पाककृती

कांद्याची चटणी------

Primary tabs

साहित्य--चिरलेले कांदा एक वाटी, चिंचेचा कोळ एक चमचा व गुळ चवीनुसार, किसलेले सुके खोबरे अर्धी वाटी, लाल तिखट, मीठ.फ़ोडणीचे साहित्य.शेंगदाणा कुट दोन चमचे. कृती-- कांदा मिक्सरमधुन काढावा , चिंचेचा कोळ व गुळ, किसलेले सुके खोबरे ,शेंगदाणा कुट, लाल तिखट, मीठ चवीनुसार.सर्व एक्त्र मिसळून वरुन खमंग फ़ोडणी द्यावी.
स्वैर परी

मस्त झणझणीत असेल शंका नाही! :)
पण फोटो तर द्या!!!

कच्ची कैरी

रेसेपीच नाव वाचुनच तिचे लेखक कोण असेल्?हे कळले होते :)

योगप्रभू

कांद्याची चटणी फार टिकत नाही त्यामुळे लगेच संपवावी लागते किंवा एका जेवणापुरतीच करावी लागते कारण दुसर्‍या दिवशी कांद्याच्या चटणीचा वास बदलतो.

दोन दिवस पुरवून खायची असेल तर कैरी-कांद्याची चटणी मस्त. कच्च्या कैरीचा आंबटपणा, कांद्याची चव आणि लाल तिखटाची फोडणी. उन्हाळ्यातील सुख. :)

आमच्याकडे तर कांदा अनि कैरी ची एकत्र चटनी करतात
खाउन बघ
१ नम्बर लागते.

jaydip.kulkarni

तोन्डाला पाणी सुटले ..................

मि पा वर अनुस्वार कसा देतात ते महित नाही ?