मराठी चित्रपट - एकंदरीत साधकबाधक चर्चा..
💬 प्रतिसाद
(107)
न
नगरीनिरंजन
Mon, 01/03/2011 - 12:48
नवीन
तुम्ही मराठी चित्रपटांचीच उदाहरणे का घेत आहात ते समजत नाही. मला अभिप्रेत असलेले चित्रपट मराठीत बनतच नाहीत. संवेदनशील चित्रपट फक्त शिकलेल्या आणि कलेची जाण असलेल्यांना आवडतात. तमाशापट किंवा दादा कोंडकेंचाही स्वत:चा एक प्रेक्षकवर्ग होता. असं नेहमीच का असतं? सगळ्यांना थोड्याफार प्रमाणात मनोरंजन करू शकेल असे चित्रपट का बनत नाहीत? इंग्रजी न समजताही लोक इंग्रजी चित्रपट पाहतात आणि त्यांना ते आवडतातही. वेगवेगळे (पण करमणूकप्रधान) विषय, उत्तम बजेट आणि त्याचा उत्तम वापर करून तंत्रदॄष्ट्या उत्तम चित्रपट असतील तरच मोठ्या प्रमाणावर जनाधार मिळतो असं मला म्हणायचं आहे.
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
Mon, 01/03/2011 - 13:22
नवीन
दादा कोंडक्यांचे चित्रपट किंवा काही तमाशापट सुपरहिट होते. त्यामुळे बहुतेकांचं मनोरंजन ते करू शकत होते असं वाटतं.
अमेरिकेतही हेच होताना दिसतं. 'टायटॅनिक' किंवा 'अवतार'ला नाकं मुरडणारे कलेची जाण असणारे लोक अमेरिकेतही आहेतच. त्यामुळे हा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर वैश्विक असावा.
'मोठ्या प्रमाणावर जनाधार' हे महत्त्वाचं आहे. दादा कोंडके किंवा काही तमाशापट यांना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जनाधार होता असं म्हणता येईल. पण ते तंत्रदृष्ट्या उत्तम नव्हते, कमी खर्चात बनत आणि विषयही तेच तेच असत. म्हणून तुमचा (भाषा न जाणणार्या माणसालाही सिनेमा कळला पाहिजे हा) मुद्दा कळला नाही.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Mon, 01/03/2011 - 13:55
नवीन
>>दादा कोंडके किंवा काही तमाशापट यांना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जनाधार होता असं म्हणता येईल
मान्य पण यात होता हा शब्द महत्त्वाचा आहे. आता परिस्थिती तशी आहे का? त्या काळात हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट यात किती फरक होता आणि आता किती आहे, तेव्हा लोकांना हिंदी किती समजायचं आणि आता किती समजतं आणि लोकांची आवड तेव्हा कशी होती आणि आता कशी आहे हे ही लक्षात घेतले पाहिजे. त्याकाळी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये इतकी दरी नव्हती, किंबहुना कित्येक मराठी चित्रपट समकालीन हिंदी चित्रपटांपेक्षा सादरीकरणात जास्त उजवे होते. दुर्दैवाने मराठी चित्रपट आता हिंदी चित्रपटांशी स्पर्धा न करता एकतर त्यांची भ्रष्ट नक्कल करतात किंवा हिंदी चित्रपटात नसणारे विषय घेऊन संवेदनशील वगैरे चित्रपट बनवतात.
>>पण ते तंत्रदृष्ट्या उत्तम नव्हते, कमी खर्चात बनत आणि विषयही तेच तेच असत. म्हणून तुमचा (भाषा न जाणणार्या माणसालाही सिनेमा कळला पाहिजे हा) मुद्दा कळला नाही.
तेव्हा ते चालायचे कारण तेव्हाची परिस्थिती. आता तसेच चित्रपट चालतील असे नाही. हिंदी चित्रपटांशी स्पर्धा करून, त्यांचे विषय त्यांच्यापेक्षा नाहीतर किमान त्यांच्याइतक्याच चांगल्या पद्धतीने दाखवले तरच लोक मराठी चित्रपटांना प्राधान्य देतील. आजकाल दाक्षिणात्य चित्रपट इतके चांगले असतात की ते इतर लोकही पाहतात आणि बरेचसे हिंदीत रिमेक (गझनी, रावण वगैरे) करून दाखवले जातात. तसं मराठीचं व्हावं अशी इच्छा धरली तरच थोडं फार भविष्य आहे.
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
Mon, 01/03/2011 - 14:08
नवीन
हा सुवर्णकाळ कोणता आणि असे कोणते चित्रपट आपण उदाहरणादाखल नमूद करू शकाल? तुलनेसाठी त्यांच्या समकालीन हिंदी चित्रपटांचेही मासले द्यावेत ही विनंती.
त्यामागे तर साधं धंद्याचं गणित असावं. हिंदी सिनेमाला ज्या व्यापक जनाधाराची शक्यता असते, ती शक्यता मराठी सिनेमाला नसते, नसणार. त्यामुळे मराठी सिनेमा हिंदी सिनेमाशी धंद्यात स्पर्धा करू शकणार नाही. 'नटरंग'सारखा एखादा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी सिनेमा मासल्यादाखल घेतला तरीही तो हिंदी सिनेमाच्या मानानं काहीच धंदा करू शकत नाही असं दिसतं.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Mon, 01/03/2011 - 16:11
नवीन
एक दोन उदाहरणे देतो.
पाठलाग या चित्रपटाच्या यशाने प्रभावित होऊन मेरा साया काढण्यात आला. माणूस आणि आदमी (माझ्या समजुतीप्रमाणे) एकाचवेळी मराठी आणि हिंदीत काढून दोन्ही गाजले. आणखीही उदाहरणे असतीलच.
पण तुम्हाला खरेच माझा मुद्दा समजला नाहीये. हिंदीशी स्पर्धा केल्याने मराठी चित्रपटाचा व्यवसाय तेवढा होईल असे मी म्हणत नाहीये. पण तशी स्पर्धा करायची वृत्तीच नाहीये असं मी म्हणतोय. चित्रपट निर्मिती हा धंदा आहे हे मान्य पण त्यातही काहीतरी मोठं करायची जोखीम कोणी घेत नाही. जेव्हा स्वतंत्र आणि मोठा विचार करून चित्रपट काढले जातील तेव्हा नक्कीच लोक ते पाहतील. नटरंग वगैरेचं यश हेच सांगतंय की लोक पाहायला तयार आहेत, पण त्यांना हवंय ते देणारे चित्रपट तर काढले पाहिजेत. आता नटरंग चालला म्हणून कोणी पुन्हा तमाशा-लावणीवर चित्रपट काढला तर चालणार नाही. पण तसाच संगीत, उत्तम छायाचित्रण, चांगले कलाकार आणि इतर तांत्रिक अंगांनी उत्तम असलेला चित्रपट चालेल.
गुणवत्ता कमी नाहीय, पण निर्माते जोखीम घेत नाहीत त्यामुळे असेच लो बजेट चित्रपट निघणार आणि त्यातला एखादा उत्तम कथा, दिग्दर्शन यामुळे थोडाफार चालणार.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 01/03/2011 - 12:19
नवीन
अजून काही चांगले - स्मृतिचित्रे, २२ जून १८९७.
सुखांत ही चांगला होता, असे ऐकून आहे - इच्छामरण हा विषय.
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 01/04/2011 - 19:37
नवीन
नाही अगं!
चांगला असेल असं मलाही वाटलं होतं पण फक्त विषय चांगला आहे.
मला तरी दिग्दर्शन आवडले नाही.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 01/05/2011 - 04:55
नवीन
कोणत्या चित्रपटाबद्दल बोलते आहेस रेवती? सुखांत का?
- Log in or register to post comments
स
स्मिता.
Wed, 01/05/2011 - 11:54
नवीन
सुखांत नाही आवडला का तुम्हाला?
म्हणजे थोडंसं अवास्तव वाटणारं आहे त्यात, पण चित्रपटांत चालूनही जातं. मला तरी विषय आवडला त्याचा...
आता प्रतिक्रिया लिहितानाच जाणीव झाली की कदाचित दिग्दर्शन याहून चांगले होऊ शकले असते. पण 'सुखांत' पाहिला तेव्हा विषयच एवढा महत्त्वाचा वाटला की बाकिच्या गोष्टी जाणवल्याच नाहीत.
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Mon, 01/03/2011 - 12:21
नवीन
"बायको पळाली स्टँडवर " हा फार छान सिनेमा वितरणातल्या उणीवेमुळे शहरी प्रेक्षकांना पहायला मिळाला नाही असे ऐकले...... त्याचे पोस्टर एकदा शिवाजीनगर स्टँडावर पाहिले होते.. खूप उत्सुकता निर्माण झाली होती हा सिनेमा पहायची.... पण योग नाही आला....
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Mon, 01/03/2011 - 12:24
नवीन
बापरे !!!
त्या पळालेल्या ( दुसर्याच्या ) बायकोच्या शोधात मास्तर लगेच ( शिवाजीनगर ) स्टँडावर जातील असे वाटले नव्हते बॉ ;)
अवांतर : एकदम फालतु शिनेमा होता, बरेच प्रेक्षक पळाले. असो.
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
म
मैत्र
Mon, 01/03/2011 - 13:06
नवीन
असं नाव प्रभात च्या पोस्टर वर पाहिल्याचं आठवतंय :)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Mon, 01/03/2011 - 13:02
नवीन
"बायको पळाली स्टँडवर " हे शिर्षक असलेल्या काही सिडी दत्त मंदीराच्या मागील बोळात मिळतात, इच्छुकांनी लाभ घ्यावा.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 01/03/2011 - 12:27
नवीन
दिलीप प्रभावळकरानी मोजक्याच काही चित्रपटात कामे केलेली आहेत.
एक डाव भुताचा : हा साधाच पण चांगला चित्रपट होता.
कथा दोन गणपतरावांची : या चित्रपटात सुंदर सोपा नैसर्गीक अभिनय काय असतो याचा प्रत्यय प्रभावळकर आणि
डॉ.मोहन आगाशे देतात. सुंदर चित्रण , प्रसंगाची सहज मांडणी पुन्हा एकदा राजा परांजपेंचा
चित्रपट पहातोय असा आनद मिळतो.
रात्र आरंभः दिलीप प्रभावळकरांचा अजून एक आगळा चित्रपट.
सरकारनामा: यातील कोकणातील मंत्र्याची बोलण्याची ढब दिलीप प्रभावळकर छोट्या रोल मध्ये देखील लक्षात रहातात
मराठीत अनेक गुणी कलाकार आहेत. त्याना वाव मिळेल अशा भुमीका मिळत नाहीत. अशोक सराफ देखील "हम पांच" मालीकेत जी धमाल करतात तसे रोल त्यान मराठीत मिळत नाहीत.
मराठी चित्रपटाना उत्त्तमोत्तम कथा मिळू शकत नाहीत असेदेखील नाही. चाम्गले चित्रपट असतील तर प्रेक्षक येतील अशी आता परिस्थिती आहे.
- Log in or register to post comments
य
योगी९००
Mon, 01/03/2011 - 15:09
नवीन
चौकट राजा विसरलात काय? या चित्रपटाला आनंद मोडकांचेच संगित होते.
तसे प्रभावळकर यांनी काही टुकार भुमिकाही केल्यात ..छक्के पंजे या चित्रपटातील आणि तात्या विंचू..
यातला तात्या विंचूला मात्र माफ करा कारण तो त्यांचा गेस्ट अॅपिअरन्स होता..जास्त भुमिकातर त्या बाहूल्याचीच होती.
ओम फट् स्वाहा!!
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 01/03/2011 - 12:30
नवीन
रजनीकांत ने मराठी चित्रपटात काम करायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली होती.
त्याने स्वतः काही केले तरच काहितरी होईल.
रजनीकान्त कडून असा चमत्कार होईल का?
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 01/03/2011 - 15:14
नवीन
रजनीकांतने डावा खिसा झटकला तरी एक मराठी चित्रपट सहज निघेल.
अशोक सराफला हिरो म्हणून जर बरीच वर्षं स्विकारलं गेलं तर रजनीकांतला नक्कीच स्विकारलं जाईल.;)
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Mon, 01/03/2011 - 16:41
नवीन
गैर हा चित्रपट नुकताच पाहिला. चांगल्या चित्रपटांच्या यादीत त्याचे नाव वाचून खेद वाटला. :)
न पटणारे अचाट कथानक, दुबळी तांत्रिक बाजू, सुरकुत्या पडलेला हिरो, आयटम साँगमधले कपडे, सजावट बाजारू बारमधल्या गोष्टींपेक्षाही बेकार वगैरे वगैरे.
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Mon, 01/03/2011 - 16:48
नवीन
अगदी अगदी... मी कालच पाहिला गैर, भंकस वाटला. एखाद्या रडक्या डेली सोपचे ७-८ भाग एकत्र जोडल्यागत वाटले. आणि गाणी तर कुठेही आणि काहीही गरज नसताना घुसवली आहेत.
'त्या रात्री पाऊस होता'चं कथानक जरी चांगलं असलं तरी चित्रपट जरा अतीरंजीत आहे. त्यात अमृता सुभाषचा अभिनय कमी आणि चिरकणंच जास्तं आहे.
- Log in or register to post comments
ग
गणपा
Mon, 01/03/2011 - 19:50
नवीन
याच धाग्यावर परत एकदा १००% सहमत. यावेळी अनामिकशी.
ही बया किती ओव्हर अॅक्टिंग करते त्याला तोड नाही. श्वास पासुनच डॉक्यात जायची.... कुठेतरी एकदम ट्रांन्स मध्ये हरवल्यासारख तिच ते बोलणं ऐकलं की शॉट बसतो डोक्याला.
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Tue, 01/04/2011 - 08:46
नवीन
>>कुठेतरी एकदम ट्रांन्स मध्ये हरवल्यासारख तिच ते बोलणं ऐकलं की शॉट बसतो डोक्याला.
अगदी अगदी. :(
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 01/04/2011 - 19:40
नवीन
'गैर' मला तरी बरा वाटला. फक्त त्यातला तो हिरो म्हातारा वाटत होता.
'त्या रात्री....' फा ल तू आहे.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 01/03/2011 - 19:04
नवीन
सगळे मुद्दे पटेश
अर्धवटराव
- Log in or register to post comments
म
मराठे
Tue, 01/04/2011 - 18:56
नवीन
अगदी १००% सहमत. जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा बघण्याची फार ईच्छा होती. पण तेव्हा जमलं नाही. आणि मग राहूनच गेलं. मागच्या महिन्यात राजश्री.कॉम वरून बघितला आणि पैसे वाचल्याचा आनंद झाला.
सिनेमा प्रेसेंटेबल झालेला असला तरी हिंदीची कॉपी बनवण्याच्या नादात पार वाट लावली आहे. संदिप कुलकर्णी (हाच हिरो आहे ना?) मात्र एक चांगला अभिनेता आहे. अंकुश चौधरी तर मला वाटतं मराठी सिनेमातला एकमेव 'ग्लॅमरस' हिरो आहे.
अवांतरः ह्या आणि आणखी कुठल्याशा एका मराठी सिनेमात मी हिंदीतली गाणी पाहिली. मात्र हिंदीत गाणी करण्याचं प्रयोजन काही लक्षात आलं नाही ?
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Tue, 01/04/2011 - 19:46
नवीन
कारण मी तरी इतक्यात दुसरा कोणता मराठी सिनेमा पाहिला नाही. :( हा बघून पुढले चित्रपट बघण्याची इच्छा झाली नाही. भयंकर प्रकार आहे तो हिंदी-मराठी गाणी.
विशेषतः तीन सराईत चोरांना/ खुन्यांना पकडण्यासाठी पोलिसांची टिम वर्षभर श्रीमंत उद्योगपती, त्याची पार्टनर, आई वगैरेंचे नाटक करते पाहून विशाद वाटला. असली नाटके करण्याची क्षमता असेल तर पोलिसांचे पगार वाढवा अशी मागणी करायला हवी. ;)
- Log in or register to post comments
म
मराठे
Tue, 01/04/2011 - 19:17
नवीन
<प्रकाटाआ>
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Mon, 01/03/2011 - 16:53
नवीन
वरती बरीच चर्चा झाली आहे .. म्हणुन पुन्हा काही जास्त बोलत नाहि.
अवांतर :
वयक्तीक रीत्या , मला मराठी चित्रपट खुप आवडतात..
मी हमखास थेटर मध्ये जावुन बरेच मराठी पिक्चत बघितले आहे.
खुप नितळ वाटतात ते मला..
मला हिंदी पिक्चर आवडत नाही असे नाही , मी बरेचस से ते ही खुप आवडिने पाहतो ..
परंतु घरात झी टॉकीज ही बर्याचदा लावतोच ..
मराठी पिक्चर मधील साधी माणसं खुप काही शिकवुन जातात .. संगीत आनि गाण्यात जे मोकळेपण असते ते खुप भावते ...
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 01/03/2011 - 17:27
नवीन
उत्तम प्रतिसाद, उत्तम संकलन..
आम्ही टाकलेला धागा सार्थकी लागला..
येऊ द्यात अजूनही..
(आनंदीत) तात्या.
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
Mon, 01/03/2011 - 19:22
नवीन
मैत्र+इतर प्रतिसादक यांनी मराठी चित्रपटांची चांगली यादी दिलीय. त्यात भर घालण्यासारखा पतकन आठवलेला चित्रपटः 'नॉट ओन्ली मिसेस राऊत'!!
बाकी,
या अनामिकांच्या वाक्याला हजारदा अनुमोदन. दारू पिणं, ड्रग्ज घेणं आणि तोंड वर करून बरेच जणांशी शारिरिक संबंध असणं हे किंचाळून सांगणं हाच त्यांना अभिनय वाटतो.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 01/04/2011 - 14:59
नवीन
नॉट ओन्ली मिसेस राऊत ह्या सुचवणीबद्दल सहमत.
त्या रात्री... जरा अतिरंजीत होता हेदेखील मान्य.
अमृता सुभाष ह्या अभिनेत्रीच्या अभिनयाबद्दल फारसं बोलु नाही शकणार मी, पण, "दारू पिणं, ड्रग्ज घेणं आणि तोंड वर करून बरेच जणांशी शारिरिक संबंध असणं हे किंचाळून सांगणं हाच त्यांना अभिनय वाटतो." ह्या वाक्यावर मात्र आवर्जुन असहमती नोंदवु इच्छितो.
मला वाटतं, आपण त्या व्यक्तिरेखेचा मुळात विचारच करत नाहीये. जाणत्या-अजाणत्या वयाच्या सीमारेषेवर भावाशी, वडिलांशी ताटातूट झालेली असणं, आईचं त्रयस्थ पुरुषासोबत (भले पराकोटीच्या असमर्थतेतुन किंवा नाईलाजातून म्हणा, पण त्या वयाच्या मुलीसाठी ते किती वाईट असेल?) शय्यासोबतीला जाणं, पुढे अशा ताणांमधून व्यसनांच्या आहारी जाणं, आईबद्दलची कुजबुज आजुबाजूला ऐकुन तथाकथित सामाजिक बंधनांची चौकट उबग येऊन तोडण्याच्या रागातून शरीरसंबंधांबद्दल धाडसी होणं, ह्या सगळ्यातून गेलेली व्यक्तिरेखा रंगवताना कोणत्या प्रकारचा अभिनय अपेक्षित असु शकतो? 'लोक बायका ठेवतात, मी पुरुष ठेवते' अशी विधानं करणं...ह्याचाच एक प्रकार वाटतो.
दारु/ड्रग्जच्या सेवनानंतर माणूस आपल्यावरचा ताबा ठेवु शकत नाही, त्यावेळी त्याच्या आतला दडलेला खरा माणुस बाहेर येतो ना? मग तो जर रागानं पिचलेला असेल, उद्वेगानं भरलेला असेल तर तो शांतपणॅ कसा व्यक्त होईल?
ती व्यक्तिरेखा मुळातच सर्वसामान्य चौकटीत न जगलेली आहे. तिला शालीनतेचे, सभ्यतेचे सार्वत्रिक निकष कसे लावता येतील?
दारुचे दोन ग्लास पोटात गेल्यावर तारस्वरात किंचाळत, अरेरावी करत बोलणारे पाहिले आहेत. कित्येक असतील..ते आपण वस्तुस्थिती म्हणुन स्विकारत असु तर पडद्यावर एक मुलगी/बाई अशाच नशेच्या आहारी जाऊन किंचाळली तर ते अति का वाटतं?
असो!
मात्र, 'त्या रात्री पाऊस होता' ची ३ बलस्थानं आहेत (असं मला वाटतं.)
१. सोनाली कुलकर्णी (थोरली हो..धाकटीला आम्ही सोनाली नाही, बाहुली म्हणतो. ;) )
२. सयाजी शिंदे.
३. शिंद्यांनी साकारलेला आबा (आबाच ना? त्या वर्कशॉपवरच्या गड्याचं नक्की नाव आठवत नाहीये आता...) ह्या तिघांसाठी मी आवर्जुन पाहिला हा सिनेमा.
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
Tue, 01/04/2011 - 15:44
नवीन
माझ्या मते ते तानाजी उमप!!! चित्रपटातलं त्यांचं नांव आठवत नाही आता..
अशा असहमतीची अपेक्षा होतीच. अर्थात जसं मला माझं मत असू शकतं तसंच ते इतरांना आहेच.
असो. माझा मुद्दा असा, की अमृता सुभाषने साकारलेली मुलगी ही सर्वसाधारण व्यक्तिरेखा नाही. पण तेही राग, लोभ, मद, मोह मत्सर असलं जे जे काही असतं ते असणारं एक जिवंत माणूस आहे. हे सगळे इतर पैलू दिसण्यापेक्षा तिचं दारू पिणं आणि किंचाळणंच जास्त दिसतं.
खरंय. पण अशा प्रकारचे पिक्चर पाहिल्यावर आपल्याला नक्की काय लक्षात रहावं अशी अपेक्षा असते, आणि हा सिनेमा पाहून काय लक्षात राहातं हाही मुद्दा आहेच. पूर्ण पिक्चरभर तसेच प्रसंग दाखवणं( उठसूट ती ड्रगची सुई हातात खुपसून घ्यायची, किंवा हा ढमका माझा ठोक्या आहे असं म्हणणं) यापेक्षा काही प्रसंग आक्रस्ताळेपणाचे आणि काही तिच्या मनाची संवेदनशीलता, तरलता दाखवणारे असतील, तर त्याची एकूणातली परिणामकारकता वाढते. थोडक्यात 'सटल्टी' नावांच्या प्रकरणाला थोडाफार थारा असावा, नाहीतर शेवटी 'नाना पाटेकर' होतो.
याच चित्रपटातला एक प्रसंग, बहुधा शेवटचा प्रसंग आहे तो: 'सुबोध भावेला त्याची आई बेवारशासारखी त्याच्या ऑफिससमोर दोन दिवसांपासून मरून पडलेली आहे हे कळतं'. हा प्रसंग जसा चित्रित आणि अभिनित झालाय, तसे अमृताचे काही प्रसंग रंगवायला हवे होते.
चाकोरीबाहेरचे चित्रपट मला आवडतात. हा आक्रस्ताळेपणा टाळला गेला असता तर कदाचित माझी दुसर्यांदा हा मूव्ही पाहण्याची हिंमत झाली असती.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 01/04/2011 - 16:07
नवीन
>>हे सगळे इतर पैलू दिसण्यापेक्षा तिचं दारू पिणं आणि किंचाळणंच जास्त दिसतं.
मला असं वाटतं, की आपल्या चौकटी पक्क्या बांधिव असतात, त्याच्यात हे बसत नसल्यानं आपल्याला ते जास्त ढळढळीतपणे दिसत राहतं आणि तेच डोक्यात राहतं.
तसं पाहता, तिचे बाबांसोबतच्या आठवणींचे हळवे क्षण भावाला सांगताना, किंवा आईची अवस्था सांगताना पिळवटून जाणं, आणि पुन्हा 'सेल्फ-मेड' असल्याचा झगा चढवल्यासारखं दुसर्या क्षणी तो दु:खी चेहरा लपवून कुर्रेबाजपणा दाखवणं हे ही अगदी नोटेबल आहेच. फक्त आपल्या चौकटीमुळं ते 'पांढर्याशेजारी काळा ठेवल्यावर काळा जास्त गडद दिसतो' असं दारु, ड्रग्ज आणि किंचाळणं आठवत राहतं असं मला वाटतं.
>>माझ्या मते ते तानाजी उमप!!!
येस! उमप..उमप. माय मिश्टेक.
.
ते तसे आहेतही. फक्त 'एम्बॉयसिंग'चा प्रश्न येतोय असं माझं मत.
>> थोडक्यात 'सटल्टी' नावांच्या प्रकरणाला थोडाफार थारा असावा,
सटल्टी? 'त्या रात्री..'मध्ये सगळंच जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न आहे असं जाणवतं. मग अशा व्यक्तीरेखेलाच का सटल्टीचा डिस्काउंट? मला ती शब्दशः वस्तुस्थिती वाटते, कारण अशा आक्रस्ताळेपणाचा बळी असलेल्या व्यक्तीसोबत काही काळ मित्र म्हणून घालवला आहे. काहीही वेगळं चित्र पाहतोय असं वाटलंच नाही.
एखाद्या लहान वयात गुन्हेगारीत पडलेल्याशी गप्पा मारताना लक्षात येतं, की त्याच्या गप्पांचा ओघ फिरुन फिरुन 'मी ह्याला कसा बडवला/ मी त्याला कसा कापला' वगैरेवर येतो.
एखाद्या विटलेल्या व्यक्तीशी बोलताना, 'माझ्याच नशीबात अशी दु:खं येतात..' वगैरे सूर असतो.
तसंच ह्या रस्त्यानं जाणार्या मुलीच्या तोंडी सतत 'अमुक माझा ठोक्या आहे' वगैरे येणं फार वेगळं वाटत नाही.
बाकी, नशेबाबत प्रत्येकाचे लिमिट्स, मापदंड वेगळे. मी चेनस्मोकर असेन तर सतत माझ्या तोंडात सिगारेट असेल, दारुड्या असेन तर सतत नशेत असेन,ऐपत असेल तर खिशात फ्लास्क घेऊन फिरेन. तसंच तिचे ड्रग्जचे इंजेक्शन्स घेण्याची वारंवारता! कुणाला आठवड्यातून एकदा पुरतं, कुणाला जरा चुणचुण कमी झाली की परत डोस हवा असतो. त्यामुळं ते अतिरेकी का दिसावं ते कळालं नाही. :)
अॅग्री टू डिसअॅग्री हे तर आहेच. म्हणुनच आपण बोलु शकतो. :)
- Log in or register to post comments
न
नीधप
Tue, 01/04/2011 - 04:33
नवीन
चित्र गेल्या ५-६ वर्षात बदलतंय. मराठी चित्रपटसृष्टीत येणं बंद झालेला पैसा परत येऊ लागलाय. त्या आधी ५ लाखात फिल्म करायची १६ मिमि वर, जत्रेत चालवायची, कोपर्यात रिलीज करायची आणि पुढच्या फिल्मसाठी १५ लाखाची सबसिडी घ्यायची. मग परत तेच चक्र असा प्रकार खूप जास्त चालत होता. गणितं बदललीयेत. ३५-४० लाखात फिल्म करून त्याची रिकव्हरी तर अगदी सोपी झालेली आहे. बरी गाणी, ठिकठाक स्टारकास्ट, ठिकठाक कथा आणि थोडा चकचकाट/ ग्लॅमर असेल तर १ कोटी पर्यंतची ही रिकव्हरी शक्य झालेली आहे. हे सगळे बदल अक्षरशः ५-६ वर्षात घडलेत.
कुठलाही व्यवसाय आधी आर्थिकरित्या सबळ झाल्यावर मगच प्रयोगशील इत्यादी होतो ना.
थोडा वेळ लागेल. पण सगळ्या पातळ्यांवर बदल होतोच आहे. हिंदी चित्रपटांशी तुलना करण्यात अर्थ नाही. कारण तिथलं गणित वेगळं आहे. मराठी व्ह्यूअरशिप १ असेल तर हिंदी १० आहे.. हा निव्वळ मराठी भाषिक + मराठी बघणारे आणि हिंदी भाषिक + हिंदी बघणारे यांच्या संख्येतला फरक आहे. तो रहाणारच आहे. तुलना करायचीच असेल तर प्रादेशिक चित्रपटसृष्टींशी करायला हवी. उदाहरणार्थ बंगाली किंवा मल्याळी.
आणि ती तुलना करताना प्रेक्षक म्हणून आपलीही तुलना बंगाली वा मल्याळी प्रेक्षकांशी करून बघायला हरकत नाही. चित्रपटसाक्षर प्रेक्षकांमुळे त्या त्या चित्रपटसृष्टींची भरभराट होण्यासाठी मोठा हातभार लागलाय हे विसरून चालणार नाही.
निर्मात्यांची/ दिग्दर्शकांची बाजू घेण्यासाठी हे लिहिलेले नाही. पण इथे लिहिणारे बरेचसे प्रेक्षकच आहेत तर त्यांनीही किंचित अंतर्मुख होऊन हा विचार करून पहायला काय हरकत आहे?
असो..
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Tue, 01/04/2011 - 06:00
नवीन
हिंदी चित्रपटसृष्टीवर मेघनाने लिहिलेले हे संपादकीय आठवले
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Tue, 01/04/2011 - 08:49
नवीन
नी, प्रतिसादाची वाट बघत होतो. आवडला आणि पटला.
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 01/04/2011 - 19:43
नवीन
मीही नी च्या प्रतिसादाची वाट बघत होते.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 01/04/2011 - 09:17
नवीन
".....चित्रपटसाक्षर प्रेक्षकांमुळे त्या त्या चित्रपटसृष्टींची भरभराट होण्यासाठी मोठा हातभार लागलाय हे विसरून चालणार नाही...."
~ या वाक्यात फार मोठा अर्थ आहे, जो सध्यातरी बंगाली आणि मल्याळी प्रेक्षकांनाच प्रामुख्याने लागू होतो. सत्यजीत रे तर राहू देत, पण ऋत्विक घटक, मृणाल सेन, बुद्धदेव दासगुप्ता, गौतम घोष, ऋतुपर्ण घोष हे बंगाली जादुगार आणि अदूर गोपालकृष्णन, शाजी करुण, जॉन अब्राहम, जी.अरविंदम या मल्याळींनी जी मोहिनी अखिल भारतीय चित्रपटप्रेमीवर घातली आहे, ती पाहता त्या दोन भाषा न कळतादेखील त्या त्या दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांची फ्रेम न् फ्रेम कशी जिवंत करता येते हे वेळोवेळी दाखविले आहे. आणि यांचे बजेट तर काय असते एका चित्रपटाचे? इंग्रजीत ज्याला "Shoe String" म्हणतात त्याच धर्तीचे....तरीही आज भारतीय चित्रपटसृष्टीचे जागतिक पातळीवर (जे काही असेल थोडेफार ते) नाव आहे ते नि:संशय बंगाली आणि मल्याळी चित्रपटांमुळे. [मल्याळी दिग्दर्शक प्रियदर्शन यानी हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील अलिकडे जे स्पृहणीय यश मिळविले आहे तेदेखील लक्षात ठेवले पाहिजे.]
कन्नडमधील गिरिश कासारवल्ली, शंकर नाग (फार अकाली गेली ही प्रतिभावंत व्यक्ती), गिरिश कर्नाड ही काही उल्लेखनीय नावे.
अशावेळी मराठीकडे नजर टाकल्यास किती असे दिग्दर्शक नजरेसमोर येतील ज्याना संपूर्ण भारत ओळखू शकेल? ~ एकतरी ??? आणि असा दिग्दर्शक इथे नसेल तर त्याला तितकाच जबाबदार इथला प्रेक्षक वर्गदेखील असू शकतोच. तो खर्या अर्थाने "साक्षर" होणे गरजेचे आहे.
इन्द्रा
- Log in or register to post comments
म
मी_ओंकार
Tue, 01/04/2011 - 09:25
नवीन
आता गरज आहे ते चांगल्या प्रसिद्धीतंत्राची. हिंदी चित्रपट नुसत्या गाण्यांवर हिट होतात. मराठीत झीचे सोडले तर बाकी चित्रपटांमधील गाणी ऐकूही येत नाहीत. नंतर कुठेतरी सारेगमप किंवा तत्सम कार्यक्रमात ऐकल्यावर मग ही गाणी कळतात. हल्ली वृत्तवाहिन्या काही कार्यक्रमांमध्ये नवीन चित्रपट, मुलाखती वगैरे दाखवतात पण ते किती लोकांपर्यंत पोचतात कोणास ठावूक.
नटरंग सारख्या सिनेमांनी प्रसिद्धी मिळाल्यावर चित्रपट चालतो हे दाखवून दिले आहेच. गाणी, प्रोमो या गोष्टींवर पैसे खर्च करण्याची तयारी निर्मात्यांनी दाखवली पाहिजे.
- ओंकार.
- Log in or register to post comments
स
सुनील
Tue, 01/04/2011 - 11:52
नवीन
. तुलना करायचीच असेल तर प्रादेशिक चित्रपटसृष्टींशी करायला हवी. उदाहरणार्थ बंगाली किंवा मल्याळी.
का? तुलना तामिळ वा तेलगूशी का नको? ह्या भाषकांची संख्या साधारणतः मराठी भाषकांशी मिळतीजुळती आहे, तरीही त्यांना हिंदी व्ह्यूअरशिपची अडचण का येत नाही?
कुठलाही व्यवसाय आधी आर्थिकरित्या सबळ झाल्यावर मगच प्रयोगशील इत्यादी होतो ना.
अगदी!
आधी तामिळ-तेलगूसारखा पैसा येऊदे मग बंगाली-मल्याळीची उंची गाठण्याचा विचार करता येईल.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 01/04/2011 - 16:24
नवीन
शेवटी सगळा खेळ आहे तो पैशाच्या डोलार्यावर.
पण मला एक प्रश्न पडतो, अजुन आपल्याकडं सस्पेन्स, थ्रिलर, अॅक्शन, कोर्टरुम ड्रामा असे प्रकार एकतर हाताळत नाहीत, किंवा खूपच ढिसाळपणे हाताळले जातात. तर असं का व्हावं?
कोकणासारखं निसर्गसौंदर्य हाताशी आहे, त्याच कोकणाच्या पोटात भुताखेतांच्या गोष्टी आहेत..पण वापर मात्र परिणामकारकरित्या करुन घेणं नाही. असं का व्हावं हे मात्र कळत नाही.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Tue, 01/04/2011 - 05:23
नवीन
२२ जून १८९७ हा एक उत्तम मराठी सिनेमा. १०० वर्षापूर्वीचे वातावरण, भाषा, वेषभूषा सगळे उत्तम. सिंहासन आणि सामना तर प्रश्नच नाही. पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात.
जैत रे जैत: हृदयनाथांचे संगीत आणि मातब्बर गायक गायिकांचे आवाज आहेत. पण आदिवासी ठाकर असली भाषा बोलत नाहीत. ठाकरांची भाषा थोडेबहुत ऐकलेली असल्यामुळे मला हे कायम खटकते. ना.धो महानोरांची भाषा ह्या सिनेमाकरता अगदी चुकीची आहे.
पाठलाग आणि पडछाया हे एक चांगले रहस्यपट होते. पण ही परंपरा खंडित होऊन एकाच छापाचे सिनेमे यायला सुरवात झाली. हा खेळ सावल्यांचा हाही एक चांगला भयपट.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 01/04/2011 - 05:49
नवीन
+१
२२ जून, सिंहासन, सामना, शामची आई या सिनेमांमधे ती कथा ज्या काळात ज्या ठिकाणी घडली असेल ते ठीकाण हुबेहुब उभे करण्याची सफाई जी दिसली ती तितकी इतर सिनेमात दिसली नाही. अपवाद अर्थातच आहेत.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 01/04/2011 - 07:13
नवीन
"...२२ जून...."
खरे तर घटना ज्या काळात घडली त्या काळातील वातावरण जसेच्या तसे उभे करणे हे पटवर्धन दांपत्यापुढील मोठे आव्हान होते. दोघेही आर्किटेक्ट असल्याने त्यांनी शूटिंगपूर्वी महिनोनमहिने "काळ उभारणी" साठी जी धडपड केली ती कशी सार्थकी लागली हे श्री.नचिकेत आणि सौ.जयू पटवर्धन यानी वेळोवेळी त्या संदर्भात केलेल्या लेखनामुळे तसेच व्याख्यानामुळे ऐकताना चित्रपटप्रेमी प्रभावित होतो. त्यातही १०० वर्षापूर्वीच्या "पुण्या"साठी "वाई" निवडून चापेकर वाडा असा [जशाचा तसा] काही उभा केला आहे त्याबद्दल त्याना वंदनच केले पाहिजे.
अनेक स्त्री पात्रे आहेत चापेकरांचे घरचे वातावरण दाखविण्यासाठी....पण एकाही पात्राला एका ओळीचाही थेट संवाद नाही, हे एक दिग्दर्शकद्वयाचे नेमकेपणाचे वैशिष्ट्य....दामोदरपंतांना आरोपाखाली नेण्यासाठी इन्स्पेक्टर ब्रुईन (की ब्रेविन?) घरी येतो आणि त्याना घेऊन जाताना दामोदर चापेकरांची पत्नी पाण्याचा पेला देताना 'शेवटची' अशी एक नजर पतीकडे टाकते, ते अबोल दृश्य अंगावर शहारे निर्माण करणारेच आहे. सर्वच पात्रांची अचूक निवड हेदेखील २२ जूनची एक जादाची गुणवत्ता.... मुख्य तर राहू दे, पण अगदी 'हवालदार रामा पांडू' देखील.
पुणे विद्यापीठ आणि गणेश खिंडीचीही बांधणी आणि चित्रीकरण पाहताना क्षणभरही कुठे जाणवत नाही की, चित्रपटाचे शूटिंग १९८० सालातील आहे. या चित्रपटाबद्दल पटवर्धन दांपत्याला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जी काही पारितोषिके मिळाली आहेत, तित 'आर्ट डायरेक्शन' चे जे एक आहे, त्याचा त्याना विशेष आनंद होत असेल.
निर्माते आणि दिग्दर्शक 'कलादिग्दर्शना'कडे अशा गंभीरतेने लक्ष देतील तर मराठी भाषेतील अनेक कथारत्ने "२२ जून" च्या तोडीची होऊ शकतील....[अशी आशा वाटते]
इन्द्रा
- Log in or register to post comments
N
nasatiuthathev
Tue, 01/04/2011 - 06:43
नवीन
आज काळाचे छान मराठी चित्रपट आणि त्यांचे विषय हाताळणी उत्कृष्ट आहे.
खालील काही चित्रपट जरूर पहा
१) नटरंग
२) झेंडा
३)त्या रात्री पाऊस होता
४) मुंबई पुणे मुंबई
५)जोगवा
६)ऑकसीजन
७)एक डाव धीबी पछाड
तरी आपण वरील चित्रपट पाहून परत एकदा चर्चा करावी
...............................................................................................
नसती उठाठेव
..............................................................................................
- Log in or register to post comments
N
nasatiuthathev
Tue, 01/04/2011 - 06:49
नवीन
"""'त्या रात्री पाऊस होता'चं कथानक जरी चांगलं असलं तरी चित्रपट जरा अतीरंजीत आहे. त्यात अमृता सुभाषचा अभिनय कमी आणि चिरकणंच जास्तं आहे."""
त्या रात्री पाऊस होता मधील अमृता सुभाष चा अभिनय विषयाशी निगडीत असल्याने मला नाही वाटत त्यात काही गैर असेल असे वाटत नाही
आणि हो drugs ,शारीरिक संबंध हे सगळे विषयाशी सलंग्न आहे .त्यामुळे ते योग्य आहे असे मला वाटते
....................................................................
नसती उठाठेव
........................................................
- Log in or register to post comments
स
सुहास..
Tue, 01/04/2011 - 08:37
नवीन
त्या रात्री पाऊस होता मधील अमृता सुभाष चा अभिनय विषयाशी निगडीत असल्याने मला नाही वाटत त्यात काही गैर असेल असे वाटत नाही
आणि हो drugs ,शारीरिक संबंध हे सगळे विषयाशी सलंग्न आहे .त्यामुळे ते योग्य आहे असे मला वाटते >>
असेच म्हणतो !! नाहीतर अगंवर धड कपडे नसलेल्या हिन्दी अभिनेत्र्या !!
- Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू
Tue, 01/04/2011 - 10:47
नवीन
मराठी सिनेमानं चांगला व्यवसाय करावा की रसिकप्रिय व्हावं याविषयी अनेक प्रतिसादांमध्ये दोन वेगवेगळ्या टोकांची मतं दिसत आहेत. मुळात कोणत्याही स्थानिक किंवा जागतिक पातळीवरच्या चित्रपटसृष्टीत असे दोन प्रवाह दिसतातच. त्यामुळे ते मराठीतही असणं हे स्वाभाविक वाटतं. पण 'प्रभात'काळ सोडता दोन्ही बाबतींत मराठी सिनेमा नेहमीच इतरांहून मागे होता हे सत्य आहे.
धंदा करण्याच्या बाबतीत दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमाशी तुलना केली तर हे सहज लक्षात येईल. पण एक बाजारपेठ म्हणून मराठीच्या अंगभूत मर्यादा आहेत. त्या लक्षात घेता आशेची परिस्थिती वाटत नाही. शिवाय आहे त्या बाजारपेठेत बर्याचशा मराठी जनतेला आवडेल असा सिनेमा बनवणं आता अशक्यच वाटतं. शहरी/ग्रामीण, तरुण/मध्यमवयीन, मल्टिप्लेक्स-सिंगल पडदा-तंबू अशांत विभागल्या गेलेल्या आजच्या मराठी प्रेक्षकाच्या आवडीनिवडी खूपच भिन्न आहेत; म्हणून आहे ती बाजारपेठही विभागली जाते. खेडोपाडी तंबूत दाखवला जाणारा मराठी सिनेमा आता आपल्या मराठी वाहिन्यांवर आणि पुण्या-मुंबईतल्या चित्रपटगृहांत येऊ शकत नाही. त्याउलट पुण्या-मुंबईत प्रदर्शित होणारा सिनेमा तंबूत वा दुसर्या-तिसर्या फळीच्या शहरांत जात नाही.
रसिकप्रियतेचे निकष पाहताही बंगाली/मल्याळी रसिकप्रिय चित्रपटांच्या तुलनेत आताआतापर्यंतचा मराठी सिनेमा मागेच पडत आला आहे. कदाचित 'डोंबिवली फास्ट' आणि 'श्वास'नंतरच्या वेगळ्या मराठी सिनेमाकडून (संदीप सावंत, निशिकांत कामत, परेश मोकाशी, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर, नंदू माधव वगैरे नवे दिग्दर्शक) काहीतरी अपेक्षा ठेवता येतील. अर्थात, त्यांनाही रसिकप्रिय हिंदी सिनेमाची भुरळ पडली नाही तरच ते शक्य आहे.
थोडक्यात, मराठी सिनेमाला जागतिक किंवा भारतीय पातळीवर दखलपात्र करण्याची आशा/अपेक्षा ठेवायची झालीच तर त्यातल्या त्यात रसिकप्रिय सिनेमाकडूनच तशी ठेवता येईल असं वाटतं.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 01/04/2011 - 16:19
नवीन
प्रतिसाद वाचुन खुप छान वाटले .. मस्त झाली चर्चा एकदम
- Log in or register to post comments
य
योगी९००
Tue, 01/04/2011 - 17:13
नवीन
माझे काही अतिआवडते चित्रपट
१) माहेरची साडी
का आवडतो? यातली रडारड पाहून आपले फार चांगले चालले आहे असे वाटते. जेव्हा जेव्हा कधी दु:खाचे प्रसंग येतील तेव्हा हा पहा..म्हणजे आपले दु:ख थोडे हलके होते.
२) टारगेट
संजय नार्वेकर, अंकूश चौधरी, सिद्धार्थ जाधव यांनाही पोटापाण्यासाठी असल्या चित्रपटात काम करावे लागते हे आपल्याला उमजून घेण्यासाठी.
३) सचिनचा आत्मविश्वास्, नवरी मिळे .. आणि बनवाबनवी सोडून कोठलाही चित्रपट..तसेच अशोक आणि लक्षाचे काही चित्रपट (चंगू मंगू वगैरे..)
फु बाई फु बघताना हसू यावे यासाठी आधी असला एखादा सिनेमा पहावा..म्हणजे अति बोअर झाल्याने थोडेफार हसू देखील फु बाई फु बघताना येईल..
अजून यादी आहे. परत कधीतरी लिहीन...
- Log in or register to post comments
स
सुहास..
Tue, 01/04/2011 - 20:03
नवीन
वरील प्रतिसाद वाचुन ठार झालेलो आहे याची नोंद घ्यावी मिस खादाड माउ !!
माझे काही अतिआवडते चित्रपट
१) माहेरची साडी
का आवडतो? यातली रडारड पाहून आपले फार चांगले चालले आहे असे वाटते. जेव्हा जेव्हा कधी दु:खाचे प्रसंग येतील तेव्हा हा पहा..म्हणजे आपले दु:ख थोडे हलके होते.
अरारारारारारा !!
_/\_
त्या मनोहरकांकाच्या डोक्यात तिडीक जाइल ना !!
आत बाकीच जिवंत झाल्यावर........
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »