Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सदसद्विवेक बुद्धी

य
यनावाला यांनी
Sun, 02/27/2011 - 17:17  ·  लेख
लेख
पं.महादेवशास्त्री जोशी यांचे आत्मपुराण हे चरित्रात्मक पुस्तक आहे. त्यांनी सुरू केलेल्या ज्योतिष कार्यालयासंबंधीची हकीगत त्या पुस्तकात आहे. त्यांतील काही भाग त्यांच्याच शब्दांत असा:--- "पणजीत मध्यवस्तीत जागा मिळवली आणि पाटी झळकवली :- ’ज्योतिष कार्यालय: इथे ज्योतिषविषयक सर्व कामे केली जातील.’ पाटी पाहून लोक यायला लागले.पत्रिका करू लागलो.त्यांतील ग्रहांचे लाभयोय, त्रिकोणयोग,नवपंचमयोग,युती ,प्रतियुती तसेच गोचरीतल्या ग्रहांचे जन्मपत्रिकेतील ग्रहांशी योग हे सगळे लक्षात घेऊन जातकशास्त्रानुसार भविष्य सांगू लागलो. थोड्याच दिवसांत लक्षात आले की माझी भविष्यवाणी खरी उतरत नाही.जेमतेम पंचवीस टक्के जमायचे.तसेच शास्त्राच्या नियमांविषयीं सुद्धा शंका निर्माण झाली.लग्नी रवि असेल तर माणूस उंच हे शास्त्र.पण लग्नी रवि असलेला एखादा उंच, एखादा मध्यम तर काही बुटके आढळू लागले. माझा आत्मविश्वास ढळला. गोव्यात एक ख्यातनाम ज्योतिषी होते.त्यांच्याकडे माणसांची रीघ लागलेली असायची. त्यांना भेटून शिष्यस्तेSहम् म्हटले.ते पृच्छकाशी कसे बोलतात ते लक्षपूर्वक ऐकू लागलो. ते नेमके उत्तर कधीच देत नसत.पृच्छ्काला बोलके करीत. प्रश्न विचारून त्याच्याकडूनच सगळी माहिती घेत. मग तेच सगळे मोठ्या चतुराईने सांगून आपण अचूक भविष्य वर्तविले असे भासवीत.वायदे देत ते षण्मासीचे:-तुझे काम नक्की होणार .पण तीन महिने लागतील. ग्रहदशा बदलली की अडचणी संपतील.सध्या वक्री असलेला मंगळ तेवढा सरळ होऊं दे. मग सगळे सुरळीत होईल. हे ऐकून आशा पल्लवित झालेला पृच्छक मान डोलवायचा. त्या भास्कराचार्याला एक भाबडी शंका विचारली,"...पण यांत जातकशास्त्र येतेच कुठे?" "जातकशास्त्र? तुम्ही ग्रंथाधारे भविष्य सांगायला गेलात की मेलात.इथे शब्दजंजाळच कामी येते.समोरच्या माणसाचे बारीक निरीक्षण करायचे.भविष्य सांगायचे ते चांगलेच सांगायचे.त्याला आशेच्या घोड्यावर बसवून पाठवून द्यायचे.अहो,हा धंदा आहे. यांत तुमचे वाक्चातुर्य जितके प्रभावी तितके भविष्यकथन अचूक.शास्त्राला धरून भविष्य वर्तविणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणे आहे." मी हिरमुसला होऊन परतलो.छे:, हे असले भविष्यकथन आपल्याला बापजन्मी जमायचे नाही.किती दिवस मी लोकांना आणि स्वत:लाही फसवीत राहू?.मला जाणवले की ज्योतिष हा माझा जीवन व्यवसाय होऊ शकणार नाही.मग एके दिवशी निर्धार करून ज्योतिषकार्यालयाची पाटी स्वहस्ते खाली काढली. त्या दिवसापासून आजपावेतो कोणताही ज्योतिषग्रंथ उघडला नाही.फलज्योतिष या विषयावर मी कायमचा पडदा टाकला." .... फलज्योतिषशास्त्रावर पूर्ण विश्वास ठेवून,त्याचा सांगोपांग अभ्यास करून मोठ्या उमेदीने ज्योतिष व्यवसाय सुरू करणार्‍या शास्त्रीबुवांचा हा सत्य अनुभव आहे."किती दिवस मी लोकांना आणि स्वत:लाही फसवीत राहू?" अशी अंत:प्रेरणा झाली ती सदसद्विवेकबुद्धी जागृत असल्यामुळे. ती नसती आणि जीवनव्यवसाय म्हणून सोडा पण जोडधंदा म्हणून ज्योतिष कार्यालय सुरू ठेवले असते तरी पं.महादेवशास्त्री जोशी हे गोव्यातील जनमान्यताप्राप्त विख्यात ज्योतिषी होऊ शकले असते.आर्थिक प्राप्ती ही चांगली झाली असती.मात्र सदसद्विवेक दडपून टाकल्याची टोचणी सतत राहिली असती. ते चांगल्या चित्रपटकथा लिहू शकले नसते.भारतीय संस्कृतिकोशाची रचना झाली नसती. ................................................................................................................................ कृपया कोणताही पूर्वग्रह न ठेवता या सत्य अनुभवावर विचार करावा.मग जे काही बुद्धीला पटेल ते मानावे. **********************************************************************************

प्रतिक्रिया द्या
35248 वाचन

💬 प्रतिसाद (79)

प्रतिक्रिया

श
शशिकांत ओक Tue, 03/01/2011 - 19:20 नवीन
जंगल जंगल बात चली है... णाडी..णाडी.. णाडी तारजण... तारजण... , आपन णाडीला तान तान देऊन आ(व)लवळे, तरीही भाऊवीजू का बारगळले ... पका का सायडिंग गाठले... यणावालांनी गुलनी का धरळी... विलास्टिका का ढिल्या पडल्या... उत्तर एकच ...अणुभव णाही म्हनूण... आपन तरी तिकी टरकाल्या मारनार.... हलु...हुल्लू... एकाचे दोन, दोनाचे तीन... करत णाडी प्रेमी जंकळात शिरुण सिकार करत करत... गाटे है... जंगल जंगल बात चली है... णाडी..णाडी.. णाडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/02/2011 - 04:51 नवीन
बर्‍याच वेळेला माणासाची आगतिकता त्याच्या सद्सद्विवेक बुध्दीवर मात करताना दिसते. अभिज्ञ यांचे वाक्य पटणारे आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
स
सामान्य वाचक Tue, 03/01/2011 - 10:25 नवीन
उदा : पूण्यात चाफयाचे झाड नाही हे म्हणण्यासाठी मला खूप फिरावे लागेल. पण 'आहे' म्हणण्यासाठी एक झाड दिसले तरी पूरे आहे.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 03/01/2011 - 10:47 नवीन
बरोबर आहे. पण मी समजा पुण्यात ३०-३२ वर्षं राहिलो असेन आणि कधीही चाफ्याचे झाड पाहिले नसेल तर मी म्हणेन की पुण्यात चाफ्याचे झाड नाही. जर दुसरा कोणी म्हणत असेल की पुण्यात चाफ्याचे झाड आहे तर त्या झाडाचा अचूक पत्ता मला त्याने द्यावा किंवा त्याने मला ते झाड तिथे नेऊन दाखवावे अशी माझी अपेक्षा असणे रास्त आहे. जर तो मनुष्य म्हणाला की झाड आहे पण मी तुला ते दाखवू शकत नाही तर माझ्या लेखी ते झाड अस्तित्वात नाही. त्यामुळे जो पर्यंत चाफ्याच्या झाडाचा अचूक पत्ता सापडत नाही तो पर्यंत आहे की नाही हा वादच निरर्थक आहे. एका माणसाने एक झाड पाहिले आणि त्याला ते चाफ्याचे वाटले म्हणून वैयक्तिक अनुभवाच्या सिद्धांताने ते चाफ्याचे होत नाही. त्याचप्रमाणे एखादा ज्याला अनुभूती म्हणतो त्याला दुसरा योगायोग किंवा भास म्हणू शकेल. शिवाय वाचासिद्धीवाले लोक असतील तर हे वाचासिद्धीवाले लोक मग आपल्या शक्तीचा वापर करून भविष्याच्या काळजीमुळे होणारी इतर क्षुद्र मानवांची दुरवस्था दूर का करत नाहीत हा प्रश्न उरतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
स
सामान्य वाचक Tue, 03/01/2011 - 10:59 नवीन
मी पाहिलेली विहीर खरी. समुद्र आस्तित्वात नाही. कारण मला तो दिसला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Tue, 03/01/2011 - 11:06 नवीन
जे समुद्र आहेत असे म्हणतात त्यांना दिसलेला समुद्र समुद्रच आहे हे कशावरून? कशावरून ते मृगजळ नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
ग
गवि Tue, 03/01/2011 - 11:16 नवीन
या वादाला अंत नाही. कोणीच कोणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा नाही असे झाले. इथे मुद्दा असा आहे की ज्याला समुद्र बघायचाय त्याला बघण्याची (प्रत्यक्ष, नि:संदिग्ध फोटो इ इ. उदाहरण फक्त..) संधी आहे आणि तिथे तो सर्वजनवर्णनाबरहुकूम जो वांछील त्याला तसाच दिसतो. काहींना समुद्राचा पुण्यातच अनुभव आला आणि काहींना रत्नांग्रीस जाऊनही येत नाही (समुद्र दिसत नाही..) कारण ते अश्रद्ध याला काही अर्थ नाही. तरीही तिथे समुद्र आहेच असे मानणार्‍याला आडकाठी नसावी पण मला दिसत नाही तोपर्यंत मानत नाही असे म्हणणाराही त्याच प्रतीचा विश्वास दाखवतोय. दोघेही योग्य आहेत जेव्हा त्यांचे स्वत :शी विरोधाभास नसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Tue, 03/01/2011 - 11:23 नवीन
आहे म्हणणार्‍यांना विरोध नाही. वैयक्तिक श्रद्धा ठेवा पण वरती लेखात म्हटल्याप्रमाणे त्याचा प्रचार करून गैरवापर केला जातो म्हणूनच त्याविरुद्ध बोलावं लागतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
N
Nile Tue, 03/01/2011 - 20:38 नवीन
>>या वादाला अंत नाही. कोणीच कोणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा नाही असे झाले. कारण हा वादच नाही. नुसती असंबंध आणि बादरायण उदाहरणं देउन फक्त तुम्ही बोलण्यात हुशार आहात इतकेच दिसते. अशीच बादरायण उदाहरणं देउन समोरच्याला निरुत्तर करुन मुद्दा सिद्धा होणार नाही. वरती तुम्हाला ते कतरीना कैफचे हास्यास्पद उदाहरण पटले आणि त्यावर उत्तर सुचले नाही हे ताजे उदाहरण घ्या. कतरीना कैफ त्या सिनेमात आहे की नाही जे जाणुन घेण्यासाठी सिनेमा पहायचा अनुभव घेण्याची अजिबात गरज नाही. पन्नास मार्ग आहेत. १. माझ्या काही मित्रांनी सिनेमा बघीतला त्यांना विचारतो (कीती मित्र असु शकतात) २. सिनेमाची जाहिरात, पोस्टर पाहु शकतो. ३. सिनेमाचा आलेल्या रीव्हु वाचु शकतो ४. सिनेमाची माहिती इंटरनेटवर शोधु शकतो ५. सिनेमा खुद्द पाहु शकतो आणि खात्री करुन घेउ शकतो. फक्त कॉमनसेन्सने मी कतरीना आहे की नाही हे पडताळुन पाहु शकतो. हे उदाहरण बादरायण कसे आहे ते कळणे फारसे अवघड नाही. वरील कुठलाही मार्ग वापरुन कोणीही हे कतरीना आहे की नाही हे पतळातुन पाहु शकतो. प्रॉब्लेम कुठे होतो, तर करतीना नसतानाही ती आहे आणि आम्हाला दिसते असे काही लोक म्हणतात तेव्हा. आता जी गोष्ट नाहीच तीचा अनुभव घ्यायचा कसा? तरी सुद्धा ज्यांचा असा दावा आहे त्यांनी ती गोष्ट आहे असे सिद्ध करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
आ
आत्मशून्य Fri, 03/04/2011 - 10:58 नवीन
१. माझ्या काही मित्रांनी सिनेमा बघीतला त्यांना विचारतो (कीती मित्र असु शकतात) - करेक्ट, ज्यानी योग्य माणसांकडे ज्योतीश पाहीले आहे त्यांना वीचारू शकता. २. सिनेमाची जाहिरात, पोस्टर पाहु शकतो. - जाहीरात पोस्टर काय भाँदू जोतीशीपण करतात, तेव्हा जोतीश बघताता या पध्दातीपासून सावध रहावे ३. सिनेमाचा आलेल्या रीव्हु वाचु शकतो - करेक्ट, क्रंमाक १ ला दीलेली सूचना पहा, तरी ज्योतीशाबाबत पेड रीव्हु वाल्यांपासून सावधच. ४. सिनेमाची माहिती इंटरनेटवर शोधु शकतो - क्रंमाक २ व ३ ला दीलेली सूचना पहा, ५. सिनेमा खुद्द पाहु शकतो आणि खात्री करुन घेउ शकतो. - अगदी बरोबर. आता तूम्हाला खरा मार्ग सापडला. अभीनंदन. (तत्पूर्वी क्रंमाक १ ते ४ या सूचना कटाक्षाने पाळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Fri, 03/04/2011 - 11:33 नवीन
>>जाहीरात पोस्टर काय भाँदू जोतीशीपण करतात, तेव्हा जोतीश बघताता या पध्दातीपासून सावध रहावे कुठल्या पोस्टरमध्ये काय पहायचं हा विवेक जवळ असणार्‍यांकरता आहे ते. तेच इतर "टिप्पण्यां"करता. >>खात्री करुन घेउ शकतो. मेंदुची कवाडं बंद असणार्‍यांना वरील वाक्याचा अर्थ समजणारच नाही त्यामुळे अधिक बोलण्यात अर्थ नाही. तुम्हाला उत्तरं देण्यात काही अर्थ नाही असे मला वाटु लागले आहे त्यामुळे इथुन पुढे तुमच्या कमेंटमध्ये उत्तरदेण्यासारखं काहीतरी विचारपुर्वक लिहलं असेल तरंच उत्तर देईन,नाहीतर राम राम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य Fri, 03/04/2011 - 12:36 नवीन
मेंदुची कवाडं बंद असणार्‍यांना वरील वाक्याचा अर्थ समजणारच नाही त्यामुळे अधिक बोलण्यात अर्थ नाही.
मंग तूम्हाला प्रतीसाद लीहातानाचे आमचे कश्ट वायाच गेले समजाय्च की.
तुम्हाला उत्तरं देण्यात काही अर्थ नाही असे मला वाटु लागले आहे त्यामुळे इथुन पुढे तुमच्या कमेंटमध्ये उत्तरदेण्यासारखं काहीतरी विचारपुर्वक लिहलं असेल तरंच उत्तर देईन.
तूमच्या प्रतीसादांमधे विचारपुर्वक व वाचण्या सारखे फार्फार असते हा गोड गैरसमज कसा नीर्माण झाला याचे थोडक्यात वीवेचन द्याल काय ?
नाहीतर राम राम.
"नाहीतर राम राम" न्हवे फक्त "राम राम" असे मनातल्या मनात सतात म्हणत रहा त्याने कदाचीत कवाडे लवकर ऊघडतील आणी पूर्वग्रहदूशीत प्रतीसाद पण टाळाल असे वाटते, प्रयत्न करायला काय हरकत आहे ? बाकी खंत इतकीच आहे की या लेखात कोणीही ज्योतीशाकडे शास्त्र व प्रोबॅबिलिटि म्हणून पाहीले नाही अथवा त्याकडे लक्ष वेधले नाही, तर सूरूवातीपासूनच त्यावर टीका करायची हेच बहूतंशी धोरण राखले. जर प्रोबॅबिलिटि ला तूम्ही शास्त्र मानता त्याच ऊअपयोग करून हे अख्खे अंतरजाल ऊभे करता (कॉप्यूटर नेटवर्कींगमधे चक्क प्रोबॅबिलिटि वापरतात) तर त्याच गोष्टीवर जेव्हा ज्योतीश शास्त्र वसले आहे तेव्हां त्यांचा अभ्यास न करता ते थोतांड का मानता ? अगदी मूळ लेखकाने सूध्दा ते काही % च बरोबर ठरत होते असे म्हटले आहे तर त्याच्या %मधे सूधारणा कशी करावी यावर संशोधन न करता त्याल थोतांड म्हणून मो़क्ळे होतात. आपल्याला नाही झेपत तर सोडून द्याना ऊगीच रॉकेट- सायन्स ज्यांना जमते त्यांनी त्यावर काम करावे इतरांनी त्याला थोतांड कशाला म्हणायचे ? बूध्धीचा आवाका मानवी वर्तन कसे ठरवतो त्याचा हा कीस्सा ऐका, अफ्रीकेत आजही घनदाट जंगलात अत्यंत मागासलेले आदीवासी राहतात, त्याना अजून दोन चाकी सायकल बनवता येत नाही मग इतर प्रगत गोष्टी तर त्यांना झेपणे शक्यच नाही. ते लोक जेव्हां आभाळातून प्रवासी वीमाने वगैरे जाताना येताना पाहतात तेव्हा त्याला चक्क देव मानून नमस्कार करतात. याचा अर्थ तेच लोक साय्न्स योग्य व्यक्तींकडून योग्य प्रकारे शीकले तर वीमान बनवू अथवा ऊडवू शकणार नाहीत असा होतो का ? अर्थातच नाही ? त्यासाठी गरज फक्त योग्य मार्गदर्शनाची असते, ते नसेल तोपर्यंत मन कलूशीतच राहते. अशा मनाला लोकांचे प्रतीसाद समजणार काय आणी त्यावर ते ऊत्तर देणार काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
प
पंगा Wed, 03/02/2011 - 04:23 नवीन
अहो,हा धंदा आहे.
हा धंदा आहे हे खरेच आहे. आणि या धंद्याच्या प्रसारासाठी कायकाय क्लृप्त्या लढवल्या जाऊ शकतात, आणि 'उत्पादना'स कशा प्रकारच्या वेष्टनांतून खपवले जाऊ शकते, हेही पाहणे रोचक ठरेल. मुंबईहून निघणारे एका ज्योतिर्भास्करांचे असेच एक लोकप्रिय नियतकालिक प्रकाशन आहे. राष्ट्रीय, महाराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांतून दर वर्षी प्रकाशित होते. दिनदर्शिका, पंचांग, मुहूर्त आणि ज्योतिर्भास्करांचे मासिक राशिभविष्य हा या प्रकाशनाचा गाभा आहे. विशेषतः त्यातील राशिभविष्याचा भाग हा एकंदर प्रकाशनाचा बराच मोठा भाग व्यापतो. हल्ली या प्रकाशनाच्या आंतरजालीय आवृत्तीवर या राशिभविष्याचे एक स्वतंत्र पानही आहे. हे प्रकाशन खपावे, त्याची लोकप्रियता आणि विक्रेयता वाढावी, म्हणून त्यात इतरही बहुत लोकोपयोगी माहिती अंतर्भूत केली जाते. जसे, पाककृती, महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांची वेळापत्रके, आजीबाईंचा बटवा, 'हे करून पहा' प्रकारच्या टीपा, वगैरे. याशिवाय लोकप्रिय साहित्यिकांचे उत्तमोत्तम लेखही छापण्याकडे कल असतो (किंवा निदान एके काळी असे), जेणेकरून रसिकांनी आपापल्या आवडत्या साहित्यिकांच्या लेखांकडे आकृष्ट होऊन हे प्रकाशन विकत घ्यावे. अनेक थोर साहित्यिकांचा आणि मान्यवर व्यक्तींचा या प्रकाशनाच्या खपास अप्रत्यक्ष हातभार लागला आहे. 'प्रत्येक घराच्या भिंतीवर हे प्रकाशन असणे अनिवार्य' अशा प्रकारे या प्रकाशनास प्रसिद्धी दिली जाते. एक जमाना असा होता, की प्रतिवर्षी या प्रकाशनाच्या जानेवारीच्या पानाच्या मागील बाजूस, ज्योतिर्भास्कर साळगांवकरांच्या राशिभविष्याच्या सदराच्या खांद्यास खांदा लावून, पु.ल. देशपांडे यांचा एखादा फर्मास लेख प्रकाशित होत असे. वर्षानुवर्षे, न चुकता, नित्य नेमाने, राशन घातल्यासारखा. आमच्यासारखे पु.ल.भक्त केवळ तो एक लेख वाचावयास मिळावा याकरिता ते प्रकाशन खरेदी करत. पु.ल. हे राशनालिस्ट आहेत, याची त्या काळी आम्हास कल्पना नसल्याने यामागील विरोधाभास काही आमच्या लक्षात येत नसे. कदाचित 'आपण राशनालिस्ट आहोत', हे पु.लं.नाही त्या काळी ठाऊक नसावे. अन्यथा त्यांनी अशा प्रकारच्या प्रकाशनाच्या खपास वर्षानुवर्षे आपल्या लेखांद्वारे हातभार निश्चितच लावला नसता, अशी आम्हा पु.लं.च्या (अंध)भक्तांची भाबडी (अंध)श्रद्धा आहे.
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 03/02/2011 - 04:40 नवीन
क्लास म्हणूनच म्हणतो जर भिंतीवर ते प्रकाशन असणे अनिवार्य तर जालावर 'पंगा उवाच' वाचणे अनिवार्य!!! आता ते दुसरे आद्य विदास्पेशल काका कधी येतील किंवा कोणत्या रुपात येतील त्याची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
य
यनावाला Wed, 03/02/2011 - 09:39 नवीन
प्रतिसादाप्रीत्यर्थ सर्वांना धन्यवाद! सदसद्विवेक बुद्धी हा लेख आवडल्याचे अनेक सदस्यांनी लिहिले आहे.त्या संबंधातील श्रेय पं.महादेवशास्त्री यांचे आहे.प्रारंभीच्या दोन ओळी आणि अंतिम चार सोडून उर्वरित लेखन त्यांचेच आहे. थोडा संक्षेप केला आहे एवढेच.
  • Log in or register to post comments
य
यनावाला Wed, 03/02/2011 - 09:57 नवीन
भविष्यकथन सत्य असते असा अनुभव असल्याचे कांही सदस्यांनी लिहिले आहे.त्यांना विनंती की त्यांनी आपल्या अनुभवाची चिकित्सा करावी.अनुभव कोणता आला,कसा आला, किती वेळां आला याचा तटस्थपणे आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून विचार करावा. वाचासिद्धी,दिव्यदृष्टी,अंतर्ज्ञान,सिद्धी,मंत्रसामर्थ्य,भविष्यज्ञान इ.असल्याच्या कथा पुराणात आहेत.ऐतिहासिक पुरावा कोठेही नाही. जर कोणापाशी असे अलौकिक सामर्थ्य असेल तर ते प्रत्येक आठवड्याला लॉटरीचे पहिले बक्षीस का जिंकत नाहीत?निरिच्छ असलेल्या त्या महान विभूतींना धनलोभ नसेल हे मान्य.पण या पैशांचा विनियोग सत्कार्यासाठी करता येईलच की.मग असे का बरे घडत नाही? हा प्रश्न पडतो.असो.ज्यांची फलज्योतिषावर श्रद्धा असेल ते ती ठेवणारच.मात्र प्राणिकपणे चिकित्सक असावे.कांही स्वयंवंचनेचे बळी असतात.काही त्यासाठी डुप्लिकेट आय्.डी. सुद्धा घेतात. हे अंतिम हिताचे नाही.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Wed, 03/02/2011 - 11:30 नवीन
ज्याना हे जमते ते त्याचा का, कसा, कुठे वीनीयोग करतात ह्या साठी स्वतंत्र लेख काढून इथे आपल्या मूळ लेखाचे काश्मीर होण्याचे टाळावे. तसेही हे दोन स्वतंत्र वीशयच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
म
मूकवाचक Wed, 03/02/2011 - 12:45 नवीन
वाचासिद्धीने भविष्य वर्तवल्याचे ऐतिहासिक पुरावे (१९ व्या शतकामधील देखील) बरेच आहेत. (उदा. डॉ. राम भोसले यान्च्या दिव्यस्पर्शी पुस्तकातील नित्यानन्द भेटीचा प्रसन्ग. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
न
नगरीनिरंजन Wed, 03/02/2011 - 16:33 नवीन
जगन्नाथ कुंट्यांच्या नर्मदा परिक्रमेतला विनोदी प्रसंग आठवला. लेखक त्याच्या मित्राला सांगतो की आज आपल्याला मोतीचूर लाडू मिळणार आणि काय आश्चर्य पुढच्याच थांब्यावर एक माणूस येऊन त्यांना मोतीचूराचे लाडू देऊन जातो. एक माणूस त्यांच्यासमोर मगरीला बळी पडतो ते मात्र त्यांना आधीच कळत नाही. धन्य ती वाचासिद्धी आणि धन्य ते लाडूखाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
म
मूकवाचक Wed, 03/02/2011 - 17:55 नवीन
ज्याना हे जमते ते त्याचा का, कसा, कुठे वीनीयोग करतात ह्या साठी स्वतंत्र लेख काढून इथे आपल्या मूळ लेखाचे काश्मीर होण्याचे टाळावे. तसेही हे दोन स्वतंत्र विषयच आहेत. - सहमत वाचासिद्धी, प्राकाम्य सिद्धी आणि त्रिकाल दर्शन या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लाडू प्रसन्ग प्राकाम्य प्रकारातला आहे. स्थळ, काळ आणि परिस्थिती हे सन्दर्भ लक्षात घेता मला तो लाडू प्रसन्ग विनोदी वाटत नाही. लेखक हा ब्रह्मदेवाचा बाप नसल्याने त्याने जगभरचा प्रत्येक अपप्रसन्ग टाळला नाही यात नवल असे काही नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन गुरुवार, 03/03/2011 - 04:35 नवीन
स्थळ, काळ आणि परिस्थितीचे संदर्भ लक्षात घेतल्यावरच मला तो प्रसंग विनोदी वाटला. असो. या धाग्यावर हा माझा शेवटचा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
व
विकास Wed, 03/02/2011 - 17:29 नवीन
भवीष्य वर्तवता येते की नाही इतपतच वीशय मर्यादीत ठेवूया (टायपो सोडल्यास ;) ) सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
म
मूकवाचक Fri, 03/04/2011 - 13:58 नवीन
भविष्यकथन सत्य असते असा अनुभव असल्याचे कांही सदस्यांनी लिहिले आहे.त्यांना विनंती की त्यांनी आपल्या अनुभवाची चिकित्सा करावी.अनुभव कोणता आला,कसा आला, किती वेळां आला याचा तटस्थपणे आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून विचार करावा. - हे सगळे करूनही असे अनुभव नाकारता येत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ए
एक Wed, 03/02/2011 - 18:43 नवीन
संस्थळाचं "**क्रम" झालं!! -एक
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Fri, 03/04/2011 - 10:15 नवीन
सामना टाय होणार असे भाकीत केले होते. आणी ते खरे ठरल्या पासून तो कोणते नंबर लॉटरीखेळताना लावतोय याला प्रचंड मागणी आली आहे.
  • Log in or register to post comments
N
Nile Fri, 03/04/2011 - 10:41 नवीन
"Can't believe my prediction 7/8 hours ago was right - tie !! Classic, didn't think it would happen but hey-not bad !!!! 2011-my year ! Lol" "Before u think there was something untoward re prediction of a tie, thought it was going to be a cracker-tie was tongue in cheek-but right" -Shane warne(Twitter) 27 feb.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य Fri, 03/04/2011 - 10:50 नवीन
मला इंग्रजी कळले नाही, तूम्हाला या वर काही टेपणी करायचीअसेल तर मराठीत अनूवादा. अवांतरः शेन वॉर्न ऊत्कृश्ठ ज्योतीशी आहे असे आम्ही म्हणतो असा गैरसमज नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Fri, 03/04/2011 - 11:36 नवीन
इंग्रजी कळत नाही? अरे रे. म्हणजे तुम्हीच वर म्हणल्याप्रमाणे, कुणावर(ही) तरी विश्वास ठेवता का? असो. सर्व प्रश्नांचा उलगडा झाला.जाउ दे जाउ दे. मी दिलेले उत्तर फक्त मेंदुची कवाडं उघडी असलेल्यांकरता आहे, ज्यांच्या विवेकात नीरक्षीरक्षमता आहे त्यांच्यासाठी. त्यांना याहुन अधिक टिप्पणीची आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य Fri, 03/04/2011 - 13:35 नवीन
मी दिलेले उत्तर फक्त मेंदुची कवाडं उघडी असलेल्यांकरता आहे, ज्यांच्या विवेकात नीरक्षीरक्षमता आहे त्यांच्यासाठी
दूसर्‍यांदा ह.ह.पू.वा. ज्यांच्या विवेकात नीरक्षीरक्षमता आहे ते तूमचे लेखन गांभीर्याने घेतात हा तूमचा गोड समज कसा तयार झाला झाला या वीशयी धमाल ऊत्सूकता..... Image removed. बाकी तूम्ही प्रतीसाद लीहला म्हणजे तूम्ही वर म्हटल्या प्रमाणे आमच्या कमेंटमध्ये उत्तरदेण्यासारखं काहीतरी विचारपुर्वक लिहलं आहे तर.... पू.ले.शू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा