आवं ढेरे साहेब, आपला प्रश्न एकदम बरोबर आहे. पण, एकदा मावेओत हे पदार्थ जमायला लागले की मग जीवनसत्त्वांवर परिणाम होतो का ? माणसावर त्याचा परिणाम होतो का ? वीज बील किती येते ? मावेओचे संभाव्य धोके ? असं टप्प्या टप्पानं चर्चा पुढे नेऊ असे वाटते, काय म्हणता ?
-दिलीप बिरुटे
अतिशय कमी. खरं तर मा वे ओ ने अन्नद्रव्यांचा र्हास सर्वात कमी होतो
खालील दुवे पहा
http://www.health.harvard.edu/fhg/updates/Microwave-cooking-and-nutrition.shtml
http://www.arimifoods.com/microwave-oven-kills-nutrients-%E2%80%93-who-should-we-believe-part2/
मित्र हो, आत्ता सकाळी (भ्राप्रवे) ला मस्त पोहे मावेओत करता आले. पोहे खातांना कोण आनंद झाला काय सांगू. आपण म्याट्रीकला चांगल्या मार्कानं पास झालो तेव्हाची त्या आनंदाची आठवण झाली.
सर्वप्रथम शेंगदाणे क्वीक मोडमधे म्हणजे एक मिनिट चांगले भाजून घेतले. गळाबंद काचेच्या भांड्यात तेल, जीरे,मोहरी,कांदे, मिरची,कढीपत्ता दोन मिनिटे मायक्रो मोडमधे फोडणी दिली.
फोडणी दिलेल्या भांड्यात भिजवले पोहे, शेंगदाणे, ह्ळद,मीठ, टाकून मायक्रोमोडमधे पाच मिनिटे ठेवले. मित्र, हो पोहे तयार. एकूणच काय आपल्या प्रतिसादांनी 'कुछ करणे की चाहत' निर्माण झाली. आपलं मला माहिती नाही. पण, मावेओचं दडपण सालं निघून गेलं.
मात्र गेल्या दोन तीन दिवसात मासे आणि चिकनपीस मात्र मस्त पैकी तांबूस होतील असे भाजता आले नाहीत. नॉनव्हेज अॅटम फसू लागले आहेत. असो....! यापुढेही, मायक्रोवेव्ह ओव्हन्समधे काही प्रयोग केला, यशस्वी झाला, फसला तर त्या पाककृतीच्या सुख दु:खाच्या गोष्टी तुम्हाला नै सांगायच्या तर मग कोणाला सांगायच्या नै का... तेव्हा सवडीनं सर्वं सांगेनच.
-दिलीप बिरुटे
मोबाईल अजिबात चालू नव्हता त्याला चार्जींगला लावल्यामुळे फोटो काढता आले नाहीत पण फोटो हवेच होते, असे मलाही वाटत होतं. पुढल्या वेळी फोटो काढेन.
मन की बाते. : प्राडॉ. वल्लीशेठ तुमच्यावर अविश्वास तर दाखवत नाही ना.... ;)
-दिलीप बिरुटे
पाककृतीला फोटो हे पाहिजेच. कोरड्या पाककृत्यांना मजा नाही.
आपण अनेकदा पाककृतींना फोटोची मागणी करतो ती यासाठीच.
बाकी, अविश्वासाची नुसती गम्मत. :)
@ पैजार बॉ, कौतुकाबद्दल धन्स. अजून खूप शिकत राहू....!!!
-दिलीप बिरुटे
>>>चला, गंगेत घोड न्हायल.
आज रव्वार आहे, तुम्हाला काय माहिती? 'घोडं' अजून आळसावलेलंच असेल ;)
मावेओ मधले पोहे मस्त लागतात.
-सासुरवाडीहून 'सप्रेम' मिळालेल्या मावेओ चे पोहे खाल्लेला प्यारे ;)
आपली शंका बरोबरच असेल पण मी केलं ते असंच केलं. अधिक वेळ दिला पाहिजे याच्याशी सहमत.
पोहे आणि अन्य पाककृती करणार्यांनी फोडणीसाठी किती वेळ आणि कोणता मोड वापरला पाहिजे, त्याची जर माहिती दिली तर आनंद वाटेलच.
-दिलीप बिरुटे
मासे आणि चिकनपीस मात्र मस्त पैकी तांबूस होतील असे भाजता आले नाहीत.
काँबी मोड वापरून पहावा. मावे मोड अन्न आतपर्यंत खोलवर समप्रमाणात शिजवतो पण अन्नाचा रंग बदलत नाही. कन्व्हेक्शन मोड अन्नपदार्थांचा बाहेरचा थर जास्त गरम करतो आणि त्यांला तांबूस रंग आणतो (ब्राउनींग) व खरपूस (क्रिस्प) बनवतो. काँबी मोड मध्ये माओ आणि कन्व्हेक्शन हे दोन्ही मोड वापरत असल्याने दोन्हींचा फायदा मिळतो.
ब्राउनिंग न केल्यास उत्तम शिजलेले पदार्थही दिसायला कच्चे असल्यासारखे "दिसतात". त्यामुळे काँबी मोड मांस-मासे यांना विशेषतः उपयुक्त आहे.
तुमच्या माओ प्रयोगांना शुभेच्छा !
फोटो बघणेच्छूक...
दोन्ही ओव्हन कशापद्धतीने पदार्थ गरम करतात/शिजवतात हे लक्षात घेतल्यास 'काँबिनेशन' का, कसे, किती आणि केंव्हा वापरावे हे ठरवता येते.
मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये ठराविक किरण पदार्थावर पडून त्या पदार्थातील सूक्ष्म जलबिंदूंना इतक्या जोरात घुसळतात की ते एकमेकांवर घासून उष्णता निर्माण होते. हे पदार्थाच्या संपूर्ण वस्तुमानात एकाच वेळी होत असल्याने पदार्थ थेट आंत पासून गरम होतो/शिजतो.
पारंपारीक (कन्व्हेक्षन) ओव्हन मध्ये, गरम झालेल्या कॉइलवरून आलेल्या गरम लाटा आतील पंख्यामुळे पदार्थाच्या संपर्कात येतात. आणि विज्ञानाच्या उष्ण्तेच्या नियमानुसार उष्ण हवेच्या संपर्कात आलेला पदार्थाचा सर्वात बाहेरचा थर प्रथम तापतो आणि अतिरिक्त उष्णता पुढच्या (आंतील) थराकडे पाठवितो, तसा तो आतला थर तापू लागतो. ही साखळी पदार्थाचा सर्वात आंतील थर तापे पर्यंत चालू राहाते आणि पदार्थ शिजतो.
आधीच शिजलेला पदार्थ 'ब्राऊनिंग्' साठी कन्व्हेक्षन मोडमध्ये ठेवला जातो.
ह्यात उष्णतेची पातळी किती ठेवली आहे ह्यावर शिजलेल्या पदार्थाचे 'ब्राऊनिंग' अवलंबून असते. एका थराकडून दुसर्या थराकडे उष्णता पाठविण्याच्या वेगापेक्षा, येणार्या उष्णतेचा वेग जास्त असेल तर बाहेरचा थर जास्त शिजून 'करपू' लागतो. ते 'करपणे' नियंत्रीत ठेवून पदार्थ आपल्याला पाहिजे तेवढाच करपविणे म्हणजेच 'ब्राऊनिंग'. गॅसच्या किंवा कोळशाच्या शेगडीवरही ह्याच नियमाने पदार्थ शिजतो, करपतो, जळतो. बार्बिक्यू करताना बार्बिक्यू शेगडीत कोळशांची रचना कमी आणि भरपूर अशी दोन विभागात करतात. कमी कोळशांच्या विभागात चिकन शिजते. कारण येणारी उष्णता आणि पुढच्या थराकडे हस्तांतरीत होणारी उष्णता ह्यांचा वेग समान असतो त्यामुळे चिकन करपण्याआधी उष्णता पुढच्या थराकडे गेल्याने चिकन करपत नाही. पण चांगले आंत पर्यंत शिजते. ते तसे शिजल्यावर जास्त कोळशांच्या विभागावर ठेवले जाते. इथे येणार्या उष्ण्तेचा वेग हस्तांतरीत होण्यार्या उष्णतेच्या वेगापेक्षा जास्त असतो त्यामुळे चिकन बाहेरून 'ब्राऊन' होऊ लागते.
'ब्राऊनिंग' का होते?
प्रत्येक पदार्थात साखरेचा अंश असतो. अति उष्ण्तेने, उष्णतेच्या संपर्कातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन साखरेला उष्णता मिळते. आणि त्या साखरेचे 'कॅरमलायझेशन' होऊ लागते. 'कॅरमलायझेशन' प्रक्रियेत साखरेचे रुपांतर कार्बनमध्ये होते ते किती प्रमाणार झाले आहे त्या नुसार 'बाऊन' ते 'ब्लॅक' असा रंगाचा प्रवास असतो. तोच आपण नियंत्रीत करत असतो.
ह्या प्रक्रियेसाठी उष्णता १४० अंश सेंटी पेक्षा जास्त असावी लागते.
मायक्रोवेव्ह मोडवर ब्राऊनिंग का होत नाही?
मायक्रोवेव्हचे कार्य वर सांगितल्याप्रमाणे पदार्थातील जलबिंदूंना घुसळण्याच्या प्रक्रियेतून होते. पाण्याचा गुणधर्म म्हणजे १०० सेंटी ला पाण्याचे वाफेत रुपांतर होते म्हणजे पाणी १०० सेंटीच्या वर तापू शकत नाही. आणि कॅरमलायझेशन प्रक्रिया १४० सेंटीच्या पुढे सुरु होते. त्यामुळेच पाण्यात बटाटा फक्त शिजतो. पण तेलात शिजतो सुद्धा आणि ब्राऊन सुद्धा होतो. कारण तेलाची उष्णता १४० सेंटीच्या वर जाऊ शकते. (उत्कलन बिंदूतील फरक).
ह्या प्रक्रियेची कारणमिमांसा मायलार्ड नांवाच्या कोणी शास्त्रज्ञाने शोधून काढली त्यामुळे ह्या प्रक्रियेला 'मायलार्ड प्रक्रिया' असेही म्हणतात.
सुरवातीला तंदुर प्रकार करुन बघितले. पदार्थामधिल अंगचा ओलावा नष्ट झाल्याने पदार्थ चिवट/ रबरी झाले होते.
हॉटेल सारखे रसदार/लुसलुशीत तंदुरी कबाब कसे करायचे?
कुठला पदार्थ केला होता?
आंच कमी ते मध्यम असावी. प्राथमिक शिजल्यावर पदार्थ बाहेर काढून त्यावर बटर किंवा तुप लावावे. अशाने बाहेरील थर शिजून पदार्थातील नैसर्गीक ओलावा टिकून राहतो. ही बटर किंवा तुप लावण्यची प्रक्रिया २ ते ३ वेळा करावी लागते.बटर/तुप इ.इ. बरोबर मधून मधून जे उरलेले मॅरिनेशन असते त्याचेही थर द्यावेत. त्यानेही पदार्थातील पाणी शिल्लक राहुन पदार्थ शिजतो पण चिवट होत नाही.
कोळशाच्या शेगडीवर बार्बिक्यू करताना शेगडीत भरमसाठ कोळसे घालू नये. आवश्यक असतील तेवढेच घालावेत. जसजसे कमी होतील तसतसे वाढवावे. निखार्यापासून पदार्थ ६ इंच वर असावा.
अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या आंतरजालावरून सतत प्रसिद्ध होत असतात. त्यांना साध्या इंग्लिशमध्ये होक्स (hoax) म्हणतात. अशा बातम्या बर्याचदा इतक्या शास्त्रिय वाटतील अशा प्रस्तावित केलेल्या असतात की सर्वसामान्य जनता त्याला सहज बळी पडून बकरा बनतात. बर्याचदा अशा बातम्यांचा लोकांना उल्लू बनवणे हाच उद्देश असतो. पण त्यातल्या काही, विशेषतः आरोग्याशी संबद्धीत असलेल्या होक्सवर विश्वास ठेवणे धोकादाय ठरू शकते.... तेव्हा सावधान !
हा प्रकार इतका बोकाळला आहे की याच्या विरोधी अनेक अँटी-होक्स संस्थळे आहेत जी शास्त्रीय कसोटीवर अशा बातम्या तपासून त्यांचे खरेखोटेपण प्रसिद्ध करतात. नमुन्यादाखल वरच्या वरच्या बातमीची शहानिशा करणारे एक संस्थळ :
museum of hoaxes
internet hoaxes हे कीवर्डस् वापरून शोध घेतल्यास अजून अशी अनेक होक्सबस्टर संस्थळे सापडतील.
एक्का काका, तुमच्या मताशी मी काही प्रमाणात सहमत आहे.बर्याचदा दुवा देताना तो योग्य माहितीचा आहे का हे पहायला हवे आणि हा विचार अनेकवेळा माझ्या मनात डोकावतो... इंटरनेटवर योग्य आणि खात्रीशीर माहिती शोधणे हल्ली कठीण होत चालले आहे,वॄत्तपत्र्,वॄत्तवाहिन्या या वरील दुवे ग्राह्य धरले जातात्,पण इतर माहिती देताना ती योग्यच असेल असे सांगणे कठीण आहे.
आत्ता या मायक्रोव्हेव विषयावर अनेक माहिती जालावर उपलब्ध आहे,अगदी विकीपिडीयावर सुद्धा.पंरंतु कुठली माहिती कितपत पूर्ण आहे हे सांगणे कठीण्,कारण यात सातत्याने भर पडत असते...
www.huffingtonpost.com या संकेस्थळावर मायक्रोव्हेव संबंधी माहिती आहे,ती सुद्धा एका डॉक्टर ने दिलेली,मग विचार केला की हा डॉक्टर सुद्धा होक्स आहे का ? कारण इंटरनेटवर नुसत्या माहितीचा नव्हे तर व्यक्तींच्या प्रोफाइलचा होक्स असु शकतो,किंवा ती व्यक्ती सुद्धा होक्स असु शकते,ज्या संस्थळावरुन माहिती आपण वाचतो तेच किती सत्य माहिती सांगते या विषयी कुठेतरी माहिती मिळायला हवी...huffingtonpost.com या संस्थळा बाबत अजुन तरी मला तशी माहिती मिळवता आली नाही.
आता या संस्थाळावरील दुवा देतो:-
http://www.huffingtonpost.com/dr-mercola/microwave-cancer_b_684662.html
जालावरील योग्य माहितीचा पडताळा कसा केला जावा ? किंवा या विषयी कुठे अधीक माहिती मिळेल ?
जाता जाता :- होक्स साईट सुद्धा मिळणारी माहिती कितपत सत्य असु शकते असा सध्या विचार मनात डोकावत आहे.
अरे लेका, दुष्परिणाम कशाचे होत नाही ते एकदा सांग बरं....!!!
आम्ही आता ओव्हन्समधे पापड भाजण्याच्या पुढे चाललो आहोत हे काय बघवेना का तुम्हाला. :)
-दिलीप बिरुटे
दुष्परिणाम कशाचे होत नाही ते एकदा सांग बरं....!!!
हॅहॅहॅ... ;)
अवांतर :---
मनुष्य प्राणी ज्या वेगाने निसर्गाचा र्हास करतोय्,आणि त्याच्या पासुन वेगाने लांब जातो आहे... तेव्हा कशा कशाचे दुष्परिणाम येणार्या मानव जातींच्या पिढीला भोगायला लागतील ते सांगणे कठीणच !
जाता जाता :---
सर जर वेळ मिळाला तर या वेगळ्या विषयावर सुद्धा वाचा.
REPORT ON CELL TOWER RADIATION
प्रतिक्रिया
सूधा कुलकर्णी ह्यांचेच
माओचा पदार्थतल्या
बरोबरच आहे.
म्हण्जे इंचा इंचाने धागा पुढे
माओचा पदार्थतल्या जीवनसत्वांवर विपरीत परिणाम
कळविण्यास प्रचंड आनंद वाट्तो की.....
फोटू कुठायत?
सॉरी
नै नै.
१००% सहमत.
अरे हो!!!!!!!!!
चला, गंगेत घोड न्हायल.
>>>चला, गंगेत घोड न्हायल.
हे नुसताच मायक्रोवेव्ह कि
आपण बरोबरच असला...
मी अजुन मायक्रोवेव्ह मधे एकही
अभिनंदन..
मासे आणि चिकनपीस मात्र मस्त
मासे आणि चिकनपीस मात्र मस्त पैकी तांबूस होतील असे भाजता आले नाहीत.काँबी मोड वापरून पहावा. मावे मोड अन्न आतपर्यंत खोलवर समप्रमाणात शिजवतो पण अन्नाचा रंग बदलत नाही. कन्व्हेक्शन मोड अन्नपदार्थांचा बाहेरचा थर जास्त गरम करतो आणि त्यांला तांबूस रंग आणतो (ब्राउनींग) व खरपूस (क्रिस्प) बनवतो. काँबी मोड मध्ये माओ आणि कन्व्हेक्शन हे दोन्ही मोड वापरत असल्याने दोन्हींचा फायदा मिळतो. ब्राउनिंग न केल्यास उत्तम शिजलेले पदार्थही दिसायला कच्चे असल्यासारखे "दिसतात". त्यामुळे काँबी मोड मांस-मासे यांना विशेषतः उपयुक्त आहे. तुमच्या माओ प्रयोगांना शुभेच्छा ! फोटो बघणेच्छूक...कार्यपद्धती...
काका सविस्तर प्रतिसाद आवडला
काही मुलभूत नियम.
धन्यवाद काका
नॉनव्हेज अॅटम फसू लागले आहेत
विजेच्या बिलावर लक्ष ठेवणे
मायक्रोवेव्हचा वापर शक्यतो
ही होक्स आहे...
एक्का काका, तुमच्या मताशी मी
अभी खेल शुरु नै हुआ तो खेल खतम करणेक्या बाता....
दुष्परिणाम कशाचे होत नाही ते
Pagination