लेख अजिबातच पटला नाहि. सण हे कारण नाहिये शेतकर्यान्च्या अधोगतीच.
मी स्वतः अनुभवलेला आहे शेतीचा बेभरवशेपणा. त्यातुन आलेली प्रचंड गरीबी. कर्जबाजारीपणा अन व्यसनाधीनता. यावरुनच सांगतेय. मला वाटते त्या प्रमाणे
१. शिक्श्णाचा अभाव (formal किंवा शेतीसंबधी)
२. सगळे failurs साठी दारु हि उपाय वाटणे. (ती easyli available पण असते.)
३. सरकारी योजना कधिच शेतकर्यान्पर्यन्त पोहोचत नहित. बर्याच जणानां माहीतीच नसते की अश्या काही योजना पण आहेत
४. आपापसातले हेवे दावे.
५. नविन काहि, जोड धंदा करुन पाहण्याची तयारी नसणे.
वर सांगीतलेला शेतकरी त्याच्य शेताकडे बघायला सांगुन गेला नाहि कोणाला? हे सहसा कधी होत नाहि.
सद्ध्या सणवार म्हटले की पारंपारिक प्रथांबरोबर बॅनर्स लावणे, डीजे बोलावणे, व्हिडिओ शूटिंग, सेलेब्रिटी बोलावणे असले अत्याधुनिक आणि आचरट प्रकार असतात. त्यामधे खर्च वाढतात...
पूर्वी तमाशा, जत्रा हेसुद्धा असायचे. आता तमाशा पार्ट्यासुद्धा मजबूत बिदागी घेतात. गावं जास्त आणि तमशा पार्ट्या कमी !
गावातच काय सगळीकडेच पारंपारिक पद्धतीने सणवार साजरे करण्याबरोबर उधळपट्टीलाही महत्व आलेय...
उगाच शेतकर्यांवर टीका करण्यात पॉइन्ट नाही.
सद्ध्या सणवार म्हटले की पारंपारिक प्रथांबरोबर बॅनर्स लावणे, डीजे बोलावणे, व्हिडिओ शूटिंग, सेलेब्रिटी बोलावणे असले अत्याधुनिक आणि आचरट प्रकार असतात
हे खरे आहे. दहिहंडीला हॉलिवूडच्या सेलिब्रिटी सनीताई लिओन आल्या होत्या.
१. देशोन्नती दिवाळी अंक-२०१२ कधीही वाचणार नाही.
२. शेती नि शेतकर्यांच्या समस्या माहिती अस(ण्याचा आव आणणा)रांनी लिहीलेलं वाचणार नाही.
मुटे साहेब, नका हो नका.
बैलपोळा का साजरा होतो हे त्या बैलाला पण ठाऊक असतंय.
नि नागाला का दूध पाजतात ते नागाला पण!
किमान माहिती तरी घ्यायची हो सणवारांची. असो.
कमी माहितीवर काहीही लिहिले आहे . वारीला जाणारा बहुसंख्य वर्ग शेतकरी आहे. पाऊस पुढे मागे झाला कि त्याप्रमाणे वारीलाही गर्दी कमी जास्त होते . दरवर्षी बातम्यान्माधेही आपण हे वाचत असतोच .
बहिणीने भावाकडे किंवा भावाने बहिणीकडे जाणे आणि गोड धोड करणे यात वाईट काय आहे ? इतकी बचत केली पाहिजे का ? जो बैल वर्षभर सेवा करतो त्याचा सन शेतकरी उत्साहानेच करत असतो. त्यात बळजबरी कुठे दिसते ? वर्षातून एक दिवस शेतावर राबणाऱ्या लोकांना घरी जेवायला बोलावले आणि चार चांगले पदार्थ केले तर लगेच दिवाळे निघते का ? महिन्यात एक सण धरला तरी शेतकऱ्यांनी इतकेही गोड खावू नये कि काय ?
पिक आले कि खरे खर्चाचे कार्यक्रम सुरु होतात - लग्न वगैरे . शिवाय जत्रा त्यात गोड , तिखट , पिणे , तमाशा अशा सर्व योग्य अयोग्य हौस मौज . . पूर्वी कपडेही शिमग्याला नाहीतर पाडव्याला घ्यायची पध्दत होती . आता दिवाळीला घेतात .
फक्त खाली दिली, तेवढी वाचली, तर मोपासा वगैरेंच्या तोडीची कथा वाटते:
>>>>>>>>> " त्या दिवशी भल्या पहाटेच चक्रधर माझ्याकडे आला होता. त्याला माझ्याकडून प्रवाशीबॅग हवी होती पंढरपूरला जायला. असा अचानक चक्रधर पंढरपूरला जायची तयारी करतोय हे ऐकून मी उडालोच. आदल्या दिवशीच माझे त्याच्याशी बोलणे झाले होते. एका खासगी कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला चलतोस का म्हणून विचारले तर म्हणत होता की, त्याला निदान एक पंधरवडा तरी अजिबात फुरसत नाहीच. शेतीची आंतरमशागत करायचीय, फवारणी करायचीय, निंदन-खूरपण करायचेय.
चक्रधर शेती करायला लागल्यापासून पहिल्यांदाच त्याच्या शेतीत इतकी चांगली पिकपरिस्थिती होती. यंदा त्याने छातीला माती लावून सार्या गावाच्या आधीच कपाशीची धूळपेरणी उरकून टाकली होती. पावसानेही आपला नेहमीचा बेभरंवशाचा खाक्या सोडून चक्रधरला साथ दिली आणि त्याची कपाशीची लागवड एकदम जमून गेली. नशीब नेहमी धाडसी लोकांनाच दाद देत असते याची प्रचिती यावी असाच हा प्रसंग होता. त्यामुळे हुरूप आलेला चक्रधर दमछाक होईपर्यंत शेतीत राबायला लागला होता. त्याला विश्वास होता की, यंदा आपली "इडापिडा टळणार आणि सावकाराच्या पाशातून मुक्ती मिळणार". भरघोस उत्पन्न आले आणि कर्मधर्म संयोगाने जर भावही चांगले मिळालेत तर ते अशक्यही नव्हते. त्यामुळे कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला येत नाही म्हटल्यावर मलाही फारसे नवल वाटले नाही.
पण चक्रधर आता असा अकस्मात पंढरपूरला जायची तयारी करतोय हे मला अनपेक्षित होते. नेमके काय गौडबंगाल आहे हे जाणून घ्यायची माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी प्रथम त्याच्या हातात प्रवाशी बॅग दिली, प्रवासाला शुभेच्छा दिल्या, येताना माझ्यासाठी पांडुरंगांचा प्रसाद घेऊन यावा, अशी विनंती केली आणि मग हळूच विचारले होते,
"काय चक्रधर, असा अचानक कसा काय बेत आखला बुवा पंढरपूरचा?"
"आरं, मी कसला काय बेत आखतो पंढरीचा? तो पांडुरंगच मला बोलवायला आलाय ना स्वतःहून" इति चक्रधर.
"स्वतःहून थेट पांडुरंगच आला तुला निमंत्रण द्यायला?" आश्चर्याने डोळे विस्फारून मी विचारले.
"हं मग? इच्छा त्या पांडुरंगाची. दुसरं काय?" चक्रधर निर्विकारपणे सांगत होता.
"अरे, पण मी तर ऐकलंय की पांडुरंग निर्गुण-निराकार असतो. शिवाय तो बोलत पण नसतो" या विषयातील आपले तुटपुंजे ज्ञान उगाळत मी बोललो.
"तसं नाही रे, पंढरीचा विठोबा स्वप्नात आलाय तो त्या रावसाहेबांच्या" माझ्या प्रश्नाचा उबग आल्यागत चक्रधर बोलत होता. पण आता मला संवाद थांबवणे शक्य नव्हते. माझी उत्कंठा शिगेला पोचली होती.
"रावसाहेबांच्या स्वप्नात? रावसाहेब आणि तुला, दोघांनाही बोलावलं होय?" मी प्रश्न फेकलाच.
"आरं बाबा, तसं नाही रे. आत्ता पहाटेपहाटे विठोबा-रुक्मिणी दोघंबी रावसाहेबांच्या स्वप्नात आलेत आणि रावसाहेबांना आदेशच दिला की चक्रधरला तातडीने पंढरीला पाठवून दे. बिचारे रावसाहेब धावतपळत माझ्याकडे आलेत आणि म्हणालेत की, तू आताच्या आत्ता सकाळच्या गाडीने तातडीने पंढरपूरसाठी नीघ. मी पैशाची अडचण सांगायच्या आधीच रावसाहेबांनी माझ्या हातावर जाण्यायेण्याला पुरून उरतील एवढे पैसे पण ठेवलेत. लई मायाळू माणूस आहे बघा आपले रावसाहेब." माझ्या प्रश्नाच्या सरबत्तीला वैतागलेल्या चक्रधरने एका दमात सगळे सांगून टाकले आणि झपाझप पावले टाकत निघून गेला.
पंढरीची वारी करून चक्रधर जेव्हा परतला तेव्हा सारेच काही बदललेले होते. फवारणी अभावी कपाशीची वाढ खुंटून झाड खुरटले होते. मशागत व खुरपणी अभावी तणांची बेसुमार वाढ झाली होती. आल्याआल्या मशागत सुरू करावी तर पाऊस सुरू झाला होता. पाऊस नुसताच सुरू झाला नव्हता तर ठाण मांडून बसला होता. आकाशातील ढग पांगायचे नावच घेईना. म्हणजे झाले असे की, जेव्हा उघाड होती आणि मशागत करण्यायोग्य स्थिती होती तेव्हा चक्रधर पंढरपुरात होता आणि आता चक्रधर शेतात होता तर पावसामुळे मशागतीचे काम करणे अशक्य झाले होते. शेवटी तणाची वाढ एवढी झाली की शेतात जिकडेतिकडे गवतच गवत दिसत होते. कपाशी गवताखाली पूर्णपणे दबून गेली होती. त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. एकावर्षात सावकाराच्या म्हणजे रावसाहेबाच्या कर्जाच्या पाशातून मुक्त व्हायची गोष्ट दूर, उलट कर्जबाजारीपणाचा डोंगरच वाढत जाणार होता.
रावसाहेब सावकार मात्र आनंदी होते. त्यांनी स्वप्न पडल्याची मारलेली थाप त्यांना मस्तपैकी कामी आली होती."
कालांतराने चक्रधर आणि रावसाहेब कालवश होऊन पुढली पिढी आली.
चक्रधराच्या मुलाने रावसाहेबाच्या मुलाला सांगितले की त्याच्या स्वप्नात अमेरिकेचे प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंटीण आले आणि त्यांनी सांगितले की रावसाहेबाच्या मुलाला ताबडतोब लास वेगासला पाठव. भारतातील तारण ठेवलेल्या जमिनी, वस्तु इ. ज्याच्या त्याला देऊन उरलेली सर्व संपत्ती लास वेगासच्या कसिनो मधे लाव, तुला शंभरपट परत मिळेल.
रा.च्या मु. ने तसेच केले, सर्व संपत्ती हारला आणि लास वेगासच्या सडकांवर भीक मागू लागला...
.......अमेरिकेचे अनर्थशास्त्र भारताच्या अर्थशास्त्राला अत्यंत मारक आहे, ही खूणगाठ मनाशी बांधूनच पुढील वाटचाल होणे अत्यंत गरजेचे आहे.
... साठा उत्तरची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण.
प्रतिक्रिया
हां... आजकाल उगाचच काहीही
फालतुपणाचा कळस आहे हा लेख.
+१
.
एक * कमी पडलाय काय ?
नाही. बा** साठी ३ अक्षरी नैतर
हाय्ला.
भॅ भॅ भॅ आपलं हॅ हॅ हॅ
.
लेख अजिबातच पटला नाहि. सण हे
सद्ध्या सणवार म्हटले की
.
सद्ध्या सणवार म्हटले की पारंपारिक प्रथांबरोबर बॅनर्स लावणे, डीजे बोलावणे, व्हिडिओ शूटिंग, सेलेब्रिटी बोलावणे असले अत्याधुनिक आणि आचरट प्रकार असतातहे खरे आहे. दहिहंडीला हॉलिवूडच्या सेलिब्रिटी सनीताई लिओन आल्या होत्या.१. देशोन्नती दिवाळी अंक-२०१२
कमी माहितीवर काहीही लिहिले
कथा
टांगा पलटी घोडे फरार |
गोष्ट पुढल्या पिढीची
सही रे सही
उंट वर बसून शेळ्या वळणे
Pagination