बटाटवडा- वडापाव!
💬 प्रतिसाद
(59)
अ
अभि
Fri, 08/01/2008 - 20:17
नवीन
खिडकि वडा,टिळ्क चौक
दरवाजा वडा देखिल चांगला आहे
- Log in or register to post comments
ब
बबलु
Fri, 08/01/2008 - 22:21
नवीन
१. अंधेरी ईस्ट (स्टेशन जवळ, सिटिबँक ATM च्या बाजूला):-- सही वडा पाव + ३ टाईप च्या चटण्या :)
२. शिवाजीमंदिर मधे (नाटकाच्या मध्यांतरात).
३. बोरीवली (वेस्ट) स्टेशन च्या बाहेरील गुज्जू दुकान (नाव आठवत नाही).
४. अंधेरी ईस्ट (महाकाली रोड) नेल्को जवळील क्रुष्णा होटेल च्या बाजूची टपरी -- जबराट चव.
(वडा पाव मय) बबलु-अमेरिकन
- Log in or register to post comments
ट
टिउ
Fri, 08/01/2008 - 22:43
नवीन
३) राहुल कॉम्प्लेक्सच्या (कृष्णा हॉस्पिटल जवळ, पौड रोड) समोरची वडापावची गाडी: वडा पाव + मुग भजी.
अहाहा!!! रोज संध्याकाळी न चुकता हिंजेवाडीतनं येतांना बसमधुन उतरलो कि तिथले २ वडापाव खाउनच घरी जायचो...अशक्य गर्दी असायची आणि त्याच्या गाडीवर.
नाशकात सर्कल सिनेमा समोर श्रीकृष्ण नावाची एक टपरी आहे..तिथला वडापाव पण एकदम फेमस आहे...
जोशींचा वडापाव काही फारसा आवडला नाही मला...म्हणजे ठीक आहे पण जितकं ऐकलं होतं तितका भारी नाही वाटला!
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
Sat, 08/02/2008 - 01:30
नवीन
जोशींचा वडापाव एकेकाळी चांगला होत म्हणतात...आता पार लयाला गेली आहे त्याची जुनी चव
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
रितु आयी सावन की,
रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥
- Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे
Wed, 01/21/2009 - 16:17
नवीन
परवाच लोणावळ्याला गोल्डनचा फेमस वडा-पाव खाल्ला. निव्वळ अप्रतिम आहे.
जुन्या मु॑बई-पुणे महामार्गावर हॉटेल रामकृष्णजवळ गोल्डन दुकान आहे. आकारही चा॑गला मोठा आहे आणि चवही बेफाट आहे. मिरचीची चटणीही क्लास होती. गरम गरम वडाच मिळतो कारण सतत घाणा चालू असतो आणि खपही प्रच॑ड आहे. हायवेवर असल्याने जाता येताही खाण्यासारखा आहे.
गरम वड्या॑वरून नागपूरच्या मू॑हजले सामोश्या॑ची आठवण झाली. शहराच्या थोड्या बाहेरच्या बाजूला तेल॑गखेडीच्या रस्त्यावर हे सामोसे मिळतात. ऐन थ॑डीच्या मोसमात दातावर दात वाजत असता॑ना स॑ध्याकाळच्या भणाणणार्या वार्यात रस्त्यावर उभे राहून हे सामोसे खावे. ते इतके गरम आणि झणझणीत असतात की तो॑ड थोडेसे पोळतेच, म्हणूनच त्या॑ना मू॑हजले नाव आहे.
बाकी नागपूरला खाण्याच्या एव्हढ्या मस्त मस्त गोष्टी मिळतात की तो एक स्वत॑त्र लेखाचा (व ट्रिपचाही) विषय आहे.
- Log in or register to post comments
स
समिधा
Wed, 01/21/2009 - 19:56
नवीन
पुणे -सातारा हाय वे वरील शिरवळ जवळ श्रीराम वडेवाले सुंदर वडापाव. महाबळेश्वर ला जाताना हमखास थांबण्याचे ठिकाण
- Log in or register to post comments
द
दवबिन्दु
गुरुवार, 01/22/2009 - 04:51
नवीन
कल्यानमधे खिडकीवडा खाल्लेलाय. एकदम सह्ही.
- Log in or register to post comments
S
sanjubaba
गुरुवार, 01/22/2009 - 06:34
नवीन
एलफिस्टंट स्टेशन वरती 2 नंबर प्लॅटफॉर्म वरचा वडा पाव एकदम छान तो खाण्यासाठी खास लोक त्या स्टेशन वर उतरतात. इतकी गर्दी असते की सकाळ
पासून की, काही विचारू नका. जर कुणी मुंबईकर असेल आणि ज्यानी हा वडापाव खाल्ला नसेल तर जरूर चव घ्यावी निराश होणार नाही याची खात्री.......
वडा पाव प्रेमी
संजू बाबा.
- Log in or register to post comments
ढ
ढ
गुरुवार, 01/22/2009 - 07:33
नवीन
गल्लीत अण्णाचा वडापाव मिळतो. मी तरी तसा वडापाव पुण्यात इतरत्र खाल्ला नाहिये.
संध्याकाळी सहा पासून माल असे पर्यंत मिळतो. ( असं म्हणण्याची पद्धत आहे पुण्यात.)
पण अण्णाचा वडापाव आणि लाल सुकी चटणी बेफाम...
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2