Welcome to misalpav.com
लेखक: इष्टुर फाकडा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

जबरदस्त लेख आहे. तिस्ता सेटलवाड्चे कट्टर हिन्दूविरोधी चेहरा अगदी बरोबर समोर आणला आहे. माध्यमे एखाद्याला कशी फाडून खातात याचे अजून एक उदाहरण म्हणजे अडवाणी. अडवाणीन्नी २००५ मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती. तिथे जिनाच्या थडग्याला भेट दिल्यावर ते पत्रकारान्शी बोलताना म्हणाले की, "पाकिस्तानच्या स्थापनेनन्तर पाकिस्तानी सन्सदेत जिनान्नी जे पहिले भाषण केले त्या भाषणात धर्मनिरपेक्ष सरकार व देश कसा असावा याचे उत्कृष्ट वर्णन होते. जर पाकिस्तान भाषणात वर्णिलेल्या मार्गावर चालला असता, तर आज पाकिस्तान धर्मनिरपेक्ष देश बनला असता." वरील वाक्यान्चा माध्यमान्नी विपर्यास करून असा गहजब माजवला की 'अडवाणीन्नी जिनाला धर्मनिरपेक्ष असे प्रमाणपत्र देऊन स्तुती केली'. प्रत्यक्षात ते म्हणाले होते की जिनाचे धर्मनिरपेक्षतेवरील भाषण (जिना नव्हे, त्याचे भाषण) उत्कृष्ट होते व ते असेही म्हणाले की पाकिस्तानने त्या मार्गावर चालायला हवे होते (पाकिस्तान धर्मनिरपेक्षतेच्या मार्गावर न चालल्यामुळे धर्मान्ध देश बनला हेच त्यातून सूचित केले होते.). परन्तु माध्यमान्नी त्यान्च्या वाक्यान्ना इतका विचित्र ट्विस्ट देऊन गहजब केला की त्याची अडवाणीन्ना मोठी किम्मत द्यावी लागली. पक्षाध्यक्षपद गेलेच व 'जिनाची स्तुती केली' अशी अवहेलना सर्वत्र सहन करावी लागली.