Welcome to misalpav.com
लेखक: प्रभाकर पेठकर | प्रसिद्ध:


Comments

... मातीच्या जमिनीवर ठेवलेली आहे? कोकणातलं सारवलेलं स्वयंपाकघर आठवलं. सामिष खात नसलो तरी नेटकि वाढलेली थाळी बघून तोंडाला पाणी सुटलं! आमची मजल बटाट्याची आमटि करण्यापर्यंतच आहे.

काका... तुम्ही खरच लाजवाब आहात. लज्जतदार जेवण हेच सर्वसुख मानणारे आम्हि. हेच आमचं सगुण साकार पूर्णब्रह्म. जय हो. अर्धवटराव

काकाकाकू, नेत्रेश, नंदन, अर्धवटराव, aparna akshay, रेवती सर्वांना खुप खुप धन्यवाद. काकाकाकू - सारवलेल्या जमिनीचा परिणाम माझ्या मित्राने फोटोशॉपच्या साहाय्याने साधला आहे. aparna akshay - पाटाची खरंच गरज आणि तेवढा धीर आहे? रेवती - गेले वर्षभर 'अन्न हे पूर्णब्रह्म' हे सदर समर्थपणे चालविल्याबद्दल खास धन्यवाद .

मस्तच एकदम पेठकर काका. अप्रतिम रचना. . . फोटोशॉप आहे होय. तरी मी म्हणत होतोच चांदीच्या ताम्ब्यावर जमीन वेगली का दिसतेय प्रतिबिम्बात.;-)

काका, काय सुंदर नजाकतीने वाढ्लेलं ताट आहे. झक्कासच. सामिष खात नसलो तरी वाचायला आणि बघायला फार छान वाटलं!

सकाळि सकाळि हे एवढे प्रकार बघुन खुप जळजळ झाली आहे. ताट एवढं सुंदर सजवलय/दिसतय कि त्याकडे नुसतं पहात बसावस वाटतय. बरं झालं तुम्हि खेकड्याची पाकॄ दिलीत. मला प्रचंड आवडतात पण कसे करायचे माहित नव्हते. आता नक्कि करुन पाहिन.

श्रावण संपला नाही अजुन,एव्हड भन्नाट काही तरी दाखवता,मग कसे रहावे भान मनाला,कसा मनाचा तोल जपावा.आता जर या महिन्यात मी जर हे खाल्ल तर आईला पहिल तुमच नाव सांगणार पेठेकर काकांनीच लालूच दाखवली म्हणून.....निव्वळ अप्रतिम पाककृती.....!

पेठकर काका, श्रावण महिना चालू आहे हो. तुम्ही अश्या खेकडे, सुरमई सारख्या पाकृ टाकल्यावर आम्ही पामरांनी श्रावण महिना कसा पाळायचा? गेले आठवडाभर जिभेवर ताबा ठेवला आहे. तुम्ही श्रावण महिना मोडायला भाग पाडणार बहुदा.

कधी येऊ जेवायला ? अगदी जानवं घालून, पळी,पंचपात्री घेऊन यायची तयारी आहे.

हा धागा फोरवर्ड केलेल्यांपैकी दोघांनी तात्काळ श्रावण मोडलेला आहे…पेठकर काका याची जबाबदारी कोण घेणार ;)

विजुभाऊ, सविता००१, इस्पीकचा एक्का, मन्द्या, दिपक्.कुवेत, आदूबाळ, प्रभो, बाबा पाटील, भाते, Mrunalini, गणपा, तिमा, बॅटमॅन - तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. दिपक.कुवेत - खेकडे करणे सोपे आहे. विशेष कठीण नाही. पण कोलेस्टेरॉल सांभाळून. बाबा पाटील - नाही. आईसाहेबांना दुखवू नका. एक महिना कळ सोसा. आपण नाही का, लग्ना आधी, चित्रपटांमधून मधुचंद्रांची अनेक दृष्य पाहिलेली असतात? भाते - श्रावण आणि गणपती होऊन जाऊ दे. पाककृती कुठे जात नाही. इथेच असणार आहे. Mrunalini - काय? पाककृती नं? ही काय पाठवली आहे की. गणपा - अरे, खरा खवय्या धारातिर्थी पडला असेल तरी 'गोवन थाळी'च्या सुवासाने ताडकन उठून बसेल. तिमा - थोडी कळ सोसा. उपहारगृहासाठी चांगली जागा शोधतो आहेच. मिळाली की 'गोवन-मालवणी' खासियतचे उपहारगृह सुरु करणार आहे. सर्वांनाच आमत्रण असेल.

माझ्या काही पदार्थांच्या कृती जरा जरा वेगळ्या आहेत. पण ताट, त्यातली पदार्थांची रचना, फोटो सगळंच अप्रतिम!

माझ्या काही पदार्थांच्या कृती जरा जरा वेगळ्या आहेत.
अरे व्वा! येऊ दे की मग तुझ्याही पाककृती. काहीतरी नविन, वेगळे शिकायला तरी मिळेल. 'माझ्याच पाककृती सर्वोत्कृष्ट, मीच सर्वोत्तम आणि सर्वज्ञानी आहे, तुम्ही माझ्याकडून पाककला शिकून घ्या तुमचे आयुष्यात भले होईल' असा दुराग्रह माझ्याजवळ नाही. इतरांच्या मतांचा मी आदर करतो. माझ्या कांही चुका दाखवून दिल्या तर त्याचा स्विकारही करतो. ही: ही: ही:

आधी तुम्ही दिलेल्या प्रकारात करून बघेन आणि मग चवीत काय फरक पडतो ते सांगेन! :)कारण तुमचा अनुभव नक्कीच जास्त आहे, तेव्हा तुम्ही दिलेला फरक हा चव जास्त चांगली करणाराच असेल याची खात्री आहे.

'माझ्याच पाककृती सर्वोत्कृष्ट, मीच सर्वोत्तम आणि सर्वज्ञानी आहे, तुम्ही माझ्याकडून पाककला शिकून घ्या तुमचे आयुष्यात भले होईल' असा दुराग्रह माझ्याजवळ नाही. पेठकरकाका, बहुधा तुमचा अध्यात्माचा अभ्यास कमी पडतोय. (कृपया हलके घेणे) :)

नुसता फोटो बघूनच तोंडाला पाणी सुटले. खल्लास... फोटोवर अगदी मधोमध, बटबटीत कॉपीराईट टाकला नाहीत, म्हणून विशेष धन्यवाद.

आईग्ग जबरदस्त.. तांदळाच्या भाकरीसोबत मच्छीफ्राय, करदी, कुर्ल्या अन .. सोलकढी.. मला तर तिचा रंगच प्रेमात पाडतो नेहमी... तेवढी वाटीच्या जागी तिला तांब्यात दाखवा किंवा सोबतीला एक सोलकढीचा भरलेला जग दाखवा.

उपाशी बोका, सानिकास्वप्निल, स्वाती२, तुमचा अभिषेक - सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. @पैसा, असं नसतं. मी पुस्तकं वाचून पाककृती शिकलो/शिकत आहे. पण बायका पारंपारीक पद्धतीत आपल्या आईकडून किंवा सासूकडून म्हणजेच अत्यंत अनुभवी हातांकडून पाककृती शिकतात. त्यांच्या पाककृती नक्कीच उजव्या असतात. असो.

उपहारगृहासाठी चांगली जागा शोधतो आहेच. मिळाली की 'गोवन-मालवणी' खासियतचे उपहारगृह सुरु करणार आहे.>>>> -पेठकर साहेब, कुठे? कधी? लवकर सांगा.

बापरे? म्हणजे आम्हाला मुंबईहुन मस्कतला यावे लागेल? मस्कतमधुन मुंबईला पार्सल मिळु शकेल का? काका, तशी सोय असेल तर नक्की कळवा.

भारतात आलो की. सध्याच्या वेळापत्रकानुसार सप्टेंबरच्या ३र्‍या आठवड्यात. गणपती वगैरे गेल्यानंतर आपल्याला रान मोकळे असेल.

मज्जा आली. मात्र गोव्यात बर्‍याचदा सोलकढी ऐवजी तिवळ असते. नारळ नसल्यामुळे लई स्ट्राँग लागते आणि जास्त पिऊ शकत नाही मी तरी. पण मस्त लागते. (कोकम, हींग, मिरी, मिरच्या कोथिंबीर घालुन करतात) करंदीची चटणी भाव खाऊन गेलीये..जब्राट आता पावसाळा सरला की करतोच.. पैसा ताईंनी दिलेली 'रेषाद' मसाला घालुन बांगड्याची पोर्तुगीज स्टाइल पाकक्रुती पण अजुन केली नाही :( लॉब्स्टर (शेवंड) पण कसा करतात साफ करण्यापासुन ते ताटात येईपर्यंत हे वाचायची पण खुप इच्छा आहे. आणि पुण्यात तो कुठे मिळेल हे देखिल कोणी सांगितले तर उत्तम.

श्रावण महिना म्हणुन तरी एखादी शाकाहारी थाळी येऊ दे.

मस्कतवासी पेठकरमियांचे धागे फक्त शुक्रवारीच उघडायचे असं मी ठरवलेलं आहे. म्हणजे मग जे काही दाखवलं असेल ते वीकेंडला करून खाता येतं.... मधल्या वारी पाहिलं तर उगाच उरलेला आठवडा जिवाला त्रास!! कुणी सांगितलंय च्यामारी? :) असो. ओली/ सुकी मासळी जेवणात नेहमीच असते त्यामुळे तिचं काही विशेष नाही, पण या वीकेण्डला कुरल्या आणून खाण्यात येतील.... अवांतरः पण पेठकरशेठ एक खरं शिक्रेट सांगू? म्हणजे आमच्या देवा मंगेशाला साक्ष ठेवून वगैरे कानात सांगतात तसं!!! गोवेकरांची मासळी अत्यंत चवदार असतेच त्यात शंका नाही... पण कुरल्या ह्या (चिंबोर्‍या म्हणून) कराव्यात त्या सीकेप्यांनीच!!! साला, जवाब नाही!!!!