Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

म — मोदक, Sat, 01/19/2013 - 05:15
******************************************************* धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले.. सखूचे विडंबन समजणार असलात तर जरूर समजावे, मात्र कुणा व्यक्ती / पात्राशी सांधर्म्य आढळयास योगायोग समजण्याची चूक करू नये. ******************************************************* शब्द खरडतो 'मी' घाई घाई, अर्थाची आठवण राहीलीच नाही बुध्दी, ज्ञान, मती सर्व 'माझ्याच' ठायी, आजही तू सहमत होशील ना? 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? संस्थळांवर उडवलाय धुरळा, 'मीच' काढलाय 'माझाच' गळा 'मी' सांगतो तीच पूर्व दिशा, 'मी' सांगतो तोच अर्थ खरा 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? जगातले सर्व ज्ञान आहे 'मला', तुझे बरोबर मुद्दे पण पटेनात 'मला' 'मी', 'माझे' मत, 'माझे' प्रतिसाद, 'माझे' विचार, 'माझे' ज्ञान.. पण आज्जिबात अहंकार नाही 'मला' 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? सांगत असतात बरेच जण 'मला', सांभाळून वाग बोल रे मित्रा 'मी' म्हणतो 'माझ्या' ज्ञानाचा ते तिरस्कार करतात, सतत 'मलाच' टारगेट करतात 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? तू कसे काय म्हणतेस 'मी' चुकलो, छे छे नाहीच्च 'मी' चुकलो. बरोबर असले मुद्दे तुझे तरी, अंतीम सत्य नेहमी 'मीच' बोलतो 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? "आजपण ऐकशील ना..?" मध्ये दिसते विनंती, आज्ञा सोडायची सवय 'माझ्या' ठायी . 'मी' आता त्या विनंतीला आज्ञेमध्ये बदलतो, आजच्या दिवसातला एक विजय (?) प्राप्त करतो. 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल. कदाचित तू असशील बरोबर, मुद्देही असतील लॉजीकल, पण ते 'मी' मान्य कसे करेन?? तुला माझ्यासारखे वागायचेय? मग सभ्यता, मर्यादा, संकेत सर्व विसरावे लागेल. 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.

प्रतिक्रिया द्या
50843 वाचन

💬 प्रतिसाद (165)
स
स्पा Sat, 01/19/2013 - 05:23 नवीन
ना यमक ना छंद कविता आहे कि गद्य .. असो पण जे काही आहे ते लई भारी आहे :D
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 01/19/2013 - 05:41 नवीन
ना यमक ना छंद कविता आहे कि गद्य .. या अभिप्रायाबद्दल तुम्हाला वरील लेखनविषयामधील 'व्याकरण' हा लेखनविषय सप्रेम भेट. ( 'औषधोपचार' प्रेझेंट देणार होतो पण तुम्ही कंपू घेवून मागे लागलात तर आम्हाला लपून बसण्यास जागा शोधावी लागेल ;-) ) असो, पण जे काही आहे ते लई भारी आहे या अभिप्रायाबद्दल तुम्हाला वरील लेखनविषयामधील 'मौजमजा' हा लेखनविषय सप्रेम भेट आपल्या अभिप्रायाबद्दल मी आणि (धनाजीरावांची) सखू आपले आभारी आहोत. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
प्रचेतस Sat, 01/19/2013 - 05:42 नवीन
नशिब!!! काव्यरसातील भूछत्री नाही दिलीत ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
स्पा Sat, 01/19/2013 - 05:40 नवीन
भूछत्री तो मान फक्त आणि फक्त मांडीवाल्या बुवाचा
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 01/19/2013 - 05:44 नवीन
स्पाशी सहमत. काय पण दिवस आलेत तेजायला. :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
पैसा Sat, 01/19/2013 - 07:06 नवीन
कोढाईकनाळ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sun, 01/20/2013 - 16:46 नवीन
बुवा, कुठे हैसा..? तुमच्यापासून सुरू झालेल्या भूछत्र आणि कोडाईकनालच्या परंपरेचे उत्तर द्यायला या. (बुवांकडून उत्तराची अपेक्षा असलेला :-D) मोदक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सूड Sun, 01/20/2013 - 17:54 नवीन
>>(बुवांकडून उत्तराची अपेक्षा असलेला ) मोंदकांऽऽऽ अरे त्या बुवाचा संबंध दक्षिणेशीं, कांय समजलांस !!...ती उत्तरा फार तर नक्षत्र म्हणून माहिती असेल त्यांस. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sun, 01/20/2013 - 18:03 नवीन
अवांतर प्रतिसाद देवून चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न. आता प्रतिसाद दिलाच आहात तर आमच्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. १० दिशा या कल्पना आहेत की भास / भ्रम..? पूपदउ आणि अवानैई या आठ दिशा आपले स्थान उत्तर दिशेप्रमाणे बदलतात. उर्ध्व आणि अधो या दिशा वैश्वीक सत्य ठरू शकत नाहीत. कारण आपली उर्ध्व दिशा ही आपल्या वरच्या मजल्यावरच्या माणसाची अधो दिशा असते. आपली अधो दिशा ही खालच्या मजल्यावरच्या माणसाची उर्ध्व दिशा असते. (सोपे मुद्दे अवघड करणारा :-D) - मोदक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Sun, 01/20/2013 - 18:08 नवीन
>>१० दिशा या कल्पना आहेत की भास / भ्रम..? ते आमाला काय विचारते, ते तुज्या शालेतला मास्तरला विचार ने !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sun, 01/20/2013 - 18:06 नवीन
आणि एक राहिले... तुमच्या स्वाक्षरीमध्ये कोणते तरी रहस्य लपले आहे असे "मला" वाटते. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Sun, 01/20/2013 - 18:12 नवीन
>>तुमच्या स्वाक्षरीमध्ये कोणते तरी रहस्य लपले आहे असे "मला" वाटते. हो तर !! मदुराईची एक देवता कोकणातल्या एका तालुक्यात येऊन स्थायिक झाली तर तिचे नाव काय असेल? (संदर्भासाठी गोव्यातल्या काही देवतांची नावे अभ्यासणे. उदा. अन्नपूर्णा कुंकळ्ळीकरीण इ.इ.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 01/20/2013 - 18:13 नवीन
@बुवांकडून उत्तराची अपेक्षा असलेला>>> =)) निरुत्तर होणं हा ही कदाचित भ्रम असला,तरी त्यानंतर पळून जाणं/पाठ फिरवणं हे वास्तव आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sun, 01/20/2013 - 18:28 नवीन
तुमचे उत्त्तर कळाले नाही. बुवा तुम्ही माझा प्रश्न नीट वाचला का..? वाचला असल्यास माझा प्रश्न कळाला का..? कळाला नसल्यास प्रिंटाऊट घेवून आणखी एकदा वाचला तरी चालेल. :-D पण समजेल असे उत्तर द्या हो प्लीज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 01/20/2013 - 18:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ग
गणामास्तर Mon, 01/21/2013 - 06:01 नवीन
तुमचे उत्त्तर कळाले नाही.
मोदक, मुळातचं तुमचा प्रश्न त्यातील व्यर्थता दर्शवतोय. तुमच्या लेखनात एक प्रकारचा दुहेरीपणा आहे. तुम्ही ही एक रिअ‍ॅलिटी आहात, तुमचा प्रश्न ही एक वर्च्युअ‍ॅलिटी आहे म्हणजेचं इफ यू बिलीव देन देअर इज नो वर्च्युअ‍ॅलिटी, इट इज रिअ‍ॅलिटी फॉर यू. वरील जाणकार (!) लोकांची चर्चा पुन्हा एकदा मन लावून वाचा. मुळात हा चर्चेचा विषय नाही, अनुभवायचा आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्हाला त्यातील गंमत जाणवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 01/21/2013 - 06:04 नवीन
अ र्र र्र र्र र्र र्र र्र हा भिडू तर पोचलेला दिसतोय, बरोब्बर पकडले आहे मला याने. लॉजीकल उत्तर देणे शक्य नाही याला. काय करावे..? फाट्यावर मारतो याचे प्रश्न आणि याचे विचार. कधीतरी मिपावर धागा टाकेलच, तिथे स्कोर सेटल करतो. इथे बस उत्तराची वाट बघत. (हा आयडी धरून एकूण ८ जणांचे स्कोर सेटल करायचे आहेत आता.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
ग
गणामास्तर Mon, 01/21/2013 - 08:41 नवीन
फाट्यावर मारतो याचे प्रश्न आणि याचे विचार. कधीतरी मिपावर धागा टाकेलच, तिथे स्कोर सेटल करतो. इथे बस उत्तराची वाट बघत. (हा आयडी धरून एकूण ८ जणांचे स्कोर सेटल करायचे आहेत आता.)
परत तेचं. माझा वरील प्रतिसाद पुन्हा वाचा. प्रश्न ही एक वर्च्युअ‍ॅलिटी आहे. ती फाट्यावर मारल्याने प्रश्न रिअ‍ॅलिटी होणार नाहीये. स्कोर सेटल करणे ही एक कल्पना आहे. ही कल्पना तुम्ही जीवनातून काढून टाका आणि पाहा तुमचा किती वेळ्,पैसा व श्रम वाचतात ते. इथे उत्तराची वाट बघत बसण्यात पर्यायाने वेळ घालवण्यात काही हशील नाहीये. जरी वेळ हा भास असला तरी तो वाचवा कारण आपण ही एक स्थिती आहोत. मी काय म्हणतोय त्याकडे लक्षपुर्वक पाहा. इथे प्रतिसाद लवकर नाही दिला तरी चालेल,घाई करु नका. नीट समजून घ्या. समजून घेताना जर तुम्हाला वाटले की "वा! क्या बात है" म्हणजे मग जमले. - गणामास्तर भोकरवाडी बुद्रुक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
स्पा Sat, 01/19/2013 - 05:47 नवीन
काय पण दिवस आलेत तेजायला असो हे हि दिवस जातील =))
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sat, 01/19/2013 - 07:01 नवीन
खत्राड लिहिलंय मोदकराव. सखुची त्यावेळी दोन दोन नामवंतांची रसग्रहणं आली. परंतू असं विडंबनही होईल असं वाटलं नव्हतं. :)
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sat, 01/19/2013 - 10:21 नवीन
च्यायला, आमचं विडंबन गंडलय.. संपाडक मंडळ ते निट करुन देइल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
क
कवितानागेश Sat, 01/19/2013 - 08:10 नवीन
काय बै वैयक्तिक धागे काढता तुम्ही लोकं!! अवांतरः माझा गोंधळ होतोय. थेट अशीच वृत्ती असलेले किमान ५ आयडी आज इथे आहेतच. अतिअवांतरः मोदका, काईतरी भन्नाट, रहस्यमय, अंगावर काटा येइल असं लिही रे. कुठे त्या सखूच्या मागे लागतोस विडम्बने पाडत! :)
  • Log in or register to post comments
स
सूड Sat, 01/19/2013 - 08:26 नवीन
जी बोलते तीच असते...;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
क
कवितानागेश Sat, 01/19/2013 - 08:40 नवीन
बालिश कुठला!! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
न
निवांत पोपट Sat, 01/19/2013 - 08:43 नवीन
विडंबन असेल अथवा काहीही,हे जे काही आहे ते आवडले.फक्त प्रश्न असा पडला की हे "पूर्वधारणा" न बाळगता कसे वाचायचे? बघू कोणाकोणाला जमतेय ते !;)
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sat, 01/19/2013 - 09:48 नवीन
मोदका, मोठी छत्री विणली आहेस... :D - पिंगू
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 01/19/2013 - 12:12 नवीन
मोदक रॉक्स बदलतो सॉक्स & then rocks म्हणुन मोदक रॉक्स
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 01/19/2013 - 12:32 नवीन
अखिल शिंव्हगड रोड धायरी जिलबीपाडू संघाचा इजय असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त
स
स्पंदना Sat, 01/19/2013 - 13:40 नवीन
मी कुचुन आखुड शींग अस वाचलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बॅटमॅन Mon, 01/21/2013 - 09:29 नवीन
कुचल्यामुळेच आखूड शिंग जाहले असावे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ध
धन्या Sun, 01/20/2013 - 09:02 नवीन
यातून वारजे तसेच डीयेस्के वगळून आमच्यात फुट पाडण्याच्या केविलवाण्या प्रकाराचा झ्याईर निशेद !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sun, 01/20/2013 - 09:42 नवीन
डीयेस्के धायरीतच समाविष्ट असल्याने वगळले गेल्याचा तुमचा आरोप चुकीचा आहे. बाकी अखिल शिंव्हगड रोड धायरी व्हाया वारजे माळवाडी असे न लिहिल्याबद्दल मी मनापासून दिलगीर असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून तुमच्या अशिंरोधाव्हावामाजिपा संघाच्या पुढच्या जिलबीचा मनापासून आस्वाद घेतला जाईल याची मी ग्वाही देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
प
पैसा Sun, 01/20/2013 - 09:48 नवीन
ही धमकी आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sun, 01/20/2013 - 09:52 नवीन
छे छे. जाहीर दिलगीरी आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ध
धन्या Sun, 01/20/2013 - 11:00 नवीन
अब रुलायेगा क्या? बाकी तुम्ही मोदकरावांच्या या जिलेबीबद्दल थेट मत व्यक्त केले नाहीत असे एक निरिक्षण जाता जाता नोंदवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sun, 01/20/2013 - 11:06 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
म
मोदक Sun, 01/20/2013 - 11:49 नवीन
शब्दरूप प्रतिक्रिया दिलीत तर 'मला' जास्ती आनंद होईल, पक्षी* 'माझा' इगो सुखावेल. :-D *इथे पक्षी म्हणजे बर्ड असा अर्थ घेवू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ध
धन्या Sun, 01/20/2013 - 12:03 नवीन
पुर्ण लेखाचा अर्थ कसा घ्यायचा हे समजवावं लागलं हे एक वेळ समजून घेण्यासारखं आहे परंतू एका शब्दाचा अर्थ "असा घेऊ नये" हे समजावण्याची वेळ यावी याचा अर्थ काय घ्यायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sun, 01/20/2013 - 12:19 नवीन
याचा अर्थ इतकाच की मिपावर इतर ठिकाणी समज गैरसमजाची धूळ उडत असेल तर ती धूळ इकडे येवून माझ्या धाग्याचे काश्मीर होवू नये या काळजीने आधीच माझा 'एकमेव स्टँड' किल्लर करतोय. मिपावर इतर ठिकाणी समज गैरसमजाची धूळ उडत असेल असे आपले मत असेल तर आपण हुषार आहात - तुम्ही जिंकलात. :-D मिपावर इतर ठिकाणी समज गैरसमजाची धूळ उडत नाही असे आपले मत असेल तर, "तुम्ही अभ्यास वाढवण्याची नितांत गरज आहे!" असे मत कुणी व्यक्त केले तर तुम्ही "तुमच्या सखूच्या विडंबनाचे विडंबन" करून स्वसमाधान करून घेवू नका. :-)) देव सर्वांना सद्बुद्धी देवो. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ध
धन्या Sun, 01/20/2013 - 12:33 नवीन
देव सर्वांना सद्बुद्धी देवो. हे देव आहे असं मानणार्‍यांच्या बाबतीत ठीक आहे. जे देव नाही असं मानतात, त्यांच्या दृष्टीने जो अस्तित्वातच नाही तो त्यांना सद्बुद्धी कसा काय देणार? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sun, 01/20/2013 - 12:53 नवीन
जे देव नाही असं मानतात, त्यांच्या दृष्टीने जो अस्तित्वातच नाही तो त्यांना सद्बुद्धी कसा काय देणार? कै च्या कै काय बोलताय वाकडे साहेब. अहो असे लोकच दिसेल तिथे सद्बुध्दी वाटतात. देवाचे काम तेच करतात. "अहं ब्रह्मास्मि" चा त्यांच्या लेखी अर्थ "मीच ब्रह्म आहे, मीच सर्वस्व आहे, मी जे काही करतो ते बरोबर करतो, माझे मत निर्विवादपणे सत्य आहे, माझ्या मताविरूद्धचे मत निखालस चुक आहे.. " कंटाळा आला टंकायचा.. वरचे विडंबन इथे टंकले आहे असे समजा :-D (माझ्या धाग्याचे काश्मीर होईल का अशा प्रश्नात बुडालेला) मोदक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
प
पैसा Sun, 01/20/2013 - 14:27 नवीन
तुला भास होतायत मोदका. सगळं जगच भास आहे. तुझा धागा भास आहे. काश्मिर हा एक भास आहे आणि तुला मनातून धाग्याचे काश्मिर व्हायला हवेच आहे, फक्त तू चालू असल्याने तसे कबूल करत नाहीयेस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sun, 01/20/2013 - 14:46 नवीन
जोरदार असहमत. मी चालू आहे हा तुम्हाला झालेला भास असून "मीं" ("तें" च्या चालीवर वाचावे), "माझा" चलनी पैसा हेच अंतीम व एकमेव वैश्विक सत्य आहे. :-D वरच्या प्रतिसादातले काही कळाले नसेल तर कृपया विचारू नये. प्रतिसाद प्रकाशित केल्यानंतर विचार करून, अर्थ लावून उत्तर देण्यात लै लै वेळ जातो. "मीं" सांगत असल्याने ते बाय डीफॉल्ट बरोब्बरच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sun, 01/20/2013 - 14:54 नवीन
पैशाचा एक फिक्स्ड मालक नसतो. चोराने तुझ्या खिशातले पैसे चोरले तर तो मालक ठरेल. तेव्हा "मी मालक" हा हट्ट सोडून दे. कारण मी म्हणते की "तू मालक". आता बरोबर कोण? यातलं काही कळलं तर गप्प बस. नाही कळलं तर स्पारायण गाळप यांना किंवा लिलाध्राला विचारायला हरकत नाही. तेच का हा प्रश्ण विचारू नये कारण सर्व कंपू एकच आहेत हे सत्य आहे आणि विडंबने मिथ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अभ्या.. Sun, 01/20/2013 - 14:58 नवीन
धन्यवाद पैसातै. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मोदक Sun, 01/20/2013 - 15:10 नवीन
अश्लील प्रतिसाद. तरीही अश्लील प्रतिसादामध्ये लीलाध्राचे नाव आल्याने हा प्रतिसाद निष्पाप आणि निरागस आहे असे "मीं" जाहीर करतो आहे. बादवे - स्पारायण गाळप. :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sun, 01/20/2013 - 15:15 नवीन
आता आमची मौनाची वेळ झाली आहे. तेव्हा तात्पुरती निवृत्ती घेत आहे. नंतर तुझा आयडी अस्तित्त्वात असलाच तर भेटू परत इथेच. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sun, 01/20/2013 - 15:26 नवीन
ही धमकी आहे का? o नाहि सहमत o
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कवितानागेश Sun, 01/20/2013 - 15:32 नवीन
नसावी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sun, 01/20/2013 - 15:36 नवीन
"मीं" म्हणतो ही धमकी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा