Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाना पाटेकर

ह
हुप्प्या
Mon, 01/10/2011 - 01:05
🗣 55 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
18135 वाचन

💬 प्रतिसाद (55)
स
सखी Mon, 01/10/2011 - 18:43 नवीन
नानाची अजुन एक मुलाखत सुधीर गाडगीळांनी घेतलेली सकाळवर पण आहे. यात उल्लेख केल्याप्रमाणे तो खरोखरचं मुलाखत कंटाळवाणी, रटाळ होणार नाही यासाठी प्रयत्न करतो आणि त्याला ते जमतेही. याचा अनुभव मागच्या वर्षीच्या बीएमएम च्या अधिवेशनाला घेतला. जवळजवळ ४-५००० क्षमता असलेल प्रेक्षागृह -बहुतेक लोकं शिस्तीने त्यांच्या तिकींटानुसार बसलेली - साहजिकच प्रेक्षक विखुरलेले, मध्येमध्ये जागा रिकाम्या सोडल्या होत्या. पहील्या मिनिटातच नानाने सगळ्यांना पुढे येऊन बसण्याची विनंती केली, म्हणजे कशा आपल्याला गप्पा मारता येतील असेही म्हणाला. गाडगीळांची येथेच्छ मस्करी केली, अशोक सराफने पडत्या काळात खूप मदत केली, करायचा हे त्याचे ऋण नानाच्या बोलण्यात अगदी जाणवते, ज्या लोकांनी त्याचे पैसे बुडवले त्यांना आता २०-३० वर्षांनंतर मागण्याची धमक मला वाटतं त्याचातच असावी. आनंदवनाबद्दल भरभरुन बोलला (कुठेही आव नाही कि तोसुद्धा नियमितपणे मदत करत असतो). रुमानी मधल्या कविता म्हणुन दाखवुन -त्याचे श्रेय कवि, लेखकालाच दिले कारण ते शब्दच इतके चांगले व एक छान लय असलेले आहेत की त्यात अ‍ॅक्टरला जास्त काही करावे लागत नाही असे त्याचे म्हणणे. हि मुलाखत गुगल व्हिडिओ किंवा युट्युबवर आहे २-३ भागात, ईच्छुकांनी गुगलुन बघावे, हाफीसातुन व्हिडिओ ब्लॉक केलेले आहेत त्यामुळे दुवा देता येत नाही.
  • Log in or register to post comments
उ
उपास Tue, 01/11/2011 - 14:26 नवीन
हो अगदी साठीतही नाना रॉक्सच.. वर म्हटल्याप्रमाणे बीएमएम मधे नाना दिलखुलास बोलला.. तसा तर तो नेहमिच बोलतो.. अगदी अलिकडच्या लागूंच्या कार्यक्रमातही.. थेट माणूस आहे.. वरती त्याच्या कारकीर्दीतले बरेच चित्रपट लिहीलेत.. त्यातलं त्याचं अजून एक आवडलेलं काम म्हणजे प्रतिघातमध्ये त्याने वेड्याचं केलेलं.. अतिशय आक्रमक भूमिका करण्यात त्याचा हात धरणार सद्ध्या कोणी नाही.. त्याची संवादफेक अफलातून आहे.. अर्थात त्याची मेहनत त्यामागे आहेच आणि आत्मविश्वासही.. मराठी माणसाचा इगो सुखावणारं काही तरी त्याच्या भूमिकेत मला नेहमी दिसत आलय... नाना परवा म्हणाला.. भ्रष्ट राजकारण्यांची चीड येते , अगदी पोटतिडकीनं बोलत होता.. घुसमट होते, गोळीनेच उडवलं पाहिजे वगैरे वगैरे.. अगदी सामान्य माणसाच्या मनातलच.. त्याच आनंदवनाशी असलेलं नातं, त्याच गणपतीत बेभान होऊन नाचंण आणि हा सामान्य माणसाशी सततचा संवाद.. एक माणूस म्हणून त्याला प्रगल्भ बनवतोच.. माझ्या तर मनात येतं, की जर साऊथ मधले हिरो, आपली प्रसिद्धि एन कॅश करत राजकारणात येतात्,तसं नानाने करायला काय हरकत आहे.. लोहा लोहे को काटता है.. नाना खरच सगळं हलवून टाकेल.. असो.. त्याने काय करावं हा त्याचा प्रश्न पण त्यानेच आपल्याला सवय लावलेय की, त्याला वेगवेगळ्या भूमिकेत बघत तोंडात बोटं घालायची.. थोडक्यात, नाना म्हणजे चोख काम, अजून काय सांगायच!
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Tue, 01/11/2011 - 13:14 नवीन
मध्ये मध्ये त्याने काही आक्रस्ताळी भूमिकांमधून तोच तोचपणा आणला होता. तरी तो मला त्याच्या अभिनयासाठी नक्कीच आवडतो. त्याच्या चांगल्या भूमिकांबद्दल वरती लिहिले गेले आहेच. मला आवडलेली त्याच्या मुलाखतीची एक लिंकः इथं तो थोडासा रूमानी हो जाए मधला एक संवाद म्हणतो, एक कविता म्हणतो आणि माधुरीसाठीचा असलेला वजूदमधला एक डॉयलॉगही आहे. हे संवाद पाठ न करता लक्षात कसे राहातात हे तो सहजसुंदरपणे सांगून जातो!!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 01/11/2011 - 14:51 नवीन
नाना पाटेकरचा मी फुल स्पीड पंखा आहे... :) कधी कधी जेव्हा माझं टाळकं सटकत किंवा मी कोणावर तरी खसकतो,,, तेव्हा मी म्हणतो माझ्यातला नाना पाटेकर जागा झाला !!! ;) बाकी त्याचे डायलॉग लयं भारी असतात हे काय मी येगळं सांगाया नको काय ? ;) त्याचा मला सर्वात आवडलेला चित्रपट म्हणजे... अर्थातच प्रहार. :) जरा हा सीन पहाच :--- बाकी नाना पाटेकर माझ्या सारखाच बाप्पाचा भक्त हाय... :) त्याच्याकडे गणपतीच्या वेळी केली जाणारी फुलांची सजावट लयं भारी असते... अवांतर :--- साला एक मच्छर !!! ;) एक मच्छर, साला एक मच्छर, आदमी को हिजड़ा बना देता है. एक खटमल पूरी रात को अपाहिज कर देता है. सुबह घर से निकलो, भीड़ का हिस्सा बनो. शाम को घर जाओ, दारू पिओ, बच्चे पैदा करो और सुबह तलक फिर एकबार मर जाओ. क्योंकि आत्मा और अंदर का इंसान मर चुका है, जीने के लिए घिनौने समझौते कर चुका है. साला, एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. ऊंची दुकान, फीका पकवान, खद्दर की लंगोटी, चांदी का पिकदान. सौ में से अस्सी बेईमान, फिर भी मेरा देश महान. टोपी लगाए मच्छर कहता है, देश की लोगों में समता की भावना आ रही है. इसलिए तो बड़ी मछली छोटी को खा रही है. हमारे चुने हुए कुत्ते हमें काटते है, हमारी ही बोटियां आपस में बांटते हैं. अमानुष गंध से भरी इनकी आवाज से कांपते हैं. कल पैदा हुए बच्चे एक सांस लेते हुए हांफते हैं. शैतानों की नाजायज औलाद तहलका मचा रही है और हम भगवान के चहेते जानवर इंसान, जीवन को गाली बनाए बैंठे हैं. क्या करें, साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. गिरो सालों, गिरो, गिरो, लेकिन गिरो तो उस झरने की तरह तो अपनी सुंदरता खोने नहीं देता. जमीन के तह से भी मिलकर अपना अस्तित्व नष्ट नहीं होने देता. लेकिन इतना सोचने के लिए, वक्त है किसके पास. क्योंकि साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. मंदिर-मस्जिद की लड़ाई में मर गए लाखों इंसान. धर्म और मजहब के नाम पर हो गए लाखों कुर्बान. जिसने अन्याय के विरोध में बाली को मारा, रावण को मौत के घात उतारा. पुण्य को पाप से उबारा आज मुझे उस राम की तलाश है. लेकिन मुझे लगता है कि इस युग के राम को आजीवन वनवास है, क्या करें, क्योंकि साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. कभी शैतान आएंगे, मेरे दरवाजे पर दस्तक देंगे. मेरे जेहन की तलाशी लेंगे, फिर चल उठेंगे. उस वक्त मैं डरूंगा नहीं. अपने विश्वास को ढाल, अंदर की आग को तलवार बनाऊंगा. एक न एक दिन तो तुम उस आग में कूदोगे. करो, आज में बदनाम करो, नीलाम करो. निलामी के लिए क्या है मेरे पास. छलके हुए आंसुओं का एहसास. मगर, मगर मैं तुम्हें बदला लूंगा. तेरी आखिरी गोली पर, मेरे दो सांसों के बीच का ठहराव, तुम्हें फोकट में दूंगा
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/11/2011 - 16:11 नवीन
नाना पाटेकर यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा