Welcome to misalpav.com
लेखक: इष्टुर फाकडा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आपण उत्तम लेख लिहिला आहे पण एक शंका आहे ...माझ्यामाहितीनुसार कुमार केतकर सध्या लोकसत्ता मध्ये नाही तर दिव्यमराठी मध्ये लेख लिहीत असतात. लोकसत्ताचे लेख गिरीष कुबेर लिहीत असतात.

लोक्सत्ताचे सद्ध्याचे सम्पादक गिरीश कुबेर आहेत.

प्रसून जोशी हा मनुष्यविशेष मला परवापर्यंत जरा 'सुलझा हुवा' वाटत होता... तिथे प्रसन्न जोशी पहिजे..... प्रसून बिचारा कविता लिहितोय....लिहु दे

http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-08-06/india/41130673_1_sikh-farmers-agricultural-lands-act-narendra-modi http://www.hindustantimes.com/India-news/NewDelhi/Modi-govt-lands-in-trouble-over-Sikh-farmers-eviction/Article1-1104336.aspx

प्रसन्न जोशी ह बर्‍याचदा बालवाडी मुलगा वाटतो. समोर कितीही मोठा माणूस असला तरी त्याला किम्मत न देणे. स्वतःला सर्वज्ञ समजणे हे गुण त्याच्यात आहेत. कधी कधी त्याला चर्चेमधे अलिप्त राहणे त्याला जमत नाही. अशा वेळी सुधीर गाडगीळ यांच्यासारख्यांची फार कमतरता जाणवते. असो अरुण टिकेकर, गिरीश कुबेर, विजय कुवळेकर, कुमार केतकर अशी माणसे कायमची लक्षात राहतात. प्रसन्ना काय आज आहे उद्या नाही. दुसरा तो नि वा. ("माधव भंडारी मला उत्तर हवय" किंवा "जिंतेंद्र आव्हाड, ब्रेकनंतर मी तुमच्याकडे येणार आहे") खोटा आक्रमकपणा दाखवत नौटंकी करत असतो

प्रसन्न काय, नि. वा काय....बरेचदा चर्चेचा निर्णय ठरवूनच चर्चा चालू करतात....राजीव खांडेकर त्यामानानं जरा ठिक बोलतो...

एकदा निखिल वागळे साहेब आजचा सवाल संपवुन घरी येतात. घरातले वातावरण गरम दिसते. श्रीमती रागावलेल्या असतात. श्रीमती : रोज रात्री 12 , 1 वाजतात यायला तुम्हाला, घराची तर काही काळजीच नाही. जेव्हा बघावं तेव्हा हातवारे करत बातम्या देता. रात्री झोपेत सुद्धा भाई एक मिनिट थांबा, चांदुलकर पूर्ण करा, अण्णा बोला बोला, मेधा ताई याच उत्तर द्या अशी नावं घेता. स्वतः झोपत नाहीच, मलाही झोपु देत नाही. वागळे(हातवारे करत) - काय मागण्या आहेत आपल्या? यावर आपणाला शांततेच्या मार्गाने उपाय काढता येणार नाही का ? श्रीमती - मलाही वाटतं, तुम्ही कधी तरी प्रेमाचेदोन शब्द बोलावे माझ्याशी, एखादी छानशी चारोळी लिहावी माझ्यासाठी, पण तुमचं आपलं फक्त आँफिस आणि बातम्या हं हं हअअअअअअ वागळे - ठीके, अहो तुम्ही रडु नका. यावर उपाय आहे. मला उत्तर देऊ द्या. हे माझं घर आहे, मला बोलु द्या. उत्तर देण्यापूर्वी आपण घेउया एक ब्रेक. ब्रेकवर जाण्यापुर्वी माझा प्रश्न पहा घरातील लोकांना मि वेळ देत नाही हा आरोप योग्य आहे का ? होय म्हणतात 99 टक्के लोक, जनता श्रीमतीच्या बाजुने आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी माझे उत्तर देखील ऐका, श्रीमतीजींसाठी एक चारोळी, तेरे प्यार में लिखे मैने हजारो खत, तेरे प्यार में लिखे मैने हजारो खत, अचूक बातमी ठाम मत पहा फक्त आयबीयन लोकमत....​

खत लिखा तो पोस्ट भी करना पडता है. बा द वे कुठलाही प्रश्न पडला की दहिहंडी फेम आव्हाडांना विचारावे. ते अतिशय धीरोदात्तपणे उत्तर देतात.

आजही हा धागा तितकाच रीलेव्हंट आहे म्हणून उजाळा दिला

मोदी यांचे टीकाकार त्यांचे जेव्ढे नुकसान करित नाहित तेवधे त्यांचे आन्धळे समर्थक करत आहेत. बाकी चालू दया

समर्थन आंधळे कि डोळस हे या लेखावरून ठरवत आहात काय? लेख मोदींच्या समर्थनासाठी नाही. लेख मोदींना त्यांच्याच पक्षातून विरोध का होत असावा याचा आढावा घेण्यासाठी एक नवीन बाजू प्रकाशात आणतो कि जी या आधी लक्षात माझ्यातरी आली न्हवती. बाकी जनरलायझेशनच करायचे असेल तर काय म्हन्ना नाय आमचा :)

मी कधि म्हन्तल की तुम्ही आन्धले समर्थक आहात अस. कैचया कई. मी तर सध्या सर्वत्र मोदी समर्थकान मध्ये जो उन्माद आहे त्या बद्दल बोलत होतो. बाकी उग्रवादी नेत्याना त्यांचयाच पक्षामधुन नेहमिच विरोध होतो. हिटलर ला सुद्धा विरोध zआला होता त्याचया पक्षामधुन.

मोदी यांचे टीकाकार त्यांचे जेव्ढे नुकसान करित नाहित तेवधे त्यांचे आन्धळे समर्थक करत आहेत.
याची मोदी समर्थकांपेक्षा मोदी विरोधकांनाच चिंता का असते हे मला न उलगडलेले कोडे आहे.मध्यंतरी काही चॅनेलवर ओपिनिअन पोल्स आले होते आणि त्यातून त्रिशंकू लोकसभा येणार असे निष्कर्श निघाले.त्यातून मग मोदींना इतर पक्षांचे समर्थन मिळणार नाही आणि सरकार स्थापन करायचे असेल तर भाजपला मोदींऐवजी वेगळा पंतप्रधान द्यावा लागेल अशा स्वरूपाचे चित्र उभे राहिले. असे झाल्यास नमो-नमो असा जप करणाऱ्या मोदी समर्थकांचे नंतर काय होणार अशा स्वरूपाचे किमान १२ फेसबुक पोस्ट मी स्वत: बघितलेले आहेत.मला एक प्रश्न नेहमी पडतो मोदी समर्थकांचे जे काय व्हायचे ते होईल त्याची चिंता इतरांनी करायचे काय कारण आहे? बाकी चालू द्या.

हात तिच्या ! तुम्ही आकाशाखालील प्रत्येक गोष्टिवार मत मोठ मोठे प्रतिसाद पाडुन दयायची. इतारानी तस करायला गेल तर तुम्ही फिकीर का करता म्हनून विचारपुस करता? भले!

तुम्ही आकाशाखालील प्रत्येक गोष्टिवार मत मोठ मोठे प्रतिसाद पाडुन दयायची.
अच्छा म्हणजे आकाशाखाली केवळ अर्थशास्त्र, राजकारण अशा स्वरूपाच्या ४-५ गोष्टीच आहेत तर.याची कल्पना नव्हती. धन्यवाद.

मोदीसमर्थकांची आपण काळजी करतो आहोत असे भासवून अंतस्थ हेतू त्यांच्या खच्चीकरणाचाच असतो.

मला एक प्रश्न नेहमी पडतो मोदी समर्थकांचे जे काय व्हायचे ते होईल त्याची चिंता इतरांनी करायचे काय कारण आहे?
नेमके =)) अहो चिंता करितो विश्वाची छाप मतपिङ्का टाकून वर प्रतिपक्षाला झोडण्याचे एक विकृत सुख मिळते त्याची बरोबरी कशानेही होऊ शकत नै.

चिंता करितो विश्वाची छाप मतपिङ्का टाकून वर प्रतिपक्षाला झोडण्याचे एक विकृत सुख मिळते त्याची बरोबरी कशानेही होऊ शकत नै.
अगदी अगदी.हा ढोंगी प्रकार त्याच्यामुळे अगदी भयंकर डोक्यात जातो. बहुदा अशा ढोंग करणाऱ्या अहो रूपम अहो ध्वनीम छाप प्रतिसादांना "मार्मिक" इत्यादी श्रेणी इथे मिळत नाही हे कारण असावे कदाचित :)

अरे मधले एक वाक्य चुकून डिलिट झाले की काय? सुधारित प्रतिसादः अगदी अगदी.हा ढोंगी प्रकार त्याच्यामुळे अगदी भयंकर डोक्यात जातो. असे प्रकार हल्ली मिपावर त्यामानाने कमी दिसतात. बहुदा अशा ढोंग करणाऱ्या अहो रूपम अहो ध्वनीम छाप प्रतिसादांना "मार्मिक" इत्यादी श्रेणी इथे मिळत नाही हे कारण असावे कदाचित :)

एकाच वृत्तसंस्थेचे मराठी वृत्तपत्र काँग्रेसधार्जिणी भुमिका घेते आणि इंग्रजीतले काँग्रेसला हाणते..

होनारच कारन त्याना माहीत हाय म्हारात्रात हिन्ग्रजी लै कमी लोकास्नी समजता,काय मी जे बोल्लु ते बराबर का न्है ?

सुमार 'घेत'करी परंपरा अबाधित असल्याचे पाहून डोळे पाणावले. तसंही लोकसत्ता कधीच आवडला नाही. आपले अस्सल ब्रँड तीनच - पुढारी,पुण्य नगरी आणि संध्यानंद ;)

लोकसत्ता - मुंबईकरांना काही आवडते, पुणेकर कसा चोखंदळ...

राजनाथ : आडवाणी जी , अब मान भी जाइए आडवाणी : ना , मैं ना मानूंगा राजनाथ : ऐसा क्या करते हैं आडवाणी जी , मेरी बात रख लीजिये आडवाणी :बिलकुल नहीं , मैं मोदी से सहमत नहीं राजनाथ : देखिये जनता चाहती हैं मोदी को , हमें जनहित में चलना होगा आडवाणी : कदापि नहीं , अगर मोदी आये तो मैं इस्तीफा दे दूंगा राजनाथ : देखिये अब मोदी ही पीएम कैंडिडेट होंगे ,आप माने या ना माने आडवाणी : आपको मोदी और मुझमे से किसी एक को चुनना होगा राजनाथ : ह्म्म्म..ठीक हैं फिर, मैं चलता हु आगे आपकी मर्जी..मैं मोदी के साथ हु आडवाणी :hmmmm ........... राजनाथ जाने को खड़े हुए , दरवाज़े तक पहुचे ही थे की पीछे से आवाज़ आई आडवाणी :राजनाथ जी | राजनाथ : जी , आडवाणी जी आडवाणी : ऐसे क्या जा रहे हैं , अरे मैंने ना मानने की कसम थोड़े ही ना खा रखी हैं , थोडा जोर देकर मनाइए आई-शपथ मैं मान जाऊंगा

लेखातील भावना आवडल्या पण मुद्दे पटले नाही. ह्याच दिल्लीला स्वदेशी शिक्षण घेतलेले साधे वाजपेयी चालले अगदी देवी गौडा ते वि पी सिंग चालले त्यामुळे मोदी ह्यांना लेखात दिलेल्या निकषात ते बसत नाही म्हणून विरोध होत नसावा. किंबहुना भारतातील ७० टक्के कंपन्यांचे सी इ ओ ह्यांनी मोदी ह्यांच्या नावाला पसंती दिली युवराजांना ५०० कोटीचे कंत्राट द्यावे लागले. आज सगळ्यात हायटेक नेता म्हणून मोदी ह्यांचे नाव आहे. मोदी ह्यांना विरोध ह्यासाठी की हाच एक नेता जनतेला आपल्या पाठी उभा करू शकतो ह्याला व्यवस्थेत परिवर्तन आणायचे आहे गुजरात सारखा भारताचा विकास करायचा आहे. त्यांचे विकासाचे मॉडेल परिपूर्ण नसेल कदाचित त्यांच्या विचारसरणीवर काहीच आक्षेप असेल पण सध्याच्या नेत्यांच्या मांदियाळीत तेच उजवे आहेत. त्यांना तुलना देणारा देशी व विदेशी लोकप्रियता व हवा असलेला नेता सध्या भारतात नाही येथे कोण कोण पंतप्रधान होऊन गेले मग मोदी ह्यांनी काय पाप केले आहे.

वाजपेयी हे नेमस्त, व्यवस्थेला आव्हान न देता कलाकलाने जाणारे नेते म्हणून ओळखले जात होते. बाकी देवेगौडा हा शुद्ध अपिरीहार्यतेतून झालेला अपघात होता हे कोणीही मान्य करेल. व्ही पी सिंग- माहित नाही. मुख्य आक्षेप महा'रथी' वर आहे. शिवाय, मोदी हा माणूस सत्तेवर आला कि दिल्लीतली परिमाणे बदलून जातील कि काय हि भीती बाकी नेत्यांना आहे असा लेखातला भाव आहे ज्याला मी तरी सहमत आहे.

||सध्या भारतात दाढ्या कुरवाळणाऱ्या तर महाराष्ट्रात शेंड्या पिरगाळणाऱ्या लोकांना अनुक्रमे धर्मनिरपेक्ष व पुरोगामी असे म्हणतात.||

फाकडा साहेब तुम्ही तुमच्या लेखाशी सहमत असालच त्यात नवल ते काय समाजवाद आणि सर्वधर्मसमभाव या दोन कल्पना लुत्येन दिल्ली मधल्या वलयांकित भागात ज्यांची उठबस असते अशा लोकांना अतिशय पवित्र अशा आहेत. सर्वच उच्च राजकीय नेत्यांना किंवा महत्वाच्या संसदीय महारथींना या पंचतारांकित 'क्लब' मध्ये प्रवेश मिळेलच असे नाही. तुम्हाला राजकीय राजपुत्र असणे किंवा थंड हवेच्या रमणीय ठिकाणांहून इंग्रजी भाषेत तुमचे वलयांकित शिक्षण झालेले असणे या गोष्टी सहज वाजतगाजत प्रवेश मिळवून देतात. अशा वातावरणातून आलेल्या हुच्च लोकांना इथले नियमही समजण्यास सोपे जातात. त्यातला एक अधोरेखित नियम म्हणजे सेक्युलर आणि लिबरल मते'च' व्यक्त करायची असतात आणि महनीय घराण्याबाबत उगी राहावयाचे असते. असे उगी राहिले कि कौटुंबिक लोकशाहीमुळे अतिशय स्पष्ट दिसणारी हानी देशाला होत असूनही माध्यमांमध्ये त्याचा गवगवा होत नाही. मला हे मुद्दे पटले नाहीत. मुळात मोदी हे गुजरात चे मुख्यमंत्री गुजरात जो आधीपासून विकसित होता त्याला त्यांनी अजून विकसित केला. राहिला प्रश्न परदेशात , शिक्षण , ते विंग्रजी भाषा न बोलणे व उच्चभ्रू संस्कृती त न झालेले बालपण तर गुजराती धीरु भाई अंबानी सुद्धा ह्या निकषात बसत नव्हता तरी त्यांनी दिल्ली व तेथील नेते आपल्या मुठीत ठेवले. आज अंबानी भाऊ ते टाटा असे भारतातील उद्योग जगतातले दोन प्रमुख खेळाडू , दोघांच्या मानसिकता , व्यापारिक धोरणे ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे मात्र दोघांच्या लेखी आदर्श नेता नरेंद्र मोदी आहेत. जागतिक पातळीवर बोलबाला असलेले आजच्या घडीला मोदी हे एकमेव नाव आहे , मनमोहन ह्यांची आंतरराष्ट्रीय जगतात त्याच्या हुशारीमुळे कौतुक होते , पण ते राजकारणी नाहीत हे परदेशात काय देशात सुद्धा सगळ्यांना माहिती आहे तेव्हा जागतिक पातळीवर नावाजलेला आजच्या मितीत एकमेव नेता म्हणजे नमो

निनाद, लेख माझा नाही. प्रस्तावना माझी आहे. लेख इंडिअन एक्स्प्रेस च्या तवलीन सिंघ यांचा आहे. बाकी तुमच्या मताचा आदर आहेच.
गुजरात जो आधीपासून विकसित होता त्याला त्यांनी अजून विकसित केला.
यासाठी काही आकडे आकडे या दुव्यावरून थोडी कल्पना यावी...

नेत्याचे आंधळे समर्थक आंधळेपणाने व नेत्याबद्दल फक्त चांगले बोलतात. मे २०१४ पासुन समर्थक असे बोलतात की जणु काहि याआधील सरकारने गेल्या ६० वर्षात फक्त न फक्त वाइट गोष्टी केल्या आहेत कोणत्याही चांगल्या गोष्टी केल्या नाहीत. (सोयिस्करपणे भा. ज. प. पंतप्रधान वाजपेयी यांच्या कालखंडातील चुका , भ्रष्टाचार विसरतात ) कट्ट्र देशभक्तीसाठी आपण इस्राएल चे उदाहरण हमखास उल्लेखले जाते. इस्राएला कधी त्याच्या शत्रुपक्षाबद्दल चांगले बोलताना एकतो का आपण. उदो उदो ची वैयक्तिक चीड येते, कारण मे २०१४ पासुन सोशल मिडिया व मेसेंजिंग अॅपवरून असे सांगण्याचा प्रयत्न होत आहे कि जर तुम्हि पंतप्रधान समर्थक नाही तर तुम्हि हिन्दु नाहि, कट्टर हिन्दु फार दुरची बाब (मला आलेल्या वैयक्तिक मेसेजवरून वरुन बोलत आहे.). मी हिन्दु आहे, माझा धर्म ही माझी वैयक्तिक बाब आहे. म. टा. दिनाक २६ जुलै २०१४ (link : http://maharashtratimes.indiatimes.com/archivelist.cms?year=2014&month=7...) उघडुन " संजय राऊत " यांच्याविषयी एक बातमी आहे ती वाचा. पंतप्रधान नाराज का होतात ?? माझ्या धर्मावर का बोट करता ?? एक पक्ष/ व्यक्ती माझा धर्म ठरवु शकत नाहि, पंतप्रधान काश्मीरमध्ये इफ्तार मेजवानी देण्याची शक्यता अशी बातमी वाचली जर इफ्तार मेजवानी झाली तर मी हसु का रडु ??

>>> कट्ट्र देशभक्तीसाठी आपण इस्राएल चे उदाहरण हमखास उल्लेखले जाते. इस्राएला कधी त्याच्या शत्रुपक्षाबद्दल चांगले बोलताना एकतो का आपण. इस्राएलच्या शत्रुपक्षाबद्दल (पॅलेस्टाईन, इराक, इराण, जॉर्डन, सीरिया, लेबानन, लीबिया इ.) चान्गले बोलण्यासारखे काही असेल तर त्याची माहिती द्यावी. पराकोटीची धर्मान्धता, देशात व जगभर पसरवलेला दहशतवाद, रक्तपात, सातत्याने होणारे बॉम्बस्फोट, स्त्रियान्ची सर्व बाजूने गळचेपी व अत्याचार, हुकूमशाही, ६ व्या शतकात देण्यात येणार्‍या क्रूर शिक्षा (दगडाने ठेचून मारणे, हातपाय तोडणे, शिरच्छेद करणे, चाबकाचे फटके इ.), लोकसन्ख्यावाढीचा प्रचन्ड वेग, . . . याव्यतिरिक्त या देशात काही आहे का? >>> पंतप्रधान काश्मीरमध्ये इफ्तार मेजवानी देण्याची शक्यता अशी बातमी वाचली जर इफ्तार मेजवानी झाली तर मी हसु का रडु ?? ही बातमी खोटी होती हो. मोदी व भाजपबद्दल अशा अनेक खोट्या बातम्या पसरविल्या जातात. काही उदाहरणे - (१) मे २०१४ च्या निवडणुकीत 'प्रियान्का माझ्या मुलीसारखी आहे' अस मोदी एका मुलाखतीत म्हटल्याचे पसरविले गेले. या बातमीवर प्रियान्काची प्रतिक्रिया विचारल्यावर तिने जाहीर सन्ताप व्यक्त केला. शेवटी भाजपने या मुलाखतीची कोणतीही काटछाट नसलेली चित्रफीत प्रसिद्ध केल्यावर असे दिसून आले की मोदी असे अथवा त्याच्या जवळपास अर्थ होईल असे काहीही म्हटले नव्हते. (२) २०१४ मध्ये भाजप सत्तारूढ झाल्यावर जे पहिले अन्दाजपत्रक आले, त्यात कॅन्सरवरील कोणत्यातरी विशिष्ट औषधाची किन्मत ८ हजार रू. वरून १ लाख रू. पर्यन्त वाढविल्याचे माध्यमान्नी पसरविले. प्रत्यक्षात अशी कोणतीही वाढ झाली नसल्याचे सिद्ध झाले. (३) नीलगायीन्च्या शिकारीला परवानगी दिली आहे, असे प्रकाश जावडेकर म्हटल्याचे एका वृत्तपत्राने छापले. प्रत्यक्षात असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. (४) 'अच्छे दिन' येण्यास २५ वर्षे लागतील असे अमित शहा म्हटल्याचे २-३ दिवसान्पूर्वी अनेक माध्यमातून जाहीर केले गेले. शेवटी भाजपने अमित शहान्च्या भाषणाची चित्रफीत दाखविल्यावर त्या सम्पूर्ण भाषणात 'अच्छे दिन' हा शब्दच नव्हता व भारताला 'सर्वोच्च सत्ता' बनण्यास २५ वर्षे लागतील असे म्हटल्याचे स्पष्ट दिसून आले. त्या भाषणात अमित शहान्नी असे म्हटले होते की ५ वर्षात गरीबी, बेरोजगारी, महागाई इ. कमी करता येईल परन्तु भारताला सर्वोच्च स्थान मिळण्यासाठी २५ वर्षे लागतील. माध्यमान्नी हे वाक्य ट्विस्ट करून 'अच्छे दिन' येण्यास २५ वर्षे लागतील असे अमित शहा म्हणल्याचे दिवसभर सान्गत होते. (५) २०१४ मधील निवडणुक प्रचारात मोदीन्नी एका भाषणात असे सान्गितले होते की, "भारताबाहेर इतका काळा पैसा आहे की जर तो सगळा काळा पैसा भारतात परत आणता आला तर प्रत्येक कुटुम्बाला १५-२० लाख रूपये मिळू शकतील." या भाषणाची चित्रफीत तूनळी वर उपलब्ध आहे. माध्यमान्नी या वाक्याचा असा प्रचार केला की "काळा पैसा परत आणून मोदी प्रत्येक भारतीयाला १५ लाख रूपये देणार असे म्हणाले." भाजप/मोदी इ. ची वाक्ये मुद्दाम ट्विस्ट करून चुकीचा प्रचार करणे हे पूर्वीपासूनच सुरू आहे. त्यात आता भर पडली या इफ्तार पार्टीची. मोदी काश्मिरमध्ये इफ्तार मेजवानी देणार असा खोटा प्रचार माध्यमान्नीच सुरू केला. प्रत्यक्षात अशी कोणतीही योजना नव्हती. पन्तप्रधान कार्यालयानेही असा कोणताही कार्यक्रम ठरविला नव्हता. आज मोदी काश्मिरमध्ये आहेत व असा कोणताही कार्यक्रम ठरलेला नाही. रमझान महिना सम्पलेला असल्याने असा कोणताही कार्यक्रम होण्याची शक्यता नाही. मोदी अशी मेजवानी देण्याचा कोणताही अधिकृत कार्यक्रम नव्हता. उलट मोदीन्नी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीन्नी आयोजित केलेल्या इफ्तार मेजवानीला दान्डी मारली होती. http://www.loksatta.com/sampadkiya-news/modi-not-going-to-iftar-party-1123694/ माध्यमे भाजप/मोदी इ. बद्दल सातत्याने अपप्रचार करीत आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले.

हे वाचा ... Indian Media Watch.... Changing The Way We Consume News हा त्यांचे ब्रिद आहे. लेखक त्याच्या ब्लॉग वर उत्तमोत्तम लेख लिहीत असतात. काही नमुने १. अर्णबगेट भाग १ व २ अर्णबगेट भाग १ व अर्णबगेट भाग २ २. तिस्ता रुदाली तिस्ता रुदाली ३. भक्तोफोबिया भक्तोफोबिया ४. CNN-IBN CNN IBN वैगेरे अवश्या वाचा लेख मुळात इंग्रजीत वाचण्यातच मजा आहे.