Welcome to misalpav.com
लेखक: विसोबा खेचर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मिसळ पाव परिवारास शुभेच्छा :) गणपती बाप्पा मोरया अमोल केळकर

हार्दिक शुभेच्छा. मी मिपाचे वाचन अगदी पूर्वीपासून करत आलो आहे. वर्षभर नुसते वाचल्यावर सदस्यत्वासाठी अर्ज केला आणि नंतर ३-४ महिन्यांनी सदस्यत्व मिळाले.सदस्यत्व मिळाल्यानंतरही वर्षभर मराठी नीट लिहिता येत नसल्याने तसा वाचनमात्रच होतो. तरीही प्रत्येक लेख, प्रत्येक प्रतिसाद वाचला आहे इथला मी.मिपामुळे माझे जीवन अत्यंत समृध्द झाले आहे. सर्व संस्थापकांचे, संपादकांचे आणि सदस्यांचे आभार. मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जाओ आणि मराठी वेबसाईटमध्ये मिपाच पहिल्या क्रमांकाची वेबसाईट बनो ही शुभेच्छा. पुण्याचे वटवाघूळ

काव्य- शास्त्र - विनोदाने माणसाचे जीवन समृद्ध होते. मिपाने असे समृद्ध जीवन जगण्यची संधी मला दिली याबद्दल आभार ! मिपा ही मर्मबंधातील ठेव आहे !

मिपाचे संस्थापक, चालक, सल्लागार, कार्यकर्ते व सदस्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. संक्षी शी १००% सह्मत - इतकी सुरेख सजावट करणार्‍या अभ्यालाही अनेकानेक शुभेच्छा!!

नीलकांत आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. या वर्षात सापडलेला एक उत्तम कलाकार म्हणजे अभ्या. उत्तम सजावट करणा-या अभ्याला स्पेशल शुभेच्छा.....!!! -दिलीप बिरुटे (मिपाकर)