शेवटी भाषा हे फक्त माध्यम असते विचारांची देवाण घेवाण करायचे ... त्यामुळे माध्यम कुठले का असेना काय फरक पडतो ?
विशेष करुन विज्ञान आणि गणिताच्या बाबतीत मराठी प्रकर्शाने टाळावेच ... आधीच सामान्य माणसाला रुक्ष वाटणारे विषय मराठीतले शब्द वापरले की फारच किळसवाणे वाटतात ...
इतिहास भुगोल समाजशास्त्र अर्थशास्त्र ( तेही नॉन-क्वांट) वगैरे स्थानिक भाषेत असायला हरकत नाही ( इतिहासाच्या ४थी पासुन १० पर्यंतच्या इतिहासात मोडी लिपी का शिकवली जात नाही हा मला अजुनही न सुटलेला प्रश्न आहे . खरीखुरी कागदपत्र न वाचता कसला आलय डोंबलाचा इतिहासाच्या अभ्यास ... )
राहता राहिले भाषा विषय : भाषा विषय हे ज्या त्या भाषेतच शिकवले गेले पाहिजेत असे माझे कट्टर मत आहे... जेव्हा आमचा पुतण्या देवः चा उच्चार देव + : असा करतो तेव्हा फार कीव येते राव ह्या "जनरेशन्"ची ...संस्कृत संस्कृत मधुन शिकवणारा एक शिक्षक नसावा येवढ्या मोठ्ठ्या शाळेत ...अरेरे :(
(आधी कोणाच्या तरी लेखात वाचलेले वाक्य आठवते .... नुसती ओझी वाहु गाढवं झालीत ह्या पिढीतली मुले ... ह्यांना ना धड कालिदास समजणार ना कुसुमाग्रज ना फिराक ना शेक्सपीयर )
शेवटी भाषा हे फक्त माध्यम असते विचारांची देवाण घेवाण करायचे ... त्यामुळे माध्यम कुठले का असेना काय फरक पडतो ?
मला नाही पटत - भाषा हे आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. त्यातून आपली संस्कृती ओसंडून वाहत असते. इथे परदेशात राहताना कुणी जर मराठी बोलणारा मिळाला तर किती आनंद होतो म्हणून सांगू. आणि दोन मराठी माणसे "English" मध्ये जेव्हा संभाषण चालू करतात (कार्यालयाबाहेर ) तेव्हा तर काय वाटून घ्यायचे कळतच नाही.
जीवशास्त्र, भौतिक शास्त्र , रसायन शास्त्र आता काळा प्रमाणे इंग्रजीमधून शिकवीत. का? तर व्यवहारामध्ये त्यांचे इंग्रजी रूपांतराच अस्तित्वात आहे. मराठीतून आपण ते वापरत नाहीत. दक्षिणेच्या राज्यांमध्ये नक्की काय होते ते माहित नाही. पण पुण्याच्या शेतकी महाविद्यालयात तुम्ही जर गेलात तर तिथे उच्च शिक्षण मराठीमधून सुद्धा मिळते.
शेवटी आई आणि मम्मी मध्ये फरक हा राहणारच!!! "आई" या शब्दाची गोडी मला "मम्मी" मध्ये कधीच आढळली नाही.
विशेष करुन विज्ञान आणि गणिताच्या बाबतीत मराठी प्रकर्शाने टाळावेच ... आधीच सामान्य माणसाला रुक्ष वाटणारे विषय मराठीतले शब्द वापरले की फारच किळसवाणे वाटतात ...
चिकटवलेली भडकमकर मास्तरांची प्रतिक्रिया वाचा.
http://www.misalpav.com/comment/9401#comment-9401
हे केवळ आणि केवळ संस्कारांवर आवलंबून आहे. एखादया समाजात बुध्दिमान/ उच्च्भ्रू वर्ग (इलिट क्लास) जे करत असतो त्याचे अनुकरण अन्य वर्गाकडून होते आणि त्या आवडी मनात धरून बा़की नावडी ठरवल्या जातात. असो.
मराठी माणसाला मराठी "यायलाच" हवं आणि इंग्रजी "शिकायलाच" हवं. एव्हढं जरी कटाक्षाने पाळलं तरी मराठी संस्कृती आणि त्या अनुषंगाने येणारी समृद्धी, तसच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीचं ज्ञान आणि त्या अनुषंगाने येणारी समृद्धी; दोन्ही आपल्या कह्यात येतात. एकदा इंग्रजी देखील "यायला" लागली कि मराठीची थोरवी आणखी दृगोच्चर होते व आपल्या संस्कृतीबद्दल आदर दुणावतो. या बाबतीत शाळा दुय्यम महत्वाची आहे. माणसाचं घर हिच उत्तम शाळा.
अनेकदा विद्वान मराठी लोकांना बोलताना इंग्रजी शब्द वापरता येणे हे अभिमानास्पद वाटते. अगदी त्याऐवजी सोपा मराठी शब्द वापरता येत असला तरी. अशी इंग्रजीची भरपूर भेसळ असणारे मराठी बोलता येणे म्हणजे आपण कसे सुसंस्कृत, उच्चभ्रू आहोत अशी छाप पाडणे असे समजले जाते.
तथाकथित बुद्धीवंतांचाच हा दृष्टीकोन असेल तर अर्धशिक्षित वा उथळ, अडाणी लोकांनी तोच कित्ता गिरवला तर आश्चर्य ते काय?
आचार्य अत्रे जेव्हा इंग्लंडहून शिकून परत आले तेव्हा त्यानंतर लगेच त्यांना भाषण करण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी ते भाषण आधी लिहिले आणि ते अनेकदा तपासले, हे बघायला की ह्यात इंग्रजीची भेसळ तर केली नाही ना आपण. हे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे.
अज्ञानापोटी, सोपा प्रतिशब्द सुचत नाही म्हणून (जसे ईमेल, फ्याक्स इ.) इंग्रजी घुसडणे एक वेळ क्षम्य आहे. पण हे न्यूनगंडापोटी बोलले जाणारे भेसळलेले मराठी फार तापदायक आहे.
जाता जाता: इंग्रजी बोलताना शब्द आठवला नाही आणि मराठी शब्द वापरावा लागला तर मेल्याहून मेल्यासारखे होते पण मराठी बोलताना इंग्रजी शब्द वापरणे कधी खटकत नाही असे का? केवळ गुलामी वृत्ती की अजून काही? कदाचित त्या भाषेतील शब्द कानाला खरोखर जास्त गोड लागत असतील. काही प्रमाणात उर्दू /फारसी शब्दांबद्दल असे वाटते. असो.
मुलांना कायम घराजवळच्या शाळेत घालावं. राहिला प्रश्न मराठी माध्यमाचा अभिमान बाळगण्याचा, माझामते जोपर्यंत स्वतःला मुल होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सामाजिक असतो. स्वतःच्या मुलाला शाळेत घालायची वेळ आली की तो व्यक्तिगत होतो.
सामान्यपणे कुठल्याही पालकाची धडपड मुलाला आपल्याला परवडू शकेल आणि जे चांगला आहे ते देण्याची असते. जर एखादी मराठी शाळा उत्तम शिक्षण द्यायची हमी देत असेल तर पालक त्या शाळेत नक्कीच घालतील.
राहता राहिला प्रश्न मुलांना इतर भाषांमध्ये शिकायला न जमण्याचा. मला असं वाटतं कि बरेचसे पालक सगळ चांगलं तेच देण्याच्या नादात कधीच आपल्या मुलांचा विचार करत नहित. जे आपल्याला चांगल वाटतंय मराठी किंवा इंग्लिश, ते मुलाला आत्तातरी आवडतंय का? मला वाटत रोज आपल्या मुलाचा चेहरा नीट बघितला तरी बरेच प्रश्न सुटतील, तो बराच काही न बोलताच सांगेल.
" मात्र हेही नमूद करण्यासारखे आहे की २० व्या क्रमांकावर असलेल्या आणि ७ कोटींची (१.०६ % ) मातृभाषा असलेल्या तमिळच्या भाषिकांएवढा भाषाभिमान मराठी भाषिकांत नाही."
१०० % पटले. मी सुद्धा तेच म्हणतो. तिकडचे दक्षिणे कडचे लोक जर त्यांची मातृभाषा सोडत नाहीत तर आपणसुद्धा आपल्या भाषेचा अभिमान का बाळगू नये? सिंगापूर मध्ये तमिळ आणि मलय भाषा या अधिकृत मानल्या जातात. जर आपण आपल्या भाषेचा अभिमान बाळगला नाही तर पुढच्या पिढीला काय देणार?
बॅटमॅन यांचे उत्तर आवडले. मान्य आहे कि मराठी भाषा नक्कीच बदलत गेली आहे पण याचा अर्थ असा नाही कि आपण अशी इंग्रजाळलेली मराठी सरसकट वापरायची. "स्टडी कर नाहीतर गॉड तुला पनिश करेल हा!" च्यायला हि काय भाषा झाली? लहान मुले नक्कीच एकापेक्षा जास्त भाषा शिकू शकतात पण त्यांना आपण त्या शुद्धच शिकवायला हव्यात. या बाबतीत माझ्या मेहुण्याचा हा प्रयोग मला इथे नमूद करावासा वाटतो. त्याने आपल्या मुलाला तीनही भाषा शिकवल्या. वय वर्षे ३.५ आहे सध्या. फक्त सातत्य ठेवले. बाळाची आई मारवाडी आहे. ती बाळाशी हिंदी मध्ये बोलते. बाळाचे आजी आजोबा मराठीतून बोलतात तर बाळाचे वडील म्हणजे माझा मेहुणा त्याच्याशी इंग्रजीतून बोलतो. आणि या सर्वामध्ये सातत्य आहे. म्हणजे आजी आजोबा कधीच बाळाशी हिंदी मधून बोलणार नाहीत. त्यामुळे बाळ सुद्धा आईशी हिंदी (खरे तर मारवाडी ), बाबांशी इंग्रजी (जेवढे जमेल तेवढे ) आणि आज्जी आजोबांशी मराठीतून बोलते आणि प्रत्येकाला त्या त्या भाषेतूनच उत्तर देते. त्याचा हा प्रयोग मला फार आवडला.
नक्कीच इंग्रजी आपल्या मुलांना शिकवायला हवी. त्याला ना नाही. परंतु "गॉड तुला पनिश करेल" वाली नाही. तर चांगली शुद्ध शिकवा ना!
मी आदरणीय अमिताभ बच्चन यांच्या बद्दल असे ऐकले आहे कि त्यांची हिंदी अतिशय उत्कृष्ट आहे (बागबान मध्ये आपल्याला ते दिसतेच) आणि त्याच बरोबर त्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व ही. पण हिंदी बोलताना ते एकही शब्द ते इंग्रजी वापरणार नाहीत. भाषेवरील प्रभुत्व असावे ते असे.
माझ्या मुलांना मी सुद्धा मराठी शाळेत घालू इच्छितो. सर्वांना भेडसावणारा प्रश्न मलाही पडला आहे - चांगली मराठी शाळा. मी हि त्या चांगल्या मराठी शाळेच्या शोधामध्ये आहे. असे ऐकले आहे कि पुण्यामध्ये काही सुशिक्षित पालकांनी एकत्र येउन स्वतःची एक छोटी शाळा सुरु केली आहे आणि त्यामध्ये ते स्वतः येउन शिकवतात. मला वाटते "Home Schooling" चा प्रकार असावा. त्यांनी वेळा वाटून घेतल्या आहेत. म्हणजे कुणाचे "इंजिनिअर " बाबा येउन मुलांना गणित विषय शिकवणार. ते हि अगदी मराठी भाषेतून! एखाद्या मराठी मधील Ph.D. काकू येउन मुलांना मराठी भाषा शिकवतात. ज्यांना इतिहास शिकवायला आवडतो असे आणि ज्यांचा इतिहासाचा अभ्यास खरच खूप चांगला आहे असे तरुण येउन मुलांना छान गोष्टीच्या स्वरुपात इतिहास शिकवतात. (फक्त सन सनावळी पाठ करायला लावत नाहीत.) मी पा वर मला असे इतिहासाचे बरेच जाणकार दिसत आहेत ज्यांचा व्यासंग खरच छान आहे.
कुणाला त्याबद्दल काही माहिती असल्यास नक्कीच इथे सांगावी. सगळ्यांना लाभ होईल. कल्पना करा असे उच्च विद्याविभूषित शिक्षक जर आपल्या पाल्यांना मिळाले तर कोणाला नाही आवडणार?
तुम्ही म्हणाल कि नोकरी आणि धंद्याच्या कामाच्या व्यापातून कुठे वेळ मिळतो आपल्या पाल्यांना शिकवायला? पण मला वाटते कि आपण एवढे कष्ट करून जर शिकलो आहोत तर त्याचा उपयोग फक्त पैसे मिळवणे एवढाच न करता आपण आपल्या मुलांना जर शिकवले तर त्याचा त्यांना किती फायदा होईल! इथे नोकरी सांभाळून मुलांना शिकवायची जबाबदारी घेणे म्हणजे स्वयंशिस्त खूप लागणार. पण आपल्या मुलांचे चांगले संगोपन करण्यासाठी मला वाटते ते आवश्यक आहे.
माझा भाचा जो आता १० ला गेला आहे त्याला मी एक वर्षापूर्वी laptop भेट दिला. परंतु त्यावर games बरोबरच त्याला फुकट मिळणारे SQL SERVER आणि Visual Studio पण टाकून दिले. आणि छोटे छोटे programs त्याच्या कडून बनवून घेतो आहे. उदाहरणार्थ creation of web forms, connection to DB, Add ,Edit ,Delete operations सुद्धा त्याला जमायला लागली आहेत आता. जे मला येते ते त्याला शिकवायला मला अतिशय आनंद होतो आणि त्यालाही शिकायची आवड आहे त्यामुळे तोही शिकतो.
अगदी अगदी पटले.
प्रत्येक कागदावर, बोर्डावर , प्याकवर विंग्रजी कशाला हवी?
आपल्या देशात २४ की ३० की १५०० कितीतरी भाषा आहेत. प्रत्येकाने आपल्या भाशीचा अभिमान बाळगलाच पाहिजे. त्यामुळे साधा पारले जी चा पुडा असो की लक्स साबण, उगाच एकाच इंग्रजी भाषेत नाव लिवण्यापेक्षा त्या सगळ्या २४ की ३० की १५०० भाषेत नाव छापले तर देशाचा उद्धार नाही का होणार?
गाडी मुंबई ते चेन्नई असली की तिच्या तोंडावरही एका इंग्रजीतून नाव लिहिण्याऐवजी ती ज्या ज्या प्रांतातून जाते, त्या सगळ्या भाशांमधून नावे असावीत .
( शेवटी अभिमान महत्वाचा ! सोय आणि सुटसुटीतपणा जाईना का फाफलत, नै का? )
आपण कधी मुम्बैतील रेल्वे गाडीतुन प्रवास केला आहे का? किवा रेल्वेतुन प्रवास केला आहे का? असा प्रष्ण विचारावा लागला कारण रेल्वे (लोह्पथ गामी अग्नीरथ) फलाटावर जी उद्घोषणा होते ती आधी प्रादेशीक नन्तर्,राष्ट्रभाषेत नन्तर अन्तराष्ट्रीय भाषेत केली जाते,तसेच आपण वैद्यक क्षेत्रात काम करणारे आहात असे वाटते,तेव्हा औषधाच्या बाटली वजा खोक्यात असेच बर्याच भारतीय भाषान्त विवरण आढळते (औषधाचे माहितीवजा).
उगाच विरोधाला विरोध असेल तर ठीक आहे,मी विवरण असा शब्द वापरला आहे उद्घोषणा असा नव्हे तसेच,"देशी भाषांत औषधांची नांवे लिहायची पद्धत मुंबईत कुठे पहायला मिळेल?" हे आपणच जास्त जाणत असावात कारण आपण वैद्यकीय क्षेत्रात काम करता चु भु द्या घ्या
जपानी लोकांना जपानी भाषेचा अभिमान असतो याचा मराठी लोकांना अभिमान असतो.
हॅहॅहॅ... अगदी अगदी आणि जपानी उत्पादनांच्या दर्जा बद्धल सुद्धा ! मेड इन जपान इतक सोडल तर बाकी सगळीकडे कांजी जिंदाबाद !
आण्णा, त्या इस्राइल आणि जपानात त्यांच्या देशात एखादीच भाषा असते. शिवाय देश लहान, त्यामुळं त्याना फरक न्हाई पडत, इंग्लिशात लिवले काय आणि हिब्रुत लिहिले काय!
पण तुमच्या देशात तीस राज्यं, शिवाय जगभरात तुम्ही माल इकायची स्वप्ने बघणार, मग एकच भाषा चालत असेल आणि ती वापरली तर बिघाडलं कुठं?
बरं, माणसाच्या मेंदुला एकच भाषा येऊ शकते असा नियम नाही. पी व्ही नरशिंहराव, चिदंबरम ५ की ६ की ७ भाषा बोलतात म्हणे.
---- इंग्रजीत एम बी बी एस करुन पेशंटशी हिंदीत बोलणारा आणि पेशंट नसले की मोबाइलवर पु ल देशपांड्यांची मराठी प्रवचनं ऐकणारा.. उद्दाम .
जोवर चंद्र, सूर्य आहेत तोवर मराठीला, इंग्रजीला आणि ह्या विषयाला मरण नाही :)
इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपलं मूल हे इंग्लिश मिडियमात शिकलं तर स्मार्ट होईल, पुढे अभ्यासात मागे पडणार नाही, कॉलेजात इंग्लिश नीट बोलता न आल्याने उगाच त्याला कॉम्प्लेक्स येणार नाही, पुढे आयुष्यात सुद्धा त्याला काही त्रास होणार नाही, तेव्हा आपण त्याला इंग्लिश मिडियममध्येच घालूया
आमच्या पालकांनी येवढा विचार केला नसेल कदाचित, आणि त्याबद्द्ल मी त्यांचा शतशः आभारी राहीन. वैयक्तिकरित्या बोलायचे झाल्यास अस्मादिकांचे १० वी पर्यंतचे १००% शिक्षण मराठीत होवूनसुध्दा अगदी राणीच्या देशातही शष्प फरक पडला नाही.
सध्याच्या मराठी शाळांच्या दर्जाबाबत मात्र कल्पना नाही (आणि इंग्रजी शाळांच्यासुध्दा). पण एकच गोष्ट नमूद करावीशी वाटते की चांगली शाळा ही चांगलीच असते, भले ती मराठी, इंग्रजी,हिंदी, स्वाहिली, कुठलीही असो.
बाकी, त्या धेडगुजरी मराठी-इंग्रजी बोलणार्या पालकांना पाहिलं की माझा सटकलेला सिंघम होतो.
असो, लेखाची मांडणी आवडली.
(इंग्रजीवर मराठीइतकेच प्रेम करणारा) चावटमेला
कैक मुद्दे आहेत. वेळे अभावी थोडे मांडतो:
१. उत्तम शिक्षण देणार्या मराठी माध्यमांच्या शाळा अत्यंत दुर्मीळ झाल्या आहेत. माझ्या मुलीसाठी सद्ध्या शाळेचा शोध चालू आहे. परिस्थिती अत्यंत विदारक आहे. मी ज्या शाळेत शिकलो ती शाळा आणि आमच्यावेळी नावाजलेल्या शाळांना भेट देऊन आल्यावर तिथल्या शिक्षकांचीच शाळा घ्यावीशी वाटली. मराठी तर इतकं भयाण बोलत होते की सांगता सोय नाही.
२. मराठीत कितीही उच्च शिक्षण घेतले तरी ते महाराष्ट्राबाहेर १००००००% कुचकामी ठरते.
३. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलो आहे. कॉलेजमधे गेल्यावर सगळा अभ्यास अचानक इंग्रजीत समोर आल्याने पूर्णपणे हवा निघाली होती. सायन्सला असलेल्या मित्रांची अवस्था माझ्याहून वाईट झाली होती.
४. सद्ध्याच्या जगात चालणारे किती टक्के ज्ञान मराठीत उपलब्ध आहे?
५. कुणालाही उगाचच हजारो रुपये उधळायची खाज नसते. मराठी माध्यमाच्या शाळांमधली परिस्थिती बघता पैसे घेऊन का होईन निदान पाल्याला चांगलं शिक्षण मिळेल ह्याची खात्री असल्याने पैसे भरायला पालक तयार होतात.
६. कोणत्याही व्यवसायीक कसोटीवर मराठी भाषा इंग्रजी भाषेसमोर ०.१% ही उभी राहू शकत नाही.
मराठी भाषेचा अभिमान, जगासमोर उदाहरण, भाषेचा कैवार, इंग्रजाळलेली धेडगुजरी मराठी हे नेहेमीचे चाऊन चोथा झालेले विषय असल्याने त्यावर बोलायची गरज वाटली नाही.
मुलीला इंग्रजी शाळेत टाकूनही तिला अत्यंत उत्तम मराठी शिकवता येईल ह्याची खात्री मला आहे. दुनिया गेली भोकात.
>> मराठीत कितीही उच्च शिक्षण घेतले तरी ते महाराष्ट्राबाहेर १००००००% कुचकामी ठरते.
हे मला कळत नाही. इतकी अचूक टक्केवारी कशी काढली हाही कुतुहुलाचा विषय ठरेल. पण ते जाऊ द्या.
समजा एखादा सुतार आहे. पूर्ण मराठीत सुतारकाम शिकला आहे आणि उत्तम कारागीर बनला आहे. सुतारकामात अत्यंत उच्च शिक्षित आहे. आता तो राज्याबाहेर जाऊन सुतारकाम करु शकेल का नाही? नक्कीच करु शकेल. त्याचे शिक्षण मराठीत झालेले असले तरी विविध प्रकारची लाकडे, त्यांना हवा तो आकार देऊन हव्या त्या वस्तू बनवण्याचे कौशल्य कुठल्याही भाषा बोलणार्याला तितकेच उपयोगी पडेल ह्याची खात्री आहे. तीच गोष्ट गवंडी, लोहार, फार काय आयुर्वेदिक वैद्याबाबतही हेच लागू आहे तेव्हा आपला मराठीविषयीचा न्यूनगंड सोडावा.
२. कोणत्याही व्यवसायीक कसोटीवर मराठी भाषा इंग्रजी भाषेसमोर ०.१% ही उभी राहू शकत नाही
ही टक्केवारी कशी काढली? अशी कितीतरी उदाहरणे देता येतील जिथे एक वेळ इंग्रजी येत नसले तरी चालेल पण उत्तम मराठी येणे आवश्यक आहे. उदा. महाराष्ट्रात राजकीय नेता बनायचे असेल तर उत्तम इंग्रजी पुरेसे आहे का? महाराष्ट्रात भाड्याची घरे देणारा एजंट बनायचे असेल तर उत्तम इंग्रजी येते पण मराठीचा गंधही नाही असे चालेल् का?
मराठी शाळेत शिक्षक बनायचे आहे तर उत्तम इंग्रजी येते पण मराठीचा गंधही नाही असे चालेल का?
आपण आपला मराठीविषयीचा न्यूनगंड सोडावा ही विनंती. ही इतकी टाकाऊ, निरुपयोगी भाषा नाही.
हे म्हणजे असे वाटते की ओबामा त्या भव्य दिव्य श्वेत गृहात अर्थात व्हाईट हाऊसमधे रहातो. मी माझ्या टुमदार झोपडीत सुखाने रहातो. श्वेतगृह अगदी प्रचंड, दिमाखदार आहे पण माझी झोपडी माझी आपली आहे. मला ते आपलेपण त्या धवल वास्तूत मिळणार नाही. तीच गोष्ट इंग्रजी आणि मराठीची आहे. इंग्रजीची समृद्धी मान्य करण्यास प्रत्यवाय नाही पण म्हणून मराठी ही आपली भाषा आहे ही भावना रहाणारच.
हुप्प्या ह्यांनी जी उदाहरणं दिली आहेत ते व्यवसाय करण्यासाठी शाळाच काय नर्सरी मधेही जायची गरज नाही. अजून काही अशी क्षेत्रं आहेत - माळीकाम, भांडी घासणे, गाड्या धुणे, घोड्यांना खरारा करणे, उंटावरून शेळ्या हाकणे, इत्यादि.
इथे आपण ज्या माध्यमाविषयी बोलत आहोत त्या माध्यमातून आपण करिअर करायला लागणारे शिक्षण घेणार आहोत ही शक्यता गॄहीत धरलेली आहे. त्या अनुषंगाने मी माझे मुद्दे मांडले आहेत.
शिवाय मला माझ्या मातॄभाषेविषयी न्यूनगंड आहे असंही ठरवून ते मोकळे झाले आहेत. त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आता ती अवाच्या सवा टक्केवारी १००००००% वगैरे कशी काढली तेही सांगा बरे!
असो. सुतार्, गवंडी, लोहार वगैरे व्यवसाय हे तुच्छ आहेत, त्याकरता नर्सरीतही जाणे जरूरी नाही असे आपण ध्वनित करत आहात. हा दृष्टीकोन आपल्याला लखलाभ असो. पण माझ्या मते कुठल्याही प्रगत समाजात हे व्यवसाय आवश्यक आहेत. ह्या व्यवसायात उतरणारे लोक आपल्या दृष्टीने कस्पटासमान असले तरी तो एक सन्माननीय पेशा आहे. हा व्यवसाय उत्तम करु शकणारे लोक धनाढ्य बनू शकतात. त्याकरता अनुभव, प्रशिक्षण आवश्यक असते. कुणीही येरागबाळा उठून सुतारकाम करु शकेल, गवंडी वा लोहार बनू शकेल इतके हे काम सोपे नाही.
आपण आपला मातृभाषेबरोबरच ह्या आणि अशा व्यवसायांचा तिरस्कार करणे सोडून द्यावे ही विनंती.
शुभेच्छांबद्दल आभार!
मी हे व्यवसाय तुच्छ आहेत असं कुठेही म्हटलेलं नाहीये. फक्त हे व्यवसाय करण्यासाठी कुठलेली पुस्तकी शिक्षण घेण्याची गरज नाही. जसे की अभियंता (मेकॅनीक नाही) व्हायचे असल्यास अभियांत्रिकी विद्यालयात जाणे आवश्यक असते, वकील व्हायचे असेल तर वकिलीच्या कॉलेजात जाणे आवश्यक असते. पण सुतार व्हायचे असल्यास सुताराच्या हाताखाली काम करणे आवश्यक असते, शाळा कोणत्या माध्यमाची आहे त्याचा इथे काही संबंध नाही.
एखादे काम करायला कुठलेही प्रशिक्षण आवश्यक नाही ह्यात एक अध्याहृत विधान आहे की कुणीही येरागबाळा ते करु शकतो. आणि हा दृष्टीकोन तुच्छतेचाच आहे.आणि तो बदलणे आवश्यक आहे.
सुतार होण्याकरता सुताराच्या हाताखाली काम करावे लागते? आपण कुठल्या जमान्यात वावरत आहात? ह्या सर्व व्यवसायांचे प्रशिक्षण द्यायला खाजगी आणि सरकारी अनेक संस्था अस्तित्वात आहेत. त्या अत्यंत लोकप्रिय आहेत. आय टी आय, कोहिनूर ही काही उदाहरणे.
सुतार, गवंडी, लोहार ह्या लोकांना अभियांत्रिकीचे ज्ञान आवश्यक असते. ते केवळ अभियांत्रिकी महाविद्यालयातच दिले जाते हा गैरसमज आहे.
उदा. अमुक एक लाकूड न तुटता किती भार सहन करु शकेल, अमुक एका कामाकरता किती लाकूड लागेल आणि त्याचा भाव कसा लावायचा? तपमानाच्या, आर्द्रतेच्या चढ उतारामुळे लाकडाचे आकारमान बदलू शकते, त्याकरता काही वेगळी योजना करायची का? वगैरे वगैरे हे अस्सल अभियांत्रिकी प्रश्न आहेत. उत्तम प्रशिक्षण आणि अनुभव ह्या जोरावर लोक ह्यात पारंगत होतात.
मूळ मुद्दा हा की असे शिक्षण मराठीत झाले असले तरी कुठेही काम करता येते. मराठीतले शिक्षण निरुपयोगी ठरत नाही.
आता ती मनोरंजक टक्केवारी १००००००००%, ०.००००००००००१ % वगैरे कुठल्या अभियांत्रिकी सूत्रावर आधारित होती ते कळू द्या जरा! असो.
हुप्प्या ह्यांनी जी उदाहरणं दिली आहेत ते व्यवसाय करण्यासाठी शाळाच काय नर्सरी मधेही जायची गरज नाही. अजून काही अशी क्षेत्रं आहेत - माळीकाम, भांडी घासणे, गाड्या धुणे, घोड्यांना खरारा करणे, उंटावरून शेळ्या हाकणे, इत्यादि.
इथे आपण ज्या माध्यमाविषयी बोलत आहोत त्या माध्यमातून आपण करिअर करायला लागणारे शिक्षण घेणार आहोत ही शक्यता गॄहीत धरलेली आहे. त्या अनुषंगाने मी माझे मुद्दे मांडले आहेत.
शिवाय मला माझ्या मातॄभाषेविषयी न्यूनगंड आहे असंही ठरवून ते मोकळे झाले आहेत. त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
लेख म्हणुन ठीक,
ज्ञान मिळणं हे खरं, कुठल्या भाषेत मिळालं त्याने काही फरक पडत नाही.
मी मराठी शाळेत शिकलो. पहिल्यांदा काही अडचणी आल्या पण त्या आपोआप थोड्या दिवसांनी सुटतात.
सर्कीट मोड ऑन>
इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे,
हे कुठल्या धेड्गुजरी भाषेत आहे?
सर्कीट मोड ऑफ>
मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी लढणारे दोन पक्ष शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या दोन्ही पक्षप्रमुखांची मुले इंग्रजी माध्यमातच जातात/जात होती.
Ironically, Uddhav Thackeray's sons Aditya and Tejas as well as Raj Thackeray's children Amit and Urvashi have all studied at Bombay Scottish School.
दुवा :- Bombay Scottish School, Mahim
हा प्रकारच अस्तित्वात नव्हता तेव्हापासून मराठी भाषा टिकून आहे. केवळ शाळा बंद पडल्या म्हणून भाषा मरत नसते. भाषा हा संस्कृतीचा एक भाग आहे. त्यामुळे भाषेत होणारे बदल हे काळानुसार होऊ घातलेल्या सांस्कृतिक बदलांचे प्रतिबिंब असते. संस्कृती टिकवायची आणि वाढवायची असेल तर तिचा प्रवाह संकुचित करण्यापेक्षा ती सर्वसमावेशक कशी करता येईल याकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे.
पैसा किंवा संपत्ती हे देखील संस्कृतीचे एक अंग आहे. आज परदेशात दिसणारी संपत्ती ही त्यांनी स्वीकारलेल्या संस्कृतीतूनच निर्माण झालेली आहे. परदेशातून येणारा पैसा हा त्यांची संस्कृती बरोबर घेऊनच येणार. पैसा तर हवा पण संस्कृती मात्र नको हि सोयीस्कर भूमिका फार काळ टिकत नाही. स्वाभिमानाची किंमत मोजावी लागते. ती किंमत मोजण्याची तयारी आज तरी कोणी दाखवायला तयार नाही.
मी आयुष्यभर पुणे, महाराष्ट्र , भारत इथेच राहीन ह्याची काही खात्री नाही. जर संधी मिळाली तर जगभर फिरुन मुलाचे अनुभवविश्व समृद्ध करायला आवडेल. त्यामुळे मराठीतुन शिकवुन फायदा नाही.
२. पुढे जाऊन सगळं इंग्रजी मध्येच शिकायचं आहे. कशाला आणखी मराठी ते इंग्लिश हा संघर्ष त्याच्या आयुष्यात वाढवायचा?
३. आई वडील घरात उत्तम मराठी बोलत असतील, वाचनाची आवड असेल तर मुलही त्या वातावरणात मराठीशी नाळ जोडुन राहील. त्यामुळे तसाही माझा मुलगा उत्तम मराठी बोलेल आणि वाचेल ह्याची खात्री आहे. मराठी शाळेत जाउन चांगलं इंग्लिश बोलेलच ह्याची खात्री नाही कारण आम्हालाही बर्यापैकी इंग्लिश येतं..उत्तम नाही (त्या भाषेतील म्हणी वापरणे, जोक मारु शकणे, भांडु शकणे हे जमत नाही..)
४. मराठी शाळांपेक्षा इंग्लिश शाळांचा दर्जा चांगला असतो असे माझे मुळीच मत नाही. फक्त इंग्लिश माध्यम पुढे जाऊन मदत करणार म्हणुन त्याला प्राधान्य. बाकी माध्यमाचा आणि दर्जाचा संबंध नाही. उत्तम मराठी आणि भिकार इंग्रजी शाळा आहेतच.
माझ्या माहितितील महाराष्ट्रातील ज्या काही शिक्षणसन्स्था आहेत त्या बहुतेक आपल्या मराठी राजकारण्याच्या आहेत,काही गुजराथी मारवाड्यान्च्या सुद्धा आहेत पण मराठी सन्स्था चालक जास्त आहेत्,आणि दुर्दैव असे की त्या सन्स्थान्मध्ये त्या त्या समाजाच्या विद्द्यार्थ्यान्च्या जागा राखीव असतात म्हणजेच त्या त्या भाषिक विद्यार्थ्याना प्राधान्य दिले जाते पण मराठी सन्स्था चालक मात्र असे सौजन्य दाखवत सुद्धा नाहीत.
लेख आवडला.
वरती काहीजणांनी 'आजच्या जगातील किती ज्ञाननिर्मिती मराठीत होते!' असे असे म्हटले आहे. पूर्ण शिक्षण मराठीतूनच घ्यावे असा लेखकाचा आग्रह दिसत नाही (माझाही नाही). प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे जी भाषा आपल्या आजूबाजूला बोलली जाते अशा भाषेत घेणे कधीही हितकारक असते हे पटत नाही का? इंग्रजी माध्यमात शिकताना, लहान वयात ज्या संकल्पना बाणवायच्या त्या बाणवल्या जाण्यापेक्षा नवीन भाषा शिकण्यावर आणि त्या भाषेतून शिकण्यावर लक्ष केंद्रित होऊन जाते आणि मूलभूत संकल्पनांकडे अनेकदा दुर्लक्ष होते.
असाच आणखी एक मुद्दा. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या पाल्याशी बोलताना अनेकदा पालकच रंग, प्राणी वगैरेंसाठी इंग्रजी शब्द घुसडत बोलतात. पाल्यही मग कलर, पिंक, ब्लॅक, एलिफंट, बुक असे शब्द वापरतच मराठी बोलू लागतो. कितीही कच्चे इंग्रजी असले तरी इंग्रजीतले असे शब्द माहीत नसलेले किती लोक दिसतात? मात्र हे शब्द अगदी सुरुवातीला शिकवून आणि मराठीतही हेच शब्द वापरल्याने इंग्रजी माध्यमात शिकलेले अनेक जण मराठीत हेच शब्द वापरू लागतात!
बहुतेक सर्व प्रतिसादांतून मराठीच्या भवितव्याबाबत भीती व्यक्त केली गेली आहे. आज शाळांत शिकवले जाणारे मराठी 'भयाण' असते असाही मतप्रवाह आहे. पण आज नऊ कोटी लोक जी मराठी भाषा बोलतात तीच आजची 'दिव्य' मराठी आणखी चाळीस-पन्नास वर्षांनंतर प्रमाणभाषा होण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे हे जाणून घेतले पाहिजे. मराठी जिवंत आहे आणि पुढेही रहाणार आहे ती याच आणि अशीच मराठी बोलणार्या भाषकांमुळे. मराठीचे स्वरूप बदलतेय यात चिंता- भयग्रस्त होण्याचे काहीच कारण नाही. जो बदलेल तोच टिकेल हे निसर्गाचे तत्त्व भाषेलाही लागू आहे. ज्ञानेश्वरी, विवेकसिंधु सोडाच; तुकारामांचा गाथाही आज हाताशी संदर्भ साहित्य आणि तळटीपा असल्याखेरीज समजू शकत नाही. इंग्लिश माध्यमातली मुले आपापसात बोलताना सररास हिंग्लिशमधून बोलतात. तसेच महाराष्ट्रातल्या खेडोपाडी लोक 'मिंग्लिश' (इंग्लिश मिश्रित मराठी) मधून बोलू लागतील. 'देऊळ' चित्रपटात हा बदल सुंदर टिपला आहे. पण एक नक्की, जी टिकेल ती मराठीच असेल. फारतर प्राचीन मराठी, मध्ययुगीन्,अर्वाचीन, अद्यतन असे टप्पे निर्माण होतील इतकेच.
भाषेचे रुप कसे बदलते आहे ह्यावर दोन घटकांतील संघर्षाचा परिणाम होत असतो. एक जुन्या वळणाचे, भाषा टिकवण्याचा प्रयत्न करणारे, आपल्याच भाषेतील प्रतिशब्द बनवायचा प्रयत्न करणारे आणि दुसरे सर्रास नव्या शब्दांची आयात करणारे.
मला तरी सर्रास परक्या शब्दांची आळसापोटी वा अज्ञानापोटी केलेली आयात भयंकर वाटते.
डिफिकल्ट, एलिफंट, एक्झाम, गॉड तुला पनिश करेल अशा शब्दांची रेलचेल असलेली मराठी जास्त समृद्ध आहे का?
इंग्रजीने आपले असलेले शब्द सोडून परके शब्द आयात केले आणि आता तेच रुळले आहेत अशी किती उदाहरणे आहेत?
इंग्रजी शब्दांचा भरमसाठ वापर मराठीची प्रकृती बिघडवतो आहे हा मूळ मुद्दा होता हे आणि तो मुद्दाही मान्य. पण काही प्रतिसादांतून (भाषेच्या शुद्धाशुद्धतेचा?) एक वेगळा अंतःप्रवाह जाणवला. मराठी शाळांमधून दिले जाणारे शिक्षण हे दर्जेदार नसते आणि शिकवणार्यांचे मराठीही दिव्य असते असा काहीसा कल दिसला, त्याचा प्रतिवाद करायचा होता. आपण किंवा आपले आईवडील जी भाषा शिकलो ती त्याच रूपात पुढल्या पिढीपर्यंत पोचणे कठिण आहे. पन्नास वर्षांपूर्वी मराठीत मोर थुई-थुई नाचत असे, आता तो तकथैयाथैया नाचतो. कारंजे आता थुईथुई उडत नाही. जे शब्द किंवा संस्कृती आसमंतातून सतत आपल्यापर्यंत पोचत असतात तेच डोक्यात दृढ होतात. आता पंचवीस वर्षांपूर्वीचे शब्द, संस्कृती यांचा मारा आज आपल्यावर का होत नाही हा प्रश्न आहे. आजची पिढी वेगवेगळ्या भवतालांना फार वेगाने सामोरी जाते आहे. पूर्वी जे अवकाश १०० % मराठी आणि आपल्या संस्कृतीने व्यापलेले असे तसे आज नाही. आपल्या परिघामध्ये इतर अनेक गोष्टींचा शिरकाव झाला आहे आणि त्या प्रमाणात मूळ भाषा,संस्कृती बाहेर फेकली जात (डिस्प्लेस?) आहे. पेल्यात पाणी ओतले की त्यातली हवा बाहेर पडावी, तशी. त्यामुळे सध्याचे युग हे सरमिसळीचे युग बनले आहे आणि काही काळतरी ते तसेच राहील.
मात्र हेही नमूद करण्यासारखे आहे की २० व्या क्रमांकावर असलेल्या आणि ७ कोटींची (१.०६ % ) मातृभाषा असलेल्या तमिळच्या भाषिकांएवढा भाषाभिमान मराठी भाषिकांत नाही.
तमिळ लोकांना हिंदी शिकवलीच जात नसल्याने झक मारत त्यांना तमिळ भाषाभिमान वगैरे गोष्टी कराव्या लागतात. हिंदी येत नसल्याने बाहेरच्या राज्यात त्यांची मानसिक कोंडी होते. आता तर तमिळ भाषाभिमान वगैरे मागे पडलाय. हे लोक हिंदीचे क्लास बिस लावतात. बंगळूरात हाफिसांमधेही या लोकांच्या आग्रहाखातर हिंदीच्या शिकवण्या चालतात.
इंग्लिश पोटापाण्यासाठी आवश्यक हॅ हॅ हॅ.
पुण्यातल्या कोणता आय टी वाला हापिसात इंग्लिशमधे बोलतो. मीटींगचे टेबल असो नाहीतर जेवणाचे कुणीही आपले मराठी सोडत नाही. पुण्यात आय टी ची अधिकृत भाषा मराठी आहे.
माझे २ पैसे. मी १० वी पर्यंत मराठी माध्यमात आणि पुढे इंग्लिश माध्यमात शिकले. कुठेही काहीही प्रॉब्ळम आला नाही. कॉन्व्हेंटमधे शिकलेल्या पोरांचे दिव्य व्याकरण पाहून आमच्या इंग्लिशच्या सरांनी त्यांची कशी बिनपाण्याने केली ते अजूनही लक्षात आहे. आम्ही भावंडे साधारण ५ वीत गेल्यानंतर म्हणजे इंग्लिश, हिंदी शिकायची सुरुवात झाल्यानंतर माझ्या आईवडिलांनी मुलांसाठी असलेली इंग्लिश पुस्तके, मासिके आमच्यासाठी आवर्जून आणायला सुरुवात केली. तशीच चांगल्या हिंदी लेखकांची पुस्तकेही आम्हाला वाचायची गोडी लावली. परिणामी कोणतीही भाषा कमी किंवा जास्त महत्त्वाची वगैरे आम्हाला कधीच वाटली नाही.
इंग्लिश बोलण्याबद्दल अजिबात न्यूनगंड बाळगू नका. गोव्यात रस्त्यावर फिरून शाली विकणार्या बायका पण फॉरीनर्सबरोबर इंग्लिशमधे बोलून शाली विकतात. महाराष्ट्रातून गोव्यात आल्यानंतर आम्हाला समोरचा माणूस ज्या भाषेत बोलतोय त्या भाषेत बोलायला काही त्रास झाला नाही. गोव्यात आणि बेळगाव भागात उलट काही मंडळी मराठीच्या "आक्रमणाला" भितात. तरी माझ्या मुलांना गोव्यात असलेली प्राथमिक शिक्षण मराठीत, तेव्हा एक विषय इंग्रजी आणि ५ वी पासून इंग्लिश माध्यम ही पद्धत मला सर्वात योग्य वाटते. प्राथमिक शिक्षण मातृभाषेत घ्यावे याबद्दल कोणत्याही तज्ञाचे दुमत असू शकणार नाही. अर्थात ज्यांची मातृभाषा इंग्लिश आहे त्यांनी त्या भाषेत प्राथमिक शिक्षण घ्यावे हीही ठीक.
गोव्यात जेव्हा शिक्षणाचे माध्यम इंग्लिश असावे की की मराठी की कोंकणी असे पालकांकडून लिहून घेतले तेव्हा ६०% लोकांनी मराठी माध्यम पाहिजे असे लिहून दिले. त्यात सर्व थरातले आणि घरांत कोंकणी बोलणारेही लोक होते. मात्र कोकणी भाषा पाहिजे म्हणणार्यांची संख्या अगदी थोडी होती.
मराठी भाषा अशी मरणार वगैरे नाही. ती भीती कोंकणीसारख्या अगदी थोडे लोक बोलतात त्या भाषांना आहे. मात्र आधी इंग्लिश शिकायचे आणि मग त्यातले शिकायचे हे मुलांना नक्कीच कठीण जाईल. उदा. गवत म्हटलं की ५ वर्षाच्या मुलाला माहित असतं. ते कसं लिहिलंय एवढंच त्याला पुस्तकात शिकावं लागेल. मात्र मराठी घरातल्या इंग्लिश माध्यमाला गेलेल्या मुलाला अधी ग्रास हा शब्द म्हणजे गवत हे शिकावं लागेल आणि मग ग्रास कसं लिहायचं हे शिकावं लागेल. आपल्याला जे सोयिस्कर वाटेल ते करावं. पण त्यात मुलांना जड जातंय का याचाही विचार करावा. घरात आईबाप दोघांनाही इंग्लिश येत नाही, पण मुले मात्र हौसेने इंग्लिश माध्यमात घातली आहेत, मग त्यांचा होमवर्क करून घेण्यासाठी त्यांना नर्सरीपासून शिकवणीला पाठवायचे हा हास्यास्पद प्रकार पुण्यात पाहिला. त्या पालकांना साष्टांग नमस्कार!
याबद्दल खूप वाद झाले आणि होतील. पण केन्द्रीय साहित्य अकादमीने कोंकणीला १९७५ साली स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता दिली आणि केन्द्र सरकारने २० ऑगस्ट १९९२ ला पास केलेल्या घटनादुरुस्तीप्रमाणे कोंकणी ही स्वतंत्र आणि अधिकृत भाषा म्हणून ८ व्या परिशिष्टात समाविष्ट केली.
कोंकणीला स्वतःची अशी लिपी नाही. मात्र प्रामुख्याने देवनागरी आणि रोमी या २ लिप्या वापरल्या जातात. त्याशिवाय कन्नड, मल्याळम आणि अरेबिक लिपीही तुरळक प्रमाणात कोंकणीसाठी वापरल्या जातात.
प्रतिक्रिया
अजून एक
माध्यम
मला नाही पटत
मी देखील असहमत
एक फरक लक्षात घेणं महत्वाचं.
लाखमोलाचं बोललात..
न्यूनगंड
मुलांना कायम घराजवळच्या शाळेत
१०० % पटले
हाकानाका...
.
महाषय
उद्घोषणा नव्हे,
साहेब
...
जपानी लोकांना जपानी भाषेचा
.
पु ल देशपांड्यांची मराठी प्रवचनं
मी तर त्याला एकपात्री प्रयोग समजत होतो.....
.
कथाकथन हे प्रवचन असू शकत नाही का?
जोवर चंद्र, सूर्य आहेत तोवर
अत्यंत एकांगी लेख
दणक्या..
प्रतिवाद
वादासाठी वाद घालण्यात मला रस नाही
आभार
हुप्प्यासाहेबांचा विजय असो
चूक!
वादासाठी वाद घालण्यात मला रस नाही
उगं गम्मत.
ज्ञान मिळणं हे खरं
मराठी माणसा जागा हो ? जय महाराष्ट्र ? मराठीचा लढा ?
मुळात शाळा
मी आयुष्यभर पुणे, महाराष्ट्र
बिजीनेस
कपिल्मुनीजी
मराठी माध्यम की इंग्लिश
लेख आवडला.
एक मुद्दा
एक संघर्ष
इंग्रजी शब्दांचा भरमसाठ वापर
...
मात्र हेही नमूद करण्यासारखे आहे की २० व्या क्रमांकावर असलेल्या आणि ७ कोटींची (१.०६ % ) मातृभाषा असलेल्या तमिळच्या भाषिकांएवढा भाषाभिमान मराठी भाषिकांत नाही.तमिळ लोकांना हिंदी शिकवलीच जात नसल्याने झक मारत त्यांना तमिळ भाषाभिमान वगैरे गोष्टी कराव्या लागतात. हिंदी येत नसल्याने बाहेरच्या राज्यात त्यांची मानसिक कोंडी होते. आता तर तमिळ भाषाभिमान वगैरे मागे पडलाय. हे लोक हिंदीचे क्लास बिस लावतात. बंगळूरात हाफिसांमधेही या लोकांच्या आग्रहाखातर हिंदीच्या शिकवण्या चालतात....
एक नंबर
चांगला लेख
पैसा ताई
नाही
मराठीची लिपी
तसे पाहिले तर, मराठीलातरी स्वतःची अशी लिपी कुठे आहे?
Pagination