Welcome to misalpav.com
लेखक: ढालगज भवानी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

घरी असताना रोज बापसाशी कचकून भांडणं व्हायची, पण ग्र्याज्युएशन झाल्यावर पुढं शिक्षणासाठी गाव सोडताना यष्टी ष्ट्यांडावर बसमध्ये बसतानाचा बापसाचा पाठीवरचा थरथरता हात, ओढलेला आवाज अन भिजले डोळे एकदम आठवले. आमच्या कडकसिंगला हे असं हललेलं पाहिलं ते तेव्हाच फक्त! :(

:( ढम्या वडीलांचं प्रेम आईपेक्षा वेगळच असतं ... दिसायला कठोर दिसतं .. पण जगातलं एकमेवं हळवं ... आई बडबड करुन काळजी दाखवते ... ते न बोलताच .... शुचि लेख छान आहे . आईला बर्‍याचदा उलटं बोलण्याची चुक केलीये :(

आम्ही आता साठ वर्षाचे झालो. वडील मित्रासारखे होते.पण शंभर टक्के मित्र म्हणता येणार नाही. आमची मैत्री १९६८ ते १९८९ या काळातली. आई मैत्रिणीसारखी पण शंभर टक्के मैत्रिण म्हणता येणार नाही. आमची मैत्री १९७५ ते २०१३ या काळातली/( नुकतीच इहलोकाची यात्रा संपविली तिने) एकूणच संस्कार या विषयात ९० टक्के वाटा ज्याचा त्याचा. १० टक्के श्रेय व अपश्रेय पालकांचे व परिसराचे असे माझे १००० टक्के मत झाले आहे.त्या ९० टक्यावर आपल्या जन्मजात " संचिता" चा फार प्रभाव असतो.म्हणूनच एकाच घरातील मुले त्याच वातावरणात वाढून सुद्धा वेगळ्या पिंडाची असतात. मी पिंड या कल्पनेला फार मानतो.

>>>नुकतीच इहलोकाची यात्रा संपविली तिने भावपूर्ण श्रद्धांजली. मृतात्म्यास सद्गती लाभो. (पूर्वी वाचलेल्या प्रतिसादांवरुन सुटल्या असेच म्हणावेसे वाटते. गैरसमज नसावा.)

२००८ मधे आलेला टेकन नामक इंग्रजी सिनेमा पालकांनी आपल्या शिंग फुटायला लागलेल्या पोरांना दाखवायचा. आपले वडील काही सी आय ए मधील "जेम्स बाँड" टाईप इसम नाही हे पोरांनी ओळखले असतेच, त्यामुळे आपसूक आई-वडील सूचना आपल्या भल्याकरता देतात हे त्यांना कळेल.

आमचे चिरंजीव, वय वर्षे साडेतीन, आतापासुनच आम्हाला मॅच्युअर्ड प्रौढत्व वगैरे बहाल करायला निघालेत. अगदी रोज, काय अर्धवटराव- कसं वाटतय बापाच्या भुमीकेतुन तुमचच बालपण... असा प्रश्न निदान एकदा येतो. आम्हि बापाला अतोनात छळलं. पण आमचा बापुस असा प्राणि आहे कि जणु आम्हाला प्रत्येक वेळी माफ करत राहावे व आमच्यावर प्रेम करत राहावे यासाठीच त्याचा जन्म. ज्यु. शिशुपाल इतके अनंत अपराध क्षमा करुन घ्यायचे वरदान घेऊन आलेले नाहित हे निश्चित. पण हे ही खरं, कि आम्हि बालपणी आमच्या चिरंजीवांइतके गोण्डस नसणार. बघु... पाळण्यातले पाय पुढे काय काय नृत्य करतील ते. ढालगज शुचे, मर्मबंध अगदी फस्ट्क्लास उतरला हो. मिपाकर अबोलींकडे बघुन तुम्हासर्वांबद्दल अगदी १००% आशावादी आहे मी. आयला... एव्हढं मीपाचं रण गाजवता... मग या तर आपल्याच कळ्या... त्या निश्चितच उत्तम उमलतील व आयुष्य सुगंधी करतील. अर्धवटराव