Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सदसद्विवेक बुद्धी

य
यनावाला यांनी
Sun, 02/27/2011 - 17:17  ·  लेख
लेख
पं.महादेवशास्त्री जोशी यांचे आत्मपुराण हे चरित्रात्मक पुस्तक आहे. त्यांनी सुरू केलेल्या ज्योतिष कार्यालयासंबंधीची हकीगत त्या पुस्तकात आहे. त्यांतील काही भाग त्यांच्याच शब्दांत असा:--- "पणजीत मध्यवस्तीत जागा मिळवली आणि पाटी झळकवली :- ’ज्योतिष कार्यालय: इथे ज्योतिषविषयक सर्व कामे केली जातील.’ पाटी पाहून लोक यायला लागले.पत्रिका करू लागलो.त्यांतील ग्रहांचे लाभयोय, त्रिकोणयोग,नवपंचमयोग,युती ,प्रतियुती तसेच गोचरीतल्या ग्रहांचे जन्मपत्रिकेतील ग्रहांशी योग हे सगळे लक्षात घेऊन जातकशास्त्रानुसार भविष्य सांगू लागलो. थोड्याच दिवसांत लक्षात आले की माझी भविष्यवाणी खरी उतरत नाही.जेमतेम पंचवीस टक्के जमायचे.तसेच शास्त्राच्या नियमांविषयीं सुद्धा शंका निर्माण झाली.लग्नी रवि असेल तर माणूस उंच हे शास्त्र.पण लग्नी रवि असलेला एखादा उंच, एखादा मध्यम तर काही बुटके आढळू लागले. माझा आत्मविश्वास ढळला. गोव्यात एक ख्यातनाम ज्योतिषी होते.त्यांच्याकडे माणसांची रीघ लागलेली असायची. त्यांना भेटून शिष्यस्तेSहम् म्हटले.ते पृच्छकाशी कसे बोलतात ते लक्षपूर्वक ऐकू लागलो. ते नेमके उत्तर कधीच देत नसत.पृच्छ्काला बोलके करीत. प्रश्न विचारून त्याच्याकडूनच सगळी माहिती घेत. मग तेच सगळे मोठ्या चतुराईने सांगून आपण अचूक भविष्य वर्तविले असे भासवीत.वायदे देत ते षण्मासीचे:-तुझे काम नक्की होणार .पण तीन महिने लागतील. ग्रहदशा बदलली की अडचणी संपतील.सध्या वक्री असलेला मंगळ तेवढा सरळ होऊं दे. मग सगळे सुरळीत होईल. हे ऐकून आशा पल्लवित झालेला पृच्छक मान डोलवायचा. त्या भास्कराचार्याला एक भाबडी शंका विचारली,"...पण यांत जातकशास्त्र येतेच कुठे?" "जातकशास्त्र? तुम्ही ग्रंथाधारे भविष्य सांगायला गेलात की मेलात.इथे शब्दजंजाळच कामी येते.समोरच्या माणसाचे बारीक निरीक्षण करायचे.भविष्य सांगायचे ते चांगलेच सांगायचे.त्याला आशेच्या घोड्यावर बसवून पाठवून द्यायचे.अहो,हा धंदा आहे. यांत तुमचे वाक्चातुर्य जितके प्रभावी तितके भविष्यकथन अचूक.शास्त्राला धरून भविष्य वर्तविणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणे आहे." मी हिरमुसला होऊन परतलो.छे:, हे असले भविष्यकथन आपल्याला बापजन्मी जमायचे नाही.किती दिवस मी लोकांना आणि स्वत:लाही फसवीत राहू?.मला जाणवले की ज्योतिष हा माझा जीवन व्यवसाय होऊ शकणार नाही.मग एके दिवशी निर्धार करून ज्योतिषकार्यालयाची पाटी स्वहस्ते खाली काढली. त्या दिवसापासून आजपावेतो कोणताही ज्योतिषग्रंथ उघडला नाही.फलज्योतिष या विषयावर मी कायमचा पडदा टाकला." .... फलज्योतिषशास्त्रावर पूर्ण विश्वास ठेवून,त्याचा सांगोपांग अभ्यास करून मोठ्या उमेदीने ज्योतिष व्यवसाय सुरू करणार्‍या शास्त्रीबुवांचा हा सत्य अनुभव आहे."किती दिवस मी लोकांना आणि स्वत:लाही फसवीत राहू?" अशी अंत:प्रेरणा झाली ती सदसद्विवेकबुद्धी जागृत असल्यामुळे. ती नसती आणि जीवनव्यवसाय म्हणून सोडा पण जोडधंदा म्हणून ज्योतिष कार्यालय सुरू ठेवले असते तरी पं.महादेवशास्त्री जोशी हे गोव्यातील जनमान्यताप्राप्त विख्यात ज्योतिषी होऊ शकले असते.आर्थिक प्राप्ती ही चांगली झाली असती.मात्र सदसद्विवेक दडपून टाकल्याची टोचणी सतत राहिली असती. ते चांगल्या चित्रपटकथा लिहू शकले नसते.भारतीय संस्कृतिकोशाची रचना झाली नसती. ................................................................................................................................ कृपया कोणताही पूर्वग्रह न ठेवता या सत्य अनुभवावर विचार करावा.मग जे काही बुद्धीला पटेल ते मानावे. **********************************************************************************

प्रतिक्रिया द्या
35248 वाचन

💬 प्रतिसाद (79)

प्रतिक्रिया

न
नगरीनिरंजन Sun, 02/27/2011 - 17:29 नवीन
ज्योतिषी लोकांकडून भविष्य ऐकतानाच लोकांच्या लक्षात हे कसे येत नाही हाच फक्त प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 02/27/2011 - 18:00 नवीन
यनांनी मिसळपावावर लेख टाकला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
समोरच्या माणसाचे बारीक निरीक्षण करायचे.भविष्य सांगायचे ते चांगलेच सांगायचे.त्याला आशेच्या घोड्यावर बसवून पाठवून द्यायचे.अहो,हा धंदा आहे. यांत तुमचे वाक्चातुर्य जितके प्रभावी तितके भविष्यकथन अचूक.शास्त्राला धरून भविष्य वर्तविणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणे आहे."
परफेक्ट!! :)
  • Log in or register to post comments
आ
आळश्यांचा राजा Sun, 02/27/2011 - 18:45 नवीन
हे असले भविष्यकथन आपल्याला बापजन्मी जमायचे नाही.
अधोरेखित शब्दांवरुन असे वाटते की शास्त्रीजींना एका ठरावीक प्रकारच्या भविष्यकथनाविषयी(च) प्रॉब्लेम असावा.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Sun, 02/27/2011 - 18:58 नवीन
उत्तम लेख, आणि धन्यवाद मिपावर टाकल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 03/07/2011 - 17:15 नवीन
सहमत आणि सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
स
सहज Mon, 02/28/2011 - 02:07 नवीन
उत्तम लेख. मागे घासकडवी यांनी मोठ्या बुवा, बाबांचे भाकीत संख्याशास्त्रातुन बरोबर यायची शक्यता व हे असे बरोबर आलेले जातक त्या त्या बुवांचे पट्टशिष्य रादर पट्ट जाहीरातदार होउन अजुन लोक जमवतात व चक्र सुरु राहते. १००% भाकीते सोडा ५०% भाकीतेही खरी होत नाहीत तरी बोलबाला होउन धंदा चालतो. हे एका लेख अथवा प्रतिसादातून उत्तम समजावून सांगीतले होते. दुवा शोधत आहे. सापडला. नाडीपट्टीवाल्यांची अजुन एक चतुराई फार फार आवडली. हे सगळे भविष्य हजारो वर्षांपुर्वी लिहले आहे, त्यामुळे चुकीचे असेल तर त्या हजारो वर्षांपूर्वी लिहलेल्या ऋषीमुनींची चूक. आपण फकस्त पोस्टमन, त्यामुळे तुमची पट्टी चुकली नसेल तुम्हीच पत्ता चुकीचा सांगीतला असेल!! कॅश ओन्ली प्लीज!!
  • Log in or register to post comments
क
किशोरअहिरे Mon, 02/28/2011 - 02:24 नवीन
माझा ज्योतीष शास्त्रावर अजिबात विश्वास नाही.. परंतु नुकताच एक अनुभव असा आला की त्या जोतीष बुवाने मुलीची पत्रिका पाहुन एकदम ढोबळ मानाने सांगितले की मुलीचे शिक्षण कमी आहे आणि पुढे पैसा कमवेल असे वाटत नाही.. त्या मुलीचे खरोखरच शिक्षण कमी होते, आणी हाउस वाईफ राहील असेच वाटले.. असो हा फक्त एक अनुभव म्हनुन सांगत आहे.. त्याच ज्योतिष बुवानी आतापर्यंत सांगितलेल्या ६०% टक्के गोष्टी खर्या निघाल्या बाकीच्या ४०% साफ खोट्या :) ह्यातुन मला एकच साक्षात्कार झाला तो म्हणजे .. स्वतःची सदस्दविवेक बुध्दी वापरुनच निर्णय घ्यावेत .. ज्योतीष बुवा कडे जाऊन पैसे , वेळ ऊगाच खर्च होतो ... आणी वरुन डोक्यावर तान पण असतो जर त्याने काही ऊलट सुलट सांगितले तर.
  • Log in or register to post comments
N
Nile Mon, 02/28/2011 - 03:46 नवीन
अरे वा! यनावालांचे मिपावर पुनरागमन पाहुन आनंद झाला. त्यांनी येथे लिहित रहावे.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 02/28/2011 - 05:54 नवीन
हेच म्हणतो. यनावालांना इथे पाहुन आनंद झाला, त्यांनी लिहीत रहावे असे म्हणतो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
व
विकास Mon, 02/28/2011 - 03:50 नवीन
श्री. यनावालांचे मिपानक्षत्रात प्रवेश केल्याबद्दल स्वागत! :-) असो. लेख आवडला. व्यक्तीगत विचाराल तर मी कधी ज्योतिष पाहीले नाही की त्यावर आधारून निर्णय घेतले नाहीत. पण जर कोणी बघत असले आणि त्याच्या आहारी जात नसेल तर कधी मधे पडलो नाही. मात्र असे देखील झाले आहे की कोणी तरी परीस्थितीने गांजल्याने भविष्याच्या आहारी जाण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळेस अशा व्यक्तींच्या सदसदविवेकबुद्धीस जागे करायचे प्रयत्न केलेत. मात्र सदसदविवेकबुद्धी ही केवळ ज्योतिषशास्त्राचा फोलपणा मान्य न करण्यातच असते असे नव्हे. आज कम्युनिझमचा फोल पणा समजून देखील त्याच्या मागे (स्वतःला मोर इक्वल करत) जाणारे बुद्धीवादी हे कदाचीत ज्योतिष्य बघत नसतीलही, पण तरी देखील स्वतःचे नाही, पण देशाचे नुकसान करू पहात आहेत. माझ्या दृष्टीने तिथे सदसद्विवेकबुद्धी येण्याची अधिक तातडीची गरज आहे आणि काळजीचे कारण देखील आहे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/28/2011 - 05:01 नवीन
फक्त भविष्य आणि कम्युनिझमच नव्हे तर प्रत्येक गोष्टीकडेच उघड्या डोळ्यांनी आणि जागृत मेंदूने बघावं असं मला हा लेख वाचून वाटलं. ज्योतिषाविषयीचा असा अनुभव आल्यामुळे पं.महादेवशास्त्री जोशी यांचा डोळसपणा वाढला असा काही उल्लेख, घटना आहेत का? एका प्रकारे विचार करण्याची सवय लागली, पद्धत एकांगी असेल किंवा सम्यक असेल, तर अनेक गोष्टींबाबत विचार करताना तशा पद्धतीने विचार केला जातो. शास्त्राचा (यथायोग्य) अभ्यास करणारे शास्त्रीय दृष्टीकोनातूनच (जवळजवळ) सगळ्या गोष्टींचा अभ्यास, विचार करतात. एखाद्या घटनेमुळे विचार करण्याची पद्धतही बदलते. महादेवशास्त्रींच्या आयुष्यातली ही गोष्ट मला या प्रकारची वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
आ
आळश्यांचा राजा Fri, 03/04/2011 - 15:39 नवीन
फक्त भविष्य आणि कम्युनिझमच नव्हे तर प्रत्येक गोष्टीकडेच उघड्या डोळ्यांनी आणि जागृत मेंदूने बघावं
सहमत आहे. शास्त्रीजींना एखाद्या अनुभवातून काय धडा मिळाला (असावा) याचा अर्थ लावता लावता (किंवा न लावताच) मंडळी भविष्य पाहता येऊ शकते की नाही यावर हाणामार्‍या करु लागतात याची अंमळ मौज वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/28/2011 - 04:31 नवीन
श्री यनावालासेठ यांचे मिपावर पुन्हा एकदा स्वागत....! लेख आवडला....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 02/28/2011 - 05:51 नवीन
लेख आवडला, माझा भविष्यावर विश्वास नाही, कारण ते नाहीचय मुळी, जे आहे आता माझ्यासमोर तेच फक्त खरं बाकी सगळं मिथ्या, आणि जे नाही ते जाणुन घेउन काय करणार. बाकी सद्सद्विवेक बुद्धी ही ज्याने त्याने आप्आपल्या स्वार्थासाठी आखलेल्या मर्यादा असतात, प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या. प्रत्येक जण या आपल्या मर्यादेत राहुन दुस-याच्या मर्यादा कशा तोकड्या आहेत किंवा चुक आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. मी तर असे करतोच, कारण असे केले नाहीतर जगणार कसा या सद्सद्विवेक बुद्धिच्या आधारे चालणा-या जगात, हे सगळे सद्सद्विवेकबुद्धिवादी मला सुखाने जगु देणार नाहित.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 02/28/2011 - 06:44 नवीन
कृपया कोणताही पूर्वग्रह न ठेवता (माझे शब्द- नाडीग्रंथांतील मजकुराच्या) सत्य अनुभवांवर विचार करावा. मग जे काही बुद्धीला पटेल ते मानावे.
प्रा. य.ना. वाला सर, पं.महादेवशास्त्री जोशी यांचे आत्मपुराण पुस्तक वाचून आपला जर वरील सल्ला असेल की 'सांगोपांग अभ्यास करून मोठ्या उमेदीने ज्योतिष व्यवसाय सुरू करणार्‍या शास्त्रीबुवांचा हा जो सत्य (माझे शब्द- म्हणजे थोतांड असा )अनुभव आहे.' तो तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही तो अनुभव घेण्याची तसदी न घेता मानता आहात. मग याउलट नाडीग्रंथांवरील माझ्या शाब्दिक अनुभवांवर नुसते न विसंबता, पुर्वग्रह न ठेवता आपण सांगोपांग प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. अर्थात तो तोंड देखला नसेल, हे आपल्याला मान्य आहे. असे मी मानतो. त्या नाडीग्रंथ ताडपट्टीचा फोटो मिळवून,ताडपट्टीतल्या मजकुराचे कथन आपल्या माहितीतल्या तमिळ जाणकाराला देऊन व त्यातील लिखाणाची म्हणजे पर्यायाने आपले नाव व जन्मदिनांक वगैरे उल्लेखांची खात्री करून मग जे काही सदसद्विवेक बुद्धीला पटेल ते मानावे. म्हणजे आयुष्यभर नाडीग्रंथांच्या सत्यतेला दडपून टाकल्याची टोचणी सतत राहणार नाही अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. आता आपण आपला सल्ला इतरांनी अमलात आणावा असे अपेक्षित असाल तर ही माझी नम्र विनंती आपण टाळणार नाही अशी अपेक्षा करतो.
  • Log in or register to post comments
प
पंगा Mon, 02/28/2011 - 07:14 नवीन
लेख बर्‍यापैकी संयत वाटला. स्नानजलाच्या निचर्‍याबरोबरच अर्भकाच्या सुरक्षिततेचीही दक्षता विशेषेकरून स्वागतार्ह आणि संतोषजनक. लेखाचे स्वागत आणि लेखास ईप्सित लक्ष्यभेदासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ग
गुड्डु Mon, 02/28/2011 - 09:27 नवीन
आजवर कुतुहलापोटि अनेकांकडे पत्रिका दाखवल्या आहेत थोड्या बहुत प्रमाणात हाच अनुभव आला आहे.
  • Log in or register to post comments
य
यनावाला Mon, 02/28/2011 - 09:32 नवीन
श्री.आ.रा. लिहितातः"हे असले भविष्यकथन आपल्याला बापजन्मी जमायचे नाही. अधोरेखित शब्दांवरुन असे वाटते की शास्त्रीजींना एका ठरावीक प्रकारच्या भविष्यकथनाविषयी(च) प्रॉब्लेम असावा. " .. हे असले भविष्य म्हणजे :"हा धंदा आहे. यांत तुमचे वाक्चातुर्य जितके प्रभावी तितके भविष्यकथन अचूक.शास्त्राला धरून भविष्य वर्तविणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणे आहे." असे सांगणारा गोव्यातील प्रसिद्ध ज्योतिषी ज्या पद्धातीचे भविष्य वर्तवतो तसले भविष्य; हे स्पष्ट आहे.
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Mon, 02/28/2011 - 09:52 नवीन
जसे भोन्दू वैद्य असतात, म्हणून शास्त्र खोटे ठरत नही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 02/28/2011 - 10:32 नवीन
या इथे कोणी काहीही म्हंटलेले नसतानादेखील नाडी बद्दलचा प्रतिसाद वाचून आश्चर्य वाटले. यालाच कदाचित सदसद विवेक अबुद्धीची टोचणी म्हणत असावेत
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 02/28/2011 - 10:43 नवीन
विजुभाऊंचे "णाडीप्रेम " पुण्हा एकदा फॉर्म मधे :) बाकी माडी , ताडी आणि णाडी , (अजुन एक "डी " आहे, पण तो समजुन घ्या) ह्या डींकडे कधीही फिरकु नये असे आमचे जाणकार मत आहे :) नेहमी आपले "व्ही" मधे खेळावे असे काल क्रिकेट एक्सपर्ट भिषनसिंग भेदी झी ण्युज वर म्हणाला. -व्ही'जुभाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
आ
आत्मशून्य Mon, 02/28/2011 - 10:35 नवीन
एकदम सहमत. मूळातच जेव्हा इंग्रजांनी काशीमधील ज्योतीष वीशयक ग्रंथांचे ग्रंथालय जाळले ते ३ महीने तसेच जळत होते असे ऐकीवात आहे, आणी आजचे शास्त्र हे त्यातून वाचलेल्या काही ग्रंथांवर व काही पाश्चीमात्य लोकांच्या अभ्यासावर टीकले आहे. म्हणून ते कदाचीत परीपूर्ण नसेलही... पण अर्थातच काही लोक अध्यात्मीक जोराच्या बळावर भवीश्य वर्तवू शकतात हा अनूभव आहे. नाडीग्रंथांवीषयी इतकेच म्हणता येइल की ते भूतकाळ बराच योग्य सांगतात याचा अनूभव आहे पण अजून त्याचे भवीश्य कीतपत खरे ठरते हे माहीत नाही.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Mon, 02/28/2011 - 18:36 नवीन
काही लोक अध्यात्मीक जोराच्या बळावर (वाचासिद्धी) भविष्य वर्तवू शकतात हा अनूभव आहे. +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
ट
टारझन Mon, 02/28/2011 - 10:37 नवीन
एक नंबर !! - चुनावाला
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 03/07/2011 - 17:38 नवीन
यनांचे पुनरागमन जोरदार झाले !!! (ठाणावाला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सामान्य वाचक Mon, 02/28/2011 - 11:05 नवीन
असे म्हणणे हे चूकिचे आहे. @आत्माशून्य : बरोबर आहे. असे लोक मी ही पाहीले आहेत की जे बिनचूक भविष्य वर्तवू शकतात.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 03/01/2011 - 05:14 नवीन
भ्रुगु संहिता बरोबर असते असा एक विश्वास आहे......घाणेकर शास्त्री भ्रुगु संहिता आधारे अचुक भविष्य वर्तवायचे असा त्यांचा पंचक्रोशीत लौकिक होता...........
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 03/01/2011 - 05:40 नवीन
"मला अनुभव नाही म्हणून एखादी चीज अस्तित्वातच नाही असे म्हणणे चूक.." या अत्यंत योग्य वाक्याविषयी थोडे: काही वाक्ये अति योग्य असल्यानेच ती ट्रिव्हिअल , विरळ बनतात. मग त्यात नेमकेपणा येणेच शक्य होत नाही. अश्या विचारपद्धतीने जगात काहीच "सिद्ध" करता येणार नाही. कारण मला त्या गोष्टीचे अनुभव (ज्ञान) किती आहे हा भाग कायम सब्जेक्टिव्ह राहणार. ते वादग्रस्तच राहणार. कारण पूर्ण ज्ञान ही भ्रामक समजूत आहे. तर तसे काहीच "चुकीचे" आहे असे १००% सिद्ध करता येत नाही. किंवा जगात काहीच बरोबर आहे असेही "सिद्ध" करता येत नाही. केवळ थियरी मांडता येते. ती पटली आणि प्रेडि़क्टेबल आउटकम दिसले की आपला विश्वास बसतो. मग ज्योतिष असो, भूमितीची तत्वे असोत, क्वांटम थियरी असो की स्ट्रिंग थियरी. विज्ञान, भविष्य, ताईत, संमोहन, भाग्यरत्ने, नजर कवच.. काहीही चुकीचे /बरोबर आहे हे ढोबळ मानाने दाखवता आले तरी "सिद्ध" करता येत नाही. जे सकृद्दर्शनी पटेल ते स्वीकारायचे ही नैसर्गिक सवय आहे. आपल्याला अनुभव नाही म्हणून ते "अस्तित्वात नाही" अशा एका जनरल मानण्यावर कोणी चालत असेल तर तो जगण्यातल्या सोयीचा भाग आहे आणि त्यात काही चूक नाही. (मी आणि माझे दृश्य जग एकमेकांसोबत सुखी असलो तर.) आपल्याला अनुभव नाही म्हणून ते अस्तित्वात आहे की नाही यावर मत द्यायला आपण लायक नाही म्हणून "ते आहेच" असा अप्रोच घेऊन जगणारे मोठ्या संख्येने असतात. मला वाटतं कोणतीही अ‍ॅबसोल्यूट सत्य अशी गोष्ट नसतेच. केवळ समोर दिसणार्‍या पुराव्यांवरुन आपण ती स्वीकारतो किंवा नाकारतो. ज्योतिष, भविष्य, तारे ग्रह, पोपट, पत्ते, यंत्रे, पट्ट्या, नाड्या, भूर्जपत्रे, चुंबक, काचगोळा यांपैकी कशानेतरी एक शक्यता वर्तवणे हा मनोरंजक भाग असू शकतो. त्याला सत्य मानून चालण्याचे काही कारण मला दिसत नाही. पण कोणी मानत असेल तर तो भंपक, थोतांडवादी.. मानत नसेल तर प्रगल्भ, सुधारक असे म्हणायला काही आधार नाही हे खरेच. आपण केवळ आपले एक बनलेले प्रामाणिक मत रेटत राहायचे इच्छा असेल तर. :)
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 03/01/2011 - 05:56 नवीन
ज्योतिष, भविष्य, तारे ग्रह, पोपट, पत्ते, यंत्रे, पट्ट्या, नाड्या, भूर्जपत्रे, चुंबक, काचगोळा यांपैकी कशानेतरी एक शक्यता वर्तवणे हा मनोरंजक भाग असू शकतो. त्याला सत्य मानून चालण्याचे काही कारण मला दिसत नाही. पण कोणी मानत असेल तर तो भंपक, थोतांडवादी.. मानत नसेल तर प्रगल्भ, सुधारक असे म्हणायला काही आधार नाही हे खरेच.
असहमत. (थोतांडवादी म्हणजे प्रसार करणाराच असे नाही) पण वरील काही गोष्टी मानणारा मुर्ख हे सहज म्हणता येईल तर उरलेल्या काहींना मुर्ख म्हणताना थोडे कष्ट घ्यावे लागतील इतकंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Tue, 03/01/2011 - 06:13 नवीन
शास्त्र म्हणून बघायचे नाही असे गृहीत धरुनच बोलतोय. आपल्या हाताबाहेरच्या, शक्तिबाहेरच्या अनंत गोष्टी जगात आहेत आणि त्यांच्यापासून कोणाला रिलीफ हवा असेल आणि तो मिळत असेल तर कोणत्याही मार्गाचा आधार घेतला तरी काय फरक पडतो.. ? मी पाहिले आहे की अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोक हे तिथेही शंभर टक्के काही अवलंबून ठेवत नसतात. "हेही करु तेही करु" वाले हे लोक असतात. औषध चालू आहेच..होम्योपॅथीही घेऊन पहा..गोमूत्रही ट्राय करा...अंगार्‍याची पुडीही काय खिशाला जड आहे का? ठेवा तीही...आणि घाटकोपरला एक अचूक भविष्य सांगणारे आहेत, त्यांनाही भेटून घ्या..कधी संपेल ही दशा ते तरी कळेल..मग नारायण नागबळीही करुन घेऊ..त्र्यंबकेश्वर काय दूर आहे का? अशा अनमानधपक्याने सगळं चाललेलं असतं. कोणीही जिवाच्या वर आणि खिशाबाहेर जाऊन स्वतःची अन्नान्न दशा करुन काही करत नाही. परवडेल असा ज्योतिषी आणि उपचारक निवडला जातो. खेडेगावात औषधोपचारांऐवजी काही इतर उपाय केले जातात त्यांनी नुकसान होतं. पण त्यात जवळपास मेडिकल सुविधा उपलब्धच नसण्याचा दोष जास्त असतो. तिथे मात्र हा गंभीर प्रश्न होतो आणि त्यांना मूर्ख किंवा शहाणे ठरवण्यापेक्षा प्रत्यक्ष हस्तक्षेप करुन त्यातल्यात्यात नवीन उपचारपद्धतीकडे वळवावे अशी गरज असते. बाकी धंद्यात खोट, लग्न न जमणे वगैरे अशा अगतिकतेमधे कोणी असे करत असेल तर मग काय बोलावे..इथेही जेवढे झेपेल तेवढेच केले जाते. क्वचित एखादा त्यावर अवलंबून राहून दीर्घकालीन नुकसान करुन घेणारा असेल तर दुर्दैव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 03/01/2011 - 06:41 नवीन
मी पाहिले आहे की अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोक हे तिथेही शंभर टक्के काही अवलंबून ठेवत नसतात. "हेही करु तेही करु" वाले हे लोक असतात. औषध चालू आहेच..होम्योपॅथीही घेऊन पहा..गोमूत्रही ट्राय करा...अंगार्‍याची पुडीही काय खिशाला जड आहे का? ठेवा तीही...आणि घाटकोपरला एक अचूक भविष्य सांगणारे आहेत, त्यांनाही भेटून घ्या..कधी संपेल ही दशा ते तरी कळेल..मग नारायण नागबळीही करुन घेऊ..त्र्यंबकेश्वर काय दूर आहे का?
'सगळे' करुन पाहणारे हे लोक मुळात अडाणी असतात, अन्यथा सगळं करुन पहाण्यापेक्षा जे कॉमनसेन्सने करु नये म्हणून यादीतुन वगळले जाउ शकते ते करुन पाहिले नसते. बर हे लोक नुसतं सर्व करुन पाहतात का? अर्थातच नाही, दहा लोकांना सांगतातही. वर त्याचा अगदी १००% गुण येतो वगैरे सुद्धा सांगतात त्यामुले हे हार्मलेस नाही हे मान्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
आ
आत्मशून्य Tue, 03/01/2011 - 09:12 नवीन
अश्या विचारपद्धतीने जगात काहीच "सिद्ध" करता येणार नाही. कारण मला त्या गोष्टीचे अनुभव (ज्ञान) किती आहे हा भाग कायम सब्जेक्टिव्ह राहणार. ते वादग्रस्तच राहणार. कारण पूर्ण ज्ञान ही भ्रामक समजूत आहे.
मूळात काही सीध्द करायचेच नसते. अनूभव हा वैयक्तीक तसेच सामूहीकही असतो. वैयक्तीक अनूभव म्हणजे "कालच माझ्या स्वप्नात कत्रीना कैफ आली होती" आता हे मी तूम्हाला सीध्द कसे करणार ? म्हणून हा अनूभव वैयक्तीक ठरतो म्हणजेच सब्जेक्टिव्ह राहू शकतो. पण समजा काल आपण कत्रीना कैफचा "तीस मार खान हा चीत्रपट पाहीला" आता हा अनूभव सामूहीक असल्याने तो एकमेकांना सीध्द करावा लागत नाही, तसेच तीकीट काढणार्‍या प्रत्येकाला त्या चीत्रपटात कत्रीना कैफ दीसत असल्याने कत्रीनाला पहायला (पून्हा पून्हा)तीकीट काढून जाणार्‍याना मूर्खही म्हणता येत नाही. मग ज्या लोकांना कधी तीकीटच मीळाले नाहीये, अथवा चूकीच्या लोकांकडून तीकीट मीळवण्याच्या प्रयत्नात फसवणूक होवून चीत्रपटच पहाता आला नाही अथवा जे फक्त ऐश्वर्या राय चे पंखे आहेत अथवा स्वभावाने चक्क नालायक व खोटारडे आहेत , त्यांनी अशी हूल ऊठवली की या चीत्रपटात कत्रीनाच नाहीये.. तर या परीस्थीतीत असे वागणारे व त्यांच्यावर वीश्वास ठेवणारे यामधे महामूर्ख कोण कोण ठरू शकेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Tue, 03/01/2011 - 09:20 नवीन
तात्कालिक तरी पटले आहे. म्हणून सध्या गप्प झालो आहे. पुन्हा विचार करुन आवश्यकतेनुसार पुन्हा टिपणी करीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
N
Nile Tue, 03/01/2011 - 09:27 नवीन
खी खी खी. =)) =)) हे म्हणजे एड्स रोग बरा करायला आधी त्याचा अनुभव घेण्याला पर्याय नाही असे म्हणणे झाले.घ्या लेको अनुभव घ्या. बादरायण संबंध लावुन उदाहरणं देउन फोलपणाला "उच्च"सिद्ध करण्याचा प्रयत्न काही नविन नाही. चालु दे. आमचं इल्यास्टीक टाईट आहे तोवर येउ नंतर प्रकाशकाकांसारखं बसु कुठंतरी जगाच्या भवितव्याची चिंता करत. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
आ
आत्मशून्य Tue, 03/01/2011 - 09:43 नवीन
हे म्हणजे एड्स रोग बरा करायला आधी त्याचा अनुभव घेण्याला पर्याय नाही असे म्हणणे झाले
ह्यामधे म्हणण्या ऐकण्यासारखे काय आहे ? जर का एड्स खराच बरा करायचा असेल तर तो कोणाला ना कोणाला तरी प्रत्यक्ष होणे / झाल्याचे अनूभवणे आवश्यकच ठरत नाही काय ? असो दूसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवणार्‍यांना हे पटणे अवघडच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 03/01/2011 - 09:48 नवीन
स्वतः अनुभवणे हा अर्थ सोयीस्कर रीत्या नाकारलेला दिसतो. असो. बाकी कुणाच्या खांद्यावर बंदुक कोण ठेवतंय? का उगाच शब्दांचे बुडबुडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य Tue, 03/01/2011 - 11:12 नवीन
स्वतः अनुभवणे हा अर्थ सोयीस्कर रीत्या नाकारलेला दिसतो.
अर्थातच नाही. कोण ना कोण मधे इतरांसोबत स्वत्:चा पण अंतर्भाव असतो हेच सूचवायचे आहे. आणी एड्स रोग बरा करायला त्याचा अनुभव घेण्याला पर्याय नाही असे माझे ठाम मत आहे. पण हे मत ज्या लोकांना दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवणे सोयीचे वाटते त्यांना पटणार नाही असे मी म्हटले आहे. स्पश्ट शब्दात लीहले असल्याने जर ते शब्दांचे बुडबुडे वाटत असतील तर कॄपया त्यांना हवेत वीरू देत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 03/01/2011 - 20:55 नवीन
>>आणी एड्स रोग बरा करायला त्याचा अनुभव घेण्याला पर्याय नाही असे माझे ठाम मत आहे. म्हणजे एडस रोगावर औषध शोधणारे सगळे डॉ./शास्त्रज्ञ यांना एड्स झालेला आहे असे म्हणायचे आहे का? >>पण हे मत ज्या लोकांना दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवणे सोयीचे वाटते त्यांना पटणार नाही असे मी म्हटले आहे. म्हणजे काय? हे कोणाबद्दल आहे? एडस वर संशोधन करणारे काय दुसर्‍यांना एडसची बाधा करवुन मग संशोधन करतात का? >>स्पश्ट शब्दात लीहले असल्याने जर ते शब्दांचे बुडबुडे वाटत असतील तर कॄपया त्यांना हवेत वीरू देत. स्पष्ट शब्द जरा दोन मिनिट विचार करुन लिहा हो, अगदीच अस्पष्ट अर्थ आहेत त्यांचे, अर्थात नाहीतर ते विरतीलच. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
स
सहज Wed, 03/02/2011 - 01:50 नवीन
>एडस वर संशोधन करणारे काय दुसर्‍यांना एडसची बाधा करवुन मग संशोधन करतात का? हो. एडसच असेच नव्हे इतर अन्य रोगांवर औषधे शोधताना अन्य जीवांवर जसे उंदीर, डुक्कर, माकडे, वानर काही उदाहरणात मनुष्य यांचा वापर होतो. १८व्या शतकात इंग्लंड तसे युरोपमधील अन्य देशात विविध रोगांवर लस बनवण्यात आल्या त्यात काही केसेस मधे लहान मुलांपासुन मोठ्यांपर्यंत व्यक्तींवर 'प्रयोग' करण्यात आले. याला श्री श्री रिचर्ड डॉकिन्सबाबा यांच्या तोंडून हे 'आज हे असे इथिक्स कमिटीमधुन कधीच पास होणार नाही' असे वर्णन ऐकले आहे (संदर्भ - बीबीसी चॅनेल वरील 'जिनियस' मालीका ) पण आजही (कमी घातक) औषध चाचणीत मनुष्याचा वापर होतो. औषधवाले लोक जास्त प्रकाश पाडू शकतील पण पेपरात क्लिनिकल ट्रायल करता लोकांना आवाहनाच्या जाहीराती वाचनात येतात. बाकी चालू द्या. खाली अभिज्ञ जे म्हणाले त्यांच्याशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
आ
आत्मशून्य Wed, 03/02/2011 - 11:25 नवीन
पुलेशू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Wed, 03/02/2011 - 20:22 नवीन
>>पुलेशू. गरज नाही, तुमच्याकडेच ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य Wed, 03/02/2011 - 22:25 नवीन
हा.का.ना.का. ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
आ
आत्मशून्य Tue, 03/01/2011 - 09:31 नवीन
एखादी कृती बरोबर नसेल पण ती चूकण्यामागे त्यामागे कारणेसूध्दा बरीच असतात, (व्यक्ती तशा प्रकृती) म्हणून तशा सगळ्यांना महामूर्ख संज्ञेमधे अथवा केवळ एकाच संज्ञेने संबोधणे मलाच जरा अतीशयोक्ती वाटतेय म्हणून महामूर्ख च्या जागी "द्रूश्टीकोनात चूकीचा अंतर्भाव झालेले" हा शब्द धरावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सामान्य वाचक Tue, 03/01/2011 - 10:11 नवीन
आपल्याला अनुभव नाही म्हणून ते "अस्तित्वात नाही" अशा एका जनरल मानण्यावर कोणी चालत असेल तर तो जगण्यातल्या सोयीचा भाग आहे आणि त्यात काही चूक नाही. (मी आणि माझे दृश्य जग एकमेकांसोबत सुखी असलो तर.) ----------------- याला हरकत काहिच नही, जोपर्यन्त दूसर्याच्या 'मानण्यावर' तुम्ही हल्ले चढवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Tue, 03/01/2011 - 10:20 नवीन
तेच तर.. बरोबर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
अ
अभिज्ञ Tue, 03/01/2011 - 06:14 नवीन
बर्‍याच वेळेला माणासाची आगतिकता त्याच्या सद्सद्विवेक बुध्दीवर मात करताना दिसते. अन माणूस ज्योतिष,नाड्या ह्यांच्या जाळ्यात अडकतो. ह्या आगतिकतेवर मात करायची कशी? हाच खरा मुद्दा आहे. लेख आवडला हे.वे.सा.न. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 03/01/2011 - 08:33 नवीन
अभिज्ञ शी सहमत आहे. हल्ली आम्ही या विषयावर लिहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
ट
टारझन Tue, 03/01/2011 - 08:48 नवीन
कशे लिवनार ? विल्याष्टीक च्या गुत्तुड्यातुन सुटलात तर ल्ह्याल ना ? :) - पोतराज बोगदापांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Tue, 03/01/2011 - 08:51 नवीन
तेच तेच लिवुन आमचच विल्याष्टिक लुज पल्डय! म्हनुन गाडी सायडिंगला लावलीय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Tue, 03/01/2011 - 09:10 नवीन
तेच तेच लिवुन आमचच विल्याष्टिक लुज पल्डय!
विल्याष्टिकंच ते .. कधीना कधी लुज पडणारंच .. म्हणुन म्हणतो .. बदलत रहा .. पण तुम्हाला लुज झालं तरी मोह सुटेणा बॉ त्या विल्याष्टिक चा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा