त्या नारयन लेले यांणीपन काणाडॉळा केला ना....
मी चुकून हे वाक्य "त्या नारायण राणे यांणीपन काणाडॉळा केला ना...." असे वाचले आणि एकदम (कळफलकरूपी) लेखणीने प्रहार झाल्यासारखे वाटले! ;)
गांधीजींनी खरोखर "हे राम ! " असे शब्द मरतांना उच्चारले होते का?
यावर पण मागे एकदा मिपावरच काथ्याकुट (हाणामारी) झाला होता असे स्मरते.
जिज्ञासुंनी थोडी उचका-उचकी करावी.
मी दिली असती लिंक शोधुन पण मग लोक मला टोमणे मारतात. ;)
गांधीजींनी खरोखर "हे राम ! " असे शब्द मरतांना उच्चारले होते का?
त्याचा इथे काय संबंध...
ती धागा वाचुन माझ्या मनातली प्रतिक्रिया आहे मी टाकली..
तसेही अशा काथ्याकुटाच्या निमित्त्याने का होईना आम्हाला राम नाम घ्यायची संधी मिळते इतकाच तो काय काथ्याकुटाचा फायदा.
ती धागा वाचुन माझ्या मनातली प्रतिक्रिया आहे मी टाकली..
सहमत आहे. आणि तुमचे हे राम वाचून आमच्या मनात जी प्रतिक्रिया आली ती आम्ही टाकली.
त्यानिमित्ताने वाचणारे दोनदा राम वाचतील... तेवढंच देवाचं नाव.
नथुरामचे कर्तृत्व काय तर एका म्हातार्या माणसाला त्याच्या पाया पडायच्या निमित्ताने गोळी झाडून खून करणे.
हे कृत्य अत्यंत भेक्कड होते. त्या कृत्याचा उदोदो कशासाठी करायचा.
गांधीनी मरताना हे राम म्हंटले काय किंवा नुसते एखादा अस्फूट उद्गार उच्चारला असेल याच्यावर वाद कशासाठी.
त्याने काय साध्य होनार आहे. गांधी हट्टी होते हे खरेच. पण त्यानी जे इतराना जमले नाही ते जमवून दाखवले.
त्यानी देशातील सर्वसामान्य माणसाला देशसेवे साठी प्रवृत्त केले . सर्वसामान्य माणसाला देशसेवेचा एक मध्यममार्ग दाखवला. इतरांची देशनिष्ठा तेवढीच सच्ची होती जेवढी गांधींची होती.
गांधींचे अनुकरण देशातील खेड्यापाड्यातील लोकानी देखील केले.
अहिंसा हे शस्त्र गांधीनी वापरले आणि व्यक्तीच्या नव्हे तर प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा उभारला.
ब्रीटीश शासन गेले तरी भारताचे राजकारणात इंग्लंड सोबत संबन्ध चाम्गले राहिले. त्याचा फाय्दा भारताला जागतीक राजकारणात झाला. सत्ता सनदशीर मार्गाने सर्वसामान्यांच्या हातात आली आणि देशात अराजक माजले नाही.
याबात कोणाचेच दुमत नसावे.
+१
गांधींची गरज स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हढी होती त्यापेक्षा जास्त स्वातंत्रोत्तर काळात होती. इतक्या प्रचंड आत्मबलाचा मनुष्य नुकत्याच जन्मलेल्या भारतीय लोकशाहीस खुपच उपकारक ठरला असता.
अर्धवटराव
>>गांधी हट्टी होते हे खरेच. पण त्यानी जे इतराना जमले नाही ते जमवून दाखवले.
त्यानी देशातील सर्वसामान्य माणसाला देशसेवे साठी प्रवृत्त केले . सर्वसामान्य माणसाला देशसेवेचा एक मध्यममार्ग दाखवला. <<
हेच म्हणतो.
गांधीजींच्या आधी स्वातंत्रलढा हा तितका जनव्यापी नव्हता, जेवढा त्यांनी केला.. त्यांच्या "गाँव चलो"च्या नार्याने शेतकर्यांना आणि गावकर्यांना आकृष्ट केले, "रामराज्य"च्या संकल्पनेने हिंदुंना लढ्यात ओढले,
"खलिफत /खिलाफत" ने मुस्लिमांनी त्यांना आपले मानले, "स्त्री-समानते"च्या विचारांनी स्त्रिया लढ्यात सामिल झाल्या. "स्वदेशी" च्या घोषाने व्यापारी वर्ग त्यांच्याकडे आणि लढ्यात ओढला गेला....
गांधीजी राजकारणी होते आणि मुत्सद्दी पण. ही हॅड हिज ओन शेअर ऑफ फेल्युअर्स.. पण "ग्रेट" होते हे पण नक्कीच..
"खलिफत /खिलाफत" ने मुस्लिमांनी त्यांना आपले मानले,
त्यांना मुस्लिमांनी आपले मानले हे विधान वादग्रस्त आहे. किंबहुना हे साफ चुकीचे विधान आहे. गांधींजींनी खिलाफतच्या निमित्ताने संपूर्ण मुस्लिम समाजाला खेचून मूळ राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. पण मुसलमान समाज इतका (आजच्याइतकाच) नाकर्ता आणि नादान होता की त्यांनी या हाकेला ओ दिली नाही. ३७ का ४० साली ज्या निवडणुका झाल्या त्यांचे रिझल्ट ही वस्तुस्थिती सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत. राष्ट्रीय सभा अर्थात काँग्रेसने मुस्लिम्बहुल भागात म्हणजे आजच्या पाकिस्तानात मजबूत मार खाल्ला आणि मुस्लिम लीग मात्र दणकून जिंकली. गांधीजींवर मुस्लिम अनुनयाचा आरोप होत असला तरी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांचे ९०% पेक्षाही जास्त अनुयायी हिंदू समाजाचे होते. भारतामध्ये हिंदू बहुसंख्यांक असल्यामुळे भारतीयांचा नेता आणि हिंदूंचा नेता असा फरक करता येत नाही. ज्यांच्यावर मुस्लिम अनुनयाचा आरोप झाला तो नेता हा बहुसंख्य हिंदूंचा नेता होता ही बाब सूचक आहे
"खलिफत /खिलाफत" ने मुस्लिमांनी त्यांना आपले मानले,
त्यांना मुस्लिमांनी आपले मानले हे विधान वादग्रस्त आहे. किंबहुना हे साफ चुकीचे विधान आहे.<<
मी हे बोललो कारण की त्यावेळी मुस्लिम नेत्यांनी खिलाफतचे नेतृत्व गांधीजींनाच दिले होते. माझ्या माहितीप्रमाणे जिन्नांच्या काँग्रेसमध्ये येण्यामागे गांधीजींचे नेतृत्व बर्याच अंशी कारणीभूत होते. (जाणकारांनी प्रकाश टाकावा) नंतरच्या राजकीय घडामोडींने जो बदल घडला तो भाग वेगळा...
राष्ट्रीय सभा अर्थात काँग्रेसने मुस्लिम्बहुल भागात म्हणजे आजच्या पाकिस्तानात मजबूत मार खाल्ला आणि मुस्लिम लीग मात्र दणकून जिंकली
हे खरे नाही.
१९३७ च्या निवडणूकीत मुस्लिम्-बहुल पंजाब आणि बंगालात अनुक्रमे युनियनिस्ट पार्टी (सर फझल-इ-हुसेन) आणि कृषक प्रजा पार्टी (फझलुल हक) यांचे सरकार आले होते. मुस्लिम लीगचे नव्हे.
तसेच सरहद्द प्रांतातदेखिल काँग्रेसचे खान अब्दुल गफार खान यांचे सरकार निवडून आले होते.
विस्कळित स्वरूपात लिहिलेल्या धाग्याच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रियांचा जमेल तसा घेतलेला परामर्ष :
१. प्रस्तुत धागा : शिळ्या कढीला नवा ऊत.
२. "नथूराम गोडसे बोलतोय" हे नाटक बटबटीत आहे. कंटाळवाणे बटबटीत. ज्यात नुसती बोंबाबोंब भाषणबाजी आहे. विचार करणार्या कुठल्याही माणसाला - अगदी हिंदुत्ववादी माणसालाही - यात काय हाती लागेल असा प्रश्न पडतो.
३. सर्व अमुक प्रकारचे लोक तमुक असतातच असे नाही पण तमुक मात्र अमुक असतात या प्रकारच्या विधानांमधे द्वेष स्मगल करून आणलेला असतो; आव मात्र संतुलित विधाने केल्याचा असतो.
थोडक्यांत असे की , गांधीविरोध, नथुरामप्रेम, हिंदुत्ववाद, काँग्रेसविरोध या प्रकारच्या कुठल्याही गोष्टी मांडायच्या असतील तर काही नीट विधाने करावीत, काय असतील ती आर्ग्युमेंट्स मांडावीत. आपल्या स्वतःच्याच अजेंड्याला थोडा तरी आदर हवा असेल तर विस्कळित, "इनोदी" , सनसनीखेज़ विधाने करायच्या ऐवजी आपल्या विचारांचा व्यूह मांडावा.
मुसु तुम्ही अनिल बर्वेंचे 'थँक्यू मि. ग्लाड' वाचले/पाहिले असेलच. 'नथुराम' वाचून/पाहून मला त्या नाटकाची आठवण का झाली कुणास ठाउक. :)
बाकी गांधी वि नथुराम या लढाईबद्दल म्या अज्ञ पामराने काय बोलावे. पुन्हा एकवार झालेल्या रणधुमाळीत एकही नवा मुद्दा मिळाला नाही हे मात्र खरे. एकुण ही लढाईदेखील शाकाहार/मांसाहार, देव आहे/नाही या वादांप्रमाणेच 'सनातन' ठरणार असे दिसते.
-(विराम)
विचार करणार्या कुठल्याही माणसाला - अगदी हिंदुत्ववादी माणसालाही - यात काय हाती लागेल असा प्रश्न पडतो.
"(प्रत्येक हिंदुद्वेष्टा हा विचारवंत नसतो, पण) प्रत्येक विचारवंत हा हिंदुद्वेष्टा असतो" या (सुप्रसिद्ध) प्रेमाइसास ग्राह्य धरता, आपल्या वरील वाक्यात कोठेतरी काँट्राडिक्षण इन टर्म्स होत आहे असे वाटत नाही काय?
तपासून पाहू.
प्रत्येक विचारवंत हा हिंदुद्वेष्टा असतो. ----------------------------------------------------- (१)
म्हणजेच, हिंदुत्वद्वेष्टा नसलेला कोणताही माणूस हा विचारवंत असू शकत नाही. ----- (२)
आता 'हिंदुत्ववादी माणसा'ची नेमकी व्याख्या खात्रीशीरपणे सांगू शकणार नाही (आणि सुदैवाने पुढील आर्ग्युमेंट करण्यापूर्वी तशी व्याख्या केलीच पाहिजे असे कोणतेही बंधन निदान या संकेतस्थळावर तरी अस्तित्वात असल्याचे ऐकिवात नाही), परंतु 'हिंदुत्ववादी माणूस' म्हणवून घेण्यासाठी 'हिंदुत्वद्वेष नसणे' एवढे किमान क्वालिफिकेषण बाळगूण असणे अपेक्षित असावे, अशी अटकळ आहे. ------------------------------------------------------------- (३)
त्यापुढे, 'विचारवंत' या शब्दाच्याही नेमक्या व्याख्येबद्दल खात्री नाही (डिस्क्लेमर वरीलप्रमाणेच), परंतु 'विचार करणारा कोणताही माणूस' हा 'विचारवंत' ठरावा, असे मानण्यास जागा आहे. ------------------------------------------------------ (४)
म्हणजेच, वरील (२) आणि (३) यांस अनुसरून,
हिंदुत्ववादी असलेला कोणताही माणूस हा विचारवंत असू शकत नाही. -------------------------- (५)
(कारण 'हिंदुत्ववादी असणारी माणसे' हा वरील (३) ला अनुसरून 'हिंदुत्वद्वेष्टी नसलेल्या माणसां'चा उपसंच आहे.)
याचाच अर्थ, वरील (५) आणि (४) यांस अनुसरून,
हिंदुत्ववादी असलेला कोणताही माणूस हा 'विचार करणारा माणूस' असू शकत नाही. ----------- (६)
वरील (६) ला अनुसरून, आपल्या विधानातील 'विचार करणार्या कुठल्याही माणसाला - अगदी हिंदुत्ववादी माणसालाही' या भागात एक प्रचंड काँट्राडिक्षण इन टर्म्स आहे, असे सुचवावेसे वाटते.
क्यूईडी. अर्थात, क्वाइट ईज़िली डन!
डिस्क्लेमर:
आपल्या विधानात 'विचार करणार्या कुठल्याही माणसा'ऐवजी 'विचार करू शकणार्या कुठल्याही माणसा'चा उल्लेख असता, तर वरील सर्व विवेचन हे गैरलागू ठरते! (मात्र, त्या परिस्थितीत आमच्या दिवंगत आत्याबाईंना आम्ही मोठ्या प्रेमाने "काकाऽऽऽऽऽऽऽ" अशी हाकही मारली असती, हेही तितकेच खरे!)
तसेही, हिंदुत्ववादी माणसे ही विचार करू शकतात अथवा नाही, याबाबत कोणतेच भाष्य करू इच्छीत नाही. मात्र, शक्य असो वा नसो, करत नाहीत अशी आजवर केवळ शंका बाळगून होतो. त्या शंकेचे आज (सिद्धतेसहित) खात्रीत पर्यवसान झाले, आणि तेही एका स्वयंघोषित हिंदुत्ववाद्याच्याच गृहीतकाच्या आधारावर, याबद्दल परमसंतोष होतो.
नथुराम चे कृत्य नक्कीच समर्थनीय नाही पण गांधींचा अति उदो उदो पण नकोसा वाटतो , वास्तविक कोन्ग्रेस फक्त गांधी या नावाचा उपयोजित ब्रांड म्हणून वापर करते ....
लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारे घाला येता कामा नये. समोरील व्यक्तीचे मत (नाटक, चित्रपट, भाषण, लेख वा कलाकृती) पटत नसेल तर ते व्यक्त करण्याचे सनदशीर मार्गच चोखाळले पाहिजेत. झुंडशाही, हुल्लडबाजीला अजिबात स्थान असता कामा नये. कुणीही कायदा हाती घेणे योग्य नाही.
सदर नाटक बंद पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राडेबाजीचा केलेला उपयोग निषेधार्हच आहे.
अर्थातच, जे ह्या नाटकाला लागू होते तेच तस्लिमा नसरीन, सलमान रश्दी, जेम्स लेन आणि एम एफ हुसेन यांच्या बाबतही लागू होते. त्यांच्या विरोधात झालेली झुंडशाहीदेखिल तितकीच निषेधार्ह होती/आहे.
लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारे घाला येता कामा नये.
या वाक्याशी फारशी सहमती नाही. लोकशाही असली तरी ती मर्यादित स्वरूपाचीच लोकशाही असते.
समोरील व्यक्तीचे मत (नाटक, चित्रपट, भाषण, लेख वा कलाकृती) पटत नसेल तर ते व्यक्त करण्याचे सनदशीर मार्गच चोखाळले पाहिजेत. झुंडशाही, हुल्लडबाजीला अजिबात स्थान असता कामा नये. कुणीही कायदा हाती घेणे योग्य नाही.
सदर नाटक बंद पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राडेबाजीचा केलेला उपयोग निषेधार्हच आहे.
अर्थातच, जे ह्या नाटकाला लागू होते तेच तस्लिमा नसरीन, सलमान रश्दी, जेम्स लेन आणि एम एफ हुसेन यांच्या बाबतही लागू होते. त्यांच्या विरोधात झालेली झुंडशाहीदेखिल तितकीच निषेधार्ह होती/आहे.
या वाक्याशी फारशी सहमती नाही. लोकशाही असली तरी ती मर्यादित स्वरूपाचीच लोकशाही असते
+२
सहमत आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देखील मर्यादित स्वरूपात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते आणि जास्त पूर्वग्रह आणि हट्टीपणाच असतो. असे आमचे वैयक्तिक मत आहे.
काही लोक पेन उचलून अभिव्यक्ती सादर करतात, काही लोक दगड उचलून. शेवटी दोन्ही गोष्टींमधे विवेकाचा अभाव असणे हे सांमतर्य जाणवतं.
विरोध करायचा तर वैचारिक दृष्ट्या करावा असे माझे मत आहे. नाटक बंद पडून की साध्य होणार आहे
अगदी सहमत.
आणि ते चालू राहिले म्हणून तरी काय होणार आहे? मुळात ते नाटक अतिशय बटबटीत बोजड आहे. कंटाळवाणे कॄत्रिम संवाद आणि सुमार पटकथा. विरोधकांनी ते बंद पाडण्याची मोहीम उभारली तर तेवढीच पब्लिशिटी जास्त होईल.
प्रतिक्रिया