Welcome to misalpav.com
लेखक: सुज्ञ माणुस | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

देवाचे नाव घेऊन उरलेले त्राण गोळा करून मग मी जे काही अशक्य हातपाय झोडले ते पाहून पिसाळलेल्या गाढवाला सुद्धा 'कॉम्प्लेक्स' आला असता. आता स्वतः "विश्राम" करत लोकांना सावधान करण्याचे काम करतोय ते काय वाईट.
कहर जमलंय!!!!!!!!!!! कमाल!!
"आयुष्यात दोन गोष्टी एकदा शिकल्या की त्या आपण कधीच विसरत नाही. त्या म्हणजे सायकल चालवणे आणि पोहणे." हे वाक्य माझ्या बाबतीत मात्र चुकीचे ठरले होते.
हे माझ्या पण बाबतीत चुकीचं ठरलंय.

आंतरजालावर पहिल्यांदा वाचला! मस्त अवलोकन, उत्कृष्ठ पंचेस आणि लाजवाब यूटर्न मारणारे जोक्स! टायटल पासून शेवटच्या वाक्यापर्यंत फुल टू धमाल लेखन. असाच लिहीत राहा!

आज इतक्या वर्षांनीही पोहणे विसरलेलो नाही. पण पाठीवर भोपळा बांधला की माणूस तरंगतो आणि पोटाचा भोपळा झाला की बुडू लागतो हा नवा अनुभव हल्लीहल्लीच घेतला. लेख/ अनुभवकथन मस्त खुसखुशीत झाले आहे.

खुसखुशीत शैलीतले अनुभवकथन आवडले. काही वर्षांपूर्वी पोहणे शिकण्याचा प्रयत्न अर्धवट सोडला असल्याने तुमचा अनुभव समजू शकतो.