दिवशी दुपारी मृत्यूदंड देण्यात येईल) १०२ व्या दिवशी सर्व काळे डोळे वाल्यांना मृत्यूदंड होईल. येथे मी असे मानले आहे की गावातल्या लोकांना माहित आहे की फक्त काळ्या आणि पिंग्या डोळ्याची माणसेच गावात रहातात. पण कोडे जरा चुकीचे वाटत आहे. येथे मृत्यूदंड ऐवजी ज्या माणसाला स्वतःच्या डोळ्याचा रंग कळला तर तो स्वतःहून गाव सोडून निघून जाईल असे हवे होते .. आता मृत्यूदंड अशी शिक्षा असल्याने कोणी स्वतःहून कबूल करेल काय की डोळ्याचा रंग कळला..?? असो.. कारण ?? समजा गावात एकच पिंग्या डोळ्याची व्यक्ती आहे. तर त्या व्यक्तीला पहिल्याच दिवशी दिसेल की बाकीच्यांचे डोळे काळे आहेत म्हणून ह्या व्यक्तीला स्वतःच्या डोळ्याचा रंग पहिल्याच दिवशी कळेल. तो स्वतः दुसर्‍या दिवशी मृत्यूदंड स्विकारतील समजा गावात दोन पिंग्या डोळ्याच्या व्यक्ती आहेत. तर त्या दोन्ही व्यक्तींना कळेल की गावात ९०० काळे डोळे आणि एक पिंगे डोळे अशी माणसे आहेत. पण स्वत:च्या डोळ्याचा रंग माहित नसल्याने त्या एक दिवस थांबतील. पण पहिल्या दिवशी कोणीच "डोळ्याचा रंग कळला" असे म्हणून पुढे आले नसल्याने त्यांना कळेल की अजून एक व्यक्तीचे डोळे पिंगे आहेत व ती व्यक्ती म्हणजे ती स्वतः.. म्हणून त्या दोन्ही व्यक्ती "डोळ्याचा रंग कळला" म्हणून दुसर्‍या दिवशी पुढे येतील. आणि तिसर्‍या दिवशी मृत्यूदंड स्विकारतील. हेच लॉ़जिक पुढे पुढे वाढवले तर असे कळेल की १०० माणसे पिग्या डोळ्यांची आहेत. त्या प्रत्येक व्यक्तीला गावात (परदेशी सोडून) कळेल की ९९ माणसे पिंग्या डोळ्याची आहेत आणि ९०० काळे डोळे आहेत. पण ९९ दिवस कोणीच "डोळ्याचा रंग कळला" असे न सांगितल्याने १०० दिवशी त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या डोळ्याचा रंग (एकदाचा) कळेल आणि त्या सर्व व्यक्ती १०१ व्या दिवशी मृत्यूदंड स्विकारतील. १०१ व्या दिवशी झालेले मृत्यूदंड पाहून गावातल्या बाकीच्या सर्व लोकांना कळेल की "तिच्या आयला आपण काळ्या डोळ्याचे आहोत"..मग ते स्वतः १०२ व्या दिवशी दुपारी मृत्यूदंड स्विकारतील. मग तो परदेशी माणूस हे सर्व पाहून पुर्ण गावाची जमिन आपल्या नावावर लावून घेईल आणि आपल्या मुळ गावात जाऊन बर्‍याच लोकांना घेऊन येईल आणि त्या गावात एक आदर्श वसाहत निर्माण करेल.
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 12/28/2010 - 14:58 नवीन
१०१ व्या दिवशी सर्व पिंग्या व्यक्तींना मृत्यूदंड होईल हे बरोबर आहे. हेच उत्तर आहे __________________________________________ परंतु पुढील भाग बरोबर वाटत नाही. अन्य लोकांचे डोळे नींळे, घारे,हिरवे असू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
स
स्वानन्द Tue, 12/28/2010 - 15:47 नवीन
हॅ... अजिबात पटले नाही. काहीच्या काहीच राव. प्रत्येकाला एक एक दिवस कसा काय लागू शकतो? आणी आपले डोळे पिंगट किंवा काळे आहेत हे समजायला त्या पहुण्याच्या भाषणाची काहीच गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Tue, 12/28/2010 - 15:50 नवीन
येथे उत्तर पहावे. मी हाच दुवा खाली देखील दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द
N
Nile Tue, 12/28/2010 - 17:30 नवीन
खादाडमाउंचे उत्तर पटले नाही. 'एकच दिवस' का थांबतील याला पटेल असे स्पष्टीकरण नाही. हे खरे असण्याकरता रोज दिवसातील एका ठराविक वेळेला पुढे येउन आत्महत्या करावी असा क्लॉज असणे आवश्यक आहे. त्याशिवाय, पिंग्याव्यतीरीक्त तिसरा रंग असण्याची शक्यता नाकारण्याचे काहीच कारण या कोड्यात नाही. म्हणजे समजा दोन व्यक्ती पिंग्या डोळ्यांच्या आहेत, आणि एक व्यक्ती घार्‍या डोळ्यांची आहे. असे असल्यास खादाडमाउंचे उत्तर लागु होत नाही. शिवाय, डोळ्याचा रंग कळल्याने आत्महत्या करावी असे असल्याने, सर्व पिंग्यांनी आत्महत्या केल्यावर, पिंगे उरले नाहीत (असाच दिवसाचा क्लॉज हवा) हे जाणुन इतर सर्वांना आपल्या डोळ्याचा रंग काळा आहे हे कळेल आणि ते आत्महत्या करतील. तुम्ही दिलेल्या उत्तरावर एकमत नाही, प्रो. टाओ यांचा ब्लॉग पाहणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Tue, 12/28/2010 - 17:41 नवीन
>> 'एकच दिवस' का थांबतील >> २ व्यक्तींचे डोळे पिंगे आहेत समजा - राम आणि शाम . मी राम आहे. मी बघते शामचे डोळे पिंगे आहेत. अन्य सर्व लोकांचे डोळे काळे आहेत. म्हणून मी १ दिवस थांबते. दुसर्‍या दिवशी राम वधस्तंभाकडे जात नाही हे पाहून मला कळते की अरेच्च्या अजून कोणीतरी पिंग्या डोळ्याची व्यक्ती आहे. ती मीच असणार कारण बाकीचे काळे आहेत. हीच गोष्ट रामच्या बाबतीत्देखील सत्य ठरते म्हणून दुसर्‍या दिवशी मला वधस्तंभाकडे नेण्यात येते. >> इतर सर्वांना आपल्या डोळ्याचा रंग काळा आहे हे कळेल आणि ते आत्महत्या करतील>> का बरं इतके निगेटीव्ह का असतील लोक? का नाही ऑप्टीमिस्टीक असणार की माझ्या डोळ्याचा रंग घारा/नीळा/हिरवा असेल म्हणून का नाही विचार करणार? >> तुम्ही दिलेल्या उत्तरावर एकमत नाही, प्रो. टाओ यांचा ब्लॉग पाहणे.>> हे उत्तर विवादास्पद आहे खरे पण मला पटते. बरेच लोक हा प्रश्न "ओपन प्रश्न" समजतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 12/28/2010 - 17:54 नवीन
का बरं इतके निगेटीव्ह का असतील लोक? का नाही ऑप्टीमिस्टीक असणार की माझ्या डोळ्याचा रंग घारा/नीळा/हिरवा असेल म्हणून का नाही विचार करणार?
हाच विचार पिंग्या डोळ्यांची व्यक्ती ही करु शकेल. समजा दोन व्यक्ती पिंग्या आहेत, पहिल्या दिवशी कोणीही पुढे आलं नाही. तर दोघांपैकी कोणीही असा तर्क का करु शकत नाही की "एकच व्यक्ती पिंग्या डोळ्यांची आहे पण तिला हे माहित नाही (कारण समाजात ते माहित होउ नये असे नियम केलेले आहेत)"? समजा शंभर लोक असतील तर तुमचे शंभर दिवसाचे एक्स्टॅपोलेशन कसे होते ते मला तरी कळले नाही. सोपे म्हणुन ४ लोक आहेत असे सम्जुयात. पहिल्या दिवशी कोणीही पुढे आले नाही, तर दुसर्‍या दिवशी कीती लोक पुढे येतील? प्रत्येक जण पहिल्या दिवशी तीन पिंगे आहेत हे पाहतोच आहे, पण पहिल्या दिवशी कोणी पुढे येत नाही, म्हणजे लगेच दुसर्‍या दिवशी चौघे पिंगे बाहेर येतील आणि आत्महत्य करतील का? त्याशिवाय. पाचवा काळ्या डोळ्यांचा माणुस आहे, तो ह्या चौघा पिंग्यांना पाह्तो, पण पहिल्या दिवशी कोणीच पुढे न आल्याने तोही (तुम्ही म्हणल्या प्रमाणे जसे पिंगे विचार करतात तसा विचार करुन) मी ही पिंगाच असे असा तर्क लावुन का पुढे येणार नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Tue, 12/28/2010 - 18:25 नवीन
१ व्यक्ती पिंगी - ती बघते अरे कोणाचेच डोळे पिंगे नाही. पण परदेशी तर म्हणाला की त्याने पाहीला आहे एक पिंगा. म्हणजे मीच तो. दुसर्‍या दिवशी जाऊन ती व्यक्ती आत्महत्या करते. .......................... (१) २ व्यक्ती पिंगे - यांना वाटत असतं की एकच व्यक्ती पिंगी आहे कारण त्यांना आरसा दिसत नसतो. पण दुसरा दिवस भाकड जातो. कारण प्रत्येकाला वाटतं समोरचा आत्महत्या करेल {संदर्भ (१)}. ज्याअर्थी दुसरा दिवस भाकड गेला त्याअर्थी एकापेक्षा जास्त व्यक्ती पिंग्या. पण समोर तर एकच दिसते. म्हनजे मीच तो पिंगा याचा साक्षात्कार दोघांना होतो. म्हणून तीसर्‍या दिवशी दोघं आत्महत्या करतात........................... (२) ३ व्यक्ती पिंगे- २ दिवस भाकड जातात कारण प्रत्येकाला वाटत असतं समोरचे दोघं आत्महत्या करतील. {संदर्भ (२)} पण ज्याअर्थी ते करत नाहीत त्याअर्थी २ पेक्षा जास्त पिम्गे आहेत. पण इतर तर काळे दिसत आहेत म्हनजे मीच तो पिंगा. म्हणून ४थ्या दिवशी तीघही आत्महत्या करतात. हेच लॉजीक पुढे ४, ५, ..... N नंबरापर्यंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
आ
आत्मशून्य Tue, 12/28/2010 - 18:38 नवीन
१ व्यक्ती पिंगी - ती बघते अरे कोणाचेच डोळे पिंगे नाही. पण परदेशी तर म्हणाला की त्याने पाहीला आहे एक पिंगा. म्हणजे मीच तो. दुसर्‍या दिवशी जाऊन ती व्यक्ती आत्महत्या करते. .......................... (१) १००० पैकी प्रतेक जण असेच समजून १००० लोक त्याच दीवशी आत्महत्या करणार नाहीत काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Tue, 12/28/2010 - 18:40 नवीन
इतर काळ्यांना तो खरा पिंगा दिसेल. मग काळे कशाला आत्महत्या करतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य Tue, 12/28/2010 - 19:13 नवीन
एकूणच ही आत्महत्याची पीरॅमीड टाइप चेन होणार जो पर्यंत सगळे पिंगे संपत नाहीत. पण जेव्हा शेवट्चा पिंगा मरतो तेव्हा त्याच्या पूढच्याला हे लक्षात येइल की तो पींगा नाही.... आणी जर आपला डोळा कोणत्या रंगाचा नाही हे समजणे गून्हा नाही तर मग पूढे कोणी मरायचा प्रश्नच येत नाही. तरी शंका आहेच की १ पिंगा - अरे कोणाचेच डोळे पिंगे नाही. पण परदेशी तर म्हणाला की त्याने पाहीला आहे एक पिंगा. म्हणजे मीच तो. दुसर्‍या दिवशी जाऊन ती व्यक्ती आत्महत्या करते. पहीला पिंगा मीच तो हे तो कशावरून ठरवतो ? आणी जर का "परदेशी तर म्हणाला की त्याने १ पाहीला आहे " म्हणून जेव्हां एक जण आत्महत्या करेल तर पून्हा उरलेले पिंगे असे समजणार नाहीत काय की तो जो कोणी होता तो १ पिंगा मेला की , आता आपण कशाला मरायचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Tue, 12/28/2010 - 19:53 नवीन
आत्मशून्य ह्या ज्या ३ केसेस घेतल्या आहेत की - १ पिन्गा, २ पिंगे, ३ पिंगे ह्या म्युचुअली एक्सक्लुसीव्ह आहेत. म्हणजे केस१ - १ पिंगा, ९९९ काळे केस २ - २ पिन्गे, ९९८ काळे केस ३ - ३ पिंगे ९९७ काळे अशा केसेस आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य Tue, 12/28/2010 - 23:03 नवीन
२ व्यक्ती पिंगे - यांना वाटत असतं की एकच व्यक्ती पिंगी आहे कारण त्यांना आरसा दिसत नसतो. पण दुसरा दिवस भाकड जातो. कारण प्रत्येकाला वाटतं समोरचा आत्महत्या करेल {संदर्भ (१)}. ज्याअर्थी दुसरा दिवस भाकड गेला त्याअर्थी एकापेक्षा जास्त व्यक्ती पिंग्या. पण समोर तर एकच दिसते. म्हनजे मीच तो पिंगा याचा साक्षात्कार दोघांना होतो. म्हणून तीसर्‍या दिवशी दोघं आत्महत्या करतात........................... (२) तसेच ज्याअर्थी दुसरा दिवस भाकड गेला त्याअर्थी एकापेक्षा जास्त व्यक्ती पिंग्या. ? हे कसे काय बूवा ? प्रत्येकाला का वाटते समोरचा आत्महत्या करेल ? कारण त्यांच्या डोळ्याच रंग पिंगा आहे हे त्यच्या वीरूध्द बजूला असलेल्याला समजते ? बरोबर ? मग त्यांचातला एक जण जेव्हा मरेल तेव्हां दूसरा म्हणेल म्हणजे माझे डोळे पिंगट नाहीतच? बरोबर ? मग दोन आत्महत्या होतीलच कशाला ? एकंदर हे सर्व माझ्या डोक्या वरून गेले असले तरी मूख्य म्हणजे तूम्ही वीचारलेल्या प्रश्नाचे अचूक ऊत्तर फक्त माझ्याकडे आहे. प्रश्न असा होता... (११) आता हे विषद करा त्याच्या या किरकोळ चूकीचा त्या जमातीवर काय परीणाम होईल? उ.- त्याच्या या किरकोळ चूकीचा त्या जमातीवर भीषण परीणाम होईल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
N
Nile Tue, 12/28/2010 - 19:06 नवीन
हा तर्क मला कळला आहे, वरच्या प्रतिसादात मी ह्या तर्कातील तृटी निर्देशित केल्या आहेत. त्याचे निवारण झाल्यास हे उत्तर पटेल असेल वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Tue, 12/28/2010 - 19:58 नवीन
>> समजा दोन व्यक्ती पिंग्या डोळ्यांच्या आहेत, आणि एक व्यक्ती घार्‍या डोळ्यांची आहे. असे असल्यास खादाडमाउंचे उत्तर लागु होत नाही. >> ही तृटी कशी होते? समजा १ घारा आणि एक पिंगा आहेत. पिंगा बघतो की अरे सगळे काळे किंवा घारे आहेत आणि दुसर्‍या दिवशी जाऊन आत्महत्या करतो. _____ समजा १ घारा आणि २ पिम्गे आहेत. पिंगा बघतो दुसरा दिवस भाकड गेला. तो समजतो कोणीतरी अजून एक पिंगा आहे. उरलेले तर सगळे घारे किंवा काळे म्हणजे मीच तो पिंगा याचा त्याला साक्षात्कार होतो. दोघांना हा साक्षात्कार झाल्याने, दोघे तीसर्‍या दिवशी जाऊन आत्महत्या करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 12/28/2010 - 20:13 नवीन
समजा १ घारा आणि एक पिंगा आहेत. पिंगा बघतो की अरे सगळे काळे किंवा घारे आहेत आणि दुसर्‍या दिवशी जाऊन आत्महत्या करतो.
तिन्ही पिंगे आणि १ घारा आणि २ पिंगे ह्या दोन केसेस्ना तुमचा तर्क लावुन पहा. तिन्ही पिंगे एक दिवस वाट पाहतात. कोणीच पुढे न आल्याने (आणि इतर सर्व काळे-नॉन पिंगे दिसत असल्याने) आपणही पिंगे आहोत असे तिघांनाही वाटेल ना? (हाच तुमचा तर्क आहे, बरोबर?) मग तिघांनीही त्याच दिवशी आत्महत्या केली पाहिजे?? त्यासाठी दोन दिवस का हे कळाले नाही. (तिघांपैके पहिले कोण आत्महत्या करेल हे ठरवणारे कुठलेही व्हेरीएबल नाही.) हाच तर्क २ पिंगे आणि एक घारा यास लागु होइल. पहिल्या दिवशी तिघेही स्वतःशिवाय कुणीतरी पिंगा आहे (इतर सर्व काळे) हे पाहतो. पण पहिल्या दिवशी कोणीच पुढे न आल्याने तिघांनाही आपणची पिंगेच आहोत असा तर्क (वरील प्रमाणे) करता येतो. इथे काळ्यांपेक्षा वेगळे हाच एक क्रायटेरीआ असल्याने घार्‍याला आपण घारे आहोत की पिंगे हे कळण्याचा कुठला मार्ग आहे हे कळत नाही. त्याशिवाय, तिन पिंग्यांच्या उदाहरणात. प्रत्येकाला दोन पिंगे आहेत हे ज्ञान आहे. (म्हणजे प्रवाश्याचे म्हणणे लागु झाले) मग पहिले कोण दोघे पिंगे आत्महत्या करतील हे कसे ठरेल? माहित नाही. समजा हे कसे तरी ठरले. तर तिसरा उरलेला पिंगा आत्महत्या का करेल? कारण आपण पिंगे आहोत हे कळण्याचा कुठलाही मार्ग त्यास आहे असे दिसत नाही. (पहिले दोघे कोण हे कसे ठरेल यात हे उत्तर असु शकेल, पण ते कसे हे मला तरी दिसत नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Tue, 12/28/2010 - 20:50 नवीन
(१) तीन्ही पिंगे मी पिंगी आहे. मी एक दिवस वाट पाहीली. त्या दिवशी कोणी आला नाही. मग मला कळलं अरे राम ने शाम ला आणि शाम ने राम ला पाहीले. मी म्।अटलं चला दुसर्‍या दिवशी दोघांचा फैसला होईलच. मी मस्त दुसर्‍या दिवशी उठले फाशी च्या ठीकाणी गेले. पण राम शाम काही पुढे येईनात. म्हणजे कोणीतरी अजून पिंगा आहे. अरेच्च्या मीच की काय कारण इतर तर काळे आहेत???? :( तिसर्‍या दिवशी आम्ही तीघे फाशीच्या ठीकाणी गेलो. ________________________ २ पिंगे आणि एक घारा मी पिंगी आहे. मला एक पिंगा दिसतोय. मी म्हटलं चला उद्या याचा फैसला लागला. पण उद्या तो काही येईना फाशीच्या ठीकाणी. मला कळलं कोणीतरी पिंगा आहे. अरेच्च्या मीच की काय कारण इतर तर काळे आणि घारे आहेत? दुसर्‍या दिवशी आम्ही दोघे फासावर. _________________________ २ पिंगे एक घारा मी घारी. पहीला दिवस भाकड. ह्म्म बरोबर कारण २ पिंगे आहेत. हरकत नाही उद्या यांचा फैसला लागेल. आणि दुसर्‍या दिवशी खरोखर २ पिंगे वधस्तंभाकडे गेले की. चला मी वाचले :) _________________ तीन्ही पिन्गे या केसमध्ये नाईल तुम्ही विचारलय >> पहिले कोण दोघे पिंगे आत्महत्या करतील>> पण एक लक्षात घ्या की तीघांना ते पिंगे आहेत हा साक्षात्कार शेवटच्या दिवशी एकाच वेळी होतो. कोणाला मागेपुढे होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 12/28/2010 - 21:00 नवीन
माझ्या विचारातली चुक ध्यानात आली आहे असे वाटते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Tue, 12/28/2010 - 22:18 नवीन
नाईल तुमचेदेखील धन्यवाद. मी हे असे वाद खूप मिस करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
क
कानडाऊ योगेशु Wed, 12/29/2010 - 08:07 नवीन
मी मस्त दुसर्‍या दिवशी उठले फाशी च्या ठीकाणी गेले. पण राम शाम काही पुढे येईनात.
हे चूक आहे.तिन्ही पिंग्यांना एकदमच कळेल की गावात तीन पिंगे आहेत.(म्हणजे तो स्वतः धरुन अजुन दोन.) त्यामुळे फक्त तिसर्या दिवशीच ते तिघेही फाशीच्या ठिकाणी जातील.कारण गावातील सर्वजण तर्काच्या बाबतीत एकाच पातळीवर आहेत त्यामुळे कुणा एकाला तर्काद्वारे एखादी गोष्ट इतरांच्या आधी कळली असे होणार नाही.बाकी उत्तर पटणेबल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
आ
आत्मशून्य Tue, 12/28/2010 - 18:06 नवीन
२ व्यक्तींचे डोळे पिंगे आहेत समजा - राम आणि शाम . मी राम आहे. मी बघते शामचे डोळे पिंगे आहेत. अन्य सर्व लोकांचे डोळे काळे आहेत. म्हणून मी १ दिवस थांबते. दुसर्‍या दिवशी राम वधस्तंभाकडे जात नाही हे पाहून मला कळते की अरेच्च्या अजून कोणीतरी पिंग्या डोळ्याची व्यक्ती आहे. ती मीच असणार कारण बाकीचे काळे आहेत. हीच गोष्ट रामच्या बाबतीत्देखील सत्य ठरते म्हणून दुसर्‍या दिवशी मला वधस्तंभाकडे नेण्यात येते. जरा स्पश्ट करता काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Tue, 12/28/2010 - 18:34 नवीन
http://www.misalpav.com/node/16043#comment-272695
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
व
विजुभाऊ Wed, 12/29/2010 - 06:29 नवीन
उत्तर सापडले प्रेषक शुचि दि. मंगळ, 28/12/2010 - 19:28. १०१ व्या दिवशी सर्व पिंग्या व्यक्तींना मृत्यूदंड होईल हे बरोबर आहे. हेच उत्तर आहे अज्याबात पटले नाही. मुळात पिंगट डोळ्याच्या व्यक्तीला स्वतःच्या डोळ्याचा रंग कळेल कसा? एक होईल फारतर तो पर॑देशी ज्या ज्या व्यक्तीना भेटला असेल त्याना वाटेल की त्यांच्या डोळ्यांचा रंग पिंगट आहे. पण तो वर्‍याच लोकाना भेटला आहे. त्यामुळे नक्की कोणाचे डोळे पिंगट आहेत हा तर्क बरोबर ठरणार नाही. अवांतरः अशी पाशवी प्रथा असूच नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
य
योगी९०० Tue, 12/28/2010 - 15:50 नवीन
जरा अभिनंदन करा..म्हणजे पुढचे कोडे सोडवायला थोडेफार motivation मिळेल.. बाकी कोडे एकदम मस्त होते..आणखी आहेत का अशी डोकेबाज कोडी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि Tue, 12/28/2010 - 15:52 नवीन
:) नक्कीच डोके लावून कोडे सोडवले आपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
य
योगी९०० Wed, 12/29/2010 - 10:17 नवीन
आभारी आहे... बर्‍याच जणांच्या शंका आपण मस्त पैकी निवारल्यात..मी प्रवास करत असल्याने उत्तर देऊ नाही शकलो. गंगापूरमधील सर्व लोकांची तर्काची बाजू विलक्षण भक्कम आहे.*** *** तर्काने जे काही कळू शकते, ते या लोकांना ताबडतोब कळून येते. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे हे पण सगळ्यांनी ध्यानात घ्यायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
म
महेश काळे Tue, 12/28/2010 - 13:08 नवीन
काहिच नाही !!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Tue, 12/28/2010 - 13:20 नवीन
समजा गावात दोन पिंग्या डोळ्याच्या व्यक्ती आहेत. तर त्या दोन्ही व्यक्तींना कळेल की गावात ९०० काळे डोळे आणि एक पिंगे डोळे अशी माणसे आहेत. पण स्वत:च्या डोळ्याचा रंग माहित नसल्याने त्या एक दिवस थांबतील. पण पहिल्या दिवशी कोणीच "डोळ्याचा रंग कळला" असे म्हणून पुढे आले नसल्याने त्यांना कळेल की अजून एक व्यक्तीचे डोळे पिंगे आहेत व ती व्यक्ती म्हणजे ती स्वतः.. म्हणून त्या दोन्ही व्यक्ती "डोळ्याचा रंग कळला" म्हणून दुसर्‍या दिवशी पुढे येतील. आणि तिसर्‍या दिवशी मृत्यूदंड स्विकारतील. हेच लॉ़जिक पुढे पुढे वाढवले तर असे कळेल की १०० माणसे पिग्या डोळ्यांची आहेत. त्या प्रत्येक व्यक्तीला गावात (परदेशी सोडून) कळेल की ९९ माणसे पिंग्या डोळ्याची आहेत आणि ९०० काळे डोळे आहेत. पण ९९ दिवस कोणीच "डोळ्याचा रंग कळला" असे न सांगितल्याने १०० दिवशी त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या डोळ्याचा रंग (एकदाचा) कळेल आणि त्या सर्व व्यक्ती १०१ व्या दिवशी मृत्यूदंड स्विकारतील.
जरूरी नाही. ईथे तुम्ही असे ग्रुहीत धरताय की जितकी पिंग्या डोळ्यांची माणसे आहेत, तितके दिवस प्रत्येक पिंग्या डोळ्याचा माणूस कोणीतरी पुढे येण्याची वाट बघेल. अजून एक गोची आहे. जरूरी नाही कि एका दिवशी एक माणूसच पुढे येइल. ( दिलेल्या माहीतीनुसार गावकरी तर्काच्या बाबतीत बाप आहेत. त्यामुळे असा अंदाज ते लावतील हे तर्कात बसत नाही) बाकी आमचा मेंदू कुवतीनुसार विचार करतोय
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 12/28/2010 - 14:39 नवीन
खादाडमाउ यांचे उत्तर बरोबर आहे. येथे त्या उत्तराचे स्पष्टीकरण पहावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
व
वेताळ Tue, 12/28/2010 - 13:22 नवीन
ते साले सर्वच आंधळे असतील.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 12/28/2010 - 13:41 नवीन
>>मित्रांनो माझ्यासारखी पिंग्या डोळ्याची व्यक्ती तुमच्या गावात पाहून मला खूप आश्चर्य वाटलं यावरून असं दिसतं की त्याला पिंगट डोळ्यांची एकच व्यक्ती भेटली. त्यामुळे त्याला कोणती पिंगट डोळ्यांची व्यक्ती भेटली हे माहिती असलेल्या आणि त्याला भेटलेल्या इतर सगळ्या लोकांना आपले डोळे काळे आहेत हे कळेल.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 12/28/2010 - 13:59 नवीन
माझ्यासारखी कायम डोळ्याचा रंग बदलणारी कोणी व्यक्ती नाही काय तिकडे ? परावर्ड कलिन्स
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 12/28/2010 - 14:07 नवीन
डोळ्याचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ग
गणेशा Tue, 12/28/2010 - 16:10 नवीन
कोणतेही रिप्लाय न पाहता उत्तर देत आहे .. चुकणार आहेच पण असुद्या तरीही ..आणि हे कोडे मला आधी माहिती ही नाहिये .. उत्तराचा एक प्रयत्न : --- १००० जनांमध्ये जर १०० जणांचे डोळे पिंगे असतील तर नियम क्रमांक ४ मध्ये दिलेल्या माहिती प्रमाने ते दुसर्याच्या डोळ्याच्या कलर्स ची पन चर्चा करु शकत नाहित .. म्हणुन जेंव्हा परदेशी जेंव्हा ते स्टेटमेंट करतो तेंव्हा पिंग्या डोळ्याच्यांना हे माहिती आहे की गावात ९९ पिंगे आणि ९०० काळ्या डोळ्याची माणसे आहेत, स्वताच्या डोळ्याच्या रंग त्यांना माहीत नसतो. म्हनुन प्रत्येक पिंग्या डोळ्याच्याला हे माहित असते की इतर लोक ९९ पिंगे आणि ९०० काळे अशे आहेत तर प्रत्येक काळ्या डोळ्याच्याला हे माहित असते की इतर लोक १०० पिंगे आणि ८९९ काळे आहेत ते. म्हणजे १०० पिंगे असणार्यांचा असा ग्रह असतो की मी सोडुन इतर ९९ जण पिंगे आहेत. म्हणुन मग तो ९९ जण पुढे येवुन मरतील असा तर्क करतो .. पण त्याला हे ही माहिती असते की त्या माणसाला कोठे त्याच्या डोळ्याचा रंग माहित आहे, अआणि कोणी दुसर्याच्या डोळ्याची चर्चा पण करु शकत नाहि मग ते पुढे कशे येतील .. आणि आपल्या डोळ्याचा कलर तरी आपल्याला माहित आहे .. तो काळा आहे पिंगा आहे का अजुन कसला आहे काय माहित .. म्हणुन मग ते बाकीच्या ९९ जणांची पुढे येण्याची प्रतिक्षा करतील पण कोणीच पुढे येत नाही तेंव्हा काहीच न बोलता ते पण गप्प असतील .. म्हनजे प्रत्येक पिंग्या डोळ्यावाल्यांची आणि कआळ्या डोळ्यावाल्यांची हीच स्थीती असेन .. आपण आता पिंगे डोळ्यांचेच कन्सिडर करु. प्रत्येक १०० पिंग्या डोळ्याच्या व्यक्तींना हे माहिती आहे की ९९ व्यक्ती पिंग्या डोळ्याच्या आहेत पन त्या पुढे आल्या नाहित .. प्रत्येक पिंग्या डोळ्याची व्यक्ती इतर ९९ जणांच्या पुढे येण्याची वाट पाहत थांबलेली असते .. म्हणुन प्रत्येक पिंग्या डोळ्याची व्यक्ती ९९ जण पुढे येण्याची तर काळ्या डोळ्याची व्यक्ती १०० जण पुढे येण्याची वाट पाहिन .. [ उत्तर बरोबर आहे का ते सांगावे, नसेल तर कसे नाहि ते पण सांगावे ] हे पोस्ट केल्यावर वरती पण पाहतो आहेच म्हणा मी ..
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 12/28/2010 - 16:21 नवीन
>> म्हणुन मग तो ९९ जण पुढे येवुन मरतील असा तर्क करतो >> किती दिवसांनी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
स
सोम्यागोम्या Tue, 12/28/2010 - 17:13 नवीन
कोणीच मरणार नाहीत. एक दोन माणसांचा तर्क एन क्रमांकापर्यंत खेचता येत नाही. त्या वक्तव्याने काहीच फरक पडणार नाही. पिंगट डोळ्यांचे लोक अल्पसंख्याक असल्याने आरक्षण मागतील :)
  • Log in or register to post comments
द
दैत्य Tue, 12/28/2010 - 20:05 नवीन
आत्तापर्यंतच्या उत्तरात आपण पाहुणा खरं बोलतोय असं गृहीत धरतोय. परदेशी पाहुण्याच्या विधानाची सत्यता लक्षात घ्यायला हवी. शिवाय त्याचा खरं किंवा खोटा बोलण्यामागचा काय हेतू असेल हे तर्कानुसार(गावकरी तर्कशुद्ध आहेत!) तपासायला हवं. त्याने गावकऱ्यांचा विश्वास संपादन करताना 'क्ष' दिवसांत किती असत्यभाषण केलं, त्यावर त्याने केलेलं विधान हे किती टक्के वेळा सत्य आहे (उदा. - तो ७०% वेळा खरं बोलतो) हे कळेल. 'शुचि' ह्यांनी म्हटल्याप्रमाणे हा एक 'ओपन प्रोब्लेम'च वाटतो! शिवाय मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर, एक समजत नाही ते असं की, जरी एखाद्याला त्याच्या डोळ्यांचा रंग समजला तरी तो मृत्यूदंडासाठी स्वयंसेवक का बनेल? ज्याला आपल्या डोळ्यांचा रंग कळला आहे, तो मरणाच्या भीतीने कधीच पुढे होणार नाही. कदाचित पाहुणा बोलण्याची आधीपासून काही लोकांना आपल्या डोळ्यांचा रंग माहितही असेल. शेवटी असं वाटतं की, सगळ्या गावासाठी उत्तम उपाय म्हणजे परदेशी पाहुण्याचं बोलणं असत्य मानून सोडून देणं! एखादी गोष्ट अर्धवटपणे समजून घेऊन नाहक आपल्या गावकरी मित्रांचा बळी देण्याऐवजी ती गोष्ट सोडून दिलेली चांगली.
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Tue, 12/28/2010 - 21:01 नवीन
या कोड्याच्या निमीत्ताने मि.पा. वरिल बर्याच लोकांची विचार करण्याची पद्धत समजली.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 12/28/2010 - 21:06 नवीन
एका देशात असा नियम असतो, की मृत्युदंड झालेल्या माणसाला "आज मृत्युदंड अमलात आणला जाईल" असे ठाऊक असता कामा नये. मनाची तयारी न करता प्राणांतिक भय होते, तीच खरी शिक्षा! असे त्या देशाचे धोरण होते. जर गुन्हेगाराला अमल करणारा येण्यापूर्वीच समजले की "आज देहदंड आहे" आणि ते तर्कासह सिद्ध करता आले, तर त्या दिवशीचा देहदंड रद्द केला जातो. कारण "तयारीशिवाय प्राणांतिक भय" हीच खरी शिक्षा होती, ती होणार नाही... (कैद्याने "माहीत आहे" असे तर्काने सिद्ध करायला पाहिजे - नाहीतर उगाच प्रत्येक दिवशी कैदी म्हणेल "मला वाटते की आजच देहदंडाचा दिवस आहे.") - - - एकदा एका सोमवारी आरोपीला देहदंडाची शिक्षा झाली. त्याने वेगळीच युक्ती लढवली. त्याने न्यायाधीशाला विनंती केली. "काही करा, पण माझा देहदंड पुढच्या एका आठवड्यातच - पुढच्या सोमवारपर्यंत - झालाच पाहिजेत, असा आदेश द्या." न्यायाधीशाने त्याच्या विनंतीला मान देऊन तशा आदेशावर शिक्कामोर्तब केले. पुन्हा कारागृहात पोचल्यावर कैदी मोठ्याने हसू लागला. "मूर्ख न्यायाधीश! माझे प्राण वाचले!!!" जेलरने विचारले - "कसे काय?" कैदी म्हणाला "इन्डक्शन-विगमनाने!" कैदी पुढे म्हणाला - "बघा... (१) जर येत्या रविवारी रात्रीपर्यंत मी जिवंत असलो, तर माझा देहदंड सोमवारी ठरला आहे, ते मला कळेल. म्हणजे सोमवारी माझा देहदंड शक्य नाही. तो सोमवार बाजूला काढूया. (२) जर येत्या शनिवारी रात्रीपर्यंत मी जिवंत असलो, तर माझा देहदंड रविवारी ठरला आहे, ते मला कळेल. म्हणजे रविवारी माझा देहदंड शक्य नाही. तो रविवार बाजूला काढूया. ... (६) जर आज रात्रीपर्यंत मी जिवंत असलो, तर माझा देहदंड उद्या मंगळवारी ठरला आहे, ते मला कळेल. म्हणजे मंगळवारी माझा देहदंड शक्य नाही. तो मंगळवार बाजूला काढूया. (७) आज सोमवारी माझा देहदंड ठरला असेल, तर ते मला माहीतच झाले आहे. म्हणजे आजही देहदंड देता येणार नाही. हाहाहा!!!!" जेलर म्हणाला, "असेल बुवा तुम्ही म्हणता तसे..." कैद्याचे बोलणे त्याने नोंदवून घेतले. झाले असे की बुधवारी देहदंडाची अमलबजावणी करणारी टीम आली. कैदी ततपप करू लागला "प-प-पण आज दे-दे-देहदंड श-श-शक्य नाही ही सिद्धता मी केली हो-हो-होती" जेलरने त्याच्याच युक्तिवादाची नोंद त्याच्या तोंडापुढे नाचवली - "तर तू मान्य करतोस : तुला तर्काने माहीत नव्हते की आज देहदंड ठरला होता! देहदंड देऊन टाका!" :-( गरीब बिचारा कैदी :-( - - - - (कैद्याचे इन्डक्शन चुकलेले आहे. हे थोड्या विचाराअंती स्पष्ट होईल. त्याच प्रकारे या काळ्या-पिंग्या डोळ्यांच्या कोड्यातले इन्डक्शन चुकलेले आहे.)
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 12/28/2010 - 21:17 नवीन
इंडक्शन ...... N=१ ला हा सिद्धांत खरा ठरतो. N करता खरा आहे हे गृहीत धरा. = N दिवसांनतर N पिंगे आत्महत्या करतात आता बघू यात N+१ केस. N पिन्गे आणि सीता N व्या दिवशी सगळे जमतात कोणीच फाशीच्या ठीकाणी जात नाही सीता विचार करते (गृहीतकानुसार त्यांनी जायला पाहीजे होतं) अरे म्हणजे अजून एक पिंगा आहे. मीच की काय? अर्थातच. तिला जसा साक्षात्कार क्झाला तसाच अन्य N पिंग्यांना होतो. N+१ व्या दिवशी सर्व पिंगे फासावर जातात इंडक्शन फुलफिलड!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ध
धनंजय Wed, 12/29/2010 - 00:32 नवीन
n वरून n+1ची सिद्धता करायची असते. तशी येथे होत नाही.
N करता खरा आहे हे गृहीत धरा. = N दिवसांनतर N पिंगे आत्महत्या करतात
पण तुम्ही तर म्हणाला की N दिवसांनी आत्महत्या केलेली नाही. म्हणजे पहिल्या दिवशी रामने आत्महत्या केलेली नाही. दुसर्‍या दिवशी राम आणि श्यामने आत्महत्या केलेली नाही. ठरवा बुवा - त्यांनी आत्महत्या केली आहे, की केली नाही आहे? बरे असे बघू : "गृहीत धरा की Nव्या दिवशी N पिंगे आत्महत्या करत नाहीत." (तिथून N+१व्या दिवशी N+1 आत्महत्या करतात असा तर्क तुम्ही करू शकता. पण N-नाही वरून N+१-होय अशी सिद्धता होते. इन्डक्शन मध्ये एक तर N-नाही वरून N+१-नाही, किंवा दुसरे तर N-होय वरून N+१-होय, अशी सिद्धता दाखवायला हवी होती.) शिवाय वरचे गृहीत N=1 पिंगा साठी असिद्ध होते. कारण एकच पिंगा असला तर तो आत्महत्या करेलच. मग "आत्महत्या करत नाही" असे कसे म्हणता येईल? असो. पुन्हा विचार करून बघतो... (सेकंड ऑर्डर नॉलेज वगैरे काय प्रकार विकीपेडियामध्ये दिला आहे, त्याबद्दल विचार करतो.) - - - मृत्युदंडाच्या इन्डक्शनमध्ये चूक कुठली ते कळले काय? हीच होती. कैद्याचे इन्डक्शन चूक नसेल, तर बुधवारी एक्झिक्यूशन टीम आली तेव्हा कैद्याला कळले कसे नाही? - - -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
N
Nile Tue, 12/28/2010 - 23:44 नवीन
ही संपुर्णप्रक्रिया मी पायरी पायरीने देतो त्यामुळे (माझ्या मते) असलेली इंडक्शनची चुक लक्षात येण्यास मदत होईल. मी त्य १००० लोकांपैकी एक आहे असे समजा. उदाहरणा दाखल, मला तीन पिंगे दिसत आहेत. मी कोण हे मला माहित नाही. पहिला दिवस. मी तिन पिंगे पहात आहे. मला माहित आहे की प्रत्येक पिंगा दोन पिंग्याकडे पहात आहे आणि माझ्या बाबत दोन शक्यता आहेत. पहिली शक्यता मी काळा, दुसरी पिंगा. पहिली शक्यता ध्यानात घेउ. आता मला माहित आहे प्रत्येक पिंग्याला हे ज्ञान आहे की दोन पिंगे आहेत. म्हणजे प्रत्येक पिंगा काय विचार करेल? पुन्हा दोन शक्यता. पिंगा विचार करेल की मी काळा आहे, आणि दोघे पिंगे किंवा मी ही पिंगा(म्हणजे तीन) ह्यातली पहिली शक्यता. प्रत्येक पिंगा विचार करेल की (जर मी काळा असेल तर) दोन्ही पिंगे एकमेकांना पाहतील. ते दोघेही दोन शक्यतांचा विचार करतील की मी काळा किंवा पिंगा. मी जर काळा असेन तर समोरचा पिंगा इतर सर्व काळे पाहुन पुढे येईल. पण हे होणार नाही. म्हणजे पहिल्याच दिवशी तिघांपैकी प्रत्येक पिंग्याची अपेक्षा असेल की इतर दोघांनाही आता कळले आहे की दोन पिंगे खात्रीने आहेत. हे ज्ञान झाल्यावर, (तीन पैकी प्रत्येक पिंगा विचार करेल) मी जर काळा असेन तर दोघांनाही एव्हाना कळले आहे की ते दोघेच पिंगे आहेत. पण तरीही ते पुढे आले नाहीत तर अर्थातच मी सुद्धा पिंगा आहे! म्हणजेच तीनही पिंग्यांना पहिल्याच दिवशी ज्ञान झाले की मी ही पिंगा आहे, आणि दोन पिंगे मी पाहु शकत आहे. आता माझी अपेक्षा असेल की मी जर काळा असेन तर ह्या तिघाही पिंग्यांना एव्हाना कळले आहे की ते तिघेच पिंगे आहेत. हे जर खरे असेल तर ते तिघे लगेच समोर आत्महत्येकरता समोर येतील. ते जर आले नाहीत तर मी विचार करेन की माझा विचार चुकीचा आहे. ..... ह्या प्रकारे निवाडा पहिल्याच दिवशी व्हायला हवा. (जर हे लोक एकमेकांसमोर आत्महत्येच्या वेळीच प्रथमच आले, आणि एक सेकंदाची ती वेळ टळुन गेल्यावर पुन्हा पुढची वेळ उद्याच येणार असेल तर तुमचे १०० दिवसांचे इंडक्शन बरोबर येईल.)
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 12/29/2010 - 01:55 नवीन
मी आहे I(काळी) मला P1 , P२, P३ पिंगे दिसत आहेत. P1 ला वाटत आहे तो आहे काळा आता जाऊ या P1 च्या जगात. P1 ला माहीत आहे P२ त्याच्या स्वतःच्या डोळ्याचा रंग पाहू शकत नाही. P1 ला दिसतो आहे P२ पिंगा P३ ने P1 आणि P२ ला पाहीलं आहे आणि म्हणून तो पुढे येत नाही. त्यामुळे P1 ला कळतं की अ‍ॅकॉर्डींग टू P३, २ पिंगे आहेत. मग उरला कोण तो स्वतः अशा रीतीने P२ आणि P३ ला देखील कळतं की ते पिंगे आहेत ........................ पहील्याच दिवशी. ________________________________________________ द थिअरम फेल्स!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
श
शुचि Wed, 12/29/2010 - 03:13 नवीन
नाईल, हे कसं वाटतय बघा - (१) एकूण ४ जणं आहेत. (२) मी I (काळी) आहे. (३) p1, p2, p3 हे पिंगे आहेत. (४) p1 समजतोय तो काळा आहे. (५)p1 ला दिसतय p2, p3 पिंगे आहेत. (६) p2 पहील्या दिवशी दुपारी बाहेर येत नाही = कोणीतरी कमीत कमी एक जण अजून पिंगा आहे. (एवढाच अर्थ निघतो. डोंट रीड बिटवीन द लाइन्स) p1 साळसूदपणे समज करतो की तो पिंगा p3 आहे. (स्वतःला p१ संशयाचा फायदा देतो) (७)दुसर्‍या दिवशी दुपारी परत p२ बाहेर निघत नाही आणि p3 देखील बाहेर पडत नाही याचा अर्थ = अजून एक पिंगा आहे = तो स्वतः च म्हणजे p१ (३) तीसर्‍या दिवशी तीघे फासावर लटकतात.
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Wed, 12/29/2010 - 05:56 नवीन
शुचि, मला वाटतं हे २ किंवा ३ पिंगे एवढंच ग्रूहीत धरल्यामुळे घोळ होतोय. मी सरळ १०० पिंगट आणि ९०० काळे यांचंच उदाहरण घेतो. समजा, मी पिगट डोळ्यांचा आहे. आणि मी ते भाषण ऐकलं, तर मी म्हणेन, हो आता इथे तर ९९ पिंगट डोळ्यांच्या व्यक्ती आहेत. त्यातल्या कोणत्याही एकाला उद्देशून तो पाहुणा ते वाक्य बोलला असेल. आणि हाच विचार प्रत्येक पिंगट डोळ्यांचा माणुस म्हणेल. 'मी तर पिंगट डोळ्यांचा नाही ना?' ही शंका कुणाच्याही मनात येण्याचं कारणच नाही. आणि एवढं गणित मांडण्याचं देखील कारण नाही. ती शंका तेव्हा आली असती जेव्हा त्यांने म्हटलं असतं की अशा १०० व्यक्ती पाहून आश्चर्य वाटलं वगैरे. कारण ह्या केस मध्ये पहिल्याच दिवशी बेनिफीट ओफ डाऊट देऊन तो मॅटरच संपेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
ग
गणेशा Wed, 12/29/2010 - 09:48 नवीन
शुची जी मला हे पटत नाहिये .. का नाहि पटत दे देतो आहे . .आनि खाली माझे कालचे उत्तर ही देतो आहे , संधर्भ असावा म्हणुन येथे p1,p2,p3 अवैजी मी आपली नावे घेतो .. म्हणजे जरा रीअल टच होइल .. यावर तुम्ही मला हे बरोबर आहे की चुक हे पण सांगा (चुक असो वा बरोबर, विचार करताना मजा येते आहे ) -- समजा मी गणेशा , शुची आणि निले अशी ३ माणसे पिंगे डोळे असणारे आहेत आणि एकुन १० माणसांपैकी असे गृहीत धरु या. १. परदेशी माणसाच्या त्या वाक्यामुळे सगळी १० माणसे विचलीत होतात ... काळी पण आणि पिंगी पण २. मला माहित आहे ( गणेशाला) की शुची आणि निले , पिंगे डोळे असणारे आहेत ३. त्याचवेळी शुची आणि निले ला पण इतर दोघे पिंगे डोळे असणारे वाटत आहेत. ४. त्याचवेळी इतर ७ जणांना गणेशा, शुची आण निले अशी ३ माणसे पिंगे डोळे असणारे आहेत हे माहित असते. ५. मात्र कोणालाच स्वताच्या डोळ्याचा रंग माहित नाहिये. काळ्या डोळ्याच्या व्यक्तीला पण माहित नाही. ६. मग मी (गणेशा), शुची आणि निले हे पुढे येण्याची वाट पाहत असणार .. तसेच इतर ७ जण आम्ही ३ घे पुढे यण्याची वआट पाहत असणार आणि शुची , गणेशा आणि निले तर निले शुची आणि गणेशा पुढे येण्याची वाट पाहत असणार .. (येथे प्रत्येक व्यक्ती पुढे येण्यासाठी १ -१ दिवस का वाट पाहते हे सांगावे काहीच कळत नाही एका व्यक्ती साठी १ दिवस का वाट पहावी ) ७. गणेशा च्या मनात विचार असतो की शुची पुढे येत नाहि कारण ती निले पुढे येण्याची वाट पहात आहे ( त्याच्या नुसार २ च पिंगे डोळे असणारे आहेत.) आणि निले पुढे येत नाहि कारण तो शुची पुढे येण्याची वाट पाहत आहे. असेच शुची आणि निले पण विचार करत असतात ८. असेच इतर ७ जन पण हे तिघे पुढे असेच येत नसतील म्हणुन थांबले असतील. अआणि त्यांनाही त्यांच्या डोळ्याचा कलर कोठे माहित आहे. माझ्या मते इथपरेंतच उत्तर आहे .. सगअ‍ॅळ वेटींग स्टेट ला असणार आहेत बस्स. ---------------------------- माउ यांनी दिलेल्या २ जणांच्या कन्सिडरेशनेच फक्त उत्तर मिळते २ पेक्षा जास्त जण असले तर ते वेटींग मध्ये जाते .. कसे ते मी समजावुन सांगतो फक्त २ जन घेवुन. १. समजा मी (गणेशा) आणि शुची पिंगे डोळे असणारे आहोत .. निले आणि एकुन ८ जन काळे डोळे असणारे आहेत. २. परदेशी माणसाच्या त्या वाक्यामुळे सगळी १० माणसे विचलीत होतात ... काळी पण आणि पिंगी पण ३. गणेशा ला हे माहित आहे की फक्त शुची पिंगी आहे आणि इतर सगळे काळे डोळे असणारे आहेत. ४. त्याच वेळी शुची ला माहिती आहे फक्त गणेशा पिंगे डोळे असणारा आहे बाकी इतर सगळे काळे डोळे असणारे आहेत. ५. मग गणेशा म्हणतो शुची का पुढे येत नाहिये नक्कीच दुसरे कोणी तरी पिंगे पुढे येण्याची ती वाट पाहत आहे.. पण इतर सगळे तर काळे डोळे असणारे आहेत .. अरे रे .. म्हणजे मी एकटाच असा आहे की माझे डोळे पिंगे आहेत आणि ती माझीच पुढे येण्याची वाट पाहत आहे.. सेम टाईम ला शुची पण हेच विचार करते .. ६. आता दोघांना हे माहिती होते की आपण पिंगे डोळ्याचे आहोत आणि ते दोघे आपण पिंगे डोळ्याचे आहोत हे कळाअले आहे म्हणुन पुढे येतात (ओके कीती वेळ वाट पाहिली दोघांनी यासाठी १ दिवस धरला आहे , कारण एक जण ५ मिनिटात विचार करत असेन आणि दुसरा १० मिनिटात विचार करत असेन त्या पेक्षा एक युनिक टाईम ते विचार करायला घेतात म्हणुन १ दिवस हे प्रमाण धरले आहे असे वाटले येथे उत्तर देताना .. असो ) पण जर दोघां ऐवजी तिघे केले तर वरती दिल्याप्रमाणे वेटींग स्टेटच राहणार कारण त्यांना वाटणार हे आपापसात वेट करत आहे.. असो, तुम्हीच व्यवस्थीत सांगा पुन्हा माझे कालचे उत्तर १००० जनांमध्ये जर १०० जणांचे डोळे पिंगे असतील तर नियम क्रमांक ४ मध्ये दिलेल्या माहिती प्रमाने ते दुसर्याच्या डोळ्याच्या कलर्स ची पन चर्चा करु शकत नाहित .. म्हणुन जेंव्हा परदेशी जेंव्हा ते स्टेटमेंट करतो तेंव्हा पिंग्या डोळ्याच्यांना हे माहिती आहे की गावात ९९ पिंगे आणि ९०० काळ्या डोळ्याची माणसे आहेत, स्वताच्या डोळ्याच्या रंग त्यांना माहीत नसतो. म्हनुन प्रत्येक पिंग्या डोळ्याच्याला हे माहित असते की इतर लोक ९९ पिंगे आणि ९०० काळे अशे आहेत तर प्रत्येक काळ्या डोळ्याच्याला हे माहित असते की इतर लोक १०० पिंगे आणि ८९९ काळे आहेत ते. म्हणजे १०० पिंगे असणार्यांचा असा ग्रह असतो की मी सोडुन इतर ९९ जण पिंगे आहेत. म्हणुन मग तो ९९ जण पुढे येवुन मरतील असा तर्क करतो .. पण त्याला हे ही माहिती असते की त्या माणसाला कोठे त्याच्या डोळ्याचा रंग माहित आहे, अआणि कोणी दुसर्याच्या डोळ्याची चर्चा पण करु शकत नाहि मग ते पुढे कशे येतील .. आणि आपल्या डोळ्याचा कलर तरी आपल्याला माहित आहे .. तो काळा आहे पिंगा आहे का अजुन कसला आहे काय माहित .. म्हणुन मग ते बाकीच्या ९९ जणांची पुढे येण्याची प्रतिक्षा करतील पण कोणीच पुढे येत नाही तेंव्हा काहीच न बोलता ते पण गप्प असतील .. म्हनजे प्रत्येक पिंग्या डोळ्यावाल्यांची आणि कआळ्या डोळ्यावाल्यांची हीच स्थीती असेन .. आपण आता पिंगे डोळ्यांचेच कन्सिडर करु. प्रत्येक १०० पिंग्या डोळ्याच्या व्यक्तींना हे माहिती आहे की ९९ व्यक्ती पिंग्या डोळ्याच्या आहेत पन त्या पुढे आल्या नाहित .. प्रत्येक पिंग्या डोळ्याची व्यक्ती इतर ९९ जणांच्या पुढे येण्याची वाट पाहत थांबलेली असते .. म्हणुन प्रत्येक पिंग्या डोळ्याची व्यक्ती ९९ जण पुढे येण्याची तर काळ्या डोळ्याची व्यक्ती १०० जण पुढे येण्याची वाट पाहिन ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
य
योगी९०० Wed, 12/29/2010 - 13:57 नवीन
वेटींग लिस्ट कशी काय? ६. मग मी (गणेशा), शुची आणि निले हे पुढे येण्याची वाट पाहत असणार .. तसेच इतर ७ जण आम्ही ३ घे पुढे यण्याची वआट पाहत असणार आणि शुची , गणेशा आणि निले तर निले शुची आणि गणेशा पुढे येण्याची वाट पाहत असणार .. इथे तुम्ही एक गोष्ट विचार नाही घेतली. मला इतर सर्वांचे डोळ्याचे रंग दिसत आहेत. म्हणजे ज्यांचे डोळे पिंगे नाहीत ते पण मला माहित आहेत. त्यामुळे समजा पहिले दोन दिवस शुचि आणि निले पुढे नाही आले..म्हणजेच आणखी एक व्यक्ती पिंग्या डोळ्याची आहे..आणि ती व्यक्ती म्हणजेच मीच..हाच विचार शुचि आणि निले पण करणार कारण त्यांचे लॉजिकर थिंकिंग पण माझ्यासारखेच चांगले आहे. यामुळेच तिसर्‍या दिवशी मी, शुचि आणि निले तिघेही पुढे येणार... हेच ४,५,६....न लोकांच्या बाबतीत घडेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Wed, 12/29/2010 - 14:55 नवीन
प्रथमता धन्यवाद .. बाकी सर्व म्हणत आहेत त्यामुळे असेच बरोबर असेल्ही पण मला तरीही शंका आहे.. बोलतो .. ---- >> त्यामुळे समजा पहिले दोन दिवस शुचि आणि निले पुढे नाही आले..म्हणजेच आणखी एक व्यक्ती पिंग्या डोळ्याची आहे हे असे ही असेल ना की शुचि आणि निले पुढे नाही आले तर मला वाटेल की ते दोघे एकमेकांसाठी वाट पाहत आहे. म्हनुन मी ही काहीच हालचाल नाहि करणार . तसेच निले आणि शुची करेन. म्हाणुन वेटींग मधेय असतील सगळे. -- कारण फक्त दोघेच पिंगे डोळ्याचे असताना, एका पिंगे डोळे असणार्या व्यक्तीला हे माहित असते की जर दुसरी व्यक्ती पुढे येत नाहि आणि इतर सगळे काळे डोळ्याचे असतील तर ती वेट करत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे मीच आहे. कारण बाकी सगळे काळ्या डोळ्याचे आहे हे नक्कीच त्याला माहित असते. परंतु वरील उदाहरणात सांगितल्या प्रमाणे हे नक्की होत नाही की हे लोक पुढे येत नाहियेत त्या अर्थी ते माझ्या पुढे येण्याची वाट पाहत आहेत ते . कारण त्या उदाहरणात असे वाटते .. की शुची पुढे येत नाही कारण निले पिंग्या डोळ्याचा आहे त्यामुळे ती त्याची वाट पाहते आहे, आणि निले येत नाहि कारण तो शुचीची वाट पाहत आहे, येथे मी पिंग्या डोळ्याचा आहे व हे दोघे माझी वाट पाहत आहे हे कसे काय कळते आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा