तिला पाऊस खूप आवडतो..
आणि मला पावसात ती.
तिला भिजायला खूप आवडते..
आणि मला भिजलेली ती.
मला खूप आवडते ती..
पण तिला नाही आवडत मी.
म्हणून खड्ड्यात गेला पाऊस आणि खड्ड्यात गेली ती!!!! :-D
ओल्ड बट गुड वन!
भर्तृहरी साहेबांच्या या श्लोकाची आठवण झाली.
यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता - जिचे मी सारखे चिंतन करतो ती माझ्याबद्दल विरक्त आहे.
साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्त:। - तीही दुसर्या एकावर प्रेम करते ज्याचे अजून दुसरीवर प्रेम आहे.
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या - माझ्यासाठीही दुसरीच एकजण झुरतेय.
धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च ॥ - धिक्कार असो तिचा(तरुणी क्र. १), त्याचा, कामदेवाचा, हिचा (तरुणी क्र. २) आणि माझाही!!
है की नै चपखल ;)
फायनल अपडेटः चौरपंचाशिका मध्ये ८५ नसून ५० श्लोक आहेत. कुठे डुलकी मारली होती दिमागाने कोण जाणे.
संस्कृत काव्याची लिंक.
याचे मराठीत भाषांतर करणारे कवी म्हणजे श्री. विठ्ठल बीडकर हे होत. (इ.स. १६२८-१६९०)
मराठी विश्वकोषातली विठ्ठल बीडकरांची लिंक.
या मराठी भाषांतराला बिल्हणचरित्र असे नाव आहे. मूळ संस्कृत काव्य रचणारा कवी बिल्हण होय. महाराष्ट्र सारस्वतात याच्या अर्ध्या भागाचे भाषांतर दिलेय.
त्यासंबंधीची महाराष्ट्र सारस्वतातील लिंक.
अजून शोध घेता घेता कळाले की ज्येष्ठ मिपाकर श्री. शरद यांनी यावर ऑलरेडी एक लेख मिपावर लिहिलाय अन माझ्या सुरुवातीच्या उत्खननसत्रात मीही कधीकाळी त्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. तस्मात या विषयावरती पुन्हा लेख लिहून रिपिटिशन नको करायला.
शरद यांच्या मिपावरील लेखाची लिंक.
सो लोकहो, मराठी भाषांतर पहा अन एंजॉय ;) :D :D
वटवाघुळ मानवा... पळवाट शोधुन नकोस ! भाषांत देण्याचे कष्ट घ्या.
बाकी चौरपंचाशिका मधे पहिल्याच श्लोकात माझ्या नावाची यंट्री दिसली ! ;) बा द वे पीनस्तनीं म्हणजे काय रे ब्यॅटॅ ?;)
मगनबाण साहेब, शरद यांच्या लेखाची लिंक दिलीय की वर, त्यात जवळपास १५-२० "महत्वाच्या" श्लोकांचे वर्णन आल्रेडी आहेच.
अन पीन च्या अर्थाचा दुवा इकडे पहा. काये ना, अर्थ सरळ लिहिले की संस्कृतिरक्षक ब्रिगेडकडून आरडाओरडा सुरू होतो उगीच. काव्यशास्त्रविनोद राहिला बाजूला, नैतिकता अन शिष्टाचाराचे काढे उकळून पाजले जातात. त्यापेक्षा लिंक देतो, कळेलच.
प्रतिक्रिया
तिला पाऊस खूप आवडतो..
ओल्ड बट गुड वन!
भर्तृहरी रॉक्क्स्स्स !!
भर्तृहरी इंडीड रॉक्स!!!!
@म्हणून खड्ड्यात गेला पाऊस
@धिक्कार असो तिचा(तरुणी क्र.
जबरी... शाळेत संस्कृतमधील
फायनल अपडेटः चौरपंचाशिका
ऊप्स लिंका गंडल्या. पुन्हा
स्वस्त्री घरात नसता
वटवाघुळ मानवा... पळवाट शोधुन
मगनबाण साहेब, शरद यांच्या
<a href="http:/
च्यायला या लिंकच्या.
वरच्या दुव्या बद्धल धन्स !
च्यायला-वाल्या लिंकमधल्या
वाघुळराव
भारी ! (y)
जबरी लेखन. :)
अता
कशाला नुसती आठवण!
ब्याटम्यानला परत बोलवा!
= ?
खलु युक्तमेव कथितं गामामल्लेन
Pagination