Welcome to misalpav.com
लेखक: सचिन कुलकर्णी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आबांचे अनेक बाबतीत हसे झाले आहेच त्यात हा मुद्दा आणखी. असेच हसे गुटखा बंदीचे होणार काय ? मी मागेच मिपावर व मिपाकरांच्याशी प्रत्यक्ष गप्पा मारताना म्हटले ही होते की पोलीसांच्या ठराविक प्रायॉरिटीज असतात , वेश्या व्यवसाय, डान्स बार, रेव्ह पार्टी, बनावट सीडी धाडी ई. कारण या व्यवसायात शक्यतो राजकारणी पडत नाहीत. होटेल, बांधकाम व्यवसाय येथेही अनेक बेकायदेशीर गोष्टी होत असतील पण त्या क्षेत्रात नगरसेवक, आमदार यांचा वावर असल्याने तिकडे पोलीस कशाला फिरकतील? मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे लॉटरी, शेअर बाजार यांच्या सारख्या सभ्य जुगारांबरोबर कॅसिनो ही येणारच , दारू व्यवस्था येणारच . पान खाऊन पचापचा थुंकलेले चालते मग गुटखा खाल्ला तर काय बिघडले? मुळात पान, दारू. गुटखा , डान्स, जुगार,वेश्यागमन, वायदे बाजार या गोष्टी इतक्या प्रचंड कराखाली दबल्या गेल्या पाहिजेत की त्यात गुंतवणूक करणाराच मुळात जेरीला आला पाहिजे. मग शौकिन पनवेलला जायचे तर सोडाच !

मुळात पान, दारू. गुटखा , डान्स, जुगार,वेश्यागमन, वायदे बाजार या गोष्टी इतक्या प्रचंड कराखाली दबल्या गेल्या पाहिजेत की त्यात गुंतवणूक करणाराच मुळात जेरीला आला पाहिजे.
अत्यंत सहमत.

अश्या भागातच डान्स बार,गेमिंग,कसिनो,थीम पार्क्स उभे राहतील, कारण अश्या शहरांमध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही अट नसते असे ऐकले आहे, म्हणजे कुणी पैसा गुंतवला,पैसा कुठून आला अशी चौकशी होत नाही आणि कितीही पैसा गुंतवू शकतो… काळा पैसा उधळपट्टी साठी देशाबाहेर जाऊ नये (बँकॉक,दुबई वगैरे ) , असाही एक यामागे विचार असू शकतो. इलाक्याबाहेर गुंतवणुकीच्या आणि कायद्याच्या मर्यादा असतील त्यामुळे त्याबाहेर कोणी हे करणार नाही असे वाटते.

लास वेगास च्या धर्तीवर एखादा तसाच भाग महाराष्ट्रात (किंवा भारतात)कुठे असावा यावर मिपाकरांची मते जाणुन घ्यायला आवडेल...:)

लास वेगास च्या धर्तीवर एखादा तसाच भाग महाराष्ट्रात......
त्याने महाराष्ट्रातील नैतिक आणि सामाजिक अध:पतन अधिक 'वेगास' येईल. (असे आपले माझे मत).

गोव्याचा लास वेगास होऊ शकतो…सध्या रशियन आणि उझबेक लोकांनी गोव्याची हालत फार वाईट करून ठेवलीये…रात्री टीटोझ च्या बाहेर काही वेळ उभा राहिलं कि स्पष्ट जाणवतं हे

मुळातच डान्सबार बंद करणे हे तथाकथित पांढरपेशा लोकांची झुंडशाही आणि इतरांच्या लिबर्टी आणि पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस वर घाला होता ! असला मुर्ख नियम काढणार्‍या शासनाचा तेव्हाही धिक्कारच केला होता आम्ही !! सर्वोच्च कोर्टाचे अभिनंदन व आभार !!

कलम ३३ नव्हे तर कलम १९ चा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. कलम १९ नुसार कोणत्याही व्यक्तीचा उपजीविकेचा मार्ग हिरावून घेता येणार नाही. येथे कोर्टाने बारबालांचे हे म्हणणे देखील मान्य केले कि - उपजीविकेसाठी त्यांना दुसरी कोणतीही कला अथवा कौशल्य अवगत नाही. पोलिसांनी कलम १४ चा आधार घेऊन हि बंदी घातली होती परंतु फक्त ३ तारांकित पेक्षा खालच्या आस्थापनांमध्ये हि बंदी लागू होती. कोर्टाने यावर देखील बोट ठेवून समानतेचा हक्क या मूल्याची पायमल्ली झाली आहे असे म्हंटले आहे.

या निमित्ताने मुंबईतील, तसेच अमेरिका, थायलंड वगैरेतील बार, बारबाला, इ. बद्दल कुणाला सांगोपांग माहिती असल्यास द्यावी, असे सुचवतो.

'कुणाचाही रोजगार हिरावून घेण्याचा सरकारला अधिकार नाही' हा संघटनेचा युक्तीवाद जसा कोर्टाला मान्य आहे तसा आम्हालाही मान्य आहे, बाकी, जगभरातील डान्सबार, बारबाला याबद्दलची सांगोपांग माहिती कोणी दिली तर समजून घ्यायला आवडेल. विकिपिडिया म्हणतो- Dance bar is a term used in India to refer to.... -दिलीप बिरुटे

जिथे डान्स बघायला व 'मूड' जमला की करायला बार बार जावेसे वाटते तो डान्स बार ! जिथे बारी बारी ने होता डान्स खिसा रिकामा होतो खास . @ चित्रगुप्तजी, " अहो,,,,,,,, ते पॅरिसचे डान्स म्हणजे त्यात बिलकुल काहीही अश्लील वाटत नाही बरं का हे विशेष !" इति- गेल्या वर्षी युरोपला जाउन आलेली आमची एक नातेवाईक .

@चौरा...ते पॅरिसचे डान्स म्हणजे...गेल्या वर्षी युरोपला जाउन आलेली आमची एक नातेवाईक.... यावरून आठवले, की आमच्या परिचयातील एक महिला (वय सत्तर) केसरी की कोणत्यातरी टुरातून युरोप फिरून आल्या, पैकी पॅरिसला दीड दिवस होत्या. मला त्यांनी ३ प्रश्न विचारले: १.नदीतून बोटीने फिरला का? २. अत्तराचा कारखाना बघितला का? ३. दहा हजार तिकिटाचा डान्स बघितला का? या तिन्ही प्रश्नांचे माझ्याकडे एकच उत्तर होते, "नाही" " ईईईई...मी जे दीड दिवसात बघितले, ते तुम्ही वर्षभर राहूनही बघितलेले नाही"...

" ईईईई...मी जे दीड दिवसात बघितले, ते तुम्ही वर्षभर राहूनही बघितलेले नाही"
:)) एक दिवसात अ‍ॅम्स्टरडॅम "केलेल्या" एका काकाने माझी परवा अशीच संभावना केली!

जर्मनीत डान्स बार मध्ये प्रवेश फी ५ युरो आहे. बीयर ६ युरोला मिळते. १ सम्पली की दुसरी घ्यावीच लागते. सगळं लिगल असल्याने कसलीच भिती नाही.. (सध्या १ युरो = ८० रुपये)

नवी मुंबईत बरेच परिवार घरातील कर्त्या पुरुषाच्या या सवयींमुळे अक्षरश: रस्त्यावर आले
सहमत परिणाम निश्चीतच चांगले होणार नाहीत

नाचणा-यांचा दोष काय! जाणा-यांचा दोष काय! परवानगी दिली म्हणून काय, आणि नाही दिली म्हणून काय! करायचं ते करतातच; व्हायचं ते होतंच. आनंद आहे.

तीव्र निषेध....निर्णय ऐकुन भयंकर धक्का बसला. अवांतरः गुटख्यच्या पुड्या आता परत मिळायला लगल्यात.शटर थोड खलि घेतल असेल तर समजाव ह्य टपरिवाल्याकडे गुतखा मिळतो.

शेवटी कंट्रोल आपल्या (पक्षी: ज्याच्या त्याच्या ;) ) हातातच आहे. अर्थात संयम हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली. ;) - सचिनबाबा मिपाकर

बार गर्ल मजबुत कमाई करतात... जर चांगलं गबरु गिर्‍हाईक असेल आणि आयटम पण रापचिक असेल तर अशी छमिया महिन्याला ५० हजारा पर्यंत कमाई आरामात करु शकते असा डान्सबारचा महिमा आहे. ;) अब्दुल करिम तेलगी ग्रांट रोडच्या टोपाझ बार मधे जात असे, तसेच त्याने तरन्नुम खान नावाच्या बार बालेवर एका रात्रीत ९३ लाख उडवल्याची बातमी त्यावेळी जोरात होती. तसेच तरन्नुम खान म्हणुन जालावर त्यावेळी दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचे फोटो वार्‍या सारखे पसरवले जात होते, यामुळे त्या अभिनेत्रीला बराच त्रास झाला... पण यामुळेच तीला बरीच प्रसिद्धी मिळाली. T1 हा वरील आणि असे अनेक फोटो या अभिनेत्रीचे तरन्नुम खान म्हणुन त्यावेळी जालावर वेगाने पसरले होते. संदर्भ :- http://www.mangalorean.com/printarticle.php?arttype=localnews&newsid=18787 http://alturl.com/3akmt

आमच्या माहितीप्रमाणे तरन्नुम दीपा बार मध्ये नाचायची आणि श्रीलंकन क्रिकेटपटू मुथैय्या मुरलीधरन देखील तिचा मोठा पंखा होता म्हणे. तो रेग्युलरली इथे 'विजीट' करायचा. नन्तर क्रिकेट बेटिंग प्रकरणात देखील तरन्नुमची चौकशी झाली होती. तिच्या बाबत बर्याच सुरस कथा होत्या. जसे कि ती मर्सिडीज मधून येते आणि अंधेरी सात बंगला येथे बंगल्यात राहते (सात बंगला एरियात राहायची सत्य होते),वैगेरे.

डान्सबार चालतात तर मग टॉपलेस बार अधिकृतरीत्या का चालु नयेत. स्विंगर क्लब्स का चालु नयेत? काही व्यक्ती अश्याही असतील की ज्यांना वासनासुधाक्षमना व्यतिरिक्त काहिही करता येत नसेल. त्यांच्यासाठी वरील अगळे धंदे अधिकृत करुन घटनेचा मान राखणे उचित नाही का? तसेच काही लोकांना केवळ दारु तयार करता येते आणि काही लोकांना केवळ गुटखा. मग अश्या परिस्थितीत काही राज्यांनी या दोन उत्पादनांवर घातलेली बंदी अवैध आणि घटनाबाह्य नाही काय?

ज्यांना फक्त भ्रष्टाचारच करता येतो अशा नेत्यांनाही आपण 'समजून' घेत आहोतच की. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळविणे, सराफांची दुकाने फोडणे, बलात्कार करणे, चॉपरच्या धाकाने वाटमारी करणे, खंडण्या वसूल करणे, खोट्या नोटा छापणे वगैरे वगैर व्यवसायात भारतात फार मोठ्या संख्येने कांही नागरीक गुंतलेले आहेत. त्यांना कारावासात टाकून त्यांच्या रोजीरोटीला काढून घेण्याचा सरकारला काय अधिकार? अशा नागरीकांवर त्यांचे कुटुंबिय अवलंबून असतात. त्यांची संख्या तर कित्येक लाखांच्या घरात आहे. एकाला एक न्याय आणि दूसर्‍याला दूसरा न्याय असता कामा नये असे सन्मानिय न्यायाधिश साहेबांनी म्हंटले आहे. मग बार बालांना नाचण्याची (आणि त्या आडून 'इतर' धंदे करण्याची) परवानगी द्यायची आणि इतरांना पकडून पकडून तुरूंगात डांबायचे असे वेगवेगळे न्याय का असावेत? अंगी इतर कांही कौशल्य नसल्याने आणि फक्त नाचता येते म्हणून त्यांना ह्या व्यवसायात राहू द्यावे त्यांच्यावर अन्याय करू नये, बंदीमुळे कित्येक बारबालांना सरकारने देहविक्रयास भाग पाडले असाही दावा केला जातो आहे. डान्सबार अस्तित्वात नव्हते तेंव्हा अकुशल स्त्रिया काय करायच्या? किती टक्के स्त्रिया देहविक्रय करायच्या? डान्सबार मधे नाचायला मिळाले तर किती वेश्या देहविक्रय सोडून डान्सबार मध्ये नाचण्याचा सन्मानिय मार्ग स्विकारतील? डान्सबार मधे जे अंगविक्षेप चालतात त्याला 'डान्स' म्हणावे का? 'येथे बार मध्ये नाचण्याचे प्रशिक्षण दिले जाईल' असे फलक लावून नाच शिकविण्याचे क्लासेस कोणी चालू केले तर सरकार परवानगी देणार का? नागरीकांवर खुप खुप अन्याय होतो आहे. ह्या अन्यायाला लवकरच कोणीतरी समाजसेवी संस्थेने वाचा फोडली पाहिजे.

त्यांना कारावासात टाकून त्यांच्या रोजीरोटीला काढून घेण्याचा सरकारला काय अधिकार?
सहमत डान्सबार चालू करण्यासाठी कोणतही स्पष्टीकरण पटत नाही

डांस बार चालू झाले ते छान झाले. राजकारण्यांनी आमच्या अध्ध्पतना ची काळजी करु नये. ( जमले तर स्वता किती शेणात आहेत ते बघावे ). आता पहिला कोणता बार चालू होतो ( ऑफिशियली ) ते बघु

'पुन्हा चालू' ह्याला काही अर्थच नाहीये.बंदी होती ती ऑफिशिअली डान्सबार चालवायला. सुरुवातीच्या काळात थोडी पडझड झाली खरी, पण पुन्हा नव्या जोमानं ह्या भानगडी 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' न्यायानं चालू झाल्या होत्याच की. बाकी, योग्य-अयोग्य, नैतिक अनैतिक वगैरे वाचतो आहेच. जाताजाता - बेकायदेशीररित्या राहणार्‍या बांग्लादेशींची पुन्हा ऑफिशिअली सोय होणार तर!

आमच्या एम एच १४ वाल्या गुंठामंत्री मित्राने वाटसअप्प वर दिलेली प्रतिक्रिया बेरोजगार को आराम,भुके को अनाज,प्यासे को पानी टुटे दिल को फिर मिलेगा प्यार…मुबारक हो आपको फिर से डान्स बार !

आमच्या पाहण्यात असेच एक श्रीमान होते. आज्यानं-बापानं दाताच्या कण्या करुन सांगितलं पण ऐकलं नाही...घाटाखाली जाऊन परत आल्यावर घरात घेतलं नाही तर साहेब दुपारपर्यंत पजेरोत झोपायचे एसी लाऊन. हल्ली पैसा संपल्यामुळं एका मित्राच्या सिक्युरिटी गार्ड्स पुरवण्याच्या एजन्सीमध्ये म्यानिजर म्हणून काम करतात म्हणे.

आता हायवे लगतचे दारू आणि बिअर बार बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हायवेवरील अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हायवे लगतच्या सर्व बार आणि बिअर बार्सचे सरकारी परवाने रद्द करण्यात येणार आहेत. अभिनंदन.

दारुविक्रीचे परवाने नसलेल्या ढाब्यांवर कित्येक वर्षांपासून दारुविक्री होती, तिला चाप लावणं होत नाही, आहे त्यांचे परवाने रद्द करुन फारतर हप्ते मिळण्याच्या हाटेलांच्या संख्येत वाढ होईल इतकंच. हायवे वरची दारुविक्री तर घंटा काय बंद होत नसते.

थोडा स्पष्टच बोलतो माफी असावी, पण दारूविक्री,डान्स बार (मयखाना) , वैशाव्यवसाय हे जगातील सर्वात जुने व्यवसाय आहेत… कारणं माहित नाहीत पण गेल्या हजारो वर्षात बर्याच जणांनी प्रयत्न केले पण याला कोणीही बंद पाडू शकले नाही, आणि पाडू शकणार हि नाही असं वाटतंय…याला फक्त ब्रेक लागू शकतो.आबांनी लावलेला हा ७ वर्षांचा ब्रेक होता म्हणता येईल. त्या सात वर्षांसाठी आबांचे आभार !