Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राधा - भक्त का प्रेयसी

स
सायली थत्ते
गुरुवार, 01/27/2011 - 09:25
🗣 90 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
45006 वाचन

💬 प्रतिसाद (90)
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 01/27/2011 - 10:01 नवीन
मुळात राधा ह्या नावाच्या किती व्यक्तीरेखा होत्या ह्याची माहिती घेतली तर बरेच प्रश्न सुटतील ;) कॉलींग नाना....
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 01/27/2011 - 10:14 नवीन
राधा ही काल्पनिक व्यक्तिरेखा आहे कारण मुळात कृष्ण हीच काल्पनिक व्यक्तिरेखा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नन्दादीप गुरुवार, 01/27/2011 - 10:24 नवीन
>>कारण मुळात कृष्ण हीच काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. मग महाभारत, गीता (श्रीक्रुणाचा अर्जुनास उपदेश) याबद्दल आपले काय सांगणे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया गुरुवार, 01/27/2011 - 10:25 नवीन
काय सांगु त्याबद्दल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप
श
शिल्पा ब गुरुवार, 01/27/2011 - 18:15 नवीन
जे माहीती आहे ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
पैसा Fri, 01/28/2011 - 17:33 नवीन
माहिती असलेलं सांगितलं तर लोक म्हणतात. "काय भंकस!" माहिती नसलेलं सांगितलं तर " मोठा तज्ञ आहे हो!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
J
jaydip.kulkarni गुरुवार, 01/27/2011 - 16:35 नवीन
कृष्ण किंवा महाभारतातील पात्रे काल्पनिक नाहीत , हे सर्व घडले होते साधारण ९ व्या किंवा १० व्या शतकात अंदाजे .... मथुरा किंवा महाभारतात सांगितलेली पुष्कळ ठिकाणे आज हि अस्तित्वात आहेत .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ह
हुप्प्या गुरुवार, 01/27/2011 - 16:41 नवीन
डॅन ब्राऊनचे दा विन्ची कोड वा एन्जल्स अँड डिमन्स वाचले आहे का? दोन्ही पुस्तकात खर्‍याखुर्‍या जागा, खर्‍या ऐतिहासिक व्यक्तिरेखा ह्यात काल्पनिक व्यक्ती आणि घटना मिसळून मनोरंजक कादंबर्‍या बनवल्या आहेत. त्याच्या लाखो काप्या विकल्या गेल्या आहेत. पण म्हणून काय तो इतिहास समजायचा का? तीच गोष्ट महाभारताची. जागा खर्‍या पण घटना काल्पनिक. कुठलाही भौतिक पुरावा नसल्यामुळे महाभारत आणि त्यातल्या व्यक्ती काल्पनिकच आहेत. अन्यथा पुरावे द्या. नाणी, शिलालेख, गाडगी मडकी असे काही तरी ठोस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaydip.kulkarni
च
चिगो गुरुवार, 01/27/2011 - 18:54 नवीन
+१.... मलाही हेच वाटतं भौ.. नाहीतर मी आत्ताच मंदार, फिरोज आणि अमरला भेटायला मुंबईला आणि दारा ला भेटायला राजस्थानात जायला तयार आहे.. (सुशिंचा चारपाती पंखा) चिगो ह्ये भलतंच अवांतर झालं ह्यासाठी स्वॉरी हां, हुप्प्याराव/जी/ पंत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
J
jaydip.kulkarni गुरुवार, 01/27/2011 - 19:43 नवीन
मग भगवद गीता कोणी लिहिली ? जर गीता आहे तर मग कृष्ण असलाच पाहिजे !!! असे म्हटले जाते कि कृष्ण अवतार साधारण पणे ३२२८ BC झाला होता ...... मथुरा आणि महाभारतातील घटना यावर देखील संशोधन चालू आहे . अशी त्या काळातील विशिष्ट लिपी व पत्रे सापडली आहेत पण त्या लिपीचा अर्थ लागत नाही असे ऐकले आहे .........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या गुरुवार, 01/27/2011 - 22:21 नवीन
जर गीता आहे तर कृष्ण असलाच पाहिजे? का बरे? काय गरज आहे? कुणी प्रतिभावंत लेखक जर इतके मोठे महाकाव्य लिहू शकतो तर त्याला गीता लिहिणे अशक्य का असावे? त्याकरता कृष्णाचे असणे का जरूरी आहे बरे? आपण जी पत्रे आणि विशिष्ट लिपीतली पत्रे म्हणत आहात ती कुठे सापडली आहेत? जरा जास्त माहिती द्या की राव. मलाही महाभारत हा इतिहासच आहे असे शाबित झाले तर आवडेल. पण आंधळ्या भक्तीपोटी नाही तर खणखणीत पुरावे मिळूनच. आणि तसे जोवर होत नाही तोवर ते माझ्या मते काल्पनिक महाकाव्यच रहाणार. इथे त्या काव्याचे मोठेपण आणि त्याचा भारतीय उपखंडातील संस्कृतीवर असलेला प्रचंड प्रभाव ह्याला कमी लेखण्याचा माझा उद्देश नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaydip.kulkarni
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/27/2011 - 16:49 नवीन
>>> राधा ही काल्पनिक व्यक्तिरेखा आहे मान्य. >>>मुळात कृष्ण हीच काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. कसं काय ? काही संदर्भ ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विकास Fri, 01/28/2011 - 01:03 नवीन
मुळात कृष्ण हीच काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. असे विचारवंत म्हणतात का? ;) बाकी, "राधा कैसे न जले?" अथवा "राधा का भी शाम हो तो..." वगैरे वरून ठरवायचे असले तर भक्त म्हणता येणार नाही. पण तसे नसले तर मी देखील अवलीयांशी सहमत आहे की राधा ही काल्पनिक व्यक्तीरेखा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ग
गवि गुरुवार, 01/27/2011 - 10:06 नवीन
८ पेक्षा कमी वय असलेला मुलगा घ्यावा व गोपी मोठ्या घ्याव्यात आणि त्यांच्यातलं प्रेम वेगळ्या प्रकारे (भक्ती युक्त) सादर करावे. असं कसं करणार? विशेषत: लहान मुलांना हे पटणे की आईच्या वयाच्या बायकांची हा आठ वर्षांहून लहान बालक छेड (कृष्णविषयक गाण्यांतून उचललेला शब्द) काढतो आहे आणि तरीही नाते भक्तीचे आहे..आणि भक्तीही उलट्या दिशेत, म्हणजे आईच्या वयाच्या स्त्रियांची त्या लहान मुलावर भक्ती असे आहे. पोरं आधी काय कमी अक्कलवान असतात का? आणि त्यांना हे पटलं तर आपण (पक्षी आईबापांनी) त्यांची भक्ती करावी अशी अपेक्षा त्यांनी ठेवली नाही म्हणजे मिळवली. रासक्रीडा म्हणजे नेमके काय? तो लहान पोराने करण्याचा प्रकार आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे पोरांसमोर तयार ठेवावी लागतील. पुन्हा "रासक्रिडेनिमित्त लहान वयातील श्रीकृष्णाच्या सहवासात गेल्याने गोपिकांच्या मनातील विकार नाहीसे होऊन त्यांना आध्यात्मिक आनंद मिळाला" म्हणजे काय? विकार गेले ते लहान मुलाशी रासक्रीडा करून ? का गेले विकार? कसे गेले विकार? विकार म्हणजे नक्की काय गेले? म्हणजे पुढे त्या ब्रम्हचारी झाल्या का? गोपींना सरळसरळ प्रेमभाव उत्पन्न झालेला सर्वत्र सांगितला दाखवला जात असताना. एक राधा एक मीरा, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी इ इ इ या सर्वांच्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण आठ वर्षांहून कमी वयाचे होते म्हणणे म्हणजे गुंता कमी करण्याऐवजी वाढवणे होय..त्यापेक्षा गैरसमज तर गैरसमज..असू दे..
  • Log in or register to post comments
न
नन्दादीप गुरुवार, 01/27/2011 - 10:21 नवीन
>>८ पेक्षा कमी वय असलेला मुलगा घ्यावा व गोपी मोठ्या घ्याव्यात आणि त्यांच्यातलं प्रेम वेगळ्या प्रकारे (भक्ती युक्त) सादर करावे. मला नाही वाटत ८ वर्षांचा मुलगा आंघोळीला गेलेल्या गोपींचे कपडे पळवील. तात्पर्य : वरील प्रमाणे दिले गेलेले वयाबाबतचे दाखले चुकीचे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
व
वपाडाव गुरुवार, 02/03/2011 - 07:26 नवीन
>>मला नाही वाटत ८ वर्षांचा मुलगा आंघोळीला गेलेल्या गोपींचे कपडे पळवील.. कपडे पळवायला काही वयाची सीमा नाही... खोड म्हणून करता येईलही... पण झाडामागे/झाडावर लपून "ते" बघायला मात्र ८ पेक्षा जास्त वय लागेल..... काय म्हणता ?? पण सारखा सारखा हा "८" वर्षांचा उल्लेख थोडासा विचित्र वाटतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप
व
विजुभाऊ Fri, 01/28/2011 - 06:29 नवीन
राधा ही एक काल्पनीक व्यक्तीरेखा आहे. पण भागवतात राधेचा पती " अनय" आहे असे देखील सांगितलेले आहे. जर भागवतानुसार गेलो तर कृष्ण आठ नऊ वर्षाचा होता तेंव्हा राधा बारा तेरा किंवा थोडी मोठी असावी. महाभारातातकाळात ( इ स ३१०० ख्री पू. ) कृष्णाच्या ज्या व्यक्तीरेखा आहेत त्या नुसार गोकुळातील कृष्ण , मथुरेतील कृष्ण आणि द्वारकेतील कृष्ण या तीन वेगवेगळ्या व्यक्तीरेखा होतात. राधे सोबतचा कृष्ण हा गोकुळातील कृष्ण आहे. आजदेखील भागवत धर्मातील ( श्रीमद वल्लभाचार्य प्रणीत ) कृष्णाचे स्वरूप हे लहान मुलाचेच आहे असे मानले जाते. गुजरातेत बर्‍याच ठीकाणी कृष्णाची पूजा तो एक छोटे बाळ आहे असे मानुनच त्याचे लाड कौतूक करावे तशी केली जाते. लहान बाळाला आपण काय मागणार? बाळाला खेळवायचे हीच भक्ती. खरे तर निष्काम भक्तीचा हा कळस ठरावा. पण तेथेही कर्मकान्ड सुरू झाले. ओरीसातील वैष्णव धर्म हा तर मानतो की कृष्ण हा पूर्नपुरुषोत्तम आहे आणि इतर सर्व गोपी आहेत. ( हा धर्म पाळणारे पुरुष तेथे साड्या नेसतात ,महिन्याचे चार दिवस बाहेर बसतात. कर्मकान्डाचे हे दुसरे बीभत्स टोक ) राधा कृष्ण भाव हा नहान मुलांच्या मनात असलेला प्रीती भाव आहे. क्षणभर मानूया की राधा ही एक मोठी स्त्री आहे. त्या स्त्रीला एखाद्या लहान मुलाबद्दल अतीव माया ममता असेल तर ती स्त्री त्यामुलाबद्दल वेडी होईल. पण ते प्रेम शारीरीक किंवा आपण म्हणतो त्याप्रमाणे गर्ल फ्रेन्ड बॉय फ्रेन्ड सारखे नसावे. एखाद्या लहान मुलाचा लळा लागणे या भावनेचा पुढच्या काळात विपर्यास केला गेला. राधा का भी शाम होतो मीरा का भी शाम्...असे म्हणण्यात काही चूक नाही. आपण लहान बाळाला विचारतोच ना की तू आईचा की मावशीचा म्हणून. मीरा आणि राधा यांच्यात कित्येक शतकांचे कालान्तर आहे. लहान मुलाने खोडीलपणे कोणाचे माठ फोडणे किंवा अंघोळीला गेलेल्या गवळणींचे कपडे पळवणे यात वयाचा काय संबन्ध येतो? रास क्रीडा हा एक खेळ आहे. आजदेखील स्त्री पुरुष एकत्र येवून काही सामुदायीक अ‍ॅक्टीव्हीटी किंवा गमतीचे खेळ खेळतात हे फक्त महाराष्ट्रातच दिसत नाही . उत्तरभारतात हे सर्वत्र आढळुन येते. गरबा , बैसाखी , होली , लोढी वगैरे प्रसंगी स्त्रीपुरुष एकत्र येवून नाचतात. गाणी म्हणतात. रास हा खेळ आहे त्यात अश्लील काहीच नाही. तो आजही समाजमान्य आहे. गुजरात मधे खेळला जातो. राधा कृष्ण हे प्रेमाचे प्रतीक आहेत ही कवीकल्पना. प्रत्यक्ष प्रेम प्रदर्षीत करण्या ऐवजी कित्येक कविनी राधा कृष्णावर गीते लिहिली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
श
शिल्पा ब Fri, 01/28/2011 - 06:43 नवीन
उत्तर आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ग
गणपा Fri, 01/28/2011 - 08:30 नवीन
विजुभौंचा प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
प
प्रचेतस गुरुवार, 01/27/2011 - 10:05 नवीन
मुळात महाभारतात आणि हरिवंशात राधेचा उल्लेखच नाही तेव्हा राधा ही काल्पनिक हरदासी पात्र.
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 01/27/2011 - 10:12 नवीन
वल्लींशी सहमत. ह्या सगळ्या कवी कल्पनांना चित्रपट निर्मात्यांनी फुकाची हवा दिली आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अवलिया गुरुवार, 01/27/2011 - 10:30 नवीन
चित्रपट निर्मात्यांनी की मध्ययुगात रागदारी, शास्त्रीय संगीत रचणार्‍यांनी अशा कल्पना करुन त्याभोवती रागदारी रचली? कृष्ण वजा करा, भारतीय संगीतात भले मोठे शून्य राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
र
रमताराम गुरुवार, 01/27/2011 - 19:03 नवीन
अवलियांशी सहमत. रागसंगीतातील बहुसंख्य बंदिशी या राधा-कृष्णाच्या वा त्यांच्या संदर्भातच प्रथम रुजलेल्या मधुराभक्तीच्या कहाण्या सांगतात. महाभारतात नसलेले राधेचे पात्र हे भागवतकारांची निर्मिती आहे असे म्हणतात. अवांतरः राधेबद्दल म्हणतात हे ठीक आहे पण श्रीकृष्ण हीसुद्धा काल्पनिक व्यक्तिरेखा आहे असे नाना म्हणतायत हे पाहून नानांचाही विचारवंत होऊ घातलाय की काय या विचाराने जीव घाबरा झालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 01/28/2011 - 03:40 नवीन
-१ आपण भागवत वाचले आहे का? भागवत वाचलंत तर त्यात राधा या पात्राचा उल्लेख नाही स्पष्ट दिसून येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम
र
रमताराम Fri, 01/28/2011 - 07:48 नवीन
अहो म्हणून तर 'म्हणतात' असे लिहिले कारण ही माहिती 'सेकंड सोर्स' मधून आली होती. (पक्की माहिती असती तर 'आहे' असे म्हटले असते.) की भागवत या ऐवजी भागवतधर्म म्हणायला हवे होते? जरा गोंधळ आहे माझा. आता विषय निघालाच आहे तर थोडा अधिक प्रकाश टाकावा ही विनंती. मधुराभक्तीचा संप्रदाय कोठून निर्माण झाला नि त्यात राधा-कृष्णाची प्रियकर-प्रेयसी अशी जोडी प्रथम कोणत्या काळात दिसू लागली हे जरा बयाजवार सांगाल तर चांगले काम होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
न
नितिन थत्ते गुरुवार, 01/27/2011 - 10:28 नवीन
गैरसमज पसरले आहेत की राधा कृष्णावर लेखन करणार्‍यांनीच तशा प्रकारचे लेखन केले आहे? -सुटली वेणी केस मोकळे...... या सार्‍याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा -आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले गं -त्या तिथे अनंगरंग रास रंगला, गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला मागे इथेच एकागौळणीवर चर्चा घडली होती त्यातही गोपी आणि कृष्णाच्या संबंधावर प्रकाश पडला होता. ही अजून एक.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 01/27/2011 - 10:35 नवीन
अवघडलो :) चर्चा वाचण्यास मात्र उत्सुक :)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 01/27/2011 - 10:38 नवीन
तुम्हाला अवघडन्यासारखं काय आहे? तुम्ही तर ८ पेक्षा मोठे आहात ना? लहान असाल तर असल्या चर्चा वाचू नका. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन गुरुवार, 01/27/2011 - 10:41 नवीन
तुम्हाला अवघडन्यासारखं काय आहे?
आता ८ पेक्षा छोटा असतो तर अवघडलो नसतो , हे तुम्हाला कळायला हवं होतं राव .. काय राव तुमी बी :)
तुम्ही तर ८ पेक्षा मोठे आहात ना?
बराच :) - ( रासक्रिडापटु) टारझन ( ८ पेक्षा म्हणजे ८ वर्षांपेक्षा , आम्ही कोणत्याही कँसर वर जनजागृती करत नाही )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 01/27/2011 - 16:38 नवीन
वय होय , मला वाटलं इंचातला हिशोब चालला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/26/2015 - 20:00 नवीन
इंचा-इंचाने माघार घेणे वगैरे आठवून डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
स्पा गुरुवार, 01/27/2011 - 10:42 नवीन
कुठ्लाश्या मराठी पिक्चर मध्ये अशोक सराफ ला श्रीकृष्ण म्हणून दाखवण्यात आलेले होते, Image removed. ते रूप बघून, माझ्या बालमनावर विपरीत परिणाम झाला.. आणि कृष्णावरून विश्वास उडायची वेळ आली होती
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 01/27/2011 - 10:48 नवीन
३ इडियट मधे जेंव्हा तिथे शर्मन जोषीच्या घरी जेवायला बसतात ,तेंव्हा शर्मनची दुष्काळी आई त्या लाटण्याने जेंव्हा त्याच्या बाबांची छाती खाजवुन देते , तेंव्हा मला अशोक सराफची आठवण होते ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ग
गणपा गुरुवार, 01/27/2011 - 10:57 नवीन
अग नाच नाच राधे उडवुया रंग... आसाच विश्वास माझा राधेवरुन उठला होता हे गाण पाहुन. गाण चांगल आहे. काळेआज्जी दिसल्याही सुंदर आहेत.. पण त्यांना नाचताना पहावत नव्हत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा गुरुवार, 01/27/2011 - 10:51 नवीन
हा गणपा तेच गाणं.... गाणं छान आहे पण....... असो ;)
  • Log in or register to post comments
म
मनराव गुरुवार, 01/27/2011 - 11:14 नवीन
स्पा, अता तुझ बाल मन ठिक आहे का रे....... ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा गुरुवार, 01/27/2011 - 11:14 नवीन
माफ करा, मी सायलींचा धागा ह्याक तर नाही ना केला?? संपादक मंडळ मला ओरडणार तर नाही ना???? Image removed.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार गुरुवार, 01/27/2011 - 11:16 नवीन
आपल्याला राधा म्हणले कि हेच आठवते. http://www.youtube.com/watch?v=XCiiCapMBrg
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 01/27/2011 - 12:34 नवीन
वास्तव आणि इतिहासात लिहिलेल्या गोष्टी यांचा ताळमेळ लागणे बर्‍याचदा अवघड होते. म्हणुन आताची ५ वर्षाची मुले पुढे जावुन १५-२० वयाची होतात तेंव्हा त्यांना समर्पक ठोस उत्तर तेंव्हा न मिळाल्याने त्यांचा इतिहासात लिहिलेल्या बर्‍याच गोष्टींवर विश्वास उरत नाही असे वाटते. अवांतर : मला वाटते इतिहासाचे संशोधन होण्यापेक्षा भविष्याचे संशोधन व्हावे. इतिहासात केंव्हा काय झाले यापेक्षा त्यातुन चांगले काय ते घेवुन आपल्या मुलांच्या मनावर ते चांगले कसे बिंबवावे हे पाहिले पाहिजे. इतिहास संशोधना ला ना नाहि पण त्यातुन ठोस .. समर्पक .. चांगले काही तरी नक्कीच निघाले पाहिजे असे मनापासुन वाटते.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 01/27/2011 - 12:43 नवीन
माझ्या मते रंजना जेव्हा उच्च पदावर होती .सराफ साहेब स्ट्रगलर होते .बहुतांशी सिनेमात ते दुय्यम नायकांच्या भूमिका करत नि ह्या बाईसाहेब लीड रोल मध्ये असायच्या .नंतर ते दोघाही नायक नायकीण म्हणून पडद्यावर आले .तिच्या अपघाता नंतर सराफ साहेबांनी जोशी बाईंशी लगीन लावले .त्यावेळी महागुरू जातीने उपस्थित होते असे वाचले आहे . ह्यांची मैत्री जगप्रसिध्ध आहे . दुर्दैवाने ह्यांच्या प्रभावाने म्हणा किंवा अजून कशाच्या ह्या चतुरस्त्र लेडी अमिताभ ची आजकालची प्रसारमाध्यमे दखल घेत नाही . सारे गामा च्या एवढ्या पर्वत ह्या अभिनेत्रीची गाणी किंवा तिच्यासाठी एखादा भाग असू नये हि शरमेची गोष्ट आहे . कोण होता स तू काय झालास तू हे दंद्वागीत माझ्या मते मराठीतील नंबर १ आहे .त्यातील सवाल जवाब निव्वळ अप्रतिम . हा सागरी किनारा गाणे असो किंवा फिटे अंधाराचे जाळे ह्यात तिचा वावर गाण्याला एक उंची देतो .त्याच सिनेमात तिचा तोंडात काही तरी चघळत बेरक्या नजरेने श्रीमंत गर्विष्ठ सुनबाई तोर्यात उभी राहिली आहे . तिचे नायक महाजनी अनू कुलदीप पवार हे अगदी साजेसे होते . शहरी व ग्रामीण भागात मराठी सिनेमा विभागल्या गेल्यावर त्यांचा सेतू जोडणारी नायिका कुठे अनू अप्सरा पर्वातील डेली सोपच्या गिरण कामगार ह्यांची तुलना होऊ शकत नाही . अभिनेत्रीला नृत्य पेक्षा अभिनय व त्याहून महत्वाचे एक अदा असली पाहिजे .रसिकांच्या कलिजा खलास करणारी . सध्या सराफ मामा आपल्या गत कर्तुत्वाला काळिमा फासणाऱ्या ज्या भूमिका करतो .त्या ह्या नटीने नक्कीच केला नसत्या . तिचा चानी अजून आठवतो .
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 01/27/2011 - 12:49 नवीन
छान लिहिले आहे, पण जरा मुळ विषय जो आहे त्यावर पण २ ओळी तर लिहा राव ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 01/27/2011 - 19:00 नवीन
फार पूर्वी कृष्ण महात्म्य वाचले होते . त्यात असे म्हटले आहे कि कितीतरी ऋषी मुनींनी अनेक वर्ष तप केले तेव्हा कुठे कृष्ण अवतारात त्यांना परत मनुष्य देह प्राप्त होऊन गोप गोपिका होऊन देवाच्या बाललीला ते पौगुदावस्थेत अश्या प्रवासाचे साक्षीदार व भागीदार बनता आले .त्यात असे म्हटले आहे .इंद्राणीला एकदा विष्णू च्या रूपाचा व कर्तुत्वाचा मोह पडून रत होण्याची इच्छा झाली ती ह्या पदावर असतांना कशी पूर्ण करायची ह्या विवंचनेत असताना तिला कुणीतरी (बहुदा बृहस्पती ) ह्यांनी कृष्ण अवतारात राधा बनून भू लोकी अवतरण्याचे सांगितले .व तिची इच्छा पूर्ण झाली . अशीच गोष्ट चंद्र व बहुदा देवांचे गुरु बृहस्पती ह्यांची बायको ह्या बाबत वाचली होती . तेव्हा चंद्राला शाप मिळाला होता कि तुझा शय होईल व तेज( रूप ) लयाला जाईन. व त्यासाठी उशाप बहुदा गणपतीने त्याला दिला त्यामुळे आपल्या कडे वर्षातून एकदा चंद्र दर्शन टाळायचे असते . फार पूर्वी वाचलेल्या पुरण कथा . बाकी मंथरेला पुढच्या जन्मात तिच्या पापाचे फळ म्हणून कुब्जा दासीच्या रुपात जन्म झाला व हे नाव तिला जन्मजात कुबड असल्याने मिळाले .व कृष्ण स्पर्शाने ते नाहीसे झाले .अशी एक सुध्धा कथा आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
प
पिवळा डांबिस गुरुवार, 01/27/2011 - 21:11 नवीन
बाकी मंथरेला पुढच्या जन्मात तिच्या पापाचे फळ म्हणून कुब्जा दासीच्या रुपात जन्म झाला व हे नाव तिला जन्मजात कुबड असल्याने मिळाले .व कृष्ण स्पर्शाने ते नाहीसे झाले .अशी एक सुध्धा कथा आहे . ओ शेठ! मंथरा रामाच्या काळात होती ना? मग तिला कॄष्णस्पर्श कधी झाला? :) का ती पण चिरंजीव आहे? (तुम्ही कैकयीची दासी मंथरा हिच्याबद्दल बोलत आहांत हे अ‍ॅझ्मशन केले आहे!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 01/27/2011 - 22:46 नवीन
हो तिच ति आग लावि (ललिता पवार ह्यांनी काय काम केले होते कुब्जेचे ) अरे बाबा तू पुराणकथा सोड .पण बी आर चोप्राचे महाभारत नाही का पहिले ? मी लिहिल्या प्रमाणे तिला परत पुनर्जन्म हा कुबडीचा मिळाला ती कंसाकडे दासी होती .कंस वध होण्याआधी कृष्ण व बलराम ह्यांची तिची भेट मथुरेच्या रस्त्यात झाली . महाभारताच्या ह्या भागामध्ये राधा आणि कृष्णाचा शेवटच्या भेटीचा करुणामय प्रसंग व नि पिवळ्या चे कुबजा प्रकरणी शंका समाधान http://www.youtube.com/watch?v=8Un7wKoA5iA&feature=channel
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
श
शेखर काळे Fri, 01/28/2011 - 01:11 नवीन
मंथरा .. किंवा कुब्जा .. तिला इतके वर्ष का वाट पहायला लागली जन्मासाठी ? रामाच्या नंतर किंवा त्यावेळेला परशुराम वगैरे होते की. अशीच गोष्ट चंद्र व बहुदा देवांचे गुरु बृहस्पती ह्यांची बायको ह्या बाबत वाचली होती . म्हणजे सगळ्या देवांच्या बायकांना खेळण्यासाठी कृष्णाचा जन्म झाला म्हणा की .. बरं .. देवांना खेळायची इच्छा झाल्यावर कोणाचा जन्म झाला म्हणायचा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
निनाद मुक्काम … Fri, 01/28/2011 - 08:20 नवीन
अहो काळे साहेब चंद्राची गोष्ट वेगळी आहे . त्याच्यावर देवांचे गुरु बृहस्पती ह्यांची पत्नी तारा भाळली त्याने प्रथम अधे वेढे घेतले .पण तिच्या पुढे काही त्याचे चालले नाही .पुढे बिंग फुटल्यावर त्याला शाप मिळाला .कि तुझे तारुण्य (तेज लयाला जाईन). गणपतीने त्याला उशाप दिला वर्षातून एकदा फक्त त्याचे दर्शन टाळावे जो पाहीन त्यावर आपटी येईल . हो गोष्ट आठवण्याचे कारण म्हंजे कृष्णावर त्याची दुसरी पत्नी सत्यभामा हिचा भावाचा एक दिव्य मणी चोरल्याचा आरोप आला .तेव्हा तो मणी शोधून आणून स्वताचे निर्दोष पणा त्याला सिद्ध करावा लागला . ह्याचे कारण म्हणजे कृष्णाने त्या दिवशी गोकुळात पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पहिले होते . जसे आठवले तसे लिहिले .बाकी राम अवतारानंतर कृष्ण अवतार येतो . परशुराम हा रामाच्या पहिला अवतार बाकी परशु धारण करतो म्हणून परशुराम नाव पडले . खुद्द इंद्र व अहिल्येची कथा आपल्याला ठावूक असेलच तिची शापाने शिळा झाली होतो .राम अवतारात तिची मुक्ती रामाच्या स्पर्शाने झाली .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर काळे
व
विजुभाऊ Sat, 01/29/2011 - 08:09 नवीन
गोष्ट आठवण्याचे कारण म्हंजे कृष्णावर त्याची दुसरी पत्नी सत्यभामा हिचा भावाचा एक दिव्य मणी चोरल्याचा आरोप आला .तेव्हा तो मणी शोधून आणून स्वताचे निर्दोष पणा त्याला सिद्ध करावा लागला . तो स्यमन्तक मणी . ह आगोदर सत्रजीताकडे होता . कृष्णाने त्यासाठी जांबुवन्ताशी लढाई केला. आणि नन्तर जांबुवन्ताने त्याची कन्या जांबुवन्तीशी कृष्णाचे लग्न लावून दिले. लग्नात आहेर म्हणून स्यमन्तक मणी कृष्णाला दिला . सध्या आस्तित्वात असलेला "कोहीनुर" हीरा हाच " स्यमन्तक" मणी असल्याचे काहीजण सांगतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
नरेशकुमार Sat, 01/29/2011 - 08:29 नवीन
सध्या आस्तित्वात असलेला "कोहीनुर" हीरा हाच " स्यमन्तक" मणी असल्याचे काहीजण सांगतात
मग आपन ब्रिटीशांकडुन परत मागुन का घेत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विश्वनाथ मेहेंदळे Fri, 01/28/2011 - 13:37 नवीन
>>देवांना खेळायची इच्छा झाल्यावर कोणाचा जन्म झाला म्हणायचा ? अप्सरांचा !!!! त्यांना विसरलात काय ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर काळे
आ
आवशीचो घोव् गुरुवार, 01/27/2011 - 13:47 नवीन
...नंतर ते दोघाही नायक नायकीण म्हणून पडद्यावर आले... तुम्हाला "नायक नायिका" असे म्हणायचे आहे, नायकीण या शब्दाचा अर्थ वेगळा होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा