Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

किशन बिहारी नुर....२

अ — अश्फाक, Tue, 12/28/2010 - 16:07

Book traversal links for किशन बिहारी नुर....२

  • ‹ किशन बिहारी नुर...१
  • Up
  • किशन बिहारी नुर....३ ( रोमेंटीक ) ›

प्रतिक्रिया द्या
3290 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
मदनबाण Tue, 12/28/2010 - 16:19 नवीन
वालेकुम सलाम अश्फाक मियाँ... तुम्ही तुमचं काम सुरु ठेवा. तुमचा मागचा धागा मला कुठे दिसत नाहीये... :( त्यातले शेर या धाग्यात दिले आहेत का ?तसे नसेल ते सुद्धा द्या. त्यातला एक शेर मला फार आवडला होता... (तुम्ही बहुतेक वा वा वा असे त्याच्या पुढे लिहले होते) बाकी तुमचे हे शेरो-शायरीवाले धागे आपल्याला लयं आवडतात बघा !!! :) लगे रहो...
  • Log in or register to post comments
अ
अश्फाक Tue, 12/28/2010 - 16:42 नवीन
http://www.misalpav.com/node/16024 घ्या कि राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
र
रामदास Tue, 12/28/2010 - 16:40 नवीन
कैसी अजीब शर्त है दीदार के लिए! आँखे जो बंद हों तो वो जलवा दिखाई दे!! या ओळी खूप आवडल्या . अश्फाक साहेब कठीण शब्दाचे अर्थ तर कळले .सोबत रसग्रहण लिहीले तर सागर-ए-सहबा ची रंगत वाढल्यासारखे वाटेल. अवांतर :मला तर जुंबीश हा शब्द फार आवडला.म्हण्जे ओझरता स्पर्श झाला आणि मी जुंबीश जुंबीश झालो. येऊ द्या आणखी.
  • Log in or register to post comments
अ
अश्फाक Tue, 12/28/2010 - 16:44 नवीन
रसग्रहन .... नक्कि प्रयत्न करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
प
प्राजु Tue, 12/28/2010 - 18:53 नवीन
सुरेख आहेत सगळेच शेर!! येऊद्यात अजून.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 12/29/2010 - 16:36 नवीन
सर्व जबरदस्त ... खालील ओळीतील सत्य तर अप्रतिम ऐ "नूर" यूँ ही तरक-ए-मुहबबत मे कया मज़ा! छोडा है जिसको वह भी तो तनहा दिखाई दे.............!!
  • Log in or register to post comments
प
पंगा Wed, 12/29/2010 - 18:53 नवीन
माझ्या मागिल लेखावर नाहक चिखल्फेक झाल्यावर हि दुसरा लेख लिहिन्याची हिम्मत करत आहे.
"उर्दूचे (साहित्याची भाषा आणि काव्याची भाषा म्हणून) स्वरूप 'एका गटाची भाषा' इतके संकुचित नसून त्यापेक्षा बरेच व्यापक आहे (अत एव त्यात कोणत्याही व्यक्तीने काहीही कर्तबगारी दाखवली असता ती त्या व्यक्तीच्या सामाजिक गटाच्या निरपेक्ष प्रशंसनीय आहे)" या प्रतिपादनात चिखलफेक कोठे आली ते समजले नाही.
श्री . नूर यांना मी कुठल्या का केटेगरीत असेना सर्वोत्तम असे कौतुक् पर म्हटले
मुळात कौतुक करताना एखाद्याला कोठल्यातरी क्याटेगरीत कोंबण्याची गरज काय? आणि 'कोठल्या का क्याटेगरीत असेना'च्या पुस्तीने त्या कौतुकाचा दर्जा खालावतो, त्या कौतुकास एका प्रकारच्या वैषम्ययुक्त कौतुकाची छटा येते, एका प्रकारचे 'लेफ्ट-हँडेड काँप्लिमेंट'चे स्वरूप येते, असे वाटत नाही काय? मग भलेही कौतुक करणाराचा तसा उद्देश असो वा नसो. (समांतर उदाहरण घ्यायचे झाले तर, 'अमूकतमूक व्यक्तीचा प्रामाणिकपणा/राष्ट्रभक्ती वाखाणण्यासारखी आहे' आणि 'अमूकतमूक व्यक्तीचा प्रामाणिकपणा/राष्ट्रभक्ती वाखाणण्यासारखी आहे, मग भलेही त्या व्यक्तीची जात/धर्म/सामाजिक गट काही का असेना' या दोन वाक्यांच्या छटांत आणि त्यामधील 'कौतुका'च्या दर्जात काही फरक आहे की नाही? मुळात दुसरे वाक्य 'कौतुक' दर्शवते का?) दुर्दैवाने सलामीलाच अशी वाक्ये आली तर जेवणात पहिल्या घासालाच मिठाचा खडा आल्यासारखी खटकतात, आणि मग उरलेला लेख भलेही कितीही उत्कृष्ट असो, पुढे वाचण्याची इच्छा मरते. मुळात माझ्यासारख्या उर्दूच्या शेरोशायरीचा गंध नसलेल्या (परंतु दुर्दैवाने उर्दूच्या भाषा म्हणून व्यापकतेबद्दल थोडीफार ऐकीव का होईना, पण कल्पना असलेल्या आणि उर्दूबद्दल ज्ञान नसले, तरी आदर असलेल्या) माणसाने कुतूहलाने लेख उघडावा, आणि पहिल्याच वाक्यात असले काहीतरी सामोरे यावे; त्या पार्श्वभूमीवर उरलेला लेख चांगला आहे की वाईट, हे तपासण्याकरिताही पुढे वाचावेसे वाटत नाही. (अर्थात उरलेला लेख जर उत्कृष्ट असेल, तर त्यास मी मुकून नुकसान माझेच होते, अन्य कोणाचे नाही, हे मान्य करूनही, पहिल्या वाक्यात व्यक्त होणार्‍या भावनेच्या पार्श्वभूमीवर पुढे विषाची परीक्षा घ्यावीशी वाटत नाही. शिवाय, मला उर्दू शेरोशायरीचे ज्ञान करून घ्यायची एवढी दुर्दम्य इच्छा असेलच, तर या एका लेखावरच मी अवलंबून राहणार नाही, त्यामुळे हा एक लेख गमावल्याने होणारे माझे नुकसान तसे फारसे मोठे नसेल, हाही भाग आहेच.) तरीही लेखकाचा उद्देश कदचित तसा नसूही शकेल, असे वाटले, म्हणून अतिशय सौम्य शब्दांत आणि अतिशय नम्रपणे लेखकाच्या भूमिकेबद्दल एक अत्यंत साधा प्रश्न विचारला. तितकेच साधे उत्तर - मला पटण्यासारखे अथवा मला न पटण्यासारखे - लेखकाकडून मिळाले असते, तर आवडले असते. (अर्थात, उत्तराचा आग्रहही नव्हता.) ते झाले तर नाहीच, उलट 'कालचा गोंधळ बरा होता'. (असो, चालायचेच. आणि चालू द्या.) बाकी, या एकंदर उपक्रमाबद्दल माझे काहीच म्हणणे नाही. (मग भलेही त्यातले मला काहीही कळत नसले तरी.) फक्त अशा उपक्रमांतून नकळत चुकीच्या कल्पना पसरू नयेत, एवढीच एक वाचक आणि एक सदस्य म्हणून माफक अपेक्षा आहे. बाकी चालू द्या. (अवांतरः बाकी त्या 'रेख़्ता' प्रकाराबद्दल तूर्तास मला यत्किंचितही कल्पना नाही. आता कुतूहल चाळवले आहे, तर बघेनही पुढेमागे कदाचित, पण तूर्तास ती प्रायॉरिटी नाही. तसेही माझ्या 'रेख़्ता' माहीत असण्यानसण्यातून काहीही सिद्ध होते, किंवा मला जे खटकते - आणि ज्याबद्दल मी कारणमीमांसा देऊ शकतो - त्याबद्दल बोलण्याचा माझा अधिकार माझ्या 'रेख़्ता'बद्दल माहिती नसण्यातून नष्ट होतो, असे मला वाटत नाही.)
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Wed, 12/29/2010 - 19:29 नवीन
जनाब अश्फाक एक कहावत तो तुम्हें याद होगी अधजल गगरी छलकत जाय !! कितनी ठोस बात कही है कि घडा आधा भरा हुआ हो तो आवाज करता है, पानी छलक कर गिर जाता है और पूरा भरा हो तो न छलकता हैं और बिल्कुल भी न आवाज करता है,| पूरे भरे घडे में गहनता आ जाती है। छिछलापन नहीं रहता। मतलब साफ है, छिछलापन आवाज करता है, गहराई में शांति होती है. Empty Vessels makes more noise याची प्रचिती तुम्हाला आली असेलच :-) बाकी सर्व शेर आवडले अन सर्वात जास्त आवडले ते मुखालिफत से संवरती है शख्सियत मेरी ! मै दुश्मनो का बडा एहतेराम करता हुं !! :-)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम गुरुवार, 12/30/2010 - 06:20 नवीन
छान लिहलंय दरिया में यूँ तो होते हैं कतरे ही कतरे सब! कतरा वही है जिसमें कि दरिया दिखाई दे!! क्या बात हे.....!!!!!!!!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 12/30/2010 - 22:48 नवीन
वा! शेर आवडले.
क्या हुस्न है, जमाल है, क्या रंग-रूप है । वो भीड़ में भी जाएं तो तनहा दिखाई दें ।
"तनहा" शब्दामध्ये मला कारुण्याची झालर दिसते. (हे वैयक्तिक असेल.) त्यामुळे शेराचा अर्थ माझ्यासाठी अधिक बहुपदरी होतो आहे. एक विनंती : जमल्यास टंकताना काळजी घ्यावी. "क्या" ऐवजी "कया" लिहिलेले वाचताना बहर ठेचकाळतो.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 12/31/2010 - 04:00 नवीन
सुरेख शेर आहेत. धन्यवाद. सोबत काही रसग्रहण येईल तर मजा येईल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा