तिने एग हलवा नावाने समोर ठेवून निदान हे तरी चालेल का? असे विचारले. त्यावेळी तो पदार्थ खरेच शिर्यासारखा दिसला. त्यात आंबा घालून कशी चव येईल हा विचार तुझ्या मनात आला.......ग्रेट! ;)
निदान अंडाकरी खात असते तर सोयीचे झाले असते असे वाटले म्हणून सवय करतीये.
अजिबात पटले नाही. दुसर्याच्या सोयीसाठी आपली तत्त्व, आहारपद्धती बदलू नये. हां एवढे करता येईल की ह्या अनुभवातून धडा घेऊन, पुन्हा कोणी अनोळखी व्यक्तीने जेवावयास बोलाविले की आपण 'शुद्ध शाकाहारी' आहोत हे ठासून सांगावे. शाकाहारी असण्याचा अभिमान बाळगावा. मांसाहार करीत नाही म्हणजे आपल्यात कांही कमी आहे, दोष आहे असा न्यूनगंड बाळगू नये.
>>> शाकाहारी असण्याचा अभिमान बाळगावा. मांसाहार करीत नाही म्हणजे आपल्यात कांही कमी आहे, दोष आहे असा न्यूनगंड बाळगू नये.
आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत असा शाकाहार्यांना जाज्वल्य अभिमान असतो. तसाच अभिमान मांसाहार्यांनाही असतो व शाकाहार्यांबद्दल एकप्रकारची तुच्छता असते.
एक गंमत आठवली. मी विद्यापीठात शिकत असताना तिथल्या संगणक प्रयोगशाळेच्या खोलीच्या कुलुपाची किल्ली हरविल्यामुळे दुसरी बनवून घेतली होती. ती किल्ली वापरायला थोडीशी अवघड होती. एका विशिष्ट ठिकाणी दाब देउन फिरविल्यानंतरच ते कुलुप उघडत असे. तिथल्या शिपायाला ती नवीन किल्ली वापरण्याची सवय होती. एकदा मी व २-३ मित्र संगणकावर असाईनमेंट करण्यासाठी गेलो असताना सर्वांनी बरीच खटपट करूनसुद्धा कुलुप उघडत नव्हते. शेवटी त्या शिपायाला बोलविल्यावर त्याने सवयीने ते एका सेकंदात उघडून दिले. त्यावेळी तो आमच्याकडे तुच्छतेने बघत म्हणाला, "त्याच्याकरता मटण खायला लागतं.". %) आता मटण खाण्याचा आणि कुलुप उघडण्याचा काय संबंध होता?
त्यानंतर तो जेव्हा जेव्हा समोर येई तेव्हा तेव्हा आम्ही त्याची टिंगल उडवून म्हणत असू, "तुम्ही काय बाब्बा, मटण खाणारी माणसं"!
शरीरबळाचा अन मटणाचा बादरायण-की मटनायण- संबंध कैकवेळेस उगीचच जोडल्या जातो. हे वरणभात खाऊन होत नाही इ.इ. डायलॉग नेहमीचेच असतात. पण वरणभातवाल्यांनी कधी कशात मात दाखवली की वरणभातमहात्म्य सांगावे-लै मजा येते =))
एकदा एका रेल्वे गाडीने एक मद्रासी आपली पत्नी आणि ८-१० मुलांसमवेत प्रवास करीत असतो. डब्यात शिरल्यावर आपल्या आरक्षित जागेवर स्थिरस्थावर होण्यास किंचित वेळ लागतो तो पर्यंत गाडी सुटते. तो आपली मुले मोजतो तर एक मुलगा स्थानकावरच राहिल्याचे समजते. तो घाबरतो. गाडी तर सुटलेली असते. तो उठतो आणि गाडी थांबविण्याची साखळी ओढू लागतो पण त्याची ताकद कमी पडते गाडी काही केल्या थांबत नाही. समोर एक सरदारजी बसलेला असतो. तो उठून उभा राहतो आणि मद्राशाला बाजू करून नुसत्या डाव्या हाताने साखळी ओढतो. गाडी करकचवून ब्रेक लावत थांबते.
सरदारजी मद्राशाला म्हणतो, 'गोश्त (मटण) खाओ. ताकद आएगी।
मद्राशी आपल्या मुलाला घेऊन येतो. तो पर्यंत गार्ड येतो डब्यात आणि विचारतो, 'चेन किसने खिंचा?'
सरदारजी म्हणतो, ' मैने खिंचा। इसका बच्चा रह गया था प्लॅटफॉर्म पर।
गार्ड म्हणतो 'ठीक है।' आणि जातो.
सरदारजीच्या, आपल्या अंगी कमी ताकद असल्याच्या, उच्चाराने मद्राशी दुखावलेला असतो.
गाडीने जरा वेग पकडल्यावर मद्राशी परत तिरीमिरीत उठतो आणि साखळी ओढायचा प्रयत्न करतो. अर्थात, त्याला जमत नाही.
सरदारजी उठतो आणि पुन्हा डाव्या हाताने साखळी ओढतो. गाडी करकचून ब्रेक लावत थांबते.
गार्ड येतो.
'चेन किसने खिंचा?' विचारतो.
'मैने खिंचा जी।'
'क्यूं' गार्ड विचारतो.
सरदार गडबडतो. मद्राशाकडे पाहतो. मद्राशी खिडकीतून बाहेर पाहात बसतो. काही बोलत नाही.
गार्ड सरदारजीला रु. २५०/- दंड ठोठावतो आणि जातो.
गार्ड गेल्यावर गाडी सुरु होते.
सरदारजीला मद्राशी म्हणतो, 'सांभार खाओ। अकल आएगी।'
२००४ साली महाशिवरात्रीला रात्री फ्रांस मधील एका खेड्यात जेवायच्या वेळेला दुकान/हॉटेलातला इसम कोलंबी/कोंबडी/पोर्क/बीफ ह्यापैकी काय हवे असे विचारात होता...मी आणि माझा बॉस हतबलतेने चिकन घेऊन जठराग्नी शांत करत होतो...अत्यंत अपराधी मानाने परमेश्वराची क्षमा मागून आयुष्यातले सगळे उपास/तापास खाण्यापिण्याची कोणतीही बंधने नं पाळण्याचे ठरवले ते आजतागायत...
माणूस सोडून सगळे मी व्हेज मानतो आणि ते व्हेज खायला मी काळ-वेळ काहीच पाळत नाही. सरपटणाऱ्या प्राण्याकडून एक गोष्ट शिकलो की "समोर आले की गिळा, ते काय आहे, कसे लागते याचा विचार नंतर करा, पोटातली आम्ले ते खाणे कसे पचवायचे ते बघून घेतील" ;)
ल्हानपणी एकदा घरी आई नसताना, कार्तिकी एकादशीला वडीलानी स्वतःचे पाक कौशल्य पणाला लावून अन्डा करी, ऑम्लेट, फ्रेन्च टोस्ट असे नानाविध प्रकार बनवून मला व माझ्या भावाला खाउ घातल्याचे चान्गले आठवते. घरी माउली आल्यावर वडिलान्च्या पाक कौशल्याने प्रभवित होउन समग्र वर्णन केले. पुढे काय झाले असेल ते आपण सूज्ञ जाणताच. पण आज इतक्या वर्षानि एक कोडे उलगडले नाहि, ते हे की जिकडे पन्ढरपुरच्या माउलिने निषेधाचा एक शब्दही उचचारला नाही तिकडे आमच्या घरच्या माउलिने एवढा थयथयाट का करावा ???
आजवर कुठलाच उपास / वार वगैरे पाळला नाही. खाताना वेज्/नॉन-वेज असा विचारच मनात येत नाही त्यामुळे वार / तिथी वगैरे पाळण्याचा प्रश्नच नाही. पोटाला झेपेल एवढेच खायचे एवढा संयम ठेवला की झाले.
तब्बल एक तप हॉस्टेल-लाइफ आणि दुर्गभ्रमण enjoy(!?) केल्यावर असा भेदभाव कधीच विसर्जित केलाय.
अनेक गुरूवारी बायकोचा फलाहार आणि माझे समिष भोजन (बुधवार special) सोबत करतो !!
घरात खाताना तारीख वार वेळ मुहुर्त तिथी सगळं बघून खावं लागतं. कारण अभक्ष भक्षण करणारा मी एकटाच.
बाहेर मात्र काही नाही. चापून चोपून ओरपायला हमेशा तैय्यार. कामानिमित्त इंदूरला असताना रोज रात्री जेवणात चिकन मसाला खायचो. अगदी श्रावणात सुद्धा ३० दिवस रोज खाल्ला.
आमचा देव आमच्या पोटात. त्याला आवडता प्रसाद दिला की तो आमच्यावर प्रसन्न.. :))
मुळात नास्तिक असल्याने, देवालाच मानत नसल्याने ना वार पाळत ना सण पाळत.. जे आवडेल ते खातो.. मात्र घरच्यांच्या मते मी सोमवार पाळतो.. त्यामुळे सोमवारी घरी तरी खायला मिळत नाही.. बाहेर खातो संधी मिळाली तर, पण घरी सांगत नाही..
प्रतिक्रिया
अंड्याचा शिरा??
तिने एग हलवा नावाने समोर
शाकाहार - मांसाहार.
सध्याच्या मराठी मधे
>>> शाकाहारी असण्याचा अभिमान
शरीरबळाचा अन मटणाचा बादरायण
मटण आणि ताकद.
हा हा हा....
हाहाहा मजा आहे
हॅ हॅ हॅ..
महाशिवरात्रीचे चिकन.
मानवी अनाकोंडा खाद्य पद्धती !
ह्म्म्म्म...
सगळेच
मी "वार" ऐवजी चुकून "वर"
आदूबाळा....
वर पाळण्याची प्रथा कुठल्यातरी
वार
सर्व प्रति-साद पहाता चर्चा
हं. शक्यतोवर पाळतो. माझा
वार?? अजिबात नाही.....जेव्हा
ल्हानपणी एकदा घरी आई नसताना,
आजवर कुठलाच उपास / वार वगैरे
जियो और जीने दो
घरात खाताना तारीख वार वेळ
मुळात नास्तिक असल्याने,
Pagination