संध्याकाळी पाणवठ्यावर जाता यावे म्हणुन.
खरे सांगायचे तर ह्या प्रश्नावर मिपा सदस्य श्री. स्पा ह्यांच्याशिवाय अधिक अधिकारवाणीने कोणी बोलु शकेल असे वाटत नाही. त्यांच्या प्रतिसादाची वाट बघत आहे.
जन्म होतो जो आपल्या हातात नसतो. पुढे रासायनिक प्रक्रिया जो पर्यंत थांबत नाहित तो पर्यंत मरण येत नाही. मधला काळ मग समय विमोचनात घालवतो ज्या ला आपण जगणे म्हणतो.
"जगतो म्हणजे काय ?
या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय
"का जगतो?"
हे सांगणं. नुसता विचारही करणं अवघड आहे.
"साठी" आणि "मुळे" हे दोन गंमतीदार शब्द आहेत. पूर्ण विरुद्ध.
कशासाठी जगतो की कशामुळे जगतो हे आधी ठरवलं पाहिजे. (म्हणजे, काहीतरी व्हायचे/करायचे म्हणून जगतो, की काहीतरी झाले/केले म्हणून जगतो..)
गहन आहे विषय. (फिलॉसॉफिकल स्माईली)
>>तर मंडळी, आपण का जगतो? तुमचे काय मत?
जगण्याची 'खाज' आहे म्हणुन जगतो, जगणे 'आवडते' म्हणुन जगतो.
बाकी ह्याशिवाय इतर कारणे देणे महत्वाचे वाटत नाही, असो.
- छोटा डॉन
जगने हे साध्य नाही साधन आहे.
वेगवेगळ्या इच्छा, हेतु पुर्न कराय्चे.
कधी आनन्द स्वतःला मिळवनयासाठी,
तर कधी जवळच्याना देन्यासाठी आहे ,
कधी गरजा पुर्न करन्यासाठी,
काही मिळवन्यासाठी,
अनि
कधी तरी वरुन बोलावने येत नाहित म्हनुन.
मी म्हनाले ते अगदी खरे नसेल हि
पन मला असे वाटते.
>>आपण म्हणजे कोण?
:) अवलियाकाका, बोला आता.
होऊन जाऊ द्या तुमचा आणि थत्तेचाचांचा सामना.
बाकी नशिबाने मिळालेला असा 'हाफवॉली' थत्तेचाचा वाया घालवतील असे आम्हाला वाटत नाही ;)
चर्चा वाचतो आहे.
- (अवलियाकाका आणि थत्तेचाचांचा फॅन)छोटा डॉन
>>>आपण म्हणजे कोण?
अतिशय उत्तम प्रश्न. आपण हा स्वतःला निर्देशित करण्यासाठी वापरलेला शब्द आहे. स्वतः या अर्थाने जसा मी स्वतः बोललो. तू स्वतः बोलला. तो स्वतः बोलला. ती स्वतः बोलली. या वाक्यांमधे स्वतः याअर्थाने निर्देशित होणारे चैतन्य जे देहरुपाने कार्यमग्न असते ते आपण याअर्थाने अपेक्षित असुन सध्या आपण या शब्दाचा परिघ केवळ मानववंशापुरता मर्यादीत आहे. कारण इतर प्राणीवंश जे स्वतः या अंशाने प्रतिबिंबित होऊ शकतात परंतु भाषेच्या अभावामुळे त्यांच्या अनुभव/जाणीवांची कल्पना किमान मला तरी नाही. सबब आपण या शब्दाचा अर्थ प्रत्येक मानवी जीव असा घ्यावा.
मी प्रेमा साठी जगतो आणि जगण्यासाठी प्रेम करतो... ;)
अवांतर :--- श्री श्री श्री अवलिया उर्फ नाना उर्फ नानुडी... आपल्याला सुस्पष्ट उत्तर मिळालेच आणि खात्री पटली तर आम्हालाही कळवा... कसे ? ;)
(लव्हर बॉय) ;)
चिन्ता चिता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशेषतः |
सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ||
या संस्कृत सुभाषिताचा अर्थ असा आहे : चिन्ता आणि चिता सारखी आहे फरक फक्त अनुस्वाराचा. चिन्ता जिवंत माणसाला जाळते तर चिता जीव निघून गेल्यावर जाळते. याच अनुषंगाने "मी का जगतो?" आणि "मी का जगलो?" असा केवळ एका शब्दाच्या बदलाने प्रश्न स्वतःलाच विचारला तर माझ्यापुरते मी म्हणू शकेन की "मी अनुभव घेण्यासाठी जगतो". जगण्याचे कारण शोधण्याची विचारक्षमता ईश्वराने [अर्थात या विश्वाची निर्मिती 'देव' नावाच्या कुणीतरी अज्ञाताने केली यावर विश्वास असेल तरच] माणसाला जन्मजातच दिली असल्याने ज्याचा त्याने आपल्या वाटेला आलेल्या खात्यावरील जमाखर्चाचा लेखाजोगा तपासून 'जगण्या' चे वल्हे कसे हाताळावे हे ठरवून आपले तारू अनुभवाच्या विशाल दर्यात न्यावे. या अखंड प्रवासातील संचित धन हेच त्याला जीवनाविषयी उभारी देण्यास कारणीभूत होत असल्याने ते मिळविण्यासाठी तरी त्याने "जगले" (च) पाहिजे; अन्यथा मानव आणि पशू यात फरकच राहणार नाही.
निसर्गाने माझ्यासाठी H2O आणि O2 चा पुरेशा प्रमाणात साठा करून ठेवला असला तरी त्यामुळे मी जगू शकेन हे खरे पण त्या जगण्याला जर 'जगणे' म्हणत असेल तर ते एखादी वनस्पतीही सहजगत्या करू शकते. पण 'जगण्याची तृष्णा' फार विलोभनीय आहे ही गोष्ट संतमंडळीही नाकारू शकत नाहीत. कोणतीही कारणमीमांसा द्या वा उपमा लावा....थोरांचे प्रेम, पत्नी प्रेम, अपत्य वात्सल्य, मित्र प्रेम...पण शेवटी उरते ते हेच सार की दिवसभराचे आपले सारे झगडणे अखेरीस जगण्याची उर्मी आणि त्याबद्दलची रत्तीभरही कमी न होणारी तृष्णा हेच होय. "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" हे दाखल्यापुरते ठीक आहे, पण या संज्ञेची रचना करणाराही जगण्याच्या तृष्णेपायी खाटल्यावरून हमखास उठला असणारच आणि मग त्याबाबतच्या शोधउत्खननाचीही गरज नाही इतके ते प्रखर आहे. नैराश्येपोटी आत्महत्येचे विचार मनी बाळगणारा रावसाहेब त्याच रात्री आमटीत आमसुल ज्यादा पडले म्हणून बायकोवर वस्स्कन ओरडतो, ते ह्याच कारणासाठी की जगण्यावरचे त्याचे प्रेम रत्तीभरही कमी झालेले नाही.
'कास्ट अवे' मधील फेडेक्सचा एक्झेक्युटिव्ह चक नोलँड चार वर्षे एकांतवासात त्या अज्ञात बेटावर अटळपणे राहतो...पण "जगतो"....आपण 'मेलेलो नाही म्हणून जगलो आहोत" असे चुकूनही त्याच्या मनी येत नाही. उलटपक्षी 'अरे, हा तर एक अनुभव आहे, जगण्याचा....आणि मी जगून दाखविनच, पाहतो कोण मला अडवे तो !"
चक आणि बेटावरील त्याच्या कल्पनेतील सखा "विल्सन" हे जगण्याच्या अनुभवाचे प्रतीक आहेत. मनुष्यप्राण्यातील ही कट्टरतेचीच भावना आणि निसर्गाने जन्मजात दिलेली जगण्याची लालसा, ओढ यासाठी आणि ती सार्थअर्थाने भोगण्यासाठीच 'आपण जगतो' असे मी म्हणेन.
इन्द्रा
उत्तम प्रतिसाद.
किंचित शंकाजगण्याचे कारण शोधण्याची विचारक्षमता ईश्वराने [अर्थात या विश्वाची निर्मिती 'देव' नावाच्या कुणीतरी अज्ञाताने केली यावर विश्वास असेल तरच] माणसाला जन्मजातच दिली असल्याने
कंसातील वाक्य सध्यापुरते बाजुला ठेवु.
जगण्याचे कारण शोधण्याची विचारक्षमता जन्मजात असते की भाषेच्या संवादामुळे/लेखनामुळे इतर मानवांच्या अनुभवाच्या /विचारांमुळे असे विचार मनात येतात हा प्रश्न आहे. कारण जर अशी क्षमता जन्मजात असेल तर प्रत्येकालाच असे प्रश्न पडतात का? हा विचार मनात आला.
जन्मजात नसावी.. पण बुद्धिमत्ता हाच माणूसप्राण्याचा इतका अविभाज्य भाग आहे की ही विचारक्षमता किंवा इच्छा इतरांकडून (अॅक्वायर्ड) असते की बुद्धी विकसित होताना सोबत आपोआप पडणार्या प्रश्नांपैकी (स्वनिर्मित) तो प्रश्न आहे हे सांगणे कठीण.
सर्वांनाच हे प्रश्न पडतात असं दिसतं.. इथे असलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी पडला असेल हे ते सांगू शकतील.
जनरली पंधरावीस वर्षे वयादरम्यान पहिल्यांदा आणि तीव्रतेने पडतात असं वाटतं. म्हणजे त्या वयात मित्रांमधे चर्चा झडलेल्या आठवतात.
क्षमता असल्याशिवाय... आपण विचार करू शकणारच नाही! असं म्हणता येईल की तिचा वापर करण्यासाठी उपरोल्लिखित कारणे कारणीभूत होतात. पण या लेखनाची सुरूवात पण कुणीतरी पहिल्यांदा केली; ती तशी क्षमता असल्यामुळेच.
>>प्रत्येकालाच असे प्रश्न पडतात का? हा विचार मनात आला.
हो. हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. किंबहुना सर्व प्रश्नांचं मूळ कारण तेच असतं. ते प्रत्येकाला प्रत्येकवेळी प्रकर्षाने जाणवत नाहि हा भाग निराळा.
अर्धवटराव
प्रतिक्रिया