मराठी चित्रपट - एकंदरीत साधकबाधक चर्चा..
💬 प्रतिसाद
(107)
फ
फारएन्ड
Wed, 01/05/2011 - 03:47
नवीन
बरीच नावे मिळाली.
यात हे तीन घ्या.
१. एक कप च्या (सुहास ने वरती दिला आहे हे आत्ता नंतर दिसले)
२. वासुदेव बळवंत फडके
३. घराबाहेर (१९९९ मधे आलेला, मोहन जोशी, सोनाली कुलकर्णी, सुहास जोशी, सचिन खेडकर यांच्या भूमिका असलेला चित्रपट. एक मतदारसंघ स्त्रियांसाठी राखीव होतो आणि तेथील आमदार (की खासदार लक्षात नाही) आपल्या मुलीला उभी करून निवडून आणतो. मग ती केवळ कठपुतळी न राहता स्वतःचा प्रभाव कसा पाडते वगैरे).
लालबाग-परळ सुद्धा चांगला आहे.
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 01/05/2011 - 14:02
नवीन
घराबाहेर मध्ये प्रशांत दामलेंचे काम पहिले आणि वाटले की का हा माणूस स्वतःला विनोदी साच्यात अडकवून बसला आहे? सचिन खेडेकर त्याच्या कानाखाली मारतो त्यानंतरचे त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव तर मस्तच.
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Wed, 01/05/2011 - 16:15
नवीन
आतापर्यंत उल्लेखिलेल्या बहुतांश"चांगल्या मराठी" चित्रपटांचे विषय हे पिटातल्या पब्लिकच्या डोक्यावरुन जाणारे आहेत.
अश्या चित्रपटांचा फक्त घरी पाहुनच आस्वाद घेता येऊ शकतो.
आणि बर्याचदा अश्या चित्रपटात प्रतिकात्मकतेचा अट्टाहास (दिग्दर्शनाच्या नावाखाली) घातलेला दिसुन येतो.
अशोक सराफचा "वजीर" असाच डोक्यात गेला होता.
"नॉट ओन्ली मिसेस राऊत" मधला तुषार दळवी तर कुठल्याश्या कादंबरीतील वाक्य जशीच्या तशी बोलतोय का काय असे वाटले.
दादा कोंडके आणि लक्ष्मीकांत बेर्डे-अशोक सराफ जसे लॉयल फॅन फॉलोइंग होते तसे सध्या कुठल्याही मराठी कलाकाराला नाही.त्यामुळे हिंदी अथवा दाक्षिणात्य चित्रपट जसे केवळ कलाकाराच्या जोरावर चालु शकतात तसा प्रकार मराठीत सध्या तरी होताना दिसत नाही.
"सामना" काही दिवसांपूर्वीच युट्युबवरुन पाहीला.आणि तरीदेखील चित्रपटाचा इम्पॅक्ट जाणवला.असे चित्रपट नेहेमी नेहेमी बनणे मुश्किलच.
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 01/06/2011 - 16:34
नवीन
१०० प्रतिक्रीया झाल्या आहेत. पण बहुतांशी प्रतिक्रीया या सिमीत (Limited) वाटल्या. एकतर निराशेचा सुर किंवा टिंगलीचा सूर. काहिंनी थोड्या मोजक्या सिनेमांची उदाहरणे दिली आहेत ती पुरेशी नाहीत.
एक गोष्ट मान्य करावे लागेल मराठी सिनेमा तमाशापट, (टुकार) इनोदी सिनेमांच्या लाटे बाहेर आला आहे आणि नक्कीच वेगवेगळे विषय हाताळले जातात. मागील काळात सामना, उंबरठा, जैत रे जैत इत्यादी सिनेमे आले. पण त्यांची संख्या मोजकीच होती. आता एक नजर पुढील यादीवर टाकू.
ध्यासपर्व, श्वास, वजीर, सरकारनामा, तू तिथे मी, बनगर वाडी, गोजिरी, सातच्या आत घरात, श्वास, नितळ, सनई चौघडे, विहीर, रीटा,गोष्ट छोटी डोंगराएवढी, कायद्याचे बोला, नटरंग, टिंग्या, जोगवा, डोम्बिवली फास्ट, वळू, वासुदेव बळवंत फडके, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुंबई-पुणे-मुंबई, मी सिंधुताई सपकाळ, गाभ्रीचा पाउस, गैर, गोष्ट छोटी डोंगराएवढी, हरिश्चंद्राची फॅक्टरी इत्यादी हे अलिकडच्या काळातले काही चित्रपट.
सगळे चित्रपट उत्तम आहेत असा दावा नाही. पण सर्वात महत्वाची गोष्ट वेगवेगळे विषय हाताळण्याचे धाडस निर्माते/ दिग्दर्शक दाखवत आहेत. दुर्दैवाने त्याबद्दल कोणिही लिहीलेले आढळेले नाही.
मराठी चित्रपटसृष्टीची वाटचाल नक्कीच वेगळ्या वाटेवर चालली आहे आणि हे आशादायक चित्र आहे हे मान्य करायला हवे.
(जाताजाता-शतकपुर्ती साठी धागाकर्त्याचे अभीनंदन)
- Log in or register to post comments
स
सखी
गुरुवार, 01/06/2011 - 17:11
नवीन
चांगला आढावा घेतला आहे. अजुन एक मी आधी विसरले होते. अनाहत - अमोल पालेकरांनी दिग्दर्शित केलेला आणि सोनाली बेंद्रेचा पहीला मराठी चित्रपट. तिचा अभिनय ठिकठाक म्हणता येइल, पण ती दिसते चांगली यात आणि ते जुन्या काळचे वातावरण, राजे-रजवाडे दिग्दर्शकाने चांगले जमवुन आणले आहे.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
गुरुवार, 01/06/2011 - 17:40
नवीन
श्री.चिंतामणी...
मीदेखील हे १००+ प्रतिसाद मनापासून वाचले आहेत, पण तुम्ही म्हणता तसा निराशेचा सूर असेल काही प्रतिसादात, पण त्याच्या तुलनेने टिंगलीची लहर प्रकर्षाने जाणवली नाही. हेही मान्य की तमाशा आणि टुकार विनोदी चित्रपटाच्या गर्तेतून मराठी चित्रपट बाहेर येऊन अगदी जागतिक पातळीपर्यंत पोहोचण्याची स्वप्ने पाहात आहे. पण खरी अडचण आहे व जी अद्यापि सुटू शकलेली नाही ती म्हणजे वितरणव्यवस्था. आज इंटरनेटमुळे सारे जग कीबोर्डच्या एका स्ट्रोकने जवळ आले आहे, मी अत्यंत दूर अशा खेडेगावात राहूनदेखील जगातील कित्येक देशातील नेटर्सबरोबर या विषयावर संवाद साधून त्याना 'मराठी चित्रपटाने मारलेली भरारी' बद्दल तासनतास सांगू शकतो, जेणेकरून त्यानाही इथल्या प्रगतीबाबत कुतहूल वाटेल....पण हे केव्हा घडेल?? तर मी स्वतः तुम्ही प्रतिसादात दिलेले चित्रपट पाहिले तर...! पाहिले आहेत का? तर उत्तर आहे...."नाही"....हे निराशजनक असेल (नव्हे आहेच...) तर याला जबाबदार परत त्या निर्मात्याचीच. कारण मी काही मुंबई-पुणे इथे येऊन तर मराठीने चित्रपट सादरीकरणात केलेली प्रगती पाहू शकत नाही. टीव्हीवर माझा विश्वास नाही. चित्रपट भावायचा असेल तर तो शांतपणे थिएटरमध्ये जाऊन पाहिला तरच ते शक्य आहे...अन्यथा ईडियट बॉक्सवर दर पाच मिनिटांनी धो-धो कोसळणारा तो जाहिरातींचा पूर पाहून डोळे आणि मन विटून जाते...कसा भावेल कितीही चांगला असला तरी तो चित्रपट !!
मी चित्रपट प्रेमी आहे....अन् या विषयावर तासनतास लिहू बोलू शकतो, पण आता तुमच्या यादीतील शीर्षकांवर नजर टाकली असता मला जाणवले की, नियमित थिएटरमध्ये मी यातील 'नटरंग' आणि 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हे दोनच चित्रपट पाहिले आणि तेही सार्या महाराष्ट्रात डंका मारला म्हणून इथे कोल्हापुरात प्रदर्शित झाले. बाकीपैकी 'श्वास' आणि 'विहीर' फिल्म क्लबतर्फे छोट्या थिएटरात ....आता राहिलेल्या यादीतील बाकीचे सर्व म्हणजे सुमारे ८०% चित्रपटांनी माझ्या शहराचा नाकाही पाहिला नाही.
"फॅक्टरी..." फार बोलबाला झाला म्हणून अगदी नाईलजास्तव झी टॉकिजवर पाहात बसलो...पण मन रमले नाही...त्यामुळे त्याबाबत जे बोलले/लिहिले गेले त्यावरूनच त्याच्या दर्जाची अटकळ बांधणे क्रमप्राप्त आहे.
असे जर असेल तर इथे संस्थळावर चर्चा करताना 'निराशेचा' जो सूर येत राहील त्याला जबाबदार निर्मातेच आहेत असे मी म्हणेन.
इन्द्रा
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 01/06/2011 - 17:52
नवीन
आता राहिलेल्या यादीतील बाकीचे सर्व म्हणजे सुमारे ८०% चित्रपटांनी माझ्या शहराचा नाकाही पाहिला नाही.
अशी अवस्था असेल तर बोलणेच खुंटले.
हे चित्रपट सर्वत्र पोहोचत नसतील तर दुर्दैव आहे.
परंतु मी म्हणलो आहे की विषयात विविधता येउ लागली आहे हा मुद्दा बाद होत नाही. मी विविधतेबद्दल बोललो आहे. सगळेच चित्रपत उत्त्म आहेत असे नाही म्हणालो. मी आशा व्यक्त केली की मराठी चित्रपटसृष्टी चांगल्या वाटेवर आहे आणि उत्तम होईल.
अजून एक आशा व्यक्त करतो की हे सगळे चांगले चित्रपट मराठी सिनेमांचे माहेरघर असलेल्या कोल्हापुरातसुध्दा प्रदर्शीत होतील.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3