माझे साप/नाग या विषयी काही (गैर) समज/प्रश्न आहेत. कृपया प्रकाश टाकावा.
१) सापाला तीव्र प्रकाश सहन होत नाही. कधी साप निघाल्यास तीव्र प्रकाश टाकून त्याला पळवून लावता येईल का?
२) साप शक्यतो ओल्या आणि थंड जागेत जात नाहीत. साप निघाल्यास पाणी टाकून बचाव करता येईल का?
३) सर्प दंश वरचे injection काही ठराविक ठिकाणीच का मिळते? आणि ती emergency मध्ये ती ठिकाणे कशी शोधायची? प्रार्थमिक उपचारांची माहिती द्या.
४) बचावाच्या काही पद्धती सांगा.
१ आणि २ - माझ्या माहितीनुसार बरेचसे चुकीचे. जेडी सांगतीलच.
३. ग्रामीण भागात दुर्दैवाने तालुक्याच्या ठिकाणीच आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रावर प्रतिविष उपलब्ध असते - तेही नेहमी असेलच असे नाही. शहरी भागात सरकारी रुग्णालयांमध्ये असते. प्रथमोपचारांबद्दल सांगायचे झाले तर जखम स्वच्छ धुणे आणि रुग्णाला धीर देत, शांत ठेवत सर्वात आधी डॉक्टरांकडे न्यावे हेच योग्य आहे. जखमेच्या ठिकाणी काप वगैरे घेऊ नयेत किंवा विष जखमेतून तोंडाने शोषून घेऊन थुंकणे असे काही प्रकार करू नयेत. रुग्णाची हालचाल कमीत कमी व्हावी अशी काळजी घ्यावी. बरेचदा चावलेला साप बिनविषारी असतो किंवा झालेला दंश हा ड्राय-बाईट प्रकारचा असतो. तरीही वैद्यकीय उपचार त्वरित मिळतील हे पहावे हेच उत्तम.
४. बचाव म्हणजे लांब राहणे. साप काही तुमच्याविरुद्ध युद्धाचा बिगुल वाजवून तुमच्याशी लढायला येत नाहीत. तसेच ते विनाकारण तुमचा चावाही घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. आपण जेवढे सापांना घाबरतो त्यापेक्षा जास्त ते आपल्याला टरकून असतात. फक्त त्यांच्या वाटेला (कळत वा नकळत) जाऊ नये.
१)हा गैरसमज आहे, उलट तीव्र प्रकाश टाकला तर तो थोडा वेळ बावचळून जाऊ शकतो पण त्या नंतर तो चवताळून हल्ला करेल.
२)साप हा पृथ्वीवर करोडो वर्ष आहेत, त्यामुळे जवळपास सगळ्या परिस्थिती त्यांना जगायला जमते. पाणी टाकून नाही पण घराच्या बाजूला फिनेल (किंवा उग्र वासाचे केमिकल) टाकल्यास जास्त करून साप फिरकत नाहीत.
३)आणि ४) उत्तरे स्वॅप्स मस्त दिली आहेत, अजून माहिती पाहिजे असल्यास, या लेखाच्या प्रतिसादात पहावी.
आमच्याकडे एक परड जातीचा साप सापडतो म्हणे(मी पाहिलेला नाहि). लोकांचा असा गैरसमज आहे कि तो साप जोरात माणसावर फूंकतो व तो माणूस म्हणे जाम म्हशी सारखा फूगतो. मला वाटते तो कदाचित घोणस असेल. कारण घोणस दूरुनच एव्हड्या वेगाने एखाद्यावर वार करत असेल कि पाहणार्याला वाटत असेल कि त्याने नूसते फुंकले आहे . त्यामूळे अशी धारणा तयार झाली असेल.
का खरच असा एखादा साप सापडतो का महाराष्ट्रात?
ह्याच्याशी दोनदा जवळून गाठ पडली. एकदा आहुप्याच्या वाटेवर आणि एकदा आमच्या घराच्या मागच्याच घरात. आहुप्यावरून परत येताना हा गाडीच्या उजेडात दिसला. स्वारी आरामात फुल्ल टाइट झाल्यासारखी हळूहळू रस्ता ओलांडत होती. एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे झोकांड्या खात जाणार्या दारुड्यागत हीपण कधी थोडी इकडे तर कधी थोडी तिकडे जाई. मग जरा वेळ गल्लीतलं आपलं घर किती नंबरचं हे विसरल्यागत वाईच दम खाई. पुन्हा किक बसल्यागत हिची गाडी चार पावलं पुढे सरके. बहुधा रात्रीचे भोजन जरा जास्तच झालं असावं.
इकडे आमचा जीव टांगणीला. आम्ही गाडी थांबवली असली तरी दुसरी गाडीपण थांबेनच हे कशावरून. खाचक्कन एखाद्या जोरात असलेल्या डायवरने घातली अंगावरून की ही देखणी त्वचा एका मृतप्रायः शरीरावर पहावी लागली असती... त्यात गाडीतले काही अतिउत्साही गडी खाली उतरून जवळून बघायला धावले. त्यांना आवरायला जीव खाऊन शिव्या देत आणि मागे ओढत शेवटी ह्या तरूण रक्तांना हिमोटॉक्सिनपासून कसंबसं वाचवलं. तिकडे ती शांतपणे गवतात अदृश्य झाली आणि हायसे वाटून आम्ही आमचा मार्ग धरला. पण जाताजाता तिने माझ्या कॅमेर्यासाठी एक मस्त पोज दिली. :)
दुसरी भेटली तीपण अशीच शांत आणि निवांत. नाग आणि घोणस हे निदान मलातरी जेव्हा जेव्हा भेटलेत तेव्हा तेव्हा ते अतिशय शांतपणे वागले आहेत. दोन्हीही आधी तिथून निघून जाण्याचा म्हणजेच संघर्ष टाळण्याचाच प्रयत्न करतात हे मात्र नक्की. दुसरीने मस्तपैकी इंग्रजी S चा आपला टिपिकल पवित्रापण घेऊन दाखवला. पण तो थोडावेळच. तिलाही सुरक्षित नेऊन सोडले जवळच्या शेतात. मात्र लोकांना तिला मारलं का नाही हे समजावता समजावता जाम दमछाक झाली नंतर - विशेषतः जेव्हा ती घोणस होती आणि तिच्यापासून लांब का रहायचं हे सांगितल्यावर जसा इथे प्रतिक्रियांना घाम फुटला आहे तसेच तिथे प्रेक्षकांना झालं होतं.
तर असोत. ही ती लावण्यवती -
कशी आहे? :) हेमांगी-मस्तकबाणधारिणी-कृष्णपुष्पदलत्रिपट्टवस्त्रांकित-सर्पकन्या...
काही नाही खरेसाहेबांना व्यनि करायचा ताबडतोब. =))
जोक्स अपार्ट, सापांबद्दल जर माहिती नसेल (दुरुस्ती - पूर्ण माहिती नसेल) तर त्यांच्या वाटेला मुळीच जाऊ नये. तेही आपल्या वाटेला जात नाहीत. आणि माहितीही असली तरी विनाकारण - सापाच्या किंवा त्यापासून इतरांच्या जीवाला जर धोका नसेल तर - निसर्गात ढवळाढवळ करू नये हे तत्त्व मी कसोशीने पाळतो. एका भटकंतीला अरण्यात कोरड पडलेल्या नदीपात्राच्या किनार्यावर असाच आम्हांला धामणींचा एक जोडा सकाळच्या उन्हात कातळावर सळसळताना दिसला. आमचा एक सर्पमित्र लगेच ओरडतबिरडत त्यांच्यापाठी त्यांना पकडण्यासाठी धावला. त्याला थोपवून फक्त हे विचारलं - तू त्यांच्या घरात आला आहेस ना, मग?... त्यालाही नशीबाने हे पटले आणि त्या मीलनातूर जोड्याला छानपैकी त्यांच्या मधुर एकांतात सोडून 'ऑल द बेस्ट' करून आम्ही पुढे निघालो. :)
थोडेसे अवांतर - सापांना जास्त त्रास स्वयंघोषित आणि स्वयंप्रेरित सर्पमित्रच जास्त देतात असे माझे मत होऊ लागले आहे. माणसांचे हे दोनच प्रकार अलिकडे जास्त दिसून येतात. एक म्हणजे साप दिसला रे दिसला की काठी घेऊन (मारायला) धावणारे अज्ञानी सामान्यजन आणि काठी घेऊन (पकडायला) धावणारे अर्धज्ञानी सर्पमित्र. त्यातही दुसरे त्यांच्या अतिउत्साहीपणामुळे सापाला पोत्यात घालण्याऐवजी गोत्यातच जास्त घालताना दिसतात. असोत.
पहिल्या सर्पकन्येच्या बाबतीत आम्ही तिच्या घरी आलो होतो आणि स्वतःहून हायहॅलो करत तिचा पाहुणचार घ्यायचे त्यामुळेच टाळले. दुसरी मात्र लोकांच्या इतकी जवळ होती की एकतर चुकून कोणाचा पायबिय पडून तो सरळ ढगात गेलातरी असता किंवा पहारीचा वा दगडाचा एक घाव हिच्या माथी दाणकन् बसलातरी असता. म्हणून दुसर्या परिस्थितीत मात्र हस्तक्षेप केला.
साप पाहून लटपटायलाच होतं पण.. तो ओळखेपर्यंत डोळे मिटायचे.. :)
विषारी साप, भक्ष्याला विषाने मारुन मग आरामात खात बसतात मग बिनविषारी साप कशी करत असतिल शिकार. विशेषतः उंदीर वगैरे चपळ प्राण्याची?
Dear Mr. Daniel,
Myself is Upendra Nirgudkar from Pune. I am a volunteer of Katraj Snake Park, Pune.
Kindly let me know your full name.
Upendra Nirgudkar.
Upendra1970@rediffmail.com
पाहुनच टाईट झाली आहे. संपुर्ण लेखमाला अतिशय माहितिपुर्ण आहे. पण उपास म्हणलेत त्या प्रमाणे...."साप पाहून लटपटायलाच होतं पण.. तो ओळखेपर्यंत डोळे मिटायचे.."
नाग, मण्यार, घोणस ह्यांची स्वभाववैशिष्ट्ये अगदी वाचनीय आहेत. निव्वळ साप कसे दिसतात त्याबरोबर हेही सांगणे उपयुक्त आहे. पर्यटक, गिर्यारोहक, भटके, सामान्य लोक अशांची ह्या सर्पश्रेष्टांशी कधीही गाठ पडू शकते. त्यावेळी त्यांचे स्वभाव आठवले तर कुणाला इजा न होऊ देता (सापालाही) सुटायला मदत होईल असे वाटते.
त्यातही आपली आलंकारिक भाषा, सर्वांच्या ओळखीची रुपके वापरुन विषय सोपा करुन सांगणे अगदी मस्त वाटते.
पण मला असा प्रश्न आहे की सगळे घोणस एकसारखे असतात का? त्यांच्यात अजून वेगवेगळी स्वभाववैशिष्ट्ये नसतात का? माणसात कुणी शांत असतो तर कुणी तापट तसे ह्या (व अन्य) सापांच्या एकाच जातीत वैविध्य नसते का?
ह्या सर्पांच्या पिल्लांचे वागणे कसे असते? पिल्ले छोटी असली तरी त्यांचे वीष जालीमच असते असे ऐकून आहे. पिल्लांच्या चावण्यामुळे वीष जास्त भिनते का कमी? आईबाप सापांच्या पिल्लांचे रक्षण करतात का?
मी नागाच्या पिल्लाबद्दल लिहिले होते ते सगळ्या विषारी सापाच्या पिल्लांना लागू होते.
नागच्या (कोणत्याही विषारी सापाच्या) पिल्लामध्ये पण पूर्ण विकसित झालेल्या विष-ग्रंथी असतात, आणि विष पण मोठ्या नागापेक्षा जहाल असते. कारण विष-ग्रंथीचा आकार छोटा असल्यानेमुळे त्यांना कमी विषात जास्त मोठें भक्ष मारून पचवायचे असते.(त्यांना त्यांच्या आया ग्राईप वाटर पाजत नाहीत ;)). म्हणून लहान पिल्लू बघून त्याला हलगर्जी पणे हाताळायला जाऊ नका, ते पण मोठ्या नागासारखेच तुम्हाला पोचवू शकते.
आई- बाप पिल्लांचे रक्षण करतात का ते मला माहित नाही, पण किंग कोब्राचा मेंदू सापांमधील सगळ्यात विकसित मेंदू असल्याने त्याची मादी अंड्यांचे रक्षण जीव तोडून करते.
मला साप पकडताना जाणवायचे की काही साप (एकाच जातीचे) शांत आहेत, पण ते परिस्थितीवर (आधीची इतिहास, तापमान इ.)पण अवलंबून असेल. ढोबळ स्वभाव धरूनच काम करायला लागते नाही तर अपघात व्हायची शक्यता असते. आता जी लोक या क्षेत्रात ३०-४० वर्षे आहेत ते अंदाज लावू शकतात पण १०० % खात्री कोणीच देऊ शकत नाही.
किंग कोब्राची मादी वेळुच्या पानांचा ढिगारा करुन त्यात अंडी घालते. आमच्या शेतात जोवर वेळुचे बन होते तोवर तेथे हा लांबच्या लांब साप दिसायचा.(पूर्वज)
पण किंग कोब्रा हा कॅनिबल असल्याने ज्या क्षणी अंड्यातले जीव वळवळु लागतात त्या क्षणी मादी घरट सोडते. कारण तिचा स्वतःचा स्वभाव साप खाणे हा असतो. तरीही....आईपणाला जागुन ज्या पद्धतीने ती घरट्यापासून दुर जाते ते पहाता, खरेच त्यांचा मेंदू विकसित असावा.
हे नुकते जन्मलेले नाग एकदा गंजीत सापडले होते, लांबवरुन काठेने ढोसलुन एका बुट्टीत भरुन मग बुट्टी पेटवली होती. :( यु माईट फील सॉरी पण आवारात बैल, म्हशी कुत्री,, कोंबड्या आणी काम करणारी माणसे एव्हढ्या सगळ्यांच्याकडे पहाता तेच उचित होते.
ही जन्मलेली पिल्ले झाडावर चढुन बसतात अन त्यातल्या काठ्यांमध्ये अगदी बेमालुन मिसळुन जातात. जोवर त्यांचा आकार अन पळ्णे डेव्हलप होत नाही तोवर अशी झाडावरच रहातात.
ट्रेक ला जाताना एक काठी बरोबर घेऊन जावे आणि गवताळ भागातून चालताना काठी जमिनीवर आपटत चालावे म्हणजे काठीने जमिनीत निर्माण होणार्या कंपनानी साप सावध होऊन दूर जातो शिवाय आयत्या वेळी हे शस्त्र केंव्हाही उपयोगी येते. (या गोष्टी आर्मीत शिकवल्या जातात)(ज्ञान) परंतु कोकणात लोक काठी चा ( रात्रीच्या वेळेस काठी आणि कंदील) शतकानुशतके वापर करीत आले आहेत.( शहाणपण)
रात्री ट्रेकला झोपताना आजूबाजूला डांबर गोळ्यांचा चुरा पसरवावा त्यामुळे उंदीर घुशी आणि सापसुद्धा दूर राहतात. डांबर गोळ्यांचा वास हा सापाची जीभ संतृप्त(saturate) करून टाकतात त्यामुळे सापाची वासाने भक्ष्याचा माग घेण्याची क्षमता कमी होते. मुळात इतका उग्र वास असेल तर उंदीर खारी किंवा तत्सम जमिनिलगत राहणारे प्राणी आपणहून दूर राहतात त्यामुळे त्यांच्या मागे येणारे साप येत नाहीत. माणूस चार पायावर चालणे सोडून दोन पायावर चालू लागला त्याचे नाक जमिनीपासून दूर गेल्यामुळे जमिनीवर असलेल्या धोक्याची शक्यता कमी झालीतेंव्हा पासून त्याची वासाची क्षमता कमी झाली त्यामुळे आपल्याला डांबर गोळीच्या वासाचा तेवढा त्रास होत नाही)
मुळात कोणताही साप दिसला तर दुरूनच रामराम करावा. मग तो विषारी का बिनविषारी याच्याशी काय घेणे आहे? आपण बिबळ्या दिसला तर असे शौर्य दाखवलं काय? केवळ सापाचा आकार लहान असल्याने लोक शौर्य दाखवण्यास जातात. बिबळ्या शी झुंज म्हणजे जीवाशी खेळ हे नक्की माहित असल्याने तो लांबून दिसताच लोक धूम ठोकतात मग सापाशी खेळ कशासाठी?
सर्व सामान्य माणसांनी( म्हणजे तुम्ही आणि मी) साप पकडण्याच्याच काय त्याच्या जवळ जाण्याच्या सुद्धा फंदात पडूच नये असे माझे प्रामाणिक मत आहे. ते असामान्य ( जे डी सारख्या) माणसांवर सोडून द्यावे
मला असे वाटते कि या जे डी साहेबांच्या उत्कृष्ट लेख मालिकेतून आपण सर्व सापाच्या(विषारी व बिनविषारी) चार हात लांब राहायला शिकलो तर तर मालिकेचे सार्थक झाले असे वाटेल.
फुकाचा शहाणपणा करतोय, पण हा रॅटल स्नेक नसावा .. तो हामेरीकेतल्या वाळवंटात असतो, असं टिव्हीवर पाहीलंय.. त्याच्या शेपटीला एक खुळखुळ्यासारखा अवयव असतो. शेपटी हलवत ह्या खुळखुळ्याचा आवाज करुन तो 'अपुन इधर बैठेला है, संभालके बाप..' असा इशारा देतो.. :-) बाकी, जेडीसाहेब सांगतीलच..
रेटल स्नेक हा याच्याच कुटुंबातील अमेरिकेत स्थायिक झालेला सदस्य आहे. त्याचे मूळ स्वभाव, हल्ला करायची पद्धत, विषाचा प्रकार सारखाच असतो, फक्त चीगो ने लिहिले आहे तसे त्याच्या शेपटीला खुळखुळा असतो, त्यामुळे त्याला कुकर ची शिट्टी वाजवायला लागत नाही.
आधी एका प्रतिसादामध्ये मी लिहिले होते, इकडे माझा एक अमेरिकन मित्र रेटल स्नेक चा माज करत होता, मी त्याला आपल्या नाग, मण्यार, घोणस, फुरसे, साधा चापडा, मलबार चापडा (चापडा -पिट व्हायपर)या बद्दल सांगून झीट आणली होती, वरती म्हणालो होतो की "हे तर पुण्यात सापडतात, अजून दाट जंगलात घुसलो पण नाही, घुसलो तर अजून लिस्ट देईन."
लावणीतला पदर....देवा!
फरोड म्हणजे घोण्स हे आज समजल. पण गावी नक्की असच वर्णन आहे की फरोड चावला की माणुस शिजल्यासारखा फुटतो. नशिबाने पाहीला नाही आहे अस वाटत होतं, पण एकदा पुराच्या पाण्याबरोबर येउन काठावर पडला होता. बरोबरच्या मुलांनी (आम्ही शाळेत होतो) मारला होता.
ज्यांना हा साप चावला आहे त्यांच्या भाषेत,"उकळते तेल शरीराच्या आत मध्ये इंजेक्शन ने टोचायचे- म्हणजे घोणसाचा चावा !"
मागच्या लेखात निनादरावांनी इथे चांगला मुद्दा मांडला आहे.
मला असे वाटते की बलात्कार्यांना फाशीबिशी देण्याऐवजी घोणशीचे चुंबन घ्यायला लावावे. जगला तरी मरणप्रायः जीवन, मेला तरी त्याने त्याच्या व्हिक्टीमला दिलेल्या वेदना सव्याज त्याला परत, इतका तडफडून...
माफ करा, पण राहवलं नाही म्हणून अवांतर!
हे विष मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर (तर नागाचे मज्जासंस्थेवर) हल्ला करते, थोडक्यात म्हणजे रक्ताचे पाणी करते. रक्ताची गुठळ्या करायची क्षमता गंडल्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते,नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते...रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी फेल होऊन रुग्ण दगावतो
आणि 'घोणसाच्या विषाचे रक्तावर परीणाम' वाल्या व्हिडियोत दाखवलंय की रक्त गोठून जेलीसारखं होतं.. नेमके काय होते? तुझ्याकडून किंवा डाॅ. खरे ह्यांच्याकडून कळेल, असे वाटते.. धन्यवाद..
चिगो साहेब.
त्या व्हिडियो मध्ये रक्त गोठ्ताना दाखवले आहे जी रक्ताची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. तो विषाचा प्रभाव नाही असे मला वाटते( व्हिडियो चुकीचा आहे असे मला वाटते.) उलट घोणस किंवा फुरसे या सापाची विषे हि रक्तभंजक (haemolytic) असतात त्यामुळे रक्ताच्या पेशी फुटून निघतात आणि रक्त गोठवणाऱ्या प्रथिनांचे विभाजन झाल्याने रक्त गोठत नाही.उलट जर ते विष गोठलेल्या रक्तात मिसळले तर रक्त पातळ आणि प्रवाही होऊ लागते. यामुळेच घोणस चावलेल्या माणसाला गेल्या काही दिवसात झालेल्या क्षुल्लक जखमातून परत रक्तस्त्राव होऊ लागतो. त्या ठिकाणच्या केशवाहीन्यात तयार झालेल्या रक्ताच्या गाठी विरघळून रक्तस्त्राव सुरु होतो आणि रुग्णाला रक्ताचे फोड येतात.
जॅक साहेब अभिनंदन !! खूपच छान माहिती आणि अतिशय आकर्षक शैली. खूप दिवसांनी मिपावर आलो; सार्थक झाले. विषारी साप व विंचू याबद्दल महाडच्या डॉ. हिम्मतराव बावस्करांच्या आत्मचरित्रातही खूप डिटेलवार माहिती दिली आहे. तेही एक थोर संशोधक असून ह्या विषयावर अॅथॉरिटी मानले जातात. मी जबड्याचा सर्जन असल्याने माझा सल्ला घोणस दंशाच्या एका केसमध्ये घेतला गेला होता; रूग्णाच्या हिरड्यांमधून खूप रक्तस्त्राव होत होता, थांबतच नव्हता,तेव्हा मी डॉ. बावस्कर सरांना फोन करून माहिती विचारली होती. त्यांच्या सल्ल्यानुसार रूग्णास ए.एस.व्ही आणि ब्लड रिप्लेस्ड बाय ब्लड असे केले तेव्हा कुठे हिरड्यांमधला रक्तस्त्राव थांबला आण रूग्ण वाचला.
घराभोवती वाळू टाकली असता साप त्यावर सरपटू शकत नसल्याने धोका कमी होतो असे ऐकले आहे. अदरवाईज गमबूट आणि जाड जीन्स पॅन्ट वापरणे अन काठी आपटत जंगलात फिरणे हे प्रतिबंधात्मक उपाय करावेत.
आणखीन एक बातमी वाचलेली आठवते. घराची साफसफाई करताना एका माणसाला (पुण्यातच) साप चावला आणि दडून बसला. आजुबाजुच्या लोकांनी साप हुडकून मारला आणि मृत सर्पासकट त्या माणसाला दीनानाथ मध्ये आणला. तपासणी अंती डोक्टर म्हणाले की हा बिनविषारी सर्प असून भीतीचे काही कारण नाही. पण आपली प्रिकॉशन म्हणून त्या माणसास त्यांनी थोडावेळ आयसीयू मध्ये ठेवले. परंतु थोड्या वेळाने त्या माणसाचे बीपी खाली येऊ लागले, दंशाची जागा टम्म सुजली व इतर सर्व विषारी सर्पदंशाची लक्षणे दिसू लागली. आयसीयूवाले पण चक्रावले. त्यांनी तातडीने आवश्यक ती ट्रिटमेंट सुरू केली आणि त्याच्या नातेवाईकाना घरात नीट शोधाशोध करायला सांगितली तर अडगळीत लपून बसलेला एक नाग सापडला !! त्या माणसाला जर आयसीयूत निरिक्षणासाठी ठेवला नसता तर काही खरं नव्हतं !!
सापावरून अजुन एक चावट किस्सा आठवला.. दादा कोंडकेंच्या एका चित्रपटात दादा आपल्या नायिकेवर इम्प्रेशन मारण्यासाठी तिला सांगतो,"अगं मी तर आहेच पण माझे आजोबा तर इतके शूर होते की त्यांच्या धोतरात एकदा नाग सापडला होता !" मग ती भयचकित होऊन विचारते,"मग त्यांना चावला नाही तो..?" "अगं, एक नाग दुसर्या नागाला कधी चावत नसतो" इती दादा. ती विचारते,"म्हणजे..?" "अगं, माझ्या आजोबांचे नाव 'नागनाथ' होते !!"
मस्त प्रतिसाद दिला आहे.
डॉ. हिम्मतराव बावस्करांचे "ब्यारीस्टेर चे कार्टे " आणि काही संशोधन पेपर मी वाचले आहेत. खूपच चांगले काम ते कठीण परीस्थित,त्या परिस्थीतीवर न रडता करत आहेत.
त्या माणसाचा अनुभव खूप कॉमन आहे, पण तो माण्यारीच्या बाबतीत खूप वेळा घडतो. कारण मण्यार दुसऱ्या सापाला खायला घरात घुसते आणि दंश करते, आपल्याला तो बिनविषारी साप सापडतो. मण्यार चावली हे कळत पण नाही, आणि जेंव्हा कळते तेंव्हा उशीर झाला असतो.
दादा कोंडकेंना सलाम !
घराभोवती वाळू टाकली असता साप त्यावर सरपटू शकत नसल्याने धोका कमी होतो
वाळवंटातही साप आढळतात. वाळूऐवजी घराच्या भिंतींना सर्व बाजूंनी जमिनीपासून काही उंचीपर्यंत गुळगुळीत गिलावा केल्यास सापांना दूर ठेवण्यास मदत होते. साप हे खवल्यांच्या आधारे सरपटत असल्याने त्यांना थोडातरी खडबडीत पृष्ठभाग त्यासाठी गरजेचा असतो. वाळू त्यांना आडकाठी करू शकणार नाही. उलट त्यामुळे सापांना लपण्यासाठी मदतच होईल असे वाटते. त्याचप्रमाणे पाण्याचा खंदक करूनही उपयोग होणार नाही. साप केवळ अतिशीत पर्माफ्रॉस्ट प्रदेश वगळता इतर सर्व अधिवासांमध्ये आढळतात. त्यामुळे गुळगुळीत पृष्ठभाग हाच सापांना घरात येऊ न देण्याचा बराचसा खात्रीशीर उपाय आहे. इतर कुठल्या समजावर खातरजमा केल्याशिवाय विश्वास ठेऊ नये.
तुमचे बरोबर आहे, वाळूमुळे जास्त काही होणार नाही. मी मागे प्रतिसादामध्ये लिहिले होते की फिनैल किंवा बाथरूम धुण्याचे आसीड टाकावे, त्याच्या उग्र वासाने साप येण्याची शक्यता कमी होते. तंबू लावून राहणार असाल तर "सापासाठी खड्डा" (स्नेक त्रेंच) जो आर्मी मध्ये खोदायला शिकवतात तो खोदावा.
प्रतिक्रिया
(गैर) समज/प्रश्न
माझी माहिती
१)हा गैरसमज आहे, उलट तीव्र
धन्य आहेस..
अप्रतिम
धन्य आहे तुमची..
आमच्याकडे एक परड जातीचा साप
"परड" हे घोणसाचे लोकल नाव आहे
बरोबर
तुमचे लेख वाचवत नाहीत आणि
रसेल वायपर
तुम्हीपण भारी..
फारच सुंदर आहे !
उसळला तर काय, एक तृतियांश सेकंद...
धन्यवाद् ! खूप सही प्रतिसाद.
नेहमीप्रमाणेच मस्त..
साप हा खूप चपळ असतो, त्यातून
नेहमीप्रमाणे मस्त लेख...
उत्तम लिखाण
फारच माहितीपुर्ण लेखमालिका.
साप
तुमचा वक्तिगत संदेश तपासा.
फारच सुंदर लेखमाला! प्रत्येक
इतक्या डेंजर विषयावरचा मस्त
जबरदस्त लेख!
मस्त.
'वन ऑफ द बेस्ट' सीरिज ऑन मिपा
+१
ईथेले अनुभव आणि फोटो
सुपर्ब!
सापांचे स्वभाव
मी नागाच्या पिल्लाबद्दल
किंग कोब्राची मादी वेळुच्या
ट्रेक ला जाताना एक काठी बरोबर घेऊन जावे
रेटल स्नेक म्हणजे हाच का?
फुकाचा शहाणपणा..
रेटल स्नेक हा याच्याच
छान लेखमाला.
घोणसने मारलेली कुकरच्या आवाजासारखी शिट्टी
लावणीतला पदर....देवा!
तुम्ही खुपच सुलभ पद्धतीने माहिती देता
मस्त रे
घोणसचा चावा
एक शंका..
चिगो साहेब.
अप्रतिम लेख माला
मस्त प्रतिसाद दिला आहे.
मस्तच ….
थोडीशी सुधारणा
तुमचे बरोबर आहे, वाळूमुळे
Pagination