Welcome to misalpav.com
लेखक: NiluMP | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लोचा तर आहेच... आता आमच्याच हापिसात घ्या... मराठी संगणक तज्ञाला मराठीत संवाद साधण्याचीच लाज वाटते.. आपण मराठीत बोललो तरी उत्तर हिन्दीतुन मिळते..घरच्यांशी बोलताना तरी नशिब मराठीतुन बोलतो ... आता बोला..

पण एक गोष्ट खरी कि मराठी माणुस हा जात्याच पापभिरु व्रुत्तिचा अस्ल्याने हे असे घडत असावे,कारण त्यन्ची कातडी अजुन तरी नेत्यान्प्रमाणे झाली नाही आहे.

मराठी माणूस उद्योजक नाही ही रडकथा आता जुनी झाली. सहज म्हणून आठवायला घेतलं तरी किर्लोस्कर, गरवारे, दांडेकर (कॅम्लिन), पेंढारकर (विको), ओगले (काच) ही जुनी मंडळी आठवली. नव्यांमध्ये चितळे (मिठाईवाले), गाडगीळ (सराफ), जाधव (फार्मा), भुजबळ (बांधकाम), गायकवाड (बीव्हीजी) हे लोक आठवले. गुरूराज "देश" देशपांडे यांनी अमेरिकेत आयटी कंपनी काढली होती. ती त्यांनी अब्जावधी डॉलर्सना विकली. विवेक रणदिवे यांच्या "टिबको" या कंपनीच्या शाखा जगभरात आहेत (अगदी पुण्यातसुद्धा).

उद्योगभुषण अविनाश भोसले राहीले की.. आणि पर्सिस्टंट्चे आनंद देशपांडे.

जुन्यातले लोणचेवाले कुबल, बेडेकर, तसेच कॅम्लीनचे दांडेकर, बांधकाम व्यावसायिक परांजपे, नव्यातले काटदरे (लोणची मसाले) तसेच शिक्षण व्यवसायातही अनेक जणं आहेत. ते सर्व राहिलेच की.

हीच यादी पुढे नेऊन बांधकांम व्यावसायिक, ज्यांनी भारताबाहेरही त्यांचा उद्योग पसरवला ते, बी. जी. शिर्के, चित्रपट क्षेत्रातील अनेक निर्माते, संगीतकार, मराठी नाटक व्यवसायातील मराठी निर्माते, वाहतुक व्यवसायातील घाटगे-पाटील, पर्यटन क्षेत्रातील वीणा पाटील, जादुगार रघुवीर, अत्तरवाले एस. एच. केळकर अनेक अनेक मराठी उद्योजक आहेत. हं हे खरे आहे की आपला समाज 'उद्योजकांचा' नाही. जसा गुजराथी, मारवाडी, सिंधी समाज आहे. तेवढे असण्याची, मला तरी, गरज भासत नाही. नोकरी आणि स्वतंत्र व्यवसाय ह्या दोहोतली, मराठी मनातील, दरी जरी भरून निघाली तरी फार मोठे यश आहे असे मी म्हणेन.

मी तरी अजून पारसी, पंजाबी, मारवाडी समाजातला भिकरी पाहिला नाही. भिकारी दिसला की त्याला तू कोठल्या समाजाचा असे विचारता काय?

पारसी भिकारी चर्चगेटला पाहिलेला आहे. सर्वसाधारणपणे अशा लोकांच्या जेवणाखाण्याची सोय अग्यारीत होत असते. त्यामुळे त्यांना भिक मागावी लागत नाही असे ऐकले आहे. खरे-खोटे झरतृष्टच जाणो. पंजाबात, मारवाडात तिथल्या समाजाचे भिकारी सापडतील. तिथे मराठी भिकारी सापडत नाहीत. प्रत्येक समाजात भिकारी, गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत असे वेगवेगळे आणि सर्व स्तर सापडतात. स्वतंत्र व्यवसायात मराठी टक्का कमी आहे हे सत्य असले तरी परिस्थिती बदलते आहे. मुळात ह्या सर्वास आपली घरची शिकवण, संस्कार कारणीभूत असतात. पुस्तकी ज्ञानाला अवास्तव महत्त्व, पक्क्या स्वरूपाची आणि महिन्याला चांगले उत्पन्न देणारी, धोका विरहीत नोकरी, उद्योग व्यवसाय म्हंटले की त्याला लागणार्‍या भांडवलाची मुळात कमी, बँकेचे कर्ज घेतले तरी परतफेडिची धाकधूक, धंद्यासाठी लागणारे शारीरीक आणि मानसिक कष्ट उपसण्याची आवड नसणे, फायद्यापेक्षा तोटाच होईल ही अनाठायी भिती आणि आज धंदा सुरु केला की उद्याच श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणे ही आपल्या समाजाची कमजोर स्थाने आहेत. ह्यासाठी आपण आपल्या पुढच्या पिढीला उद्योगव्यवसायासाठी प्रोत्साहन देणे, लहान लहान व्यवसायातून त्यांच्या मनात धंद्याची आवड निर्माण करणे आणि डोळे उघडे ठेऊन 'धाडसी' बनण्यास प्रवृत्त करणे ही आपल्या आणि पुढच्या सर्व पिढ्यांची नैतिक जबाबदारी आहे. ती आपण व्यवस्थित पार पाडली तर भविष्यात मराठी माणसाचा उद्योजकतेतील टक्का नक्कीच वाढीस लागेल. पूर्वी आपण राहतो ते क्षेत्र सोडून जसे, मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापूर, बाहेर जाण्यास मराठी माणूस राजी नसायचा. आज भारताबाहेर अनेक मराठी माणसे नोकरी-धंद्या निमित्त विखुरलेली दिसतात. बी.जी. शिर्के सारख्या मराठी उद्योजकाने अनेक मराठी माणसांना दुबईचा मार्ग दाखविला. मराठी माणूस आखातात पाऊल टाकता झाला, संगणकक्षेत्राने अमेरिका दाखविली. तसेच, हळू हळू फरक पडेल आणि मराठी उद्योजकही मोठ्या प्रमाणात तयार होतील. पूर्वीचा मराठी समाजाचा, संकुचित आणि सुरक्षित वर्तुळात राहण्याचा, स्वभाव हळूहळू बदलत आहे.

तेच तेच जुने मुद्दे नव्याने खरडले आहेत्..कसला लोच्या आहे तेच कळत नाही. बहुतेक धागाकर्त्याच्या डोक्यात केमिकल लोच्या असावा.

फ्रिश्मन-प्रभू हा बांधकाम उद्योग जगविख्यात आहे. त्यातले एक भागीदार सुधाकर प्रभू हे प्रवासवर्णनकार मीना प्रभू यांचे पती. युनिटी बिल्डर्सचे अवरसेकर, पितांबरीचे प्रभुदेसाई, अंडरवॉटर सर्विसेस चे सामंत, सुला वाईन्स, मास्टेक, आय आर बी, मसालेवाले जोग, कोहिनूर, केसरी अशी अनेक नावे आहेत. वाडवळ-एस्केपी समाज पर्यटन व्यवसायात, पांचाळ-मिस्त्री समाज फोर्जिंग, लेथ मशिन्स वगैरेमध्ये आघाडीवर आहे आणि आज एक संपन्न समाज बनून राहिला आहे.

मराठी टंकताना मध्येच इंग्रजी शब्दांचा आधार घेताना crtl \ वापरून टंकनाची भाषा बदलावी.. म्हणजे "ठवससलूववक@100" असे होणार नाही.. लेख / प्रतिसाद टंकल्यानंतर पूर्वपरीक्षणाची सोय वापरावी.. ठवससलूववक@100 म्हणजे काय तेही सांगा हे वेगळे सांगणे न लागावे!! बाकी.. पेठकरकाकांचा प्रतिसाद आवडला.. ते स्वतः एक उद्योजकच आहेत हे ही कसे विसरता येईल..