Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विनिल आणि...

श
श्रावण मोडक यांनी
Fri, 02/18/2011 - 07:54  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
33674 वाचन

💬 प्रतिसाद (116)

प्रतिक्रिया

व
विकास Fri, 02/18/2011 - 16:42 नवीन
वरील काही विस्तृत प्रतिक्रियांशी सहमत. मला एकदम रविन्द्र म्हात्रेंची आठवण झाली. विनिल आणि त्याच्या अपहरण झालेल्या सहकार्‍यावर तसेच त्यांच्या कुटूंबियांवर अशी वेळ येऊ नये ही प्रार्थना. विनिलचे काही चुकलेच असले तर ते मोकळे पणाने हिंडणे... पण प्रामाणिकपणे वाटते की अगदी सुरक्षेचा आधार घेतला असता तरी तेच होऊ शकले असते. अर्थात त्याचे काही चुकले असे वाटत नाही. मानवतावाद्यांच्या संदर्भात कायमच एक मुद्दा येतो तो म्हणजे ते फक्त सरकारने अर्थात प्रस्थापित सत्तेने काही गैर केले तर आवाज उठवतात. जर जनतेतील कुठल्या चळवळीने आणि ते देखील डाव्या विचारसरणीशी मिळत्याजुळत्या चळवळीने केले तर, अल्पसंख्यांकांनी केले तर ते त्यांच्यादृष्टीने मानवाधिकाराचा भंग करणारे ठरत नाही. हेच काश्मीर मध्ये होते, हेच कधी काळी पंजाबमधे झाले आणि जिथे जिथे माओवादी आहेत तेथे होताना दिसते. आज जनतेने विनितयांच्या बाजूने आणि माओवाद्यांच्या विरुद्धच नुसता आवाज उठवून चालणार नाही तर मानवतावाद्यांना जबाब विचारायला हवा. जेंव्हा बाकी यात ज्या आदीवासींसाठी माओवादी आवाज उठवू लागले त्यांचेच जास्त हाल होणार असे वाटते.
  • Log in or register to post comments
आ
आळश्यांचा राजा Sat, 02/19/2011 - 02:07 नवीन
सामान्य लोकांची प्रतिक्रिया जर काही फार गंभीर प्रसंग झाला तर येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, असं अपहरण अनेकदा होत असतं, त्यामुळे सामान्य लोकांना आता सवय झाली आहे
अगदी अगदी. दर दिवसाआड एक अधिकारी अपहृत होतच असतो. त्यात विशेष काहीच नाही. आणि तसेही अधिकार्‍यांचा आणि सामान्य माणसांचा संबंध तो काय? त्यामुळे प्रस्तुत प्रसंग फार गंभीर तर नाहीच, पण साधा गंभीरदेखील नाही.
विनिल ह्यांची कळकळ, कर्तव्यपरायणता मलाही आवडली, पण त्यांना तिथल्या परीस्थितीची जाणिव असतांना हा धोका घ्यायला नको होता.. It's better to be a tactful soldier than being a fool-hardy hero..
बरोबर आहे. विनील यांच्याकडे एकतर टॅक्ट नव्हती. मग गप्प घरात बसावे की नाही? जायचे नक्षल भागात एकटेच. मला उचला म्हणून सिटिंग डक व्हायचे. मग नक्षल्यांकडून काय अपेक्षा आहे? मुळात सिम्बॉल ऑफ स्टेट असलेल्या अधिकार्‍यांनी (अशा अधिकार्‍यांची एक यादी सरकारने प्रसिद्ध करावी, म्हणजे कळेल नेमके कोण 'सिम्बॉल' असतात ते) हे असं मोटरसायकलवरुन फिरणे असला फूलहार्डीपणा करु नये. आता टाकलं की नाही सरकारला पेचात? आता जे नक्षली सुटतील त्याला कोण जबाबदार? असो. अवलिया यांना (नेहेमीप्रमाणेच) काहीही कळत नाही हे त्यांनी (पुन्हा एकदा) यशस्वीपणे सिद्ध केले आहे. बाकी श्री विनील आणि त्यांच्यासोबत असलेले ज्यु. इंजिनियर श्री माझी (योगायोगाने हेही आदिवासीच आहेत) यांच्या सुटकेविषयी सर्वांनी व्यक्त केलेल्या भावनांशी सहमत.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sat, 02/19/2011 - 04:14 नवीन
ब्राव्हो, आळशांच्या राजा, ब्राव्हो! असेच चालू राहिले तर कर्तृत्ववान, प्रामाणिक, देशभक्त ही (आणि अशीच कांहीं इतर) विशेषणे 'गौरवपूर्ण विशेषणें' न रहाता 'शिव्या' होऊ नयेत हीच देवाकडे प्रार्थना! तसेच विनिलसाहेब व त्यांचे सहकारी यांची त्यांना कसलीही इजा न होता लवकरात लवकर सुटका होवो अशीही देवाकडे प्रार्थना! मोडकसाहेबांनी 'मिपा'वर या विषयाला तोंड फोडले याबद्दल त्यांचेही आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा
च
चिगो Sat, 02/19/2011 - 15:26 नवीन
बरोबर आहे. विनील यांच्याकडे एकतर टॅक्ट नव्हती. मग गप्प घरात बसावे की नाही? जायचे नक्षल भागात एकटेच. मला उचला म्हणून सिटिंग डक व्हायचे. मग नक्षल्यांकडून काय अपेक्षा आहे? << कदाचित नव्हतीच टॅक्ट.. घरात बसले तरी गप्प रहायची गरज नाही. कलेक्टरच्या घरातही ऑफीस असतं, त्याला "कॅम्प ऑफिस" म्हणतात. तसेच फिल्डवरही जायलाच पाहिजे, पण सुरक्षिततेची काळजी घ्यायलाच पाहीजे. "आमचा विकास झाला नाही' म्हणणारे नक्षलवादीच त्यांच्या भागात झालेल्या विकासकार्याला ध्वस्त करत असतात. शाळा, दवाखाने तोडतात. डॉक्टर, मास्तरांचा जीव घेतात. पोलिसांना सहकार्य करणार्‍यांचे घरदार उध्वस्त करतात. त्यामुळे "गरीब, बिचारे नक्षलवादी. त्यांच्या भागात विकास करायला गेलो तर ते मला काहीच करणार नाहीत" हा ध्येयवाद जरा टोकाचा आहे. अहो, विकास झाला तर "बेस" जाणार ना त्यांचा. आणि तुम्ही बोललात तेच झालंय, सिटींग डकच झालेत की विनिल... मुळात सिम्बॉल ऑफ स्टेट असलेल्या अधिकार्‍यांनी (अशा अधिकार्‍यांची एक यादी सरकारने प्रसिद्ध करावी, म्हणजे कळेल नेमके कोण 'सिम्बॉल' असतात ते) << हे तुम्हाला माहित नसेल कदाचित, नक्षलवाद्यांना ठाऊक असतं. कुठल्याही नक्षल-हल्ल्याची बातमी बघा, लगेच कळेल. आणि जिल्हाधिकार्‍यापेक्षा मोठा चालता-बोलता प्रशासकिय "सिम्बॉल ऑफ स्टेट" कदाचित दुसरा कोणताच नसेल जिल्ह्यात.. हे असं मोटरसायकलवरुन फिरणे असला फूलहार्डीपणा करु नये. << खरंच करु नये.. बाकी ज्याची त्याची मर्जी... आता टाकलं की नाही सरकारला पेचात? आता जे नक्षली सुटतील त्याला कोण जबाबदार? << चांगला प्रश्न... उत्तर कळेलच आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा
आ
आळश्यांचा राजा Sat, 02/19/2011 - 17:49 नवीन
कदाचित नव्हतीच टॅक्ट.. घरात बसले तरी गप्प रहायची गरज नाही. कलेक्टरच्या घरातही ऑफीस असतं, त्याला "कॅम्प ऑफिस" म्हणतात. तसेच फिल्डवरही जायलाच पाहिजे, पण सुरक्षिततेची काळजी घ्यायलाच पाहीजे. "आमचा विकास झाला नाही' म्हणणारे नक्षलवादीच त्यांच्या भागात झालेल्या विकासकार्याला ध्वस्त करत असतात. शाळा, दवाखाने तोडतात. डॉक्टर, मास्तरांचा जीव घेतात. पोलिसांना सहकार्य करणार्‍यांचे घरदार उध्वस्त करतात. त्यामुळे "गरीब, बिचारे नक्षलवादी. त्यांच्या भागात विकास करायला गेलो तर ते मला काहीच करणार नाहीत" हा ध्येयवाद जरा टोकाचा आहे. अहो, विकास झाला तर "बेस" जाणार ना त्यांचा. आणि तुम्ही बोललात तेच झालंय, सिटींग डकच झालेत की विनिल...
नक्षलवादी गरीब बिचारे असतात असं कोण म्हणतंय? विनीलनेही असं कधी म्हणलं नाही. गरीब बिचारे आदिवासी असा शब्दप्रयोग हवा. तुमच्या मते विनीलकडे टॅक्ट नव्हती. आमच्या मते विनील ज्या प्रकारे काम करत होते ती बेस्ट पॉसिबल टॅक्ट होती. एवढंच आहे, की ही टॅक्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास, निर्भयता, आणि असीम प्रेम मनात असावे लागते. ते नसेल तर कॅम्प ऑफिसमधून कट ऑफ भागाच्या विकासाचा टॅक्टफुली विचार करावा लागतो. घरात बसले, किंवा जिल्हा मुख्यालयातील कार्यालयात बसले तर अर्थातच अधिकारी सिटिंग डक होत नसावा बहुदा तुम्ही म्हणताय तसं. नाहीतर अशा परिस्थितीत अधिकार्‍यांना थेट राजधानीतल्या कॅम्प ऑफिसमधून टॅक्टफुली काम करावं लागेल. तिथंही धोका असेल, तर त्यांनी सीआरपी च्या छावणीत किंवा सरळ लष्करी मुख्यालयात आपले ऑफिस हलवावे. शेवटी टोकाचा ध्येयवाद काय कामाचा?
हे तुम्हाला माहित नसेल कदाचित, नक्षलवाद्यांना ठाऊक असतं. कुठल्याही नक्षल-हल्ल्याची बातमी बघा, लगेच कळेल. आणि जिल्हाधिकार्‍यापेक्षा मोठा चालता-बोलता प्रशासकिय "सिम्बॉल ऑफ स्टेट" कदाचित दुसरा कोणताच नसेल जिल्ह्यात..
नाही ब्वॉ. मी नक्षलवादी नसल्यामुळे मला हे माहीत नाही. जिल्हाधिकारी एव~~~ढा मोठा असतो हे माहीत नव्हतं मला. विनील ला देखील माहीत नसावं. नाहीतर तो एका छॉट्याश्या छोट्याश्या ज्युनिअर इंजिनियरच्या मागे मोटरसायकलवर बसून गेलाच नसता. असल्या लोकांना आय ए एस मधे कोण घेतं कुणास ठाऊक. साधे प्रोटोकॉल समजत नाहीत. आपण किती मोठे प्रशासकीय "सिम्बॉल ऑफ स्टेट" आहोत हे पण समजत नाही. अ‍ॅकॅडमीत झोपा काढत असणार.
चांगला प्रश्न... उत्तर कळेलच आता
या प्रश्नाचे उत्तर कळण्यासाठी...असो. आमचे एक गुरु म्हणायचे, एखादी योग्य गोष्ट करण्याचे १०० योग्य मार्ग असू शकतात. अमुक एक मार्ग चुकीचा आहे असं म्हणण्याअगोदर तो तसा खरंच चुकीचा आहे का, आणि का आहे, हे तपासून बघावे. असो. विनीलच्या बाबतीत जरा आम्ही हळवे आहोत. थोडे कडू बोललो असल्यास खेद आहे. आमचा नाइलाज आहे. क्षमाप्रार्थी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
च
चिगो Sun, 02/20/2011 - 16:08 नवीन
गरीब बिचारे आदिवासी असा शब्दप्रयोग हवा. << नाही, तोच शब्द टाकायचा होता. तुमच्या मते विनीलकडे टॅक्ट नव्हती. आमच्या मते विनील ज्या प्रकारे काम करत होते ती बेस्ट पॉसिबल टॅक्ट होती. एवढंच आहे, की ही टॅक्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास, निर्भयता, आणि असीम प्रेम मनात असावे लागते. << बरोबर आहे. जोपर्यंत फेल होत नाही तोपर्यंत ही टॅक्ट बेस्टच वाटणार.. आता त्यावर पुनर्विचार करताहेत बरेच अधिकारी असे बातम्यांवरुन कळतेय.. ते नसेल तर कॅम्प ऑफिसमधून कट ऑफ भागाच्या विकासाचा टॅक्टफुली विचार करावा लागतो. << कट ऑफ भागात जावून पाहणी करण्यासाठी "स्विच ऑफ" व्हायची पाळी आणायची गरज नसते. नक्षलवादी भागात काम करतांना नेहमी आधी एरीया क्लिअर करुन (कॉम्बीन्ग ऑप) वगैरे करुन नंतर सिस्टम एस्टॅब्लीश करावी असे एका नक्षल भागात काम केलेल्या डि. आय. जी.चे विचार ऐकले होते.. खरे-खोटे तेच जाणोत. घरात बसले, किंवा जिल्हा मुख्यालयातील कार्यालयात बसले तर अर्थातच अधिकारी सिटिंग डक होत नसावा बहुदा तुम्ही म्हणताय तसं. << बहुतेकदा नाहीच... नाहीतर अशा परिस्थितीत अधिकार्‍यांना थेट राजधानीतल्या कॅम्प ऑफिसमधून टॅक्टफुली काम करावं लागेल. तिथंही धोका असेल, तर त्यांनी सीआरपी च्या छावणीत किंवा सरळ लष्करी मुख्यालयात आपले ऑफिस हलवावे. << ह्याची गरज नाही. समजा, तुम्ही गाडीत बसलेले आहात आणि कुणीतरी मागून येऊन तुम्हाला ठोकले तर तो तुमचा दोष नाही. पण नशेत गाडी चालवल्यावर अपघात झाल्यास दोष तुमचाही असणारच ना? शेवटी टोकाचा ध्येयवाद काय कामाचा? अधोरेखीत शब्द पुन्हा वाचावा, ही विनंती... मी नक्षलवादी नसल्यामुळे मला हे माहीत नाही. << आनंद आणि दु:ख दोन्ही देणारे वाक्य लिहु शकलात, त्याबद्दल धन्यवाद.. जिल्हाधिकारी एव~~~ढा मोठा असतो हे माहीत नव्हतं मला. विनील ला देखील माहीत नसावं. नाहीतर तो एका छॉट्याश्या छोट्याश्या ज्युनिअर इंजिनियरच्या मागे मोटरसायकलवर बसून गेलाच नसता. << त्यांच्या इंजिनीअरच्या मागे बसुन जाण्यावर काहीही म्हणणं नाही.. कुठे गेलेत, ह्यावर बोलतोयत आपण. आणि हा फुकट युक्तिवाद आहे, असे मी तरी म्हणेल.. असल्या लोकांना आय ए एस मधे कोण घेतं कुणास ठाऊक. UPSC आणि DoPT ठरवतात म्हणतात ब्वॉ सिलेक्शन आणि सर्विस अलोकेशन बद्दल.. साधे प्रोटोकॉल समजत नाहीत. नो कमेंट्स.. त्यांच्या कामात कुठेही हा भाग येत नाहीये चर्चेपुरता तरी... आपण किती मोठे प्रशासकीय "सिम्बॉल ऑफ स्टेट" आहोत हे पण समजत नाही.<< कळायला हवं, आणि त्यामुळेच "अ‍ॅन्टी-स्टेट फोर्सेस" सोबत डील करतांना कसे वागावे हे पण ठरवता यायला हवं... अ‍ॅकॅडमीत झोपा काढत असणार.<< अगेन नो कमेंट्स.. तसे बरेच जण करतात, असे कळते.. विनीलच्या बाबतीत जरा आम्ही हळवे आहोत. तुमची मर्जी... त्यांनी सुखरुप परत यावे, हीच प्रार्थना. थोडे कडू बोललो असल्यास खेद आहे. आमचा नाइलाज आहे. क्षमाप्रार्थी नाही.<< त्याची गरजही नाही हो... पुन्हा तुमची मर्जी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा
आ
आळश्यांचा राजा Sun, 02/20/2011 - 16:37 नवीन
वादाला वाद होतोय हे बरोबर आहे. फार तत्परतेने तुम्ही विनीलच्या चुकांवर बोट ठेवले आहे. विनीलसारखे कमीतकमी चार पाच कलेक्टर ओरीसात असे आहेत. असेच आहेत. असेच जात असतात आतपर्यंत. हे ते विचारपूर्वक करत असतात. विनीलला टॅक्ट नसेल, तर या बाकीच्यांना पण टॅक्ट नाही असे म्हणावे लागेल. विनीलच्या कामाचा सिग्निफिकन्स फार मोठा आहे. नक्षलवाद असा "धरा नक्षलवाद्याला आणि उडवा" इतका सोपा नाही. विनील नक्षलवादाला संपवण्याच्या मार्गाने चालला होता. चालला आहे. त्याच्यासारखेच काम करणारे इतर कलेक्टरही त्याच मार्गाने चालले आहेत. त्याच्या इतका नक्षलवाद फार थोड्या जणांना समजला आहे. मागे एकदा श्री प्रकाश घाटपांड्यांनी श्री महेश भागवत, आय पी एस यांची एक कॉमेंट सांगितली होती - मी नक्षलवाद्याशी लढू शकतो, नक्षलवादाशी नाही. विनील नक्षलवादाशी लढतो आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
स
सहज Sun, 02/20/2011 - 16:45 नवीन
आता फक्त एखाद्या विनिलनेच नव्हे तर सरकार व जनतेने सगळ्यांनी लढली पाहीजे. हा एखाद्या विनिलचा, सरकारचा प्रश्न होता कामा नये. सर्व राजकीय पक्ष, जनतेने सरकारने नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी एकत्र आले पाहीजे. निर्णायक लढाई लढली पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा
आ
आळश्यांचा राजा Sun, 02/20/2011 - 17:02 नवीन
अगदी बरोबर बाण. निर्णायक लढाई. पण माझ्या मते ही लढाई का आहे, कशी आहे, आपण का लढली पाहिजे, कुणाच्या बाजूने लढली पाहिजे या सगळ्याचे भान येण्यासाठी काही बेसिक इन्पुट्स मिळायला हवेत. अज्ञान असेल तर काय अपेक्षा करणार? नक्षलवाद म्हणजे विकासाचा अभाव, नक्षलवाद म्हणजे जंगलातच असतो, हे आणि असेच लोकप्रिय गैरसमज दूर व्हायला हवेत. नक्षलवाद "डीकोड" व्हायला हवा. हा प्रश्न विनीलचा होता कामा नये हे खरेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
च
चिगो Mon, 02/21/2011 - 09:43 नवीन
माझा हेतु समजावण्यात चुक झाली असल्यास क्षमस्व.. फार तत्परतेने तुम्ही विनीलच्या चुकांवर बोट ठेवले आहे.<< हा हेतू नव्हता आणि नाही.. गरजेपुरती काळजी काम करण्यात अडथळे आणते, हे वाटत आणि पटत नाही एवढेच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 02/19/2011 - 02:14 नवीन
आजच्या लोकसत्तेत ही बातमी आहे. या बातमीतला शेवटचा परिच्छेद बोलका आहे. ... छत्तीसगड व ओरिसामधील अनेक शासकीय कर्मचारी पोलीस वा सुरक्षा दलासोबत साधे संबंधही ठेवत नाहीत. दौरे करतांना पोलीस ठाण्यासमोरून जाणेही टाळतात. पोलिसांशी वा सुरक्षा दलांशी फार उठबस असणारा शासकीय कर्मचारी नक्षलवाद्यांच्या नजरेत लवकर भरतो. यासाठीच ही काळजी घेतली जाते. ...
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 02/19/2011 - 03:46 नवीन
डेडलाईन अजून २४ तासांनी वाढवली आहे. असे होईल असे वाटत होतेच. परिस्थितीचा पूर्ण फायदा घेतल्याशिवाय नक्षली काही भलतेच करतील असे वाटत नाही. सरकार उघडपणे काही करत नाही असे वाटू शकते पण वाटाघाटी नक्कीच चालू असणार. इतका वेळ झाला तरी तथाकथित मानवाधिकार संघटना ज्या हिरिरिने इतरवेळी रस्त्यावर येतात किंवा व्होकल होतात त्यापैकी एक शतांशही दिसत नाही. हे ही अपेक्षितच म्हणा. मिडियाने पण हे जितक्या गंभीरतेने घ्यायला हवे तितके घेतले आहे असेही वाटत नाही. बहुतेक 'एखाद्या कोपर्‍यातल्या राज्यातल्या एका मामुली कलेक्टरचे ते अपहरण, त्याला कितीशी न्युजव्हॅल्यु असणार?' असा व्यवहारी हिशेब असावा. त्यांना तरी काय दोष देणार. लोकांना क्रिकेट वर्ल्डकपबद्दल जास्त काळजी आहे. बरेच ठिकाणी भारताने वर्ल्डकप जिंकावा यासाठी यज्ञ वगैरे चालू आहेत / झाले आहेत असे बघितले आज टिव्हीवर. त्यामुळे आता काही दिवस केवळ तेच बघायचे / वाचायचे / ऐकायचे. असो. दु:खद मात्र आहे हे सगळे. (स्पष्टीकरण : माझा क्रिकेटला / वर्ल्डकपला / त्याबद्दल प्रेम असायला / जल्लोष करायला विरोध नाही. केवळ, आपल्या प्रायॉरिटीजमधे विनिलचे स्थान नाही हे दाखवायला तुलना म्हणून त्याचा उपयोग केला आहे.)
  • Log in or register to post comments
आ
आळश्यांचा राजा Sat, 02/19/2011 - 04:39 नवीन
ही अपाथी विनीलच्या बाबत दिसतीय सगळीकडे, प्रिसाइझली तेच कारण आहे नक्षलवाद वाढण्याचं, करप्शन वाढण्याचं. हे भल्या भल्यांच्या लक्षात येत नाहीये. सत्य हे असं डोळ्यांपुढे असतं आणि ते दिसत नाही ते असं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
आ
आळश्यांचा राजा Sat, 02/19/2011 - 04:46 नवीन
सध्याच्या सिस्टिमचा काहीही उपयोग नाही असे म्हणत सिस्टिमविरुद्ध लढणार्‍यांना
म्हणजे सरकारविरुद्ध/ एस्टॅब्लिशमेंट विरुद्ध/ घटनेविरुद्ध/ कायद्या विरुद्ध लढणार्‍यांना, म्हणजेच नक्षल्यांना
सिस्टिममधील लोकांकडूनच त्रास होत आहे, त्याच्या विरोधात आम्ही उभे आहोत अशी भुमिका एकदा घेतली की
म्हणजे (भ्रष्ट) सरकारी अधिकार्‍भ्रष्ट)/ नेत्यांकडून त्रास होतोय, त्याचा आम्ही विरोध करतो अशी भूमीका एकदा घेतली की
सिस्टिममधे काही जण चांगले आहेत ते सिस्टिमविरुद्ध उभे राहणार्‍यांना मात्र अडचणीचे असतात हे मान्य करणे सोईचे नसते
म्हणजे विनील चांगला आहे हे नक्षल्यांना मात्र अडचणीचे असतात, हे मान्य करणे सोईचे नसते
कारण इथे सिस्टिमचा दोष नसुन त्यातील माणसांचा आहे म्हणुन सिस्टिम न बदलताही बदल घडवून आणता येतो हे सिद्ध होते, जे आधी घेतलेल्या भुमिकेशी विसंगत असते
हे समजायला सोपे आहे.
म्हणून अशा प्रकारचा आवाज येत नाही
आलं लक्षात? * डेडिकेटेड टू छोटा डॉन अ‍ॅण्ड काळे काका!
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sat, 02/19/2011 - 04:56 नवीन
मला वाटते श्री. अवलिया ह्यांचा रोख (तथाकथित) मानवतावाद्यांवर होता, नक्षलवाद्यांवर नव्हे. (आणि तो तसा असला, तर मी त्यांच्याशी सहमत आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा
स
सुधीर काळे Sat, 02/19/2011 - 08:30 नवीन
नोस्ट्राडामसच्या लिखाणाची आठवण झाली. त्याने लिहिलेले घटना झाल्यावर कळते! कारण त्या आधी काढावा तो अर्थ असू शकतो! हाहाहा!! ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
व
विकास Sat, 02/19/2011 - 15:05 नवीन
मला वाटते श्री. अवलिया ह्यांचा रोख (तथाकथित) मानवतावाद्यांवर होता, नक्षलवाद्यांवर नव्हे. सहमत. मला वाटते, कदाचीत त्यांच्या (अवलीयांच्या) लेखनात नकळत "उपरोधीक+गंभीर" असे एकत्रीत झाल्याने समजताना गैरसमज होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
ध
धनंजय Mon, 02/21/2011 - 13:30 नवीन
असेच डिकोडिंग मीदेखील केलेले होते. उपरोधात अडचण अशी असते, की ग्राह्य आणि अग्राह्याचे इतके विचित्र मिग्रण असते, की संवादच खुंटतो. एखादा भ्रष्टाचार-विरोधी अधिकारी सापडला म्हणून आपण सर्वांनी "सिस्टिममध्ये भ्रष्टाचार आहे, तो बदलायला मोठाच समूळ-मूलभूत बदल जरूर आहे" हे मत बदलावे काय? अवलिया यांच्या उपरोधाचा हतोडा* इतका जाडजूड आहे, की नक्षलवाद/शोषण-विरोधात समूळ-सिस्टिमबदल आणि भ्रष्टाचार-विरोधात समूळ सिस्टिमबदल या दोहोंनाही तो लागू होतो. (*खिळा वापरण्याऐवजी हतोडा वापरला, तर लाकडात भोक पडू शकते, पण ते हवे तसे उपयोगी नसते.) शक्यतोवर या दोहोंत फरक करण्याइतपत कारणमीमांसा दिली नाही, तर एका हास्यानंतर उपरोध वाया जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ज
ज्ञानेश... Sun, 02/20/2011 - 17:25 नवीन
डिकोडिंग द अवलिया कोड, अगेन- सध्याच्या सिस्टिमचा काहीही उपयोग नाही असे म्हणत सिस्टिमविरुद्ध लढणार्‍यांना =नक्षलवाद्यांना सिस्टिममधील लोकांकडूनच त्रास होत आहे, =पोलिस, न्यायसंस्था त्याच्या विरोधात आम्ही उभे आहोत अशी भुमिका = मानवतावादी सिस्टिममधे काही जण चांगले आहेत =विनीलसारखे अधिकारी ते सिस्टिमविरुद्ध उभे राहणार्‍यांना मात्र अडचणीचे असतात =नक्षलवाद्यांना+मानवतावाद्यांना हे मान्य करणे (मानवतावाद्यांना) सोईचे नसते कारण इथे सिस्टिमचा दोष नसुन त्यातील माणसांचा आहे म्हणुन सिस्टिम न बदलताही बदल घडवून आणता येतो हे सिद्ध होते, जे आधी (मानवतावाद्यांनीच) घेतलेल्या भुमिकेशी विसंगत असते म्हणून अशा प्रकारचा आवाज येत नाही. हुश्श. *डेडिकेटेड टू आ.रा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा
आ
आळश्यांचा राजा Sun, 02/20/2011 - 20:12 नवीन
परफेक्ट. हे बरोबर आहे. (टाळ्या वाजवायची स्मायली!) आमचे चुकले. अवलियांसारख्या मास्टरमिस्टिक च्या कूट श्लोकाला हात घालण्याचे साहस केले हीच चूक झाली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...
य
यशोधरा Sat, 02/19/2011 - 09:26 नवीन
विनिल ह्यांच्याप्रमाणेच एक अभियंता श्री. पवित्र मझी (Mr. Pabitra Majhi- नक्की उच्चार ठाऊक नाही) हेही नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहेत ना? इथे धाग्यावर त्यांचा उल्लेख आढळला नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 02/19/2011 - 10:24 नवीन
हो तेही आहेत. त्यांचा उल्लेख धाग्यात राहिला. कारण घाई आणि नंतर स्वसंपादनाची सोय नसण्याने झालेली पंचाईत. अर्थातच, माझ्यालेखी विनिल प्रातिनिधीक आहे. त्याच्याऐवजी माझीचा उल्लेखही मला चालेल. पण, ही गोष्ट पुढे आणल्याबद्दल धन्यवाद. तपशील दुरूस्त होणे आवश्यकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Sat, 02/19/2011 - 10:43 नवीन
विनिल जिल्हाधिकारी आहेत. एकूणच उतरंडीवर वरच्या पायरीवर आहेत आणि पवित्र साधेसुधे अभियंता. त्यांच्याकडे लक्ष न जाणे स्वाभाविक आहे. तुमचेच असे नाही, एकूणातच. ह्याचा उल्लेख किंवा त्याचा उल्लेख वा कोणाला कोणाचा उल्लेख चालेल, हा प्रश्न नाही, त्याला महत्व नाही. मानवतावाद्यांवर टीका करताना मूळ लेखात अनवधानाने का होईना, राहिलेला उल्लेख पुढेही धागाकर्त्यासकट कोणालाही करावासा वाटत नाही ह्याचे आश्चर्य वाटले. असो. आ.रा ह्यांच्या प्रतिसादात श्री माझी ह्यांचा उल्लेख दिसतो. चालूदेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Sat, 02/19/2011 - 10:58 नवीन
क्षमा असावी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Sat, 02/19/2011 - 11:54 नवीन
तुमच्या ह्या प्रतिसादाची खरोखर गंम्मत वाटते एवढेच म्हणते. ह्याची गरज खरे तर नव्हती. विनील काय वा पर्वत काय वा कोणीच व्यक्ती ह्या केवळ सो कॉल्ड इंटलेक्च्युअल चर्चेचा विषय आहेत का - अमुक एका ऐवजी दुसर्‍याचा उल्लेख चालेल म्हणायला? प्रत्यक्ष हाडामांसाच्या जिवंत व्यक्तींचे आयुष्य पणाला लागलेले आहे. (ह्याचा अर्थ सगळ्यांनी तिथे जाऊन ह्या व्यक्तींच्या सुटकेत सक्रीय योगदान द्यावे असेही म्हणत नाही, ते शक्यही नाही ) जनमानसामध्ये चर्चा ही होणारच, त्यातही काही गैर नाही, पण चर्चा करतानाही आपण दोन वेगवेगळ्या जिवांबद्दल बोलतो आहोत ही जाणीव जोपासल्यास गैर असेल का? म्हणूनच, माझ्यालेखी विनिल प्रातिनिधीक आहे. त्याच्याऐवजी माझीचा उल्लेखही मला चालेल हे वाक्य खटकले,बाकी काही नाही. नपेक्षा, हा नाही तर तो - चर्चा होत असल्याशी मतलब आणि 'मला' आणि 'माझी मते' इतकेच मांडायचे असल्यास योग्यच आहे. असो. ह्यापुढे तुमच्या वा तुम्ही लिहिलेल्या विषयाच्या जराही विरोधात वा तत्सम काही लिहायचे नाही हे पथ्य पाळेन. हे ह्या धाग्यावर शेवटचे पोस्ट. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
न
नितिन थत्ते Sat, 02/19/2011 - 12:10 नवीन
आश्चर्य आहे. क्षमा असावी असा प्रतिसाद दिल्यावर आधीच्या प्रतिसादालाच चिकटून मत व्यक्त करण्याचा आग्रह पटला नाही. मा़झी यांचे नाव लेखात आले नाही म्हणजे त्यांची सोडवणूक करणे मोडक यांना अपेक्षित नाही असा निष्कर्ष काढणे आततायी (किंवा खोडसाळ) वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
श
श्रावण मोडक Sat, 02/19/2011 - 12:24 नवीन
माझ्याकडून उणीव राहिली होती. ती फक्त उणीव नसून, चूक असल्याचे तुम्ही दाखवलेत. म्हणून क्षमा असावी असं लिहिलं. आत्ताचा तुमचा प्रतिसाद वाचता, ही चर्चा सुरू करताना मी थोडा संकुचितच विचार केला होता. मला फक्त मानवतावाद्यांची भूमिका चर्चेत अपेक्षीत होती. हाडामासाची माणसं, सरकारी यंत्रणेतील उतरंड वगैरे व्यापक मुद्देही त्यात आहेत, हे माझ्या ध्यानी नव्हते. ते आत्ता तुमच्या प्रतिसादामुळे लक्षात आले. त्यामुळे तुम्ही लिहिणं थांबवू नका. विरोधात, किंवा कसेही, लिहित रहा. माझ्या ज्ञानात भर पडते, आकलनही वाढते. :) दंडवत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Sat, 02/19/2011 - 12:32 नवीन
छे, छे! आपल्यासारखे मिपावरले महान व्यक्तीमत्व कधी अधिक उणे लिहू शकते वा तशी शक्यताही असू शकते हे मनातही आणल्याचे आणि ते असे मांडल्याचे पाप केले, माझीच चूक :) आपणाइतके कोणाला कळत नाही हे आता अगदीच समजले. थत्तेकाकाकाही हिरीरीने बाजू मांडतात म्हणजे काय? :) धन्यवाद. अवांतरः आपल्या लिखाणाला संमंतीदर्शक लिहिले नाही की आपल्याला उपरोधी प्रतिसाद का द्यावेसे वाटतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Sat, 02/19/2011 - 12:54 नवीन
शेवटचे पोस्ट असे मघा म्हणाला होता. त्यापासून थोडे बदलत आता हा प्रतिसाद लिहिल्याबद्दल धन्यवाद. उपरोधाचे वावडे नाही ना? नसावेच. म्हणून मला महान वगैरे म्हणून घेतलंत. उगा थत्ते यांच्याबाबतही खोडसाळपणा करून घेतलात. म्हणजे त्याचेही वावडे नसेलच. धाग्यावर अवांतर अधिक नको, म्हणून मी इथंच थांबतो. एक वरकड टाकण्याची संधी तुम्हाला आहे. ती घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 02/19/2011 - 12:31 नवीन
आत्ताच बातमी बघितली... माओवाद्यांनी मलकानगिरीला जाणारा मुख्य हायवे ब्लॉक केला आहे. रेस्क्यु ऑपरेशन्स रोखणे हा हेतू आहे म्हणे. तसेच तिथे अजूनही नागरिकांची विनिलच्या समर्थनार्थ आंदोलनं चालू आहेत.
  • Log in or register to post comments
आ
आळश्यांचा राजा Sat, 02/19/2011 - 17:25 नवीन
त्यांचे म्हणणे असते की सरकारने कायद्याने जावे, पण आम्हाला पटले नाही तर आम्ही कायदा हातात घेऊ शकतो कारण आम्ही सरकार नाही!
यात अजून थोडी भर टाकावी म्हणतो. हा त्यांच्या स्टेटमेंटमधला भाग -
In Orissa, there have been continuous reports of lawlessness and repressive action by the State security agencies resulting in large-scale arrests and incarceration of innocent ordinary people. Fake encounters are on the increase and even children are not being spared. We are constrained to point out that the Government of Orissa, apart from routinely denying any abuse of law by its forces, has only stepped up security operations. Ironically, the Governments seem to respond only when government officials, that too senior officers, are abducted or kidnapped.
म्हणजे यांना असं म्हणायचं आहे, की या अपहरणाला तर पर्यायच नव्हता! अरे, मग तुम्ही निषेध कशाचा करताय? आणि पुन्हा विनीलला सोडा असंही त्याच एकाच दमात कसं काय म्हणताय? मान गये बाप!
Recently in Chattisgarh when on 25th January, 2011, 5 police constables were kidnapped, there was lukewarm response by the Government and senior officials to secure their release. It was only on the demand of the human rights groups that the Maoists unconditionally released the constables.
इथे बघा अजून एक गम्मत. यांनी डिमांड केली म्हणून माओवाद्यांनी सोडलं. सरकारने माओवाद्यांच्या मागण्या मान्य करायला नकार दिला ही त्यांची लाडिक तक्रार आहे. म्हणजे अपहरण झाले पाहिजे, आणि सरकारने अपहृतांना सोडवण्यासाठी अपहरणकर्त्यांच्या मागण्या मानल्या पाहिजेत असे हे विधान आहे. सरकारने कारवाई अर्थातच करायची नाही. "has only stepped up security operations" यात कशी तक्रार आहे ते नीट बघा.
PUCL calls upon the Government of Orissa, as also the Government of India and other States where the conflict with Maoists exists, to immediately call a halt to Operation Green Hunt and other combing and paramilitary operations being conducted in the name of curbing the Maoists. Increased militarization and resort to repressive use of laws has created a climate of fear, insecurity and alienation among the local people. People’s legitimate democratic protests are also being brutally suppressed.
इथे आवाहन सरकारला आहे. माओवाद्यांना नाही.
PUCL therefore demands that the State Government does not do anything to precipitate the issue. PUCL also demands the unconditional release of the abducted officials by the Maoists.
माओवाद्यांकडे "अनकंडिशनल रिलिज" ची डिमांड करत असताना त्यांनीच माओवाद्यांची डिमांड सरकारला सांगून टाकलीय! क्या बात है! अविवेकाचा इतका नागडा नाच आजपर्यंत बघायला मिळाला नव्हता.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 02/19/2011 - 17:52 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा
व
विकास Sat, 02/19/2011 - 20:42 नवीन
विश्लेषण (का "विच्छेदन"?) एकदम आवडले आणि "दुर्दैवाने" खरे आहे. याला (त्यांच्या प्रेस रिलीजला) माध्यमांनी प्रसिद्धी दिलेली नाही, पण जर दिली असती तर, "...बिनशर्त सोडून द्या अशी मागणी केली" वगैरे, नुसत्या मथळ्यात जनतेची मते जिंकली असती. सामान्य माणूस सगळे वाचत बसत नाही त्यामुळे चालून जाते. क्या बात है! अविवेकाचा इतका नागडा नाच आजपर्यंत बघायला मिळाला नव्हता. मी कधिही न विसरू शकणारी जी काही उदाहरणे आहेत त्यात असेच एक उदाहरण हे बॉस्टन/केंब्रिजच्या एम आय टी मधे आपल्याच लोकांनी बोलावलेल्या एका व्यक्तीचे होते. ती स्वतःला कम्युनिस्ट आणि फेमिनिस्ट म्हणत होती. सरकारी पैशावर/आधारावर युनोमधे कुठल्यातरी कॉन्फरन्सला आली होती. नंतर येथे लेक्चर देत असताना, काश्मिरी जनतेवर सरकार/लष्कर कसे अत्याचार करत आहे आणि म्हणून ते कसे बिथरलेत आणि त्यामुळे आता (काश्मीरला स्वातंत्र्य देण्यावाचून) कसा पर्याय नाही. :( नंतर तेथे बसलेल्या एका व्यक्तीने जेंव्हा त्यावर आक्षेप घेत स्वतःच्या नात्यातील दाखला देत कसे अतिरेक्यांनी मारले हे सांगितले, तेंव्हा मात्र दुर्लक्ष आणि कुत्सित हास्याने त्या व्यक्तीस स्पष्ट न बोलता पण "रॅडीकल" ठरवून मोकळे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा
आ
आळश्यांचा राजा Sun, 02/20/2011 - 05:06 नवीन
मुंबईच्या दुर्दैवी २६/११ प्रसंगामध्ये (आपल्यासाठी) प्राण देणारे करकरे, साळस्कर, आणि कामटे साहेबांविषयी अनेक विद्वानांनी असे मत मांडले होते की त्यांनी अनाठायी शौर्य दाखवले. टॅक्ट नव्हती. हिरो बनायची हौस. नेतृत्त्वानेच प्राण गमावले तर कसे चालेल? लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जित्ता पाहिजे यावर विश्वास ठेवणारे शिवाजी महाराज देखील प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून काही मोहीमा लीड करत असत (उदा. लाल महाल, बाजी घोरपडे प्रकरण, अफझल खान प्रकरण, इ.) हे लक्षात घेणे आवश्यक आहे. करकरे मॅडम आणि कामटे मॅडम यांनी या 'विद्वान' मतांचे आपापल्या अभ्यासू पुस्तकांमधून याचे मुद्देसूद खंडण केलेले आहे. ते वाचायची तसदी हे असली मतं मांडणारे घेतीलच असं नाही. आजच ओडिया माध्यमात एक कॉमेंट वाचण्यात आली - या कलेक्टरला आपल्या जिल्ह्याची काहीही माहिती नसावी, नाहीतर हा असा सिक्युरिटी न घेता "वॉर झोन" मध्ये गेलाच नसता. आता सरकारला याने किती मोठ्या संकटात टाकले आहे. वाईट वाटते. एवढेच सध्यापुरते. का वाईट वाटते याविषयी सविस्तर वरील काही प्रतिसादांमध्ये आलेले आहेच. संताप येत नाही. सध्या काळजी जास्त आहे. संतापाविषयी पुन्हा. विनील आणि पवित्र परत आल्यानंतर मग. एकत्रित सवडीने टंकून टाकतो. तोपर्यंत विनील आणि पवित्र यांना काही त्रास न होता सुखरुप परत यावेत ही कामना करण्याशिवाय काय हातात आहे? पीयूसील वाल्यांसारखा नतद्रष्टपणा तरी किमान न करणे हे नक्कीच हातात आहे. प्रसंग नीट समजून घ्यायचा प्रयत्न करावा. टिप्पण्या करण्याअगोदर एवढे भान राखले तरी खूप आहे. प्रश्न भावनांचा नाही. (आपल्या सर्वांच्याच) अस्तित्त्वाचा आहे. हे कुठेतरी दूर ओरीसात घडतंय, आपल्या अंगाला लागणार नाही असं समजू नये. ओरीसा तून जाणार्‍या आणि आपल्या महाराष्ट्राला जोडणार्‍या रेल्वे ऑलरेडी धोक्याच्या टप्प्यात आलेल्या आहेत. याही पलीकडे बर्‍याच लिंक्स आहेतच आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 02/20/2011 - 14:28 नवीन
प्रसंग नीट समजून घ्यायचा प्रयत्न करावा. टिप्पण्या करण्याअगोदर एवढे भान राखले तरी खूप आहे. प्रश्न भावनांचा नाही. (आपल्या सर्वांच्याच) अस्तित्त्वाचा आहे. हे कुठेतरी दूर ओरीसात घडतंय, आपल्या अंगाला लागणार नाही असं समजू नये. ओरीसा तून जाणार्‍या आणि आपल्या महाराष्ट्राला जोडणार्‍या रेल्वे ऑलरेडी धोक्याच्या टप्प्यात आलेल्या आहेत. याही पलीकडे बर्‍याच लिंक्स आहेतच आहेत.
अर्थात. सहमत. पण... एकूणच समाज स्वतःला सरकारपासून वेगळा मानतो की काय असा प्रश्न अनेकदा उभा राहतो. विनील आणि माझीच्याच संदर्भात नव्हे फक्त. इतरही. विनील जे काम करतोय त्यातून माओवाद्यांना मिळणारा पाठिंबा कमी होणार होता. माओवाद्यांचा प्रसार होण्यामागची जी कारणे मांडली जातात (विकासाचा अभाव, विषमता, डेफिसीट ऑफ गव्हर्नन्स वगैरे) तीच कारणे संपण्यासाठीची स्थिती (हीही एक प्रकारची कॉंक्रीट सिच्युएशनच, अर्थात उलट्या कारणांसाठीची) विनीलच्या कामातून, तो घालून देत असलेल्या कार्यपद्धतीतून निर्माण होत होती. एकीकडे विनीलसारखी मंडळी काम करतात, त्याचवेळी दुसरीकडे अशाच काही भागांमध्ये अशाच स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठीचे अहिंसक संघर्षही सुरू असतात. विनीलचे काम आणि/किंवा हे अहिंसक संघर्ष यांना समाजातून किती साथ मिळते? विनीलच्या कामाचे प्रतिमान (आवश्यक त्या बदलांसह) इतरत्रही सरकारने राबवावे यासाठी किंवा त्या अंहिंसक चळवळींचे प्रश्न सरकारने त्वरेने हाती घेऊन सोडवावेत यासाठी समाज काही दबाव आणतो का? बहुदा अत्यल्प प्रमाणात. माओवादासारखा प्रश्न सोडवणे ही एकट्या सरकारचीच जबाबदारी आहे, असे बहुदा स्वतःला सरकारपासून वेगळे ठेवत समाज म्हणत असावा. हे थोडं जनरलायझेशन होत असावं. पण परिस्थिती समग्रपणे पाहिली तर असेच चित्र डोळ्यांसमोर येते. आता हे सारं समाजानं समजून घ्यायचं असेल तर हे काम समाजापर्यंत पोचलंही पाहिजे. तेही किती प्रमाणात घडतं? तिथं माध्यमंही कमी पडतात. त्याबाबतचा मुद्दा वर बिपिनने लिहिला आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा
व
विकास Sun, 02/20/2011 - 15:42 नवीन
एकूणच समाज स्वतःला सरकारपासून वेगळा मानतो की काय असा प्रश्न अनेकदा उभा राहतो. आठवते त्याप्रमाणे: कधीकाळी पंजाबात (मला वाटते ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या आधी) ८-१० निरपराध लोकांना मारले म्हणून विरोधी पक्षांनी भारतबंदची हाक दिली आणि जनतेने त्याला मनापासून साथ दिली. अर्थात असल्या बंदचे शस्त्र आता बोथट झाले आहे आणि तसे ते बोथट झाले हेच बरे आहे. जो पर्यंत आपण आपल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारत नाही तो पर्यंत असेच चालू रहाणार. तो विचारायचा म्हणल्यास तुम्हा-आम्हाला (त्यात मी देखील आलो), त्याचा काहीच उपयोग होत नाही असे वाटत लांबच रहाणे पसंत करणे योग्य वाटणार... मग त्यांचे फावते. बर्‍याचदा प्रश्न विचारणे, गार्‍हाणे मांडणे देखील लांब जाउंदेत आपण मतदानाचा देखील उपहास करतो.... विनीलच्या कामाचे प्रतिमान (आवश्यक त्या बदलांसह) इतरत्रही सरकारने राबवावे यासाठी किंवा त्या अंहिंसक चळवळींचे प्रश्न सरकारने त्वरेने हाती घेऊन सोडवावेत यासाठी समाज काही दबाव आणतो का? इथे एक गंमत आहे. सरकारने विनीलला काही स्पेशल अधिकार दिले आहेत का? मला नाही वाटत. जी काही ध्येयधोरणे आहेत ती होतीच, फक्त विनीलसारख्या, "बाबू"ने त्याचा मनापासून वापर केला, इतर करत नाहीत. म्हणजे यात सरकार, पक्षी: राज्यकर्ते/राजकारणी हे प्रत्यक्ष दोषी ठरत नाहीत. त्यांच्या कुजकट राजकारणाने सगळी वाट लागली त्यामुळे त्यांना अर्थातच दोष देता येईल. पण तो वेगळा मुद्दा आहे. कधी काळी येथे (बॉस्टनमध्ये) एका केंद्रिय मंत्र्याशी एका विद्यापिठात गाठ पडली होती. त्याने आम जनतेसाठीचे अनेक कार्यक्रम सांगितले. म्हणलं मग ते दिसत का नाही. त्याची तक्रार अशी होती की केंद्राने कार्यक्रम घोषीत केले आणि पैसे उपलब्ध करून दिले तरी राज्यसरकारांनी जर ते वापरले नाहीत, त्या मोहिमांमधे सहभाग घेतला नाही तर केंद्र बळजबरी करू शकत नाही. मला वाटते कुठल्याही पक्षाचे/युतीचे सरकार केंद्रात असले तरी बर्‍याचदा हाच मुद्दा असतो. ज्यांना असे कार्यक्रम माहीत असतात आणि ते वापरायची इच्छा असते ते तसे करतात. सध्याची उदाहरणेच बघायची तर गुजरात आणि बिहार मधे विरोधी राजवटी असून देखील त्यांनी केंद्राकडून योग्य मदत घेतली... आता राहता राहीला प्रश्न समाजाचा: त्याचे उत्तर या प्रतिसादाच्या सुरवातीस आले आहेच. त्यात अधिक भर म्हणजे जे सामाजीक चळवळी करतात त्यांनी देखील सत्तेसाठी हपापलेले जसे एकमेकांची विरोधी (आणि स्वार्थी) मते दुर्लक्षित करत "common minimum program" आमलात आणतात तसेच कुठल्याही राजकारणासाठी नाही तर त्यापासून दूरच राहून समाजसेवी संस्थांनी जिथे एकमेकांना समान तळमळ आहे अशा सामाजीक प्रश्नांसाठी "common minimum program" राबवावा असे वाटते. माझ्या दृष्टीने - "भारताची एकता, समाजातील ऐक्यामधे वाढ आणि कुठल्याही हिंसेला विरोध, आणि कुठल्याही हिंसेचे समर्थन न करण्याचे एकमेकांना वचन" इतकेच डोक्यात ठेवावे. बाकी, "कोणी निधर्मी असतील, कोणी धार्मिक - ते त्यांच्या त्यांच्या घरी." हे अवघड आहे, अशक्य नाही. आणिबाणीच्या काळात असे झाले होते. त्यात नंतर केवळ एकमेकांवर दोषारोप करण्यातच वेळ घालवला गेला. त्यातून शिकून तोच प्रकार पुढे कसा रेटता येईल या संदर्भात विचार केला गेला नाही. तो येथे करता येईल असे वाटते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Mon, 02/21/2011 - 05:47 नवीन
इथे एक गंमत आहे. सरकारने विनीलला काही स्पेशल अधिकार दिले आहेत का? मला नाही वाटत. जी काही ध्येयधोरणे आहेत ती होतीच, फक्त विनीलसारख्या, "बाबू"ने त्याचा मनापासून वापर केला, इतर करत नाहीत. म्हणजे यात सरकार, पक्षी: राज्यकर्ते/राजकारणी हे प्रत्यक्ष दोषी ठरत नाहीत. त्यांच्या कुजकट राजकारणाने सगळी वाट लागली त्यामुळे त्यांना अर्थातच दोष देता येईल. पण तो वेगळा मुद्दा आहे.
थोडे मतांतर. विनीलला सरकारने काही विशेष अधिकार दिले नाहीत. दिले जातही नसतात, हे मान्य. पण चाकोरीबाहेर जात असे काही अधिकारी सृजनशीलतेने काही गोष्टी करतात. व्यवस्थेच्या आतच राहून, व्यवस्थेचं सडलेपण दूर करत. व्यवस्था अशी झाली आहे की, या गोष्टी झाल्या की त्या ठळकपणे समोर येतातच. विनील ते करत होता. गव्हर्नन्सचा डेफिसीट भरून काढण्यासाठी ही मंडळी निम्म्याहून अधिक रस्ता चालण्याची तयारी ठेवतात. चालतातही (अगदी शब्दशःही). त्यातूनच जनसंपर्कसारख्या मोहीमा आकाराला येतात. त्या औपचारिक रहात नाहीत. त्या मोहीमांचे हेतू स्पष्ट असतात आणि हे अधिकारी अशा हेतूंसाठी हेतूपूर्वकच काम करतात. त्याचे प्रतिमान इतकेच मला म्हणायचे आहे. आरा यांनी दिलेले इतर दुवे पाहिले. एकूण, विनीलचे (आणि माझीचेही) अपहरण ही एक संधी आहे. माओवाद आणि एकूणच हिंसक चळवळींना विरोध करणाऱ्यांची किती ताकद अशा गोष्टींच्या मागे येते त्यावर बरेच काही अवलंबून राहील. अन्यथा, विनीलचे अपहरण ही आणखी एक घडून गेलेली घटना ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
इ
इन्द्र्राज पवार Mon, 02/21/2011 - 06:39 नवीन
"...पण चाकोरीबाहेर जात असे काही अधिकारी सृजनशीलतेने काही गोष्टी करतात. व्यवस्थेच्या आतच राहून, व्यवस्थेचं सडलेपण दूर करत...." ~ हे छान सांगितले तुम्ही श्रा.मो. -- इथे थोडे विषयांतर जरी होत असले तरी श्री. विनिल कृष्णा (तसेच श्री.अजित जोशी) यांच्यासारखे कल्पक युवक प्रशासनच्या चौकटीत राहूनदेखील जितकी समाजोपयोगी कामे करीत असतात त्याबद्दल सरकारी चौकटही त्यांचे ऋणी राहिलच. इथे उदाहरण देत आहे ते कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री.लक्ष्मीकांत देशमुख यानी अत्यंत प्रभावीपणे राबविलेल्या 'सेव्ह द बेबी' अभियानाचे. गेल्या दशकात कोल्हापूर जिल्ह्यात वाढलेल्या 'गर्भलिंग तपासणी केन्द्रा' (जरी शासनाने नंतर अशा लिंग तपासणीवर कायद्याने बंदी आणली असली तरी छुपे प्रकार घडत होतेच) मुळे जिल्ह्यात मुलींचे प्रमाण १०००:८३२ असे धक्कादायक झाले होते. 'सायलेन्ट ऑब्झर्व्हर प्रोग्राम' अंतर्गत श्री.देशमुख यानी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेन्टर्स 'कलेक्टर ऑफिस ऑनलाईन झोन' मध्ये सक्तीने रजिस्टर करवून घेतली...आणि जिल्ह्यातील सर्व २३२ अल्ट्रासाऊंड स्कॅनिंग मशिनरी सेन्ट्रल कॉम्प्युटरला जोडली गेली. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही सोनोग्राफीसाठी स्त्री आणली गेली की तिची माहिती त्याच क्षणाला कलेक्टर ऑफिसच्या रेकॉर्डला येऊ लागली. प्रत्येक सोनोग्राफ इथल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून तपासल्यानंतर ज्या गावातून तो डेटा येई त्या संबंधित महिलेवर 'गर्भलिंग' तपासणीसंदर्भात कोणतीही 'गैर' कारवाई तिथल्या डॉक्टराकडून तसेच त्या महिलेल्या सासुरवाडीकडून होणार नाही याची शासकीय पातळीवर खबरदारी घेतली जाऊ लागली. श्री.लक्ष्मीकांत देशमुखांच्या या योजनेचे प्रभावी फळ त्याच वर्षी समोर आले आणि सन २००८ मध्ये असलेला मुलांचा ८३२ चा आकडा २००९ मध्ये ८९०...म्हणजे जवळपास १०००-९०० असा झाला. एक कल्पक जिल्हाधिकारी आपल्या अधिकाराच्या कक्षेत राहूनदेखील (प्रसंगी चाकोरीबाहेर जाऊन) अशी सृजनशील कार्य करतो त्यावेळी त्याच्या पाठीशी समाजातील सर्वच घटक उभे राहतात. श्री.विनिल याना मिळत असलेल्या पाठिंब्याची हीच जातकुळी आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
च
चिंतामणी Mon, 02/21/2011 - 06:48 नवीन
एकूणच हिंसक चळवळींना विरोध करणाऱ्यांची किती ताकद अशा गोष्टींच्या मागे येते त्यावर बरेच काही अवलंबून राहील. श्रामो, तुमचा आशावाद बघीतला. मीसुद्धा आशावादीच आहे. परन्तु तुम्ही आधी उल्लेख केलेल्या NGOs, तथाकतीत मानवतावादी इत्यादी ठरावीक ठिकाणीच आवाज उठवतात. (मी यादी द्यायची गरज नाही.) आता ३ दिवस होउन गेले. अजून कोणत्याही NGOs, तथाकतीत मानवतावादी इत्यादींनी या प्रकारात आवाज उठवला नाही. ज्या कोणी निवेदने छापुन आणली त्यांनी ढोलकी वाजवली आहेत. एकीकडे माओवाद्यांना/नक्शलवाद्यांना ओलीसांना सोडुन द्यायचे आवाहन करायचे (त्या प्रकाराबद्दल निषेध नाही केलेला), दुसरीकडे सरकारला त्यांच्या विरूध्दची कारवाई थांबवायचे आवाहन करायचे. त्यामुळे मलातरी असे वाटते की तुमचा आशावाद या प्रकरणात फोल ठरणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Mon, 02/21/2011 - 07:46 नवीन
मानवतावादी संस्था-संघटना आणि एनजीओज क्षणभर बाजूला ठेवूया (कारण, त्या का उभ्या रहात नाहीत, असा माझाच मूळ प्रश्न आहे). त्यांच्यात समाविष्ट नसणारा मोठा समुदाय बाहेर असतो. तोही इथं पुढं आला पाहिजे आणि फक्त ओरिसातील नव्हे तर ओरिसाच्या बाहेरही. ओरिसात तो उभा राहतोय. अगदी काल-परवा आदिवासींच्याच मोठ्या समुहाने विनीलच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले हे कळताच माओवाद्यांनी त्याला पुन्हा एका खेड्यातून दुसरीकडे हलवले, असे एक वृत्त आजच वाचले. त्या आदिवासींपलीकडे "विनील आमचा हिरो" असे म्हणत किती जण उभे राहतील, असा माझा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
स
सुधीर काळे Mon, 02/21/2011 - 11:00 नवीन
म्हणूनच माझा नेत्यांकडे पत्रे लिहिण्यावर विश्वास आहे. पण दु:खाची गोष्ट अशी कीं खासदारांना 'sansad.gov' या 'आयडी'ला पाठविलेली प्रत्येक ई-मेल बाउन्स होऊन परत येते. हा फक्त खासदारांनी आपापसात 'मेला-मेली' करण्यासाठीचा आयडी असावा! मग कुठे लिहायचे हे कळत नाहीं. फक्त पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पाठविलेले निरोप कमीत कमी बाउन्स होत नाहींत. दहातल्या एकाद्या निरोपाचे उत्तर पंतप्रधानांच्या कार्यालयातून येते. प्रतिभाताईंचा ई-मेल आयडी 'one-ended bag' च वाटते. पण मी लिहीत असतो. कुणाला जास्त माहिती असेल तर द्यावी ही विनंती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
आ
आळश्यांचा राजा Sun, 02/20/2011 - 15:48 नवीन
एकूणच समाज स्वतःला सरकारपासून वेगळा मानतो की काय असा प्रश्न अनेकदा उभा राहतो. विनील आणि माझीच्याच संदर्भात नव्हे फक्त. इतरही.
एकीकडे विनीलसारखी मंडळी काम करतात, त्याचवेळी दुसरीकडे अशाच काही भागांमध्ये अशाच स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठीचे अहिंसक संघर्षही सुरू असतात. विनीलचे काम आणि/किंवा हे अहिंसक संघर्ष यांना समाजातून किती साथ मिळते?
याचं कारण मला वाटतं मिसप्लेस्ड प्रायॊरिटीज. सर्वांच्याच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
स
सुधीर काळे Mon, 02/21/2011 - 11:12 नवीन
राजासाहेब, मी कामटेबाईंचे पुस्तक वाचले आहे, पण करकरेबाईंनी पुस्तक लिहिले आहे याची कल्पनाच नव्हती. मी एक दिवस पुण्यात आहे. लगेच कळले तर आणेन येता-येता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा
आ
आळश्यांचा राजा Sun, 02/20/2011 - 19:20 नवीन
http://www.youtube.com/watch?v=_11_ufkDP4o इथे मलकनगिरीतील आदिवासी विनीलच्या बाजूने कसे उभे आहेत ते बघायला मिळेल. हा त्याच कट ऑफ भागातला व्हिडो आहे. याला म्हणतात नक्षल "वादा" विरुद्धचा लढा. एक आदिवासी मध्यम वयीन बाई विनीलचा उल्लेख "माझा बाप" असा करतेय. माझ्या बापाला घेतल्याशिवाय मी जाणार नाही म्हणतेय. मी त्याच्याशिवाय कशी जगू म्हणतेय.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 02/20/2011 - 20:13 नवीन
वरील पोस्ट बद्दल आणि http://www.misalpav.com/node/16880साठी सुद्धा. एव्हढे सगळे लिहून/दाखवून झाले तरी विचारवंताच्या (?) मतात फरक पडणार नाही हे येथील चर्चेवरून स्पष्ट दिसत आहे. विचारवंताच्या (?) मतात फरक पडो ना पडो, आदीवासीलोकांचा सत्याग्रह आणि भावना बघून झाल्यावर "ते डिस्ट्रीक्ट कलेक्टर आहेत", "त्याना गांभीर्य नाही" इत्यादी शेरेबाजीचा विसर पडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा
आ
आळश्यांचा राजा Sun, 02/20/2011 - 19:44 नवीन
http://www.youtube.com/watch?v=Y_7o6GfcNXI&feature=related
  • Log in or register to post comments
आ
आळश्यांचा राजा Sun, 02/20/2011 - 20:02 नवीन
विनीलचे बॅचमेट आणि मलकनगिरी जवळच्याच कोरापुट जिल्ह्याचे कलेक्टर राजेश पाटील यांचे मन्तव्य इथे आहे. http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=NashikEdition-6-4-19-02-2011-7a123&ndate=2011-02-20&editionname=nashik
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/21/2011 - 10:18 नवीन
असेच काही वेडे लोकं फिरत असतात आजूबाजूला, एक आहेत मनोज स्वेन. जालावर फिरताना विनील कृष्णा यांची, नक्षलवाद्यांनी पळवून नेण्याच्या काही दिवस आधीचीच आणखी एक गोष्ट सापडली. आणि नक्षलवाद्यांसाठी ही एक कविता.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 02/22/2011 - 17:15 नवीन
आत्ताच आलेल्या बातमीनुसार विनील आणि पवित्र यांची सुटका झाली आहे.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 02/22/2011 - 17:17 नवीन
अभिनंदन.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा