नथुराम गोडसे म्हटलं.. की आठवतात.. "शरद पोन्क्षे"!....माय फेव्हरेट अॅक्टर! :)
त्यान्चा "परशुराम किल्लेदार"पण लई भारी आहे! ;)
__________________
असो... लेट कम टू द पॉईन्ट...
"नथुराम गोडसे" ही अशी एक व्यक्तीरेखा आहे... ज्याला गान्धीजींन्च्या काही मूल्-तत्वांबद्दल आत्यंतिक आदर आहे..
पण गान्धींचे काही मिळमिळित तत्वे... उदाहरणार्थः नको इतका अहिन्सावाद.... वगैरे.... गोष्टी साहजिकच तरूण आणि उसळत्या रक्ताला चीड आणणार्या आहेत... आणि त्यातूनच गांधींची हत्या घडली असावी... हा माझा प्राथमिक अन्दाज आहे...
लेट सी... या लेखावर अजून काही प्रतिक्रिया आल्याच... तर त्या अनुषंगाने चित्र अजून स्पष्ट होईल! :)
________________
शरद पोंक्षेंबद्दल व्यक्तिगत : "नथुराम गोडसे" हे नाटक जेव्हा प्रथम रन्गभूमीवर आले..तेव्हा सगळ्या "कॉन्ग्रेस्-वाल्यां"नी त्याचा प्रचंड निषेध नोन्दवल... अर्थातच.. ते नाटक न बघता.... सभा वगैरे घेतल्या... नाटक बन्द पाडण्यासाठी हिन्सक मार्ग ही अवलम्बला... अशाच एका सभेला मुम्बईला त्यांनी नथुराम्'चा रोल प्ले करणार्या शरद पोंक्षेंनाही बोलावले... बरीच भाषणबाजी वगैरे झाली... सभेच्या मध्यभागी एका खुर्चीवर हार घातलेला गान्धीजीन्चा फोटोही होता... कॉन्ग्रेस्वाल्यांनी बरीच टीका करून नथुराम्'ला यथेच्छ लाखोली वाहिली... गान्धीजी त्यान्चे परमदैवत असल्याचे वगैरे सान्गून सेन्टीमेन्टल भाषणे ठोकली...
झालं... सभा सम्पली.... सगळे आपापल्या घरी गेले... तेव्हा पुन्हा शरद पोन्क्षे.. त्या रिकाम्या मैदानात गेले... कारण त्या दिवशी रात्री त्यांचा "शो" होता.. तेव्हा मैदानात एक रिकामी खुर्ची दिसली.. त्यांनी जवळ जाऊन पाहिले.. तर त्याच खुर्चीच्या खाली गांधीजींचा फोटो.. धुळीत पडलेला होता.... तासाभरापूर्वी... ज्यांन्च्या नावाने राजकारण करून कॉन्ग्रेसवाल्यांनी शरदजींना दम भरला होता.... त्याच गांन्धीजीन्चे आता कोणालाच काहीच सोयसुतक नव्हते....
शरदजींनी तो फोटो.. उचलला.. खिशातल्या रूमालाने पुसला ..आणि आपल्या रुमवरती नेला....व आपल्या पेटीमध्ये व्यवस्थित ठेवून दिला....
एकदा अशीच एकदा मुलाखत देताना ते म्हणाले, की "जरी मी नथुरामचा रोल करतोय तरी गान्धीजींबद्दल मला खूप आदर आहे.. पण तो आदर कॉन्ग्रेसवाल्यांसारखा बेगडी नक्कीच नाही...गांधीजींचा फोटो मी ज्या बॅगेत ठेवला होता... तीच बॅग मी नथुराम'चा प्रयोग करताना वापरायचो.. आजही गांधीजींचा फोटो नथुराम गोडसेंच्या पेटीमध्ये अत्यंत सुरक्षित आहे!" :)
या सगळ्यात शरद पोंक्षांचा काय संबंध? शरद पोंक्षे सज्जन, गांधीप्रेमी वगैरे असले म्हणून त्यांनी रंगवलेला नथुराम समर्थनीय होतो का?
निळूभाऊंनी सामना मध्ये हिंदुराव धोंडेपाटलाची भूमिका केली. ते स्वतः अगदी सज्जन होते. म्हणून हिंदुराव धोंडेपाटील ही व्यक्तिरेखा (आणि ती सरंजामी प्रवृत्ती) समर्थनीय होत नाही.
नितीन'जी... मला शरद पोन्क्षेंची नाही.. तर गांधींचा बेगडी उदोउदो... करणार्या कॉन्ग्रेस्'ची चीप मेन्टॅलिटी दाखवायची होती...
शरद पोन्क्षे... हे एक माध्यम आहेत.... :)
माझी अशी थिअरी आहे की हे केवळ सक्रीय काँग्रेसजन करतात असे नाही. तर ते अगदी जे गांधींनाच श्रेष्ठ समजतात आणि क्रांतीकारक आणि त्यांच्या चाहत्यांची थट्टा करतात, ते गांधी पुण्यतिथीस स्वतः त्यांची आठवण करणारे लिहीतही नाही आणि तशा चालू असलेल्या गंभीर चर्चेत देखील सहभागी होत नाहीत. कारण, "अशा गांधीवाद्यांना गांधीजी किंवा गांधीवादाची आठवण क्रांतीकारक स्वातंत्र्यसैनिक आणि त्या मार्गावर वाटचाल करणार्यांना डिस्क्रेडिट करण्यापुरतीच येते." :-)
तेंव्हा पोंक्षे हे वास्तव आणि चपखल असले तरी त्यामानाने फार लांबचे उदाहरण आहे... ;)
बाकी मूळ चर्चेबाबतः कुठल्याही कलाकृतीवर बंदी घालण्याच्या मी विरोधात आहे. पण, "मी नथुराम बोलतोय.." हे नाटक ऐतिहासीक घटनेस धरून नाही असे ज्येष्ठ विचारवंत य.दी. फडके यांचे मत आहे. (‘Mee Nathuram’ distorts history, complains scholar) . त्यामुळे त्याच्यातील भ्रष्टकरण काढून केवळ जे काही नथुरामने पुस्तकात म्हणले ते सांगितले तर एकेरी का होईन, पण किमान त्या ऐतिहासीक दृष्ट्या काही अंशी खरे ठरेल..
असो.
(स्कोअर सेटलिंग फक्त उपक्रमावरच चालते असे वाटत होते).
माझ्या लेखाचा संदर्भ असल्याने या प्रतिसादाला उत्तर देत आहे.
>>तर ते अगदी जे गांधींनाच श्रेष्ठ समजतात आणि क्रांतीकारक आणि त्यांच्या चाहत्यांची थट्टा करतात,
गांधींना मानणार्यांपैकी कोणीही, कधीही मिसळपाववर क्रांतिकारकांची थट्टा केल्याचे स्मरत नाही. मी देखील कधी केलेली नाही. त्यांच्या मार्गाच्या परिणामकारकतेविषयी किंवा अनुकरणीयतेविषयीच चर्चा होते.
गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने या आपण सुरू केलेल्या चर्चेत भाग घेण्यास वेळ झाला नाही. :( परंतु इजिप्तमधल्या घटनांचा आणि तेथील सैन्याने सरकारशी पुकारलेल्या असहकाराच्या संदर्भात गांधींच्या तत्त्वाबाबत लेख लिहिण्याचा विचार अजूनही आहे. वेळ मिळाला की लिहीन.
(स्कोअर सेटलिंग फक्त उपक्रमावरच चालते असे वाटत होते).
तसा काही नाही आणि उपक्रमाला/उपक्रमींना मधे आणायचीही गरज नाही. जे दिसले ते त्या संदर्भात लिहीले इतकेच. बरं तुम्ही थोडेच काही अनसेटल केले होते जे सेटल करायची गरज भासावी? :-)
गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने या आपण सुरू केलेल्या चर्चेत भाग घेण्यास वेळ झाला नाही.
अच्छा! :-) मुद्दा चर्चेत सहभागी होण्याचाच नसून चर्चा चालू करण्याचा पण होताच... शिवाय (वेळ झाला नाही) असेच जर इतरांच्या बाबतीत झाले असे समजण्याऐवजी नवीन थिअरी शोधायची घाई कशाला करायची? असो.
थिअरी शोधायची घाई केली नव्हती. माझी जुनी थिअरी आहे. त्या थिअरीच्या धाग्यावर येथील स्नेही सदस्यांशी खरड झाल्याचे लिहिले होतेच.
शिवाय या प्रतिसादात देखील त्या थिअरीची झलक दाखवली होती.
>>विरोध करायचा तर वैचारिक दृष्ट्या करावा असे माझे मत आहे. नाटक बंद पडून की साध्य होणार आहे .
हॅ हॅ हॅ. रोचक वाक्य. :)
प्रत्येक को.ब्रा. नथुरामप्रेमी नसतो पण प्रत्येक नथुराम प्रेमी को.ब्रा. असतो.
अपेक्षितच होता हा प्रतिसाद.
टार्याच्या खालच्या प्रतिसादात ***** जागी जो शब्द अपेक्षित असतो त्यात न बसणारे अतिरेकी दाखवता येतातच.
त्याला सामंतर्य दाखवण्यासाठीच माझ्या प्रतिसादातले वाक्य होते.
अरे वा... म्हणजे तुम्ही भलतेच पोचलेले दिसता की! टार्या असं काही लिहील असं तुम्हाला स्वप्न पडलं आणी तुम्ही त्यातलं सामंतर्य दाखवण्यासाठी आधीच असं वाक्य लिहिलं. नाहीतर एरवी तुम्ही जातीयवादी नाहीच!
>>म्हणजे तुम्ही भलतेच पोचलेले दिसता की! टार्या असं काही लिहील असं तुम्हाला स्वप्न पडलं
आँ. माझा प्रतिसाद १३:२४ भा प्र वेळेचा आहे आणि टार्याचा त्याच्या आधीचा १३:१६चा.
पण तुम्हाला जे सामंतर्य वगैरे दाखवाय्चे होते ते वाक्य तर तुम्ही १३:०७ च्या प्रतीसादात दिलेले दिसते आहे. १३:२४ चा प्रतीसाद तर तुम्ही स्पष्टीकरणासाठी खर्च केलेला दिसतो आहे.
>>सामंतर्य - मराठी भाषेतील समांतर'ला एक जुळे भावंड दिल्याबद्दल आपले अभिनन्दन!
सामंतर्य हा शव्द धनंजय यांच्याकडून शिकलो. माझा शोध नाही. धनंजय यांनी तो वापरला असल्याने तो चुकीचा असणार नाही असे वाटते. (त्यांनी वापरलेला शब्द एक्झॅक्टली हाच नसेल सुद्धा... पहायला लागेल).
योग्य शब्द 'सामांतर्य' असा असावा, 'सामंतर्य' असा नव्हे (स्वभाषा आत्मविश्वासाने वापरणार्याच्या अधिकारास अनुसरूनसुद्धा), असे सुचवावेसे वाटते. (चूभूद्याघ्या.)
मी पण !
...१९४८ साली गांधीजी गेले, पण त्यांचा मृत्यू ५ वर्ष आधी किंवा ५वर्ष नंतर झाला असता तर त्याचे भारतावर (चांगले,वाईट)काय परिणाम झाले असते,हे तज्ञांकडून जाणून घ्यायला आवडेल.
बहुतेक गांधीकाका हाताबाहेर निघुन गेले असावेत. नथुराम त्यांचा वैचारिक विरोध करत राहिले असते तर पाकिस्तान विभाजन अनुमती , ५५ कोटी , नेहरुला प्रधाणमंत्री इत्यादी निर्णयांपाठोपाठ अजुन एकेक निर्णय घेतले गेले असते. असे नथुरामांना वाटले असावे. त्यापेक्षा गांधी काकांचा वध केल्या गेल्या असावा.
अधिक प्रकाश जाणकार टाकतीलंच :)
-
>>बहुतेक गांधीकाका हाताबाहेर निघुन गेले असावेत. नथुराम त्यांचा वैचारिक विरोध करत राहिले असते तर पाकिस्तान विभाजन अनुमती , ५५ कोटी , नेहरुला प्रधाणमंत्री इत्यादी निर्णयांपाठोपाठ अजुन एकेक निर्णय घेतले गेले असते. असे नथुरामांना वाटले असावे. त्यापेक्षा गांधी काकांचा वध केल्या गेल्या असावा.
ही काही कारणे गोपाळ गोडसे यांनी क्लेम केली आहेत.
५५ कोटींचा गांधींनी उपोषण केल्यामुळे द्यायला लागले ही गोष्ट खोटी असल्याचे या धाग्यावर दाखवून दिले आहे.
फाळणीला संमती देण्याचे काम काँग्रेसमधून सर्वप्रथम सरदार पटेल यांनी केले.
Vallabhbhai Patel was one of the first Congress leaders to accept the partition of India as a solution to the rising Muslim separatist movement led by Muhammad Ali Jinnah. He had been outraged by Jinnah's Direct Action campaign, which had provoked communal violence across India and by the viceroy's vetoes of his home department's plans to stop the violence on the grounds of constitutionality. Patel severely criticised the viceroy's induction of League ministers into the government, and the revalidation of the grouping scheme by the British without Congress approval. Although further outraged at the League's boycott of the assembly and non-acceptance of the plan of 16 May despite entering government, he was also aware that Jinnah did enjoy popular support amongst Muslims, and that an open conflict between him and the nationalists could degenerate into a Hindu-Muslim civil war of disastrous consequences. The continuation of a divided and weak central government would in Patel's mind, result in the wider fragmentation of India by encouraging more than 600 princely states towards independence.[42] Between the months of December 1946 and January 1947, Patel worked with civil servant V. P. Menon on the latter's suggestion for a separate dominion of Pakistan created out of Muslim-majority provinces. ( http://en.wikipedia.org/wiki/Vallabhbhai_Patel )
असो.
नाटकावर बंदी घालण्याची मागणी चुकीचीच आहे. नाहीतरी ती एक काल्पनिक कलाकृती आहे असे याच संस्थळावर म्हटले गेले आहे.
अवांतर :-
माझे आजोबा म्हणत असत गांधीजीनी देशाला ३ हानिकारक गोष्टी देल्या.
१) खादी - जी राजकारणी लोक घालतात. अर्थ - खा - आधी .
२) खाकी- जी पोलीस/ सरकारी कर्मचारी घालतात. अर्थ- खा - कि
३) गांधी टोपी - जी घालून हे सगळे आपल्याला टोप्या घालतात .
खादी एक वेळ ठिक आहे समजु,
पण गांधींनी खाकी चा प्रचार/प्रसार कधी कुठे केला ते वाचायला आवडेल.
तेच गांधी टोपी बद्दल.. मी तरी मोहनदास करमचंद गांधींचा गांधी टोपी घातलेला फटु पण पाहिला नाहीये.
१९२० सालचा फोटो असल्याचं वेबसाईटवर म्हटलं आहे.
फोटो श्रेय
श्री. राहुल शर्मा
http://blogscoolpics.blogspot.com/2010/10/mahatma-gandhi-mohandas-karamchand.html
"खाकी" हा शब्द पश्तुनी भाषेतील "खाक" या शब्दावरून आला आहे असं म्हणतात. खाक म्हणजे माती. अर्थातच खाकी म्हणजे "मातकट".
इंग्रज सैन्यात शूर पठाण लोकांची एक तुकडी १८४७ साली बनविण्यात आली. तिचं नाव "कॉर्प्स ऑफ गाईड". या तुकडीने सर्वप्रथम खाकी कपड्याचा गणवेष वापरला असा उल्लेख सापडला.
अर्थातच खाकी ही महात्मा गांधी यांची देणगी नसावी!
>>इंग्रज सैन्यात शूर पठाण लोकांची एक तुकडी १८४७ साली बनविण्यात आली. तिचं नाव "कॉर्प्स ऑफ गाईड". या तुकडीने सर्वप्रथम खाकी कपड्याचा गणवेष वापरला असा उल्लेख सापडला. >>
कुठे???
लगेच त्यांचे आभार मानून टाका बरे का....जाला वरून असेल तर ती लिंक टाक, पुस्तक/व्यक्ती असेल तर संदर्भ द्या....नाही काय आहे, आज काल फॅशन निघालीये अस करण्याची...नायतर लोक रागावतात म्हणे...
इंग्रज सैन्यात शूर पठाण लोकांची एक तुकडी १८४७ साली बनविण्यात आली. तिचं नाव "कॉर्प्स ऑफ गाईड".
"कॉर्प्स" नाही हो!
इंग्रजीत "कॉर्प्स" असा उच्चार होऊ शकणारा एकच शब्द, तो म्हणजे Corpse. अर्थः मुडदा.
"पथदर्शकाचा मुडदा" असे या तुकडीचे नाव होते काय?
उलटपक्षी, आपल्याला अपेक्षित शब्द Corps असा आहे. (शेवटी e नाही याची कृपया नोंद घ्यावी.) उच्चारी: "कोर".
(शिवाय, त्या तुकडीच्या नावातील "गाइड्स" अनेकवचनी आहेत - "गाइड" नसून, "गाइड्स" - हा आणखी एक मुद्दा.)
तेव्हा, कृपया "कोर ऑफ गाइड्स" म्हणा. नाहीतर अर्थाचा अनर्थ होतो.
अवांतर दुरुस्तीसाठी धन्यवाद! आतापर्यंत या शब्दाचा उच्चार कधीही न ऐकल्यामुळे नकळत हातून सायबाच्या भाषेचा "मुडदा" पडला याची नाही म्हटलं तरी जरा मौज वाटली. याचं कारण म्हणजे core या शब्दाचा उच्चार कोर असा आहे हे माहित होतं. पण 'corps' चा उच्चारही 'कोर' आहे ही मला नवीन माहिती आहे. जरूर लक्षात ठेवीन.
आणखी अवांतरः 'विकि' वर शोधता या शब्दाचे मूळ 'corpus' हा Latin शब्द आहे. आणि त्याचा अर्थ 'body' असा सापडला. आणि विंग्रजीत अश्या अनावश्यक अक्षरांच्या शेपट्या लावायची पद्धत का असावी असा एक विचार डोक्यात येऊन गेला.
याचं कारण म्हणजे core या शब्दाचा उच्चार कोर असा आहे हे माहित होतं. पण 'corps' चा उच्चारही 'कोर' आहे ही मला नवीन माहिती आहे.
(शाळेत असताना वगैरे) NCCबद्दल कधी ऐकले नाहीत वाटते?
असो. एक विनोद आठवतो.
आमचे सरदारजी सैन्यात असतात. आणि सैन्याबद्दल त्यांना प्रचंड अभिमान असतो. इतका, की त्यांच्या मुलांची नावे पण 'सुभेदारसिंह', 'मेजरसिंह' अशी ठेवलेली असतात.
तर ड्यू कोर्समध्ये त्यांची पत्नी पुन्हा एकदा गरोदर राहते. तिच्या बाळंतपणासाठी रीतसर रजा घेऊन सुट्टीवर जायला निघण्यापूर्वी बरोबरच्या सैनिकांचा निरोप घ्यायला जातात, तेव्हा सहज चौकशी होते.
"काय सरदारजी, या वेळी मुलाचे नाव काय ठेवणार?"
"हम्म्म्म्म्... 'सुभेदार' झाला, 'मेजर' झाला. यावेळी थेट 'जर्नैलसिंह' ठेवेन म्हणतो."
"आणि समजा यावेळी मुलगी झाली तर?"
"हरकत नाही. तिचे नाव 'आर्मर्ड कौर' ठेवू की, त्यात काय?"
मला हे नाटक अति ष्टाईलबाज आणि टाळ्याकाढू बटबटीत संवादांनी भरलेले वाटले..... साउथच्या सिनेमातला हीरो कसा असतो, तसे पेश केले आहे.... इन्स्पेक्टर तर त्याच्या इतका भजनी लागलेला मला पाहवला नाही.. नक्की तसेच होते का, खरे खोटे माहित नाही...
घरी आल्यावर प्रचंड भारावलेल्या चुलतकाकांशी तासभर वादविवाद केल्याचे आठवते.( माझा पवित्रा "तुमचे सगळे खरे असेल, पण या घटनेमुळे गांधीजी अधिक मोठे झाले" ..)
प्रतिक्रिया