Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

यु आर लेट यु फुल

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Mon, 03/04/2013 - 03:45
आज भेटायचे ठरले होते आपले किनार्‍यावर जरा लवकरच आलो अन् दूर उभा राहिलो . मी नसतांनाचा समुद्र आणि मी तुझ्याबरोबर नसतांनाची तू दोघांना बघायचे होते म्हणून . पण तू माझ्या आधीच पोहचली होतीस किनार्‍यावर, समुद्राकडे तोंड करून . मनात म्हटले, यु आर लेट यु फुल! . बेभान वाहणारा खारट वारा तुझ्या कुंतलात अडकून तुला छळत होता वाटले तुझ्या केसांमधून बोटे फिरवून त्याला मोकळे करावे पण इतक्यात तू मानेला एक मोहक झटका देऊन त्याला झटकलेस वाटले... यु आर लेट यु फुल! . तुझ्या पायाखालची वाळू तुझ्या कोमल पाऊलांना चिटकत होती तुला ती हुळहुळ सतावत होती वाटले पुढे होऊन ती झटकून द्यावी पण इतक्यात तू येणार्‍या लाटेत आपले पाऊल हळूवार वरचेवर घुसलळेस वाटले... यु आर लेट यु फुल! . समुद्र जरा रागावलेला वाटला, बहुदा माझ्यावरच तिला वाट पाहायला लावत होतो म्हणून असेल बहुतेक नाही,बहुदा तिच्या डोळ्यातला समुद्र जास्त सुंदर होता, म्हणून कदाचित माहित नाही नक्की काय ते पण त्याच्या लाटा अजूनच उग्रपणे किनार्‍यावर आदळत होत्या . कुठल्याशा अनावर ओढीने मी तुझ्याकडे सरसावलो तुझा हात धरून तुला मागे ओढले मला पाहताच तू लटक्या रागाने ओठांचा लोभस चंबू करत म्हणालीस . यु आर लेट यु फुल!! |- मिसळलेला काव्यप्रेमी -| टिपः हि कविता मी ऑर्कुटवर प्रसिद्ध केली होती, तिथुन उचलुन चेपुवरच्या 'पुण्याला पुणेच म्हणा' नावाच्या ग्रुप ने ती माझे नाव वगळून, मला न विचारता एक पेज बनवून त्यांच्या ग्रुप मध्ये प्रसिद्ध केली होती. त्यामुळे तुम्ही ती आधीच वाचलेली असण्याची शक्यता आहे. तिथे काही हजार लाइक्स आले होते, मला कळल्यावर, मी ती कविता त्या ग्रुपशी भांडून तिथुन काढायला लावली.

प्रतिक्रिया द्या
34447 वाचन

💬 प्रतिसाद (85)
स
संजय क्षीरसागर Tue, 03/05/2013 - 10:21 नवीन
मोदका, सिरियसली, ...मला वाटलं मिकानंच फोटोवर कविता केली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षया
म
मोदक Tue, 03/05/2013 - 16:19 नवीन
धन्यवाद हो संक्षी.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
स्पा Tue, 03/05/2013 - 07:14 नवीन
माय्ला मोदका ... तू पण मिका ,माझा पण क्लास घे रे आता
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 03/05/2013 - 10:04 नवीन
मस्त , खुप आवडली
  • Log in or register to post comments
श
शिद Tue, 03/05/2013 - 10:12 नवीन
प्रतिसाद देण्यास उशिर केला म्हणुन मीच मला म्हणतोय...यु आर टू लेट...यु फुल!!! अप्रतिम कविता...!!!
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 03/05/2013 - 11:20 नवीन
मिकाभाउ तुस्सी छा गये :)
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Tue, 03/05/2013 - 12:15 नवीन
भन्नाट....
  • Log in or register to post comments
श
श्रिया Tue, 03/05/2013 - 12:30 नवीन
वाह मिका वाह! काय सुरेख लिहिली आहे कविता.
  • Log in or register to post comments
व
विलासराव Tue, 03/05/2013 - 16:43 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया
S
Sujata Kulkarni Tue, 03/05/2013 - 20:01 नवीन
मस्त!! खरच छान!
  • Log in or register to post comments
अ
अनुजा कुलकर्णी Tue, 03/05/2013 - 20:05 नवीन
अप्रतिम. खूप आवडली आहे. धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 03/06/2013 - 04:02 नवीन
अतिशय सुंदर .... !
  • Log in or register to post comments
उ
उपास Wed, 03/06/2013 - 17:58 नवीन
आवडलीच..
  • Log in or register to post comments
म
मीराताई Wed, 03/06/2013 - 19:48 नवीन
आहा. फार सुंदर.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक गुरुवार, 03/07/2013 - 07:13 नवीन
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक गुरुवार, 03/07/2013 - 07:16 नवीन
कविताशी आपले कधी जमलेच नाही, पण असा मूड पकडणारी असेल तर आवडलीच :)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 03/17/2013 - 20:56 नवीन
खुपच सुंदर काव्य मिका
  • Log in or register to post comments
ह
हरिप्रिया_ Mon, 03/18/2013 - 12:04 नवीन
मस्त!! पुन्हा पुन्हा वाचली...
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Mon, 03/18/2013 - 12:50 नवीन
छानच!
  • Log in or register to post comments
ह
हारुन शेख Tue, 03/19/2013 - 07:07 नवीन
मनातले तरल भाव व्यक्त करणारी सुंदर कविता. प्रतिसादसुद्धा एकापेक्षा एक अप्रतिम.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Tue, 03/19/2013 - 16:50 नवीन
भारी
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 03/22/2013 - 05:48 नवीन
डिस्क्लेमर : मला काव्यप्रांतातलं शष्प काही कळत नाही हे जगजाहीर आहेच. पण तरीही मताची पिंक टाकण्याचा मोह आवरणं एक मनुक्ष्य म्हणून अशक्य झाले म्हणून पचकत आहे. :) मिक्या, बेट्या, कविता वाचल्यावर राहून राहून संदीप्-सलीलच्या गाण्यांच्या रचना असतात तशी असल्याचा फील येऊन राहिलाय भैय्या! का कोण जाणे, पण संदीप-सलीलच्या "पाऊस असा...." च्या चालीत ही कविता बसेलसं वाटलं :) चुभूदेघे!
  • Log in or register to post comments
अ
अर्थहीन Fri, 08/07/2015 - 11:50 नवीन
अहाहह... क्या बात है... हलुवार प्रवेश केला कवितेने मनात...
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 08/07/2015 - 12:05 नवीन
पुन्हा एकदा कट्यार काळजात घुसली! गवि, मोदक नि आणखी कुणीतरी ती आणखी आत रुतवली. ते मिक्या कवितासंग्रहाचं कधी डोक्यात घेतंय कुणाला माहिती. अर्थहीन या आयडीचे कविता वर काढल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Fri, 01/22/2016 - 08:30 नवीन
अरे वा इतकी सुंदर कविता. अप्रतिम. गविंप्रमाणेच चांगल्या कवितेला आमचंही ठिगळ.. प्राजक्त सड्यावर तु अस्ताव्यस्त पहुडलेली, ओंजळी भर फुलं तुझ्यावर उधळण्यासाठी हळुवार पावलांनी पुढे झालो, पण तिथेच रेंगाळणार्‍या वार्‍याने जोर केला अन् झाडावरची सगळी फुले तुझ्यावर बरसली, तुझ्या तनुवर विसावलेल्या , त्या फुलांनी हसुन वेडावत मला म्हंटले , यु आर लेट यु फुल!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 01/22/2016 - 09:14 नवीन
छान कविता, आवडली.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 01/22/2016 - 10:00 नवीन
!!!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 01/22/2016 - 11:50 नवीन
कविता वाचली होती, आवडलीही होती, पण प्रतिसाद द्यायला लेट झाला. मिका लिहितोच जीवघेणे. आजकाल मिकाशेठ कुठे गायबलेत कोणजाणे? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Fri, 01/22/2016 - 11:54 नवीन
कविता करण्याजोग्या अनेक भेटल्या पावसातही अनेक विकल्या पण जेव्हा ती भेटली तेव्हा मी नि:शब्द झालो काहीच न बोलता स्तब्ध झालो भानावर आलो तेव्हा ती निघून गेलेली अाणि उदासवाणा अासमंत मला म्हणाला यू आर लेट यू फूल! - (काव्याळलेला मिसळप्रेमी) बोका
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 01/22/2016 - 12:01 नवीन
पावसातही अनेक विकल्या
जेवढ्या भेटल्या त्या सगळ्या का विकल्या? एखादी स्वत:साठी ठेवायची ना. व्याजासकट डबल, ट्रिपल झाली असती आतापर्यंत गुंतवणुक. मराठी माणुस इथेच मार खातो पैजारबुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
मित्रहो Sat, 01/23/2016 - 15:59 नवीन
सुंदर कविता
  • Log in or register to post comments
स
सनईचौघडा Fri, 01/28/2022 - 17:17 नवीन
आज पुन्हा पाच वर्षांनी ही कविता वर काढतोय. जे मीपावर नवी आहेत त्यांना वाटायला नको की "यु आर लेट यु फुल " सध्या मिकाभाऊ कुठं गायबलेत कुणास ठाऊक?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 01/29/2022 - 05:06 नवीन
हा इसम सध्या कविता का बरे लिहीत नाही? लिहित असेल तर इकडे का टाकत नाही? हा प्रश्र्ण मलाही बरेच दिवसांपासून पडला आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनईचौघडा
श
श्रीगणेशा Sat, 01/29/2022 - 10:00 नवीन
खूप सुंदर! उशीरा का होईना पण वाचायला मिळाली. धन्यवाद सनईचौघडा, धागा वरती आणल्याबद्दल!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sat, 01/29/2022 - 21:25 नवीन
८ - ९ वर्षांनंतरही आपली एखादी कविता आपल्या मित्रांच्या लक्षात राहिलीय ह्याच खरंच खूप समाधान वाटतं. आताशा इतकं तरल सुचत नाही, पण सुचलं तर प्रथम इथेच घेऊन येणार मी.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा