Welcome to misalpav.com
लेखक: प्रभाकर पेठकर | प्रसिद्ध:


Comments

ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड मधून निर्यात केलेल्या मेंढीच्या मांसाचे दोन प्रकार आहेतः अ) लँब : एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मेंढीचे मांस. हे सर्वोत्तम. मउ, शिजायला सोपे आणि चवीला जास्त चागले असते. आ) मटन : एक वर्षापेक्षा जास्त वयाच्या मेंढीचे मांस. हे जरा जून म्हणून जरा वातड आणि शिजायला कठीण असते. (चला नवीन नवीन मिळालेले ज्ञान पाजळून झाले ;) )

पेठकरशेठ, आम्ही तुमची रेसेपी वापरून मटन रोगनजोश केलं..... आणि ते झकास झालं!!!!! हां, हां फोटो दाखवतोच, पण त्याआधी ही गुरुदक्षिणा स्वीकारा!! :) pic1 आधी थोडं काहीतरी अ‍ॅपेटायझिंग हवं ना, म्हणून ही फ्रेंन्च पिनोन्वा आणि चेरीज!! :) आता रोगनजोश कडे बघू... . मस्त लालभडक झालं होतं. मटण शिजलंही लवकर आणि यथास्थित. इतकं दही होतं ना त्यात!!! असं हे मटण, ऑनियन कुलचा, सलाड वगैरे खाऊन भोजन संपन्न झालं!!! . रेसेपीदाता सुखी भव!!! :) बाकी तुमचं म्हणणं बरोबर आहे, ऑस्ट्रेलियन मटणात फॅट जास्त असते, मी ती बरीचशी काढून टाकतो. परिणामी ते मटण साफ करायला दुप्पट वेळ लागतो. पण आमच्याइथे भारतीय स्टाईल मटणापेक्षा हे मटण चांगल्या क्वालिटीचं असतं. भारतीय बकर्‍याचं इथे मिळणारं मटण मला फारसं आवडत नाही. (तसे मिपावर भरपूर बकरे गावतात, पण नीलकांत 'बिस्मिल्ला' करायला परवानगी देत नाही!! हा हा हा!!!) सरतेशेवटी: रेसेपी तर झकासच आहे, रंग, चव, टेक्स्चर मस्त आहे. मला, माझ्या चवीला तिखट जरा कमी वाटलं. म्हणून पुढच्या वेळेस या काश्मिरी मिरचीबरोबरच आपली तिखट मिरची थोडी टाकायचा मानस आहे. म्हणजे बोकडाला आपला उगाच हकनाक बळी गेला असं वाटायला नको! :)

पिवळा डांबिस साहेब, ह्या मैफिलीला हजर राहू शकलो नाही, त्याने हृदयात एक बारिकशी कळ येऊन गेली. असो. गुरुदक्षणा कसली? मित्रप्रेमाचे 'टोकन' म्हणूया. ते पावले. पुढच्या खेपेस तिखट कराच. जास्त मजा येते.

चचाजान, अरे काय फोटो टाकलाय...व्वा!!!! स्वगतः च्यायला! लवकरात लवकर वेष्टकोष्टाला स्थलांतर करायलाच हवं आता. ;) अवांतरः वाडग्यात मटण दिसतंय, नळी क्कुठाय?

आधी हसून घेते. आणि मग वाट बघते.

काय तो रंग, काय ते दिसणं.... साला दिल खुश होऊन गेला नुसता फोटो पाहूनच :) आता, ह्या विकांताला इकडे कोणीतरी अन्नपुर्णा / बल्लवाचार्य शोधणं आलं! ;) - (आयतोबा) ध.