"तुमची गर्ल फ्रेंड नागकन्या आहे का ?" हा प्रश्न सहकारनगर मधल्या सुखवस्तू-सुशिक्षित (?) माणसाने विचरला होता. > हसावे की रडावे?
चांगला जमलाय लेख. अख्खी लेखमाला सुरेख सुरु आहे.
पण हत्तीच्या सुळ्याना एवढे मार्केट आहे की छोट्या मण्यांकडे कोणाचे लक्षच गेले नसेल.
अहं अस नाही ! याची किंमत सुद्धा जबरा आहे असे म्हणतात. या मण्याचे नाव गजमुक्ता ,गजमणी किंवा Elephant Pearl असे आहे. खरं पाहिलं तर हा हत्तीच्या डोक्यात निर्माण झालेला ट्युमर असावा,पण तो गजमुक्ता याच नावाने प्रसिद्ध आहे हे मात्र खरे.
हा वरील प्रमाणे दिसतो... याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते,लाखात किंवा कोटी मधे खरा मणी विकला जातो.
एक दुवा :- 5 caught striking Rs 2 lakh deal for precious elephant pearls
वाचनिय दुवा :- imperialpearl
जाता जाता :- विरप्पन ने २ हजार पेक्षा जास्त हत्ती ठार मारले त्यांचे ४ हजार दात झाले. ते कुठे गेले ? तसेच विरप्पन देशातल्या देशात असुन मोकाट होता आणि आपले लोक पाकिस्तान मधल्या दाउदला पकडण्याच्या वार्ता करतात !
जबरदस्त आहे हे प्रकरण ! कधी विचार पण केले नव्हता.
हत्तीला कसे पण करून या जगातून नाहीसे करायचे हाच विचार लोकं करतात बहुतेक.
'डुक्कर मणी' पण शोधून काढला पाहिजे, डुकरे तरी कमी होतील थोडी...;)
सुनाद रघुराम चे 'वीरप्पन' वाचले होते, त्या वरून तरी असे वाटले की तिकडचे सरकारच त्याला हत्ती मारायला सांगायची. सगळे दात श्रीलंकेला जायचे आणि तिकडून सगळ्या जगामध्ये विकले जायचे.
अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण लेखमाला.
बाकी ह्या नागाबद्दलच्या श्रद्धा, अंधश्रद्धा बहुत प्राचीन.
ही पहा काही मध्ययुगीन नागशिल्पे
-
आणि ह्या पहा त्या विषकन्या =))
-
ते पहिल्या शिल्पतल नागाच/सापाच कडबोळे/गुंता म्हणजे भारतीय सरकारी व्यास्थेचे कडबोळे/गुंता
आणि एव्हढा गुंता होवून सुद्धा "Superpower" चा फना डोलातोच आहे.
मी पण ऐकले आहे की कोरेगाव पार्क आणि गोवा मधल्या काही मोठ्या पार्ट्यांना ही धेंड पुरवली जातात. पण माझ्या अनुमानानुसार ही लोक बिनविषारी किंवा निम-विषारी (semi venomous- हरणटोळ-ज्याचे विष किडे -छोटे बेडून मारण्याइतपत झहाल असते.) वापरात असतील. त्यांचे जे कस्टमर असतात ते आधीच बुंगलेले असतात त्यामुळे त्यांना बिनविषारी पण विषारी वाटत असेल. काही कॉलेज तरुणांना १ ग्लास ओल्ड मोन्क नंतर पाणी घालून कोक दिला तरी त्यांनी तो ओल्ड मोन्क वाटतो, तसला प्रकार.;)
7-8 वर्षापुर्वीची गोष्ट ,मे महिण्याचा काळ, आमच्या घराशेजारी लहान औढा आहे .3-4 फुट उंच गवत होते .त्यात एक सापाच्या जोडप्याच प्रणयाराधन चालु होत .जोडी हवेत 5-6 फुट उंच उठत होती . आजुबाजुला पाचपन्नास माणुस
तुमचे बरोबर आहे, ती तिचे पात्र जगत होती, पण हे लोकांना कळत नाही. माझा खूप राग आहे या सिनेमा वरती, सिनेमा हा सिनेमा म्हणून पाहायचा आणि सोडून द्यायचा. पण नको त्या गैरसमजुती घेऊन गुप्तधन शोधायला बाहेर पडलेले काही लोक मला माहित आहेत.
सगळ्या सापांना प्रत्येक प्रदेशात काही लोकल नावे असतात. (मण्यार-सूर्), चंद्र कंडार, फुरसे- जलेबी साप(पंजाब)) तशी काही नावे असू शकतील. साप कसा दिसत होता सांगितला तर बरोबर नाव सांगता येईल.
म्हणून उन्हात बसलेला नाग हा त्याची बॉडी ट्यान करत नसून त्याच्या शरीरातले तापमान वाढवत असतो.>>> :D
मी कल्पना केली, मस्त सनलोशन, गॉगल वगैरे लावून लवंडलेल्या नागाची :D
लेखमाला मात्र अप्रतिम. नेमकाच वेळ मिळतो त्यात, गोल्डरश, कॉफिखाने ही अशा लेखमाला वाचता वाचता अर्धवट टाकाव्या लागतात :(
जे डी, नागाची नाही पण काही सापांची वासन (वास घेण्याची ) क्षमता जास्त असते का हो ? खास करून नानेटी..
हिंदी चित्रपट सृष्टीबद्दल बरोब्बर लिहिलयस.. लोकं येडपट त्याला कोण काय करणार.. अमिरच्या उमेद्वारीच्या काळात, 'तुम मेरे हो' अस पिक्चर होता असं आठवतय.. असलाच सगळा अचरटपणा..
लेख एकदम सुबक झालाय... पूर्ण लेखमाला झाला की एक पुस्तक किंवा पीडीएफ पब्लिश करता आलं तर बरं पडेल!
सुसाट चाल्लेय गाडी एकदम.. आवडतं आहेच!
जेडी - एक प्रश्न.
सापाच्या विषाचा मानवी शरीरावर होणारा ढोबळ परिणाम पाहिला तर आपले शरीर दोन प्रकारे रिअॅक्ट करते.
१) अन्ननलिकेतून विष शरीरात गेले तर (विष रक्तात मिसळण्यावर होणार्या हानी इतकी) हानी होत नाही - अन्ननलिका मार्गातील जखमा हा अपवादात्मक मुद्दा बाजूला ठेवूया!
२) विष रक्तात मिसळले गेले तर भयंकर परिणाम दिसून येतात.
(मज्जारज्जूवर होणारा परिणाम किंवा हृदय बंद पडून मृत्यू वगैरे सर्व मुद्दा क्रं. २ चे आफ्टर इफेक्ट्स असल्याने त्यांनाही विचारात घ्यायला नको.)
या परिस्थितीमध्ये जे विषारी जीव आपल्यासारख्या दुसर्या विषारी जीवाला चावतात. (एक साप दुसर्या सापाला, एक विंचू दुसर्या विंचवाला..) त्यावेळी त्यांच्या शरीरातील प्रतिकारके त्या विषाला १००% निष्प्रभ करतात की त्याचेही काही साईड इफेक्ट्स असतात..?
माफ करा मला उत्तर द्यायला वेळ लागला.
माझा जास्त या विषयावरील शास्त्रीय अभ्यास नाही पण जेंव्हा किंग कोब्रा धामणीला चावतो तेंव्हा मी पहिले आहे. ७-८ फुटी संटी धामण ५ मिनिटात जीव सोडते. विषाची किती मात्रा आणि त्याची जहालता या वरती सगळे अवलंबून असेल. म्हणजे किंग कोब्रा चे विष मण्यारी पेक्षा कमी जहाल असते पण त्याच्या विषाने मण्यार मरते (कारण तो चमचा भर विष घालतो) आणि तिच्या चाव्याने किंग ला काही होत नाही. ( बहुतेक माणसाला मधमाशी चावल्यावर जे होते तसे होत असेल.)जर काही अजून माहिती मिळाली तर लिहीनच पुढच्या लेखात.
एक डॉक्युमेंटरी पाहिली होती. किंग कोब्रा नर आणि मादी एकत्र असताना, अजून एक किंग कोब्रा नर त्या ठिकाणी येऊन दोघांचीही जुंपली व पराभूत नर तिथून निघून जाताच विजयी नराने (नंतर आलेला) मादीला मारुन टाकले.तुम्ही इथे किंग कोब्राने धामणीला मारायचा उल्लेख केला आहेत, त्यावरुन आठवले.
सुंदर खुसखुशीत शैलितील लेख. खूप आवडला. पुभाप्र.
छान शास्त्रिय माहितीचा लेख असल्यानेच केवळ इकडे थोडेसे लक्ष वेधू इच्छितो...
अंगावरील केसांचे मुख्य काम म्हणजे कुठल्याही सस्तन प्राण्याच्या (माणूस, कुत्रा, बैल इ.) शरीरात जी उर्जा निर्माण होते त्याचे उत्सर्जन कमी करणे आणि शरीर थंड राखणे.
येथे "...शरीर थंड राखणे." ऐवजी "...शरीर गरम राखणे." असे पाहिजे. शिवाय केसाच्या उपयोगासाठी जी प्राण्यांची उदाहरणे दिली आहेत त्यापैकी माणूस आणि बैल यांच्यात केस हे केवळ अतीप्राचीन पुर्वजांकडून आलेले पूर्णपणे निरुपयोगी अवयव आहेत. कुत्र्यांपैकी काही अतीथंड प्रदेशातील जाती सोडल्या तर इतरांतही केसांची तीच अवस्था आहे. मात्र थंड प्रदेशातल्या पोलार अस्वल, याक, इ. प्राण्यांमध्ये केसांचा शरीर गरम ठेवण्यास उपयोग होतो.
तुमचे बरोबर आहे. माझी थोडी वाक्यरचना चुकली आहे. थंडीत शरीर गरम राखणे (इन्सुलेशन चे काम करून ) आणि उन्हाळामध्ये (घाम वाळवून) थंड राखणे असे मला म्हणायचे होते मला.
माणूस आणि बैल यांच्यात केस हे केवळ अतीप्राचीन पुर्वजांकडून आलेले पूर्णपणे निरुपयोगी अवयव आहेत
मला माहित नव्हते, आता हिवाळ्यात दाढी वाढवणे बंद करीन.;)
फार वर्षापूर्वी "दुध का कर्ज" नावाचा एक नागपट आला होता. त्यात अरुणा इराणी नागाला आपलं दुध पाजते व तो हे "दुध का कर्ज" व्यवस्थीत अदा करतो अशी काहिशी ष्टोरी होती =))
हिंदी सिनेसृष्टीतल्या प्राण्यांच्या वापरावर मागे एक प्रोग्राम बघितला होता. जीव हळहळला अक्षरशः. नागांचे फाईट सीन, प्रणय सीन दाखवायला दोन नागांची तोंडे पारदर्शक टेप ने चिकटवतात. मग ते बिचारे कसरत करत, एकमेकांना वेटोळे देत ते बंधन तोडायचा प्रयत्न करतात... आणि ते चित्रीकरण प्रणय सीन म्हणुन खपवलं जातं. वर सांगीतलेल्या चित्रपटात नागांची टोळी दुष्ट व्हीलन मंडळींवर चाल करुन येते. त्यावेळी काचेच्या खिडक्या फोडुन सर्पगठ्ठे आत घुसतात. आता ते सर्व नकली साप होते कि त्यातले काहि असली होते माहित नाहि, पण त्यात सापांना खुप इजा झाली असणार.
अर्धवटराव
प्रतिक्रिया
"तुमची गर्ल फ्रेंड नागकन्या
तुमची गर्लफ्रेंड नागकन्या आहे
माझी नाही पण, आपल्याला
भारी..
लेखन आवडले...
मल तरी माहित नाही, पण
पण हत्तीच्या सुळ्याना एवढे
बिचारा हत्ती !
अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण
पाटेश्वर ला पण आहेत कारे
हो.
ते पहिल्या शिल्पतल नागाच
वल्ली वरून उजवीकडचे शिल्प
ते शिल्प मोरगावजवळच्या
मस्त फोटो आहेत.
@विषकन्या खात्यापित्या घरच्या
लेखन आवडले
भारी ए ! पण चित्र कै दिसली
अजुन एक अंधश्रध्द्दा ...
ऐकीव माहितीनुसार मध्यंतरी
खरा आहे…एक्सटसी साठी वापरतात
मी पण ऐकले आहे की कोरेगाव
हा लेख संपुर्ण लेखमालेतला
"तुमची गर्ल फ्रेंड नागकन्या
कोणती विचारले असते तर तीच
तुमचा या विषयावरचा लेख वाचला
+१ +१ +१ टु किसनदेव!
*****
क्रमश:
डोळ्यासमोर चित्र उभे राहिले,
लैच भारी..
धन्यवाद् !
लेखमाला मस्तच !
तुमचे बरोबर आहे, ती तिचे
छान माहिती
जबरी पंचेस!!!
आंतरजालावर वाचलेल्या
नाग: अंधश्रद्धेचा बळी !
सगळ्या सापांना प्रत्येक
अधेले
मस्त
मस्त..
जेडी - एक प्रश्न.
माफ करा मला उत्तर द्यायला वेळ
डॉक्युमेंटरी
एकदम मस्त !!
सुंदर खुसखुशीत शैलितील लेख.
अंगावरील केसांचे मुख्य काम म्हणजे कुठल्याही सस्तन प्राण्याच्या (माणूस, कुत्रा, बैल इ.) शरीरात जी उर्जा निर्माण होते त्याचे उत्सर्जन कमी करणे आणि शरीर थंड राखणे.येथे "...शरीर थंड राखणे." ऐवजी "...शरीर गरम राखणे." असे पाहिजे. शिवाय केसाच्या उपयोगासाठी जी प्राण्यांची उदाहरणे दिली आहेत त्यापैकी माणूस आणि बैल यांच्यात केस हे केवळ अतीप्राचीन पुर्वजांकडून आलेले पूर्णपणे निरुपयोगी अवयव आहेत. कुत्र्यांपैकी काही अतीथंड प्रदेशातील जाती सोडल्या तर इतरांतही केसांची तीच अवस्था आहे. मात्र थंड प्रदेशातल्या पोलार अस्वल, याक, इ. प्राण्यांमध्ये केसांचा शरीर गरम ठेवण्यास उपयोग होतो.तुमचे बरोबर आहे. माझी थोडी
आवडेश
बिच्चारे नागराव :(
Pagination