अजून काय काय ऐकायला लागणार देव जाणे. एकेकाळी पोलीस किंवा इतर सरकारी अधिकाऱ्यांना घाबरण्याची पद्धत होती. फारतर पैसे चारून गप्प केले जायचे. हल्ली जाळायची पद्धत आली आहे. मागे एका पोलिसाला जाळला होता एका रिक्षावाल्याने आणि आज हे. बिहार झाला आहे महाराष्ट्राचा.
हेच म्हणतो.
आधी सरकारी अधिकार्यांमध्ये "वाळु माफियां"चे दहशत होती, आता इतर बरेच जण ह्यात दाखल झाले आहेत.
आधीही अशा बातम्या आल्या होत्या.
नगरमध्ये तर वाळु माफियांनी तहसिलदारांवर गोळ्या झाडल्या होत्या, दमदाटी रोजचीच आहे.
- छोटा डॉन
>>>>बिहार झाला आहे महाराष्ट्राचा.
बिहार मधे कायदा व्यवस्था सुधरत आहे.. महाराष्ट्रात बिघडत आहे.
सोनियाचे दिन आले... प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कॉग्रेस सरकारच्या राज्यात जनतेला मिळालेल्या या धड्यापासुन सावध होऊन सरकारी अधिकारी तसेच जनतेने आपली स्वतःची काळजी घ्यावी.
महाराष्ट्राचा बिहार नाही झाला तर बिहारची जागा महाराष्ट्राने घेतली आहे. युपी-बिहार ऐवजी युपी-महाराष्ट्र असा उल्लेख करायला हरकत नाही कारण बिहार आता सुधारणेच्या मार्गावर आहे.
बिहार आणि महाराष्ट्राची झालेली ही आलटपालट (गुन्हे, फसवणूक, भ्रष्ट्राचार, तीव्रतेने ढासळत चाललेली कायदा व्यवस्था, सत्ताधार्यांची, त्यांच्या समर्थकांची बेबंदशाही, सर्व काही म्यॅनेज करता येते फक्त योग्य ती किंमत योग्य त्या व्यक्ती पर्यंत पोहोचवली की बस्स! ही वाढीस लागलेली भावना) या सर्व गोष्टींमुळे शक्य झाली आहे.
या पुढे अकार्यक्षम, भ्रष्ट्र सत्ताधार्यांना किवा राजनेत्यांनाच फक्त दोष देणे चुकीचे ठरेल. सर्वात मोठा दोष आहे तो अश्या राजनेत्यांना पुन्हा पुन्हा निवडून देणारे, त्यांना पुन्हा पुन्हा सत्तेत बसवणारे, त्यांच्या सर्व दोषांना पदरात घालणारे, त्यांच्या सर्व चुकांना माफ करणारे, त्यांच्या पुढे लाचार होणारे, त्यांच्या भ्रष्ट कमाईला हातभार लावणारे अश्या सर्व मतदारांना दोष देणे योग्य ठरेल.
हे सर्व मतदार सोईस्कररीत्या विसरत आहेत की हा देश सोडून ब्रिटीश केव्हाच निघून गेलेत तसेच निजाम,बादशाह, मुघल, राजे हे सुद्धा संपलेत आणि देशात आता राज्यकर्त्यांची निवड जनतेतून आणि जनतेच्या पंसतीनी(मतानी) केल्या जाते. पुर्वीप्रमाणे त्यांच्यावर राज्यकर्ते लादले जात नाहीत. सध्याच्या परिस्थीला फक्त राज्यकर्तेच जबाबदार नाहीत तर त्यांना निवडणारे हे सर्व मतदार जबाबदार आहेत.
सोनवनेंचा ज्या पद्धतीने मृत्यू झाला, कायद्याला न घाबरण्याची, अधिकार्यांना न घाबरण्याची जी मानसीकता आज अपराध्यांमध्ये दिसून येत आहे त्याला फक्त भ्रष्ट-अकार्यक्षम सत्ताधारी जबाबदार नाहीत तर त्यांना निवडणारी महाराष्ट्रातील जनता/मतदार जबाबदार आहेत.
वा काय योग, देशाच्या संविधानाची ६१ वी साजरी करताना अशी घटना व्हावी...
[अंवातरः पोलीस अधिकार्यावर हात उचलला म्हणून विरोधी आमदाराला पोलीसांनी चांगलच फोडलं :) आता बघूया प्रशासनिक अधिकार्यावर हात उचलण्यासोबतच हत्या केल्या बद्दल संबंधिताना किती फोडतात :) ]
भेसळखोरांविरोधात मोक्का लावणार आणि त्या सोबतच तो मोक्का न्यायालयात टिकणार नाही ही काळजी सुद्धा आरोपींच्या वतीने घेणार. व्वा! जनता भी खुष, आरोपी भी खुष और अपन भी खुष :)
आता राजकारणी लोकांनी तो अधिकारी लाच मागत होता आसा राग वाळला नाही म्हणजे मिळवली.
तो अधिकारी अगदी लाच मागत होता असे घटकाभर समजून चालू या. (तसे प्रत्यक्षात झालेले आहे असे म्हणत नाही. पण तरीही समजा.) पण तरीसुद्धा, एखाद्याने लाच मागितलेली असणे हे त्याला जिवंत जाळण्याचे समर्थन होऊ शकते काय?
की या बाबीमुळे घटनेच्या चौकशीच्या आणि त्यावरील कारवाईच्या कर्तव्यातून मुक्ती मिळते?
तो अधिकारी लाच मागत होता किंवा नव्हता याचा घटनेच्या भयंकरपणाशी, गांभीर्याशी आणि दखलपात्रतेशी नेमका काय संबंध?
एखाद्याने लाच मागितलेली असणे हे त्याला जिवंत जाळण्याचे समर्थन होऊ शकते काय?
मी असे कुठेही म्हटलेलं नाही.
जे झाल ते अत्यंतहीन दर्जाच कृत्य होत. त्याला कुठलच समर्थन असु शकणार नाही. पण गेंड्याच्या कातडी वाले स्वतःचा बचाव करताना, दोष समोरच्याच होता हे ठसवताना काय वाट्टेल ते आरोप करु शकतात. एवढच म्हणायच होत.
हे केवळ हिमनगाचं टोक आहे असं वाटत नाही का साहेब?
अधिक काय बोलणे? रहाटगाडगे चालु आहे...चालते आहे! अडकत, खुरडत कसं का असेना, चालतंय तोवर कुणाला घेणंदेणं नाही.
भेसळयुक्त पेट्रोलवर बंदी घातली तर पेट्रोल आत्ताच १०० रु ली ने पेट्रोल विकावं लागेल.
पेशवे जी.....अभ्यास हवा अभ्यास ....
तुमच्या म्हणण्याचा मतीतार्थ असा होतो की सध्या तशी बंदी नाहिय्ये. आणि भेसळयुक्त पेट्रोल सर्वत्र सरकारी हुकुमानुसार विकले जाते.
अन्न आणि औषध प्रशासन याची पुरेपूर काळजी घेते .
बंदी आत्ताही आहे ती तशी कडकपणे लावली तर असा मतितार्थ आहे. आपल्याकडे कायदे सगळ्याचे आहेत पण त्यावर अंमल होत नाही ही माहीती तुम्हासही नवीन नसावी. सगळ्या गोष्टीतून राजकारण्यांना (जे सरकार चालवतात) कट जातच असतो.
पुढच्या वेळपासून विजुभाऊंसाठी प्रत्येक गोष्टीचे निरूपणही करावे लागणार असे दिसते आहे.
बातमी भयंकरच आहे. वाईट काम करायचं आणि वर हे असं!
माझ्या होस्टेलला दोघी बहिणी रहायच्या (नाव सांगत नाही). सधन घरच्या होत्या.
त्यांच्या वडीलांच्या बिझनेसमध्ये ढवळाढवळ (?) केल्याबद्दल तिथल्या पोलीस ऑफिसरला त्यांनी त्यांच्या करखान्यात भट्टीत टाकून मारला असे त्या सहजपणे सांगत होत्या. माझ्या मनातून ते अजून गेले नाही. त्याची बातमी होवू नये म्हणून नंतर वडीलांनी कायकाय केले हेही सांगत होत्या.
त्या मुलींबरोबर खोली शेअर करायला कोणीही तयार झाले नव्हते.
अतिशय दुर्दैवी घटना. पेट्रोल-डिझेल भेसळीचे प्रकरण अधून-मधून वाचावयास मिळतात. पुढे काही दिवसांनी अशी प्रकरणे 'थंड'ही होतात. मात्र, प्रामाणिक अधिका-यांना अशा बरबटलेल्या व्यवस्थेवर कार्यवाही करण्याची वेळ येते तेव्हा गुंडांकडून हल्ले होतात आणि अशा अधिका-यांन जीव गमावण्याची वेळ येते. असे का होते, तेही आपण सर्वांना माहित आहे. एकमेव कारण कायद्याने अशा गुंडावर कठोर कार्यवाही होत नाही. मोठमोठे घाऊक व्यापारी गुंडांवर कोणाचा-कशाचा वचक नाही. राजकीय लोकांचे पाठबळ. आणि पोलिसांची कार्यवाही करणारी केवळ 'शो' बाजी. यामुळे गुंडाची दहशत वाढत जाते. आणि अशा घटना घडतात. वरील घटना प्रचंड चीड आणणारी आहे.
आता किरकोळ कार्यवाही होईल. निषेध व्यक्त होतील, काळिमा फासणारी घटना म्हणून फ्रंट पेजवर बातम्या छापून येतील. पेट्रोल-डिझेल भेसळीच्या ठिकाणांवर काही दिवस कार्यवाही होईल. बराच काळ लोटला की, पुन्हा येरे माझ्या मागल्या. पुन्हा अशीच कुठे घटना घडेल. कोणाच्या तरी कुटूंबातील कर्ती व्यक्ती जाईल, ते कोणाचे वडील असतील, तो कोणाचा पती असेल, कोणाचा तो मुलगा असेल, आपण पुन्हा हळहळ व्यक्त करु. अन, थोडा मानसिक त्रास झाला की, व्यवस्थेच्या मायला शिव्या घालू. :(
-दिलीप बिरुटे
+ १
या प्रकारच्या घटना झाल्यानंतर त्याबाबत काय उपाय-योजना केली गेली आणी त्याप्रमाणे त्या उपाययोजनेची अंमलबजाबणी झाली की नाही हे प्रसिद्धी माध्यमांनी लाऊन धरलं पाहिजे.. जनेतेची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी प्रसिद्धी-माध्यमांशिवाय पर्याय नाही... अर्थात त्यात न्युजवॅल्यु नसल्यामुळे कोणी या भानगडीत पडत नाही.
मला वाटतं निदान एखादा मुद्दा प्रत्येक प्रसिद्धी माध्यमाने धरून तडीस नेला तरी बराच फरक पडू शकेल. नाहीतरी 'रियालिटी शो' चं आजकाल फॅड आहेच ना.. ह्याचा सुद्धा एक ' ट्रू रियालिटी शो' करता येइल.
+१
खूपच वाईट वाटलंय.
त्या गेलेल्या अधिकार्याच्या कुटुंबाची जबाबदारी सरकार उचलतंय, पत्नीला त्या व्यक्तीच्या रिटायरमेंटपर्यंत त्यांचा पगार मिळत राहील आणि मुलांची शिक्षणे सरकारतर्फे केली जातील हे वाचून त्यातल्यात्यात बरं वाटलं.
पण कर्तव्य बजावण्याची दुर्मिळ वृत्ती आणि तिला मिळणारं हे असं फळ पाहून आगामी कर्तव्यदक्ष लोकांना एकूणच कर्तव्याचीच दहशत बसेल की काय असं वाटून वाईट वाटतंय.
हा भस्म सूर शेवटी आपल्याच डोक्यावर हात ठेवेल तो सुदीन!
राजकारणात गुन्हेगारीचा शिरकाव झाल्यावर चोरुन करायच्य कामांना राजरोस पणा आला.
हे शेवटी घड्णारच होते .. हीच गुन्हेगारी एक दिवस राजकारण्यांना संपवेल... !
या पोपटाचा बोलविता धनी कोणी वेगळा असेल हे सांगायला हवे का?
राजकारणात गुन्हेगारी कोन्ग्रेस ने आणली.. शिवसेनेची सुरुवातच फक्त रोबीन हूड ची होती आणि राष्ट्र्वादीने कळस चढवला आहे. भाजपची मुठ्ठी भर कार् सेवा असतेच .. यात कोणीच मागे नाही.
इंदिराजींचा बळी त्यानींच पोसलेल्या भस्मासुराने घेतला हा इतिहास आहे .. पण यातून शिकणार कोण? कोणाचा विवेक जाग्यावर आहे?
कर्तव्य तत्पर जिल्हाधिकारी श्री. सोनावणेंना विनम्र श्रद्धांजली !
राजकारणात गुन्हेगारी कोन्ग्रेस ने आणली.. शिवसेनेची सुरुवातच फक्त रोबीन हूड ची होती आणि राष्ट्र्वादीने कळस चढवला आहे. भाजपची मुठ्ठी भर कार् सेवा असतेच .. यात कोणीच मागे नाही.
विटेकरकाका असे धादान्त जेनीरीक विधान्त करू नका. तुमच्याकडे काय आकडेवारी आही याबद्दल?
सुरवात कोणी केली हे नक्की कसे ठरवणार? कळस कोणी चढवला हे तुम्ही कशावरून ठरवता?
राजद आनि सप व बसपा च्या काही मन्त्र्यांवर केसेस आहेत.
भाजप मध्ये गुन्हेगार आहेत हे कोणत्याही भाजप प्रेमी माणसाला म्हणून पहा.... तासभर चिंतन शिबीर घेईल तुमचे .
काही लिहीताना नक्की माहिती असेल तर लिहा. हे संस्थळ बर्याच पत्रकारांच्या अभ्यासाचा विषय आहे.
इंदिराजींचा बळी त्यानींच पोसलेल्या भस्मासुराने घेतला हा इतिहास आहे .. पण यातून शिकणार कोण? कोणाचा विवेक जाग्यावर आहे?
या गोष्टीचा इथे काय संबन्ध? इंदीरा गांधींचा बळी हा गुन्हेगारीने नाही घेतला. प्रतिसाद देताना किमान आपण नक्की कोणत्या विषयावर लिहितोय याचा सारासाअर विवेक बाळगा ही विनन्ती
काय सांगता? बारं!! चालायचंच नाही का!! आधी फक्त गोळ्या घालायचे आजकाल जिवंत जाळतात इतकाच फरक समजला...आधी सामान्य माणसं मरायची आता सरकारी अधिकारीसुद्धा हा एक मोठा फरक...बाकी माझे मत यापुढे कॉंग्रेसलाच....जमले तर राजकारणात जाईन म्हणते.
हे सुद्धा दडपल जाईल. जो कोणी या असल्या प्रकारांविरुद्ध आवाज उठवेल त्याची हीच गत आहे.
सकाळी सकाळी उठुन प्रजा सत्ताक दिनाच्या शुभेच्छा द्याव्या म्हंटल्या होत्या , पण आता त्यातला जीव गेला.
वर्तमानपत्रांच्या बातमीनुसार तो 'पोपट' बेपत्ता नसून त्यालाही भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात ठेवले आहे. सोनावणे यांनी त्याला मरत असतानाही पकडून ठेवल्यामुळे तो भाजला. मरता मरता सोनावणे यांनी उत्तम काम केले आहे.
घटना भयंकरच.
माननीय गृहमंत्र्यांना अजुनही 'ऐसे छोटे हादसे होते रहते है असेच वाटताय का ?
मरता मरता सोनावणे यांनी उत्तम काम केले आहे.
खरंच. ६० टक्के वगैरे भाजला आहे म्हणे पोपट. तरी हे लोक केवळ पुढची बुजगावणी असतील. भरभक्कम पाठींबा असल्याशिवाय असं करु धजावले नसतील. पडद्यामागचे गुन्हेगार शोधून त्यांनाही अशाच शिक्षा दिल्या पाहिजेत जिवंत जाळण्याच्या..
:(
"वरचे" लागेबांधे उघडकीस येऊ नये म्हणून पोपटचा बकरा बनवला आहे. समजा पोपटाची तपासणी झाली असती आणि तो पोपटासारखा बोलू लागला असता तर नस्ती लफडी झाली असती. आणि आता पब्लिकला खूष करायला सोनवण्यांच्या पराक्रमाची दंतकथा बनवली जाईल. कोण विरोध करेल अशा ष्टोरीला?
म्हणजे सोनवणे साफ, पोपटही खल्लास आणि भेसळ प्रकरण फुल्ल स्पीड्मधे चालूच! सगळेच खूष!
ह्या हलकटांचे इतके धाडस होते म्हणजे अगदी वरपर्यंत ह्या प्रकरणाचे हात पोचले असावेत. दुसरे असे की प्रकरण न्यायालयात जाणार, तेथे खटला चालणार, पुरेसे पुरावे सापडणार, गुन्हा शाबित होणार, शिक्षा दिली जाणार आणि शिक्षेची अम्मलबजावणी होणार. ह्यातील प्रत्येक पायरीवर चार, पाच, दहा वर्षे जाऊ शकतात. राजकारण्यांची मदत असेल तर हे आणखी सहज शक्य आहे.
उदा. अफजल गुरु आणि कसाबची फाशी कशी लटकली आहे दिसतेच आहे.
तात्पर्य, शिक्षेचा धाक नाही, राजकारण्यांचा वरदहस्त आहे. असे असेल तर अशी कृत्ये घडणारच.
विरोधकांना थोड्या नोट्या पोचवल्या की तेही थंड पडतील. पहिले दोनचार दिवस राजीनामा मागा, राष्ट्रपती राजवट आणा वगैरे नेहमीचे राग आळवायचे, निवडणूकीला चटपटीत भाषणे झोडायला सोनवण्यांचे नाव घ्यायचे. बस्स.
माध्यमांचेही तेच. रेटिंग मिळेपर्यंत बातमी हेडलाईन. नंतर वरून पैसा आला की चिडीचूप!
एकंदरीत सगळे आलबेल. ऑल इज वेल.
आता चला क्रिकेटची मॅच पहायला!
ह्या हलकटांचे इतके धाडस होते म्हणजे अगदी वरपर्यंत ह्या प्रकरणाचे हात पोचले असावेत. दुसरे असे की प्रकरण न्यायालयात जाणार, तेथे खटला चालणार, पुरेसे पुरावे सापडणार, गुन्हा शाबित होणार, शिक्षा दिली जाणार आणि शिक्षेची अम्मलबजावणी होणार. ह्यातील प्रत्येक पायरीवर चार, पाच, दहा वर्षे जाऊ शकतात. राजकारण्यांची मदत असेल तर हे आणखी सहज शक्य आहे.
शब्दा शब्दाशी सहमत.
कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा सांगणार्या पुरोगामी महाराष्ट्राचा " जय हो"... आता आपल्याला बिहार, यु.पी.ला शिव्या घालायचा हक्क नाही. मागे एकदा मराठवाड्यात कुठेशी एका स्त्री-अधिकार्यावर बलात्कार झाल्याची बातमी वाचली होती. ही बातमी म्हणजे आम्ही कर्तव्य-परायण अधिकार्यांची किती किंमत आणि कदर करतो, ह्याचा पुरावाच आहे. म्हणजे एखाद्या अधिकार्याने कर्तव्यात कसूर केली, तर जनता आणि वृत्तपत्रे त्याला शिव्या घालणार, आणि जर कुणी कर्तव्य करण्याचं धाडस दाखवलंच तर त्याला माफीया जिवंत पेटवणार ! क्या करे, क्या ना करे...
असो. शहीद (माझ्यापुरते तरी) श्री. सोनावणे ह्यांच्या आत्म्याला शांती आणि गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळो, हीच प्रार्थना..
अगदी घॄणास्पद.
लोकसत्तेतील त्याच बातमीत ठाण्यामधे बिल्डर्स-राजकारण्यांच्या भानगडी उघडकीस आणणार्या विक्रांत कर्णीकांवर पण प्राणघातक हल्ला झाला असल्याचे म्हणले आहे.
अतिशय वाईट बातमी. वाचून खूप त्रास झाला. अशा घटना घडल्यावर कोणा अधिकार्याचे कुटूंबिय त्यांना प्रामाणिक काम करा, छापे घाला असे सांगतील. आणि असे राजरोस खून पडत असतील तर कोण अधिकारी आपल्या जीवावर उदार होउन आपलं काम प्रामाणिकपणे करतील. प्रत्येकासाठी आपल्या जीवापेक्षा मोठे काहीच नसते. आधीच प्रामाणिक अधिकारी अगदी बोटाएवढे असतात त्यात असे प्रकार नक्कीच त्यांच्यासाठी demotivating आहेत.
थोडक्यात कायदा, सुव्यवस्था फक्त कायद्याच्या पुस्तकात उरला आहे. आणि गुंडाना अक्षरशः कोणाची भिती उरली नाही. खूप वाईट झाले. खूपच वाईट.
आणि मुख्य म्हणजे हा काही प्लॅन्ड छापा नव्हता. म्हणजे कुणाला काही कुणकुण/आतली बातमी मिळ्ण्याची काही शक्यता नव्हती असे असताना गुंडांची एवढी तयारी की समोरच्यावर सरळ हल्ला करून त्याला जाळून टाकले. याचाच अर्थ या गुंडांना किती जास्त support असावा सिस्टिमचा. Too bad.
हे सर्व पाहिलं की असं वाटतं की, आपण आपल्या सेफ job मध्ये बसून नेहमी म्हणतो की सिस्टीम किती खराब आणि currupt झाली आहे, लोकांनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे वगैरे वगैरे. पण पावलोपावली असा जीवाचा धोका असेल तर प्रामाणिक काम करू इच्छिणार्या लोकांनासुद्धा या दलदलीचा हिस्सा बनण्यावाचून गत्यंतर नसेल :-(
कधी संपणार हे सगळं कोणास ठावूक.
श्री. सोनावणेना आदरांजली.
फार वाईट.
अंधार्या रात्री मारुती कांबळेचं काय झालं (होतं)?- तेच आता दिवसाउजेडी चव्हाट्यावर यशवंत सोनवणे यांचं झालं आहे.
याला सामना देण्यासाठी कोणीही मास्तर व्हायला तयार नाही आणि मास्तर होण्याची पात्रताही कोणाकडे नाही.
तो म्हणे ७०% भाजला होता. सात टक्के भाजला असता तरी आत्तापर्यंत मेलाच असता. त्याचे जिवंत राहणे अनेकांच्या मुळावर उठणारे होते. म्हणूनच तो मेला म्हणून वाईट वाटले. पुढचे दुवे मिळण्याचा मार्ग आता अधिकृतरीत्या बंद झाला.
प्रतिक्रिया