Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाना पाटेकर

ह
हुप्प्या यांनी
Mon, 01/10/2011 - 01:05  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
18135 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

र
रेवती Mon, 01/10/2011 - 01:20 नवीन
नाना पाटेकरांचा अभिनय आवडतो म्हणण्यापेक्षा मला त्या माणसाची भीती वाटते असे म्हणायला हवे. मी आणि माझ्या नणदेनी चुकून 'अग्नीसाक्षी' पाहिला आणि मी त त प प करत थेट्रातून घरी आले होते ते आठवले. त्यांच्या समाजसेवेबद्दलही बरच ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
म
महेश-मया Mon, 01/10/2011 - 06:01 नवीन
जर तुम्हि नाना पाटेकरांची निखील वागले बरोबरची मुलाखत पाहीली असती तर तुमचे मत बदल्ले असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ट
टारझन Mon, 01/10/2011 - 08:15 नवीन
अग्निसाक्षी पाहिल्या नंतर मी सुद्धा नाना ला बरेच वर्ष घाबरत होतो. त्यानंतर तो मधु बरोबर आलेला एक चित्रपट होता ... यशवंत लोहार नावाची रुपरेखा असलेला. णाणा पाटेकर केवळ अप्रतिम कलाकार आहे. त्याने केलेला एक मराठी चित्रपट ही आहे. तो पाहुन देखील मी घाबरलो होतो . त्यात बहुतेक हिरोईन ओढ्याकडे शौचास जात असतांना नाना तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा ट्राय करतो परंतु हिरॉइनचा कुत्रा तिला ऐन वेळी वाचवतो. अवांतर : त्या मराठी हिरॉइन ला पाहुन णाणा पाटेकरची लैंगिक इच्छा एवढी प्रबळ झालेली पाहुन तो मला लिंगपिसाट देखील वाटला होता. नाना पाटेकर यांज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. - पापा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश-मया
न
नन्दादीप Mon, 01/10/2011 - 10:48 नवीन
>>>>>>अवांतर : त्या मराठी हिरॉइन ला पाहुन णाणा पाटेकरची लैंगिक इच्छा एवढी प्रबळ झालेली पाहुन तो मला लिंगपिसाट देखील वाटला होता. काय भयानक अवांतर आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सुहास.. Mon, 01/10/2011 - 10:56 नवीन
अग्निसाक्षी पाहिल्या नंतर मी सुद्धा नाना ला बरेच वर्ष घाबरत होतो >>> अग्निसाक्षी पाहिल्या नंतर मी बरीच वर्षे मनीषा कोईराला ला घाबरत होतो . काय ' थर्ड रेटेड ' अभिनय. असो .. नाना म्हटल्यावर मला एकच आठवत . ते म्हणजे त्याच नाटक ' पुरुष ' आणि दुसरा त्याने उभा केलेला. ' जक्कल ' बेक्कार !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Mon, 01/10/2011 - 11:01 नवीन
मनिषा कोईराला ... बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या. तिचा सिनेमा पाहुन आमच्या एका बालमित्राची बाटली फुटली होती ... त्यानंतर आम्ही बरेच दिवस त्याला लै चिडवत होतो :) तात्यांचे मनिषा कोईराला विषयक विचार वाचण्यास उसुक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
न
नन्दादीप Mon, 01/10/2011 - 11:15 नवीन
आले....टारझन भाऊ फारमात आले.....काय भयानक, भन्नाट, जबरा, खतरी प्रतिसाद देता हो तुम्ही.. >>>(तिचा सिनेमा पाहुन आमच्या एका बालमित्राची बाटली फुटली होती ... ) ह. ह. पु. वा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
श
शुचि Mon, 01/10/2011 - 01:39 नवीन
माझा "एकमेव" आवडता अभिनेता. इन्टेन्स!!!! इन्टेन्स!!!! इन्टेन्स!!!! इतक्या इन्टेन्सिटी ने कोणी अभिनय करू कसे शकते? त्याचा "प्रहार" फार सुंदर चित्रपट! _______________________________________________ नानाची जयवंत दळवींच्या "पुरुष" नाटकातील गुलाबरावची भूमिका पहायला नाही मिळाली याची खंत वाटते. पण नानाने न्याय दिला असणार याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Mon, 01/10/2011 - 05:53 नवीन
सहमत. एकमेव नाही पण प्रचंड आवडतो. प्रहार असो, टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह असो, अब तक छप्पन असो की माफीचा साक्षीदार... नानाचा अभिनय अगदी खणखणीत! बाकी तो साठ चा झाला तरी 'तो नाना' असंच म्हणावसं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
R
ramjya Mon, 01/10/2011 - 13:38 नवीन
मला सुद्धा प्रहार आवडला होता.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
व
वेताळ Tue, 01/11/2011 - 05:46 नवीन
डासामुळे माणसाचे तृतियपंथी मध्ये रुपातंर होते हा त्याचा शोध मागच्या शतकातील सर्वोत्तम शोध म्हणुन गणला गेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
ट
टारझन Tue, 01/11/2011 - 05:54 नवीन
नाना पाटेकर ह्या शास्त्रज्ञाच्या " (ब्रदर इन लॉ) वन मॉस्किटो थेरी ऑफ जेंडर ट्रान्स्फॉर्मेशन" नुसार मला सगळे कव्वाल , आरती म्हणणारे , सभागृहात एखाद्याचं भाषण ऐकल्यावर प्रोत्साहन देणारे लोक तृतियपंथी वाटायला लागले होते. - ट्युटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
स
संजय अभ्यंकर Tue, 01/11/2011 - 15:59 नवीन
" (ब्रदर इन लॉ) वन मॉस्किटो थेरी ऑफ जेंडर ट्रान्स्फॉर्मेशन" ह.ह.पु.वा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
श
शिल्पा ब Mon, 01/10/2011 - 01:34 नवीन
मला आवडतो नाना पाटेकर हा अभिनेता. एकदम जबर्दस्त माणुस...वाटत नाही साठीचा.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 01/10/2011 - 03:57 नवीन
नाना पाटेकर आपली मते स्पष्ट मांडतो त्यामुळे मते पटो वा न पटो पण तो आम्हाला आवडतो.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 01/10/2011 - 04:19 नवीन
मराठी मधला नानाचा एक ठळक चित्रपट म्हणजे 'माफीचा साक्षीदार'. जोशी-अभ्यंकर खून खटला या त्याकाळी पुण्यात गाजलेल्या प्रकरणावर आधारीत हा चित्रपट होता. यात नानाने प्रमुख खलनायकाची-विकृत खुन्याची भूमिका केली होती. यात त्याची देहबोली, डोळ्यातील क्रूरता फारच प्रभावीपणे दर्शवली होती. मराठीमधील त्याचा अजून एक चित्रपट म्हणजे 'पक पक पकाक' 'भालू' मध्येही त्याची खलनायकी भूमिका होती.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 01/10/2011 - 15:17 नवीन
मला देखील नाना पाटेकरांचे ’पक पक पकाक पक’मधील काम अतीशय आवडले होते! पण अगदी वेगळा नाना पाटेकर पहाचा असेल तर "महासागर" आणि "हमीदाबाईची कोठी" ही नाटके पहायला हवीत. दोन्हीतील त्याला मिळालेल्या व्यक्तिरेखा अगदी आगळ्या-वेगळ्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
व
विंजिनेर Mon, 01/10/2011 - 04:29 नवीन
नाना एक विक्षिप्त आणि सच्चा अभिनेता आहे. त्याच्यावर बर्‍याच वर्षांपूर्वी किस्त्रीमच्या दिवाळी अंकात "तिच्यायला तिच्या नानाच्या...." ह्या टायटलची एक प्रदीर्घ मुलाखत वाचली होती. मला वाटतं त्याची शिवीगाळ आणि विक्षिप्तपणा इतर नट/नट्यांच्या सोज्वळपणा आणि साधेपणावर (म्हंजे त्याच प्रकारची लफडी वगैरे) उठून दिसते - पत्रकारितेच्या भाषेत "इट मेक्स अ गुड कॉपी".
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 01/10/2011 - 06:05 नवीन
पंधराएक वर्षांपूर्वी नानामधे तोच तोच पणा खूप आला होता. (आक्रस्ताळेपणा, थयथयाट, कपाळ बडवणे, अण्णा अण्णा, ये हिंदू..ये मुसलमान्..किसका खून कौनसा,.. किडे मकोडों की तरह बच्चे पैदा करो, कीडे मकोडोंकी तरह मर जाओ.. अशा टाईपचा अँग्री अभिनय कंटाळा येईपर्यंत रिपीट व्हायला लागला होता) पण नंतर त्याची दखल घेऊन म्हणा किंवा काहीही असो.. त्याने स्वतःत एकदम बदल करुन जी विविधतेची "रेंज" दाखवली त्याचे नाव तेच.. नवीन कॉमेडीरुपात (वेलकम, टॅक्सी#९२११ इ इ) तर तो खूपच धमाल दिसतो.
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Mon, 01/10/2011 - 06:20 नवीन
नानासमोर हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व स्तरावरील दिग्गज ज्या आदराने वागतात ते पाहिल्यावर व्ही.शांताराम, 'लता मंगेशकर, आशा भोसले' यांच्यानंतर खर्‍या अर्थाने 'नाना पाटेकर' हाच महाराष्ट्रीयन कलाकार असेच चित्र नजरेसमोर येते. इतके यश पदरी असूनही नानांचे (साठीला पोचले असल्याने आदरार्थी लिहिणे भाग आहे....अन्यथा कुणालाही पटणार नाही ते वयाच्या या मुक्कामाला आले आहेत) पाय मात्र घट्ट जमिनीवर आहेच. मागील महिन्यात 'तन्वीर पुरस्कार'च्या वेळी केलेल्या त्यांच्या भाषणात स्वभावातील नम्रपणा फार उठून दिसला. डॉ.श्रीराम लागू आणि सुलभा देशपांडे यांच्या संदर्भात ज्या भाषेत त्यानी कृतज्ञता व्यक्त केली [तसेच आणखीन एक 'तन्वीर पुरस्कार' विजेती वीणा जामकर या नवोदित अभिनेत्रीचे भाषण.....पण तो वेगळा विषय आहे]..... ती पाहता पडद्यावरील 'नाना' आणि स्टेजवरील नाना यात जमीनअस्मानाचा फरक जाणवतो. "माझे बी.पी. मी ८० ते १२० मध्ये कायम ठेवतो....समाजातील असंतोषाबाबत माझ्या मनी जी घुसमट आहे ती खरे तर तुमचीच आहे, मी फक्त प्रतिनिधीत्व करतो..." अशी वाक्ये असोत वा नाट्यसृष्टीबद्दलची कृतज्ञता असो, नानां किती कसलेले वक्तृत्वपटू आहेत हे जाणवले. वर मराठी चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाबद्दल एक मुद्दा आहे. पण आता ते डॉ.श्रीराम लागू यानी अजरामर केलेल्या "नटसम्राट" च्या भूमिकेतून पडद्यावर येत आहेत....या चित्रपटाविषयी आणि त्यातील नाना पाटेकर यांची मध्यवर्ती भूमिका याबद्दल औत्स्युक्य राहिल. नाना पाटेकर याना दीर्घायुरारोग्य लाभो. इन्द्रा
  • Log in or register to post comments
व
विलासराव Mon, 01/10/2011 - 06:33 नवीन
विसरलात की काय? माझा आवडता नानाचा चित्रपट.
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Mon, 01/10/2011 - 06:38 नवीन
श्री.विलासराव.... धागाकर्ते श्री.हुप्प्या यानी लिहिलेच आहे की, "हिंदी सिनेमात अनेक भूमिका आठवत आहेत पण मराठी सिनेमातील फारशा आठवत नाहीत....." ~ त्यामुळे नानांच्या फक्त 'मराठी' चित्रपटाबद्दलच त्याना प्रतिसाद अभिप्रेत असावेत. ... आणि होय, तुम्ही म्हणता तसे 'परिंदा' कोण विसरेल? इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
प
पाषाणभेद Mon, 01/10/2011 - 09:19 नवीन
अंकूश मधला रवी कोण विसरेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
अ
अप्पा जोगळेकर Mon, 01/10/2011 - 15:04 नवीन
त्याच्यात तो डोक्यावर थापट्या मारुन घेतो तेंव्हा एकदम खतरा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव
श
श्रावण मोडक Mon, 01/10/2011 - 06:58 नवीन
हे कणेकर काय लिहितात: "ना तो अमिताभपुढे (कोहराम) कमी पडला ना राजकुमारपुढे (तिरंगा), ना ऋषी कपूरपुढे (हम दोनो) कमी पडला ना अनिल कपूरपुढे (वेलकम), ना अजय देवगणपुढे (अपहरण) कमी पडला ना जॅकी श्रॉफपुढे (अग्नीसाक्षी). मग अतुल अग्निहोत्रीपुढे (यशवंत) काय कमी पडणार?" नानाची तुलना अमिताभशी समजू शकतो. एकवेळ राजकुमारही समजू शकू. पण ऋषी कपूर, अनिल कपूर, अजय देवगण, जॅकी श्रॉफ ते अगदी अतुल अग्निहोत्री? अगागागागागा... या असल्या लिंका नका देत जाऊ राव नाना, सचिन, आशाताई अशा व्यक्तींविषयी.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 01/10/2011 - 07:02 नवीन
+०.५ अनिल कपूर वगळून अन्यांबाबतीत अत्यंत सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ह
हुप्प्या Mon, 01/10/2011 - 07:12 नवीन
अहो कणेकर जरा वहावत गेलेत. नानाने किती लोकांसमोर काम केले आहे ते सांगायला गेले आणि भलतेच काही लिहून बसले. ऋषी कपूर, देवगण, राक्षसगण वगैरे मंडळींकडून नानाला कांपिटिशिन होतीच कुठे? कुठे तो ऐरावत आणि कुठे ती शामभट्टाची ....... तसे पाहिले तर व्यक्तीश: मला राजकुमारचा तथाकथित अभिनय हा अत्यंत बावळट प्रकार वाटतो. बर्‍याचदा विनोदीच वाटतो. नानासमोर तोही किस झाड की पत्ती असे माझे स्वच्छ मत आहे. पण कणेकरांच्या लेखातून नानाच्या स्वभाववैशिष्ट्यांची चांगली झलक दिसते. कणेकरांशी त्याची इतकी जवळची ओळख आहे त्यामुळे इतक्या गोष्टी मला तरी नव्याने समजल्या. नानाचे मला आवडलेले हिंदी सिनेमे म्हणजे प्रहार, अब तक छप्पन, गुलाम -ए-मुस्ताफा, अंकुश, प्रतिघात, टॅक्सी नं. ९२११.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
अ
अप्पा जोगळेकर Mon, 01/10/2011 - 15:05 नवीन
अजय देवगणने अपहरण मधे अगदी तोडिस तोड टक्कर दिली आहे नाना पाटेकरांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
र
राजेश घासकडवी Mon, 01/10/2011 - 07:10 नवीन
हे नाटक पाहून इतकी वर्ष झाली तरी त्यातला नाना पाटेकर आठवतोय... खत्रा काम केलं होतं.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 01/10/2011 - 08:06 नवीन
नानाचा अभिनय आवडला होता " ब्लफ मास्टर" मध्ये अगोदर होटेलमालक असतानाचा नेहमीच्या गुर्मीत वागणारा नाना शेवट लेखक आहे असे दाखवताना नानाने बोलण्यात /वागण्यात देहबोलीत केलेला टोकाचा बदल "सलाम ठोकावा " इतका झक्क जमलाय. कणेकरांच्या लेखात लिहीलय तसे "तेजाब" च्या शुटिम्गच्या वेळेस नाही तर परिंदा च्य वेळेस भाजला होता. नानाने कुठल्यतरी चित्रपटात सह अभिनेता असलेल्या राजेश खन्नाला वेळेवर येण्यासाठी दम भरला होता
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Mon, 01/10/2011 - 10:34 नवीन
नानाने कुठल्यतरी चित्रपटात सह अभिनेता असलेल्या राजेश खन्नाला वेळेवर येण्यासाठी दम भरला होता त्या चित्रपटाचे नाव होते आवाम... बी आर चोप्रांचा चित्रपट होता तो.. त्यात मी सुद्धा काम केले होते :) म्हणजे मी सहावीत असताना पनवेलला होतो. तेथील विठोबा खंडाप्पा हायस्कूल मध्ये या चित्रपटाचे थोडे शुटींग झाले होते. त्यातल्या सुरुवातीच्या प्रार्थना म्हणण्याच्या सीन मध्ये मी होतो. आवाम चित्रपट लई भारी होता...फक्त पनवेल मध्येच चालला बहूतेक...त्यात नानाने एका वयस्कर कर्नल की मेजरची भुमिका केली होती आणि राजेश खन्नाने त्याच्या हाताखालील तरूण शिपायाची...हॅ हॅ हॅ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
परिकथेतील राजकुमार Mon, 01/10/2011 - 08:26 नवीन
मला नानाची सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे तो चाहत्यांना देतो त्या प्रत्येक सही साठी पैसे घेतो, आणि जमलेले पैसे आमटेंच्या आश्रमाला देतो :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 01/10/2011 - 08:41 नवीन
रोखठोख नाना आवडतो. जंगलबुकचा बुलंद शेरखान असो वा थोडासा रुमानी हो जाये मधला हळवा नाना. He is the Bestest ;) नानाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
स
स्मिता चावरे Mon, 01/10/2011 - 08:43 नवीन
तो विसरलात का?
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 01/10/2011 - 09:26 नवीन
पकपक पकाक मध्ये अतिश्शय सुंदर काम केलं आहे त्याने!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता चावरे
ड
डावखुरा Mon, 01/10/2011 - 10:55 नवीन
पक पक पकाक ..evergreen hit साळु माझी सोनपरी.. जीवन लई सुंदए हाये..भारी एकदम भारी.. सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
५
५० फक्त Mon, 01/10/2011 - 09:32 नवीन
थोडासा रुमानी हो जाये हा नानांचा आवडलेला चित्रपट. त्यातली एक खुप प्रसिद्ध कविता की गाणं आहे, ते कुणाकडे असेल तर द्या ना. नानांना खुप खुप शुभेच्छा. हर्षद.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 01/10/2011 - 09:40 नवीन
थोडासा रुमानी हो जाये इथे प्रयत्न करुन बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
प
पाषाणभेद Mon, 01/10/2011 - 09:40 नवीन
नाना अन दिप्ती नवलचा एक चित्रपट आहे. ते बहूतेक शेतमजूर दाखवलेले आहेत. कोणता तो चित्रपट? क्लासीकल आहे तो. किंबहूना त्याच्या सगळ्या चित्रपटाचीच यादी देता येईल काय?
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Mon, 01/10/2011 - 09:51 नवीन
त्याची फिल्मोग्राफी आहे इथं विकीपीडियावर. मला वजूद मधला मल्हार गोपालदास अग्निहोत्री खूप भावला होता. कसलेला अभिनय, करारी देहबोली, दर्जेदार संवादफेक, सारं काही उच्चकोटीतलं. त्याचं "कैसे बताऊं मै तुम्हे मेरे लिये तुम कौन हो.." तर निव्वळ अप्रतिम. इतका भावला होता नानाचा तो रोल की त्या चित्रपटात माधुरी असूनदेखील तिच्याकडे लक्षच गेलं नाही! :) आमच्या या लाडक्या नटास साठाव्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
च
चिगो Mon, 01/10/2011 - 15:23 नवीन
हेच म्हणणार होतो.. "वजूद" मधला नाना जबरा आहे.. किंवा त्या पिक्चरमध्ये तोच काय तो बघण्यासारखा आहे... नाना द ग्रेट ला "अब तक साठ" साठी खुप खुप शुभेच्छा... वाढदिवसाच्या शुभेच्छा, नाना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
र
राजा Mon, 01/10/2011 - 10:35 नवीन
सुर्योदय हा नाना अन दिप्ती नवलचा चित्रपट आहे याची आठ्वण होण्याचे कारण म्हणजे खुप वर्षा पुर्वी दुरदर्शन ला दुपारी पहिला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
परिकथेतील राजकुमार Mon, 01/10/2011 - 11:08 नवीन
दुपारी सुर्योदय पाहिल्यावर लक्षात राहणारच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजा
व
विलासराव Tue, 01/11/2011 - 06:43 नवीन
सुर्योदयचं शुटींग हे माझ्या गावी म्हणजे पारनेरला झालेले आहे. जवळपास एक महीना हे काम चालु होते. त्यामुळे नानाला प्रत्यक्ष पहाता आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजा
ब
बाबय Mon, 01/10/2011 - 14:18 नवीन
हा नाना चा च होता का?
  • Log in or register to post comments
म
मराठे Mon, 01/10/2011 - 14:18 नवीन
त्याचं 'खामोशी' मधलं काम पण खरं तर चांगलं होतं.. त्या सिनेमात तर एका बाजूला नाना आणि सीमा बिस्वास तर दुसर्‍या बाजूला मनिषा कोईराला आणि सलमान खान... भन्साळीबाबूंनी काय खाउन स्टारकास्ट जमवलं होतं कोणास ठाऊक ! ... गाणी चांगली होती.. स्टोरी ठिक होती.. नानाचा आणि सीमा विस्वास चा अभिनय मस्त होता पण तरीही सिनेमा दणकून आपटला.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 01/10/2011 - 14:40 नवीन
माझा पण आवडता अभिनेता नाना पाटेकर. नाना पाटेकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा (मिपा स्टाईल नव्हेत, तर खर्‍याखुर्‍या, मनापासून!! - भट
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Mon, 01/10/2011 - 15:20 नवीन
नानांना प्रथम पाहिले ते 'पाहिजे जातीचे' मध्ये. विहंग नायक व त्यांनी अक्षरशः धमाल केली होती त्यात. कणेकरांच्या लेखात त्याचा उल्लेख आहे तो अशा अर्थाने की कुण्यातरी 'शिरीश कणेकर' नाम सदृश्य 'टिकाकारा'ने एका मराठी वर्तमानपत्रात त्यांच्या त्या कामाची (व बहुतेक त्या नाटकाचीच) टिंगल केली होती व नानांना ते आवडले नव्हते. तो टिकाकार कोण असावा ह्याचा अंदाज मी अजून बांधत आहे (उगाच, चाळा म्हणून!). त्याकाळी छबिलदास चळवळीची टिंगल मराठी मुख्य प्रवाहातील संबंधित ('प्रवाहपतित'!) लोकांकडून व्हायची. एकाएकी अरविंद व सुलभा देशपांडेंनी उभारलेल्या ह्या चळव़ळीकडे नाटक ह्या प्रकाराकडे गंभीरपणे पाहणार्‍या अनेक सुजनांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे मुख्य प्रवाहपतितांचा जळफळाट झाला होता. माधव मनोहर व नंतर पुष्पाबाई भावे ह्यांचे सन्माननीय अपवाद सोडले तर तेव्हा मराठी वर्तमानपत्रांतून जी नाटक समिक्षणे येत ती 'दुर्वांची जुडी' इ. (स्थळः दिवाणखाना) छाप नाटकांना अनुरूपच असत. तर हे गृहस्थ, ज्यांना नानांना अगदी मारावेसे वाटले हे कोण असावेत? एकंदरीत शिरीष ह्या नावाशी साधर्म्य असणारे एक तेव्हाचे नाटककार असावेत बहुधा. त्यांचे एक नाटक तेव्हा अफाट चालले होते, व एकंदरीत प्रायोगिक रंगभूमिवर तुच्छतेने काही जाहीर मतप्रदर्शन करण्यास हे तत्पर असत. एकदा टी.व्ही. वर त्यांनी हे अमोल पालेकरांची मुलाखत्र घेतांना केले व ज्याला हिंदीत 'कुल्हाडी पे पाँव रख दिया' असे म्हणतात अशी स्वतःची गत करून घेतली., ते थोडे नंतर ऐशीच्या शतकात. त्या दिवशी वाचले ते हेच असावेत बहुधा! दोनेक वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात 'पाहिजे जातीचे' च्या निर्मीतीवरील सुलभाताईंची मुलाखत आली होती. त्यात अरविंद देशपांडेंनी किती खोल विचार केला होता, व ते कसे बसवले होते ह्याविषयी सुंदर माहिती त्यांनी कथन केली होती. तळमळीने काही जणांनी छबिलदास चळवळ उभारली होती-- देशपांडे पत्रि-पत्नि, तसेच अरूण काकडे, माधव वझे ही त्यातील अग्रगण्य नावे. चळवळ लौकिकार्थाने संपली खरी पण त्यातून बरेच काही चांगले आपणास मिळाले. नाना हे त्यातील एक महत्वाचे लखलखते रत्न!
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 01/11/2011 - 14:55 नवीन
'पाहिजे जातीचे' हे नाटक मी दोनदा बघितले. पहिल्यांदा बघितल्यावरच नाना हा मोठा अभिनेता होणार हे लक्षांत आले होते. त्यात स्वत: अरविंद देशपांडे व सुषमा तेंडुलकर यांनीही अप्रतिम अभिनय केला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
व
विसोबा खेचर Mon, 01/10/2011 - 17:40 नवीन
नान्या साठीचा झाला? फोन करायला पायजेल त्याला..! -- नान्याचा तात्या.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा