Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इश्कबाजांच्या मैफिलीत

अ — अधिराज, Sat, 02/09/2013 - 08:16
इश्कबाजांच्या मैफिलीत तू असावीस गाजलेली नशा शायरीत आणताना तू असावीस लाजलेली. दो जीवांची स्पंदने ही असावी तुझ्यातच रुजलेली वसंतातले रंग लेऊन तू असावीस सजलेली. घेऊन चांदणे उशाला तू असावीस निजलेली धुंद जाणिवेच्या धारांमध्ये तू असावीस भिजलेली. विरहसमय आला तरी नसावी प्रेमवात विझलेली बहू पालटले ऋतू जरी नसावी गझल झिजलेली.

प्रतिक्रिया द्या
2017 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
प्रचेतस Sat, 02/09/2013 - 08:22 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 02/09/2013 - 08:26 नवीन
विरहसमय आला तरी नसावी प्रेमवात विझलेली बहू पालटले ऋतू जरी नसावी गझल थांबलेली असं हवं का?
  • Log in or register to post comments
अ
अधिराज Sat, 02/09/2013 - 13:31 नवीन
गझल नाविन्य संपलेली किंवा कंटाळवाणी झालेली नसावी ह्या अर्थी तो शब्द वापरला आहे. पण तुमचा "थांबलेली" बी चालायला हरकत नाही. तुमच्यासाठी काय पन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sat, 02/09/2013 - 14:35 नवीन
शब्द नज़ाकतदार हवा. कविता (किंवा गज़ल) सखीशी नातं असतं तशी असावी. सखी थांबते. तिचं नाविन्य संपत नाही, तिचा सहवास कधी कंटाळवाणा होत नाही. आपला तिच्याकडे पाहण्याचा नज़रिया नाविन्यपूर्ण लागतो. ती अस्तित्वाचं प्रकटरूप असते, नित्यनूतन! तुमच्यासाठी काय पन!... क्या बात है! म्हणून तर लिहीलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज
अ
अभ्या.. Sat, 02/09/2013 - 08:54 नवीन
मस्त जमलीय. सुरेख.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/09/2013 - 10:06 नवीन
चान चान आहे.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 02/09/2013 - 14:03 नवीन
इश्कबाज ?? शब्द अंमळ खटकून गेला बॉ.
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 02/10/2013 - 07:55 नवीन
कधीकधी खटकतात. मागे एकदा,मी एका कुठेही झोप येऊ शकणार्‍या मित्राला 'इच्छाशयनी' म्हटले तर त्याने वेगळाच अर्थ घेतला.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sun, 02/10/2013 - 08:26 नवीन
इश्कबाजांच्या मैफिलीत तू असावीस गाजलेली (?)
हे जरा वेगळं वाटते आहे . बाकी कविता छान!
  • Log in or register to post comments
अ
अधिराज Mon, 02/11/2013 - 04:56 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांचे व येथे पायधूळ झाडून गेलेल्या सर्वांचे मनापासून आभार!
  • Log in or register to post comments
श
श्रिया Mon, 02/11/2013 - 06:48 नवीन
अतिशय सुंदर जमलीये.
दो जीवांची स्पंदने ही असावी तुझ्यातच रुजलेली वसंतातले रंग लेऊन तू असावीस सजलेली.
एकदम खास!
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Mon, 02/11/2013 - 17:24 नवीन
.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Mon, 02/11/2013 - 17:26 नवीन
मी पायधुळ झाडलीन बरका .. अधिकाका :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा