Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जैतापूर हवे का?

य
युयुत्सु यांनी
Sat, 03/12/2011 - 10:50  ·  लेख
लेख
जपान सारखा देश निसर्गाच्या प्रकोपापुढे हतबल झाला. अणु - ऊर्जा निर्मितिकेंद्राच्या सुरक्षेच्या बाबतीत हरला. आम्ही भारतीय मानव निर्मित स्कॅमपुढे हरलो. स्कॅम्सची अद्वितीय परंपरा असलेल्या देशात जैतापूर सारखा प्रकल्प निर्धोक होइल काय? जपानला जे जमले नाही ते भारताला जमेल काय?

प्रतिक्रिया द्या
10837 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

च
चिंतामणी Sat, 03/12/2011 - 12:58 नवीन
नाव वाचून गल्ली (प्रकार) चुकला का असे वाटले. आधी वाटले होते "कौल" असावा. पण टॉपीक एव्हढ्या कमी ओळीत मांडला आहे ते पाहून निराश झालो.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 03/12/2011 - 13:07 नवीन
खरतर ह्यावर ५ किलोच्या जिलेबी पाडता आल्या असत्या ,ह्यानी फक्त १/२ तोळ्यातच आटपले आहे.
  • Log in or register to post comments
ई
ईन्टरफेल Sat, 03/12/2011 - 14:24 नवीन
भविष्यात त्याचा फायदाच होइल
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 03/12/2011 - 15:07 नवीन
जपानला जे जमले नाही ते भारताला जमेल काय? जपानला जे जमले नाही ते भारताला करुन दाखवण्याची सोन्यासारखी संधि का घालवता? पुढची पिढी छाति फुगवुन सांगेल.. होय आमच्या पुर्वजांनी हे केले...
  • Log in or register to post comments
भ
भारी समर्थ Sun, 03/13/2011 - 12:17 नवीन
दुर्दम्य आशावाद.... पण हे होण्यासाठी आधी कोणीतरी बाहेरच्याने 'भारतीय हे करू शकतात' हे म्हणणे गरजेचे आहे. क्लिंटनने सांगितल्यावर आपल्याला कळलं की आपण एक आर्थिक महासत्ता होऊ शकतो, सारकोजीने सांगितले तेव्हा आपण नागरी उपयोगांसाठी अणूऊर्जा वापरू लागलो (अलिकडच्या काळात).... दुरदृष्टी असलेले होमी भाभांसारखे लोक फारच कमी आहेत राव देशात आपल्या. भारताने कशात गुंतवणूक करावी? चांद की सतेह का अध्ययन करणार्‍या यानात की कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त अंतर धावणार्‍या गाड्यांच्या संशोधनात? ध्रुवीय प्रदेशांमधील संशोधनात की तिन्ही सैन्यदलांत देशाला स्वयंपूर्णतेकडे नेणार्‍या संसाधनांच्या आविष्कारात? दुरदृष्टी असलेल्या लोकांचा खरंच अभाव आहे आपल्याकडे.... भारी समर्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
व
विकास Sun, 03/13/2011 - 12:30 नवीन
दुरदृष्टी असलेले होमी भाभांसारखे लोक फारच कमी आहेत राव देशात आपल्या. तसे वाटत नाही. पण अशा दूरदृष्टी असलेल्यांना सत्तेच्या आणि पैशाच्या राजकारणात कोणी जवळ करत नाही. म्हणून ते जिथे शक्य असेल तेथे स्वतःचे काम करत, यातून पुढेकाही चांगले निष्पन्न होऊ शकेल असा आशावाद ठेवत कर्म करत रहातात... भारताने कशात गुंतवणूक करावी? चांद की सतेह का अध्ययन करणार्‍या यानात की कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त अंतर धावणार्‍या गाड्यांच्या संशोधनात? ध्रुवीय प्रदेशांमधील संशोधनात की तिन्ही सैन्यदलांत देशाला स्वयंपूर्णतेकडे नेणार्‍या संसाधनांच्या आविष्कारात? सगळ्यात. अर्थात समान म्हणत नाही आहे. प्राधान्य बदलू शकते. बाकी चालूंदेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारी समर्थ
र
राही Sat, 03/12/2011 - 15:13 नवीन
जपान हा देश भूकंप अतिप्रवण क्षेत्रात येतो. तिथे भयानक भूकंप झाले , होत आणि होणार आहेत हे तिथल्या जनतेला,सरकारला आणि योजनाकारांना चांगलेच माहीत आहे. तरीही तिथे महाकाय अणु ऊर्जाप्रकल्प तसेच इतरही अवजड उद्योग उभारले गेले आहेत. जैतापूर्-माडबनला भूकंपाची शक्यता खूपच कमी आहे. योग्य ती भूकंपनिरोधक व्यवस्था आणि इतरही सुरक्षाव्यवस्था राबवून योग्य नियोजनाने प्रकल्प उभारला जावा. अर्थात नियोजनकारांनी त्यांच्या आराखड्यात ह्या सर्व बाबींचा समावेश केलाच असेल. नक्की माहिती नाही.
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 03/13/2011 - 12:44 नवीन
जैतापूर्-माडबनला भूकंपाची शक्यता खूपच कमी आहे. Image removed. वरील नकाशा हा विकीवरून घेतलेला आहे. त्यात बघितल्यास लक्षात येईल की हा भाग किमान "मॉडरेट" आणि कमाल "हाय" अशा भूकंपप्रवण क्षेत्रात येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ज
जयेश माधव Sun, 03/13/2011 - 15:43 नवीन
जैतापूर प्रकल्पविरोधका॑नी मिळ्वलेल्या माहीतीच्या अधीकारात मागील २० वर्षात जैतापूर आणि परीसरात ९१ भूक॑पाचे धक्के बसले आहेत.सन १९९३ मध्ये सर्वात मोठा म्ह्णजेच ६.३ रिस्टर स्केल एवढा धक्का बसला आहे.तसेच जिऑलॉजीकल सर्वे ऑफ इ॑डिया च्यानुसार जैतापूर क्षेत्र हे भूक॑पप्रवण क्षेत्र ४ मध्ये येते. त्यामुळे भविष्यात प्रकल्पावर भूक॑पाचे सावट असणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विनायक बेलापुरे Sun, 03/13/2011 - 22:39 नवीन
कोयनानगर, जो नेहमी एपिसेंटर असतो, त्याच्यापासून १००-१२५ किमी च्या त्रिज्जेत कोकणाचा बराचसा भाग येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्रदीप Mon, 03/14/2011 - 15:50 नवीन
जर्मनीनेही त्यांच्या अणूभट्ट्यांविषयी पुनःविचार सुरू केला आहे, अशी बातमी आहे. अँजेला मर्कल म्हणते की जपानमधील [ह्या संदर्भातील] घटना ह्या विशेष (watershed) स्वरूपाच्या आहेत, तेव्हा आम्ही 'काहीच जणू झालेले नाही' अशा तर्‍हेने [आमच्या निर्धारीत मार्गावर] पुढे जाऊ शकत नाही. गेल्या हिवाळ्यातच मर्कलच्या सरकारने तेथील अणूभट्ट्यांचे कार्य अगोदर ठरवलेल्या काळापे़क्षा (२०२२ पर्यंत) सुमारे १२ वर्षांनी वाढवायची घोषणा केली होती,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
न
निनाद मुक्काम … Mon, 03/14/2011 - 16:32 नवीन
आज संध्याकाळी आम्ही व आमचे कुटुंब ह्या विरोधात आमच्या शहरात विराट मोर्चा निघणार आहे .त्यामध्ये सहभागी व्हायला चाललो आहोत . आमच्या विभागातील काही मान्यवरांनी सोशल नेटवर्क मधून आम्हास संपर्क केला . अर्थात सहमती बनल्याने आम्ही मोर्च्यात येऊ म्हटले . अर्थात मोर्चा अहिंसक मार्गाने जाणार असेल तरच सहभागी होऊ कारण ''मी गांधींच्या देशातला आहे'' . ह्याचा विशेष परिणाम होऊन बहुदा स्वतःहून फोन आला . '' मूळ उद्देश जपानमधील आण्विक पीडित व इतर मृत व्यक्तीस आदरांजली वाहणे. व ह्याच मुद्यावर पुढे सरकारच्या निर्णयाचा विरोध करणे'' .. त्यांचा अणू उर्जेस विरोध आहे .तर आपल्या येथे विरोध प्रकल्पाच्या जागेवर, पर्यावरण व इतर मुद्दे आहेत . त्यांच्यात व आपल्या एकंदर परिस्थितीत फरक म्हणजे ''आपल्याकडे विजेच्या बाबतीत म्हटले तर कुपोषण तर ह्यांच्याकडे अती लठ्ठता'' त्यामुळे अपारंपरिक उर्जेचा पर्याय आम्हास येथे योग्य वाटतो. भारतात मात्र असलेल्या विजेच्या प्रचंड विषमतेमुळे अणू उर्जेस पर्याय नाही .( ह्यावर भारतात कुणाचेच दुमत नाही .)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
व
वेताळ गुरुवार, 03/17/2011 - 17:40 नवीन
तुम्ही लिहलेले मोर्च्याचे वार्तांकन आले आहे त्याबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
व
वेताळ Sat, 03/12/2011 - 15:41 नवीन
अणुस्फोटापेक्षा त्सुनामीची अधिक भिती आहे. त्यामुळे जैतापुर प्रथम समुद्र किनार्‍यावरुन हलवुन भारताच्या अंतर्गत भागात घेता येते का ते प्रथम पाहिले पाहिजे.
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Mon, 03/14/2011 - 13:52 नवीन
>> जैतापुर प्रथम समुद्र किनार्‍यावरुन हलवुन भारताच्या अंतर्गत भागात घेता येते का ते प्रथम पाहिले पाहिजे अख्खे जैतापूरच हलवायचे म्हणता ? बाकीची शहरे आणि गावे पण अशाच प्रकारे हलवता येतील का हो ?? मुंबई थोड्या थंड ठिकाणी नेता येईल का ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/17/2011 - 07:56 नवीन
सहमत.. आणि पुणे समुद्रात कुठेतरी हलवा. म्हणजे पुणेकरांचा त्रास इतरांना नको. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 03/12/2011 - 15:47 नवीन
जैतापूर हवे का?
काय? जैतापूर विकायला काढलंऽऽऽऽय? :D :D :D ;) ;) ;)
  • Log in or register to post comments
N
Nile Sat, 03/12/2011 - 16:55 नवीन
हे आले दुबैचे शेख लगेच विकत घ्यायला. तुम्हाला नाय देणार हो, एकवेळ बंद करुन तिथे युयुत्सुंचे भविष्यकेंद्र सुरु करु पण तुम्हाला जैतापुर देणार नाही!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विनायक प्रभू Sun, 03/13/2011 - 05:45 नवीन
खीखीखीक १+ निळ्याशी सहमत्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
आ
आत्मशून्य Sun, 03/13/2011 - 11:31 नवीन
.आता तर प्रकल्प झालाच पायजेल........
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 03/13/2011 - 05:08 नवीन
कधीतरी मरणारच आहे म्हणून रोजचं जगायचं सोडायचे का?
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 03/13/2011 - 05:48 नवीन
ओ पेशवे, तुम्ही तुमचा नविन काथ्या कुटा की!!! युयुत्सुंचा धागा कशाला हायजॅक करताय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 03/13/2011 - 05:57 नवीन
झालं असतं ना एकात एक दोन एकदम... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 03/13/2011 - 08:40 नवीन
शिवसेनेचे जैतापूर प्रकल्पाला ‘चले जाव’! जपानसारखा विनाश कोकणात होऊ देणार नाही मुंबई, दि. 12 (विशेष प्रतिनिधी) - अणुऊर्जा प्रकल्पामुळे जपानमध्ये झालेला संहार अख्ख्या जगाने पाहिला. असा विध्वंस कोकणात होऊ देणार नाही असे बजावतानाच जैतापुरात विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पाची वीटही रचू देणार नाही असा जबरदस्त इशारा शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. मी स्वत: लवकरच जैतापुरात जाणार आहे. कोकणवासीयांसह शिवसैनिकांची सुनामी जैतापुरात धडकेल आणि या अणुऊर्जा प्रकल्पाला कायमचेच ‘चले जाव’ करण्यात येईल, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा प्रचंड विरोध असूनही हा प्रकल्प उभारण्यासाठी सरकारची दडपशाही सुरू आहे. जैतापूर ग्रामस्थांच्या भावना जाणून घेण्यासाठी व लढ्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज शिवसेना भवन येथे बैठक झाली. या बैठकीत विविध संघटनांसह कोकणातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. जैतापुरातून मोठ्या संख्येने मच्छीमार, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. तुमच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना अखेरपणे लढेल आणि अणुऊर्जा प्रकल्पाला कायमची मूठमाती दिली जाईल असे वचनच उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिले. दोन अणुऊर्जा प्रकल्पांमुळे जपानमध्ये विध्वंस झाला आहे. हे भीषण वास्तव पाहत असतानाही अणुऊर्जा प्रकल्प आणणारच असा अट्टहास का केला जात आहे? सरकार सुखासमाधानाने राहणार्‍या कोकणवासीयांच्या जीवावर का उठले आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. जैतापूरवासीयांना हा प्रकल्प नकोय तर तो शिवसेनेलाही मान्य नाही. माझ्यासह शिवसेनेचे खासदार, आमदार, नगरसेवक व कोकणवासीय मुंबईकर जैतापुरात धडक देऊन जनतेची ताकद दाखवून देतील आणि आम्ही एकजुटीने सरकारला पळता भुई थोडी करू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. जसे डाऊ, नॅनो, सेझ हे प्रकल्प जनतेच्या विरोधामुळे रद्द करावे लागले तसा जैतापूर प्रकल्पही रद्द होणारच असा विश्‍वास शिवसेना विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना नेते दत्ताजी नलावडे, आमदार विनोद घोसाळकर, राजन साळवी, परशुराम उपरकर, दीपक सावंत, शिवसेना सचिव विनायक राऊत उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने राजन साळवी, जैतापूर जनहित समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर व जैतापूर संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघधरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. * जैतापूरमधील दडपशाही थांबविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले होते. या भावनांचा गंभीरपणे विचार करू असे सांगणारे मुख्यमंत्री आता अमरावतीत शिवसेनेचा जैतापूर विरोध मावळला आहे असे सांगत आहेत. स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचा दिवसरात्र गळा काढणारे मुख्यमंत्री खोटारडे आहेत हे दिसून आले. * कोकणवासीयांवर दडपशाही करण्यापेक्षा हिंमत असेल तर सरकारने अणुऊर्जा प्रकल्प नक्षलवादी भागात नेऊन दाखवावा. * सुपारी घेऊन हा प्रकल्प राबविण्यासाठी आटापिटा करणार्‍या नारायण राणेंची सुपारी कशी कातरायची आम्हाला माहीत आहे. * विकासाच्या आड आम्ही नाही पण जनतेचे मुडदे पाडून होणारा विकास आम्हाला मुळीच मान्य नाही.
  • Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे Sun, 03/13/2011 - 09:45 नवीन
* सुपारी घेऊन हा प्रकल्प राबविण्यासाठी आटापिटा करणार्‍या नारायण राणेंची सुपारी कशी कातरायची आम्हाला माहीत आहे. काल श्रीकांत सरमळकरानी काही टीप दिली असेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
ब
बाबुराव Sun, 03/13/2011 - 11:19 नवीन
अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर जे म्हणले(मटा दुवा) ते मला पटंतं बा. बाकी चालूं द्या. बाबुराव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
प
प्रदीप Sun, 03/13/2011 - 16:04 नवीन
अविनाशकुळकर्णींचा इतका प्रदीर्घ प्रतिसाद तितकाच प्रदीर्घ श्वास घेऊन वाचावयास सुरूवात केली, तोच लक्षात आले की इथे कुठल्यातरी वर्तमानपत्रातील बातमी डकवण्यात आलेली आहे. अविनाशकुळकर्णी किमानपक्षी ह्या बातमीचे स्त्रोत सांगून आम्हा येथील वाचकांना, व त्या वर्तमानपत्राला उपकारीत करतील काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
व
वेताळ Sun, 03/13/2011 - 13:18 नवीन
त्याच्या व सेनेच्या अथक परिश्रमामुळे कोकणात गॅस वरुन वीज निर्मीतीचा एन्रॉन सारखा यशस्वी प्रकल्प साकारला गेला आहे.त्यामुळे त्याचे विचार सर्व सामान्य लोकाना महत्वाचे वाटतात.उध्दव ठाकरेना महाराष्ट्रातील प्रश्नांबद्दल चौफेर माहिती आहे. सत्ता मिळाल्यावर ते त्याचा योग्य उपयोग करुन महाराष्ट्र सुजलामसुफलाम बनवु शकतील.त्याच्या कार्यकिर्दीमध्ये शिवसेनेने जी चौफेर मुसंडी मारली आहे त्यावरुन आगामी निवडनुकीत शिवसेनेच्या जागा दोन्ही हाताच्या बोटावर नक्कीच मोजता येतील.
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sun, 03/13/2011 - 17:26 नवीन
+१ दादर सांभाळा म्हणाव आधी. बाकी रिबेका मार्क ने काय जादु केल्ती काय माहित एन्रॉनच्या वेळी. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
स
सोत्रि Sun, 03/13/2011 - 23:07 नवीन
>> बाकी रिबेका मार्क ने काय जादु केल्ती काय माहित एन्रॉनच्या वेळी. +100
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
श
शिल्पा ब गुरुवार, 03/17/2011 - 18:06 नवीन
<<<दादर सांभाळा म्हणाव आधी. तुम्ही का त्यांच्यावर इतका खार खाउन हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
भ
भारी समर्थ Wed, 03/16/2011 - 08:04 नवीन
युवराजांनी घोषित केले होते की, विरोध हा अणुऊर्जेस नसून जोपर्यंत तेथील लोकांचा विरोध आहे, तिथपर्यंतच आहे. पण जपाननंतर त्यांचा नूर पालटलासा वाटतो. त्यांचा विरोध आता या विनाशकारी, अतिभयंकर ऊर्जा स्त्रोतासच आहे. अर्थात ते स्वतः असे म्हणाले नसले तरी दिवाकर रावतेंनी साधारण अशीच प्रतिक्रिया काकोडकरांच्या भाषणानंतर दिली होती. आणि ज्या दिवशी शिवसेनेतील नेत्यांमधे स्वतःच विचार करण्याची व मांडण्याची वेळ येईल त्या दिवशी मातोश्रीचे प्रस्थच संपेल हे काय शेंबडं पोर देखील सांगेल. हलके अवांतरः मातोश्रीवर तर म्हणे आता चुलीवर स्वयंपाक होतो, कारण एलपीजीचाही स्फोट वगैरे होतो. फुकणीने फुंकून फुंकून तर मोठ्या साहेबांचे गाल बाहेर आले नसावेत??? भारी समर्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
न
निनाद मुक्काम … Sun, 03/13/2011 - 16:23 नवीन
मला अबू हत्ती वाले ह्यांचे जैत पूर विषयी मत जाणून घ्यायचे आहे . कुणास अधिक माहिती असल्यास कृपया द्यावी . हा प्रकल्प व फक्त महाराष्ट्राचा आहे .उर्वरित देशाची त्याचा संबंध नाही अश्या थाटात उर्वरित भारतातील विविध पक्ष व नेते मंडळी वागत आहेत .नाही म्हणायला जयराम ह्यांनी आपले मत नोंदवले पण इतर राष्ट्रीय पक्ष कमालीची उदासिनता दाखवत आहेत . अवांतर कोकणात आता जमिनी विकत घेणे घेणे शक्य नाही पण एखादे घरकुल घेतले तर फ्रेंच मंडळीना भाड्याने देता येईन ,असा व्यापारी विचार करीत आहोत ( कॉलेजात फ्रेंच जुजबी शिकलो आहे व .बायकोला समजते ). तूर्त हा प्रकल्प यशस्वी होणार का अरबी समुद्रात रामदास बोटी प्रमाणे डुबणार ह्यावर आमची गृह खरेदी अवलंबून राहीन .
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 03/13/2011 - 17:04 नवीन
प्रदीर्घ प्रतिसाद शिवसेनेचे जैतापूर प्रकल्पाला ‘चले जाव’! जपानसारखा विनाश कोकणात होऊ देणार नाही मुंबई, दि. 12 (विशेष प्रतिनिधी) - उध्द्वव ठाकरे म्हटले कि शिवसेना म्हटले कि सामना हे कुठल्याहि नेट साक्षरास कळु शकते.. असो हे वृत्त" सामना" चे क्व्यापि पेस्त आहे
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 03/13/2011 - 17:05 नवीन
अनिल काकोडकर जे म्हणले(मटा दुवा) ते मला पटंतं बा. बघु यात सुनामी आली तर आपली किति तयारी आहे या वर काकोदकर काय म्हनतात
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sun, 03/13/2011 - 18:52 नवीन
थोडी माहिती खालील पीडीएफ दुव्यावर मिळू शकेल. http://www.lokshasanandolan.com/Jaitapur_pdf.pdf
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 03/14/2011 - 00:42 नवीन
मी काही जैतापूर प्रकल्प होयला हवा या बाजूने लिहीलेले नाही आणि आत्ता देखील तो उद्देश नाही. मात्र ही कोण जी संघटना आहे ती केवळ राजकारण समजतच राजकारण म्हणून या प्रकल्पाला विरोध करत आहे असे पहील्याच पानावरील दिलेले "३ हेतू" वाचल्यावर वाटते. त्यांनी अनेक मुद्दे नंतरच्या पानावर जरी मांडले असले तरी, "फ्रेंच कंपनीकडे" ज्यात फ्रेंच सरकार देखील भागीदार आहे, कंत्राट दिलेले असताना, "अमेरिकेच्या भांडवलशाहीस काही करून" कसे पैसे करता येतील हे समजले नाही. (हे दुवा दिलेले तसे आहे का नाही ते माहीत नाही, पण) अशा मुद्यांमुळे आंदोलन जरी प्रामाणिक असले, तरी त्याची विश्वासार्हता देखील कमी होऊ शकते (की हा राजकारण्यांनीच वरकरणी तयार केलेला विरोध आहे का). तसेच मूळ उद्देशाला त्यामुळे मूठमाती मिळू शकते असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
त
तिमा Mon, 03/14/2011 - 05:04 नवीन
अणुप्रकल्प हा समुद्रापासून लांब न्यावा असे म्हणणार्‍यांनी हे समजून घ्यावे की अणूप्रकल्पासाठी जवळ पाण्याचा प्रचंड साठा असावा लागतो. अणूउर्जेतून निर्माण होणारी प्रचंड उष्णता थंड करण्यासाठी. भारतात ती शक्यता समुद्राजवळ हीच आहे. आता असा प्रकल्प हा जैतापूरला करावा की नाही हा वादाचा विषय आहे. पण तिथे केला नाही तरी कुठेतरी करावाच लागणार. त्सुनामी, भूकंप हे रोजरोज होत नाहीत. एकदा तो जैतापूरला नाही, असे झाले की भारतातले कुठलेच राज्य तो स्वीकारणार नाही, बहुतांशी अपप्रचारामुळे. मग दुसरा पर्याय हा वाढत्या विजेच्या तुटवड्याचा सामना करा. मग लोड शेडिंग बद्दल बोललात तर सरकार जैतापूर प्रकल्पाच्या विरोधकांकडे बोट दाखवेल. चॉईस इज युवर्स!
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Mon, 03/14/2011 - 05:22 नवीन
अणूउर्जेतून निर्माण होणारी प्रचंड उष्णता थंड करण्यासाठी.
बरोबर. अणुइंधनाच्या एका रॉडला(~ १२०० डि. से. तापमान कायम ठेवायला) ताशी २८ टन पाणी लागते. एका रिअ‍ॅक्टरमधे साधारणतः १५००+ रॉडस असतात. सहसा अणु प्रकल्प उभारायला येणार्‍या खर्चाचा विचार करता, एका प्रकल्पात एका पेक्षा जास्त (२ किंवा अधिक) रिअ‍ॅक्टर असतात. अशा परिस्थितीत पाणी पुरवठा चटकन आणि हमखास करू शकणारा समुद्र हा एकच स्त्रोत असतो. शिवाय तयार झालेल्या वीजेच्या वितरणात कमीत कमी खर्च यावा म्हणून अणुप्रकल्प नागरी वस्तीच्या जवळ असतो(<५० किमी). दोन्ही बाबींचा विचार करता, जर देशाच्या अंतर्गत भागांत अणुप्रकल्प उभारयचा म्हटला तर त्या प्रकल्पाची पाण्याची गरज नागरी वस्तीच्या पाणी पुरवठ्यावर प्रचंड ताण आणेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
अ
अमित देवधर Mon, 03/14/2011 - 05:47 नवीन
जैतापूर प्रकल्प चळवळीबद्दल काही अधिक माहिती: कोकण अणुऊर्जा प्रकल्पविरोधी समितीची वेबसाइट: http://www.nonukekokan.org/ आजची बातमी: मटा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7697319.cms http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7697270.cms http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7693739.cms गोषवारा: या अणुभट्ट्या प्रकल्पात समुद्राचं पाणी वापरतात. तसं सतत वापरल्यामुळे अणुस्फोटाचा धोका वाढू शकतो. 'प्रकल्पासाठी समुद्राचे पाणी या भट्ट्या वापरत असून तसे सातत्याने होत राहिल्यास चेर्नोबिलसारखी दुर्घटना होऊ शकते.-अमेरिकन संस्थेतील प्राध्यापक (वरच्या बातमीनुसार)' ....(चेर्नोबिल अपघात समुद्रपाणीवापरामुळे झाला होता?) एका अणुभट्टीचा स्फोट/गळती झाली आहे. दुसर्‍या अणुभट्टीचं वातावरण नियंत्रण बंद पडलं आहे, त्यामुळे तिलाही धोका आहे. त्या एका मोठ्या स्फोटानंतरही छोटे धक्के बसणं चालू आहे, त्यामुळे धोका आणखी वाढला आहे. या परिस्थितील प्रकल्पांशी आपण जैतापूरची तुलना करू शकतो. शिवाय, टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस चा रिपोर्ट जैतापूर प्रकल्पाच्या बाजूने दिलेला नाहीये. गंभीर गोष्ट म्हणजे, सरकारने त्याच्याकडे लक्षच दिलं नाहीये. NPCIL Director ने हा रिपोर्ट अवैज्ञानिक असल्याचं म्हटलं आहे. (सरकारची भूमिका संशयास्पद दिसते.) संदर्भः http://www.nonukekokan.org/ सर्वसाधारण चर्चा, आंदोलनांमध्ये सरकारची भूमिका लोक, तज्ञ, शास्त्रज्ञ, आंदोलक यांचं शंकासमाधान करण्याची दिसत नाही (शंका तर्कशुध्द असूनही). 'तुम्ही तुमच्या जमिनीची भरपाई घ्या, प्रकल्पाला काही होत नाही.' अशा प्रकारची भूमिका दिसते. ही वेळ मारून नेण्याची नोकरशाही भूमिका नाही काय? वेळ कशासाठी मारून नेली जात आहे, त्याची कारणं अनेक, गुंतागुंतीची असू शकतील. सरकारने प्रकल्पाबद्दलच्या योग्य शंकांचं निरसन केलंच पाहिजे. त्याच्या कल्याणकारक / अकल्याणकारक बाजू शास्त्रीय विश्लेषणाने/शास्त्रीय चर्चेने समजून घेतल्या पाहिजेत, इतरांना समजून दिल्या पाहिजेत. जर त्यातून प्रकल्पनिर्माण देशासाठी सगळ्या बाजूंनी (आर्थिक, सामाजिक, निसर्गचक्राच्या दृष्टीने, भविष्यकालीने ऊर्जेच्या गरजेसाठी, आंतरराष्ट्रीय राजकारणातील वर्तमान व भविष्यकालीन सामर्थ्यवाढीच्या दृष्टीने (प्रकल्प १००००मेवॉ.चा आहे, त्याच्याशी अमेरिकन अणुकरार व फ्रेंच कंपनीच्या कराराचा संबंध आहे)) गरजेचा आहे असं दिसलं तर तो प्रसंगी गावं हटवूनसुध्दा करायला हवा. आणि जर तो तसा कल्याणकारक नाही असं लक्षात आलं तर काही झालं तरी तो करता नये. ही शहर, खेडी, देश, स्थानिक लोक, उद्योग यांचं कल्याण करण्याच्या दृष्टीने गरजेची/योग्य भुमिका नाही काय? पण सरकार अशी भूमिका घेताना दिसत नाहीये. त्यामुळे जैतापूर प्रकल्प चांगला असूही शकेल, पण तो अशा हेकट पध्दतीने राबवला जाणार असेल, तर (हेकटपणामुळे दुसरी बाजू लक्षात घेतली न गेल्यामुळे) तो खरंच भयंकर (उदा. जपानची सद्यस्थिती) ठरू शकतो.
  • Log in or register to post comments
अ
अमित देवधर Mon, 03/14/2011 - 06:02 नवीन
आत्ताचे प्रतिसाद बघून माहिती टाकाविशी वाटली. प्रकल्प गरजेचा'च' आहे, असं गृहीत धरण्यासाठी; हे गृहीत धरणार्‍यांकडे काही विशेष माहिती आहे काय? तशी असेल तरच, तो इथे झाला नाही तर इतर ठिकाणी व्ह्यायला तसाच विरोध होईल की नाही या मुद्द्यावर चर्चा युक्त आहे. तो समुद्राजवळ असण्याची गरज याबद्दलही हीच गोष्ट लागू आहे. सध्या सरकार व आंदोलक यांतील वादाचं स्वरूप बाहेरून जमीन सरकारजमा होणं एवढंच दिसत असलं तरी त्याचं मूळ (तात्विक/शास्त्रीय) हे आहे की, १०,००० मेवॉ. एवढ्या मोठ्या अणुउर्जा इन्स्टॉलेशन एकाच ठिकाणी करायची गरज आहे काय? मग आंदोलक म्हणतात, करणार तर करा पण आमच्या इथे नको वगैरे.
  • Log in or register to post comments
न
नारयन लेले Mon, 03/14/2011 - 07:04 नवीन
जेतापुर प्रकलप होणे जरुरिचेच आहे परन्तु नुकतेच जपानचे जे वाटोळे झाले ते पाहता योग्य जागा निवडावि व लोकान्चे पुनरव्रसन समाधान कारक करुन मगच समुद्रापासुन दुर प्रकलप करावा. विनित
  • Log in or register to post comments
म
मी_ओंकार Mon, 03/14/2011 - 08:09 नवीन
http://www.misalpav.com/node/16592 म. टा. वरचा आणखी एक लेख http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7689515.cms हा सारांश : धडा फुकुशिमाचा... डॉ. बाळ फोंडके, ज्येष्ठ वैज्ञानिक अणुभट्टीचा गाभारा थंड करण्यासाठी तीन-चार आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा प्रस्थापित केलेल्या असतात. पहिली यंत्रणा बंद पडली तर दुसरी लगेच कार्यान्वित होते. तीही काही कारणानं आपदग्रस्त झाल्यास तिसरी, तिच्याही पाठी चौथी अशी व्यवस्था केलेली असते. जैतापूरमध्ये अशा चार संपूर्णपणे स्वतंत्र चौपदरी यंत्रणांचा अंतर्भाव करण्याची योजना आहे.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 03/14/2011 - 14:27 नवीन
मी म्हणतो, देशाच्या (की राष्ट्राच्या?) आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जैतापूरकरांनी एवढा त्याग करावाच !!
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 03/14/2011 - 14:36 नवीन
मी म्हणतो, देशाच्या (की राष्ट्राच्या?) आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जैतापूरकरांनी एवढा त्याग करावाच !! नक्की कसला त्याग करावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Mon, 03/14/2011 - 16:54 नवीन
१. आपल्या जमिनी (जी काय नुकसानभरप्पई मिळेल, न मिळेल ती घेऊन) द्याव्या. २. किरणोत्साराचा धोका सहन करावा. ३. अपघात झाला तर जे काय होईल त्याची तयारी ठेवावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Mon, 03/14/2011 - 17:23 नवीन
अजून एक... तयार होणार्‍या उर्जेचा स्वतःच वापर न करता, ती इतरांसाठी आहे, हे ध्यानात ठेवावे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Mon, 03/14/2011 - 17:52 नवीन
ते तर त्यागाच्या व्याख्येतच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
V
VINODBANKHELE Wed, 03/16/2011 - 09:28 नवीन
माय बाप सर्कार समोर एक योजना आहे, ज्यांना जैतापुर प्रकल्प हवा आहे त्यांना जैतापुर ला वसवा, आणि ज्यांना जैतापुर प्रकल्प नको आहे त्यांना त्यांच्या जागी वसवा, (पुनर्वस्ना साठी सर्व तो परी मदत मिळेल,)
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Fri, 03/18/2011 - 07:14 नवीन
पुनर्वस्ना साठी सर्व तो परी मदत मिळेल मी याला असे वाचले. पुनर्वस्त्रासाठी सर्वांना 'परी' मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: VINODBANKHELE
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा