आपण का जगतो?
💬 प्रतिसाद
(95)
न
निखिलेश
Mon, 01/17/2011 - 15:26
नवीन
मला वाटते सर्व सजीव जगतात तसेच आपणही जगत असतो..
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Mon, 01/17/2011 - 16:13
नवीन
बाकी सगळे मनोव्यापार!
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 01/18/2011 - 06:45
नवीन
प्रारब्ध अटळ असेल तर मानवी प्रयत्नांची व्यर्थता सिद्ध होते.
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Tue, 01/18/2011 - 16:08
नवीन
मानवी प्रयत्न हा मनोव्यापारच आहे.
In accordance with the prarabdha of each, the One whose function it is to ordain makes each to act. What will not happen will never happen, whatever effort one may put forth. And what will happen will not fail to happen, however much one may seek to prevent it. This is certain.
- Ramana Maharishi
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 01/19/2011 - 07:19
नवीन
प्रारब्ध कोण ठरवते?
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Wed, 01/19/2011 - 15:50
नवीन
Be As You Are (Edited by David Godman)
Paperback.
251 pages.
Published by Arkana (Penguin Books).
ISBN 0140190627
अवश्य वाचा. त्यात याविषयी सविस्तर विवेचन आहे.
- Log in or register to post comments
श
शुचि
Mon, 01/17/2011 - 16:38
नवीन
बाळ असतो तेव्हा आपल्याला आईबाप जगवतात आणि नंतर सवय होऊन रहाते आणि आपण जगत रहातो.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Mon, 01/17/2011 - 18:39
नवीन
अजून मेलो नाही म्हणून!
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 01/17/2011 - 21:01
नवीन
स्वतःपुरते प्रश्नोत्तरं का होत नाहीत मिपावर?
कार्यकर्त्यांशी असहमत.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 01/18/2011 - 04:04
नवीन
>>>स्वतःपुरते प्रश्नोत्तरं का होत नाहीत मिपावर?
प्रश्न समजला नाही.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 01/18/2011 - 17:55
नवीन
"आपण का जगतो" यामधे किमान सगळ्या प्रतिसादक मिपाकरांचा समावेश आहे. मी का जगते याचं मला अपेक्षित असणारं उत्तर बिपिन कार्यकर्ते का जगतात असं त्यांना वाटतं किंवा अवलिया आयडीधारी व्यक्ती का जगते असं या व्यक्तीला वाटतं यापेक्षा वेगळं असू शकतं.
तत्त्वज्ञान वगैरे सांगून 'मरत नाहीत म्हणून' सजीव जगतात आणि हे उत्तर सगळ्यांसाठी सारखंच आहे असंही सांगता येईल. पण तसं असेल तर मग सगळ्यांना हा प्रश्न विचारण्याचं कारण नाही.
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Tue, 01/18/2011 - 18:05
नवीन
इथे आधीच खुलासा केलेला दिसतो आहे.
http://www.misalpav.com/node/16332#comment-278791
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 01/19/2011 - 07:10
नवीन
मी का जगते याचं मला अपेक्षित असणारं उत्तर बिपिन कार्यकर्ते का जगतात असं त्यांना वाटतं किंवा अवलिया आयडीधारी व्यक्ती का जगते असं या व्यक्तीला वाटतं यापेक्षा वेगळं असू शकतं.
सहमत आहे. आणि म्हणूनच अशा विविध विचारांच्या मागे काही समान सुत्र सापडते का हे पहाण्याचा प्रयत्न चालू आहे.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Tue, 01/18/2011 - 05:33
नवीन
"....अजून मेलो नाही म्हणून!..."
~ हे उत्तर मजेत [वा 'लाईट मूड' मध्ये] दिले असेल तर ठीक आहे, पण जर त्याला गंभीरतेची छ्टा असेल तर ही एक प्रकारची Cynic Attitude असून ती निर्माण होण्याचे कारण 'या जगात काहीही चांगले चालू नाही' अशी नैराश्याला जवळ करणारी स्थिती भोवताली आहे असे मानले जाते.....जी तुमच्या बाबतीत नसावी अशी खात्री आहे.
मीही कधीकधी या गर्तेतून जात असतो पण अचानकच केव्हातरी 'तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे...' ही धून कानी पडते आणि मन परत ताळ्यावर येऊन म्हणते 'अरे, आपण का जगतो याच्या उत्तरासाठी ताज्या गुलाबाची आठवण खूपच आल्हाददायी आहे...'.
इन्द्रा
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 01/18/2011 - 06:34
नवीन
>>>अजून मेलो नाही म्हणून!
गंभीरतेने उत्तर दिले आहे असे धरुन -
मरण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतांना तसेच अनेक जण आत्महत्येचे मार्ग चोखाळत असल्याचे दिसत असतांना जगण्याचा पर्यायच का निवडला जातो?
- Log in or register to post comments
ग
गुंडोपंत
Tue, 01/18/2011 - 06:39
नवीन
जन्मही नाही ताब्यात नि मरण नाही!
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 01/18/2011 - 06:44
नवीन
मरण जर हातात नाही तर आत्महत्या या मानवी कर्माची वाट काय?
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Mon, 01/17/2011 - 19:12
नवीन
"....कारण जर अशी क्षमता जन्मजात असेल तर प्रत्येकालाच असे प्रश्न पडतात का? ...."
~ स्वतः धागाकर्ते श्री.अवलिया, मी आणि इथे लहानमोठ्या प्रतिक्रिया दिलेल्या (तसेच केवळ वाचनमात्र असलेल्यांनी) सर्वाना हे मान्य व्हावे की हा विषय तसा गहन आणि तात्विक असल्याने यातील भाषाप्रयोग By default जडच असणार. कारण तत्वज्ञानाचे शास्त्र सोप्या भाषेत सांगण्यासाठी गाडगेबाबा किंवा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यासारखी समस्त समाजमनाला भावणारी भाषेची दैवी देणगी असणे गरजेचे आहे, जी सर्वांकडेच असेल असे नाही. त्यामुळे वरील प्रश्नाला उत्तर देताना माझ्यापुढे जी काही बंधने आहेत तीत प्रामुख्याने आहे ते सोप्या भाषेत त्याचे उत्तर देणे. तरीही मी प्रयत्न करतो...उत्तर बरोबर आहे किंवा सर्वमान्य व्हावे असा बिलकुल आग्रह नाही. कारण पु.ल.म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक गार्डाची शिट्टी न्यारी, त्याचप्रमाणे मला जे भावते ते केवळ माझेच आहे इतपतच उत्तराचा भावार्थ.
जीवशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहताना हे आपण जरूर जाणतो की अगदी तासापूर्वी जन्माला आलेले बाळ रडू लागले की मातेला वा नर्सला कळते की त्याला 'भूक' लागली आहे. ते बालक शब्दरूपाने भूक शमविण्याची मागणी करू शकत नाही, पण त्यासाठी त्या वरच्या कारागिराने त्याच्या मेंदुत अशी काही जादू भरलेली आहे की ज्याचे कंपन त्या मागणीच्या आधारे मुखावाटे बाहेर पडते ज्याला आपण 'बाळाचे रडणे' म्हणतो. म्हणजेच एका अर्थाने तासापूर्वी जन्मलेल्या बाळाला पडलेला प्रश्न त्याने स्वतःच सोडविला आहे. ही जी आत्मजाणीव आहे त्यात मग पुढे वाढत्या वयोमानाने वस्तूंची, व्यक्तीची, निसर्गाची, समाजातील असमानतेची भर पडत जाते आणि प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता तो स्वतःही प्रगल्भ होत जातो. हे सर्वांच्याच बाबतीत होत असेल का? हा Most Hypothetical प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर परत ज्याचे त्याने Individual Case म्हणून शोधायचे आहे.
न्यूटनने झाडावरून खाली पडणारे सफरचंद पाहिले. त्यावेळी त्याच्याबरोबर जर अन्य मित्र असतील तर न्यूटनला त्यामुळे जो प्रश्न पडला तो त्यानाही पडला असेल का? तर याचे उत्तर अज्ञातात आहे. जगात अन्य ठिकाणीही सफरचंदसदृष्य फळे त्या क्षणाला पडली असतील पण संपूर्ण विश्वात फक्त न्यूटनचाच मेंदू कारणमीमांसेसाठी सजग झाला. म्हणजेच त्याचसमयी त्याच्यासमवेत शिकणार्या मुलामुलींच्या तुलनेत त्याच्याकडे अधिकची प्रगल्भता होती. त्याने पुढे केलेल्या अभ्यासाच्या भाषेने/संवादाने जगाने ते ऐकले...मान्यही केले. म्हणजेच याला दुसरीही अशी छटा आहे की न्यूटनचा शोध व अनुभव योग्य आहे इतपत मानण्याजोगी प्रगल्भता समाजाकडे आली. हेदेखील अनुभव तृष्णाशमनाचे एक उदाहरण.
जगण्याच्या कारणासाठी माणसाने स्वतःशी जे नाते निर्माण केले आहे हे त्याचे स्वातंत्र्य आहे. "मी मनावर ताबा ठेवतो" असे म्हणून ताबा राहत नसतो कारण मनाला 'भटकायला' आवडते. पण परत जगण्याची आसच असे काही चक्र फिरविते की ते मुलूखगिरी करायला गेलेले मन सायंकाळी आपसूक परड्यात झापाखाली येऊन पडणार्या कोंबड्यासारखे शांत होते. हीदेखील निसर्गाने मानवाला दिलेली जन्मजात देणगी आहे...जिची कुठल्याही शासकीय दप्तरात नोंद झालेली नसते तर त्या देणगीच्या आधाराने ती ती व्यक्ती आपल्या वाट्याला आलेले पत्ते पटावर मांडून उद्याचे दान काय असेल याचा खरचटणार नाही असा लेखाजोखा मांडत.
श्री.अवलिया विचारतात 'प्रत्येकालाच असे प्रश्न पडतात का?" ~ याला थेट उत्तर द्यायचे असेल तर 'होय' असेच असेल माझ्या दृष्टीने. पण हे सर्वच बेधडक कबूल करतील का? बहुधा नाही, कारण तर ही स्थितीगती अखेरीस मानवानेच निर्माण केली असल्याने प्रत्येकाच्या होय-नाहीला त्याच्यापुरतेच महत्व असते.
जगण्याचे कारण वा प्रयोजनाची क्षमता जन्मजात का असेल याचा थोडा मागे जाऊन विचार केल्यास मला कर्ण आणि अश्वत्थामा यांचे उदाहरण आठवते. दोघांनाही लहानपणापासूनच त्यांच्या पालकांनी जी शिकवण दिली ती त्यानी स्वीकारली कारण तो स्वीकृतीचा गुण जन्मतःच त्यांच्या अंगी आला होता. त्यामुळे 'आमचे जगण्याचे कारण काय?" असा प्रश्न दोघांसमोर उभा राहिला त्यावेळी त्यांच्याकडे उत्तर होते 'मित्रासाठी'...मग भले त्यानी केलेली कारणमीमांसा व्यासांना पटो वा ना पटो. दोघांनाही माहीत होतेच की त्या जगण्याच्या कारणाचा शेवट काय होईल. पण त्यांचापुरता तो प्रश्न आता प्रश्न राहिला नव्हता तर ते साध्य होते....जे त्यांनी पूर्ण केले.
आजच्या काळातही 'मी का जगतो?' याचे रेखाटन व्यक्तीकडे असेल तर ते साध्य करण्यासाठी जी साधना हवी ती त्याच्याकडे जन्मजात असेलही...प्रश्न आहे तो त्याने शोधून काढण्याचा.
इन्द्रा
- Log in or register to post comments
स
सुधीर
Mon, 01/17/2011 - 19:29
नवीन
ईन्द्रा यांचा "अनुभवासाठी जगणे....!!" ह प्रतिसाद योग्य वाटतो. स्वप्नपूर्ती किंवा ध्येय्याचा पाठलाग करताना मिळणारा अनुभव, खाव्या लागणार् या खास्ता, त्यातून संपन्न होत जाणारं व्यक्तीगत ज्ञान, आणि सरतेशेवटी अर्थपूर्ण आयुष्य जगल्याचं "समाधान" ह्यासाठीच माणसानं जगावं.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 01/18/2011 - 02:22
नवीन
आपण का जगतो? तर रंगमंचावर आपली ठरलेली भूमीका वठवण्याकरता..
(कलाकार) अर्धवटराव
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Tue, 01/18/2011 - 16:06
नवीन
सहमत.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Tue, 01/18/2011 - 04:19
नवीन
अत्यंत अहंकारी प्रश्न! आपण जगतो म्हणजे यात आपण काही कृती केल्याचा जो आभास आहे तो पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे. एकवेळ मरणे आपल्या हातात आहे पण जगणे आपल्या हातात नाही. केवळ आपले हृदय चालू आहे आणि रक्त आपल्या शरीरात खेळते आहे म्हणून आपण जिवंत आहोत. हृदय चालवण्यासाठी आपण स्वतः कोणतेही प्रयत्न करत नाही आणि करूनही काही उपयोग होईल याची शाश्वती नाही.
त्यामुळे वरती स्पा म्हणाला तसं जन्माला आलो म्हणून आणि कार्यकर्ते म्हणाले तसं अजून मेलो नाही म्हणून आपण जिवंत आहोत.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 01/18/2011 - 06:39
नवीन
म्हणजे तुम्ही रक्त/हृदय स्वतःपासून वेगळे मानता का?
जर मानत असल्यास मग स्वतः म्हणजे नक्की काय?
आणि मानत नसल्यास स्वप्रयत्नाने हृदयाचे ठोके कमी जास्त करता येतात असे काही मानतात त्यावर काय मत? तसेच स्वतःचीच जी गोष्ट जी शरीराकडून केली जाते तिला आपले प्रयत्न कारणीभुत नाही असे कसे म्हणता येते?
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Tue, 01/18/2011 - 10:23
नवीन
रक्त आणि हृदयापासून मी वेगळा नाही पण फक्त रक्त आणि हृदय म्हणजेच मी नाही. 'मी ' म्हणजे शरीर, त्यातल्या सगळ्या रासायनिक क्रिया आणि ऊर्जा हे सगळं मिळून निर्माण होणारं जे काही आहे ते असं मला वाटतं.
स्वप्रयत्नाने हृदयाचे ठोके कमी-जास्त करता येत असतील तर थांबवता आणि सुरु का करता येत नाहीत? मीपणाची भावना ही सुद्धा मेंदूतली एक रासायनिक प्रक्रिया आहे असे मला वाटते. बर्याच प्राण्यांमध्ये ती नसते.
आपण म्हणतो की आपण आपल्या इच्छेप्रमाणे वागतो पण या इच्छांची निर्मीती कशी होते ते आपल्याला माहिती नाही. काही ठराविक बाह्यसंवेदनांनी ठराविक इच्छा निर्माण केल्या जाऊ शकतात त्यामुळे आपल्या इच्छांवरही आपला ताबा असतो असेही म्हणणे अवघड आहे.
'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हे एकापेक्षा जास्त अर्थांनी खरं असावं.
- Log in or register to post comments
र
रणजित चितळे
Tue, 01/18/2011 - 04:33
नवीन
अफजल गुरुला विचारा
- Log in or register to post comments
ग
गुंडोपंत
Tue, 01/18/2011 - 06:28
नवीन
पूर्वसंचित कर्म जे असेल त्याप्रमाणे आपण जगतो. त्यातून सुटका नाही. का जगतो आणि किती, हे त्यावर अवलंबून.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 01/18/2011 - 06:42
नवीन
पूर्वसंचित कर्मावर मात कशी करता येते?
जर मात करता येत नसेल तर मानवी प्रयत्न व्यर्थ मानावे का?
मानवी प्रयत्न व्यर्थ नसतील तर पूर्वसंचित मानावे का?
- Log in or register to post comments
र
रणजित चितळे
Tue, 01/18/2011 - 06:59
नवीन
पूर्वसंचित कर्मावर मात कशी करता येते?
कर्माचा विपाक करुन. तो कसा करायचा ह्या साठी लोकमान्यांनी लिहीलेले गीतारहस्य कर्मविपाक वाचावे. येथे दोन चार ओळीत नाही देता येणार.
जर मात करता येत नसेल तर मानवी प्रयत्न व्यर्थ मानावे का?
भोग भोगावेच लागतात. मानवी प्रयत्नांनी कर्म संचित कमी करु शकता. मानवी प्रयत्नांनी भोग भोगायची शक्ती येते. मानसिकतेत सुधार होतो. ...
मानवी प्रयत्न व्यर्थ नसतील तर पूर्वसंचित मानावे का?
पूर्व संचित मानणे न मानणे एखाद्याच्या मनाच्या घडणीवर अवलंबून आहे. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कर्म बंधनातून मुक्त होण्या मधला एक टप्पा आहे. आपण कोठल्या काँशियस लेव्हल वर आहात ह्या वर अवलंबून आहे.
- Log in or register to post comments
ग
गुंडोपंत
Wed, 01/19/2011 - 23:06
नवीन
रणजितराव,
सुयोग्य आणि नेमके उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.
टिळकांच्या गीतारहस्य या ग्रंथाची ओळख करून देणारी एक लेखमाला लिहावी अशी विनंती मी आपल्याला करत आहे.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 01/18/2011 - 07:42
नवीन
हे' प्रश्न 'तुम्हा'ला खरंच पडलेय्त? की 'जगाच्या कल्याणा' च्या भूमिकेतून 'परिप्रश्नेन सेवया'....???
असो.
पूर्वसंचित कर्मे भोगूनच संपवावी लागतात. 'खरे' संत आपल्याला असेच आचरण करुन दाखवतात (उदा. रामकृष्ण परमहंस) त्यांच्याकडे 'आमचे येथे प्रारब्ध अथवा संचित बदलून मिळेल' असा बोर्ड नसतो. अर्थातच त्यामुळे( जनरली) कमी अथवा अजिबात प्रसिद्धी नसलेल्या जागी आढळतात. तसेच ते बर्याचदा त्यांच्या 'क्लास'मधील दारिद्र्य रेषेखाली आढळतात. असो.
आपणच केलेल्या कर्माचे फळ आपल्याला मिळत असते. चांगले किंवा वाईट आपण ठरवतो. संचित आपल्या पर्यंत तथाकथित सुख अथवा दु:ख घेऊन येते. सुखी किंवा दु:खी होणे, न होणे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते.
पूर्वी आंब्याचे झाड लावले असेल तर आंब्याचे फळ मिळ्णार हा निसर्ग नियम आहे. (आंबा कुठला, कसा लावला, कशी मशागत केली,किती मोहोर आला, हवा पाणी कसे इ.इ. सगळा विचार करुन त्या त्या प्रकारचे फळ येईल पण फळ आंबा'च') बाभूळ लावली असेल तर काटे.....!!!
आज केलेले कर्म उद्या संचित होणार असल्याने विहित कर्म करणे (जे आपल्या हातात आहे) हेच करणे उत्तम.
बाकी आपण का जगतो....??? या प्रश्नाचे उत्तर को हं सारखेच. आत्मशोध घेणे.म्हणून आत्मा वा अरे श्रोतव्यो,.....
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 01/18/2011 - 08:12
नवीन
पूर्वसंचित कर्मे भोगूनच संपवावी लागतात.
आज केलेले कर्म उद्या संचित होणार असल्याने विहित कर्म करणे (जे आपल्या हातात आहे) हेच करणे उत्तम.
ह्म्म..
परत एका सहस्रप्रतिक्रियासक्षम वादाची सुरुवात.. :)
काहींना जे काही भोगावं लागतं त्याला त्यांचं पूर्वसंचित म्हणणं म्हणजे क्रूर चेष्टा आहे. अशा वेळी मग त्या व्यक्तीला "नेमकं काय घडलं होतं त्याच्या हातून? कधी ?" ते ऐकण्याचा किमान अधिकार असता तर किती बरं असं वाटतं.
फाशी, जन्मठेप शिक्षा सुद्धा देताना आरोपपत्र वाचून दाखवले जाते. पण इथे काय ? .. सगळाच आनंद.
आणि एकदा या जन्मीच्या जन्मतिथीपर्यंत काही थांग लागत नाही म्हटल्यावर "राज पिछले जनम का".. की मग बोलतीच बंद.. :)
यंदा ज्यांना वाईटाचे फळ नाही मिळाले त्यांना पुढच्या जन्मी मिळेल..आणि आत्ता ज्यांनी काय वाईट केले हे सांगता येत नाही त्यांनी गतजन्मी केले असेल..
:)
काय ते नेमकं माहीत नाही, उमजत नाही, कळत नाही म्हणून किती सोयीस्कर उत्तरं शोधून काढतो ना आपण ?
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 01/18/2011 - 10:50
नवीन
>>>>काय ते नेमकं माहीत नाही, उमजत नाही, कळत नाही म्हणून किती सोयीस्कर उत्तरं शोधून काढतो ना आपण ?
गवि,
नेमकं काय हे माहित करुन घ्यायचं ठरवलं तर अगदी तर्कशुद्ध उत्तरं मिळतात.
ह्या तथाकथित सोयिस्कर उत्तराचा थोडा विचार करु. आंब्याचंच उदाहरण घेऊ. झाडाला आंबे येण्याचा कालावधी हा काही वर्षांचा. अगदी कच्च्या कैरीचा आंबा व्हायला देखील एखादा महिना पकडू शकतो ना आपण...??? मग कधीतरी पूर्वी केलेल्या कर्माचे फळ पक्व होण्यास वेळ लागला तर नवल काय....???
दुसरी गोष्ट म्हणजे आपण च लावलेलं आम्ब्याचं झाड कधी लावलं कुठं लावलं कशा प्रकारे वाढलं हे आपण जरी विसरलो ( डोक्यावर पडलो) तरी आंबे यायचे आणि गोडपणा द्यायचं थांबणार थोडीच आहे...??? फळ हे येणारच.
हिंदू धर्म पुनर्जन्म मानतो. अगदी तुम्ही म्हटल्या प्रमाणे 'राझ पीछ्ले .....' स्टाईल नाही तरी आणि कारणमीमांसा द्यायची म्हटले आणि सगळी लिस्ट (मला कशाची कसली शिक्षा मिळते आहे याची) समोर आली तर विचार करा की काय अपराधी पणाची भावना येईल..? मान्य करणार नाही आपण की हे सगळे आपणच केले म्हणून. उदा. एक गाडी आपण चालक, गाडी चालवताना अपघात. विस्मृती. काही वर्षांनी दुसरी गाडी चालवतोय. पोलिसांना आधीचा अपघात कळाला. शिक्षा देतीलच ना????
हा ही विचार बाजूला सोडा.
माझ्या कानाने मला कमी ऐकू येते. का कमी ऐकू येते???? कारण मीमांसा करु का??? त्याने काय होईल??? संचित / प्रारब्ध मानले. त्रागा कमी झाला. दुसर्या कुणावर दोषारोप नाहीत, असूया ईर्ष्या, द्वेष, मत्सर नाही.
ऑपरेशन करवणे हे कर्म. हे करताना मी चांगल्या डॉक्टरकडेच जाईन.त्यातही सक्सेस रेट किती असेल हे ठाऊक नसल्याने पुन्हा प्रारब्धावर भरवसा. नॉट अ बॅड डील ......
- Log in or register to post comments
स
स्पा
Tue, 01/18/2011 - 10:54
नवीन
जोरदार अनुमोदन
प्यारे जब्रा एकदम
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 01/18/2011 - 10:59
नवीन
हे ठीक..
पण म्हणजे माहीत नसल्याने मानले असेच झाले ना.
पाप आहे, पुण्य आहे हे मानले+ या सर्वाची नोंद ठेवणारी यंत्रणा आहे हे मानले + गतजन्म मानला की मग सर्व सरळ सोपे आहे.
आंब्याचे उदाहरण प्रस्तुत मुद्द्यासाठी फार फार ढोबळ वाटते.
..पण स्थूलमानाने एकूण मुद्दा पटला.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 01/18/2011 - 11:53
नवीन
स्वतःचे काम १००% करत राहिल्यानंतरच हा 'हातचा' मानणे इष्ट ठरते. ( असेल हरी.... अजिबात नाही.)
(असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे - तुकाराम,
रेखा ( तळहातावरील रेषा)तितुकी पुसोन जाते हे तो प्रत्ययास येते मग डोळे झाकणी करावी काये निमित्त- रामदास)
असे 'मानणे' आपण बर्याच ठिकाणी करतो.... गणीतात क्ष मानतोच की!
औषध देणार्या़ डॉक्टरला :- मला या औषधाचे संपूर्ण रासायनिक समीकरण द्या मी स्वतः बघतो, करतो आणि मग मीच बनवलेले औषध घेऊन बरा होतो असे कुणी म्हटल्याचे ऐकिवात नाही..... तिथे 'रेडी टू यूज' वरच 'श्रद्धा' असते. कारण लवकरात लवकर बरे व्हायचे असते ना....
तिथे आपली 'के हेच्च ए ए जे' कुठे जाते....???
'संतांनी, आम्ही अनुभव घेतलाय तुम्हाला सांगतो' असे म्हटले की आलेच बाहुं मध्ये स्फुरण.... ३०० -४००-१००० वर्षांपूर्वी होऊन गेलेले हे संत काय पैसे उकळणार असतात कोण जाणे....??? ३% च्या ऐवजी २ % मिळाले म्हणा एखाद वेळी हाय काय आन नाय काय ....!!!
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 01/18/2011 - 12:27
नवीन
याचाच अर्थ केवळ कार्य-कारण-परिणामभाव सिद्ध करण्यासाठी कर्मफलसिद्धांत मानला जातो.
- Log in or register to post comments
स
स्पा
Tue, 01/18/2011 - 06:46
नवीन
"का जगतो" याचं सोप्पं उत्तर म्हणजे जन्माला आलो म्हणून.,..... आणि मरण येत नाही म्हणून....
अवलिया साहेब.. हे फायनल उत्तर आहे.. अजून आता वाद घालू नका
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 01/18/2011 - 06:58
नवीन
तेज्यायला हा मिपाकंटक नाना अजुन जिवंत आहे का?
नान्या तु लेका मिपाचे वातावरण दुषित करायला जगतोस असे कोणीतरी सांगीतले होते ना मागच्यावेळी ?
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Tue, 01/18/2011 - 08:32
नवीन
पराशी सहमत.
पण परा अर्धी लाकडे पोचलेल्याला लेका का म्हणत असावा बरे?
- Log in or register to post comments
N
Nile
Tue, 01/18/2011 - 18:15
नवीन
ते मागल्या जन्मीचं संचित आहे पर्याचं. बाकी अनेक लोक मरत का नाहीत हा प्रश्न मला जास्त सतावतो. असो.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानेश...
Tue, 01/18/2011 - 08:39
नवीन
माझे कुतूहल शमलेले नाही, म्हणून मी जगतो आहे.
इतरांबद्दल सांगू शकत नाही.
- Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे
Tue, 01/18/2011 - 11:33
नवीन
जीव जात नाही म्हणून ......
जीव गेला तर कोण कशाला जगेल ? ;)
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 01/18/2011 - 18:24
नवीन
मला वाटतं, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक माणूस वेगवेगळं देईल. प्रत्येकजण आपाआपले संस्कार, विचार, अनुभव जसे असतील, तसं उत्तर देईल.
रामदास स्वामी किंवा शिवाजी महाराज यांचं जगण्याचं कारण वेगळं होतं, तर एखाद्या अय्याश नबाबाचं जगण्याचं कारण वेगळं असेल. कष्ट करून एखादी आई आपल्या बापाविना असलेल्या मुलाना वाढवते, तिचं जगण्याचं कारण तिच्यापुरतं तेवढच खरं आणि महत्त्वाच असेल.
मी तर म्हणेन, "आपण का जगतो?" या प्रश्नाचा विचार करूच नये. शक्य तेवढं मस्त जगावं, चांगलं जगावं. जास्त विचार करत राहिलात तर खरे जगण्याचे क्षण वाळूसारखे हातातून निसटून जातील!
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 01/19/2011 - 07:24
नवीन
पुन्हा तेच..
"साठी" आणि "मुळे" चा घोळ.
"का जगतो ?" याचा अर्थ काहींनी "कशासाठी" जगतो, म्हणजे काय करण्यासाठी जगतो असा घेतला आहे. (खाण्यासाठी, राज्यस्थापनेसाठी, संगीतसाधनेसाठी)
"कशामुळे" जगतो असाही अर्थ त्या "का ?" त आहे आणि तोच विचारणार्याला अभिप्रेत असावा.
"व्हॉट कॉजेस लिव्हिंग" (किंवा "व्हॉट कॉजेस लाईफ"), ऐवजी आपण नेहमीच "व्हाय आय वाँट टू लिव्ह" असाच प्रश्नार्थ घेतो.. :)
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Tue, 01/18/2011 - 18:57
नवीन
<<<आपण का जगतो?
मरत नाही म्हणुन..नेक्स्ट..
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2