बटाटवडा- वडापाव!
💬 प्रतिसाद
(59)
ऋ
ऋचा
Tue, 06/17/2008 - 20:11
नवीन
आमच्या खालापूरचा "किरकिंडे" यांचा वडापाव.
आता पर्यंत खुप ठीकाणी वडा-पाव खाल्ला पण "किरकिंडे" ची चव कुठ्ठेच नाही.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
- Log in or register to post comments
ट
टारझन
Fri, 06/27/2008 - 14:06
नवीन
एकदा अलका टॉकिज मधे ईरंटर्वल मधे वडापाव खाण्याचा योग आला....
...... "तो प्रचंड वडा" पाहून माझी दातखिळीच बसली.
.........लिंबाएवढा मोठा वडा पाहून मी त्याला म्हणालो हे काय "बकासूरांसठी" बनवलेले वडे देतोस कायं?
..............आणि त्याला पाव ही मस्त काँप्लिमेंट करत होता....किंमत रुपये ६ ....
चार वडापाव चेपलेला ) कुबड्या खविस
http://picasaweb.google.com/prashants.space
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
Tue, 06/17/2008 - 20:21
नवीन
.. हीच वेळ असते गरमागरम बटाटवडा खाण्याची!
मस्त वर्णन
वडा पाव आमचे ठिकाण -
छबिलदास - दादर ( पश्चिम)
इगतपुरी, सुरत रेल्वे स्टेशन्स
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 06/17/2008 - 20:23
नवीन
बंगलुरुत नाय मिळत वडा पाव :( आमच्या कुंपणीच्या कँटीन मधे अर्धा वडापाव १५ रुपये अन् त्यालाही रस्सम् चा वास :( :(
- Log in or register to post comments
म
मनस्वी
Tue, 06/17/2008 - 20:42
नवीन
फोरम मॉलमध्ये वरती 'ट्रान्झिट' म्हणून फूडकोर्ट आहे. तिथे शिवसागर स्टॉलवर २० रु. ना १ वडापाव प्लेट. त्यात २ वडापाव असतात.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
- Log in or register to post comments
अ
अभिज्ञ
Wed, 06/18/2008 - 08:06
नवीन
यशोताई,
बंगलोरात वडापाव खायचा आहे.??????????
हि घ्या लिहून काहि ठिकाणे.
१.फोरम मोल-ट्रान्सिट
त्यात राजधानी मध्ये वडापाव रु.४५ फक्त (२ वडापाव)
२.राजवर्धन फूडस-जे.पी. नगर ,बिगबझार जवळ्,(वुडिज होटेल जवळ)
एक वडापाव -रु.१४ फक्त
३. ब्रिगेड रोड- (मोलचे नाव आठवत नाहि.परंतु एम जी रोडला जाताना डावीकडे हा मोल आहे.बाहेर कॉफीचे स्टोल्स आहेत.)
एक वडापाव -रु.१४ फक्त.
४.जयनगर मार्केट ,आयसीआयसीआय बँकेजवळ एक बिहारी माणसाचे दुकान आहे.
एक वडापाव -रु.५ फक्त.(हा चवीला सगळ्यात जबरी आहे.)
अभिज्ञ.
- Log in or register to post comments
ऋ
ऋचा
Tue, 06/17/2008 - 20:26
नवीन
अररररर..
लै वंगाळ झाला बगा!!! @)
तुझ्या दु:खात सहभागी यशो.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
- Log in or register to post comments
म
मनस्वी
Tue, 06/17/2008 - 20:45
नवीन
पुण्यात बर्याच हातगाड्यांवर चांगला वडापाव मिळतो.
त्यातली एक गाडी : सुजाता कोल्ड्रिंककडून बाजीराव रोडला जो चौक मिळतो, त्या चौकातील हातगाडी. एकदम टेष्टी!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
- Log in or register to post comments
त
तात्या विंचू
Wed, 06/18/2008 - 10:54
नवीन
सीओईपी होस्टेलच्या शेजारी..(कलानिकेतनसमोर) दुर्वांकुर वडापाव....
फक्त संध्याकाळी २-३ तास गाडी सुरु असते.....
ओर्डर दिली की ५ मिनटात तुमच्यासमोर बनवून देतात...
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 06/17/2008 - 21:01
नवीन
निगडी बष्टाप वर....
मागची बिल्डिंग आहे ना तिच्या तळमजल्यावर एक मारवाड्याचं /राजस्थान्याचं स्वीट्सचं दुकान आहे. त्या दुकानाबाहेर स्टॉल लाऊन वडापाव, कचोरी, सामोसे विकतो.
तिथला वडापाव लै भारी असतो...एकदम "नो वन कॅन इट जस्ट वन" :)
सासवडला बसस्टॅडबाहेर 'अस्मिता वडेवाले'. पुर्वी मस्त असायचे. हल्लीचं ठाऊक नाही.
बारामतीला कुलकर्णी वडेवाले.
दिल्लीत 'दिल्ली हट' ला एम.टी.डी.सी.च्या स्टॉलवर...इतका काही खास नसतो वडा, पण परमुलुखात आपल्या वडापावची अतीव इच्छा पुर्ण करण्याइतपत ठीक असतो. किंमत रु. ३५/- नग २.
- Log in or register to post comments
ग
गणा मास्तर
Sat, 06/28/2008 - 06:03
नवीन
निगडी बष्टाप वर....
मागची बिल्डिंग आहे ना तिच्या तळमजल्यावर एक मारवाड्याचं /राजस्थान्याचं स्वीट्सचं दुकान आहे. त्या दुकानाबाहेर स्टॉल लाऊन वडापाव, कचोरी, सामोसे विकतो.
तिथला वडापाव लै भारी असतो...एकदम "नो वन कॅन इट जस्ट वन" Smile
काय रे निगडीत राहतो काय रे !!!
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 06/17/2008 - 21:06
नवीन
तो वडापावही एकदम मस्त असतो. जितकी गाडी कळकट तितकी चव उत्तम. हा सिध्दांत या २-३ गाड्यांना १०० % लागू होतो.
:)
पुण्याचे पेशवे
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Tue, 06/17/2008 - 21:08
नवीन
जितकी गाडी कळकट तितकी चव उत्तम.
+++++++++++++१
१०००००००००% सहमत !
हेच चहाच्या टपरीलाही लागु पडतं. टापरी आणि पोर्या जितका कळकट तितका चहा झक्कास!
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
गुरुवार, 01/22/2009 - 06:39
नवीन
मिसळीबाबतही लागू
कुंजविहार ठाणे एस टी स्टँड्जवळ. याने जंबो वडापावचा शोध लावला असे माझे मत आहे.
मुंबईत जंबो किंग ची साखळी आहे. तेथे ही बरा मिळतो. आणि हो... भेळ/ वडापाव / मिसळ वगैरे खायला गेल्यावर जे स्वच्छता पाहण्याची वायफळ अपेक्षा करतात त्यांच्यासाठीही हा चांगला.
नितिन थत्ते
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
Wed, 06/18/2008 - 07:55
नवीन
इन्डीयन रेस्टॉरन्ट, शेर-ए-पन्जाब,
यीवू सीटी ,झेहियान्ग ,चायन....
१० आर एम बी त २ मस्त वडापाव ~~~~
चायना त अस्लो म्हणून काय झाल~~~~
- Log in or register to post comments
ध
ध्रुव
Wed, 06/18/2008 - 08:14
नवीन
चांगला विषय :)
श्रीकृष्ण बेकरी, सहकारनगर पुणे (अप्रतिम वडा आणि भला मोठा पाव) - लई लई भारी असतो..
अजून एक म्हणजे खत्री वडापाव - बालगंधर्व पूल जोशी वडेवाल्याच्या समोर :)
--
ध्रुव
- Log in or register to post comments
र
राजमुद्रा
Fri, 06/27/2008 - 14:31
नवीन
अजून एक म्हणजे खत्री वडापाव - बालगंधर्व पूल जोशी वडेवाल्याच्या समोर
भन्नाट चव
राजमुद्रा :)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 06/18/2008 - 08:22
नवीन
मनस्वी, ट्रांझिट माहीत आहे, बघेन आता.
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Wed, 06/18/2008 - 08:33
नवीन
डोंबिवली- कस्तुरी प्लाझासमोर, वडा टेस्टी असतो.
-ठाकुर वडा, विथ मक्याच चिवडा
- जानकी - मंजुनाथ स्कुल समोर
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Wed, 06/18/2008 - 08:39
नवीन
पुण्याच्या "जोशी वडेवाले" च्या बैलाला ढोल...
- Log in or register to post comments
भ
भाग्यश्री
Wed, 06/18/2008 - 08:54
नवीन
मला तसे सगळेच वडापाव आवडतात.. पण अहमदाबाद मधे एकदा खाल्ला होता, अगदी भरपुर बटर लावून, पावाला एका साईडला हिरवी न दुसर्या साईडला लाल चटणी लावून मधे तो मस्त बटाटेवडा खाल्ला होता...(आय नो, वडापाव असा नसतो.. वर्तमान्पत्राच्या कागदात बांधून लाल कोरडी चटणी, आणि तळलेल्या मिरच्यांबरोबरचा वडापाव तोच खरा!!) पण तो अमेझिंग लागत होता! नाव काय माहीत नाही..
पण वडा म्हटलं की मला माझ्या आईच्या हातचाच ब.वडा आवडतो.. भरपूर सारण असलेला, आई आलं-लसूण, हिरव्या मिरच्या मस्त ठेचून असला सही करते ना! आईग्ग... आठवण झाली!! तशी मी पण आता आईसारखी करायला लागलीय.. त्यामुळे सद्ध्य होम-मेड वडापाव!
http://bhagyashreee.blogspot.com/
- Log in or register to post comments
भ
भिडू
Wed, 01/21/2009 - 18:15
नवीन
हो,गुजरात मधे बरयाच ठिकाणी पावाला बटर लावुन पावाच्या मधे चटणी बरोबर टोमॅटो सॉस पण घालतात.तो आंबट तिखट वडापाव पण छान लागतो.
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
Wed, 06/18/2008 - 10:45
नवीन
साडेतीन पाऊंडात (२८० रुपायात) दोन वडापाव! (म्हणजे २ डिस्को ब.वडे, ब्रेडच्या २ स्लाईस् आणि एकदम रद्द्ड टेस्ट) :(
पण चलता है! दरवेळी शिव्या देत खातो ;)
(सातासमुद्रापार वडापाव खाल्लेला) टिंग्या :)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Wed, 06/18/2008 - 10:55
नवीन
साडेतीन पाऊंडात (२८० रुपायात) दोन वडापाव!
:O :O :O :O :O :O :O :O :O
8} 8} 8} 8} 8} 8} 8}
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Wed, 06/18/2008 - 10:48
नवीन
कोल्हापुरात राजाराम कॉलेजजवळ शामचा वडा एकदम झकास मिळतो.(कालच मित्रांबरोबर २ खाल्ले)
मिसळीसाठी फेमस असे हॉटेल मोहनमध्येही चांगला वडा-सांबार मिळते.
अनेक गाड्यांवर मुंबई वडा म्हणून व्हर्जिनल वड्याची रिडक्शन आवृत्ती मिळते. पण अजून कधी खाल्ला नाहिए इतका चिरकुट वडा ;)
- Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या
Wed, 06/18/2008 - 13:47
नवीन
चिरकुट वडा ... हा हा हाआअ =))
- Log in or register to post comments
झ
झकासराव
Wed, 06/18/2008 - 13:49
नवीन
खादाडीचा विषय; ते ही पावसाळ्यात; ते ही वडापाव =P~
धमाला तु उल्लेख केलेल्या दुकानाच नाव आहे "नॅशनल स्वीट्स" :)
निगडी प्राधीकरणात भेळ चौकाच्या जवळच असलेला वासु वडापाव चवीत लयी भारी आहे.
फेमस देखील आहे आणि चवीत भारी देखील हे दुर्मिळ कॉम्बिनेशन आहे तिथे. :)
मध्ये एकदा "गोली वडापाव" खाल्ला चिंचवड स्टेशनच्या जवळ बिगबजारच्या जवळच. तो ही चांगला आहे.
(गोली वडापाव ही मुंबईमधील चेन आहे ना???)
दिवाडकरांचा वडा अजुन खाल्ला नाहिये पण लोणावळ्याला एकदा पावसाळ्यात दिवसभर भटकंती करुन संध्याकाळी ६ च्या लोकलला बसायच्या आधी स्टेशनवर खाल्लेला वडापाव जबरा होता. :)
अन्या दातार दहावीनंतर मी कालेजातली पाच वर्ष मी शामचा धंदा वाढवण्याच पुण्यकर्म केलय :)
शामचा वडा चांगला होताच पण मला तो संध्याकाळी ४-४:३० वाजता करत असलेली कांदाभजी जास्त आवडत होती.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Wed, 06/18/2008 - 13:55
नवीन
आयल्ल्ला.....
वासुचा वडा विसरलोच कसा काय मी?
एकच नंबर!!!
- Log in or register to post comments
क
कुंदन
Wed, 06/18/2008 - 14:27
नवीन
आता ती चव नाही राहीली दिवाडकर वड्याची.
फक्त दिवाडकर वडा नाव आहे म्हणुन लोक घेतात , पण ती पुर्वीची मजा नाही आता.
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
गुरुवार, 06/19/2008 - 11:38
नवीन
आयला, झकासराव,
तुम्ही राजाराम कॉलेजचे स्टुडंट का गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे?
- Log in or register to post comments
प
प्रशांतकवळे
Wed, 06/18/2008 - 14:14
नवीन
पनवेल ला गुरुदत्त स्नॅक्स
पुण्यामध्ये कोरेगाव पार्क सिग्नल जवळ ( सिग्नल पासुन पुलाकडे जाताना - मेन रोड वर) संध्याकाळी एक गाडी लागते, चांगला वडापाव मिळतो..
- Log in or register to post comments
श
शितल
Wed, 06/18/2008 - 14:14
नवीन
कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्य गृहा जवळ अश्विनी वडा से॑टर नावाच्या गाङया वर मस्त वडा मिळतो.
कोल्हापुरातील वडे मोठे, आणि ब्रेडच्या स्लाईस असतात, येथे पुण्यात छोटे वडे आणि गोल ब्रेड.
- Log in or register to post comments
झ
झकासराव
Wed, 06/18/2008 - 16:58
नवीन
कोल्हापुरातील दीपक वडा फारच फेमस आहे. अयोध्या टॉकिज जवळ असणारी वड्याची गाडी आता त्याच रोडवर पण सीपीआर हॉस्पिटलजवळ असते.
कधी योगच नाही आला खायचा पण एकदा खायचाच आहे.
अजुन एक आठवल. आम्ही कालेजात असताना प्रोजेक्ट निमित्ताने इचलकरंजीत जात होतो.
तेव्हा इचलकरंजीमध्ये गाडीने एन्ट्री केली की एक चौक आहे तिथे कोणाचा तरी पुतळा आहे. त्या चौकाच्या जवळ वडा पाव चटणी हाणायला जात होतो.
शेंगदाण्याची पातळ बनवलेली चटणी अप्रतिम होती. आणि खाल तितकी. त्याची चव देखील मस्त होती. आता नाव आठवत नाहिये त्या दुकानाच.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
गुरुवार, 06/19/2008 - 11:41
नवीन
मी कसा काय खाल्ला नाही बरे??????? तिथेच सध्या यश वडा सेंटर म्हणून एक फिरती गाडी असते. अश्विनी वडा सेंटर आठवत नाहीए. ~X(
- Log in or register to post comments
झ
झकासराव
गुरुवार, 06/19/2008 - 15:18
नवीन
दसरा चौकात शाहु महाराजांचा पुतळा आहे तिथुन एक रस्ता अयोध्या टॉकिज कडे जातो त्या रस्त्यावर उजवीकडे बघत जायचे.
सापडेल ती टपरी तुला. :)
आणो हो.
मी दोन वर्ष राजाराम आणि (बारावीत मार्क कमी पडल्याने) तीन वर्ष पॉलिटेक्निक
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
- Log in or register to post comments
म
मऊमाऊ
गुरुवार, 01/22/2009 - 05:18
नवीन
कोल्हापुरात पूर्वी चारुदत्तचा वडा छान असायचा..आता नाही मिळत वाटते ?
- Log in or register to post comments
व
वेताळ
Wed, 06/18/2008 - 16:14
नवीन
बरोबर तळलेल्या लंवगी मिरच्या असव्यात तरच वडा खाताना मज्ज्या येते.
वेताळ
- Log in or register to post comments
व
वरदा
Wed, 06/18/2008 - 16:19
नवीन
त्रिमुर्ती (कानिटकर) वडापाव, डो॑बिवली (इथे वड्याबरोबर पावास शिळ्या ब्रेडची लाल चटणी व मिरची, आले, लसूण लावलेली फक्कड हिरवी चटणी लावतात ती लाजवाब..)
आमचे आडनावंधू इतके फेमस आहेत मला माहित नव्हतं आता तिथे आले की खाऊन पाहीन हा वडा...
कुंजविहार चा वडा असाच पाऊस पडत असताना सगळ्या कॉलेजच्या ग्रुप बरोबर उभं राहून खायला काय मज्जा यायची...तिथे ये दिल मांगे मोअर चा चान्सच नसायचा एक खाल्ला की संपलं....
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sat, 06/28/2008 - 04:22
नवीन
कुंजविहार चा वडापाव तर जबरदस्तच आहे...१०वी ला असताना बर्याच वेळेला ताव मारला आहे.....
राजमाता चा वडापाव पण जबरदस्त लागतो..
(गरम गरम वडा चापणारा)
मदनबाण.....
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Fri, 08/01/2008 - 09:40
नवीन
राजमाताचा आता नाही इतका चांगला राहिला,गजानन वडा बेष्ट! आणि गोखले रोड वरच्या दुर्गाचा वडा,आपटेच्या गाडीवरचा वडा! अम्म्म... मस्त!
स्वाती
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
Wed, 06/18/2008 - 21:40
नवीन
श्रीकृष्ण वडा (सहकारनगर), जोशी वडेवाले (बालगंधर्वसमोर), दिवाडकर (कर्जत) इथल्या बटाटावड्यांच्या आठणीत रमून मग पावलं अधून्-मधून वळतात 'डिंपल'कडे !
न्यू जर्सीत 'ओक ट्री रोड' ह्या ठिकाणी (भारतातील एखाद्या गजबजलेल्या रस्त्याची परदेशी आवृत्ती) डिंपल रेस्टॉरंट आहे.
अमेरिकन ब्रेडमधे बटाटावडा आणि लाल चटणी लावून मिळतो. पाहिजे असल्यास झणझणीतही मिळतो.
तुका म्हणे त्यातल्या त्यात ... अजून काय !!!
वेताळ -- मिरची बाबत पूर्ण अनुमोदन !
(पुढच्या पुणे दौर्याची वाट बघत असलेला) संदीप !
- Log in or register to post comments
व
वरदा
Wed, 06/18/2008 - 23:06
नवीन
हॉट ब्रेड मधला वडापाव मला जरा बरा वाटला डिंपल पेक्षा..पण कितीही झणझणीत सांगितला तरी आपल्या घरची चव येतच नाही....
तुका म्हणे त्यातल्या त्यात अगदी पटलं....
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 06/27/2008 - 21:14
नवीन
हॉट ब्रेड्स, अल कमिनो रियल, सनीव्हेल, कॅलिफोर्निया.
बरा आहे.
- सर्किट
- Log in or register to post comments
न
नाटक्या
Fri, 08/01/2008 - 00:45
नवीन
रियल आईसक्रिम, एल कमिनो, सॅन्टा क्लॅरा येथे पण बरा मिळतो...
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
Fri, 08/01/2008 - 22:28
नवीन
ती दाक्षिणात्य लोकांची चेन आहे ग वरदा ... त्यांनी वडा करण्यापेक्षा मला डिंपलच्या गुजराथ्याने केलेला वडा आवडला.
-------------
'सुखाडिया' (ओक ट्री रोडवरच) वडाही मस्त असतो.. वडा पाव नाही... नुसता वडा .
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
- Log in or register to post comments
म
मैत्र
Fri, 06/27/2008 - 16:43
नवीन
रमाकांतचा वडा प्रसिद्ध होता.. आता फारसा चांगला नाही...
पण त्रिमुर्ती चा वडा झकास होता... खाऊन दोन वर्ष झाली पण ती चव आठवते... आणि भला थोरला वडा ...झणझणीत चटणी आणि तळलेल्या मोठ्या मोठ्या हिरव्या मिरच्या ...
पुण्यात नारायण पेठेत प्रभा विश्रांती गृह, एस पी च्या मागे एस एस आणि
टिळक रोड चिमण बागेत तिलक...
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
Fri, 08/01/2008 - 01:44
नवीन
खत्रीचा वडापाव (बालगंधर्व पुलावर)....त्यातही त्याच्या म्हातारीने तळलेला असेल तर अजून बेश्ट (ती फार वेळा हे काम करत नाही, आता आहे की नाही बिचारी हे पण ठाऊक नाही, शेवटचं पाहिलं तेव्हाच लै वाकली होती)...
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Fri, 08/01/2008 - 05:11
नवीन
बर्याच वर्षा पुर्वी कोल्हापुरात बिनखांबि गणपति मंदिराजवळ वाइकरचा , आकाराने मोठा असलेला वडा खुप प्रसिध्द होता.
- Log in or register to post comments
स
सुचेल तसं
Fri, 08/01/2008 - 05:39
नवीन
पुण्यातली काही ठिकाणं...
१) बिपिन स्नॅक्स: गरवारे महाविद्यालयासमोर, कर्वे रोड, पुणे.
२) गिताई शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या (आनंदनगर पाशी, पौड रोड) बाजुला तळमजल्यावर: इथला वडा पाव आणि मुग भजी एकदम बेष्ट.
३) राहुल कॉम्प्लेक्सच्या (कृष्णा हॉस्पिटल जवळ, पौड रोड) समोरची वडापावची गाडी: वडा पाव + मुग भजी.
http://sucheltas.blogspot.com
- Log in or register to post comments
म
मुकेश
Fri, 08/01/2008 - 13:17
नवीन
पुण्यात बटाटे वडा खावा तर प्रभाचा ....
"प्रभा विश्रांती ग्रुह"
नारायण पेठ, रमणबाग शाळेच्या शेजारी.
वडापाव नाही, फक्त वडा & उपवासाची कचोरी.... एकदा चाखून बघा नक्की ..
मुकेश
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »