पाककृती

हमारे पाक इरादे...

Primary tabs

जीवनात ही घडी अशीच राहू दे...
हे तुम्ही ऐकले आहेच...
जेवणात ही कढी अशीच राहू दे...
हे ही तुम्ही कुठेतरी ऐकले असेल...
पण त्याच्या पुढचे माझ्याकडून ऐका...
आणि हो;चालीत कढी गायली तर चव छान लागेल..

जेवणात ही कढी अशीच राहू दे..
त्यावरी तुपाचा तवंग नाचू दे.. ||

घुसळले वाडग्यात दही देखणे..
उमलुनी येते नवनीत वेगळे..
उरलेला ताकवा कढीस लाभू दे...||

हळुच तुपात फोडणीला जिरा आगळा..
कडिपत्ता स्पर्शुनी ये गंध वेगळा..
हळदीतुन अंग अंग धुंद होऊ दे.. ||

राहू देत 'उकळी'ला नित्य हासता..
स्वर्गीचा नाद फुटे कढी भुरकता..
पंगतीला कढी पीत धन्य होऊ दे.. ||

यशोधरा

ओह्हो!! मस्त!! ताकाची कढी, सोलकढी ... सगळ्या कढ्या आठवल्या की!! :)

बेसनलाडू

(कढीप्रेमी)बेसनलाडू
याला विडंबन म्हणावे काय?
(पृच्छक)बेसनलाडू

चतुरंग

एकूण कढीचा बेत जमलाय फर्मास! ;)

चतुरंग

विसोबा खेचर

हळुच तुपात फोडणीला जिरा आगळा..
कडिपत्ता स्पर्शुनी ये गंध वेगळा..
हळदीतुन अंग अंग धुंद होऊ दे.. ||

वा! कढी छानच झाल्ये! :)

शेखस्पिअर

तुमची प्रतिक्रिया ऐकून मल कढ आला...
शब्द चुकीचे असतील तर भावना समजून घ्या..

रामदास

काल तुझ्या बहिणीला घातला डोळा
काश्मीरी थाटाचा ठसका वेगळा
मधूनच लुडबुडला बेसनाचा गोळा
दोन्ही बहीणींचा मज लागला लळा...
(लागला कारे तडका?)

अमोल केळकर

जेवणात ही कढी अशीच राहू दे..
त्यावरी तुपाचा तवंग नाचू दे.. ||

स्पेशल गुजराथी खिचडी, कढी याची आठवण झाली .

( बडोद्याचा वारकरी) अमोल