पाककृती
कैरीचे फ़ुटे (गोड लोणचे)
Primary tabs
आज सकाळीच मंडईत गेले होते तो तिथे ह्या महाराणीचे आगमन झालेले दिसले,
ह्या हंगामातील पहिली कैरी.........पाहूनच तोंडाला पाणी सुटले.
मग काय घेतली पटकन....हो संपायला नको....आणी घरी आल्या आल्य़ा चालू झाले लगेच काम.
प्रथम कैरी स्वच्छ धुवुन - पुसुन घेतली.
त्याच्यावरील साले काढून टाकली, त्याच्या अगदी बारीक फ़ोडी केल्या.एक वाटी फ़ोडी असतिल तर एक वाटी
चिरलेला गुळ, मिरची पावडर- मिठ चविनुसार, घालून सगळे एकत्र करुन ठेवले.
आणी त्याला मोहरी, हिंग, हळद घालून खमंग फ़ोडणी दिली व पुन्हा एकत्र केले..
हे घ्या तय्यार....कैरीचे फुटे--
हे लोणचे चार- पाच दिवस टिकते....(उरले तर)
खल्लास !!
पक्वान आहे बॉस
मस्त ग
पाणी पाणी सुटल तोंडाला पाहुनच!
व्वाईट्ट ताई!
आई शप्पथ.......... तोंडाला पाणी सुटलं
क ह र !
परवाच चकण्याला कैरी घेऊन बसलो होतो ;)
पाणी सुटुन तुझा पेग ज्यादा माईल्ड झाला नाही ना? का त्यावर काही उपाय केला होतास?
>> ह्या हंगामातील पहिली कैरी.........पाहूनच तोंडाला पाणी सुटले
अगदी अगदी. कैरी पाहुन तोंडाला पाणी न सुटणारे विरळेच!
बाकी लोणच अगदी 'झ्याक' झालय. या विकांताला करेन म्हणते! ;)
superb... मी पण कैरीचे असेच लोणचे करते. एकदम मस्त. तोंडाला पाणी सुटले. आमच्या कडे ते कधी ४ दिवस टिकतच नाही. २ दिवसातच संपते. ;)
असेच म्हनतो ..
उलट १ दिवसाच्या वर काय मी त्याला ठेवु देत नाहिच
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग..........
धरण बांधावे लागणार.
(ही पाककृती अंडं न घालता कशी करावी....???)
ए चूप रे...............थांब धपाटेच घालते चांगले....हा हा हा
करकरीत कैरीचे लोणचे...
तोंडाला पाणी सुटले बघा.
हंगामातील या पहिल्या कैर्यांची गंमत म्हणजे त्या कोवळ्या असतात. त्यामुळे ही कैरी खाताना दात फार आंबत नाहीत.
चला आज आणतोच कैरी :)
खू प म स्त आहे
गूळ घातलेलं लोणचं एकदम चविष्ट लागतं!
खल्लास. आता करून आणि खाउन झाल्याशिवाय चैन नाही पडणार.
मस्त
मस्त
लाळेचा पूर आला ग ताई
एकदम सही :)
कालच केले होते हे लोणचे मी इथे.
यात एक.. फोडणी गार झाल्यावर घालयची लोणच्यावर. आणि दुसरे म्हणजे.. हे लोणचे २-३ दिवसाम्तच संपवावे.. रादर संपतेच. :)
अग्ग्ग्ग्ग्ग्ग!
अगदी चवदार असते हे लोणचे.
आम्ही याला कैरीचे 'चालू' लोणचे म्हणतो.
तसेच पटकन संपवायच्या साखरांबा, गुळांब्यालाही 'चालू' मुरांबा म्हणतो.;)
आता भारतीय दुकानात जाते आणि आणतेच एक तरी कैरी (चव नसेना का त्या कैरीला)!
रेवती,
अगं त्या 'चालु' मुरांब्याची पाकृ दे ना... मला पण खुप आवडतो मुरांबा :)
कैरी आणून मुरांबा करीन तेंव्हा पाकृ देइनच.
तोपर्यंत हा जरा वेगळा मुरांबा बघ.
http://www.misalpav.com/node/8242
मस्त आहे ग.. करुन बघेल एकदा. इथे ते हापुस आंबे मिळत नाहीत. त्यामुळे जे afican आंबे आहेत, त्याचा करुन बघेल.
मस्तच आहे ग मुरांबा.............आता घरचा हापुस आला की करतेच....
निवेदीता ताई..
मुरंबा कर नक्की.. पण खबरदार त्या "घरच्या हापुस" आंब्याच्या मुरंब्याचा फोटो इथे टाकलास तर!!! संपाद़कीय अधिकारात तुझ्या सगळ्या पाकृ उडविल्या जातील. ;)
* सांगायचा मुद्दा असा की, आमची जळजळ होते गं *
असेच खायचे का? उन्हात ठेवत नाहित ?
भन्नाट
ओह नोSSSSSSSSS
ओह कैरी !कैरी म्हणजे माझी सर्वात प्रिय ,कैरीचा प्रत्येक पदार्थ मला आवडतो म्हणुन हाही आवडला:)