Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

यु आर लेट यु फुल

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Mon, 03/04/2013 - 03:45
आज भेटायचे ठरले होते आपले किनार्‍यावर जरा लवकरच आलो अन् दूर उभा राहिलो . मी नसतांनाचा समुद्र आणि मी तुझ्याबरोबर नसतांनाची तू दोघांना बघायचे होते म्हणून . पण तू माझ्या आधीच पोहचली होतीस किनार्‍यावर, समुद्राकडे तोंड करून . मनात म्हटले, यु आर लेट यु फुल! . बेभान वाहणारा खारट वारा तुझ्या कुंतलात अडकून तुला छळत होता वाटले तुझ्या केसांमधून बोटे फिरवून त्याला मोकळे करावे पण इतक्यात तू मानेला एक मोहक झटका देऊन त्याला झटकलेस वाटले... यु आर लेट यु फुल! . तुझ्या पायाखालची वाळू तुझ्या कोमल पाऊलांना चिटकत होती तुला ती हुळहुळ सतावत होती वाटले पुढे होऊन ती झटकून द्यावी पण इतक्यात तू येणार्‍या लाटेत आपले पाऊल हळूवार वरचेवर घुसलळेस वाटले... यु आर लेट यु फुल! . समुद्र जरा रागावलेला वाटला, बहुदा माझ्यावरच तिला वाट पाहायला लावत होतो म्हणून असेल बहुतेक नाही,बहुदा तिच्या डोळ्यातला समुद्र जास्त सुंदर होता, म्हणून कदाचित माहित नाही नक्की काय ते पण त्याच्या लाटा अजूनच उग्रपणे किनार्‍यावर आदळत होत्या . कुठल्याशा अनावर ओढीने मी तुझ्याकडे सरसावलो तुझा हात धरून तुला मागे ओढले मला पाहताच तू लटक्या रागाने ओठांचा लोभस चंबू करत म्हणालीस . यु आर लेट यु फुल!! |- मिसळलेला काव्यप्रेमी -| टिपः हि कविता मी ऑर्कुटवर प्रसिद्ध केली होती, तिथुन उचलुन चेपुवरच्या 'पुण्याला पुणेच म्हणा' नावाच्या ग्रुप ने ती माझे नाव वगळून, मला न विचारता एक पेज बनवून त्यांच्या ग्रुप मध्ये प्रसिद्ध केली होती. त्यामुळे तुम्ही ती आधीच वाचलेली असण्याची शक्यता आहे. तिथे काही हजार लाइक्स आले होते, मला कळल्यावर, मी ती कविता त्या ग्रुपशी भांडून तिथुन काढायला लावली.

प्रतिक्रिया द्या
34447 वाचन

💬 प्रतिसाद (85)
फ
फिझा Mon, 03/04/2013 - 04:00 नवीन
ही कविता खरंच जीवघेणी आहे .....आधी वाचली आहे ....आजही तितकीच नव्याने वाचली ............खुपच सुंदर !!!!शब्द नाहीयेत.... प्रतिसाद काय देऊ कवितेला !!!
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Mon, 03/04/2013 - 04:21 नवीन
आवडेश :)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 03/04/2013 - 04:25 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 03/04/2013 - 04:27 नवीन
यु आर लेट यु फुल!! :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 03/04/2013 - 04:48 नवीन
जबरी रे मिका
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Mon, 03/04/2013 - 05:03 नवीन
.
  • Log in or register to post comments
अ
अनिदेश Mon, 03/04/2013 - 06:18 नवीन
सुन्दर लिहिलय....!!!:)
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 03/04/2013 - 06:26 नवीन
मस्त! लै आवडली!
  • Log in or register to post comments
अ
अस्मी Sat, 03/09/2013 - 06:18 नवीन
खूपच आवडली..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ग
गवि Mon, 03/04/2013 - 06:33 नवीन
लव्हली... झकास.. कविता हा प्रकार न आवडणार्‍यांनी अशा कविता वाचाव्यात. बाकी "तुझ्या" आणि "तिच्या"चा नेहमीचा घोळ इथेही घातला आहेसच.. पण कविता सुंदर असल्याने तिकडे दुर्लक्ष..
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 03/04/2013 - 18:32 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ई
ई-पूर्वाई Mon, 03/04/2013 - 06:51 नवीन
आपण खूपच छान लिहिता.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 03/04/2013 - 07:08 नवीन
चांगली कविता, ती बहुधा त्याची ऑफिसातली बॉस असावी असा संशय आहे.
  • Log in or register to post comments
M
michmadhura Mon, 03/04/2013 - 07:18 नवीन
खूपच आवडली.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 03/04/2013 - 08:06 नवीन
मिका, क्या बात है! तुझमे समाना तो था मेरी जां आखोंके रस्ते तू मुझमें समा गयी मुझसे पहेले दिलके रस्ते मैं सोचता रहा ये कैसे अंदाज ये क्या जादू है तू आशिकीका सिलसिला मुझसे पहलेही पहेचाने है तू
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 03/04/2013 - 08:12 नवीन
कविर्मिका कविर्मिका कविर्मिका न संशयः!!!!
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Mon, 03/04/2013 - 08:18 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 03/04/2013 - 08:26 नवीन
देवळाच्या थंड काळ्या दगडाने कळ लागलेले पाय अन कापराअंगार्‍याचा गंध अंगभर लेवून मी दगडाच्याच देवाकडे तिला मागितली, अगदी डोकं टेकून.. एरवी कधी एका शब्दानेही बोलत नाही.. पण आज तोही म्हणाला ... यू आर लेट यू फूल.. ..................... हे आपलं उगीच चांगल्या कवितेला ठिगळ..
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 03/04/2013 - 08:29 नवीन
एरवी कधी एका शब्दानेही बोलत नाही.. पण आज तोही म्हणाला ... यू आर लेट यू फूल..
व्वाह, सार्थकी लागली कविता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
द
दादा कोंडके Mon, 03/04/2013 - 09:38 नवीन
मस्त. कविता आणि गवींचं कडवं दोन्ही आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
अ
अनिदेश Mon, 03/04/2013 - 11:41 नवीन
वा गवि...चार चांद लावले कवितेला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सुधीर Mon, 03/04/2013 - 14:35 नवीन
हायला! गवी तुम्हीपण शोलीट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
परिकथेतील राजकुमार Mon, 03/04/2013 - 08:27 नवीन
__/\__ हलवलेस आतून...
  • Log in or register to post comments
न
नानबा Mon, 03/04/2013 - 08:33 नवीन
भन्नाट रे मिका.. एकेक शब्द वाचताना डोळ्यांसमोर चित्र उभं राहत गेलं. निव्वळ अप्रतिम... :) विशेषतः
मी नसतांनाचा समुद्र आणि मी तुझ्याबरोबर नसतांनाची तू दोघांना बघायचे होते म्हणून
हे वाचून माझ्या आयुष्यातला असाच एक क्षण डोळ्यांसमोर तरळला.. कमाल कविता...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/04/2013 - 08:34 नवीन
या वेळी आंम्हाला समुद्रच जास्त भावला ! :-)
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 03/04/2013 - 08:53 नवीन
आहा! :)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 03/04/2013 - 12:46 नवीन
.......... (आमच्या शब्दांची ठिगळं नकोत) :) हॅट्स ऑफ!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/04/2013 - 13:42 नवीन
(आमच्या शब्दांची ठिगळं नकोत) +१०० !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
र
रेवती Mon, 03/04/2013 - 12:56 नवीन
क्या बात है| कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अधिराज Mon, 03/04/2013 - 12:59 नवीन
एकदम मस्त! रुमानी!
  • Log in or register to post comments
त
तिमा Mon, 03/04/2013 - 14:02 नवीन
कधीकाळी आपणही तरुण होतो त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Mon, 03/04/2013 - 14:28 नवीन
झक्कास!!!
  • Log in or register to post comments
स
सुधीर Mon, 03/04/2013 - 14:31 नवीन
आवडली. लाईक करण्याजोगीच आहे. काहीवेळेला वाटलं अरर्! आपल्यावरच तर नाही ना केली? अ‍ॅम ऑलवेज लेट एण्ड फूल.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 03/04/2013 - 14:38 नवीन
कविता कशी असावी? कविता अशी असावी :) फुलपाखराच्या पंखांचा निसटता स्पर्श व्हावा, तशी तरल कविता!
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 03/04/2013 - 15:13 नवीन
खासच.
  • Log in or register to post comments
म
मराठे Mon, 03/04/2013 - 15:58 नवीन
मस्त! आणि गविंच्या ठिगळाने एक वेगळंच अस्तर उलगडून दाखवलंय!
  • Log in or register to post comments
ल
लौंगी मिरची Mon, 03/04/2013 - 16:09 नवीन
सरत्या आयुष्याला मागे वळुन पाहाताना टोचलेल्या काट्याचं कुरुप झालय आता सैरभैर होउन तुला पाठमोरी पहात राहिलो तुला निघुनच जायचं होतं पण तरिहि क्षणभर थांबलीस डोळ्यात आलेल्या पाण्याशीच कुजबुजलिस यु आर टू लेट ... यु फुल ! अतिशय सुंदर कविता मिका . लिहित रहा.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 03/04/2013 - 18:19 नवीन
तुला निघुनच जायचं होतं पण तरिहि क्षणभर थांबलीस डोळ्यात आलेल्या पाण्याशीच कुजबुजलिस यु आर टू लेट ... यु फुल !
वाह, सुंदर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लौंगी मिरची
स
संजय क्षीरसागर Mon, 03/04/2013 - 19:44 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
प
प्रीत-मोहर Tue, 03/05/2013 - 04:26 नवीन
मला कवितेइतकच हेही भावल ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लौंगी मिरची
श
शब्दबम्बाळ Fri, 01/22/2016 - 09:47 नवीन
अतिशय सुंदर कविता आणि त्यावर आलेले एक से एक प्रतिसाद... मझा आ गया! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लौंगी मिरची
ध
धन्या Mon, 03/04/2013 - 16:17 नवीन
कवितेबद्दल काही लिहिण्यासारखं नाही. ही फक्त पोच एका सुंदर कवितेला.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Mon, 03/04/2013 - 16:27 नवीन
वरच्या नंबरवर ठेवण्यासाठी!! खरच खूप सुंदर कविता!!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 03/05/2013 - 00:46 नवीन
कितीदा वाचली. पण आत अस काही हुरहुरतय, की काही लिहावसच वाटत नाही.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 03/05/2013 - 05:33 नवीन
तरल गझलेच्या वळणाने जाणारी आहे - मस्त! खूप आवडली...
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 03/05/2013 - 05:40 नवीन
जबराट रोम्यांटिक झालीये राव Image removed. हायला कालेजात अशा कविता पोरींना ऐकवल्या असत्यास तर रे .... ;)
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 03/05/2013 - 07:11 नवीन
मस्त फोटो रे स्पाऊ.. या घे फोटोवरून काही ओळी.. माझी वाट पाहून नकळत. तू स्वतःला स्वतःच्या मिठीत घेतलेस.. तिथे रेंगाळणारा वारा थोडासा सुखावला. ओलसर वाळूमध्ये भिजणार्‍या तुझ्या नाजूक पाऊलांना पाहून चुकार लाटा अधीरतेने किनार्‍याकडे झेपावल्या.. त्या नाजूक ओलसर पाऊलांशी विरणारी एक लाट मागच्या लाटेला म्हणाली.. यु आर लेट यु फुल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
इ
इनिगोय Tue, 03/05/2013 - 09:48 नवीन
चेरी आॅन द केक..! मस्तच मूड पकडलास रे मोदका..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
प्रीत-मोहर Tue, 03/05/2013 - 09:58 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय
अ
अक्षया Tue, 03/05/2013 - 10:04 नवीन
अप्रतीम लिहिले आहे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा